Temple, मंदिरावर एकच मुख्य कळस असावा. इतर आणखी कळस बसविले तरी चालतील असे भव्य मंदिर किंवा आकाशाला भिडणारे क्रॉस असो,
जी व्यक्ति त्या खाली किंवा देवमूर्तिच्या चरणात डोके ठेवून चरण स्पर्श करून हाथ जोडून पूजा-अर्चना करते ती खूपच मोठे पुण्य कर्म करते.
मंदिराचे शिखर उत्तर ध्रुवाकडे असते आणि प्राण प्रतिष्ठित मूर्तिचे चरण स्वतःच दक्षिण ध्रुव बनतात.
माणसाचे डोके उत्तरध्रुव असते. जेव्हां देवी-देवतांच्या पवित्र चरणांवर आम्हीं नतमस्तक होतो तेव्हा या देवी-देवतांचा वरदायक आशिर्वाद तर आम्हाला मिळतोच शिवाय माणसाच्या डोक्यातील गुप्त विचारही संपतात.
मंदिरातील फरशी :- Temple
फरशी जितकी उंच बनविण्यात येईल तितकी ती लाभदायक ठरते.
मंदिरातील गोपुर कोणत्याही स्थितीत पूर्वेकडे उघडणारे असले पाहिजे.
पूर्व दिशाच एक अशी दिशा आहे की ज्या दिशेत जगभरातील ज्ञात-अज्ञात सर्व शक्ती बेधडक मंदिरातील प्रतिष्ठित मूर्तिचे पूजन-दर्शन करण्यासाठी मंदिरात पोहोचतात.
दिल्लीतील सुप्रसिध्द बिर्ला मंदिराचे द्वार पूर्व दिशेलाच आहे.
पूजास्थान :- Temple
मोठा दरवाजा पूर्वेकडे किंवा उत्तर-पूर्वेकडे असेल तर मंदिर बनविणा- यांला अमर्याद यश व मान प्रतिष्ठा प्राप्त होते.
मग तो साधा फकीर असला तरी मोठ्यातील मोठी शक्ती,
मोठ्यातला मोठा धनाढ्य त्याचे वर्चस्व स्वीकारून त्याला आपला सल्लागार, शुभचिंतक आणि प्रिय मानून त्याला मान देईल.
अशाच प्रकारे मंदिरात दर्शन-पूजनासाठी आलेली व्यक्ती सुध्दा सन्मान व प्रतिष्ठा मिळवते,
अशा पूजा स्थानामुळे आपला कारभार सुधारून आपल्या मान प्रतिष्ठेत वृध्दी होत राहते.
आणि आपला व्यवसाय धनदायक व लाभदायक बनतो.
दिशा :- Temple
ज्या मंदिरात पूर्व उत्तरेतच मातृस्थान, द्वार असेल तर त्यात येणे- जाणे पूर्व उत्तर दिशेकडून होईल,
हा येण्या जाण्याचा मार्ग धन-दौलत व अप्रत्यशात असे सुख प्राप्त करून देईल.
ज्या मंदिराचे गोपुर-मुख्य प्रवेश द्वार पितृस्थानाकडे असेल परंतु बाहेर जाण्याचा मार्ग उत्तर दिशेकडून असेल
तर अशा मंदिरात येणा-या जाणा- यांना मोठे नाव व यश प्राप्त होते. समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते.
जनमानसात एक विशिष्ठ व्यक्ती म्हणून तो ओळखला जातो.
मंदिरा बाहेर पूर्व उत्तर दरवाजाच्या बरोबरच्या उजव्या बाजूला पाणी टाकून पूजा करण्याची पध्दत आहे.
त्या मागे हाच तर्क आहे की, पूर्व- उत्तरेकडे पाणी टाकल्याने भाग्य जागे होते.
वाईट ग्रहदशा कितीही शक्तीमान असो ती निष्प्रभ ठरते.
सूर्य दिशा :- Temple
सूर्य उगवता क्षणीच त्याला नमस्कार करून अर्ध्य देण्याचे रहस्य हेच आहे की,
आपल्या डोक्यावरून पाण्याचा तांब्या घेऊन सूर्य देवतेला अर्ध्य दिला तर दोन लाभ होतात.
पूर्व उत्तर दिशेकडून खाली पडणा-या पाण्यामुळे पाण्यातून गाळून निघालेले सूर्य किरणाद्वारे शरीरातील अनेक रोग नष्ट होतात.
