Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage: विवाह जमण्यात-होण्यात होणाऱ्या विलंब अडचणींची ज्योतिषशास्त्रीय कारणे;

Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage
श्रीपाद गुरुजी

Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage: जन्मकुंडलीत पुढील ग्रहयोग असतील तर विवाह उशीरा, विलंबाने होतात व विवाह जमण्यात अडथळे उभे राहतात.

१) सप्तम स्थानात शनिची मकर किंवा कुंभ राशी असणे.

२) लग्नी-प्रथमस्थानी, द्वितीयस्थानी, चतुर्थस्थानी, पंचमस्थानी, सप्तमस्थानी, अथवा दशमस्थानी या पैकी कोणत्याही स्थानी शनि असणे.

३) लग्न, चतुर्थस्थान, सप्तमस्थान, अष्टमस्थान, व्ययस्थान यापैकी कोणतयाही स्थानी मंगळ असणे.

४) लग्नी किंवा सप्तमात शनि शुक्र एकत्र असणे.

५) लग्नी किंवा सप्तमात राहू किंवा केतू असणे.

६) सप्तमस्थानी रवि, मंगळ, हर्षल किंवा नेपच्यून असणे.

७) रवि, मंगळ, राहू, हर्षल या ग्रहांपैकी कोणत्याही ग्रहाची दृष्टी सप्तमस्थानावर किंवा सप्तमस्थानाच्या स्वामीवर असणे.

८) चंद्राच्या सप्तमात रवि, मंगळ, शनि, हर्षल, राहू यापैकी ग्रह असणे.

९) सप्तमेश षष्ठ, अष्टम किंवा द्वादशस्थानी असणे.

१०) सप्तमस्थानाचा स्वामी-सप्तमेश वक्री, अस्तंगत, स्तंभी किंवा नीच राशीत असणे.

११) सप्तमेश सप्तमसथानापासून सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानी असणे.

१२) षष्ठ, अष्टम, द्वादश या स्थानापैकी कोणत्याही स्थानाचा स्वामी सप्तमस्थानी असणे.

१३) षष्ठ, अष्टम किंवा द्वादश स्थानाचे स्वामी सप्तमेशाबरोबर असणे.

१४) सप्तमेश मंगळ, शनि किंवा हर्षल ग्रहाबरोबर असणे.

१५) लग्नी किंवा द्वादशस्थानी राहू असणे.

१६) लग्री हर्षल असणे.

१७) सप्तम स्थानावर मंगळ, शनि किंवा राहूची दृष्टी असणे.

१८) शनि चंद्र एकत्र असणे.

१९) शुक्र शनि समोरासमोर असणे.

२०) रवि, शनि एकाच स्थानात असणे. शनि पुढे रवि किंवा रविचे पुढे शनि असणे किंवा शनि रवि समोरासमोर असणे.

२० ते ४० :- Astrological Reasons and Remedies For Delay in Marriage

२१) मंगळ राहू, मंगळ केतू, शनि केतू, शुक्र केतू या जोड्या लग्नी, पंचमस्थानी. सप्तमस्थानी किंवा भाग्यस्थानी असणे.

२२) गुरु शनि एकत्र असणे, गुरुचे मागेपुढे शनि अथवा शनिचे मागेपुढे गुरु असणे,गुरु समोर शनि असणे, गुरुपासून शनि चौथा असणे.

२३) शनिपासून चंद्र पहिला, दूसरा, चौथा किंवा बारावा असणे.

२४) कुंडलीत कालसर्प योग असणे. ‘कालसर्प योग’ म्हणजे राहू – केतूच्या दाबात सर्व ग्रह असणे. 

२५) चंद्र, शुक्र व रविवर शनिची दृष्टी असणे.

२६) शुक्र त्याच्या नीच राशीत म्हणजे कन्या राशीत असणे.

२७) सप्तमेश मकर राशिचा असणे.

२८) चंद्राच्या सप्तमात शुक्र-हर्षलची युती असणे.

२९) जन्मनक्षत्र कृतिका किंवा आश्लेषा असणे.

३०) शुक्र कृतिका नक्षत्रात असणे.

३१) सप्तमस्थानी रवि-शनि, अष्टमस्थानी मंगळ-राहू आणि सप्तमेश षष्ठस्थानी असणे.

३२) नवमस्थानी शनि तीन किंवा अधिक ग्रहांसह असेल तर ‘प्रवज्या’ किंवा ‘संन्यास योग’ होतो. अशा ग्रहस्थितीत विवाह होणे अशक्यच!

३३) सप्तमेश वक्री असेल आणि मंगळ अष्टम स्थानी असणे.

३४) लग्न, सप्तमभाव व सप्तमेश आणि शुक्र, मेष, कर्क, तुळ, मकर यापैकी एका राशीत असणे.

३५) लग्न, सप्तम त्यांचे अधिपति किंवा शुक्र पापकर्तरी योगात असणे.

३६) शनि व चंद्र लग्नेश व सप्तमेश असून एकमेकांना पाहत असतील तर विवाहात विलंब होतो. ही स्थिती कर्क व मकर लग्नाच्या जातकाच्या बाबतीत संभवते.

३७) शुक्र व चंद्र हे परस्पर शत्रू आहेत. चंद्र व रवि दोघेही शुक्राचे शत्रू आहेत. जर शुक्र, रवि किंवा चंद्र, कर्क किंवा सिंह राशीत असतील आणि रवि चंद्र त्याच्यापासून द्वितीय स्थानी असतील तर विवाहात खूपच विलंब होतो. ठरलेला विवाह मोडू शकतो.

३८) शुक्र, चंद्र, सप्तमस्थानात कर्क, सिंह, तुळ किंवा वृषभ राशीचे असतील किंवा नवांश लग्नापासून सातवा असेल किंवा शुक्र व चंद्रात षडाष्टक असेल तर लमात अवरोध उत्पन्न होतो.

३९) सप्तमेश शुक्र असेल व त्याच्या बरोबर रवि चंद्र असतील तर शुक्र अति पापी बनतो. अशा स्थितीत विवाह होत नाही किंवा विवाह होऊनही अविवाहितासारखे जीवन जगावे लागते.

४०) लग्न व शुक्र वंध्या राशीत म्हणजे मिथुन, सिंह, कन्या किंवा धनु राशीत असेल तर विवाहास खूपच विलंब होतो.

४० ते ५१ :- Reasons for delay in marriage

४१) राहू व शुक्र लग्मी असतील तर विवाहात थोडा विलंब होतो.

४२) जर सप्तमेश किंवा नवमेश अष्टमात असेल किंवा अष्टमस्थ ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर विवाहास विलंब होतो.

४३) पुरुष जातकाच्या कुंडलीत रवि, मंगळ किंवा चंद्र, शुक्र पापाक्रान्त स्थितीत सप्तमस्थानी असतील तर विवाहास विलंब होतो.

४४) जर द्वितीय भाव पापग्रस्त असेल व द्वितीयेश बाराव्या स्थानी असेल तरी सुध्दा विवाहास विलंब होतो.

जर द्वितीयेश वक्री असेल किंवा द्वितीयस्थानी वक्री ग्रह असेल तर विवाहात अत्याधिक विलंब होतो. सप्तमस्थानी जर वक्री ग्रह असेल किंवा सप्तमेश वक्री असेल किंवा वक्री

४५) ग्रहाची सप्तमस्थानावर दृष्टी असेल, सप्तमेश किंवा सप्तम भावातील ग्रह किंवा शुक्रावर दृष्टी असेल किंवा स्वतः शुक्र वक्री असेल तर विवाहात अनेक अवरोध उत्पन्न होतात. ठरल्या वेळी विवाह होत नाही.

४६) द्वितीयेश वक्री असेल किंवा द्वितीयस्थानी वक्री ग्रह असेल तर विवाहात अत्याधिक विलंब होतो.

४७) द्वितीयस्थानी वक्री ग्रह असेल किंवा द्वितीयेश स्वतः वक्री असेल किंवा कोणतातरी वक्री ग्रह व्दितीयस्थानी असेल किंवा त्याची दृष्टी द्वितीयेशावर असेल तर विवाहास विलंब होतो.

४८) जन्मकुंडलीत सप्तमेश मंगळ वक्री स्थितीत अष्टमस्थानी असेल तर आणि द्वितीय स्थानावर त्याची दृष्टी असेल तर विवाहात अकल्पित विलंब होतो आणि वैवाहिक सुखाचा संभव रहात नाही.

४९) सप्तमेश शनि वक्री असेल आणि द्वितीयेश बुध आणि विवाहाचा कारक शुक्राची दोन्हींवर दृष्टी असेल तर विवाहास खूपच विलंब होतो. ४० वर्षांचे वय झाल्यावर सुध्दा विवाह होत नाही.

५०) द्वितीयस्थानी शुक्र, बुध असतील व दशमस्थानी वक्री गुरु असेल आणि शनि व्ययात असेल तर विवाह होत नाही.

५१) शनि स्वतः द्वितीयेश बनून वक्री अवस्थेत व्ययस्थानी असेल आणि शुक्र, मंगळ सप्तमस्थानी असतील, वक्री गुरु लाभ स्थानात असून त्याची दृष्टी सप्तमभाव, सप्तमेश चंद्र आणि शुक्रावर असेल, पंचमेश व सप्तमेशांचा परिवर्तन योग असेल तर विवाह विलंबाने होतो.

स्थिर राशीतील ग्रहांची विवाहातील विलंबाबाबत भूमिका – Delay in Marriage | Reasons for Late Marriage and Solutions

जर लग्न, सप्तमभाव, सप्तमेश व कलत्रकारक शुक्र स्थिर राशीत असतील आणि चंद्र चर राशीत असेल तर विवाहास विलंब होतो. अशा स्थितीत चंद्र निर्बल असेल तर ३०व्या वर्षी विवाह होतो. याच परिस्थितीत शनिचा कुप्रभाव समाविष्ट असेल तर ५०व्या वर्षी लग्न होते.

