When Will My Marriage, विवाहास विलंब होणे, ठरलेला विवाह मोडणे, विवाहानंतर घटस्फोट होणे इत्यादि बद्दलचे कुंडलीतील ग्रहयोग आपण याच पुस्तकात इतरत्र पाहिले आहेत.
आता आपण विवाह केव्हा होईल ? प्रश्नांची उकल करण्यासाठी काही माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी लवकर विवाह होण्यास कोणते ग्रहयोग कारणीभूत होतात हे पहाणे ही आवश्यक आहे.
लवकर विवाह करणारे ग्रहयोग :- When Will My Marriage
१) ज्याच्या जन्मकुंडलीत रवि आणि शुक्र बलवान असतील व इतर ग्रह अनुकूल नसतील तरी सुध्दा अशांचा विवाह लवकर होतो.
२) चंद्र व गुरुची पंचमस्थानावर व सप्तम स्थानावर पूर्ण शुभ दृष्टी असेल वपापग्रहाने ही स्थाने दुषित झालेली नसतील तरी अशा जातकाचा विवाह फार लवकर होतो.
३) जन्मकुंडलीतील लग्न स्थानी व सप्तमस्थानी शुभ ग्रह असतील आणि लग्नेश व सप्तमेश शुभ ग्रहाने युक्त किंवा दृष्ट असतीलआणि पंचम व नवमस्थानी असतील तर विवाहास मुळीच विलंब लागत नाही. विवाह फार लवकर होतो.
४) सप्तमेश व लग्नेश चतुर्थ, पंचम, सप्तम, नवम, दशम, एकादश स्थानी किंवा लग्नी असतील तर विवाह लवकर होतो.शुक्र चंद्र, गुरु चंद्र व रवि चंद्र शुक्र असे योग कुंडलीत असतील तरी सुध्दा विवाह लवकर होतो. विवाहानंतरच भाग्योदय व उत्कर्ष होतो.
विवाह कोणत्या वर्षी होईल ? When Will My Marriage
१) विवाह कोणत्या वर्षी होईल. जन्मकुंडलीतील ग्रह आणि गोचर भ्रमणातील ग्रह यांच्या माहितीच्या आधारे लग्नाचे वर्ष सहज काढता येईल.विवाह होण्यासाठी गुरु, शुक्र व रवि हे तीन ग्रह अनुकूल असावे लागतात. हे ग्रह अनुकूल असतील तर विवाह योग येतो.या ग्रहांच्या अनुकूलते बरोबरच शनिची साडेसाती नसावी.
२) गुरु, मंगळ, राहू व शनि यापैकी कोणत्या ग्रहाची अनुकूलता आहे ते पहाणेव जन्मकुंडलीत ते कोणत्या स्थानांचे स्वामी आहेत त्याचाही विचार लक्षात घ्यावा,अष्टक वर्ग पध्दती प्रमाणे विवाहाचा कारक ग्रह गुरु गोचरीने ५,६,७,८ अशा शुभ बिंदुत असेल तेव्हा म्हणजे त्या वर्षी विवाह नक्की होईल.
वर्षी होईल ? :-
३) जन्मकुंडलीत लग्न, द्वितीय, चतुर्थ, पंचम, सप्तम, नवम व दशम या स्थानांचा स्वामी गुरु,शुक्र आणि चंद्र असून गोचर भ्रमणात तो शुभ वर्षात विवाह होतो. मात्र गोचर भ्रमणातील शनिपेक्षा गुरु बलवान असला पाहिजे.त्याच बरोबर शुक्र व रवि हे दोन्ही ग्रह बलवान असले पाहिजेत. रवि शुक्राच्या भ्रमणावरून लग्नाची माहिती काढता येईल आणि गुरुवरुन लग्नाचे वर्ष समजेल.
४) जन्मकुंडलीतील शुक्र व रवि लग्नेश किंवा सप्तमेश यांच्याशी गोचरीने योग करीत असेलव त्याचा चंद्राशी शुभ योग असेल त्याच वर्षी विवाह होतो.
५) वधूच्या वय वर्षे १८ पासून कोणत्या वर्षी विवाहाच्या दृष्टीने ग्रहबल अनुकूल येते आणि वराच्या वयाच्या २४ पासून ३० वर्षापर्यंत कोणत्या वर्षी लग्नाच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे ते पहावे. ज्या वर्षी अनुकूल ग्रहमान असेल त्यां वर्षी विवाह होतो. सर्व ग्रह अनुकूल असल्यास विवाहाचा पूर्ण व निश्चित योग असतो. काही ग्रहमान अनुकूल व काही प्रतिकूल असेल तर विवाह योगा बद्दल निश्चितपणे काहीच सांगता येत नाही. तथापि गुरु व शुक्र खूप बलवान असतील तर त्या वर्षी विवाह होतोच.
६) मूळच्या शुक्राशी गोचरीच्या रवि शुक्राचा शुभसंबंध झाल्याशिवाय विवाह होत नाही.
विवाह केव्हा ? कोणत्या तारखेस होईल ? When Will My Marriage
कोणत्याही जातकाच्या लग्नाचा दिवस, लग्नाची तारीख म्हणजेच त्याच्या प्रणयसुखाच्या प्रारंभाचा दिवस जाणण्यासाठी (१) लग्नाची (२) लग्नेशाची (३) सप्तम स्थानाची (४) सप्तमेशाची (५) सप्तम स्थानाचा कारक शुक्राची अशा पाच गोष्टींचा विचार करावा लागतो.
जन्म कुंडलीतील स्थितिशी जेव्हा गोचर ग्रहांच्या स्थितिचा संबंध येतो तेव्हा जातकाच्या स्वतःच्या कुंडलीतील योगा प्रमाणे फल मिळते. अर्थात मनुष्याच्या जीवनात कोणत्या दिवशी कोणता प्रसंग घडेल हे जाणणे शक्य होते.
