Scorpio Yearly Horoscope 2025: वृश्चिक राशि भविष्य 2025 च्या माध्यमाने जाणून घ्या वर्ष 2025 वृश्चिक राशीतील स्वास्थ्य, शिक्षण, व्यापार-व्यवसाय, नोकरी, आर्थिक पक्ष, प्रेम, विवाह, वैवाहिक जीवन, घर गृहस्थी व भूमी-भवन-वाहन इत्यादीसाठी कसे राहणार आहे? या व्यतिरिक्त, या वर्षी ग्रह गोचरच्या आधारावर आम्ही तुम्हाला काही उपाय सांगू जे करून तुम्ही संभावित समस्या किंवा दुविधा दूर करू शकतात. चला तर पुढे जाऊया आणि जाणून घेऊया की, वृश्चिक राशीतील जातकांसाठी वृश्चिक राशि भविष्य 2025 काय सांगते?
वृश्चिक राशी वार्षिक स्वास्थ्य राशीभविष्य २०२५ Scorpio Yearly Health Horoscope 2025
वृश्चिक राशीतील जातक स्वास्थ्य दृष्टिकोनाने वर्ष 2025 मिळते जुळते राहू शकते. काही बाबतीत एव्हरेज किंवा कमजोर ही राहू शकते. वर्षाच्या सुरवातीच्या महिन्यात खासकरून मार्च पर्यंत शनीचे चतुर्थ भावात गोचर स्वास्थ्य दृष्टिकोनाने चांगले नाही विशेषकरून, त्यांना हृदयाच्या संबंधित काही आजार आहे. गुढग्याच्या संबंधित काही समस्या आहे तर त्यांना या काळात अर्थात जानेवारी ते मार्च पर्यंत आपल्या स्वास्थ्य प्रति पूर्णतः जागरूक राहण्याची आवश्यकता राहील.
राशि भविष्य 2025 च्या अनुसार,मार्च नंतरची वेळ जुन्या रोगांना दूर करणे आणि तुम्हाला स्वस्थ ठेवण्यात मदत करेल परंतु, मे महिन्यानंतर राहूचे गोचर चतुर्थ भावात होईल जे छाती संबंधित काही समस्या देऊ शकते. मार्च नंतर शनीचे गोचर पोट इत्यादी संबंधित काही समस्या देऊ शकते. या प्रकारे काही जुन्या समस्या दूत होतील आणि नवीन समस्या येण्याची शक्यता ही राहील. अश्यात, स्वास्थ्य दृष्टिकोनाने वर्ष 2025 मिळते जुळते राहू शकते. अतः या वर्षी स्वास्थ्य प्रति खूप जागरूक राहणे विशेषकरून ज्या लोकांना पोट, डोकेदुखी, कंबरदुखी व छाती च्या संबंधित समस्या आहे, त्यांना विशेष जागरूक राहण्याची आवश्यकता असेल.
वृश्चिक राशी वार्षिक शिक्षण राशीभविष्य २०२५ Scorpio Yearly Education Horoscope 2025
वृश्चिक राशीतील जातक शिक्षणाच्या दृष्टिकोनाने ही वर्ष 2025 उत्तम परिणाम देणारे प्रतीत होत आहे. या वर्षी तुमच्या चतुर्थ आणि पंचम भावात शनी आणि राहूच प्रभाव येत राहतो. स्वाभाविक आहे की, अश्या स्थितीमध्ये आपल्या विषयांवर प्रॉपर फोकस कायम ठेवणे कठीण होईल. सतत फोकस करणे कठीण होईल असे नाही परंतु तुम्हा चांगले परिणाम मिळवायचे आहे तर असे करणे सहज नाही तर कठीण असेल.
तसेच जे लोक अध्ययनाच्या प्रति अधिक गंभीर नाही अथवा कमी वेळेत आता पर्यंत चांगले परिणाम प्राप्त करतात त्यांना या वर्षी आपला अध्ययन टाइम वाढवण्याची आवश्यकता राहील. वृश्चिक राशि भविष्य 2025 च्या अनुसार, बृहस्पतीचे गोचर ही मे महिन्याच्या मध्य भागाच्या आधी तुम्हाला अधिक चांगले परिणाम देण्याची इच्छा ठेवेल. मे च्या मध्य नंतर खूप मेहनत करण्याची आवश्यकतेचे संकेत बृहस्पतीचे गोचर ही करत आहे.