विवाह न होण्याचे योग – Causes & Cures of Delay in Marriage

१) चंद्र पंचमात असेल आणि पापग्रह सप्तम स्थानी किंवा बाराव्या स्थानी असेल तर जातकाचा विवाहच होत नाही. आयुष्यभर अविवाहित राहतो.

२) शुक्र व बुध सप्तमात असून त्यांच्यावर शुभ ग्रहांची दृष्टी नसेल तर जातक संपूर्ण आयुष्यात अविवाहित राहतो. बहुधा लग्नाला नकारच देतो.

3) शनि, मंगळ जर शुक्र किंवा चंद्रापासून सातव्या स्थानी असतील तर जातकाचा विवाह होत नाही. जातक स्वतः विवाहास नकार देतो किंवा परिस्थितीमुळे त्याचा विवाह होत नाही. आयुष्यभर तो अविवाहित राहतो.

४) सप्तमेश षष्ठात, अष्टमात किंवा व्ययात असेल आणि षष्ठेश, अष्टमेश किंवा विवाह होत नाही. व्ययेश सप्तमात असेल तर जातकाचा त्याच्या आयुष्यात 

५) राहू व चंद्र बाराव्या स्थानी असतील आणि त्यावर शनि मंगळाची दृष्टी असेल तर जातक जन्मभर अविवाहित राहतो.

६) निर्वल चंद्र पंचमात असेल व पापग्रह लग्नी किंवा सप्तम किंवा व्यय स्थानात असेल तर जातक आजन्म अविवाहित राहतो.

प्रेमविवाहाचे योग – Delay in Marriage In Horoscope & Remedies

१) सप्तमेश स्वगृही असेल तर प्रेमविवाह होतो. जातक स्वत:च आपला जोडीदार निवडतो. त्याच्या निवडीला घरच्यांची संमतीही मिळते.

२) लग्नी राहू बसेल तर प्रेमविवाह होतो. कालांतराने या प्रेमविवाहास घरच्या लोकांची संमत्ती मिळते.

3) शुक्र, शनि किंवा राहूवर सप्तमेशाची दृष्टी असेल तर प्रेमविवाह होतो.

४) कुंडलीत शनि आणि केतु सप्तमस्थानी असेल तर प्रेमविवाह होतो.

५) मंगळ किंवा राहू बरोबर सप्तमेश असेल आणि त्यावर शुक्राची दृष्टी असेल किंवा शुक्राशी कोणत्या प्रकारे त्याचा संबंध येत असेल तर प्रेमविवाह होतो.

६) लममेशाचा पंचमेश, सप्तमेश अथवा भाग्येशाशी संबंध येत असेल तर प्रेमविवाह होतो.

७) एकादश स्थानावर पाप ग्रहांचा अजिबात प्रभाव नसेल तर प्रेमविवाह होतो. पंचमेशाची सप्तमेशाशी युती होत असेल तर प्रेमविवाह होतो.

8) पंचमेशाची सप्तमेशाशी युती होत असेल तर प्रेमविवाह होतो  

9) सप्तमेश व नवमेशांची युती कुंडलीत होत असेल तर प्रेमविवाह होतो.

१०) पंचमेश व नवमेशाची युती कुंडलीत असेल तर प्रेमविवाह होतो.

११) लग्नेश सप्तम स्थानी व सप्तमेश लग्नी असेल तर प्रेमविवाह होतो.

१२) पंचमस्थानी मंगळ पंचमेशाबरोबर असेल तरी प्रेमविवाह होतो.

१३) सप्तमस्थानी मंगळ सप्तमेशाबरोबर असेल तर प्रेमविवाह होतो. 

१४) लग्नी लमेशाबरोबर शुक्र असेल तर प्रेमविवाह होतो.

१५) शुक्र सप्तमात लग्नेशाबरोबर असेल तर प्रेमविवाह होतो.

१६) चंद्र लग्मी असून लग्नेश त्याच्या बरोबर लग्नातच असेल तर प्रेमविवाह होतो. 

१७) चंद्र सप्तमस्थानी सप्तमेशाबरोबर असेल तर प्रेमविवाह होतो.

१८) शुक्र लग्नी असेल किंवा चंद्रा पासून पाचव्या स्थानी असेल तर प्रेमविवाह होतो.

१९) शुक्र नवमस्थानी असेल तर प्रेमविवाह होतो.

२०) सप्तमेश व एकादशेश यांचा परिवर्तन योग होत असेल आणि मंगळ नवमात किंवा पंचमात असेल तर प्रेमविवाह होतो.

२१) सप्तमस्थानी चंद्र असेल व त्यावर गुरुची दृष्टी असेल तर प्रेमविवाह होतो.

परंपरागत विवाह योग – Delay in marriage Astrological reasons and remedies

१) चंद्र सप्तमात असेल व त्यावर गुरुची दृष्टी असेल तर परंपरागत विवाह होतो. आई-वडिल व नातेवाईक यांच्याकडून विवाह जुळवला जातो. स्वतः जातकाचा धार्मिक व परंपरागत विवाहावर विश्वास असतो.

आंतरजातीय विवाह – Reasons for Delay in Marriage and Astrological Remedies

१) नवमभाव, सप्तमभाव आणि नवमेश गुरुचा संबंध पापग्रहांशी येत असेल तर आंतरजातीय विवाह होतो. जातक परंपरागत रूढी मोडून विवाह क्रतो. विवाहासाठी धर्म बदलण्याचीही त्याची तयारी असते.

२) लग्न, चंद्र, शुक्र यांचा सप्तमेशाशी संबंध येत असेल व शुक्राची शनि किंवा राहुशी युति होत असेल आणि धनस्थान पीडित असेल तर आंतरजातीय विवाह होतो. विवाहासाठी जातक धर्म बदलतो.

3) जातकाचे कर्क लग्न असेल आणि त्यावर चंद्र शनिची दृष्टी असेल तर आंतरजातीय विवाह होतो. परंतु हा विवाह सुखदायक ठरत नाही. 

४) कर्क लग्न असून लग्नी शनि असेल तर आंतरजातीय विवाह होतो. पण विवाहाचे रुपांतर दुःखात होते.

आपल्याच प्रांतात – प्रदेशात विवाह होण्याचा योग – Reasons for delay in marriage as per astrology

१) लग्नात स्थिर राशि वृषभ, सिंह, वृश्चिक किंवा कुंभ असेल आणि शुभ ग्रहाची त्यावर दृष्टी असेल तर जातकाचा विवाह त्याच्याच प्रदेशात रहाणाऱ्या मुलीशी होतो.

२) स्त्री जातकाच्या कुंडलील चंद्र स्थिर राशीत -वृषभ, सिंह, वृश्चिक किंवा कुंभेत असेल तर त्या जातकाचा विवाह तिच्याच प्रातांत रहाणाऱ्या पुरुषाबरोबर होतो.

विदेशात विवाह होण्याचा योग – Spiritual reasons for delayed marriage

१) सप्तम स्थानाचा कारक ग्रह शुक्र किंवा सप्तम स्थानाचा अधिपति क्रूर ग्रहांच्या समवेत त्रिकोणात असेल तर जातकाचा विवाह विदेशात होतो.

विधवा विवाह योग

१) कारकांश कुंडलीत सप्तमस्थानी राहू असेल तर जातक विधवेशी विवाह करतो. स्त्री. जातक विधुराशी विवाह करते.

रितसर विवाहापूर्वी विवाह योग – Powerful solution for delayed marriage for girl

आजकाल मुला-मुलींना खूप स्वातंत्र्य आहे. सहशिक्षण पध्दतीमुळे मुला-मुलींचे एकत्र येणे वाढले आहे. टी.व्ही. वरच्या मालिका, सिनेमा यामुळेही मुला-मुलींच्या कामवासना प्रज्वलित होतात आणि रितसर विवाहापूर्वी विवाह होतात. मौजमजा चालते च त्यानंतर कुंडलीतील योगामुळे रितसर विवाह होतात. त्यासाठी कुंडलीत खालील योग असायला हवा.

१) सप्तमस्थानी शनि व बुध एकत्र असतील तर रितसर विवाहापूर्वी विवाह होतो. लग्नासाठी कुंडली जमविताना हा योग आवर्जुन पहावा.

२)  चंद्र, शनि सप्तमस्थानी असतील तर रितसर विवाहापूर्वी विवाह होतो. अशा जातकाची पत्नी विवाहापूर्वीच विवाहित असते. अशा जातकाची पत्नी अक्षत योनीची नसते. विवाहापूर्वीच तीचा परपुरुषाशी शरीर संबंध झालेला असतो. विवाहासाठी पत्रिका मेलन करताना या योगाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.

चारित्र्यहीन स्त्रीयोग – Why God delays marriage

वैवाहिक जीवनात पति-पत्नींचे चारित्र्य चांगले असणे हे महत्वाचे आहे. चारित्र्य चांगले नसेल तर फार काळ वैवाहिक जीवन सुखी राहू शकत नाही. त्यासाठी ज्योतिष्यांनी आपल्याकडे गुणमेलनासाठी आलेल्या कुंडल्यातील चारित्र्यहीनता योग अवश्य आवर्जून पहावा. फक्त मंगळ दोषावर भर देऊ नये.

१) अष्टमेश अष्टमस्थानी असेल तर स्त्री चारित्र्यहीन असते. अशा जातकाच्या पत्नीचे चारित्र्य शंकास्पद असते व ती चारित्र्यहीन असते.

२) षष्ठेश, अष्टमेश व नवमेश पापग्रहांनी युक्त किंवा दृष्ट असतील तर पुरुष जातकाच्या पत्नीचे चारित्र्य शंकास्पद असते.

