Sade Sati Storm 2025: साडेसातीचा धसका: साडेसातीत काय घडते ? त्यावर उपाय काय ?

Sade Sati Storm 2025
श्रीपाद गुरुजी

Sade Sati Storm 2025: वैडुर्य कान्तिरमलः शुभदः प्रजानां । बाणातसी कुसुमसवर्णनिभश्च शस्तः ।। पंचापि वर्णमुपच्चति तत्सवर्णान् । सूर्यात्मजः क्षपयतिति मुनि प्रवादः ।। ….बृहत्संहिता 

वैर्य मण्यासारखा तेजस्वी, कांतिमान व निर्मळ किरणांनी युक्त असलेला असा शनि योग्य रीतीने भ्रमण करीत असता प्राणीमात्रांचे कल्याणच करतो. 

तात्पर्य- 

बृहत्संहिताकार या श्लोकात म्हणतात त्याप्रमाणे शनि योग्य रीतीने भ्रमण करीत असता मानवाचे अकल्याण करतो. त्याचा अनन्वितपणे छळ करतो. हे आपण स्वतः अनुभवाने पाहत आलो आहोत. अशा या शनीची सर्वप्रथम सांगोपांग माहिती घेऊन मग या शनीचे अनिष्टत्व कोणकोणत्या साधना- उपासनांनी करता येते, ते क्रमवार पाहू या. 

शनि हा सूर्यमालेतील शेवटचा ग्रह आहे. हा सूर्यपुत्र असूनही सूर्याचे कोणतेही गुण यात नाहीत. हा फिक्कट, निस्तेज व राखेच्या रंगासारखा आहे. अत्यंत मंद गतीने चालणारा व अत्यंत उशीरा फल देणारा असा ग्रह आहे. एका राशीत तो अडीच वर्षे राहतो. ज्या राशीत शनि असेल, त्या राशीच्या मागच्या व पुढच्या एका राशीला त्याचा त्रास नेहमी चालू असतो. आता शनि सिंह राशीत आहे. मागील रास म्हणजे कर्क, सिंह, कन्या या राशीच्या लोकांना व पुढील रास म्हणजे कन्या या राशींना त्याचा त्रास सुरु आहे. कर्क, सिंह, कन्या यांना शनि साडेसाती सुरु आहे. जन्मकुंडलीतील चंद्राबरोबर गोचरीचा शनि आला कीं, तो त्या जातकाला छळतो. अनिष्ट फले त्याला देतो. 


गोचर शनि Sade Sati Storm 2025

जन्मकुंडलीतील चंद्र राशीपासून गोचर शनि पहिल्या, दुसऱ्या व बाराव्या स्थानातून भ्रमण करतो. त्या साडेसात वर्षाच्या कालवधीस ‘साडेसाती’ असे म्हणतात. शनिची साडेसाती म्हणजे नुकसान, त्रास, संकटांची परंपरा ही शनीची एक बाजू झाली. त्याची दुसरी बाजू वाखाणण्यासारखी आहे. तो कृपाळू-इष्ट झाला, तर जातकाचे कोटकल्याण करतो. ज्या स्थानात असेल ते स्थान आकुंचन करतो. म्हणजेच त्या स्थानात न्यूनता आणतो. त्या स्थानाविषयी किंवा संबधित गोष्टींवर आपला कुप्रभाव दाखवतो. त्या स्थानाचे नुकसान करतो. 

आयुष्यातील मोठमोठी स्थित्यंतरे शनी ग्रहामुळेच होतात. कुंडलीत शन्त्री ग्रहाचा प्रभाव नसेल तर कुंडलीच निर्जीव समजावी. शनी १४० दिवस सतत वक्री होत असतो. वक्री होण्यापूर्वी पाच दिवस स्तंभी असतो. मार्गी होण्यापूर्वी सुद्धा शनि पाच दिवस स्तंभी असतो. वक्री शनी अत्यंत तीव्र स्वरुपाची फले देतो. मानवी जीवनाच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊन जीवन सुखी व आनंदी होण्यासाठी शनीची अनुकूलता संपादन करणे आवश्यक आहे. 

थंडपणा, नपुंसकत्व, दगडांचा व्यापार, नीच कार्य, परिश्रम, उन्माद, वातरोग, भगंदर, स्नायुरोग, अडथळे, फारकत (डशरीिरींळेप), घटस्फोट, पति-पत्नीत बेबनाव, मतभेद, दुष्टपणा, ठग, पाकीटमार, काळारंग, साधुसंन्याशी, तत्त्ववेत्ता, राजकारण, लोखंडाचा व कोळशाचा व्यापार, यंत्रे व सुटे भाग, चामडे, चामड्याची पादत्राणे, मजूर वर्ग, खाणी व खनिज पदार्थ, कायमचे आजार, मृत्यू, दारिद्र्य, लोभ, मोह, रोग, कायद्याची आवड, विलंब, घोटाळा, दैन्य, गरिबी, गुन्हेगारी वृत्ती, पराधीनता, बेअब्रू, जनतेचा पुढारी, गरीबांसाठी स्वार्थत्याग करणारा, जनतेच्या सुखासाठी झटणारा, लोकशाहीचा पुरस्कर्ता इत्यादी गोष्टींचे कारकत्त्व शनी ग्रहाकडे आहे. 


मेदिनीय ज्योतिषशास्त्रात

मेदिनीय ज्योतिषशास्त्रात परराष्ट्राची संबंध, शत्रुत्त्व किंवा मित्रत्त्व, परदेशी वकील, परदेश मंत्री, सत्तेचे सत्तांतरण इत्यादींचे आधिपत्य शनि ग्रहाकडे आहे असे मानले जाते. शनीच्या मकर व कुंभ या स्व-राशी आहेत. मूल त्रिकोण राशी कुंभ आहे. उच्च राशी तुळ आहे. नीच राशी मेष आहे. याला तीन, सात व दहा अशा तीन दृष्ट्या आहेत. हा नपुंसक ग्रह असून पश्चिम ही त्याची दिशा आहे. बुध, शुक्र व राहू हे तीन ग्रह शनिचे मित्र आहेत. गुरु सम आहे व रवि, चंद्र, मंगळ हे तीन ग्रह शनिचे शत्रु आहेत. 

शनीचे धातू – सोने, उपधातु- लोखंड, रत्न-नीलमणी, धान्य उडीद, पशु- म्हैस, रस-तेल, वस्त्र काळे, पुष्प-काळी फुले, वार-शनिवार. 


शनि कोणाला शुभ? कोणाला अशुभ? 

मेष, मिथुन, सिंह, धनु, कर्क, वृश्चिक व मीन या राशी व लप्रांना शनि शुभ फले देतो. वृषभ, कन्या, तुळ, मकर व कुंभ या राशींना व लनांना शनि शुभ फले देतो. वृषभ, कन्या, मकर, व कुंभ या राशी लग्नांना शनि अशुभ फले देतो. चंद्रापासून ४, ८, १२ व्या स्थानी गोचर शनि आला म्हणजे अनिष्ट फले देतो. मूळ कुंडलीतील शनीपासून ४,८, १२ या स्थानी व्या स्थानी आला म्हणजे अनिष्ट फले देतो. 


शनिची साडेसाती कोणत्या राशीला केव्हा सुरु होते ? 

मेष राशी – Sade Sati Storm 2025

मीन, मेष व वृषभ या राशीत शनि गोचर भ्रमणाने जेव्हा येईल, तेव्हा मेष राशीची साडेसाती सुरु होईल. प्रत्येक राशीत मीन- अडीच वर्षे, मेष-अडीच वर्षे, आणि वृषभ – अडीच वर्षे याप्रमाणे एकूण साडेसात वर्षे शनीची साडेसाती मेष राशीला राहील. 

वृषभ राशी –

मेष, वृषभ, मिथुन या राशीत. शनि गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल, तेव्हा वृषभ राशीस साडेसाती सुरु होईल. प्रत्येक राशीत मेष-अडीच वर्षे, वृषभ – अडीच वर्षे, व मिथुन -अडीच वर्षे, याप्रमाणे एकूण साडेसात वर्षे शनीची साडेसाती वृषभ राशीला राहील. 

मिथुन राशी – Sade Sati Storm 2025

वृषभ, मिथुन व कर्क राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल. तेव्हा मिथुन राशीत साडेसाती सुरु होईल. प्रत्येक राशीत वृषभ अडीच वर्षे, मिथुन- अडीच वर्षे, कर्क-अडीच वर्षे याप्रमाणे एकूण शनिची साडेसात वर्षे साडेसाती मिथुन राशीला राहते. 

कर्क राशी –

मिथुन, कर्क व सिंह राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल. तेव्हा कर्क राशीला साडेसाती सुरु होईल. प्रत्येक राशीत मिथुन अडीच वर्षे, कर्क- अडीच वर्षे, सिंह-अडीच वर्षे याप्रमाणे एकूण शनिची साडेसात वर्षे साडेसाती कर्क राशीला राहते. 

सिंह राशी – Sade Sati Storm 2025

कर्क, सिंह व कन्या राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल. तेव्हा सिंह राशीत साडेसाती सुरु होईल. प्रत्येक राशीत कर्क- अडीच वर्षे, सिंह-अडीच वर्षे, कन्या अडीच वर्षे याप्रमाणे एकूण शनिची साडेसात वर्षे साडेसाती कर्क राशीला राहते. 

कन्या राशी –

सिंह, कन्या व तुळ राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल. तेव्हा कन्या राशीत साडेसाती सुरु होईल. प्रत्येक राशीत कन्या-अडीच वर्षे, तुळ-अडीच वर्षे, वृश्चिक अडीच वर्षे याप्रमाणे एकूण शनिची साडेसात वर्षे साडेसाती कन्या राशीला राहते. 

तुळ राशी – Sade Sati Storm 2025

कन्या, तुळ व वृश्चिक राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल. तेव्हा सिंह राशीत साडेसाती सुरु होईल. प्रत्येक राशीत कर्क- अडीच वर्षे, सिंह-अडीच वर्षे, कन्या अडीच वर्षे याप्रमाणे एकूण शनिची साडेसात वर्षे साडेसाती कर्क राशीला राहते. 

वृश्चिक राशी –

तुळ, वृश्चिक व धनु राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल. तेव्हा सिंह राशीत साडेसाती सुरु होईल. प्रत्येक राशीत कर्क -अडीच वर्षे, सिंह-अडीच वर्षे, कन्या-अडीच वर्षे याप्रमाणे एकूण शनिची साडेसात वर्षे साडेसाती कर्क राशीला राहते. 

धनु राशी – Sade Sati Storm 2025

वृश्चिक, धनु व मकर राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल. तेव्हा धनु राशीत साडेसाती सुरु होईल. प्रत्येक राशीत वृश्चिक – अडीच वर्षे, धनु-अडीच वर्षे, मकर अडीच वर्षे याप्रमाणे एकूण शनिची साडेसात वर्षे साडेसाती धनु राशीला राहते.  

मकर राशी –

धनु, मकर व कुंभ राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल. तेव्हा धनु राशीत साडेसाती सुरु होईल. प्रत्येक राशीत वृश्चिक – अडीच वर्षे, धनु- अडीच वर्षे, मकर अडीच वर्षे याप्रमाणे एकूण शनिची साडेसात वर्षे – साडेसाती धनु राशीला राहते. 

कुंभ राशी – Sade Sati Storm 2025

मकर, कुंभ व मीन राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल तेव्हा कुंभ राशीला साडेसाती सुरु होईल. प्रत्येक राशीत मकर – अडीच वर्षे, कुंभ-अडीच वर्षे, मीन अडीच वर्षे याप्रमाणे एकूण शनिची साडेसात वर्षे साडेसाती कुंभ राशीला राहते. 

मीन राशी –

कुंभ, मीन व मेष राशीत गोचर भ्रमणाने जेव्हा शनि येईल. तेव्हा मीन राशीला साडेसाती सुरु होईल. प्रत्येक राशीत कुंभ अडीच वर्षे, मीन-अडीच वर्षे, मेष अडीच वर्षे याप्रमाणे एकूण शनिची साडेसाती साडेसात वर्षे मीन राशीला राहते. 


शनिची स्थानगत फले- 

प्रथमस्थान – Sade Sati Storm 2025

प्रथमस्थान म्हणजे लग्नस्थानी असलेला हा शनि नीचस्थ, शत्रूक्षेत्री किंवा दुर्बल असेल तर अशुभ फले देतो. असा जातक विशेषतः लहानपणी अल्पश्रीमंत, कामुक, आळशी, अस्वच्छ राहतो. मातापित्यांपैकी एकाचे सुख कमी असणारा, नाकात किंवा शरीरात काही व्यंग असलेला असतो. या जातकाला त्याच्यापेक्षा जास्त वयाची किंवा वयस्कर दिसणारी पत्नी मिळते. याला आयुष्यही कमी असते. कफप्रकृती व खरजेसारखे रोग व वातरोग याला होतात. शरीरप्रकृती द्विवर्ण व डोक्यावर केस कमी असतात. डोक्यावर मार लागण्याची भीती असते. दात मोठे असतात. कानाचे व दातांचे विकार होतात. कामुक असल्याने स्त्रीचा गुलाम असतो. प्रकृती स्थुल असते.

अशा जातकाची दृष्टी जर कोणत्याही प्राण्यावर अथवा वस्तूवर पडली, तर त्या प्राण्याच्या किंवा वस्तूचा नाश होतो. हा फारच लोभी असतो. मूळ पत्रिकेत शनिवर चंद्राची दृष्टी असेल तर जातक परावलंबी किंवा गुलाम बनतो. ही फले दुर्बल, पापी किंवा अनिष्ट शनिची आहेत. जर शनि बलवान असून उचीचा असेल, विशेषतः धनु, मीन, तुळ, मकर किंवा कुंभ राशीचा असून तो प्रथमस्थानी असेल तर अत्यंत शुभ फलें मिळतात. जातक संपन्नयुक्त व राजमान्य असतो. विद्वान, सुंदर, समाजात प्रतिष्ठा व गंभीर प्रवृत्तीचा असतो. कमी वयातच म्हाताऱ्यासारखा गंभीर व समजूतदार असतो. आयुष्यही खूप दीर्घ असते. प्रथम स्थानातील शनि चर्तुर्थेश किंवा दशमेशाच्या राशीचा असेल, तर याला उच्च अधिकार व राजयोग देतो. 

द्वितीयस्थान

द्वितीयस्थानी म्हणजे धनस्थानी शनि असता तोंडात काहीतरी रोग उद्भवतो. डोळ्यांचे रोग व मुखरोग होतात. आर्थिक दष्टीने जातक संपन्न असतो. परंतु फसवणूक किंवा दंड यामुळे धनक्षय होतो. स्पष्टवक्ता व न्यायप्रिय असतो. कोणाच्याही पुढे पुढे न करण्याची वृत्ती व स्पष्टवक्तेपणा यांमुळे मित्र कमी असतात. सगेसोयऱ्यांशी सुद्धश संबंध नीट राहत नाहीत. बहुधा असे जातक जन्मस्थानापासून दूर जाऊन उपजिविका चालवितात. जन्मगावी यांचा भाग्योदय होत नाही. शनि नीचेचा किंवा दुर्बल अथवा पाप ग्रहाने युक्त असेल, तर जातक खोटारडा, ठग, चोर सुद्धा होऊ शकतो.