कोणत्याही जातकाच्या जन्मकुंडलीतील जन्मवेळेचे व गोचर ग्रहांचे खालील प्रमाणे योग ज्या दिवशी होतील त्या दिवशी त्या तारखेस जातकाचे लग्न होईल. कोणत्याही जातकाचे लग्न कोणत्या तारखेस होईल त्यासाठी आवश्यक योग, युति, प्रतियुती किंवा दृष्टी संबंध खालील प्रमाणे पहावेत.
अ)
१. जन्म लग्नेश + जन्म गुरु
२. जन्म लग्नेश + गोच गुरु
३. जन्म लग्नेश वृषभ किंवा तुळ या शुक्राच्या राशीत ४. मिथुन, कन्या, मकर किंवा कुंभ लग्न असेल तर जन्म गुरु + गोचर गुरु
५. लमेश ६,८ किंवा १२ यापैकी एका स्थानात असेल, नीचीचा असेल, • शून्य अंशात असेल अथवा मिथुन, कन्या, मकर किंवा कुंभ राशीत
असेल तर लग्र + जन्म गुरु किंवा गोचर गुरु.
ब)
१. जन्म सप्तमेश + जन्म गुरु किंवा गोचर गुरु.
२. जन्म सप्तमेश वृषभ, तुळ किंवा कर्क राशीत येईल तेव्हा ३. सप्तमस्थानात मिथुन, कन्या, मकर किंवा कुंभ यापैकी एक रास असेल तर
सप्तम स्थान + जन्म गुरु किंवा गोचर गुरु किंवा उच्च गुरु ४. जन्मसप्तमेश ६,८ किंवा १२ व्या स्थानी असेल, नीच असेल,
शून्य अंशात असेल किंवा मिथुन, कन्या मकर किंवा कुंभ यापैकी एका राशीत जन्म गुरु किंवा उच्चीचा गुरु असेल.
क)
१. जन्म शनि + गोचर गुरु किंवा गोचर शनि + गोचर गुरुच्या माध्यमातून
जन्म गुरुशी संबंध होईल.
२. जन्म शनि उच्चीचा, नीचीचा किंवा शून्य अंशात असेल किंवा वृश्चिक राशित किंवा जन्म शनि, जन्म गुरु किंवा जन्म मंगळाच्या दृष्टित असेल किंवा शनि शुभ असेल.
ड)
१. गोचर शनि + जन्म शनि.
२. गोचर शनि मेष, कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीत असेल. ३. गोचर शनि मिथुन किंवा मकर राशित असेल
४. जन्म शनि शून्य अंशात असेल तर गोचर शनि वृषभ किंवा तुळ
किंवा वरील कोणत्याही योगात असेल.
इ)
१. जन्म सप्तमेश + गोचर मंगळ. राशित
२. जन्म सप्तमेश मिथुन, कन्या मकर किंवा कुंभ यापैकी एका राशित असेल तर जन्म शुक्र + गोचर मंगळ किंवा गोचर शुक्र मेष किंवा वृश्चिक राशी असेल.
३. जन्म सप्तमेश व जन्म शुक्र मिथुन, कन्या, मकर किंवा कुंभ यापैकी एका राशीत असेल किंवा जन्म शुक्र ६,८ किंवा १२ यापैकी एका स्थानी असेल तर जन्म शुक्र + गोचर मंगळ किंवा गोचर शुक्र मेष किंवा वृश्चिक राशीत किंवा सप्तम स्थानी मंगळ असेल
४. सप्तमेश मंगळ असेल तर गोचर शुक्र, मिथुन, कन्या, मकर किंवा कुंभ यापैकी एका राशीत असेल किंवा गोचर शुक्र मेष किंवा वृश्चिक राशि असेल.
५. शुक्र सप्तमेश असून तो सप्तमस्थानी + गोचर मंगळ किंवा गोचर शुक्र मेष किंवा वृश्चिक राशीत.
६. सप्तमेश मंगळ. बुध 1 असेल तर जन्म शुक्र + गोचर मंगळ किंवा सप्तम स्थानी
७. सप्तमेश रवि किंवा चंद्र असेल तर गोचर मे मेष, वृश्चिक, धनु किंवा मीन राशीत किंवा सप्तमस्थानी गोचर मंगळ.
८. सप्तमेश गुरु असेल तर जन्म शुक्र + गोचर मंगळ किंवा गोचर शुक्र वृश्चिक राशित.
इ)
१. गोचर रवि मेष, कर्क, वृश्चिक किंवा धनु राशीत येईल तेव्हा
२. गोचर रवि मकर, कुंभ किंवा मीन राशीत असेल.
३. गोचर रवि सप्तमस्थानी असेल.
उ)
१. गोचर चंद्र कर्क, सिंह धनु किंवा मीन राशीत असेल.
२. गोचर चंद्र उच्चीचा किंवा सप्तमस्थानात असेल.
३. जन्म मंगळ + गोचर चंद्र
४. वृषभ, तुळ, मकर, कुंभ किंवा मीन यापैकी एक राशि लगात येईल आणि
सिंह लगात गोचर चंद्र मिथुन, कन्या, मकर, किंवा कुंभ राशीत असेल.
याप्रमाणे जन्म ग्रह व गोचर ग्रहांचा योग ज्या तारखेस होईल त्या तारखेस लग्न होईल.
मार्गदर्शन :-
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!
ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,
आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.
( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
अधिक माहिती साठी संपर्क :-
श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन, (संतती समस्या विशेतज्ञ)
सामुद्रिक ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