3) मंगळ, शुक्राची युती सप्तमस्थानी किंवा व्ययस्थानी असेल तरी हा योग बनतो. तिचे वागणे संशयास्पद असते. सुखी जीवनात विष कालवणारा हा योग आहे. हा योग गुणमेलनाच्यावेळी कटाक्षाने पाहिला पाहिजे.

चारित्र्यहीन पति योग Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

पुरुष जातक बाहेरख्याली, परस्त्रीशी संबंध ठेवणारे व वेश्यागामी आढळतात. वैवाहिक जीवनातील सुखात व्यत्यय यामुळे येतो. घटस्फोटही या कारणामुळे झाल्याचे आम्ही पाहिले आहेत. ज्योतिष शास्त्रातील अनेक ग्रंथात चारित्रहीन पुरुषांचे ग्रहयोग दिलेले आहेत. त्यापैकी काही निवडक ग्रह योग येथे देत आहे.

१) जन्मकुंडलीच्या सप्तमस्थानी पापग्रह अशुभ योग करीत असतील तर हा योग बनतो. अशा स्त्रीचा पति चारित्र्यहीन असतो.

२)  चंद्र व शुक्र पापग्रहांच्या प्रभावात असतील तर हा योग बनतो. अशा स्त्रीचा पति चारित्र्यहीन असतो.

3) शुक्र आणि शनि कुंडलीच्या सप्तम, अष्टम किंवा दशम स्थानी असता अशा स्त्री जातकाचा पति चारित्र्यहीन असतो. 

४) सहाव्या स्थानाचा अधिपति आठव्या किंवा बाराव्या स्थानी असेल तर असा योग बनतो. अशा स्त्री जातकाचा पति चारित्र्यहीन असतो.

५) शनि सप्तमात व शुक्र- चंद्र दशम स्थानी असतील तर असा योग बनतो. अशा स्त्रीचा पति चारित्र्यहीन असतो.

६) मंगळ व शुक्र यांचा परस्पर परिवर्तन योग होत असेल तर असा योग बनतो व अशा स्त्री जातकाचा पति चारित्र्यशून्य असतो.

७) सप्तमेश आठव्या स्थानाला व मंगळ सप्तम स्थानाला पहात असेल तर हा योग बनतो. अशा स्त्री जातकाचा पति चारित्र्यहीन असतो.

8) लग्नेश  व सप्तमेश यांचा परिवर्तनयोग कुंडलीत असेल तर हा योग बनतो. अशा स्त्रीचा पति चारित्र्यभ्रष्ट असतो.

९) मंगळ व शुक्र सप्तमस्थानी किंवा व्ययस्थानी असतील तर पुरुष व स्त्री दोन्हीं जातक चारित्र्यभ्रष्ट असतात. लग्नापूर्वी व लग्नानंतरही यांचे विवाहबाह्य संबंध . असतात.

वृध्दा विवाह योग – Powerful solution for delayed marriage for boy

१) कारकांश कुंडलीत सप्तमभावात शनि असेल तर जातकाला आपल्या पेक्षा वयस्कर किंवा वृध्द पुरुषाशी लग्न करावे लागते किंवा स्त्री जातकाला आपल्या पेक्षा वयस्कर पुरुषाशी लग्न करावे लागते. आंध्रप्रदेशात मुली पेक्षा वयस्कर असलेल्या मुलाशीच विवाह करण्याचा प्रघात आजही प्रचलित आहे. आपल्याकडे प्रेमविवाहाच्या बाबतीत असे घडल्याची उदाहरणे आहेत.

वृध्दावस्थेत विवाह होण्याचा योग – Causes of delay in marriage for ladies

काही ना काही कारणाने म्हातारपणी पुरुष जातकाचा विवाह होतो. अशा विवाहासाठी कोणते ग्रहयोग कुंडलीत असावे लागतात ते पाहूया. 

१) सप्तमस्थान, सप्तमेश व शुक्र कुंडलीत निर्बली असतील आणि त्यावर शनि, राहूचा प्रभाव असेल तर म्हातारपणी किंवा वयोवर्षे ४० नंतर पुरुषाचा विवाह होतो. 

२) लमेश, सप्तमेश व शुक्र निर्बली असेल किंवा स्थिर राशीत असतील परंतु चंद्र चर राशीत असेल तर अशा जातकाचा विवाह वृध्दावस्थेत वयोवर्षे ५० नंतर होतो.

३) लग्न किंवा सप्तमात राहू व शनि असतील आणि शुक्र निर्बली असेल तर म्हातारपणी लग्न होते. साधारण ५० वयानंतर अशा जातकाचा विवाह होतो. 

४) सप्तमेश नीच राशीत व शुक्र अष्टमस्थानी असेल तर जातकाचे लग्न म्हातारपणी जवळपास ६० व्या वर्षी किंवा त्यानंतर होते.

५) मिथुन किंवा मकर लग्न असेल आणि पंचमेश शुक्र असून तो षष्ठ, अष्टम किंवा व्ययस्थानी असेल तर अशा जातकाचा विवाह म्हातारपणी म्हणजे वयोवर्षे ४० ते ५० च्या दरम्यान होतो.

पत्नी भक्त पतिचा योग Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) लग्नेश सप्तमस्थानी असेल अशा भाग्यवान स्त्री जातकाचा विवाह पत्नीभक्त अशा जातकाशी होतो. पति तिच्या मुठीत रहातो. तिला खुश करण्याचा सतत प्रयत्न करतो आणि यामुळे दोघांचे वैवाहिक जीवन सुखी बनते.

पत्नी सुख नसण्याचे योग – Depression due to delay in marriage

जातकतत्वम’ हा ज्योतिष शास्त्राचा एक प्रामाणिक ग्रंथ असून त्यांत खूपच अपयुक्त अशी सूत्रे दिलेली आहेत. या ठिकाणी पत्नी सुख नसण्याच्या योगांची माहिती देत आहे.

१) जर शुक्र, रवि नवम, सप्तम किंवा पंचमस्थानात असतील तर अशा जातकाला पत्नीच नसते. कितीही प्रयत्न केले तरी अनेक विवाह करुन देखील अशा जातकाला पत्नी सुख मिळत नाही. त्याला पत्नी सुखापासून वंचित रहावे लागते.

२) चंद्रापासून सप्तमस्थानी मंगळ व शनि शुक्राबरोबर असतील तर पत्नीहीनतेचा योग बनतो.

3) शुक्र, बुध सप्तमस्थानी असतील तर जातक पत्नीहीन असतो.

४) कुंडलीतील शुक्रापासून म्हणजे ज्या स्थानात शुक्र असेल त्या स्थानात पापग्रह असतील किंवा सप्तमस्थानी पापग्रहाने युक्त शुक्र असेल तर जातक पत्नीहीन असतो.

पुत्र व पत्नीहीनतेचा योग – Delay in marriage remedies

१) क्षीण चंद्र पंचमात असेल व पापग्रह सप्तम किंवा व्यय स्थानी असतील तर असा जातक पुत्र व पत्नीहीन असतो. अशा जातकाला जन्मभर पुत्र व पत्नी शिवाय रहावे लागते.

२) रवि, मंगळ, शनि आणि राहू यापैकी एक ग्रह सप्तमात असेल तरी जातक पुत्र व पत्नीहीन बनतो. 

३) रवि, मंगळ, शनि आणि राहू यापैकी एक ग्रह बाराव्या स्थानी आणि क्षीण चंद्र पंचमस्थानी असेल तर हा योग खूपच मजबूत बनतो.

पत्नीहत्या योग What Causes Delay in Marriage According to Astrology?

१) कुंडलीत जर चंद्र द्वादश स्थानी असेल आणि शुक्र सप्तम स्थानी असेल तर जातक आपल्या पत्नीची हत्या करतो. विवाहासाठी जे कुंडलीमिलन केले जाते त्यावेळी हा योग कटाक्षाने पहावा.

विवाहाच्या तिसऱ्या दिवशी सर्पदंश – Delay in Marriage, the Reasons and Solutions

१) ‘बृहत्पाराशर होरा शास्त्र’ या ज्योतिष ग्रंथात एक ग्रह योग सांगितला आहे. या ग्रहयोगानुसार लग्नानंतर तीसऱ्या दिवशी जातकाच्या पत्नीला सर्पदंश होऊन ती मृत्युमुखी पडते.

२) द्वितीय स्थानी राहू व सप्तमस्थानी मंगळ असेल तर विबाहाच्या तिसऱ्या दिवशी साप चावल्यामुळे स्त्रीचा मृत्यू होतो.

पत्नीनाश योग – Delay in Marriage: Astrology, Reasons & Remedies

१) बृहत्पाराशर होरा शास्त्रात ‘च या योगाची माहिती दिलेली आहे. खालील ग्रहयोग कुंडलीत असेल तर पत्नीचा नाश होतो.

२) सप्तमेश निर्वल असून तो सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानी असेल तर जातकाच्या पत्नीला मृत्यू येतो.

आत्महत्या योग Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

‘जातकृतत्व’ या ग्रंथात आत्महत्येचे ग्रहयोग सांगितले आहेत.

१) स्त्री जातकाच्या कुंडलीत पापग्रहांच्या परिधीत शुक्र अष्टमस्थानी किंवा चतुर्थ स्थानी असेल तर जातकाची पत्नी आत्महत्या करते. फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा संभव असतो.

(विवाह मेलापकाच्या वेळी या ग्रह योगाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.)

२) जातकाच्या कुंडलीत शुभग्रहांची दृष्टी किंवा योग नसलेला शुक्र असेल तर त्याची पत्नी आत्महत्या करते.

अग्निदाह योग – Delay in Marriage According to Astrology Versus Modernity

१) कुंडलीत जर शुक्र पापग्रहाने युक्त व शुभ ग्रहांच्या दृष्टी विरहित असेल तर जातकाची पत्नी जाळून घेऊन आत्महत्या करते.