याला याच्या पत्नीकडून धोका संभवतो. असा जातक शत्रूचा सहार करणारा असतो. लोखंड, लाकूड किंवा कोळशाच्या व्यापारात फायदा होतो. या जातकाला शेती फायदेशीर ठरत नाही. मंदिराच्या किंवा धार्मिक संस्थेचा फायदा होतो. या जातकाला शेती फायदेशीर ठरत नाही. मंदिराच्या किंवा धार्मिक संस्थेचा संचालक असू शकतो. अशा जातकाची बहिण अल्पायु असते. अशा जातकाला दोन पत्नी असतात. याला लहान भाऊ असतो. तूळ राशीचा शनि जातकाला चांगली फळे देतो. 

तृतीयस्थान Sade Sati Storm 2025

तृतीयस्थानी म्हणजे सहजस्थानी शनि असता तो शुभ फले देणारा असतो. असा जातक पराक्रमी, शूर, दानी, परोपकारी, विद्वान असतो. आर्थिक स्थिती चांगली असते. आपल्यापेक्षा लहान भावाबहिणींचे सुख नसते. संततीतही गर्भपात वगैरे मुळे अडथळे निर्माण होतात. धनप्राप्ती होऊन यशस्वी जीवन जगतो. शासनाकडूनही मान मिळतो. कामवासना प्रबळ असते. यांच्या व्यक्तिमत्त्वावर व पुरुषार्थावर स्त्रिया भाळतात. काहीतरी न्यूनता भासत राहिल्याने असा जातक जीवनात असंतुष्ट राहतो. कौटुंबिक कारणांमुळे किंवा विघ्नबाधेशिवाय कोणतेही कार्य सफल होत नाही. यामुळे ही काहीसा असंतुष्ट असतो. तृतीय स्थानातील शनिचा उच्चीचा किंवा स्वक्षेत्री, शुभ असेल तर भावाबहिणींचे सुख मिळते. आरोग्य चांगले असते. तुळ किंवा मकर अथवा कुंभ राशीचा शनि असेल तर आरोग्य चांगले राहते, अन्यथा वातविकार व हातात दोष उद्भवतो. २ P ४ ५ ७ ९ ६ ८ 

पाश्चात्य ज्योतिषांच्या मते तृतीयस्थ शनि शुभ भावात, शुभ ग्रहांनी युक्त असेल तर विवेक, सहनशीलता, शांत चित्तवृत्ती जातकात आढळते. अनेक विषयांचे ज्ञान, व्यावहारिक चातुर्य, प्रवासात सुख, लेखन व प्रकाशनाच्या व्यवसायात फायदा होतो. गूढशास्त्रातही गती असते. याविरुद्ध दुर्बल किंवा पापग्रहाने युक्त शनि तृतीयस्थानी असेल तर शेजारीपाजारी, भावंडे, इष्टमित्रांशी संबंध सुखकारक नसतात. त्यांच्याकडून सहकार्य मिळण्याऐवजी नुकसान भोगावे लागते. शिक्षणात अडथळे, प्रवासात दगदग व नुकसान, विचारात प्रगलभता व विद्वत्तेचा अभाव असतो. वातवायुसंबंधी विकाराने प्रकृतिस्वास्थ्य नरम-गरम असते. 

चतुर्थस्थान- 

चतुर्थस्थानी म्हणजे सुखस्थानी शनि उच्चीचा किंवा स्वक्षेत्रीचा असेल तर तो अनिष्ट नसून तो शुभफले देतो. मेष किंवा वृषभ राशीचा शनि असेल तर तो जातकाला दीर्घायुषी बनवतो व आईचे सुखही चांगले मिळते. अनिष्ट शनि २ १२ असेल तर मानसिक त्रास, दुःखदायी जीवन तसेच आईचे सुख मिळत नाही. सावत्र आई असण्याचा संभव असतो. जर शनि अष्टमेश असून ता चतुर्थात असेल तर निश्चितपणे आईच्या सुखाचा नाश करतो. लहानपणी आरोग्य मध्यम प्रकारचे. असते. विशषतः वातरोगाने ग्रस्त ८ असतो. अशा जातकाचे केस व नखे मोठी असतात.

चतुर्थातील शनि पापग्रहाने युक्त किंवा दुर्बल असेल तर हृदयविकाराची भीती असते. भावंडांचे व नातेवाईकांचे सुखही कमी मिळते. चतुर्थस्थानात शनि वक्री असेल तर जन्मस्थानापासून दूर रहावे लागते व अधिक कष्ट सहन करावे लागतात. वडिलोपार्जित संपत्ती भोगण्यात दूर रहावे लागते व अधिक कष्ट सहन करावे लागतात. वडिलोपार्जित संपत्ती भोगण्यात अडचणी येतात. 

पंचमस्थान Sade Sati Storm 2025

पंचमस्थान म्हणजे सूतस्थानी शनि असता संततीचे सुख मिळत नाही. पंचमस्थानातील शनि अत्यंत दुर्बल व पापाक्रांत असेल तर पुत्र संतती होत नाही. सामान्यपणे पंचमातील शनि उच्चीचा किंवा स्वगृहीचा असेल तर उत्तम फल देतो. अन्यथा पंचमातील शनि मध्यम फले देतो. जीवन विशेष संपन्न नसणे, मन नेहमी उदिग्न व चिंतातूर असणे, बुद्धी, विवेक काम न देणे, मित्र कमी असणे, जीवन सुखी नसणे, अशी फले मिळतात. परंतु जातक कूटनीतिज्ञ, शत्रुहन्ता व दीर्घायु असतो. शनि दुर्बल व पापाक्रांत असेल तर हृदयरोग उद्भवतो. तंत्रमंत्रात जातकाला रुची असते व त्यातच त्याला नुकसान सोसावे लागते. शनिवर गुरुची दृष्टी असेल तर दोन विवाह होतात व दुसऱ्या पत्नीला संतती होते. स्त्रियांच्या कुंडलीतील पंचमातील शनि उशिरा संतती देतो. प्रजोत्पादन शक्ती कमी असते. 

षष्ठस्थान

षष्ठस्थानी म्हणजे शत्रुस्थानी शनि असेल तर जातक धडधाकट, अत्यंत कामातूर, शूरवीर, भोजनभाऊ, संपन्न व शत्रुसंहारक असतो. खूप शत्रू असतात, परंतु अंतिम विजय या जातकाचाच होतो. स्त्रियांच्या कुंडलीतील शनि घरात सवत आणतो. समाजात प्रतिष्ठा असलेला, काव्यरसिक व निरोगी असतो. शासनाकडून सन्मान मिळतो P ७ ९ ८ मामा-मावशीकडून सुख कमी मिळते. 

गुद्दाराचे रोग, प्रमेह व वातरोग, लकवा, पोलिओ यासारखे रोग उद्भवतात. जर शनि षष्ठात किंवा षष्ठेश असेल तर तो अनिष्ट फले देतो. वात, शूल व व्रण उद्भवतात. षष्ठातील शनि मंगळाबरोबर असेल, तर विदेश यात्रा होते. पाश्चात्य ज्योतिषांच्या मते षष्ठातील शनि यकृत, पित्ताशय, दमा, आंव, आमाशय, अपेंडिक्स, डिप्थेरिया, घटसर्प, हृदयविकार निर्माण करतो. 

सप्तमस्थान – Sade Sati Storm 2025

सप्तमस्थानी म्हणजे पति/पत्नी व व्यापारस्थानी शनि असता पत्नी सुखात न्यूनता येते. दांपत्यजीवन सुखी नसते. स्त्रियांच्या कुंडलीतील सप्तमस्थानातील शनि पतीची न्यूनता आणतो. दांपत्यजीवन सुखी नसते. स्त्रियांच्या कुंडलीतील सप्तमस्थानातील शनि पतीशी पटू देत नाही. जातक पत्नीकडून वारंवार अपमानित होतो. पत्नीचे सुख दीर्घ कालापर्यंत लाभत नाही. पत्नीचे आचरण भ्रष्ट असते किंवा पत्नी रोगी असते. ‘जातक पारिजातकात’ आचार्य वैद्यनाथांच्या मते अशा जातकाची पत्नी उन्नत वृक्षस्थळे असलेली असते. अचार्य गर्ग यांच्या मतें पत्नीत कामेच्छेचा अभाव असतो. महर्षी भृगूंच्या मते सप्तमात मकर, कुंभ किंवा तुळ राशीचा शनि असेल तर’ भगशिश्नचुंबनपरः’ असा कामुक असतो. इतर राशींचा शनि सप्तमात असेल तरी सुध्दा परस्त्री समागम व वेश्यागमनाकडे ओढा असतो. 

सप्तमातील शनि विवाहाला विलंब लावतो व अडचणी उत्पन्न करतो. जातक निर्दयी, नास्तिक, हिंसक व असच्छ असतो. आर्थिक परिस्थिती साधारण असते. पैसा मिळविण्यासाठी खूप धडपड करावी लागते. प्रवासही करावे लागतात. मित्रांकडून योग्य सहकार्य मिळत नाही. स्त्रियांच्या कुंडलीत सप्तमातील शनि असेल तर त्यांना त्यांच्यापेक्षा अधिक वयस्कर किंवा विधूर पती मिळतो. सप्तमात शनिबरोबर चंद्र असेल तर सांसारिक सुख मिळत नाही. व्यापारातील भागीदारी व कोर्टकचेरीच्या कामात अपयश येते. 

अष्टमस्थान

अष्टमस्थानी, म्हणजे मृत्यूस्थानी शनि असता रक्तीमूळव्याध, भगंदर, गुद्द्वाराचे रोग, नेत्रविकार, कुष्ठरोग, खोकला, विषुचिका, हृदयरोग, खाजखरुज, फोड, पुटकुळ्या, वातरोग, प्रमेह इत्यादी रोगांमुळे जातकाचे शरीरस्वास्थ्य मध्यम असते. कोणताही रोग होऊ शकतो. अष्टमात तूळ, मकर किंवा कुंभ राशीचा शनि असेल तर ३ १ ४ ५ ७ ९ ६ ८ जातकाला दीर्घायु बनवतो. शत्रूक्षेत्री नीचीचा किंवा अष्टमेश नीच राशीचा असून शत्रुक्षेत्री असेल तर आयुष्य कमी असते. शनि अष्टमात मेष राशीचा शनि असेल तर भुकेमुळे, वृषभ राशीचा असेल तर धनामुळे, मिथुन राशीचा असेल तर अतिजेवणामुळे किंवा उपवासामुळे, कर्क राशीचा शनि असेल तर शत्रूच्या हाताने किंवा कावीळीमुळे,

कन्या राशी असेल तर क्षय किंवा प्रमेह रोगामुळे, तूळ राशीचा शनि असेल तर पक्षघात किंवा पक्षी चावल्याने, धनु राशीचा शनि असेल तर फोड झाल्यामुळे किंवा पशुच्या हल्ल्याने, मकर राशीचा असेल तर घोड्यामुळे, मीन राशीचा शनि असेल तर गाढवामुळे मृत्यू येतो. अष्टमस्थानातील शनि कमी संतती देतो. पुत्रसंततीत बाधा आणतो. स्त्रियांच्या अष्टमातील शनि गर्भाशयातील दोष उत्पन्न करतो, जातक वादविवाद करणारा, शूर पण रागीट असतो. अर्थिकनुकसानीचे प्रसंग वारंवार येतात. बहुधा जन्मस्थानापासून इतर ठिकाणी भाग्योदय होतो. शनि पापी किंवा अनिष्ट असेल तर चोरी करण्यापडे प्रवृत्ती असते. त्यामुळे शिक्षा किंवा दंड भोगावा लागतो. 

नवमस्थान Sade Sati Storm 2025

नवमस्थान म्हणजे भाग्यस्थानी शनि असता हा शनि शुभ, बलवान, उच्चीचा किंवा स्वगृहीचा असेल तर जातक संपन्न, सुखी, संतानसुखाने युक्त, शूरवीर, धर्मात्मा, लोक- कल्याणाची कामे करणारा, धार्मिक व सांस्कृतिक कार्याचे यशस्वी संचालन करणारा, राजस प्रकृतीचा, राजमान्य, ३ १ ७ ९ ६ ८ योगशास्त्रात गती असणारा असतो. वैराग्यभावामुळे असे जातक संन्यासीही होतात. बलवान शनिमुळे संन्याशी बनून मठाधीश होतात. आयुष्याच्या ३९ व्या वर्षी मंदिर, सार्वजनिक विहिरीचे बांधकाम होते. एखाद्या मंदिराचा जीर्णोद्वार देखील होतो. वडिलांचे सुख दीर्घकाळ मिळते. 

याउलट शनि नीच, अस्त, पापपीडित व दुर्बल असेल तर वडिलांचे सुख कमी मिळते. अशा जातकाने संन्यास घेतला तरी तो अध्यात्मिक दृष्टीने घेतलेला नसून पोट भरण्यासाठी घेतलेला असतो. असा संन्याशी ठग, धूर्त असतो. असा जातक नास्तिक, चारित्र्यभ्रष्ट, सुखाने वंचित असलेला, परस्त्रीगामी असतो. पत्नी, संतती, मित्र इत्यादिंचे सुख त्याला लाभत नाही. शरीरात विशेषतः पायात काही विकार असतो. 

दशमस्थान

दशमस्थान म्हणजे कर्मस्थानी शनि असेल तर बहुधा चांगली फले मिळतात. दशमस्थानी शनि असलेला जातक धाडसी, बुद्धिवान, संपन्न, सुखी व अधिकारप्राप्त असा असतो. आपल्या समाजातही त्याला प्रतिष्ठा आणि पुढारीपणा लाभतो. शत्रूचा संहार करणारा, स्वपुरुषाने प्राप्ति करणारा असा असतो. वडील निर्धन तरी ३ P PP ५ ७ ९ ६ ८ असतात किंवा आईवडिलांचे सहकार्य-सुख याला कमी लाभते. जर शनि दुर्बल, नीच पापयुक्त असेल, तर अनिष्ट फले मोठ्या प्रमाणात मिळतात. जातक दुर्बुद्ध, दुराचारी, शत्रूनी घेरलेला, मातापित्याच्या सुखाला पारखा झालेला असतो. प्रत्येक कार्यात अडचणींना तोंड द्यावे लागते. लोभी असतो. पायात विकार असतो, पित्त विकाराने त्रस्त झालेला असतो. 

दशमातील शनि बलवान, उच्चक्षेत्री असेल तर खूप चांगली फले मिळतात. शेती-उद्योगात फायदा मिळतो. मित्रपरिवार मोठा असतो. वयाच्या ३६ व्या वर्षी भाग्योदय होतो. सामाजिक व राजपकीय कार्यात पुढाकार असतो. वयाच्या २५ व्या वर्षी काहीतरी पुण्यकार्य हातून होते. दशमातील शनि सतत सत्तेत स्थान देतो. अध्यात्मिक वृत्तीही असते. दशमात शनि मीनेत असेल तर जातक संन्यास घेतो. 