पृथ्वीवर पाणी पडल्याने पृथ्वी व पाणी यांचे कडून शरीराला दोन तत्वे मिळतील व त्यामुळे झोपलेले नशीब जागे होईल.
आर्थिक, सरकारी समस्या, इत्यादी त्वरित सुटका होते.
मनुष्य दिवसोंन दिवस परिश्रम करून सुख- समृध्दी प्राप्त करतो.
भगवान राम द्वारे राज्यभरात सूर्य पूजा अनिवार्य केल्याने रामराज्य स्थापना सुलभ झाली होती.
पींपळा सारख्या वृक्षांच्या मूळी, दक्षिणी ध्रुव असतात या मूळ्याना हस्त स्पर्श व मस्तक स्पर्श केल्याने असाध्य रोग व संकटांचा परिहार होतो.
मंदिराचा कलश जितका सुनियोजित व सुंदर असेल त्या प्रमाणात ते मंदिर वरदानी तीर्थ बनते.
अशा स्थानावर नियमीत जाण्याने जुने रोग, संकटे व अशुभ ग्रहफलांच्या पीडांचे निवारण त्वरित होते.
मेंदुचे विकार :- Temple
शंभू महादेवाला अभिषेक करून नतमस्तक होणे हा मेंदुचे विकार दूर करण्याचा अमोघ व त्वरित परिणाम कारक उपाय आहे.
या तनावपूर्ण जगात माणसाची बुध्दी व्यवस्थित सकारात्मक मार्गांनी चालावी,
त्याने चांगले विचार करून त्यावर अंमल करावा.
यासाठी लागणारी शक्ती जीवनदायी वरदान शिवशंकराच्या चरणी मस्तक नत केल्यावरच मिळू शकेल.
लहानांनी मोठ्यांचा आदर करावा, मान राखावा व त्यांच्या पायावर डोके ठेवून बुजूगांचा आशिर्वाद घ्यावा.
आणि बुजुगांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशिर्वाद द्यावा.
जो पर्यंत उत्तरी ध्रुव, दक्षिणी ध्रुवाला आकर्षित करणार नाही तो पर्यंत शांति- समाधान मिळणार नाही.
ज्या मंदिराच्या उत्तरी भागात उंच ईमारती व त्या इमारतीत उंच फर्शा बसविल्या जातील तेथे देवतांचे आस्तित्व रहाणार नाही,
आपसातील संघर्ष, स्पर्धा, संपत्तिवरून भांडणे तंटे, कोर्ट-कचे-या इत्यादी त्रास या मंदिरामुळे उत्पन्न होऊ शकतात.
उत्तरमुखी मंदिर :- Temple
उत्तरमुखी मंदिराच्या गोपुरात नंदीची भक्कम व वजनदार मूर्ति खाली फरशी बनवून त्यावर प्रतिष्ठापित केली पाहिजे.
अन्यथा उत्तरेकडील वर आलेले स्थानामुळे मंदिराला येणारा ‘चढावा’ व लोकप्रियतेला कमीपणा येईल.
मंदिर जर वस्तीच्या दक्षिण भागात असेल तर सर्व त-हेचे ऐश्वर्य या मंदिरामुळे भक्तांना प्राप्त होईल.
वस्ती किंवा घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला.
मंदिर असेल तर नैऋत्य राक्षसावर मंदिराचे वजन येईल.
यम देवी-देवतांच्या पायाखाली येऊन शांत होतो,
अशा स्थानी किंवा मंदिराच्या पूर्व या उत्तर पूर्वेकडे रहाणाऱ्या लोकांना सुख-शांति समाधान व आरामदायक जीवन जगतात.
दक्षिण किंवा दक्षिण-पश्चिम दिशेत आलेल्या मंदिरामुळे लोकांची झोप उडते,
कोणत्या न कोणत्या संकटानी ते जकडले जातात. कोणत्या न कोणत्या प्रकारचा त्रास,
अशुभ बातमी कानावर येणे, व्यापार-व्यवसायात अडचणी येणे आणि जीवन दुःखद असणे अशा गोष्टी निश्चितपणे घडतात.
मातृस्थान :- Temple
१) मंदिर जर भूखंडाच्या दक्षिण-पूर्व भागात बांधले तर अशा स्थानापासून दक्षिणेकडे राहणाऱ्या लोकांना अग्निभय राहते.