२) कुंडलीत शुक्रापासून चतुर्थ किंवा अष्टम स्थानी पापग्रह असेल तर अशा जातकाची पत्नी आत्महत्या करते. बहुधा स्वतःला जाळून घेऊन आत्मघात करते.

अल्पायु पत्नी योग – Astrological Remedies for Overcoming Delay in Marriages

१) कुंडलीत मेष किंवा मकर लग्न असेल व सप्तमस्थानी कर्क किंवा तुळ राशीचा रवि असेल तर जातकाची पत्नी अल्पायु योगाची असते. तिला आयुष्य फारच थोडे असते.

२) कुंडलीत शनि अष्टमस्थानी असेल आणि मंगळ सहाव्या स्थानी व राहू सप्तमस्थानी असेल तर जातकाची पत्नी जीवंत रहात नाही.

3) कन्या लग्न असून रवि लग्नी व शनि सप्तमस्थानी असेल तर जातकाची पत्नी जीवंत रहात नाही. 

४) लग्री नीच राशीचा ग्रह असेल व लग्नेश सुध्दा नीच राशीत असेल तर अशा जातकाची पत्नी जीवंत रहात नाही.

५) चतुर्थ स्थानी नीच राशिचा शुक्र किंवा चंद्र असेल आणि सप्तमस्थान पापपीडित असेल तर जातकाची पत्नी जीवंत रहात नाही.

६) कुंडलीत षष्ठेश व शुक्र यांची युती असेल तर जातकाची पत्नी जीवंत रहात नाही.

दीर्घायुष्यी पत्नी ग्रोग – What Causes Delay in Marriage

१) कुंडलीतील लग्नापासून अष्टमस्थानी शुभ ग्रह असतील तर अशा जात्तकाची पत्नी दीर्घायुष्यी असते. जातंक जीवंत असे पर्यंत पत्नी जीवंत रहाते.

वैधव्य योग – Find Out The Astrological Reasons for Delay in Marriage

१) मेष किंवा वृश्चिक या मंगळाच्या राशीत राहू पापग्रह युक्त असून तो अष्टम किंवा व्ययस्थानी असेल आणि चंद्रापासून सप्तम किंवा अष्टमस्थानी पापग्रह असतील तर अशा स्त्री जातकाच्या विवाहानंतर सात किंवा आठ वर्षात ती विधवा होते म्हणजे तिच्या पतिचा मृत्यू होतो.

२) सप्तमस्थानी कर्क राशीचा रवि-मंगळ असून लग्न किंवा चंद्र पापपीडित असेल तर स्त्री जातक लग्नानंतर सात किंवा आठ वर्षाने तिच्या पतिचा मृत्यू होऊन ती विधवा बनते.

बालविधवा योग – Astrological Reasons for Marriage Delay & Effective 

१) ज्या-स्त्री जातकाच्या कुंडलीत सप्तम भावात मंगळ पापग्रहाने युक्त असेल आणि पाप ग्रहांची दृष्टी त्यावर असेल किंवा अष्टमेश सप्तमस्थानी असेल व सप्तम भावात व सप्तमेशावर पापग्रहांची दृष्टी असेल तर नवपरिणीत स्त्री लवकरच बालविधवा होते म्हणजे तिच्या पतिचा मृत्यू होतो.

दुःखी दांपत्य योग Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) लग्नेश व सप्तमेश यांच्यात परस्पर शत्रूता असेल आणि सप्तमेश ५ अंशापेक्षा कमी अंशाचा असेल, अस्तंगत असेल तर अशा जातकाचे वैवाहिक जीवन कलहपूर्ण असते. वैवाहिक जीवनात सुख कमी, दुःख अधिक असते. 

२) कर्क किंवा सिंह लग्न असून लग्नी किंवा सप्तमात रवि किंवा शनि असेल व लग्नेश निर्बल असेल तर अशा जातकाचे वैवाहिक जीवन दुःखी असते. प्रत्येक गोष्टीवर पति-पत्नीत भांडण होत राहते आणि घरात कलहाचे वातावरण असते.

3) सप्तमेश दुःस्थानी असेल व सप्तम स्थानावर एकापेक्षा अधिक पापग्रहांचा प्रभाव असेल तर जातकाचे वैवाहिक जीवन कलहपूर्ण असते व वैवाहिक जीवन दुःखी असते.

४) स्त्री जातकाच्या कुंडलीत सप्तमेश रवि असून तो व्ययस्थानी असेल व सप्तमस्थानावर मंगळ-शनिची संपूर्ण दृष्टी असेल तर दांपत्य जीवन भयंकर दुःखकारक व विवादपूर्ण असते.

पतिची अवज्ञा करणारी पत्नी मिळण्याचा योग – Marriage Delay Astrology Remedies and Solutions

१) सप्तमेश चतुर्थस्थानी असेल तर जातकाची पत्नी जातकाच्या अधीन रहात नाही. ती जातकाच्या आज्ञेत नसते. जातक स्वतः मात्र धर्मात्मा, सत्यप्रिय परंतु दंतरोगी असतो. सप्तमेश दशमस्थानी असेल तरी जातकाची पत्नी जातकाच्या आज्ञेत नसते मात्र जातक स्वतः धार्मिक प्रवृत्तीचा व संतती सुखाने युक्त असतो.

पत्नी त्याग योग – What to do if marriage is late

१) ज्या स्त्री जातकाच्या जन्म कुंडलीत सप्तमस्थानी कोणताही पापग्रह असून त्यावर कोणत्याही शुभ ग्रहाची दृष्टी नसेल किंवा लग्गी राहू किंवा शनि असेल तर अशा स्त्री जातकाचा पति लोकापवाद किंवा लोकनिंदेला घावरुन पत्नीचा त्याग करतो, तिला सोडून देतो.

कुलटा योग Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) ज्या स्त्रीच्या कुंडलीत लग्न व चंद्र दोन्हीं पापग्रहाच्या मध्ये असतील म्हणजेच धनस्थानी व व्ययस्थानी पापग्रह असतील, शुभ ग्रहाची दृष्टी नसेल, लग्न दुर्बल असेल तर अशी स्त्री कुलटा असते व पितृकुल आणि पतिकुल दोन्हीं कुळांचा नाश करते.

पिशाच्च पीडा योग – 7 Astrological Reasons for Delays and Problems in Marriage

१) शनि, राहू, केतु किंवा मंगळ यापैकी कोणताही एक ग्रह जरी सप्तमस्थानी असेल तरी जातकाला पिशाच्च पीडा होते. पिशाच्च पीडा योगामुळे अतिमानसिक त्रास होतो.

प्रेतबाधा योग – What are the Reasons for Delay in Marriage by Birth Chart?

१) लग्नी चंद्राबरोवर राहू असेल, त्रिकोण स्थानी म्हणजे १,५, ९ च्या स्थानात क्रूर ग्रह असेल तर जातकाला प्रेतबाधा योग होतो. या योगामुळे घाणेरड्या आत्म्यांचा प्रकोप जातकाला सहन करावा लागतो.

बहुपुरुष गामिनी योग – What Causes Delay In Marriages, Know It

१) कुंडलीत विषम राशीचे लग्न असेल, रवि व गुरु लग्नी असतील, शनि मध्यम बलवान असेल, शुक्र बुध बलहीन असतील तर बहुपुरुष गामिनी योग स्त्री जातकाच्या कुंडलीत उत्पन्न होतो. या योगामुळे स्त्री एकापेक्षा अधिक पुरुषाशी शरीर संबंध ठेवते. अशा स्त्रीला नित्यनवी वस्त्राभूषणे व नित्य नवा पुरुष हवा असतो.

२) कुडलीत मेष, वृश्चिक, मकर किंवा कुंभ लग्न असेल व लग्नी चंद्र, शुक्र असून त्यावर पापग्रहांची दृष्टी असेल अथवा सप्तम स्थानी चंद्र- शुक्राची युती असेल तर बहुपुरुष गामिनी योग होतो. अशी स्त्री अनेक पुरुषांशी शरीर संबंध ठेवणारी असते. ती आपल्या पति व आई वडिलांच्या संमत्तिने परपुरुष गमन करते.

नपुंसक योग (स्त्री जातक) – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) ज्या स्त्री जातकाच्या कुंडलीत बुध व शनि हे दोन्हीं ग्रह सप्तमस्थानी असतील व चंद्र विषम राशीत असेल तर ‘नपुंसक योग’ उत्पन्न होतो. अशी स्त्री नपुंसक असते व तिच्यात संतानोत्पादन शक्ती नसते. दांपत्य जीवनाला नरक बनविण्याची वाईट शक्ती या योगात असते. विवाहासाठी गुणमेलन करताना हा योग अवश्य पाहिला पाहिजे. शास्त्रकारांच्या मते अशा कुंडलीत लग्नी चर राशी असेल तर अशा स्त्रिचा पति नित्य प्रवास करणारा असतो.

जारज पुत्र योग – Delayed Marriage or Late Marriage Astrology

१) जर पंचमेश आणि सप्तमेश बलवान असून षष्ठेशाने युक्त असतील व शनिने युक्त असून शुभग्रहांनी दृष्ट असतील तर ‘जारज पुत्र योग’ बनतो. अशा जातकात प्रजनन शक्तीचा अभाव असतो परंतु त्याच्या पत्नीला दूसऱ्या पुरुषापासून संतति होते.

२) याबाबाबतीत पति-पत्नी दोघेही दोषी असतात. दोघेही आपली शारीरिक भूक भागवण्यासाठी कनिष्ठ मार्गाचा अवलंब करतात. वर्णसंकर संतति मात्र बुध्दीवान असते.

स्त्री नपुंसक योग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) सप्तमेश व अष्टमेशाची युती असेल तर स्त्री जातकाच्या कुंडलीत ‘स्त्री नपुंसक योग’ बनतो.