एकादशस्थान Sade Sati Storm 2025

एकादशस्थानी म्हणजे लग्नस्थानी शनि असता बहुधा चांगली फले देतो. असा जातक भरपूर धनसंपत्ती असलेला, निरोगी, दीर्घायू, शिल्प व इतर कलेत पारंगत, शूर, वीर, बहादूर, मित्र व जनशक्ती पाठीमागे असलेला, नोकर-चाकर पदरी असलेला व स्थिर संपत्ती असलेला असतो. काहीं संतती अल्पायु असते. प्रथम संतती अल्पायुषी किंवा मृत जन्माला येते. लहानपणी रोगी असतो. बहुधा शेती व्यवसायातून लाभ होतो. राज्यशासनाकडून सन्मान मिळतो. मकर किंवा कुंभेचा शनि एकादशात असेल तर जातक विद्वान व महाभाग्यशाली असतो. मकर किंवा कुंभेचा शनि एकादशात असेल तर जातक विद्वान व महाभाग्यशाली असतो. 

द्वादशस्थान  

द्वादशस्थानी म्हणजे व्ययस्थानी शनि असेल तर जातक विवेकशून्य, अशांत, आचार-विचार नसलेला, निर्लज, कृतघ्न, धोकेबाज व निर्दय हृदयाचा असतो. आरोग्य चांगले नसते. फासळ्यांचे रोग, जांघेत फोड किंवा पायाला त्रास डोळ्यांचे विकार यामुळे आरोग्य चांगले राहत नाही. डोळे बारीक किंवा नेत्रज्योती क्षीण असते. ३ १ १९ ४ ५ ७ ९ ६ ८ दोन्ही डोळे एकसारखे नसतात. द्वादशस्थानातील शनि बरोबर दुसरा पापग्रह असेल तर जातकाला ‘चकणा’ किंवा ‘आंधळा’ बनवतो. 

अर्थिक स्थिती चांगली राहत नाही. खर्च फार असतो. त्यामुळे कर्जबाजारी होतो. आकस्मिक खर्च, अर्थिक नुकसान, चोरी यांमुळे आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीत असतो. संगत चांगली नसते. शत्रू फार असतात. दुर्जनांचा का होईना पर पुढारी असतो. नातेवाईकांशी संबंध सलोख्याचे राहत नाही. अशा जातकाचे जन्मस्थान सोडून इतरत्र राहिल्याने त्याच्या जीवनमानात सुधारणा होते. पुत्रांचे सुख यांच्या नशिबात नसते. 


स्थानगत राशींप्रमाणे शनीची फले- 

प्रथमस्थानी मेष राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

प्रथमस्थानात मेष राशीचा शनि असेल तर लहानपणी आरोग्य मध्यम राहते. आर्थिक स्थिती कमकुवत असते, पण उत्तरोत्तर सुधारणा होते. अशा जातकात कवित्त्वशक्ती असते. आई-वडीलांचे सुख कमी असते. आईचे चारित्र्य चांगले नसते. जातक वाचाळ असतो. जातकाचा मृत्यू तहानेमुळे होतो. 

प्रथमस्थानी वृषभ राशीचा शनि- 

द्वितीयस्थानात वृषभ राशीचा शनि असेल तर जातकाची स्मृती चांगली असते. अस्तिक, कमी खाणारा, धनसंग्रहात रुची नसलेला, भोगी प्रवृत्ती असलेला, कवित्त्वशक्ती असलेला असा जातक लहानपणी दुःखी पण नंतर सुखी होतो. आईचे चारित्र्य संशयास्पद असते. जातकाच्या वडीलांच्या मृत्यूनंतर आई दुसरे लग्न करते. 

प्रथमस्थानी मिथुन राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

या प्रथमस्थानी मिथुन राशीचा शनि असेल तर जातकाचे एकापेक्षा जास्त विवाह होतात. जातक नास्तिक, अल्पाहारी, रागीट, भांडखोर व दुःखी असतो. फोड-पुटकुळ्या, खाज, कॅन्सर इत्यादि विकार होण्याची शक्यता असते. 

प्रथमस्थानी कर्क राशीचा शनि- 

या प्रथमस्थानी कर्क राशीचा शनि असेल तर जातक एकापेक्षा अधिक विवाह करतो. जातकाला अतिकामवासना असल्यामुळे जातकाने अनेक लग्ने करुनही त्याचे बाहेर इतर स्त्रियांशी गुप्त संबंध असतात. जातकाचा स्वभाव चंचल व उतावळा असतो. तसेच जातक रागीट व निष्ठूर असतो. यांच्या पोटात कोणतीही गोष्ट टिकत नाही. जातक विलासी व शत्रुनाशी असतो. खाज, फोड, पुटकुळ्या, कॅन्सर व रक्तासंबंधीच्या रोगांची भीती असते. 

प्रथमस्थानी सिंह राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

या प्रथमस्थानी सिंह राशीचा शनि असेल तर जातक भयंकर रागीट, कठोर, उतावळ्या स्वभावाचा, विलासी प्रवृत्तीचा व परस्त्रीलंपट असतो. सांसारिक सुखे व विषयभोग याच्या नशिबी असतात. संतती सुखात बाधा येते. आपल्या कुटुंबियांशी, नातेवाईकांशी, भावंडांशी याचे संबंध नसतात. हा प्रत्येकाला दुःख देत असतो. 

प्रथमस्थानी कन्या राशीचा शनि- 

कन्या राशीचा शनि प्रथमस्थानी असेल तर जातक स्वाभिमानी, धाडसी, शत्रूचा कर्दनकाळ, मनात येईल ते बकणारा, बेडर असतो. आपल्या कुटुंबाशी व नातेवाईक, मित्र-मंडळी यांच्याशी याचे संबंध चांगले नसतात. जातक महाकंजूष, चहाडीखोर व नाटक्या स्वभावाचा असतो. जातकामध्ये विद्वत्ता व समयसुचकता असते. पुत्रसुखात बाधा येते. 

प्रथमस्थानी तूळ राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

तूळ राशीचा शनि प्रथमस्थानात असेल तर जातक विद्वान, कुशाग्र बुद्धीचा, चतुरस्त्र, चतुरपणाने आपला स्वार्थ साधणारा, कंजुष असा असतो. वडिलांचे सुख चांगले मिळते. वडिलांमुळे प्रसिद्धी मिळते. पण वडिलोपार्जित संपत्तीचा उपभोग मात्र याला मिळत नाही. स्वतःच्या पुरुषार्थाने संपत्ती मिळवून जातक सुखी जीवन जगतो. वडिलांचे भाऊ-काका वगैरे यांच्याशी शत्रुत्त्व असते. 

प्रथमस्थानी वृश्चिक राशीचा शनि- 

वृश्चिक राशीचा शनि असेल तर जातक काकांशी वैर करतो. वडिलोपार्जित इस्टेटीला लाथ मारतो व स्वतः आपल्या पुरुषार्थाने धनसंपत्ती मिळवून सुखी जीवन जगतो. जातकाचे वडील प्रतिष्ठित नागरिक असतात. पित्याच्या यशामुळे जातकास फायदा होतो. जातक धाडसी, रागीट, लोकांत भांडणे लावणारा, कामुक, स्त्रीलंपट, क्रूर व विद्वान असतो. 

प्रथमस्थानी धनु राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

धनु राशीचा शनि प्रथमस्थानी असेल तर जातक कामातूर, कठोर स्वभावाचा, चहाडीखोर, भांडणे लावून तमाशा पाहणारा, शत्रूचा संहार करणारा असतो. आपल्या कर्तव्यात दक्ष, संपन्न, परोपकारी, भित्रा, विलासी, समाजात प्रसिद्ध असतो. याचे डोळे सुंदर असतात व पत्नी याला चांगली सुंदर व सुस्वभावी मिळते. 

प्रथमस्थानी मकर राशीचा शनि- 

मकर राशीचा शनि प्रथमस्थानी असेल तर जातक निरोगी, उद्योगी, पौरुषयुक्त, दीर्घायुषी व कामुक असतो. विवाह दोन करतो किंवा बाहेर ही संबंध असतात. समाजात प्रतिष्ठित व राजमान्य असतो. 

प्रथमस्थानी कुंभ राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

कुंभ राशीचा शनि प्रथम स्थानी असेल तर जातक शस्त्रविद्या पारंगत व तिरंदाज असतो. डोक्यावर टक्कल किंवा पायात विकार असतो. पत्नीसुख कमी मिळते. विवाह दोन होतात किंवा परस्त्रीसंबंध असतात. जातक धडधाकट, पुरुषार्थी, स्त्रीभोगी, दीर्घायुषी, संपन्नशील असतो. समाजात व राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठित असतो. यवनाचार्यांच्या मते जातक स्वतःच नपुंसक असल्याने त्याला स्त्रीसुख मिळत नाही. 

प्रथमस्थानी मीन राशीचा शनि- 

मीन राशीचा शनि प्रथमस्थानी असेल तर जातक अतिवाचाळ, संपन्न, पक्षपात न करणारा, राजमान्य व जनताप्रिय नेता असतो. शास्त्रविद्या पारंगत व तिरंदाज असतो. डोक्यावर टक्कल असते. पायात काहीं विकार असतो. पत्नीसुख मिळत नाही. यवनाचार्यांच्या मते जातक स्वतःच नपुंसक असतो. मग त्याला पत्नीसुख कसे मिळणार? 


द्वितीयस्थान

द्वितीयस्थानी मेष राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

मेष राशीचा शनि द्वितीयस्थानी असेल तर जातक अपशब्द बोलणारा, बुद्धीहीन, चोर व अल्पायुषी असतो. अर्थिक स्थिती चांगली नसते. अस्तिक असतो. 

द्वितीयस्थानी वृषभ राशीचा शनि- 

वृषभ राशीचा शनि द्वितीयस्थानी असेल तर जातक स्वाभिमानी, गुणी, अल्पोपहारी व कामुक असतो. आई-वडिलांचे सुख चांगले मिळते. अनिष्ट शनि असेल तर जातक लाचखोर, चोर, अल्पायुषी, अपशब्द बोलणारा असतो. 

द्वितीयस्थानी मिथुन राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

या द्वितीयस्थानी मिथुन राशीचा शनि असेल तर जातकाचा चेहरा विद्रूप असतो. वाहन किंवा जनावरांमुळे अपघात होऊन शरीरावर जखमा होतात. आतक पराक्रमी, विद्वान, संपन्नशील, लोकप्रिय, माता-पित्याकडून सुखी व अल्पोपहारी असतो. 

द्वितीयस्थानी कर्क राशीचा शनि- 

या द्वितीयस्थानी कर्क राशीचा शनि असेल तर जातकाचे आरोग्य मध्यम असते. अर्थिक स्थिती साधारणपणे असते. आर्थिक नुकसान एकसारखे होत राहते. अशा जातकांनी अर्थिक बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे. कोणाला पैसे दिले तर ते परत मिळणार नाहीत. विद्वान असूनही चोरी करण्याची प्रवृत्ती असते. जातकाला काहीं ना काही कारणामुळे कसली तरी जखम होतच असते. जातकाला राजभय असते व त्यापासूनच मृत्यू येतो. 

द्वितीयस्थानी सिंह राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

सिंह राशीचा शनि द्वितीयस्थानी असेल तर जातक रोगी, अल्पायुषी, राजदंड शिक्षा भोगणारा, अर्थिक अडचणीत नेहमी राहणारा, फिरस्तीचा व्यवसाय केल्यास जातकाला चांगला फायदा होतो. जातक विद्वान असूनही लोभी असतो, लाच लुचपत स्विकारीत असतो. चोरी करण्याची प्रवृत्ती असते. यांनी कोणालाही अर्थिक मदत केली तर तो पैसा पुन्हा येत नाही. जातकाची पत्नी प्रौढ दिसते, क्रोधी, कलह करणारी असते. या कारणामुळे जातक बाहेरील स्त्रियांशी संबंध ठेवतो व त्यांच्या वर पैसे खर्च करतो. 

द्वितीयस्थानी कन्या राशीचा शनि- 

कन्या राशीचा शनि द्वितीयस्थानी असेल तर जातक अतिकामुक, अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणारा असतो. जातकाला पत्नी चांगल्या स्वभावाची मिळत नाही. जातकाचे वैवाहिक जीवन खडतर जाते. जातकाचे आरोग्य मध्यम असते. जातक आपल्या कुळात प्रसिद्ध होतो. 

द्वितीयस्थानी तूळ राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

तुळ राशीचा शनि द्वितीयस्थानी असेल तर जातक संपन्न, अनेक मित्र असलेला आपल्या कुंटुंबाचा प्रमुख, रागीट व पोटाच्या विकाराने ग्रस्त असतो. कुटुंबियांबरोबर व भावंडांबरोबर सलोख्याचे संबंध नसतात. जातक कवि किंवा गायक असतो. 

द्वितीयस्थानी वृश्चिक राशीचा शनि- 

वृश्चिक राशीचा शनि द्वितीयस्थानी असेल तर जातक रागीट, उष्णप्रकृतिचा, पोटाचे विकार असलेला, कुटुंबियांबरोबर व भावंडांबरोबर सलोख्याचे संबंध नसतात. जातकाला मित्रांचा गोतावळा मोठा असतो. जातकाची अर्थिक स्थिति मध्यम असते. शेती-जमीनीपासून फायदा होतो. विद्वान व संपन्न असतो. पर वडिलांशी मतभेद असतात. 

द्वितीयस्थानी धनु राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

धनु राशीचा शनि द्वितीयस्थानी असेल तर जातक गुद्द्वाराच्या रोगाने पीडित असतो. पित्याशी मतभेद असतात. स्थावर संपत्ति, घर यांपासून फायदा होतो. जातक विद्वान व संपन्नशील असतो. पण वडिलांशी मतभेद असतात. 

द्वितीयस्थानी मकर राशीचा शनि- 

मकर राशीचा शनि द्वितीयस्थानी असेल तर जातकाच्या संततीसुखात बाधा येते. दोन-तीन विवाह केल्यानंतर अपवादात्मक, परिस्थितीत संतती होते. जातक स्वाभिमानी, संपन्न व भोगी असतो. 

द्वितीयस्थानी कुंभ राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

कुंभ राशीचा शनि द्वितीयस्थानी असेल तर जातकाचे अनेक विवाह होतात. संततीसुखात बाधा असते. अर्थिकदृष्ट्या जीवन सुखी व संपन्न असते. जातक विद्वान, दीर्घायुषी, व प्रकृती सुदृढ असते व जातक स्थुल असतो. स्थावर संपत्तीचे सुख उपभोगणारा, पुढारी व अधिकारप्राप्त असा असतो. 

द्वितीयस्थानी मीन राशीचा शनि- 

भीन राशीचा शनि द्वितीयस्थानी असेल तर जातक दीर्घायुषी, स्थूल शरीरप्रकृतीचा स्वाभिमानी, धर्मावर श्रद्धा ठेवणारा, अनेक धार्मिक कार्य करणारा, समाजाचा पुढारी व अधिकार प्राप्त असणारा असा असतो. 


तृतीयस्थान –

तृतीयस्थानी मेष राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

या तृतीयस्थानी मेष राशीचा शनि असेल तर जातक संपन्न, यशस्वी, सुखी व धर्मात्मा असतो. भावा-बहिणींच्या सुखाला पारखा होतो. दोन विवाहांची शक्यता असते. 