तथापि, संशोधनाच्या विद्यार्थ्यांसाठी बृहस्पतीचे गोचर मे मध्य नंतर ही चांगले परिणाम देतील परंतु, इतर विद्यार्थ्यांना अपेक्षाकृत अधिक मेहनत करण्याची आवश्यकता राहील. शिक्षणाच्या बाबतीत हे वर्ष थोडे कमजोर आहे. त्या कमजोरीला दूर करून चांगले परिणाम प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आता तुलनात्मक रूपात अधिक मेहनत करण्याची आवश्यकता राहील.
वृश्चिक राशी वार्षिक व्यवसाय राशीभविष्य २०२५ Scorpio Yearly Business Horoscope 2025
वृश्चिक राशीतील जातक व्यापार व्यवसायाच्या बाबतीत वर्ष 2025 मिळते जुळते परिणाम देण्याचे काम करत आहे. वर्षाच्या सुरवाती पासून मे महिन्याच्या मध्य भागापर्यंत बृहस्पतीचे सप्तम भावात गोचर व्यापार व्यवसायात चांगले परिणाम देऊ शकते. अतः नवीन व्यापार व्यवसाय किंवा व्यापार व्यवसायाला घेऊन काही नवीन प्रयोग करण्यासाठी ही वेळ चांगली सांगितली जाईल. जे काही नवीन प्रयोग करायचे आहे या काळात करणे अधिक चांगले राहील. वृश्चिक राशि भविष्य 2025 च्या अनुसार, मे महिन्याच्या मध्य भाग नंतर बृहस्पतीचे गोचर आठव्या भावात जाईल.
राहु चे गोचर चतुर्थ भावात येईल. केतुचे गोचर दशम भावात होईल. अस्या प्रकारे ही वेळ नवीन व्यापारिक निर्णयासाठी चांगली सांगितली जात नाही. जे काही असे चालू आहे, त्याला तसेच मेंटेन करण्याची आवश्यकता राहील. आपल्या क्षेत्राच्या वरिष्ठ लोकांकडून सल्ला घेण्याची आवश्यकता राहील. जर तुमच्या फिल्डचा कुणी सिनिअर व्यक्ती तुमच्या सोबत संपर्कात आहे तर, त्यांच्या सोबत रिस्पेक्ट ने रहा.
जर त्यांच्याकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही तरी त्यांच्या विरोधात काही बोलण्यापेक्षा त्यांना खुश करण्याची आवश्यकता राहील. त्यांचा लागोपाठ सन्मान करण्याची आवश्यकता राहील, तेव्हाच ते आपल्या व्यापार व्यवसायाला मेंटेन करू शकतील अथवा ती व्यक्ती आपले सपोर्ट खेचू शकते आणि बदल्यात तुमचे नुकसान होऊ शकते. अश्या स्थितीत आपले अनुभव आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाच्या अनुसार काम करत राहणे, ज्यामुळे तुम्ही आपल्या व्यापार व्यवसायाला मेंटेन करू शकाल.
वृश्चिक राशी वार्षिक नोकरी राशीभविष्य २०२५ Scorpio Yearly Job Horoscope 2025
वृश्चिक राशीतील जातक नोकरीच्या दृष्टिकोनाने ही हे वर्ष मिळते जुळते परिणाम देणारे प्रतीत होत आहे. सहाव्या भावाचा स्वामी मंगळ या वर्षी काही वेळेसाठी चांगले तर काही वेळेसाठी कमजोर परिणाम देऊ शकते. तसे अधिकतर वेळ मंगळ तुम्हाला अधिक परिणाम देणारे प्रतीत होत आहे. वर्षाच्या सुरवातीपासून मार्चच्या महिन्यापर्यंत शनीची दृष्टी सहाव्या भावावर राहील. अतः नोकरीला घेऊन असंतोष मन मस्तिष्क मध्ये राहू शकते. वृश्चिक राशि भविष्य 2025 च्या अनुसार, मार्च नंतर शनीची पोझिशन बदलण्याच्या कारणाने तुम्ही नोकरीला घेऊन संतृष्ट राहू शकतात किंवा बऱ्याच प्रमाणात उत्तम अनुभिति करू शकतात.
मे महिन्याच्या मध्य पर्यंत बृहस्पती लाभ भावाला पाहून चांगले परिणाम देण्याचा प्रयत्न करेल. अश्या प्रकारे आपल्याला मे महिन्यापर्यंत नोकरी मध्ये संधी मिळत राहील परंतु, मार्च पर्यंत तुम्ही काही समस्यांचा अनुभव करू शकतात. तर मार्च ते मे महिन्यामधील वेळ बराच चांगला आणि अनुकूल आहे जर या मध्ये जॉब मध्ये परिवर्तन करण्याची इच्छा आहे तर तुम्ही करू शकतात. मे महिन्याच्या मध्य नंतर स्थिती थोडी कठीण राहू शकते तथापि, विदेशात काम करणारे किंवा दूर जाऊन नोकरी करण्याची इच्छा ठेवणाऱ्या लोकांना या काळात ही उत्तम परिणाम मिळू शकतात.