२) बहुधा पुरुषार्थात कमतरता व गुप्तरोगामुळे पुरुष नपुंसक बनतो परंतु स्त्री नपुंसक असते किंवा बनते हे जरी विचित्र वाटत असले तरी हे कटुसत्य आहे की पुरुषाप्रमाणेच स्त्रिया सुध्दा नपुंसक असतात. नपुंसक स्त्रियांच्या स्तनाचा विकास योग्य स्परुपात होत नाही आणि अशा स्त्रियांची कामक्रीडेत, पुरुष सहवासात अल्प रुचि असते. त्या या बाबतीत पुरुषांना तृप्त करण्यास असमर्थ असतात. अशा स्त्रीच्या पतिला दुर्देवीच म्हणावे लागेल.

परित्यक्ता योग (स्त्री जातक) – Remedies for Delay In Marriage

१) ज्या स्त्रीच्या कुंडलीच्या सप्तमस्थानात राहू व शनि असतील व चंद्र वलहीन असेल, शुभ ग्रहाची दृष्टी यांच्यावर नसेल तर ‘परित्यक्ता योग’ बनतो.

विषकन्या योग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) ४,६,१४ यापैकी एक तिथिं व वार शनिवार किंवा मंगळवार अप्रैल आणि ज्येष्ठा, मूळ व श्रवण यापैकी एक नक्षत्र असेल तर वार, तिथि व नक्षत्रांच्या संयोगाने ‘विषकन्या योग’ उत्पन्न होतो. या योगात जन्मलेली कन्या जीवंत रहात नाही. जन्म होताच तिचा मृत्यू होतो किंवा कुटूंबाचा नाश होतो. नामकरण संस्काराच्या वेळी हा संस्कार करणारा ब्राम्हण मरतो यातूनही ती मोठी झाली तर विवाहाच्या वेळी पति मरतो. विवाह काळी ती पतिला घातक असते.

२) द्वितीया तिथि, आश्लेषा नक्षत्र व शनिवार किंवा तिथि सप्तमी, नक्षत्र विशाखा, वार मंगळवार, तिथि द्वादशी, नक्षत्र शततारका, वार रविवार असेल तरी ‘विषकन्या योग’ उत्पन्न होतो.विषकन्या योगावर जन्मलेली मुलगी शोकपीडित, धनहीन, पुत्र-पति रहित, सुखहीन व दुःखी स्त्री बनते.

३) पंचनस्थानी रवि, लगी शनि आणि भाग्यस्थानी मंगळ असून षष्ठ स्थानावर कोणत्याही पापग्रहाचा प्रभाव असेल तर ‘विषकन्या योग’ बनतो. विषकन्या योगात जन्मलेली मुलगी धन, पुत्र, पति व सुखहीन आणि दुःखी असते.

रखैल योग (पुरुष जातक) – Best Solutions of Delay in Marriage According to Astrology

१) सप्तमेश व्यय स्थानी व व्ययेश सप्तमस्थानी असा योग पुरुष जातकाच्या कुंडलीत असेले तर सामान्यतया असा जातक आंतरजातीय विवाह करतो. त्याचे वैवाहिक जीवन कलहपूर्ण असते. एखाद्या दूसऱ्या स्त्रीशी पत्नीप्रमाणे संबंध असतो.

अतिकामातूर योग (पुरुष जातक) – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) कुंडलीच्या सप्तमस्थानी मंगळ असून तो शुभ ग्रहांनी दृष्ट असेल तर ‘अतिकामातूर योग’ बनतो. असा जातक खूपच कामातूर असतो व त्याची सदैव संभोगाची इच्छा असते.

स्त्री प्रवज्या योग – Astrological Remedies for Delay in Marriage

१) ज्या स्त्रीच्या कुंडलीत सप्तमस्थानी क्रूर ग्रह असेल व नवमस्थानी शुभ ग्रह असून बुध, मंगळ, गुरु व शुक्र बलवान असून ते समराशीत असतील तर ‘स्त्री प्रवज्या योग’ बनतो. अशी स्त्री आपल्या कुंडलीतील ग्रहांच्या गुण व शीला प्रमाणे संन्यास घेते. ती विदुषी, विख्यात व ब्रह्मलीन अवस्था प्राप्त करते.

पुनर्विवाह योग (स्त्री जातक) – Remedies for Early Marriage

१) स्त्रीच्या कुंडलीत लग्री मंगळ असेल व सप्तमस्थानी बुध असेल व स्पतमेश बनून शुक्र अष्टमस्थानी असेल तर ‘पुनर्विवाह योग’ होतो. अशा स्त्री जातकाची निर्णय शक्ती कमी असते व त्यामुळे ती एका पतिचा त्याग करुन दूसरा पति करते.

वैवाहिक सुख योग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) ज्या जातकाच्या कुंडलीत सप्तमस्थानी शुक्र असून त्यावर लग्नेशाची दृष्टी असेल व शुक्र आपल्या वृषभ किंवा तुळ राशीत असेल तर ‘वैवाहिक सुख योग’ निर्माण होतो. अशां जातकाचा जोडीदार रतिक्रीडेत आपल्या साथीदाराला पूर्ण शारीरिक सुख देतो. यांचे दांपत्य जीवन सुखी व आनंदी असते.

२) मंगळापासून दशमस्थानी किंवा चतुर्थ स्थानी शनि व चंद्र असतील तर ‘दांपत्य सुख योगा’ ची निर्मिति होते. पति-पत्नीला पूर्ण शारीरिक सुख मिळून त्यांचा संसार सुखाचा होतो.

पतिवल्लभा योग – Remedial Astrology for Delay in Marriage

१) स्त्रीच्या कुंडलीत लग्नी शुक्र- चंद्र असतील आणि सप्तमस्थानी कोणताही शुभ ग्रह असेल तर ‘पतिवल्लभा योग’ बनतो. अशा स्त्रीचा स्वभाव काहीसा शंकेखोर असला तरी पतिची आवडती, श्रेष्ठ व राणी सारखा सन्मान तिला मिळतो. तिचा संसार सुखी होतो.

२) कारकांशलग्नी बुध असून सप्तमस्थानात गुरु व चंद्र असतील तर ‘पतिवल्लभा योग’ बनतो. या योगामुळे पतिपत्नीचे चांगले पटते. सर्व प्रकारच्या भौतिक सुखसाधनांचा उपभोग मिळतों. स्त्री आपल्या पतिला प्रिय असते.

३) कुंडलीत उच्चीचा व शुभ शुक्र सप्तमस्थानी असेल व शुक्र शुभ ग्रहांनी दृष्ट असेल तर ‘पतिवल्लभा योग’ बनतो. या योगामुळे वैवाहिक जीवन पूर्ण सुखी होते.

विवाहानंतर भाग्योदय – What are the common astrological reasons for delay Marriage

१) लग्न किंवा चंद्रापासून सप्तमस्थानी शुभग्रह असेल किंवा त्यावर सप्तमेशाची दृष्टी असेल किंवा सुप्तमेश स्वतः तेथे असेल तर विवाहानंतर भाग्योदयाचा योग बनतो. अशा जातकाला लग्नानंतर पत्नीकडून धन संपत्ति मिळते व त्याचा भाग्योदय होता.

कलत्रमूल धनयोग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) बलवान द्वितीयेश जर सप्तमेश किंवा सप्तमस्थानाचा कारक यांची युती किंवा दृष्टी संबंध होत असेल तर ‘कलत्रमूल धनयोग’ बनतो. अशा जातकाला लग्नानंतर पत्नीकडून धनसंपत्ति मिळते व भाग्योदय होतो.

विवाहानंतर राजयोग – Astrological causes for late marriage

१) एकटा गुरु षडवर्गात शुध्द असून केंद्रात असेल, त्याच्यावर चंद्राची दृष्टी असेल तर ‘विवाहानंतर राजयोग’ होण्याचा योग बनतो. अशी स्त्री राणीतुल्य धनवान, पुत्रवान व भाग्यवान असते. हिच्या विवाहानंतर त्याच्या पतिचा राजयोग बलवान होऊन कार्यरत होतो. पतिची चौफेर प्रगती होते.

२) एकादश स्थानी चंद्र, सप्तमस्थानी मीन राशीचा शुक्र, बुध असून त्यावर गुरुची दृष्टी असेल तर ‘विवाहोपरांत राजयोग’ बनतो. या योगामुळे स्त्री राणीसारखी धनवान, पुण्यवान व भाग्यवान बनते. लग्नानंतर हिच्या पतिची वाखाणण्याजोगी प्रगती होते.

३) लग्नी गुरु, सप्तमात चंद्र आणि दशमात स्वगृहीचा शुक्र असेल तर ‘विवाहोपरांत राजयोग’ बनतो. अशी स्त्री धनवान, पुत्रवान सर्व सुखोपभोगाने संपन्न बनते. हीच्या पतिची लग्नानंतर प्रशंसा करण्यासारखी प्रगती होते.

४) स्थिर राशीचे लग्न असेल, लग्नी गुरु, लाभस्थानी शनि व तृतीय किंवा षष्ठ स्थानी मंगळ असेल तर ‘विवाहोपरांत राजयोग’ होतो. अशी स्त्री भाग्यवान, धनवान, संततीयुक्त असते. विवाहानंतर पतिचा राजयोग बलवान होतो व पतिची सर्वांगीण, सर्व क्षेत्रात प्रगती होऊन त्याचा दरारा व नावलौकिक वाढतो.

५) सप्तमस्थानी शुक्र आणि दोन शुभ ग्रहांची, लाभस्थान व लग्न स्थानावर शुभ दृष्टी असेल तर ‘विवाहोपरांत राजयोग’ बनतो. या योगाची फले क्रमांक ३ प्रमाणे मिळतात.