तृतीयस्थानी वृषभ राशीचा शनि- 

या तृतीयस्थानी वृषभ राशीचा शनि असेल जातक सख्ख्या भावा- बहिणींच्या सुखाचा नाश करणारा, संपन्न, सुखी, पराक्रमी, प्रत्येक कार्यात कुशल असा असतो. शूलरोगाने त्रस्त होण्याचा संभव असतो. 

तृतीयस्थानी मिथुन राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

या तृतीयस्थानी मिथुन राशीचा शनि असेल तर जातक मामा-मावशीच्या व संततीसुख ला पारखा असतो. लहानपणी आजोळचे सुख चांगले मिळते. शरीर दुर्बल व शुलरोगाने ग्रस्त असते. त्यामुळे अधिक परिश्रमाचे काम करु शकत नाही. अर्थिकदृष्टीने जीवन सुखी असते. 

तृतीयस्थानी कर्कराशीचा शनि- 

या तृतीयस्थानी कर्क राशीचा शनि असेल तर जातक उद्योगी, संपन्न, विद्वान, जनताप्रिय, सुंदर असा असतो. समाजात केलेल्या कार्यामुळे मरणोपरान्तसुद्धा नावलौकिकात राहतो. शरीर प्रकृती कमकुवत असते. जातक अल्पायुषी असतो. 

तृतीयस्थानी सिंह राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

या तृतीयस्थानी सिंह शनि असेल तर जातकाची अर्थिक स्थिती चांगली नसते. अर्थिक नुकसान होण्याची सदैव भीती असते. अर्थिक देवाण-घेवाणीत अत्यंत जागरुक असणे आवश्यक असते. याने दिलेला पैसा पुन्हा परत मिळत नाही. जातकाचे आरोग्य मध्यम असते. जातक अल्पायु असतो. भावंडांशी भांडणे होऊन संबंध चांगले रहात नाही. जातकाला कटू बोलण्याची सवय असते. जातकाची कोर्टकचेरीपर्यंत मजल जाते. जातक प्रतिष्ठित असतो. 

तृतीयस्थानी कन्या राशीचा शनि- 

या तृतीयस्थानी कन्या राशीचा शनि असेल तर जातकाच्या पुत्रसुखात अडथळे आणतो. बहुधा संतती मृत जन्माला येते किंवा अल्पायुषी असते. कन्या संतती अधिक असते. पत्नी सुस्वरूप असते परंतु तिचे धाकट्या धीराशी अनैतिक संबंध असतात. जर सप्तमात पापग्रह असेल तर हे फल प्रकर्षाने अनुभवाला येते. शरीर कमकुवत व रोगग्रस्त असते. भावंडांशी सलोखा रहात नाही. कोर्ट-कचेरीपर्यंथ मजल जाते. अर्थिक बाबतीत दक्ष राहणे आवश्यक ठरते. पैसा बुडण्याची शक्यता असते. अर्थिक स्थिती बेताचीच असते. 

तृतीयस्थानी तूळ राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

या तृतीयस्थानी तूळ राशीचा शनि असेल तर जातकाचे डोळे लाल असतात व स्वभाव रागीट आणि हेकट असतो. याचे संबंध कोणाशीही चांगले नसतात. जातक नास्तिक, चहाडीखोर, संपन्न असूनही वडिलोपार्जित पैशाचा अपव्यय करणारा असतो. संतती अल्पायुषी व कन्या संतती अधिक असते. मृत संतती अल्पायुषी व कन्या संतती अधिक असते. मृत संतती जन्माला येते, पुत्रसुख विलंबाने मिळते. जातकाच्या पत्नीचा धाकट्या भावाशी अनैतिक संबंध असतो. 

तृतीयस्थानी वृश्चिक राशीचा शनि- 

या तृतीयस्थानी वृश्चिक राशीचा शनि असेल तर जातक अत्यंत रागीट असतो व डोळे लाल असतात. जातक इतरांना दुःखी करतो. संबंध चांगले ठेवत नाही. जातक खर्चाच्या बाबतीत नको तेथे कंजुषी करतो व नको तेथे उदार होतो. जातक समाजात प्रसिद्ध असतो. जातकाची संतती कर्तृत्त्ववान असते. त्यांची मदत जातकाला होते. 

तृतीयस्थानी धनु राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

धनु राशीचा शनि तृतीयस्थानी असेल तर जातक संपन्न, उदार, श्रद्धाळू, दानशूर व स्वकर्तृत्वाने प्रगती करणारा असतो. जातकाचे आरोग्य बेताचेच असते. जातकाचे वडील स्वतः व जातक समाजात बरोबरीने प्रतिष्ठा मिळवतात. खर्चाच्या बाबतीत जातक कंजूष व. व्यवहारकु शल असतो. भावंडांशी पटत नाही परंतु त्यांच्या विषयीची कर्तव्ये जातक पूर्ण करतो. याच्या मुली कर्तृत्ववान व सुख देणाऱ्या असतात. 

तृतीयस्थानी मकर राशीचा शनि- 

मकर राशीचा शनि तृतीयस्थानी असेल तर जातक कर्तृत्त्ववान, नोकरचाकरांचे सुख असणारा, संपन्न, सुखी व राजमान्य असा असतो. जातक आपल्या स्वकर्तृत्वाने प्रगती करतो. जातकाचे वडील समाजात प्रतिष्ठा प्राप्त करणारे असतात. कौटुंबिक कर्तव्य पार पाडूनसुद्धा भावंडांचे सुख पाहिजे तसे मिळत नाही. 

तृतीयस्थानी कुंभ राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

कुंभ राशीचा शनि तृतीयस्थानी असेल तर जातक विद्वान, कर्तृत्त्ववान, संपन्नशील व विवेकशील असतो. जातक अस्तिक असतो. जातकाला नोंकर- चाकरांचे सुख प्राप्त असते. जातकाचे संबंध बाहेर असतात. जातकाला एखादी वस्तू आवडली तर न विचारता घेऊन जायची सवय असते. 

तृतीयस्थानी मीन राशीचा शनि- 

तृतीयस्थानी मीन राशीचा शनि असेल तर जातक अत्यंत कर्तव्यदक्ष, संपन्नशील, विवेकशील असतो. चोरी करणे, लाच खाणे अशा सवयी असतात. जातकाचा एक विवाह होऊन ही त्याचे बाहेर संबंध असतात. 


चतुर्थस्थान –

चतुर्थस्थानी मेष राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

या चतुर्थस्थानी मेष राशीचा शनि असेल तर जातक मातापिता व भावंडांचे सुख असलेला, श्रीमंत व दीर्घायु असतो. जातक अत्यंत कामुक असतो. 

चतुर्थस्थानी वृषभ राशीचा शनि- 

या चतुर्थस्थानी वृषभ राशीचा शनि असेल तर जातक संपन्न, राजमान्य व सुखी असतो. जातकाला मातृ-पितृ सुख भरपूर असते. जातक दीर्घायुषी असतो. जातकाला वैवाहिकसौख्यात व संतती सौख्यात बाधा असते. संततीकडून जीवालाही धोका असतो. विवाह बहुधा दोन होतात. 

चतुर्थस्थानी मिथुन राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

या चतुर्थस्थानी मिथुन राशीचा शनि असेल तर जातक पुत्रहीन असतो. वडिलांचे सुख नसते, जातक परोपकारी विचाराचा पक्का, अर्थिक दृष्टीने संपन्न असतो. त्याला दोन पत्नी असतात. 

चतुर्थस्थानी कर्क राशीचा शनि- 

या चतुर्थस्थानी कर्क राशीचा शनि असेल तर जातक दीर्घायुषी, मातापित्याचे सुख भोगणारा, संपन्न, कर्तृत्त्ववान, विद्वान व राजमान्य, शूलरोगी असतो. 

चतुर्थस्थानी सिंह राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

सिंह राशीचा शनि चतुर्थस्थानी असेल तर मातृपितृभक्त, अधिकारसंपन्न, कर्तृत्ववान, अस्तिक, विद्वान, यशस्वी व अर्थिक दृष्टीने सुखी असतो. 

चतुर्थस्थानी कन्या राशीचा शनि- 

या चतुर्थस्थानी कन्या राशीचा शनि असेल तर जातक स्वतः कर्तृत्त्ववान, अस्तिक, समाजात नाव कमविणारा, अधिकारसंपन्न असतो. आई-वडील व भावडांचे सुख कमी असते. वडिलांशी मतभेद असतात. वडिलोपार्जित संपत्तीचे नुकसान करतो. रोगभय असते. 

चतुर्थस्थानी तूळ राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

तूळ राशीचा शनि चतुर्थस्थानी असेल तर जातक वातरोगी असतो. आई- वडील व भावंडांचे सुख कमी मिळते. वडिलांशी पटत नाही. पत्नी मात्र सुंदर, सुशील व पतिव्रता मिळते. 

चतुर्थस्थानी वृश्चिक राशीचा शनि- 

वृश्चिक राशीचा शनि चतुर्थात असेल तर जातक तापट, डोळे लाल असलेला, स्वाभिमानी, नास्तिक व अस्थिर विचारांचा असतो. वडिलांशी मूळीच पटत नाही. पत्नी सुशील मनमिळावू मिळते. 

चतुर्थस्थानी धनु राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

धनु राशीचा शनि चतुर्थस्थानी असेल तर जातक सुखी, संपन्नशील, राजमान्य, नोकर-चाकर, वाहन सौख्य भोगणारा, अस्तिक, उदार, दानी असतो. मातापित्याचे सुख चांगले मिळते. 

चतुर्थस्थानी मकर राशीचा शनि- 

मकर राशीचा शनि चतुर्थस्थानी असेल तर जातक सुखी संपन्न, राजमान्य, नोकर-चाकरांचे सुख, श्रद्धाळू, विद्वान असतो. माता-पित्याचे सुख चांगले मिळते. 

चतुर्थस्थानी कुंभ राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

कुंभ राशीचा शनि चतुर्थस्थानी असेल तर जातक सुखी व संपन्न असतो. जातकाला धनसंपत्ती, वाहनसुख, ऐश्वर्याचे सुख भोगणारा असतो. जातक राजमान्य व प्रतिष्ठावान असतो. जातकाला कौटुंबिक सुखाचा, वैवाहिक सौख्याचा अभाव असतो. जातकाची पत्नी क्रूर व दुष्ट स्वभावाची असते. 

चतुर्थस्थानी मीन राशीचा शनि- 

मीन राशीचा शनि चतुर्थस्थानी असेल तर जातक अत्यंत कामुक असतो. त्याचे बाहेर स्त्रियांचे संबंध असतात. जातकाची पत्नी कर्कषा असते. जातकाला कौटुंबिक प्रेम बेताचेच असते. आरोग्यसुध्दा बेताचेच असते. 


पंचमस्थान –

पंचमस्थानी मेष राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

मेष राशीचा शनि पंचमस्थानात असेल तर जातक कंजूष, दुःखी व विलासी असतो. अर्थिक स्थिती संतोषजनक असते. वडील व आप्तस्वकीयांचे सुख- सहकार्य मिळते. संततीला त्रास असतो. 

पंचमस्थानी वृषभ राशीचा शनि- 

पंचमस्थानात वृषभ राशीचा शनि असेल तर जातक राजमान्य, दीर्घायुषी, संपन्न, धार्मिक, संगीतप्रिय व त्यात प्राविण्य मिळविणारा, चारित्र्यवान असतो. प्रथम संततीस त्रास होतो. नंतरच्या संतती कर्तृत्ववान व सुख देणाऱ्या असतात. 

पंचमस्थानी मिथुन राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

पंचमस्थानात मिथुन राशीचा शनि असेल तर जातकाला संततीसौख्य, पत्नीसौख्य बेताचेच मिळते. जातक दीर्घायुषी, संगीतप्रिय, राजमान्य व स्वाभिमानी असतो. 

पंचमस्थानी कर्क राशीचा शनि- 

पंचमस्थानात कर्क राशीचा शनि असेल तर जातकाला आयुष्य कमी असते. अर्थिक स्थिती चांगली असते. संततीसुख चांगले मिळते. 

पंचमस्थानी सिंह राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

पंचमस्थानात सिंह राशीचा शनि असेल तर जातकाला संततीकडून स्नेह व सुख मिळते. जातक संपन्न, राजमान्य, संगीतात रुची असलेला व त्यात प्राविण्य मिळविणारा असतो. 

पंचमस्थानी कन्या राशीचा शनि- 

कन्या राशीचा शनि पंचमस्थानांत असेल तर जातक संगीतप्रिय असून त्यात ख्याती मिळवतो. जातक चारित्र्यवान, सुखी, लोकप्रिय, उदार व संततीसुख असलेला असतो. 

पंचमस्थानी तूळ राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

तूळ राशीचा शनि पंचमस्थानात असेल तर जातक अस्तिक, धार्मिक, भाग्यवान, समाजप्रिय व लोकप्रिय असतो. पुत्र संतती असते पण त्यांच्यापासून सुख बेताचेच मिळते. जीवन संपन्न असते. परंतु धन स्थिर राहत नाही. धूर्तपणाही या जातकात असतो. 

पंचमस्थानी वृश्चिक राशीचा शनि- 

वृश्चिक राशीचा शनि पंचमस्थानात असेल तर जातक धूर्त, राजकारणी असतो. पुत्र संततीचा अभाव असतो. कन्या संतती कर्तृत्ववान व सुख देणाऱ्या निजपतात. 

पंचमस्थानी धनु राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

धनु राशीचा शनि पंचमस्थानात असेल तर जातकाची अर्थिक स्थिती चांगली नसते. मित्रमंडळी वेळेवर मदत करीत नाहीत. आपला कार्यभाग साधण्यात जातक चतुर व कूटनीतिज्ञ असतो. पुत्र संततीशी मतभेद असतात. त्यामुळे त्यांचे सौख्य मिळत नाही. कन्या संतती कर्तृत्त्ववान असतात. त्यांच्याकडून सुख मिळते. 

पंचमस्थानी मकर राशीचा शनि- 

या पंचमस्थानी मकर राशीचा शनि असेल तर जातकाची संतती अल्पायुषी असते. बहुधा दत्तकपुत्र किंवा विलंबाने झालेला पुत्र सुख देतो. आमच्या पहाण्यात आलेल्या व्यक्तीने तीन विवाह केले तरी संतती झाली नाही. पण दत्तकपुत्र घेतल्यावर एक मुलगा झाला. यासाठी इतर योगही लक्षात घेणे आवश्यक आहेत. महान कूटनीतिज्ञ, अधिकारपाप्त, बोलण्यात चतुर व अर्थिकस्थिती चांगली असलेला असतो. 

पंचमस्थानी कुंभ राशीचा शनि- Sade Sati Storm 2025

कुंभ राशीचा शनि पंचमस्थानी असेल तर जातक कर्तृत्त्ववान, सुखी, समाजात नावलौकिक मिळविणारा, लोकप्रिय, स्वाभिमानी, धार्मिक, विद्वान, दीर्घायुषी, लेखक असतो. याचे हस्ताक्षरही चांगले असते. पुत्रसुखात मात्र बाधा असते. 