वृश्चिक राशी वार्षिक आर्थिक राशीभविष्य २०२५ Scorpio Yearly Financial Horoscope 2025
वृश्चिक राशि भविष्य 2025 च्या अनुसार,आर्थिक बाबतीत वर्ष 2025 तुम्हाला मिळते जुळते परिणाम देऊ शकते. तुमच्या लाभ भावाचे स्वामी बुध ग्रहाचे गोचर पाहिल्यास वर्षच अधिकांश वेळ बुध चांगले परिणाम देण्याची इच्छा ठेवेल. अतः कमाई मध्ये काही मोठी समस्या आली नाही पाहिजे. विशेषकरून, मे महिन्याच्या मध्य भागापर्यंत, जेव्हा तुमच्या धन भावाचा स्वामी बृहस्पती लाभ भावाला पाहिलं तेव्हा तुम्ही उत्तम कमाई करू शकाल तसेच, कमाई चा एक मोठा हिस्सा वाचवण्यात यशस्वी राहतील परंतु, मे महिन्याच्या मध्य नंतर कमाई मध्ये काहीसा आराम किंवा स्लो गती पहायला मिळू शकते.
तथापि, मे महिन्याच्या मध्य नंतर बृहस्पती धन भावाचा स्वामी असून धन भावाला पाहील. अश्या स्थितीमध्ये बचत करण्याच्या बाबतीत अथवा वाचवलेल्या धन बाबतीत बृहस्पती सकारात्मक परिणाम देण्याची इच्छा ठेवेल परंतु, कमाई च्या बाबतीत कुठली ही मदत करू शकणार नाही. सांगायचे तात्पर्य हेच आहे की, वर्षाच्या सुरवातीपासून मे महिन्याच्या मध्य पर्यंतची वेळ कमाई च्या दृष्टिकोनाने बरीच चांगली आहे तर, नंतरची वेळ कमाईच्या दृष्टिकोनाने थोडी कमजोर परंतु, बचतीच्या दृष्टिकोनाने चांगली राहील.
वृश्चिक राशी वार्षिक प्रेम जीवन राशीभविष्य २०२५ Scorpio Yearly Love Life Horoscope 2025
वृश्चिक राशीतील जातक प्रेम संबंधांच्या बाबतीत वर्ष 2025 काही चांगले तर काही कमजोर परिणाम देऊ शकते. चांगली गोष्ट ही आहे की, मे महिन्याच्या नंतर पंचम भावातून राहू केतूचा प्रभाव समाप्त होईल. अश्या स्थितीमध्ये एकमेकांना घेऊन जे गैरसमज होते ते दूर होऊ शकतात. तुम्ही लोकांचा दृष्टिकोन प्रेम संबंधांना घेऊन अधिक चांगले आणि खरे होत जाईल परंतु, मार्च च्या महिन्या नंतर शनीचे गोचर पंचम भावात होईल जे प्रेम संबंधात काही समस्या देऊ शकतात.
तथापि, शनीचे खरे प्रेम करणाऱ्या लोकांसाठी मदतगार ही बनू शकते. अर्थात जर तुमचे प्रेम वास्तविक आहे तुम्ही एकमेकांवर प्रेम करतात आणि भविष्यात विवाह करण्याची इच्छा ही ठेवतात तर, अश्या स्थितीमध्ये तुम्हाला चांगले परिणाम ही मिळू शकतात परंतु, जर तुमचे प्रेम टाइम पास आहे किंवा तुम्ही प्रेमाचा दिखावा करत आहे, वेळेच्या अनुसार तुमचे प्रेम बदलत राहील; शनीचे हे गोचर तुमच्या प्रेम संबंधात दुरावा आणण्याचे काम करू शकते.
सांगण्याचे तात्पर्य हे आहे की, प्रेम संबंधांसाठी वर्ष 2025 मिळते जुळते राहू शकते. जर तुमचे प्रेम खरे राहील तर शनी तुम्हाला नुकसान न पोहचवता चांगले परिणाम देण्याची इच्छा ठेवेल. वृश्चिक राशि भविष्य 2025 च्या अनुसार, बृहस्पतीचे गोचर ही वर्षाच्या पहिल्या भागात तुमच्यासाठी मदतगार बनेल. या प्रकारे तुम्ही वर्षाच्या पहिल्या हिस्स्यात आपले प्रेम जीवन उत्तम करण्याचा आनंद घेऊ शकाल. वर्षाचा दुसरा हिस्सा मिळता जुळता राहू शकतो.