६) कुंभ लग्न असून उच्चीचा चंद्र चतुर्थस्थानी गुरुने दृष्ट असेल व सप्तमेश रवि लाभ स्थानी असेल तर ‘विवाहोपरांत राजयोग’ होतो. या योगाची फले वरीलप्रमाणे मिळतात.

७) स्वराशीचा म्हणजे मिथुन किंवा कन्येचा बुध चर्थ स्थानी असेल, षडवर्गात शुध्द असलेला ग्रह केंद्रात असून त्यावर शुक्राची दृष्टः असेल तर ‘विवाहोपरांत राजयोग’ होतो. या योगाची फले वरीलप्रमाणे मिळतात.

8) लग्न कन्या असून लमी बुध असेल व धनस्थानी शुक्र, दशमात चंद्र व एकादश स्थानी गुरु असेल तर ‘विवाहोपरांत राजयोग’ बनतो. या योगाची फले वरीलप्रमाणे मिळतात.

बाल्य विवाह योग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) कुंडलीत जवळ जवळ च्या स्थानात सप्तमेश व लग्नेश असतील तर ‘बाल्य विवाह योग’ बनतो. या योगामुळे जातकाचा विवाह लहानपणीच होतो. लग्नास योग्य अशा योगा पूर्वीच लग्न होते.

२) कुंडलीत लग्न स्थानाच्या आसपास शुभ ग्रह असतील तर हा योग बनतो.

३) सप्तमेश पारावनांशात असेल किंवा बलवान असून द्वितीय राशी असेल तर विवाह लहानपणीच होतो.

४) चंद्र सप्तमस्थानी असेल तरी सुध्दा ‘बाल्य विवाह योग’ बनतो. लहानपणात विवाह होतो पण पत्नी सुंदर असते. असा जातक आपल्या पत्नीची शारीरिक भूक भागवण्यास समर्थ असतो. स्त्री जातकाच्या कुंडलीत गुरु सप्तमात असेल तर हा योग बनतो परंतु तिचा पति वयाने मोठा किंवा विधूर असतो. कर्क किंवा सिंह लग्न असेल व सप्तमात गुरु असेल तर पति-पत्नीत काही प्रमाणात द्वंद सुरु राहते.

विवाह विच्छेद योग – Reasons For Delay in Marriage as per Astrology

१) लग्नी शनि असेल व व्ययेश अष्टमात असेल व सप्तमेश व अष्टमेश परस्पर एकमेकांना पाहत असतील तर ‘विवाह विच्छेद योग’ बनतो. या योगामुळे वैवाहिक जीवनात विघ्न निर्माण होते. दोघांतील मतभिन्नता पराकोटीला जाऊन घटस्फोट होतो.

२) सप्तमेशावर शनिची दृष्टी असेल, सप्तमस्थानावर शुभ ग्रहांची दृष्टी नसेल तर ‘विवाह विच्छेद योग’ बनतो. या योगामुळे वैवाहिक जीवनात कटुता येते. घटस्फोट होण्याचा संभव असतो. 

३) लग्नेश शनिदृष्ट असेल व षष्ठेश व सप्तमेश षष्ठस्थानी असतील तर ‘विवाह विच्छेद योग’ बनतो. या योगामुळे पतिपत्नित एकोपा रहात नाही. मतभेद वाढून घटस्फोटापर्यंत पाळी येते.

४) षष्ठेश व अष्टमेशाला रानि किंवा मंगळ पहात असेल तर ‘विवाह विच्छेद योग’ बनतो. या योगामुळे वैवाहिक जीवन गढूळ बनते, मतभिन्नता होते, एकमेकांशी पटत नाही. परिणाम घटस्फोट होतो.

५) मंगळ किंवा इतर कोणतातरी पापग्रह लग्री, चतुर्थात, सप्तमात, अष्टमात किवा द्वादशस्थानी असेल तर ‘विवाह विच्छेद योग’ बनतो. विवाहानंतर पतिपत्नीत वारंवार भांडणे होतात. शुल्लक कारणावरुन हमरी तुमरीवर येतात. मतैक्य होत नाही आणि घटस्फोट होतो.

६) सुप्तमस्थानी रवि असून त्यावर पापग्रहांची दृष्टी असेल तर ‘विवाह विच्छेद योग’ बनतो. एक क्षणही भांडण केल्या शिवाय जात नाही. भांडण शुल्लक कारणावरुन असते. त्यामुळे वैवाहिक जीवन कलहपूर्ण बनते. वैवाहिक जीवनातील कटुता शिगेला पोहचून घटस्फोट घ्यावा लागतो.

एक विवाह योग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

ज्योतिष शास्त्राचा प्रामाणिक ग्रंथ ‘जातकतत्वम्’ मध्ये एक विवाह योगाचे ग्रह योग सांगितलेले आहेत.

१) गुरु व शुक्र, रवि किंवा मंगळाच्या नवांशात असतील तर ‘एक विवाह योग’ बनतो. अशा योगधारी जातकाच्या जीवनात एकदाच विवाह होतो. जर जातक पुरुष असेल तर तो एक पत्नीव्रत धर्म पालन करतो. जातक स्त्री असेल तर ती पतिव्रता असते आणि परपुरुषाकडे ढुंकूनसुध्दा पाहत नाही.

२) बुध गुरुच्या नवांशात सप्तम स्थानी असेल तर ‘एक विवाह योग’ बनतो. या योगाचे फळ वरील प्रमाणे मिळते.

पतिव्रता योग – Late Marriage Problems in India Understanding the Causes

ज्योतिषशास्त्रात ‘बृहदयोग रत्नाकर’ व ‘जातकतत्वम्’ हे दोन ग्रंथ समृध्द असे ग्रंथ आहेत. ‘पतिव्रता योग’ बद्दल दोन्ही ग्रंथात विपुल योग दिलेले आहेत. येथे काही निवडक योग देत आहे.

१) सप्तमेश चतुर्थ स्थानी किंवा दशमस्थानी असेल तर ‘पतिव्रता योग’ बनतो. या योगात जन्मलेला जातक पुरुष असेल तर त्याची पत्नी पतिव्रता व धर्मपरायण असते. हा योग स्त्री जातकाच्या कुंडलीत असेल तर पति एक पलीव्रताचे पालन करणारा असतो.

२) सप्तमेश किंवा सप्तमस्थानाचा कारक ग्रह गुरुने युक्त किंवा दृष्ट असून बलवान असेल तर ‘पतिव्रता योग’ बनतो. या योगात जन्मलेल्या जातकाची पत्नी पतिव्रता व धार्मिक वृत्तीची असते. स्त्री जातकाच्या कुंडलीत हा योग असेल तर तिचा पति ट्रंक पत्नी व्रतधारी असतो.

३) सप्तमेश रवि असून तो शुभ ग्रहाने युक्त किंवा दृष्ट असेल तर ‘पतिव्रता योग’ बनतो. हा योग फक्त कुंभ लग्न असेल तरच होतो. याचे फल वरील प्रमाणेच मिळते.

४) सप्तमेश शुक्र असेल व तो शुभ ग्रहाने दृष्ट असेल तर ‘पतिव्रता योग’ बनतो. या योगाचे फल वरील प्रमाणेच मिळते.

५) सप्तमस्थानी गुरु असेल तर ‘पतिव्रता योग’ बनतो. या योगाचे फळ वरील प्रमाणे मिळते.

६) सतमेश केंद्रात, लग्नी, चतुर्थात, सप्तमात किंवा दशमात शुभ राशीच्या नवांशात शुभ ग्रहाने युक्त किंवा दृष्ट असेल तर ‘पतिव्रता योग’ वनतो. या योगाची फळे वरील प्रमाणे मिळतात.

७) सप्तमेश केंद्रात, लग्नी, चतुर्थात, सप्तमात, दशमात शुभ राशीच्या नवांशात शुभ ग्रह युक्त किंवा दृष्ट असेल तर ‘पतिव्रता योग’ बनतो. या योगाची फळे वरील प्रमाणे मिळतात.

द्वितीय लग्न योग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) लग्नेश लग्नी असेल तर ‘द्वितीय लग्न योग’ बनतो. असा योग ज्याच्या कुंडलीत असतो त्या जातकाला दोन बायका असतात. परंतु एक पत्नी वारल्यावर तो दूसरे लग्न करतो.

२) अष्टमेश लग्न स्थानी किंवा सप्तमस्थानी असेल तर ‘द्वितीय लग्न योग’ बनतो. अशा जातकाला दोन पत्नी असतात. त्याच्या आयुष्यात दोन विवाह अवश्य होतात परंतु एक पत्नीच्या मृत्यूनंतर तो दूसरे लग्न करतो.

3) लग्नी मंगळ असेल आणि सप्मेश सहा, आठ किंवा बाराव्या स्थानी पापग्रहांनी युक्त असेल तर ‘द्वितीय लग्न योग’ बनतो. या योगाचे फळ वरील प्रमाणे मिळते.

४) षष्ठस्थानी लग्नेश असेल तर ‘द्वितीय लग्न योग’ बनतो. या योगाचे फळ वरील प्रमाणेच मिळते. स्त्री जातकाच्या कुंडलीत असा योग असेल तर ती दूसरे लग्न करते.

५) धनस्थानाचा स्वामी म्हणजे धनेश जर षष्ठस्थानी स्थिर राशीत असेल आणि सप्तमस्थानी स्थिर राशीत पापग्रह असेल तर ‘द्वितीय लग्न योग’ बनतो. या योगाचे फळ वरील प्रमाणेच मिळते.

६) सप्तमेश शुभग्रहांनी युक्त आपल्या नीच राशीत किंवा शत्रू राशीत असेल आणि सप्तम स्थानी पापग्रह असेल तर ‘द्वितीय लग्न योग’ बनतो. या योगाचे फळ क्रमांक २ प्रमाणे मिळते.