पंचमस्थानी मीन राशीचा शनि- 

मीन राशीचा शनि पंचमस्थानी असेल तर दीर्घायुषी, धर्मात्मा, कर्तुत्ववान, लोकप्रिय, विद्वान, राजमान्य असा असतो. भावाबहिणींकडून सुख मिळते. पत्नी दुष्ट स्वभावाची असते. 


षष्ठस्थान –

षष्ठस्थानात मेष राशीचा शनि Sade Sati Storm 2025

या षष्ठस्थानात मेष राशीचा शनि असेल तर-  षष्ठस्थानात मेष राशीचा शनि असेल तर जातकाला मामा, वडील, भाऊबहीण यांचे सुख कमी मिळते किंवा त्यांच्याशी मतभेद असतात. वडिलोपार्जित संपत्तीचा अपव्यय यांच्या हातून होतो. 

षष्ठस्थानात वृषभ राशीचा शनि असेल तर- 

वृषभ राशीचा शनि षष्ठस्थानी असेल तर जातकाला भावाबहीणींचे व मामाचे सुख मिळत नाही. मामीशी अनैतिक संबंध ठेवण्याची इच्छा असते. आर्थिक स्थिती बेताचीच असते. वादविवाद, कोर्टकचेरी, आरोग्य चिकित्सेसाठी पैशाचा अपव्यय होतो. नेत्ररोग व गुद्दाराचे रोग होतात. 

षष्ठस्थानात मिथुन राशीचा शनि असेल तर- Sade Sati Storm 2025

या षष्ठस्थानात मिथुन राशीचा शनि असेल तर जातक गुद्दाराच्या रोगाने व मेंदूच्या विकाराने आजारी असतो. तरी सुध्दां दीर्घायुषी असतो. संतती व मामांकडून सुख-सहकार्य मिळत नाही. दुसऱ्या विवाहाची शक्यता असते. कंजूष असतो. पण औषधोपचार व कोर्टकचेरीच्या कामात पैसा खर्च होतो. आर्थिक स्थिती साधारण असते. 

षष्ठस्थानात कर्क राशीचा शनि असेल तर- 

कर्क राशीचा शनि षष्ठस्थानात असेल तर जातकाला शत्रू फार असतात. मातृसुख व संततीसुख पाहिजे तसे मिळत नाही. गुद्वारासंबंधी व मेंदूचे विकार होतात. दोन विवाह होतात किंवा परंस्त्रीशी संबंध असतो. 

षष्ठस्थानात सिंह राशीचा शनि असेल तर- Sade Sati Storm 2025

सिंह राशीचा शनि षष्ठस्थानी असेल तर जातकाला शत्रू व चोरांपासून भीती असते. जन्मस्थान सोडून इतरत्र गेल्यावर संबंध भाग्योदय होतो. आर्थिक स्थिती चांगली राहते पण आरोग्य चांगले राहत नाही. काहीं ना काही रोगपीडा चालूच असते. संततीसुख मिळत नाही. डोळ्यांचे विकार होतात.. आईची माया मिळत नाही. 

षष्ठस्थानात कन्या राशीचा शनि असेल तर- 

कन्या राशीचा शनि असेल तर लहानपणी उंचावरुन पडण्याची भीती असते. लहानपणी खूप कष्ट उपसावे लागतात. शत्रू फार असतात. चोरीची भीती असते. जन्मस्थानापासून दूर जावे लागते. जन्मस्थानापासून दूर प्रवासात किंवा रस्त्यात मृत्यू येतो. कामुक असतो. चारित्र्य संशयास्पद असते. शासनाशी मतभेद असतात. प्रकृती फारशी चांगली रहात नाही. 

षष्ठस्थानात तूळ राशीचा शनि असेल तर- Sade Sati Storm 2025

तूळ राशीचा शनि षष्ठस्थानात असेल तर जातक कामुक असतो. अनेक स्त्रियांशी संबंध असतात. आईचे चारित्र्यही संशयास्पद असते. शत्रू फार असल्याने आयुष्यात संकटे येतात. प्रकृतीही साधारणच असते. उंचावरुन पडण्याची भीती असते. लहानपण खडतर जाते. राज्याच्या उच्च अधिकारी वर्गाशी शत्रुत्व असते. मामा व थोरल्या भावाचे सुख-सहकार्य मिळत नाही. नास्तिक असतो. त्याचे दात खराब असतात. 

षष्ठस्थानात वृश्चिक राशीचा शनि असेल तर- 

वृश्चिक राशीचा शनि षष्ठस्थानात असेल तर जातक नास्तिक असतो. परजातीय मुलीशी प्रेमविवाह होतो. दिसायला विद्रूप असतो. व्यसनी व झोपाळू असतो. प्रकृती नीट राहत नाही. मामा व थोरल्या भावाचे प्रेम व सहकार्य मिळत नाही. लहानपणी पाणी, सर्प व विषापासून धोका असतो. जीवन संघर्षमय असते. 

षष्ठस्थानात धनु राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

धनु राशींचा शनि षष्ठस्थानात असेल तर जातक रोगी असतो. आयुष्यात सुख कमी मिळते. लहानपणी विषारी प्राण्यांपासून धोका असतो. पत्नी किंवा पति यापैकी एक तापट डोक्याचा असतो. त्यामुळे वैवाहिक जीवन दुःखी असते. स्वी संसर्गामुळे किंवा अतिस्त्रीसंगामुळे जातकाला क्षय रोग जडतो. जातक अल्पायु असतो. 

षष्ठस्थानात मकर राशीचा शनि असेल- 

मकर राशीचा शनि षष्ठस्थानात असेल तर जातक अति-स्त्रीसंगामुळे क्षयरोगी बनतो. आयुष्य कमी असते. जातकाला आप्त-स्वकीयांपेक्षा बाहेरचे मित्र मदत करतात. 

षष्ठस्थानात कुंभ राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

या षष्ठस्थानात कुंभ राशीचा शनि असेल तर जातकाचे स्वकीयांशी शत्रुत्व असते. पुत्रसंतती होत नाही किंवा झाली तर ती अल्पायुषी असते. त्यामुळे संततीसुख मिळत नाही. 

षष्ठस्थानात मीन राशीचा शनि

षष्ठस्थानात मीने राशीचा शनि असेल तर जातकाच्या संततीच्या सुखाला बाधा लागते. जातक तापट व कामुक असतो. जातकाची सावत्र आई असते. वडिलांशी मतभेद असतात. वडिलोपार्जित संपत्तीचा अपव्यव होतो व ती संतती संपत्ति मिळवत नाही. 


सप्तमस्थान –

सप्तमस्थानात मेष राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

सप्तमस्थनात मेष राशीचा शनि असेल तर जातक विद्वान, कमी बोलणारा, परंतु कठोर स्वभावाचा असतो. सासऱ्यांशी संबंध चांगले नसतात. पत्नीसुख व संततीसुख कमी मिळते. पत्नी मात्र सदाचारी व चांगली असते. 

सप्तमस्थानात वृषभ राशीचा शनि असेल- 

या सप्तमस्थानात वृषभ राशीचा शनि असेल तर जातक विद्वान, उद्योगी, कमी बोलणारा, परंतु उध्दट व कठोर असतो, सासऱ्यांशी त्याचे संबंध चांगले राहत बोलणार लहानपण खडतर असते. दुराचार व चोरीसारखे अवगुण असतात जाहीकाला राजदंडामुळे मृत्यू येतो. जाचक अत्यंत कामुक असतो. पत्नी सुंदर असूनही दांपत्यजीवन दुःखी असते. पत्नीचे अनैतिक संबंध दुसरीकड असतात. 

सप्तमस्थानात मिथुन राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

या सप्तमस्थानात मिथुन राशीचा शनि असेल तर जातक चोर असतो. पत्नी सुंदर असूनही दांपत्यजीवन दुःखी असते. जातक स्वतः, त्याची आई व पत्नी हे तिघेही दुराचारी असतात. पत्नी वंध्या असण्याची शक्यता असते. त्यामुळे संततीसुख नसते. 

सप्तमस्थानात कर्क राशीचा शनि असेल- 

या सप्तमस्थानात कर्क राशीचा शनि असेल तर जातकाचे जीवन दुःखी असते. जातकाचा विवाह होत नाही. समजा विवाह झाला तर त्याला पत्नी सुंदर मिळते. मात्र ती अल्पायु असते. जातक व त्याच्या पत्नीचे संबंध चांगले नसतात. पत्नी वंध्या असल्याने त्याला संतती सुख मिळत नाही. 

सप्तमस्थानात सिंह राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

या सप्तमस्थानात सिंह राशीचा शनि असेल तर जातक शस्त्रविद्येत तरबेज व निशाणेबाज असतो. जातकाला श्वास, कफ यासारखे रोग बळावतात. जातकाची प्रकृती नाजूक असते. जातकाला पत्नी चांगली असते. परंतु ती अल्पायु असते. ८० % जातकाचा विवाह होत नाही. 

सप्तमस्थानात कन्या राशीचा शनि असेल- 

या सप्तमस्थानात कन्या राशीचा शनि असेल तर जातक प्रभावी व्यक्तिमत्वाचा असतो. आर्थिक परिस्थिती चांगली असते. समाजात प्रतिष्ठा असते. जीवनात यशस्वी पर कामुक असतो. पत्नी सुंदर, सेवाभावी व सुख देणारी असते. 

सप्तमस्थानात तुळ राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

या सप्तमस्थानात तुळ राशीचा शनि असेल तर जातक प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा असतो. त्याची अर्थिक परिस्थिती चांगली असते. समाजात तो अत्यंत प्रतिष्ठित असतो. जीवनात यशस्वी परंतु कामातूर असतो. त्याला पत्नी सुंदर, सेवाभावी व सुख देणारी मिळते. 

सप्तमस्थानात वृश्चिक राशीचा शनि असेल- 

या सप्तमस्थानात वृश्चिक राशीचा शनि असेल तर जातक श्रीमंत असतो. पत्नी रुपवान, चतुर आज्ञाधारक व सुशील स्वभावाची असते. विवाहामुळे धनलाभ होतो. 

सप्तमस्थानात धनु राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

या सप्तमस्थानात धनु राशीचा शनि असेल तर जातक कपटी, क्रूर, नास्तिक, बुद्धीभ्रष्ट झालेला असतो. जातक अत्यंत कामुक असतो. दुराचारामुळे गुप्तरोग होतो. पत्नी सुंदर, आज्ञाधारक व सदाचारी असूनही तिच्याशी पटत नाही. 

सप्तमस्थानात मकर राशीचा शनि असेल- 

मकर राशीचा शनि सप्तमात असेल तर जातक यशस्वी, दीर्घायुषी, तेजस्वी व दुराचारी असतो. याच्या पोटात कोणतीही गोष्ट टिकत नाही. फोड- फुटकूळ्या, मूळव्याध, भगंदर, कॅन्सर व सांसर्गिक रोगाचा त्रास असतो. बहुधा दोन विवाह होतात. 

सप्तमस्थानात कुंभ राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

कुंभ राशीचा शनि सप्तमस्थानी असेल तर जातक श्रीमंत असतो. जातक नशेचा भोक्ता असतो. जातकाला भांडायची सवय असते. जातकाची पत्नी सुंदर व अत्यंत कामुक मिळते. परंतु प्रजोत्पादन शक्ती नसल्याने गर्भपात होतो. त्यामुळे जातक परस्त्रीलंपट होतो. 

सप्तमस्थानात मीन राशीचा शनि असेल- 

सप्तमस्थानात मीन राशीचा शनि असेल तर जातक उद्योगी, गुणी व श्रीमंत असतो. परंतु भांडखोर व विद्ध्वंदस करणारा असतो. पत्नी सुंदर, मृदुस्वभावाची असते, परंतु अत्यंत कामुक असते. 


अष्टमस्थान – Sade Sati Storm 2025

अष्टमस्थानात मेष राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

अष्टमस्थानात मेष राशीचा शनि असेल तर जातक धूर्त, रागीट, हिंस्त्रक व कठोर असतो. मित्र व शत्रू दोन्हींची संख्या मोठी असते. पोटाचे विकार, डोळ्यांचे विकार, संग्रहणी, विषभय, राजभय असते. पत्नीचे सुख कमी मिळते. जातक परस्त्रीगामी असतो. भावंडे व संतती रोगी असतात. 

अष्टमस्थानाते वृषभ राशीचा शनि असेल- 

अष्टमस्थानात वृषभ राशीचा शनि असेल तर जातक दीर्घायुषी असतो. क्रूर, दुराचारी व धूर्त असतो. जातक क्रूर, दुराचारी व धूर्त असतो. पत्नी व मित्रसुख कमी असते. संतती व भावंडे रोगी असतात. आरोग्य बेताचेच असते. वडिलांचे सुखही कमी मिळते. 

अष्टमस्थानात मिथुन राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

अष्टमस्थानी मिथुन राशीचा शनि असेल तर जातक क्रोधी, रोगी, चोर, परस्त्रीगामी असतो. माता-पिता व भावंडांचे सुख कमी मिळते. बालपण खडतर असते. याच्या हातात काही विकृती असते. 

अष्टमस्थानात कर्क राशीचा शनि असेल- 

अष्टमस्थानी कर्क राशीचा शनि असेल तर जातकाची अर्थिक स्थिती चांगली असते. जातकाला भूमिगत किंवा अचानक धनलाभ होतो. थोरल्या भावाचे व पत्नीचे सुख कमी मिळते. जातकात रोगी परहिंसा, परस्त्रीगमन असे दुर्गुण असतात. 

अष्टमस्थानात सिंह राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

या अष्टमस्थानात सिंह राशीचा शनि असेल तर जातक शिल्पकार असतो. जातकात चोरी, जुगार, क्रोध, परस्त्रीगमन, आत्मघात इत्यादि दुर्गुण असतात. जातकाला वैवाहिक सौख्य व भावंडांचे सौख्य कमी मिळते. जातकाला अर्थिक धनलाभ वारंवार होत असतो. 

अष्टमस्थानात कन्या राशीचा शनि असेल- 

या अष्टमस्थानात कन्या राशीचा शनि असेल तर जातक चोर, ठग, जुगारी व रागीट असतो. जातकाला शिल्पकलेची आवड असते. 

अष्टमस्थानात तुळ राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

या अष्टमस्थानात तूळ राशीचा शनि असेल तर जातकाला शनिची शुभफले मिळतात. जातक सुखी, दीर्घायुषी व श्रीमंत असतो. जातकाला पत्नी सुस्वरुपवान, मनमिळाऊ मिळते. 

अष्टमस्थानात वृश्चिक राशीचा शनि असेल- 

या अष्टमस्थानात वृश्चिक राशीचा शनि असेल तर जातक रोगी, कपटी, चौर्यकर्मात तरबेज असतो. व्यक्तीमत्व काहींसे उग्र असते. जातकाला पत्नी सुंदर व व्यवहारी मिळते. 

अष्टमस्थानात धनु राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

या अष्टमस्थानात धनु राशीचा शनि असेल तर जातक ठग, अकर्तृत्त्ववान, नास्तिक, कपटी, रोगी, लोकांना त्रास देणारा असतो. जातकाला आयुष्यात भरपूर संघर्ष करावे लागतात. 