वृश्चिक राशी वार्षिक वैवाहिक जीवन राशीभविष्य २०२५ Scorpio Yearly Marriage Life Horoscope 2025
वृश्चिक राशीतील जातक जर तुमचे वय विवाहाचे आहे आणि तुम्ही विवाह करण्याचा प्रयत्न करत आहे तर, वर्षाचा पहिला हिस्सा या बाबतीत तुमच्यासाठी चांगला मदतगार बनू शकतो. विशेषकरून, मे महिन्याच्या मध्य भागापर्यंतची वेळ बरेच चांगले परिणाम देणारी प्रतीत होत राहील. या काळात तुमच्या पंचम भावाचा स्वामी बृहस्पती सप्तम भावात राहील जे न फक्त सामान्य विवाहाला संपन्न करण्यात मदतगार बनेल तर, प्रेम विवाहाची इच्छा करणाऱ्या खऱ्या प्रेम करणाऱ्या लोकांची मनोकामना पूर्ती ही करेल. अर्थात, प्रेम विवाहात मदतगार गुरु ग्रह बनेल.
तसेच जे लोक प्रेमाचा दिखावा करत होते त्यांची पोल खुलू शकते अर्थात, त्यांच्या लव पार्टनर ला ह्या गोष्टी माहिती होऊ शकतात की, त्यांच्या मध्ये जे प्रेम होते ते इतके मजबूत नव्हते ज्याला विवाहात परिवर्तित केले जाऊ शकेल. वृश्चिक राशि भविष्य 2025 च्या अनुसार, मे महिन्याच्या मध्य नंतरचे परिणाम तुलनात्मक रूपात कमजोर राहू शकते अश्या स्थितीमध्ये विवाहाच्या प्रक्रियेला वारशाच्या पहिल्या हिस्यात संपन्न करणे समजदारीचे काम असेल.
वैवाहिक जीवनाने जोडलेल्या बाबतीत ही वर्षाचा पहिला हिस्सा अधिक चांगले परिणाम देऊ शकतो. नंतरची वेळ बृहस्पती अष्टम भावात राहील आणि शनीची दृष्टी सप्तम भावावर राहील. अतः काही विसंगती किंवा असंतुलन पहायला मिळू शकते अर्थात, वर्षाच्या पहिल्या हिस्स्यात तुम्ही वैवाहिक जीवनाचा उत्तम आनंद घेऊ शकाल. तर वर्षाचा दुसरा हिस्सा तुमच्याकडून समजदारीची डिमांड करत आहे.
वृश्चिक राशी वार्षिक कौटुंबिक जीवन राशीभविष्य २०२५ Scorpio Yearly Family Life Horoscope 2025
वृश्चिक राशीतील जातक कौटुंबिक बाबतीत ही वर्षाचा पहिला हिस्सा अधिक चांगला राहू शकतो. विशेषकरून, मे महिन्याच्या मध्य पर्यंत तुमच्या दुसऱ्या भावाचा स्वामी बृहस्पती चांगल्या पोझिशन मध्ये राहील, जे घर कुटुंबात सुमती देऊन संबंधांना उत्तम करण्याचे काम करेल. मे महिन्याच्या मध्य नंतर बृहस्पती तेव्हा ही दुसरा भाव आणि चौथ्या भावाला पाहील. अतः काही मोठी विसंगती येणार नाही परंतु, कमजोर होण्याच्या कारणाने आधी सारखे परिणाम देण्यात असमर्थ असू शकतात.
या मध्ये मार्च नंतर शनीची दृष्टी दुसऱ्या भावावर पडेल अतः काही जातकांमध्ये असंतुलन व असंतोष पहायला मिळू शकते. गृहस्थ जीवनाविषयी बोलायचे झाले तर, गृहस्थ जीवनात या वर्षी तुलनात्मक रूपात उत्तम परिणाम पहायला मिळू शकते विशेषकरून, मार्च नंतर शनीचा प्रभाव चतुर्थ भावापासून दूर होईल अश्यात, मागील दिवसात येणाऱ्या समस्या दूर होतील.