७) सप्तमभावाचा कारक ग्रह पापग्रहाने युक्त किंवा नीच नवांशात, शत्रू नवांशात असेल अथवा अस्तंगत ग्रहाच्या नवांशात असेल तर ‘द्वितीय लम योग’ बनतो. या योगाचे फळ क्रमांक २ मध्ये दिलेल्या नियमाप्रमाणे मिळते.

८) सप्तमस्थानात पापग्रह असेल तर ‘द्वितीय लग्न योग’ बनतो. याचे फलित क्रमांक २ प्रमाणे मिळते.

9) सप्तमस्थानी उच्चीचा किंवा स्वगृहीचा असेल आणि त्याच्या बरोबर राहू किंवा केतू असेल तर ‘द्वितीय लग्न योग’ वनतो. या योगाचे फळ क्रमांक २ प्रमाणे मिळते.

१०) मेष, सिंह, वृश्चिक, मकर किंवा कुंभ राशीत मंगळ असेल तर ‘द्वितीय लग्र योग’ बनतो. या योगाचे फळ क्रमांक २ प्रमाणे मिळते.

त्रिविवाह योग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) कुंडलीच्या ७व्या स्थानी चंद्र व चंद्रापासून सातव्या स्थानी बुध असेल, अष्टमेश पाचव्यास्थानी असेल तर दहा दहा वर्षांच्या कालांतरात जातकाचे तीन विवाह होतात.

त्रिभार्या योग – Reasons Behind Delay in Marriage

१) धनस्थानी बरेच पापग्रह असतील व धनेशाची दृष्टी त्यांच्यावर नसेल तर ‘त्रिभार्या योग’ बनतो.अशा योगाचे फळ एक पत्नी वारल्यावर दुसरी, दुसरी वारल्यावर तीसरी अशा क्रमान तीन विवाह होतात.

२) लग्न स्थान, द्वितीय स्थान व सप्तमस्थान ही तीन्ही स्थानें पापग्रहांनी युक्त असतील आणि सप्तमेश नीचीचा, शत्रुराशीचा किंवा अस्तंगत असून लग्नात बसला असेल तर ‘त्रिभार्या योग’ बनतो. पत्नीच्या मृत्युमुळे क्रमशः तीन विवाह होतात.

द्विपत्नी योग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) सप्तमेश निर्वल असून सप्तम स्थानी पापग्रहांनी युक्त किंवा दृष्ट असेल तर ‘द्विपत्नी योग’ बनतो. या योगामुळे जातक प्रथम पत्नी असताना देखील दुसरी पत्नी मिळवतो. पहिल्या पत्नीला संतति न झाल्याने दुसरे लग्न करुन दुसरी पत्नी मिळवतो किंवा लग्न न करता रखेल म्हणून दुसन्या स्त्रीशी शरीरसंबंध ठेवतो व तीची गुजराण करतो हे ही संभवनीय होय.

२) धनेश निर्वल असून धनस्थानातच असेल व तो पापग्रहांने युक्त किंवा दृष्ट असेल तर ‘द्विपत्नी योग’ बनतो. या योगाचे फळ नरील प्रमाणे मिळते.

३) सप्तम व अष्टम स्थानी पापग्रह असून द्वादश स्थानी मंगळ असेल तर “द्विपत्नी योग’ बनतो, या योगाचे फळ वरील प्रमाणे मिळते.

४) लग्न स्थान नीच राशीचा, अस्तंगत किंवा शत्रूक्षेत्री असेल आणि सप्तमेश सुध्दा नीच, शत्रूक्षेत्री किंवा अस्तंगत असेल तर ‘द्विषत्नी योग बनतो. या योगाचे फलित वरील प्रमाणे मिळते.

५) रवि व राहू सप्तमस्थानी असतील तर ‘द्विपत्नी योग’ होतो. या दोनाचे फलित वरील प्रमाणेच मिळते परंतु आणखी एक विशेष फळ मिळते ते म्हणाने दोन्ही बायका आजारी असतात.

एकाच वेळी दोन पत्नींचा योग – Marriage Delay Astrology

१) धनु किंवा मीन लग्न असेल व बुध सप्तमस्थानी असून शुक्रावर शुभ ग्रहांची दृष्टी नसेल तर हा योग बनतो. असा जातकं एकाच वेळी दोन त्रिवांवर प्रेम करतो. विवाहित पत्नी शिवाय त्याला एक उपपत्नी असते.

२) शुक्र आणि बुध जर दशमस्थानी किंवा सप्तमस्थानी असेल तर एकाच वेळी दोन पत्नींचा योग बनतो. असा जातक व्यभिचारी असतो. तो परस्त्रीगामी, कामातूर व भावनावश असतो.

३) शुक्र, शनि किंवा मंगळाच्या वर्गात असेल आणि त्याला मंगळ व शनि किंवा दोन्ही पैकी एक पाहत असेल तर एकाच वेळी दोन पत्नींचा योग होतो.

४) सप्तमेश राहू केतू सह कुंडलीत कोणत्याही स्थानी असेल आणि त्यावर पापग्रहांची दृष्टी असेल तर एकाच वेळी दोन पत्नींचा योग बनतो.

५) कारकांश कुंडलीत द्वादश स्थानी शुक्र, मंगळ असतील तर एकाच वेळी दोन पत्नींचा योग बनतो.

६) कारकांश कुंडलीत नवमस्थानी जर केतु असेल तर एकाच वेळी दोन पत्नींचा योग बनतो.

७) धनेश तृतीय स्थानी असेल अथवा चतुर्थस्थानी असेल तर एकाच वेळी दोन पत्नींचा योग बनतो.

८) सप्तमस्थानचा अधिपति लग्नी असेल व तो अस्तंगत किंवा सप्तमस्थानी असेल तर एकाच वेळी दोन पत्नींचा योग बनतो.

व्यभिचारी योग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) सप्तमेश द्वितीय किंवा द्वादश स्थानी असेल तर ‘व्यभिचारी योग’ बनतो.

२) शनि किंवा मंगळाच्या वर्गात सप्तमस्थानी शुक्र असेल अर्थात शुक्र मेष, वृश्चिक, मकर किंवा कुंभ राशीचा असेल व त्यावर शनि मंगळाची दृष्टी असेल तर ‘व्यभिचारी योग’ होतो.

३) चंद्राबरोबर मंगळ व शनि सप्तमस्थानी असतील तर ‘व्यभिचारी योग’ बनतो.

४) चंद्र, शनि योग कुंडलीत असेल तर ‘व्यभिचारी योग’ बनतो. या योगात पति-पत्नी दोघेही व्यभिचारी बनतात.

५) लग्नेश व षष्ठेश पापग्रहांनी युक्त असतील तर ‘व्यभिचारी योग’ बनतो.

६) सप्तमेश पापग्रहांनी युक्त असेल तर ‘व्यभिचारी योग’ बनतो.

७) क्षीण चंद्र पापग्रहाने युक्त असून सप्तमस्थानी असेल तर ‘व्यभिचारी योग’ होतो.

८) शुक्र व गुरु पापग्रहाबरोबर धनस्थानी, सप्तमस्थानी किंवा षष्ठस्थानी असतील तर ‘व्यभिचारी योग’ बनतो

९) एकटा बुध सप्तमस्थानी असेल तर ‘व्यभिचारी योग’ होतो. १०) लग्नेश पापग्रहाने युक्त असेल तर ‘व्यभिचारी योग’ बनतो.

११) सप्तमेशापासून तृतीयस्थानी बलवान चंद्र असेल तर ‘व्यभिचारी योग’ बनतो.

१२) द्वितीयेश व द्वादशेस तृतीय स्थानात असतील व त्यांवर गुरु व नवमेशाची दृष्टी असेल तर ‘व्यभिचारी योग’ बनतो.

१३) बलवान सप्तमेश केंद्रस्थानी किंवा त्रिकोणस्थानी शुभ वर्गात असतील व त्यावर कर्मस्थानाधिपाची दृष्टी असेल तर ‘व्यभिचारी योग’ बनतो.

१४) सप्तमेश व एकादशेश दोघेही बरोबर असतील अथवा दोघे एकमेकांना पहात असतील तर ‘व्यभिचारी योग’ बनतो.

१५) सप्तमेश व एकादशेश बलवान असतील व ते त्रिकोण स्थानात असतील तर ‘व्यभिचारी योग’ बनतो.

बहुस्त्रीगामी योग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) लग्नाधिपति आणि सप्तमाधिपति एकमेकांनी युक्त किंवा दृष्ट असतील तर ‘बहुस्त्रीगामी योग’ वनतो. असा योग कामातूर जातकांच्या कुंडल्यात बघायला मिळतो.

शतस्त्रीगामी योग – Marriage Astrology

१) सप्तमेश ज्या नवांशात असेल त्या नवांशाचा स्वामी ग्रह अर्थात सप्तमेशाधिष्टित नवांशेश जर सौम्य ग्रहांनी युक्त असेल आणि बलवान होऊन पारावतारि अंशांत गेला असेल तर ‘शतस्त्रीगामी योग’ बनतो.

२) अशा योगातील जातकांचे बरेच विवाह होतात. सर्वच स्त्रियांशी त्याने विवाह केला नाही तरी स्त्रियांशी स्वच्छंदीपणाने समागम करतो व त्याला इतर स्त्रियांकडून पत्नी सारखे शरीरसुख मिळते. शास्त्रवचना प्रमाणे असा पुरुष शतस्त्रीगामी असतो व आपल्या आयुष्यात शंभर स्त्रियांशी संसर्ग करतो.

कुभार्या योग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) शनि सप्तम स्थानी असेल तर ‘कुभार्या योग’ बनतो. असा योग असेल तर जातकाला त्याच्या मनाजोगी पत्नी मिळत नाही. पत्नी कुरुप व कर्कश बोलणारी असते. काही ना काही आजार तिला असतो. याशिवाय परस्परात एकमत होत नाही व शुल्लक कारणावरुन सतत भांडणे होतात. स्त्रीजातकाच्या कुंडलीत हा योग असेल तर तिचा पति वरील प्रमाणे मिळतो.