अष्टमस्थानात मकर राशीचा शनि असेल- 

या अष्टमस्थानात मकर राशीचा शनि असेल तर जातक व्यापारात भरपूर पैसा कमविणारा, आपल्या कुळात प्रसिद्ध, नास्तिक, लबाड, चोर, लोकांची निंदा करणारा, जुगारी, बोलण्यात चतुर, धूर्त असतो. बहुधा पत्नी दुराचारी असते. 

अष्टमस्थानात कुंभ राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

कुंभ राशीचा शनि अष्टमस्थानात असेल तर जातक व पत्नी यांचा स्वभाव तापट असतो. पत्नी व्याभिचारी असते. वैवाहिक जीवन दुःखी असते. जातक वेश्यागामी असतो. जातकात चोरी, जुगार, निंदा हे दुर्गुण असतात. बोलण्यात हुशार व चतुर असतो. बहुधा असा जातक ब्रह्मचारीपणाचे ढोंग करतो व वेश्यागामी असतो. 

अष्टमस्थानात मीन राशीचा शनि असेल- 

अष्टमस्थानात मीन राशीचा शनि असेल तर जातक उद्योगी, गुणी व श्रीमंत असतो. परंतु भांडखोर व सिद्ध्वंस करणारा असतो. पत्नी सुंदर, सदाचारी, गोड बोलणारी परंतु अत्यंत कामसु असते. पत्नीसुख दीर्घकाळ टिकत नाही. पत्नीत काहींतरी विकृती असल्यास संतती होत नाही. 


नवमस्थान- Sade Sati Storm 2025

नवमस्थानात मेष राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

या नवमस्थानात मेष राशीचा शनि असेल तर जातक दगड, फरशी व तत्संबंधी वस्तूंच्या व्यापारातून पैसा मिळवतो. जातक कामुक असून अनेक स्त्रियांशी संबंध ठेवतो. पत्नीसुख कमी मिळते. पत्नी कठोर व रागीट असते. पायास जखम होते. 

नवमस्थानात वृषभ राशीचा शनि असेल- 

या नवमस्थानात वृषभ राशीचा शनि असेल तर जातकाला अपघात होतो किंवा पायात विकृती असते. संशोधनकार्यात चिरकाल टिकणारे यश मिळवतो. संगीत, नाटक, तर्कशास्त्र इत्यादी अनेक शास्त्रात पारंगत असतो. जातक अत्यंत विद्वान व श्रीमंत असतो. 

नवमस्थानात मिथुन राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

या नवमस्थानात मिथुन राशीचा शनि असेल तर जातक अनेक शास्त्रांचा जाणकार असतो. संगती, नाट्यरसिक, राजमान्य यापैकी एकामध्ये ख्याती मिळवतो. तर्कवितर्क निपूण, कर्तृत्त्ववान, अस्तिक, लोकप्रिय व सुंदर डोळे असलेला असतो. 

नवमस्थानात कर्क राशीचा शनि असेल- 

कर्क राशीचा शनि नवमस्थानात असेल तर जातक उद्योगी, विद्वान, उदार, धर्मात्मा, अस्तिक, समाजात व जनतेत लोकप्रिय व श्रीमंत असतो. जन्मस्थानापासून दूर भाग्योदय होतो. याच्या भाग्योदयात स्त्रियांचा मोठा भाग असतो. स्वकर्तृत्त्वाने स्वतःची संपत्ती करतो. याचे डोळे सुंदर असतात. भावंडांचे सुख कमी असते. 

नवमस्थानात सिंह राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

नवमस्थानी सिंह राशीचा शनि असेल तर जातकाचे बालपण खडतर जाते. उर्वरित आयुष्य चांगले जाते. जातकाच्या वडिलात चोरी करण्याचा दुर्गुण असतो. भावाबहिणींशी संबंध फारसे चांगले नसतात. स्त्रिया यांच्या भाग्योदयास सहाय्यक बनतात. 

नवमस्थानात कन्या राशीचा शनि असेल- 

कन्या राशीचा शनि नवमस्थानी असेल तर जातकाचे बालपण खडतर जोते. मात्र उर्वारित काल चांगला जातो. जातक सुखी श्रीमंत, लोकप्रिय, व्यवहारकुशल, अस्तिक, यशस्वी व राजमान्य असतो. देशविदेशात प्रवास करण्याची संधी मिळते. 

नवमस्थानात तूळ राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

तुळ राशीचा शनि नवमस्थानी असेल तर जातक भाग्यवंत, यशस्वी, समाजात प्रतिष्ठित व लोकप्रिय, आस्तिक, धर्मात्मा व राजमान्य असतो. देशविदेशांचे प्रवास सारखे होतात. 

नवमस्थानात वृश्चिक राशीचा शनि असेल- 

वृश्चिक राशीचा शनि नवमस्थानी असेल तर जातक अधिकारसपन्न, भाग्यवंत, विद्वान व अस्तिक असतो. 

नवमस्थानात धनु राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

धनु राशीचा शनि नवमस्थानी असेल तर जातक श्रीमंत, भावंडांचे सुख असणारा, सदाचारी, विद्वान, धर्मात्मा, अस्तिक व आपल्या सत्कार्यामुळे प्रसिद्धी मिळविणारा असतो. याची आई एक आदर्श महिला असते. 

नवमस्थानात मकर राशीचा शनि असेल- 

मकर राशीचा शनि नवमस्थानी असेल तर जातकाची आई सदाचारी व परोपकारी असते. आईकडून गुणांचा वारसा मिळाल्याने जातक स्वतः दानी, परोपकारी, सदाचारी, अस्तिक व धर्मात्मा बनतो. जातकाची अर्थिक स्थिती चांगली असते. बहीणभावांचे प्रेम व सहकार्य लाभते. 

नवमस्थानात कुंभ राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

कुंभ राशीचा शनि नवमस्थानी असेल तर जातकाला बहीण-भावांचे प्रेम चांगले मिळते. जातक भांडखोर असतो. मात्र श्रीमंत असतो. जातक लोभी, कठोर, स्वभावाचा असतो. याच्या मुखात काहीतरी रोग असतो. 

नवमस्थानात मीन राशीचा शनि असेल- 

मीन राशीचा शनि नवमस्थानी असेल तर जातकाचा चेहरा विकृतीपूर्ण असतो. कठोर स्वभावाचा, हिंसक प्रवृत्तीचा, लोभी, मित्रांच्या सुखाला पारखा व अतिकामुक असतो. पत्नीचा स्वभाव उग्र व कठोर असतो. वैवाहिक सुखाचा बोजवारा वाजतो. 


दशमस्थान- Sade Sati Storm 2025

दशमस्थानात मेष राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

दशमस्थानातील मेष राशीचा शनि असेल तर जातकास पत्नी सुंदर व सदाचारी मिळते. आई-वडील व भावाबहिणींचे सुख असते. शासनावर टीका करणारा असतो. सासऱ्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवणारा असतो. 

दशमस्थानात वृषभ राशीचा शनि असेल- 

दशमस्थातील वृषभ राशीचा शनि असेल तर जातक धाडसी, कुळात नाव कमविणरा असतो. तसेच जन्मस्थानापासून दूर राहणारा असतो. मातापित्याशी मतभेद असतात. पत्नी सुंदर व व्यवहारी मिळते. मात्र सासरा दुष्ट प्रवृत्तीचा, प्रभावशाली व प्रसिद्ध असतो. जातक सासऱ्याचे अनुकरण करतो. जातक राजकारणी व टीकाकार असतो. 

दशमस्थानात मिथुन राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

मिथुन राशीचा शनि दशमस्थानात असेल तर जातक अधिकारसंपन्न, कुळात प्रसिद्ध व यशस्वी असतो. जन्मस्थानापासून दूर राहतो. पण मातापित्याशी पटत नाही. 

दशमस्थानात कर्क राशीचा शनि असेल- 

कर्क राशीचा शनि दशमस्थानात असेल तर जातक लेखक, संशोधक, समाजात प्रसिद्ध, राजमान्य, सुखी, श्रीमंत आजोळकडून सुख मिळविणारा, पित्याशी मतभेद असणारा, परस्त्रियांचा भोक्ता असतो. 

दशमस्थानात सिंह राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

सिंह राशीचा शनि दशमस्थानात असेल तर जातकाला कौटुंबिक सौख्य चांगले मिळते. पण पित्याचा संबंध परस्त्रीशी असल्याने सुख मिळत नाही. जातकाची पत्नी क्रूर स्वभावाची असते. तरीही जातक संपन्न व सुखी असतो. 

दशमस्थानात कन्या राशीचा शनि असेल- 

कन्या राशीचा शनि दशमस्थानात असेल तर जातक श्रीमंत, सुखी, राजमान्य व आईवडीलांचा आज्ञाधारक असतो. जातकाची पत्नी क्रूर व द्वेषी असते. यांना संतती सुखात अडचणी असतात. 

दशमस्थानात तूळ राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

या दशमस्थानात तुळ राशीचा शनि असेल तर सुखी, संपन्न, राजमान्य, यशस्वी, आईवडील, भाऊबहिणींचे सुख प्राप्त असलेला असतो. पत्नी सुशिक्षित मिळते. 

दशमस्थानात वृश्चिक राशीचा शनि असेल- 

या दशमस्थानात वृश्चिक राशीचा शनि असेल तर जातक श्रीमंत, सुखी विद्वान, राजमान्य असतो. आईवडीलांचे व भावंडांचे सुख चांगले मिळते. जातकाला पुत्र सुखात बाधा असते. 

दशमस्थानात धनु राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

या दशमस्थानात धनु राशीचा शनि असेल तर जातक श्रीमंत, सुखी, चतुर व यशस्वी असतो. मातापित्याशी सलोखा राहत नाही. जातकाची आई कटू बोलणारी असते. जातकालाही कटू बोलण्याची सवय असते. 

दशमस्थानात मकर राशीचा शनि असेल- 

मकर राशीचा शनि दशमस्थानात असेल तर जातक धाडसी, धार्मिक, अधिकारसंपन्न, यशस्वी व परोपकारी असतो. जातकाची आर्थिक स्थिती चांगली असते. मामा-मावशीचे सुख चांगले मिळते. 

दशमस्थानात कुंभ राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

कुंभ राशीचा शनि दशमस्थानात असेल तर जातक धार्मिक, श्रद्धाळू, अधिकारसंपन्न, यशस्वी व परोपकारी असतो. मामा-मावशीचे सुख चांगले मिळते. 

दशमस्थानात मीन राशीचा शनि असेल- 

मीन राशीचा शनि दशमस्थानात असेल तर जातक परोपकारी, आस्तिक, अधिकारसंपन्न, धाडसी, कर्तृत्त्ववान असा असतो. सामाजिक व धार्मिक कार्यात पुढाकार असतो. बालपण फार खडतर असते. आईवडील व भावंडांचे सुख कमी मिळते. जातकाला अनौरस संतती असते. 


एकादशस्थान- Sade Sati Storm 2025

एकादशस्थानी मेष राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

या एकादशस्थानी मेष राशीचा शनि असेल तर जातकाचा पैसा स्थिर रहात नाही. संगत चांगली मिळत नाही. अल्पायुषी असतो. समाजात नावलौकिक होतो यशस्वी व राजमान्य असतो. 

एकादशस्थानी वृषभ राशीचा शनि असेल- 

वृषभ राशीचा शनि एकादशस्थानात असेल तर जातकाला अपमृत्यूचे भय संभवते, शरीर कृश व रोगी असते. वाईट संगत असते. पत्नी सुंदर व सुशील असते. परंतु प्रसुतीच्या वेळी मरणोप्राय यातना होऊन तिला मृत्यू येण्याची दाट शक्यता असते. 

एकादशस्थानी मिथुन राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

मिथुन राशीचा शनि एकादशस्थानात असेल तर जातकाला चोरभय, राजभय नेहमी असते. राजभयामुळे धननाश सोसावा लोगतो. जातकाला शत्रू फार असल्याने जीवाला धोका असतो. पत्नी सुंदर, सुशील व आज्ञाधारी असते. पण प्रसुतीच्या वेळी तिच्या जीवाला धोका असतो. संतती सुखात बाधा येते. पत्नीच्या खऱ्या जन्मदात्याविषयी शंका असते. 

एकादशस्थानी कर्क राशीचा शनि असेल- 

कर्क राशीचा शनि एकादस्थानात असेल तर जातक लोकप्रिय, यशस्वी, विद्वान, असतो. अधिकारसंपन्न, राजमान्य, धनसंपत्तीने युक्त संगीतात प्रवीण व ललित कलेची रूची असते. चोरीमुळे धनक्षय संभवतो. याला शत्रू फार असल्यामुळे शस्त्रघाताची भीती असते. 

एकादशस्थानी सिंह राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

या एकादशस्थानी सिंह राशीचा शनि असेल तर जातक संगीतकलेत प्रवीण, इतर कलांचा जाणकार, विद्वान, यशस्वी, चतुर, अधिकारसंपन्न असतो.  स्वकर्तृत्त्वाने आयुष्यात प्रगती करतो. जातक दीर्घायुषी व मातापित्यांची सेवा करणारा असतो. परंतु जन्मस्थानापासून दूर राहून आयुष्य कंठणारा व परजातीय मुलीशी लग्न करणारा असतो. 

एकादशस्थानी कन्या राशीचा शनि असेल- 

कन्या राशीचा शनि एकादशस्थानी असेल तर जातक कर्तृत्त्ववान, संपन्न, निरोगी, दीर्घायुषी, मातापित्यांचा आदर करणारा, सुखी, धाडसी, रागीट, राजमान्य, भावंडांचे सुख मिळविणारा व सुखी जीवन जगणारा असतो. जन्मस्थानापासून दूर राहिल्याने आयुष्यात यश मिळते. 

एकादशस्थानी तूळ राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

तूळ राशीचा शनि एकादशस्थानी असेल तर जातक धाडसी, कर्तुत्त्ववान, समाजसेवक, राजमान्य, मित्र व भावंडांचे सुख भोगणारा, संपन्न, व्यापार व लोकाचारात कुशल असतो. 

एकादशस्थानी वृश्चिक राशीचा शनि असेल- 

वृश्चिक राशीचा शनि एकादशस्थानी असेल तर जातकाला लहानपणी रोग असतो. परंतु बाकीचे जीवन सुखी व निरोगी असते. जातक आस्तिक, उद्योगी, विद्वान, व्यापारात कुशल, लोकांशी व्यवहार करण्यात चतुर, समाजात नाव कमावणारा व यशस्वी जीवन जगणारा असतो. 

एकादशस्थानी धनु राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

धनु राशीचा शनि एकादशस्थानात असेल तर जातक उदार, उद्योगी, धाडसी, विद्वान, सर्व ऐहिक सुखे भोगणारा, आयुष्यमान परंतु संतती सुख नसलेला, व्यवहारकुशल असा असतो. 

एकादशस्थानी मकर राशीचा शनि असेल- 

मकर राशीचा शनि एकादशस्थानात असेल तर जातक सत्यवादी, सुखी, संपन्न, व्यवहारकुशल, मितभाषी, विद्वान व लेखक किंवा कवी असतो. पुत्रसुखात काहीतरी बाधा असते. 