२) मंदिर जर पश्चिम-उत्तर दिशेस बांधले आणि उत्तर दिशेला तोंड असेल तर मंदिर बनविणा-यांच्या हातून मंदिर व मंदिराची मालमत्ता निघून जाईल,
३) पूर्व दिशेला जर मंदिराचे तोंड किंवा प्रवेश द्वार असेल तर मंदिर,
निर्माण करवून घेणा-याला वासिध्दी प्राप्त होईल.
त्याचा तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द दगडावरची रेघ होईल जसे दिल्लीतील बिर्ला मंदिर! या मंदिराच्या दर्शनाने लक्ष्मीची विशेष अनुकंपा होते. सर्व आर्थिक अडचणींचा परिहार होतो.
४) पूर्व, उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेस मंदिर निर्माण केले तर निर्माण कर्त्याला धनसंपत्ति विषयी असलेला मोह-लोभ संपुष्टात येईल.
त्याची सर्व मालमत्ता व पैसा अडका दूसरे लोक हडपतील.
तो स्वतः फकीर बनून इतरत्र कोठे तरी राहण्यास जाईल.
त्यांची मुले बाळे सुध्दा लायक व चांगले जीवन व्यतीत करू शकणार नाहीत.
पूर्व, उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला
दानशूरांनी बांधलेली मंदिरे व धर्मशाळा ओसाड व मग्न स्थितीत पाहावयास मिळतात.
ज्यांनी ही मंदिरे व धर्मशाळा धार्मिक वृत्तीने व जनकल्याणासाठी बनविली,
त्यांचा तर पत्ताच लागत नाही आणि कालांतराने त्यांचा वंशच खुटल्याचे पाहिले आहे.
परंतु पूर्व, उत्तर किंवा उत्तर-पूर्व किंवा पूर्वोत्तर या दिशेस मंदिर निर्माण करताना द्वार बसविले
तर मंदिर निर्मात्यावर कधी दुःखी होण्याची पाळी येत नाही.
काही देव-देवता इंद्राच्या मार्गावर पूर्वेकडे असलेल्या मंदिरात दर्शनासाठी जाणे पसंत करतात.
पूर्व दिशा :- Temple
पूर्व दिशेला असलेले मंदिराचे द्वार देवी-देव मंदिरात येण्याचे निमंत्रण देते.
प्राण प्रतिष्ठीत मूर्तित देवी-देवतांचे महाकर्षण असते व त्यांच्यात आशिर्वाद देण्याची क्षमता असते.
हे आशिर्वाद प्रत्यक्षात फलीभूत होतात.
असा देव नवसाला पावतो, तिरूपति बालाजी, सालासरचा हनुमान,
खाटूया कृष्ण कन्हैया व पुण्याचा दगडू हलवाई, तुळजापूरची भवानीदेवी,
कोल्हापूरची महालक्ष्मी नवसाला पावणा-या देव-देवतांपैकी प्रमुख आहेत.
काही देवी-देवता परमात्मा, लक्ष्मी, कुबेर व वायुच्या मागनि प्राण प्रतिष्ठित मूर्तित निवास करतात व भक्तांना आशिर्वाद देतात.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन उत्तर, उत्तर-पूर्व,
पूर्व उत्तर आणि अगदी बरोबर पूर्वेला द्वार ठेवणे फायदेशीर ठरते.
वरूण व वायुदेवता नेहमी पश्चिम उत्तरेच्या मागनि वास्तूत प्रवेश करतात.
म्हणून या ठिकाणी द्वार असणे सुध्दां शुभ-लाभदायक ठरतात.
दक्षिण-पूर्व क्षेत्रात वास्तूचे द्वार ठेवणे म्हणजे यज्ञाचे प्रतीक अनि देवाला
खुश करण्यासारखे आहे. म्हणून या क्षेत्रात द्वार असेल तर मोठमोठ्या अवघड कार्यात अथवा वास्तुत रहाणा-यांना यश मिळते.
या नियमा प्रमाणे द्वार असलेल्या मंदिरात जाऊन परमेश्वराची पूजा करणारा मोकळ्या हाताने परतत नाही.
श्रध्देने पूजन करणारांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात.
दिल्लीच्या बाबा नागपालने निर्माण केलेल्या छतरपूरचे देवी मंदिर याचा पुरावा आहे.