२) सप्तमेश ज्या नवांशात असेल त्या नवांशाचा स्वामी जर पापग्रह असेल तर ‘कुभार्या योग’ होतो. या योगात जन्मलेल्या पुरुष जातकाला मन-वचन व कर्माच्या अनुकूल पत्नी मिळत नाही. स्त्री जातकाच्या कुंडलीत हा योग असेल तर तिला तिच्या मनोनुकूल पति मिळत नाही.

३) सप्तमेश क्रूर षष्टयांशात असेल तर ‘कुभार्या योग’ बनतो. या योगाची फले पुरुष व स्त्री जातकाला वरील प्रमाणे मिळतात.

४) सप्तमस्थानाचा अधिपति ग्रह किंवा सप्तमस्थानाचा कारक ग्रह शुक्र नीच राशीच्या नवांशात असेल तर ‘कुभार्या योग’ बनतो. या योगाची फले पुरुष व स्त्री जातकाला वरील प्रमाणे मिळतात.

५) कुंडलीत कुंभ लग्न असेल व रवि पापग्रहाच्या राशीच्या नवांशात असेल आणि पापग्रहांची दृष्टी किंवा युती असेल तर ‘कुभार्या योग’ बनतो. या योगाची फले वरील प्रमाणे स्त्री व पुरुषास मिळतात.

६) लग्न मकर असेल व चंद्र पापग्रहाच्या नवांशात असेल तर ‘कुभार्या योग’ बनतो. या योगाची फले वरील प्रमाणे मिळतात.

७) सप्तमस्थानी रवि असेल तर ‘कुभार्या योग’ बनतो. या योगाची फले वरील प्रमाणे स्त्री व पुरुष जातकाला मिळतात.

सुभार्या योग – Ten Astrological Reasons for Late Marriage Problem

१) कारकांश कुंडलीत स्पतमस्थानी गुरु-चंद्र असतील तर ‘सुभार्या योग’ बनतो. असा योग असलेल्या जातकाची पत्नी सुंदर, सुलक्षणी, गुणवती असते. ती स्वधर्मपरायण पतिव्रता असते. तीचा आपल्या पतिला आनंद देण्याकडे कल असतो. स्त्री जातकाच्या कुंडलीत हा योग असेल तर वरीलप्रमाणे पति तिला मिळतो. त्यांचा संसार सुखाचा होतो.

२) मीन लग्राच्या कुंडलीत सप्तमस्थानी बुध असेल तर ‘सुभार्या योग’ बनतो. या योगाची फले वरील प्रमाणे मिळतात.

३) सप्तमेश गुरु किंवा शुक्राने युक्त किंवा दृष्ट व बलवान असेल तर ‘सुभार्या योग’ बनतो. या योगाची फले वरील प्रमाणे मिळतात.

सक्कलत्र योग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) सुभार्या योगा प्रमाणेच ‘सत्त्कलत्र योग’ आहे. सप्तमेश अथवा शुक्र गुरु किंवा बुध युक्त किंवा दृष्ट असेल तर ‘सत्त्कलत्र योग’ बनतो. या योगामुळे जातकाची पत्नी सच्चरित्र, शीलवान, पवित्र व सुयोग्य स्त्री असते.

वृध्दा व्यभिचार योग – Reasons of delay in marriage as per zodiacs

१) नवमस्थानी चंद्र पापग्रह युक्त असेल तर ‘वृध्दा व्यभिचार योग’ बनतो. या योगामुळे जातक आपल्यापेक्षा वयस्कर स्त्रीशी समागम करतो. अशा योगात जन्मलेल्या जातकाच्या जीवनात आपल्यापेक्षा वयाने मोठया स्त्रीशी समागम करण्याचे प्रसंग येतात.

गुरु स्त्री गमन योग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) नवमेश जर आपल्या नीच राशीत असेल तर ‘गुरु स्त्री गमन योग’ होतो. या योगात जन्मलेल्या जातकावर गुरुपत्नी किंवा आदरणीय स्त्रीशी समागम करण्याचे प्रसंग येतात.

मातृगामी योग

१) कुंडलीच्या केंद्रस्थानी चंद्र किंवा शुक्र अथवा रवि पापग्रहांनी युक्त किंवा दृष्ट असून क्रूर नवांशात किंवा षष्टमेशात असेल किंवा नीचाभिलाषी असून चतुर्थस्थानी पापग्रह असेल तर ‘मातृगामी योग’ होतो. हा योग फारच विचित्र आहे. नुसते ऐकायला ही धीर लागतो. परंतु कामांध व अधम पुरुषांच्या हातून असा व्यवहार घडल्याचे आम्ही स्वत: पाहिले आहे.

गर्भिणीगामी योग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) कुंडलीच्या सप्तमस्थानी गुरु असेल किंवा सप्तमस्थानी शुक्र किंवा राहू असेल, सप्तमस्थान पापपीडित असेल तर ‘गर्भिणीगामी योग’ बनतो. हा योग गंभीर व कुकर्माचा संकेत आहे. हा सामाजिक अपराध असून नैतिक नियमांचे उल्लंघन करणारा आहे. या योगामुळे कामातूर पुरूष मागचा पुढचा, नीती अनीतिचा विचार न करता गरोदर स्त्रीशी समागम करतो.

वेश्यागामी योग

१) सप्तम किंवा व्ययस्थानी बुध असेल तर ‘वेश्यागमन योग’ बनतो. अशा योगात जन्मलेला जातक अतिकामातूर असतो व तो वेश्यागामी बनतो.

पशुगामी योग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) कुंडलीत केंद्रस्थानात पापग्रह असतील किंवा सर्व केंद्रस्थानांवर पापग्रहांची दृष्टी असेल तर ‘पशुगामी योग’ बनतो. या योगात जन्मलेला जातक पशुशी संभोग करतो किंवा आपल्या पत्नीशी पशुतुल्य संभोग करतो किंवा वागणूक ठेवतो.

२) कुंडलीच्या सप्तमस्थानी गुलिक असून त्या बरोबर एखादा पापग्रह असेल तर ‘पशुगामी योग’ बनतो. या योगाचे फल वरील प्रमाणे मिळते.

३) सप्तमस्थानी रवि व चतुर्थस्थानी मंगळ असेल तर ‘पशुगामी योग’ होतो. या योगाचे फल वरील प्रमाणे मिळते.

४) कुंडलीत सप्तमस्थानी राहू असेल व चतुर्थस्थानी मंगळ असेल तर ‘पशुगामी योग’ बनतो. या योगाचे फल वरील प्रमाणे मिळते.

५) सप्तमेश मेष किंवा वृश्चिक राशीत असेल व शुक्राची दृष्टी त्यावर असेल तर ‘पशुगामी योग’ बनतो. या योगाचे फलीत वरील प्रमाणे मिळते.

६) कुंडलीतील तीन केंद्रस्थाने पापग्रहांनी युक्त असतील तर ‘पशुगामी योग’ बनतो. या योगाची फले वरील प्रमाणे मिळतील.

विकलांग पत्नी योग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) कारकांश कुंडलीत सप्तमस्थानी मंगळ मृतावस्थेत असेल तर ‘विकलांग पत्नी योग’ होतो. असा योग जातकाच्या कुंडलीत असेल तर जातकाची पत्नी विकलांग असते.

विकलांग पति योग

१) कुंडलीच्या पंचम, सप्तम किंवा नवम भावात शुक्र व रवि पापग्रह दृष्ट किंवा युक्त असतील तर ‘विकलांग पति योग’ होतो. अशा स्त्री जातकाचा पति विकलांग असतो.

रोगिणी पत्नी योग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) शनि, मंगळ मेष, वृश्चिक, मिथुन, कन्या या राशीत असतील किंवा हे दोन्हीं ग्रह लग्नी असतील तर ‘रोगिणी पत्नी योग’ बनतो. अशा जातकाची पत्नी रोगी विशेषतः नाकासंबंधी रोगाने ग्रस्त असते.

क्रोधिणी पत्नी योग

१) सप्तमेश अष्टमस्थानी असता जातकाची पत्नी क्रोधी व रोगी असते. या योगाला ‘क्रोधिणी पत्नी योग’ असे नामाभिधान आहे.

सेवाव्रती पत्नी योग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

१) कुंडलीच्या सप्तमस्थानी चंद्र असेल तर ‘सेवाव्रती पत्नी योग’ बनतो. या योगाचे फळ म्हणजे अशा जातकाची पत्नी खूप सेवा करणारी किंवा मळकर कपडे परिधान करणाऱ्या दासी प्रमाणे असते.

वंध्या योग

१) लग्नी शनि असेल व तो कर्क, वृश्चिक व मीन राशीच्या अंतिम चरणात असेल तर ‘वंध्या योग’ होतो. या योगावर जन्मलेली स्त्री वांझोटी असते. ती स्त्री हीन व समागमास अयोग्य व संतति जननास असमर्थ असते.

बारा लग्ने व विवाह योग – Astrological Reasons for Delayed Difficulties in Marriage

मार्गदर्शन :-

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा लेख आवडला असेल आणि तो उपयुक्त वाटला असेल. कृपया आपल्या कुटुंब आणि मित्रांसह सामायिक करा आणि अधिक लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या

अश्याच नवनवीन लेख ची सूचना आपल्याला वेळोवेळी मिळत राहावी या साठी खालील WhatsApp वर क्लिक करावे.

This image has an empty alt attribute; its file name is Untitled-design-1.gif

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण ShreeSevaPrathishthan@Gmail.Com या वर मला Email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित 
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) +91 9420270997
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन, (संतती समस्या विशेतज्ञ)
सामुद्रिक ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ , व्यसन मुक्ती औषध तज्ञ
( दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!