एकादशस्थानी कुंभ राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

कुंभ राशीचा शनि एकादशस्थानात असेल तर जातक दीर्घायुषी, संभाषणात व व्यवहारात चतुर, विद्वान, साहित्यप्रेमी, सुस्वरुप, धडधाकट शरीर असलेला व श्रीमंत असतो. वकीलीमध्ये चांगला पैसा व नाव कमावतो. 

एकादशस्थानी मीन राशीचा शनि असेल- 

मीन राशीचा शनि एकादशस्थानी असेल तर जातक संपन्न व सुखी जीवन जगणारा असतो. कोर्टकचेरीच्या वादात यश मिळून फायदा होतो. जातक आस्तिक, समाजसेवी, यशस्वी, दीर्घायुषी, दानशूर, राजकीय क्षेत्रात नेतृत्त्व करणारा असा असतो. 


द्वादशस्थान- Sade Sati Storm 2025

द्वादशस्थानात मेष राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

द्वादशस्थानात मेष राशीचा शनि असेल तर जातक धूर्त असतो, शत्रू फार असतात, सरकारी नौकरी करणारा असतो. जन्मस्थानापासून दूर भाग्योदय होतो. मामा व भावंडांचे सुख कमी असते. 

द्वादशस्थानी वृषभ राशीचा शनि असेल- 

या द्वादशस्थानी वृषभ राशीचा शनि असेल तर जातकाला नेहमी जलभय, वीषभय, जनावरांचे भय असते. जातक ठग, चोर, खुनी, तस्करी करणारा असतो. शरीरात काहीतरी रोग असतो. जातक धूर्त, अभिमानी, खुनशी असतो. 

द्वादशस्थानी मिथुन राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

मिधुन राशीचा शनि द्वादशस्थानी असेल तर जातकाचा लहानपणी मृत्यूभय असते. पाणी व जनावरांपासून भीती असते. जातक सुदृढ नसतो. मृत्यूनंतरही शरीराची चिरफाड ( पोस्टमार्टम) होते. फसवणूक, चोरी यासारखे दुर्गुण असतात. याची पत्नी लोभी, खर्चिक, दुष्ट स्वभावाची असते. पत्नी कोणाचा हात धरुन पळून जाण्याची दाट शक्यता असते. जातकाला कापड व्यवसायात भरपूर लाभ होतो. 

द्वादशस्थानी कर्क राशीचा शनि असेल- 

कर्क राशीचा शनि द्वादशस्थानी असेल तर जातकाची पत्नी व सासरवाडीचे नातेवाईक हे दुष्ट प्रवृत्तीचे असतात. सासरा तस्कर, चोर, लाचखाऊ असतो. कापड व्यवसायात चांगला लाभ होतो. 

द्वादशस्थानी सिंह राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

सिंह राशीचा शनि द्वादशस्थानी असेल तर जातक रोगी, क्रूर व निर्दयी असतो. मारामारीची आवड असणारा, परस्त्रीगामी असतो. जनावरांमुळे किंवा विदेशात धनहानी होते. पुत्रसुख नसते. पुत्र झालाच तर त्याच्याशी संबंध चांगले राहात नाही. 

द्वादशस्थानी कन्या राशीचा शनि असेल- 

कन्या राशीचा शनि द्वादशस्थानी असेल तर जातकाचे भाग्योदय परदेशात किंवा परगावात असते. जातक दीर्घायुषी असतो. कौटुंबिक सौख्य चांगले मिळत नाहीत. 

द्वादशस्थानी तूळ राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

तुळ राशीचा शनि द्वादशस्थानी असेल तर जातक दीर्घायुषी असते. चोरी, परस्त्रीलोभ असे दुर्गुण आढळतात. जातकाला कौटुंबिक सौख्य चांगले मिळत नाही. राजभय व मृत्यूदंड यांचे भय असते. 

द्वादशस्थानी वृश्चिक राशीचा शनि असेल- 

वृश्चिक राशीचा शनि द्वादशस्थानी असेल तर जातक धाडसी, उद्योगी, विदेशगमन करणारा, अभिमानी, कर्तुत्त्ववान, राजनीतिनिपूण, दुर्बुद्ध, दुष्ट, निर्दयी, चोर, ठग, बहुरुपी व वाईट संगत व व्यसन असलेला असतो. जातक भांडखोर, व परस्त्रीगामी असतो. कुटुंबाशी व मित्रांशी पटत नाही. 

द्वादशस्थानी धनु राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

धनु राशीचा शनि द्वादशस्थानी असेल तर जातक लोभी, जुगारी, चोर, क्रोधी, अभिमानी, बोलण्यात बाकबगार, चतुर, राजकारणी, ठग, बहुरुपी, परस्त्रीगामी असतो. आर्थिक स्थिती बेताचीच असते. दत्तक़विधानामुळे किंवा इतर मार्गाने पैसा भरपूर मिळतो. थोरल्या मुलाच्या प्रेमाला जातक वंचित असतो. शिल्पकलेत प्रवीण असतो. 

द्वादशस्थानी मकर राशीचा शनि असेल- 

मकर राशीचा शनि द्वादशस्थानात असेल तर जातक वारसा हक्काने इतरांची संपत्ती मिळविणारा, गोडबोल्या, निर्दयी, रागीट, परस्त्रीगामी व जुगारी असतो. आईशी मतभेद असतात. ग्रामीण वातावरणाचा शौकीन व भोजनभाऊ असतो. संततीसुखात कमतरता असते. आर्थिक स्थिती चांगली असते. 

द्वादशस्थानी कुंभ राशीचा शनि असेल- 

या द्वादशस्थानी कुंभ राशीचा शनि असेल तर जातक अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणारा, उत्पात करणारा, दुष्टबुद्धीचा, कर्तुत्त्ववान, अल्पायुषी व संतती किंवा मातृसुखाला पारखा असतो. 

द्वादशस्थानी मीन राशीचा शनि असेल- Sade Sati Storm 2025

मीन राशीचा शनि द्वादशस्थानी असेल तर जातक सरकारी नोकरी करणारा, शत्रूनी घेरलेला, दुष्टबुद्धीचा, कामुक, अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणारा, धडपड्या असतो. आईशी मतभेद असतात. 


शनिच्या विंशोत्तरी महादशेची फले- Sade Sati Storm 2025

जो ग्रह आपल्या उच्चराशीत असेल, स्वक्षेत्री, मित्रराशीत असेल, अष्टकवर्गात चारपेक्षा अधिक बिंदू त्याला मिळालेले असतील. लग्न, चतुर्थ, सप्तम व दशम यापैकी फ्रेंद्रस्थानी असेल, नवांशात उच्च असेल, षड्बलाने युक्त असेल, शुभग्रहाने युक्त किंवा पाप ग्रहाने युक्त असेल तर तो ग्रह आपल्या महादशेत किंवा अंर्तदशेत चांगली फले देतो. याउलट जो ग्रह नीच राशीत 

असेल, भाव-संधीत असेल, अष्टक वर्गात चारपेक्षा कमी बिंदूत असेल, सहा, आठ व बारा या अशुभ स्थानी नवांशात नीच राशीत असेल, षड्‌बलात हीनबली असेल, अस्तंगत असेल, शत्रुराशीत असेल, अशुभ ग्रहाने युक्त किंवा दुष्ट असेल तर तो ग्रह आपल्या महादशेत किंवा अंर्तदशेत अशुभ फले देईल. हे मुख्य सुत्र महादशेची फले पाहताना लक्षात घेणे आवश्यक आहे. 


शनि महादशेची विस्तारपूर्वक फले- Sade Sati Storm 2025

1) कुंभ लग्न Sade Sati Storm 2025

कुंभ लग्न असून बलवान शनि प्रथमस्थानाचा स्वामी असेल तर शनि १२ महादशेत सन्मान मिळेल व अर्थलाभ चांगला होईल. खालच्या दर्जाच्या लोकांशी विशेष संबंध महादशेच्या काळात येईल व त्यांच्यापासून फायदा होत राहील. कुंभ लग्न असून शनि प्रथमस्थानाचा स्वामी असेल पर तो निर्बली व पीडित असेल तर शनि महादशेच्या काळात पायाची दुखणी वाढतील, नोकरचाकरांकडून नुकसान होईल. अर्थिक नुकसान होईल. शासनाकडून नाना प्रकारचा त्रास होईल. अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागेल. प्रतिष्ठेला धक्का देणारे अपमानजनक प्रसंग येतील.

2) मकर लग्न Sade Sati Storm 2025

मकर लग्न असून बलवान शनि द्वितीयस्थानाचा स्वामी असेल तर शनि ९ महादशेच्या कालावधीत मान-प्रतिष्ठा व अर्थिक लाभ मिळतील. स्वकर्तृत्त्वाने वं परिश्रमाने आर्थिक लाभ मिळवता येईल. कनिष्ठ दर्जाच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. मकर लग्न असून शनि द्वितीयस्थानाचा स्वामी असेल व तो निर्बली किंवा पीडित असेल तर धन व मान दोन्हींचे नुकसान होईल. गुडघ्यांचा विकार बळावेल. इतर रोगही होण्याची शक्यता राहील. पत्नीला वातरोगाचा त्रास सुरू होईल. 

3) धनु लग्न Sade Sati Storm 2025

धनु लग्न असून बलवान शनि तृतीयस्थानाचा असेल तर शनि महादशेत विद्याभ्यासात प्रगती होईल. भावंडांकडून व मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल व त्यामुळे धन्रपाप्ती होईल. कुटुंबातील सर्व लोकांचे सहकार्य मिळेल. धनुलग्न असून शनि तृतीयस्थानाचा स्वामी असेल व शनि निर्बली किंवा पीडित असेल तर सुखाचा नाश होतो. शनि पीडित असेल तर शनि महादशेत पैसा चांगला मिळेल. मात्र मित्रांकडून भरपूर नुकसान होईल. बडीणभावांचे संबंध चांगले राहणार नाहीत. 

4) वृश्चिक लग्न Sade Sati Storm 2025

वृश्चिक लग्न असून बलवान शनि चतुर्थस्थानाचा स्वामी असेल तर सुखात वाढ करील, कनिष्ठ दर्जाच्या लोकांकडून फायदा होत राहील. भूमिलाभ होईल. 

वृश्चिक लग्न असून शनि चतुर्थस्थानाचा स्वामी असून निर्बली व पीडित असेल तर सुखाचा नाश होतो. मानसिक त्रास चिंता वाढते. भावंडांपासून त्रास होतो. स्थावरासंबंधी वाद निर्माण होतात. स्थावर मिळण्यात अनेक अडचणी येतात. राजकारण्यांना जनतेपासून विशेष त्रास होण्यास सुरवात होते.

5) तूळ लग्न Sade Sati Storm 2025

तूळ लग्न असून बलवान शनि पंचमस्थानाचा स्वामी असेल तर शनि महादशेत स्थावर जमिनीची प्राप्ती होते. मुलांकडून सुख मिळते. स्थावरासंबंधी सुखात वाढ होते. तूळ लग्न असून शनि पंचमस्थानाचा स्वामी असेल तर तो निर्बली किंवा पीडित असेल तर त्रासदायक काळ येऊन स्थावर जमीन यांचे नुकसान सहन करावे लागते. 

6) कन्या लग्न Sade Sati Storm 2025

कन्या लग्न असून बलवान शनि षष्ठस्थानाचा स्वामी असेल तर शनि महादशेत अर्थिक नुकसान कमी होते. परिश्रम भरपूर मात्र उत्पन्न अत्यंत कमी. शत्रूचा त्रास कमी होतो. कन्या लग्न असून बलवान शनि षष्ठस्थानाचा स्वामी असेल तर शनि महादशेत दीर्घकालीन रोग उद्भवतात. संततीकडून शत्रूसारखा त्रास भोगावा लागतो. पण पैसा चांगला मिळतो. 

7) सिंह लग्न Sade Sati Storm 2025

सिंह लग्न असून बलवान शनि सप्तमस्थानाचा स्वामी असेल तर शनि महादशेत स्थिर लक्ष्मी प्राप्त होते. व्यापारात लाभ होतो. लोखंडाच्या व्यापारात अधिक पैसा मिळतो. चांगली स्त्री मिळण्याची शक्यता असते. सिंह लग्न असून शनि सप्तमस्थानाचा स्वामी असेल व तो निर्बली किंवा पीडित असेल तर पत्नी आजारी पडते. व्यापारात नुकसान होते. या कालखंडात स्त्री शत्रूसारखी वागून त्रास देते. 

8) कर्क लग्न Sade Sati Storm 2025

कर्क लग्न असून बलवान शनि अष्टमस्थानाचा स्वामी असेल तर शनि महादशेत अर्थलाभ होतो. शासनाकडून पैसा मिळतो. तब्येत चांगली राहते. भावंडाकडूनही , थोडाबहुत फायदा होतो. 

कर्क लग असून शनि अष्टमस्थानाचा स्वामी असेल पण तो निर्बल किंवा पीडित असेल तर विदेशयात्रा घडण्याचा संभव असतो. आर्थिक आवक चांगली होते. स्वतःला काही रोग होण्याची भीती असते. 

9) मिथुन लग्न Sade Sati Storm 2025

मिथुन लग्न असून बलवानं शनिं नवमस्थानाचा स्वामी असेल तर शनिच्या महादशेत धनप्राप्तीत वाढ होते. वडिलांना या काळात विशेष लाभ होतात. विदेशातून पैसा येतो. 

मिथुन लग्न असून शनि नवमस्थानाचा स्वामी असेल पण तो निर्बली किंवा पीडित असेल तर शनि महादशेत भाग्यहानी होते. शासनाकडून त्रास होतो. वडिलांचे अर्थिक खर्च वाढतात. 

10) वृषभ लग्न Sade Sati Storm 2025

वृषभ लग्न असून दशमस्थानाचा स्वामी बलवान शनि असेल तर महादशेत मोठ्या प्रमाणात पैसा हाती येतो. शासनाकडून वडिलांना लाभ होत असतात. वृषभ लग्न असून स्वामी शनि असेल तर शनि महादशेत हातून दुष्ट कार्ये होतात. धन व भाग्याची हानी होते.  वडिलांनाही फार मोठे अर्थिक नुकसान सोसावे लागतात. 

11) मेष लग्न Sade Sati Storm 2025

मेष लग्न असून एकादशाचा स्वामी बलवान शनि असेल तर शनि महादशेत चांगला पैसा मिळतो. स्थावर-जमीन वगैरेचा लाभ होईल. शासनाकडूनही काही फायदा होत राहतो. मेष लग्न असून एकादशस्थानाचा स्वामी शनि असून तो निर्बली किंवा पीडित असेल तर, शनि महादशेत ९ ४ ९ ५ ७ ६ ८ शासनाकडून त्रास अर्थिक नुकसान होते. प्राप्ती कमी होते. थोरला भाऊ किंवा थोरल्या बहिणीला त्रास होतो. स्वतःच्या पायात वेदना होतात. 

12) मीन लग्न Sade Sati Storm 2025

मीन लग्न असून द्वादशस्थानाचा स्वामी बलवान शनि असेल तर शनि महादशेत अर्थिक उत्पन्न वाढेल. त्याच बरोबर खर्चही जास्त होईल. स्थावराची प्राप्ती होते. भावाबहिणींचे सहकार्य मिळते. परिश्रम अधिक करावे लागतात. मीनलन असून निर्बली किंवा पीडित शनि व्ययस्थानात स्वामी असेल तर शनि P २ ३ ९ ४ ६ ८ ५ ७ महादशेत अर्थिक नुकसान होते. भावंडांकडून सहकार्य मिळत नाही. प्रवासात नुकसान होते. 