तथापि, मे नंतर राहूच प्रभाव चतुर्थ भावावर सुरु होईल जे काही व्यवधान देण्याचे काम करेल परंतु, जुन्या समस्या दूर होण्याने तुम्ही आरामाचा श्वास घेऊ शकाल. वृश्चिक राशि भविष्य 2025 च्या अनुसार, मे महिन्याच्या मध्य नंतर बृहस्पतीचा प्रभाव चतुर्थ भावावर राहील; तसेच तुमची मदत ही करत राहील. अश्या प्रकारे आम्हाला वाटते कौटुंबिक बाबतीत वर्षाचा पहिला हिस्सा अधिक चांगला आहे तर, दुसरा हिस्सा काहीसा कमजोर आहे तसेच, गृहस्थ बाबतीत वर्षाचा दुसरा हिस्सा अधिक चांगला राहू शकतो.
वृश्चिक राशी वार्षिक भूमी, भवन, वाहन सुख राशीभविष्य २०२५ Scorpio Yearly Land, Building, Vehicle Happiness Horoscope 2025
वृश्चिक राशीतील जातक जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून भूमी किंवा भवन खरेदी किंवा विकण्याचा प्रयत्न करत आहे परंतु, ते काम पुढे जात नाही तर, या वर्षी या बाबतीत तुम्हाला अनुकूलता पहायला मिळू शकते विशेषकरून, मार्च महिन्याच्या नंतर चतुर्थ भावातून शनीचा प्रभाव समाप्त होईल; जे भूमी आणि भवनाच्या संबंधित बाबतीत गती देणारे काम करू शकते तथापि, मे नंतर राहूचा प्रभाव चतुर्थ भावावर होईल ते लहान लहान समस्या देण्याचे काम करत आज परंतु, आधीसारखी स्थिती नसेल, स्थिती आधीपेक्षा उत्तम होईल.
फळस्वरूप तुम्हाला आरामाचा अनुभव होऊ शकतो. सांगण्याचा अर्थ हा आहे की, भूमी, भवन, वाहन इत्यादीच्या संबंधित बाबतीत मागील वर्षीच्या तुलनेत हे वर्ष अधिक चांगले परिणाम देऊ शकते. वाहनाच्या संबंधित बोलायचे झाले तर, या बाबतीत ही तुम्हाला उत्तम अनुकूलता किंवा तुलनात्मक रूपात उत्तम परिणाम पहायला मिळू शकतात. एप्रिल पासून मे मध्य च्या मधील वेळ वाहन खरेदीच्या दृष्टिकोनाने अधिक चांगले राहील, याच्या आधी आणि नंतरच्या वेळेच्या संबंधित वाहनाच्या बाबतीत खूप पडताळणी केल्यानंतर पुढे जाणे योग्य राहील तथापि, या वर्षी तुमचे वाहन खरेदीची मनोकामना पूर्ती होऊ शकते.
वृश्चिक राशी जातकांसाठी वार्षिक उपाय Yearly Remedies for Scorpios
- प्रत्येक शनिवारी वाहत्या शुद्ध पाण्यात जटा असणारे नारळ वाहून द्या.
- मित्रांमध्ये नमकीन गोष्ट वाटा.
- अंगावर चांदी धारण करा.
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
नेहमी विचारले जणारे प्रश्न
1) 2025 मध्ये वृश्चिक जातकांसाठी काय चांगले असेल?
उत्तर :- वर्ष 2025 च्या सुरवाती पासून मे 2025 पर्यंत वृश्चिक जातकांचे जीवन सुखद राहील. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद वाढेल.
2) वृश्चिक जातकांची समस्या केव्हा संपेल?
उत्तर :- या राशीवर साडेसाती 28 जानेवारी 2041 ते 3 डिसेंबर 2049 पर्यंत राहील आणि तसेच ढैय्या विषयी बोलायचे झाले तर हे 29 एप्रिल 2022 ते 29 मार्च 2025 पर्यंत राहील.
3) वृश्चिक राशीतील जातकांना कोणत्या देवी देवतेची पूजा केली पाहिजे?
उत्तर :- वृश्चिक राशीतील जातकांना हनुमानाची पुन्हा करणे सर्वात शुभ फळदायी सिद्ध होऊ शकते.

मार्गदर्शन :-
आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevasprathishthan@gmail.com या वर मला Email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.
(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Whatsapp ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,

अधिक माहिती साठी संपर्क :-
श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी (गुरुजी)
+91 94202 70997
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,
संतती समस्या विशेतज्ञ
ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ, व्यसन मुक्ती औषध तज्ञ
(दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)