अशा मंदिराच्या उत्तरपूर्व किंवा उत्तर-पूर्व समुद्र वाहत असेल तर त्या मंदिराची शोभा
तर वाढतेच परंतु त्या बरोबर वरदायिनी शक्तीला वरदान मिळून भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.
मंदिराची मूर्ति :- Temple
मंदिराची मूर्ति सूर्यभूमि पेक्षा उंचावर असणा-या चंद्रभूमिवर स्थापन करण्यात येते.
देवळातल्या मुर्ति वास्तुच्या भूतलावरच स्थापित केल्या पाहिजेत.
छतावर चुकून सुध्दा मूर्ति ठेवू नये. मूर्तिचे तोंड केव्हांही दक्षिण दिशेला असू नये.
या नियमा मागे शास्त्रीय कारण असे आहे की उत्तर दिशेला उत्तर ध्रुव असते आणि देवीचे मस्तक सुध्दा उत्तर ध्रुवी असते.
यामुळे दोघांचे वास्तव्य या दिशेला असेल तर दोघात सामंजस्य रहाणार नाही व त्यामुळे अनर्थ ओढवेल.
ब-याच जुन्या व जाणत्या लोकांचे म्हणणे आहे की श्री लक्ष्मी व भगवान श्री विष्णु पाण्यात शेषनागाच्या शैयेवर निवास करतात.
म्हणून पूर्व-उत्तर क्षेत्रात अंडरग्राऊंड खोली बनवून खोलीच्या दक्षिण किंवा पश्चिम द्वारा जवळ लक्ष्मी, कुबेर, गणेश, सरस्वती, विष्णु इत्यादीच्या मूर्त्यांची स्थापना करावी.
किंवा महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वतीचे मंदिर बनवावे.
आणि वरील गोपुर त्याच भिंती पासून दूर बनवून दूसरी मुर्ति स्थापित करावी म्हणजे अशी मंदिरे त्वरित फलदायी बनतात.
पाणी व्यवस्था :- Temple
अंडरग्राऊंड हॉलमध्ये घुडघ्यापर्यंत पाणी भरून एक विशेष लक्ष्मी प्रयोग केला जातो.
ब-याच वेळा बेलपत्राचा अर्क, अपामार्ग वनस्पतिचा अर्क इत्यादी मिसळून त्वचेच्या असाध्य रोगावर त्याचा उपयोग केला जातो.
काविळ सारख्या रोगावर याचा उपाय म्हणून चांगला उपयोग होतो, मात्र
असले स्थान उत्तर-पूर्व किंवा पूर्व उत्तर क्षेत्राखाली वनवावे लागते.
छतावरून किंवा फरशीवरून वाहणाऱ्या पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी उतार सुध्दा याच दिशेला ठेवला पाहिजे.
उत्तरेकडे निचरा होणा-या पाण्यामुळे त्या वास्तुशी संबंधित लोकांना धनदायक ठरतो.
या मागे एक तर्क आहे तो असा की, धनप्रदायक अलकानगरी उत्तर दिशेला आहे.
हे एक गुप्त रहस्य आहे.
पाण्याचा निचरा खाली, जाण्या-येण्याचा रस्ता आरपार मोकळा ठेवणारे लोक स्वतः श्रीमंत बनतात.
मंदिराचा मध्यभाग उंच ठेवून मध्यभागीच देऊळ बांधून त्यात प्राण प्रतिष्ठापनेच्या
विधीसह मूर्ति स्थापित केली तर ती खूपच समृध्दी दायक व लक्ष्मीदायक ठरते.
जर चंद्र क्षेत्रात मंदिर बांधून प्राण प्रतिष्ठित मूर्तिची स्थापना करून सूर्य क्षेत्रात
दरवाजां ठेवला तर यश प्राप्ती व मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.
अशा मंदिरातील प्राण प्रतिष्ठित मूर्ति तिची पूजा करणाऱ्याला त्वरित निर्णय घेण्याची व दृढनिश्चयी बनण्याची शक्ती देते.
घराच्या सभोवती थोडी तरी मोकळी जागा सोडावीच.
भूखंडाचा एक तृतीयांश भाग उत्तर दिशेला व एक तृतीयांश भाग पूर्व दिशेला मोकळा सोडणे सर्वोत्तम फलदायी असते.
मार्गदर्शन :-
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!
ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,
आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.
( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
अधिक माहिती साठी संपर्क :-
श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन, (संतती समस्या विशेतज्ञ)
सामुद्रिक ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