शनिची अंतर्दशेची फले- Sade Sati Storm 2025

शनि महादशेची आधी सांगितलेली फले सामान्यतः अंतर्दशेत मिळतात. महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे जो ग्रह लग्नाच्या स्वामीचा मित्र असेल त्याप्रमाणेच फले मिळतात. त्याबरोबरच अंतर्दशेतील ग्रह लग्न किंवा लग्नेशाच्या मित्रस्थानी असेल तर शुभ फल देतो. शत्रूस्थानी असेल तर अशुभ फले देईल. 


अन्यग्रहांवरुन शनिच्या भ्रमणाची फले- Sade Sati Storm 2025

१)रवि – 

मूळ कुंडलीतील रवीवरून किंवा शनिच्या सप्तमातून, एकादशस्थानातून, चतुर्थस्थानातून शनिचे गोचर भ्रमण होईल, तेव्हा शासनाकडून अनेक प्रकारचा त्रास होतो. नोकरी जाते, व्यवसाय बंद पडतात. उत्पन्नाचे मार्ग बंद होतात. पोटाचे विकार उद्भवतात. वडिलांनाही त्रास होतो. 

2) चंद्र- 

मूळ कुंडलीतील चंद्रावरुन किंवा चंद्राच्या सप्तमातून, एकादशस्थानातून व चतुर्थस्थानातून शनीचे गोचर भ्रमण होईल, तेव्हा अर्थिक नुकसान होते. मनात उदासपणा व चिंता वाढते. छातीच्या रोगांचा, सर्दी, न्यूमोनिया, खोकला इत्यादींचा प्रादुर्भाव होतो. 

3) मंगळ- 

मूळ कुंडलीतील मंगळावरून किंवा मंगळाच्या सप्तमातून शनिचे भ्रमण होईल तेव्हा स्वभावात क्रूरपणा वाढतो. भावंडांशी भांडणे होतात. शत्रूशी दोन हात करावे लागतात. शासनाकडून त्रास होतो. रक्तविकार किंवा सांध्याचे विकार व मूळव्याधीचा त्रास होतो. 

4) बुध- 

मूळ कुंडलीतील बुधावरुन किंवा बुधाच्या सप्तमातून, एकादशस्थानातून किंवा चतुर्थस्थानातून शनीचे भ्रमण होईल तेव्हा विद्याभ्यासात अपयश, स्वकीयांचा वियोग, धंद्यात मंदी, मामाशी वादविवाद होतो. 

5) गुरु- 

मूळ कुंडलीतील गुरुवरून किंवा गुरुच्या सप्तमातून अथवा एकादशस्थानातून शनीचे भ्रमण होईल तेव्हा पैशाचा तुटवडा जाणवतो. पुत्राशी मतभेद किंवा पुत्राचा वियोग होतो. सुखात न्यूनता येते. हृदयरोगाचा प्रादुर्भाव होतो. 

6) शुक्र- 

मूळ कुंडलीतील शुक्रावरुन किंवा त्याच्या सप्तमातून, एकादश व चतुर्थस्थानातून किंवा चतुर्थातून शनीचे गोचर भ्रमण होईल तेव्हा पत्नीशी बेबनाव होतो. जन्मकुंडलीतील शुक्र जर राहू, शनि किंवा इतर पापग्रहाने पीडित असेल तर घटस्फोटापर्यत पाळी येते. अर्थिक त्रास वाढतो, सुखात न्यूनता येतो. 

7) शनि- 

मूळ कुंडलीतील शनिवरून किंवा त्याच्या सप्तमातून, एकादश किंवा चतुर्थस्थानातून शनीचे गोचर भ्रमण होईल. तेव्हा स्थावराचा नाश होतो, कनिष्ठ दर्जाच्या लोकांकडून त्रास होतात. अनेक प्रकारच्या त्रासातून जातकाला जावे लागते. 


शनिचे राशी गोचर भ्रमण- Sade Sati Storm 2025

जन्मराशीत- Sade Sati Storm 2025

शनिचे गोचर भ्रमण जन्मराशीत होत असताना रोगाचा प्रादुर्भाव होतो. सुखशांती कमी मिळते. आप्तांशी वितुष्ट येते. स्वकीयांपासून दूर राहावे लागते. राहती जागा सोडण्याचा प्रसंग येतो. सरकारकडून कारावास होण्याची शक्यता असते. अर्थिक परिस्थितिचा बोजवारा वाजतो आणि शरीर निस्तेज होत जाते. 

जन्मराशीपासून दुसरा- Sade Sati Storm 2025

शनिचे गोचर भ्रमण जन्मराशीपासून दुसऱ्या स्थानातून होत असताना आर्थिक अडचणी वाढतात. पत्नीस मरणप्राय यातना होतात. अनेक प्रकारचे क्लेश व नाश होतात, विदेशयांत्रा होण्याची दाट शक्यता असते. 

जन्मराशीपासून तीसरा- 

शनिचे गोचर भ्रमण जन्मराशीपासून तिसऱ्या स्थानातून होत असताना शनि अतिशय चांगली फले देतो. सर्वप्रकारचे सुख व लाभ मिळतात. अर्थिक लाभ, अर्थसंचय, नोकरी-व्यापारधंद्यात प्रगती, नोकर-चाकर, वाहन, पाळीव पशूपासून फायदे होतात. प्रत्येक कार्यात यश मिळते. शत्रूवर विजय मिळतो. जमीन-स्थावराच्या व्यवहारात फायदा होतो. 

जन्मराशीपासून चौथा- Sade Sati Storm 2025

शनिचे गोचर भ्रमण जन्मराशीपासून चौथ्या स्थानातून होत असताना जातकाच्या अर्थिक खर्चात वाढ होते. कार्यात अपयश येते. स्थावर- इस्टेटीसंबंधीत कटकटी सुरु होतात. नोकरदारांची बदली होते. प्रवासात दगदग होते. राजकारणी लोकांना अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. अपमानजनक परिस्थिति निर्माण होते. 

जन्मराशीपासून पाचवा – 

शनिचे गोचर भ्रमण जन्मराशीपासून पाचव्या स्थानातून होत असताना जातकाच्या मनीध्यानी नसताना अर्थिक खर्चात वाढ होते. विद्याभ्यासात मन लागत नाही. संततिविषयक प्रश्न उभे राहतात. बुद्धी भ्रष्ट होते. व्यापारात मंदी येते. अर्थिक अडचणी प्रकर्षाने जाणवतात. कोणतीही नवीन योजना सुरळीत सुरु होत नाही व राबवता येत नाही. पत्नीस वातरोगाचा त्रास होतो. 

जन्मराशीपासून सहावा- Sade Sati Storm 2025

शनिचे गोचर भ्रमण जन्मराशीपासून सहाव्यास्थानातून होत असताना शनि अतिशय चांगली फले देतो. तब्येतीच्या कुरबुरी संपुष्टात येतात. स्त्री-भोग विलासात वेळ जातो. प्रेमवीरांना प्रेमप्रकरणी घवघवीत यश मिळते. सुखसौख्याची बरसात होते. कौटुंबिक सुखात वाढ होते. शत्रूचा पराभव होतो. फ्लॅट खरेदीस अनुकूलता येते. 

जन्मराशीपासून सातवा – 

शनिचे गोचर भ्रमण जन्मराशीपासून सातव्यास्थानातून होत असताना रोगाची, विशेषतः गुप्तरोग होण्याची भीती असते. पत्नीला त्रास होतो. प्रवासात दगदग होते. अर्थिक अडचणी शिखर गाठतात. काहींचे धंद्यात दिवाळे वाजते. पत्नीचा बेबनाव पराकोटीला जाऊन घटस्फोटापर्यंत मजल जाते. 

जन्मराशीपासून आठवा- Sade Sati Storm 2025

शनिचे गोचर भ्रमण जन्मराशीपासून आठव्यास्थानातून होत असताना सुखाची सर्व साधने जवळ-जवळ असूनही त्यांचा उपभोग घेता येत नाही. कष्ट भरपूर करावे लागतात, त्या मानाने अर्थिक आवक होत नाही. वाईट सवयी, संगत व जुगारामुळे प्रचंड नुकसान होते. पत्नी व मुलाबाळांचा असहकार असतो. 

जन्मराशीपासून नववा- 

शनिचे गोचर भ्रमण जन्मराशीपासून नवव्यास्थानातून होत असताना विघ्ने व दुःखांचा मारा सहन करावा लागतो. प्रत्येक कार्यात विघ्न-विलंब होतो. हृदयरोगाचा व तांत्रिक क्रिया करणीचा त्रास होतो. 

जन्मराशीपासून दहावा- Sade Sati Storm 2025

शनिचे गोचर भ्रमण जन्मराशीपासून दहाव्या स्थानातून होत असताना रोगांचा प्रादर्भाव होतो. आर्थिक साधनात वृद्धी होते. नवीन कार्याचा आरंभ होतो. नोकरी-व्यवसायात बदल होतो. छातीच्या रोगाचा त्रास सुरु होतो. पत्नीशी वैमनस्य येऊन वेगळे राहण्याचा प्रसंग येतो. अपयश किंवा अपमानाची बोचणी राहते. 

जन्मराशीपासून अकरावा- 

शनिचे गोचर भ्रमण जन्मराशीपासून अकराव्यास्थानातून होत असताना अनेक चांगल्या गोष्टी घडतात. हा गोचर शनिभ्रमणाचा कालखंड जीवनात उत्कृष्ट असा ठरतो. कीर्ती मिळते. वैभव प्राप्त होते. अर्थिक परिस्थितीत सुधारणा होते. कौटुंबिक सौख्य उत्तम मिळते. व्यवसायात प्रगती होते. स्त्रियांकडून लाभ होतात. लोखंड, यंत्रे, सिमेंट, कोळसा या वस्तूंच्या व्यापारातून व जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायातून फायदा होतो. 

जन्मराशीपासून बारावा- Sade Sati Storm 2025

शनिचे गोचर भ्रमण जन्मराशीपासून बाराव्यास्थानातून होत असताना शनि अत्यंत वाईट फले देतो. अर्थिक नुकसान होते, संकटाला सामोरे जावे लागते. निरर्थक त्रास सहन करावा लागतो. संततीस हा काळ त्रासदायक जातो. संबंधित व प्रतिष्ठित लोकांशी मतभेद होतात. दूरवरचे प्रवास निरर्थक व त्रासदायक होतात. रोगांचा प्रादुर्भाव होतो. 


अष्टकवर्गावरुन शनि त्रासदायक आहे. हे कसे ओळखावे? 

अष्टकवर्गात प्रत्येक ग्रहाला एकुण आठ गुण दिले जातात. शनिग्रहाला सुद्धां आठ च गुण आहेत. यापैकी जेव्हा शनि गोचर भ्रमणाने पुढे जाईल तेव्हां त्याला आठपैकी ०,१,२ असे गुण मिळाले तरी शनि खूपच त्रासदायक ठरते. दोन गुण लावून जातकाची एकुण परिस्थिति ढासळण्यास सुरवात होऊन जेव्हां गुण मिळतील त्या काळात जातकाच्या व्यवसायाचे दिवाळे वाजते व दारिद्र्य येऊन त्याला दारोदारी भिक्षा मागण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. नक्षत्र पद्धति प्रमाणें शनि नक्षत्र भ्रमणाची वाईट फळे केव्हा मिळतात. 

जन्मनक्षत्रापासून पहिले नक्षत्र- उत्पत्तिकर, दुसरे नक्षत्र संपत्तिकर, तिसरे नक्षत्र विपत्तिकर, चवथे नक्षत्र क्षेमकर, पांचवे नक्षत्र प्रत्वर, सहावे नक्षत्र साधक, सातवे नक्षत्र नैश्वन, आठवे नक्षत्र मित्र व नववे नक्षत्र परममैत्र या क्रमानें शनिची शुभअशुभ फळे मिळतात. जन्मनक्षत्रापासून पहिले, दुसरे, चवथे, सहावे, आठवे, नववे, दहावे, अकरावे, तेरावे, पंधरावे, सतरावे, अठरावे, एकोणीसवावे, बावीसवावे, चौवीसवावें, सत्तावीसवावे अशी १८ नक्षत्रे वाईट फलदायक समजावीत, आपल्या जन्मनक्षत्रापासून विपदकर, पत्वर, नैश्वन या सदरात येणारी नक्षत्रे अनिष्ट व अशुभफले देतात. तसेच जन्म, उत्पत्तिकर, संपतकर, क्षेमकर, साधक, मैत्र, परममैत्र, ही नक्षत्रे अनुकूल व शुभफल देतात. 


पूर्व कल्पना –

जन्मनक्षत्रापासून तिसरे, पाचवे, सातवे, बारावे, चौदावे, सोळावे, एकविसावे, तेवीसावे व पंचवीसावे ही नऊ नक्षत्रे अनिष्ट फलदायक असतात. यावरुन जातकाला केव्हां केव्हां शनि ग्रह अनिष्ट व अशुभ फलदायक होईल त्याची पूर्ण कल्पना येते. 


Daily Horoscope 18 January 2025

मार्गदर्शन :-

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा लेख आवडला असेल आणि तो उपयुक्त वाटला असेल. कृपया आपल्या कुटुंब आणि मित्रांसह सामायिक करा आणि अधिक लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या

अश्याच नवनवीन लेख ची सूचना आपल्याला वेळोवेळी मिळत राहावी या साठी खालील WhatsApp वर क्लिक करावे.

Love Marriage 2025

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevasprathishthan@Gmail.Com या वर मला Email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित 
श्रीपाद विनायक जोशी (गुरुजी)

कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,
संतती समस्या विशेतज्ञ
सामुद्रिक ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ , व्यसन मुक्ती औषध तज्ञ
( दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)

शनी संक्रमण २०२५: या राशीवर साडे साती सुरू होईल? या राशींचा सुवर्णकाळ सुरू होईल, त्यांना मिळेल अमाप धन संपत्ती;

 कुंभ राशीत शनी मार्गी: नोव्हेंबर पासून शनिदेव वाढवू शकतात या ३ राशीच्या अडचणी, आर्थिक नुकसान होण्याची संकेत; हि काळजी घ्यावी

 नोव्हेंबर पासून शनिदेव वाढवू शकतात या ३ राशीच्या अडचणी, आर्थिक नुकसान होण्याची संकेत; हि काळजी घ्यावी

कुंभ राशीत शनि मार्गी: या राशींना नशिबाची साथ मिळू शकते, आर्थिक लाभाची प्रबळ शक्यता; देश, जगावर कसा परिणाम होईल?

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tarot Weekly Horoscope 26 January to 01 February 2025

Tarot Weekly Horoscope 26 January to 01 February 2025: टॅरो साप्ताहिक राशीभविष्य २६ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२५: येणारे ७ दिवस वरदान समान आहेत, आयुष्यात महत्त्वाचे बदल होतील, करिअर वाढीच्या अनेक संधी मिळतील, तुम्ही भरपूर पैसे कमवाल;

Read More »

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!