Delayed marriage: भारतीय संस्कृतित जे सोळा संस्कार सांगितलेले आहेत त्यापैकी विवाह संस्कार अत्यंत महत्वाचा मानला जातो. गृहस्थीरुपी रथचक्र जीवनरुपी मार्गावर सुरळीत चालण्यासाठी या रथचक्राची दोन्हीं चाके व्यवस्थित असणे आवश्यक आहेत. स्त्री व पुरूष ही दोन चाके आहेत या रथचक्राची ! या दोन चाकांपैकी एक चाक थोडे जरी कुरकुरायले लागले तर जीवनरुपी गाडे चालणे दुरापास्त होते.
The Positive and Negative Effects of Late Marriage
Astrological Reasons and Remedies For Delay in Marriage
What is delayed marriage:ज्योतिषशास्त्र हे मानवी जीवनाचे कल्याणकारी शास्त्र आहे. (Delayed Marriage and Abstinence-until ) आमच्या पूर्वाचार्यांनी ज्योतिषशास्त्रात मानवी जीवनाच्या प्रत्येक समस्येची उकल करुन ठेवलेली आहे. सरकारी कायद्याप्रमाणे लग्नांची वये निश्चित करण्यात आलेली आहेत (Delayed marriage age) मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ पूर्ण झाल्यावर विवाह करण्यास कायद्याने मोकळीक दिलेली आहे.
कायद्याने दिलेली ही वयोमर्यादा होऊन गेल्यावरही अनेक मुला-मुलींचे विवाह होत नाहीत. या बाबतीतील ज्योतिषशास्त्रीय कारणमीमांसा करुन ज्योतिषशास्त्रांच्या(Do’s and Don’ts to Avoid Delay in Marriage) अनेक ग्रंथाचा अभ्यास करुन उपाय, उपासना, तंत्र-मंत्र-यंत्र, यांचा विवाह होण्यास मदत होईल यादृष्टीने कुठलेही हातचे न ठेवता संपूर्ण व परिपूर्ण ज्ञान या पुस्तकात देण्याचा आटोकाट प्रयत्न मी केला आहे.
Delay in Marriage | Reasons for Late Marriage and Solutions
कुंडलीतील स्थाने व भाव – Horoscope Positions And Values
Delayed Marriage On Rise: Good for College Educated
Causes & Cures of Delay in Marriage: कुंडलीत बारा स्थाने म्हणजे बारा भाव असतात. प्रत्येक स्थानाचे नांव व त्यावरुन कोणत्या विषयाचा विचार करावा हे भावावरुन समजेल. वर दिलेल्या कुंडल्यांवरुन याचा सहज बोध होईल.
जन्मकुंडली – राशिकुंडली
१) चंद्रकुंडली -जन्माच्या वेळी जी राशी उदीत असते त्या राशीला ज्योतिषशास्त्रात ‘लग्न’ म्हणतात. जन्माच्या वेळी ज्या राशीत चंद्र असतो त्या राशीला ‘चंद्र कुंडली’ किंवा राशि म्हणतात.
२) रविकुंडली – जन्माच्या वेळी ज्या राशीत रवि असेल ती राशी प्रथम स्थानी लिहीली व इतर ग्रह क्रमाने लिहीले म्हणजे ‘रवि कुंडली’ बनते. पाश्चात्य ज्योतिषी रवि कुंडलीला अधिक महत्व देतात.
3) कारककुंडली – जन्मकुंडलीतल ज्या भावाचा विचार करावयाचा असेल त्या भावाची राशी लग्नस्थानी लिहीली आणि इतर ग्रह त्या क्रमाने लिहिले म्हणजे ‘कारककुंडली’ होते.
४) राशी व राशींचे अंक – प्रत्येक राशीला एक विशिष्ट अंक दिलेला आहे. कुंडलीत राशीचे नाव न लिहता त्या राशीचा अंक लिहण्याचा प्रघात आहे. १ मेष, २ वृषभ, ३ मिथुन, ३ कर्क, ५ सिंह, ६कन्या, ७ तुळ, ८ वृश्चिक, ९ धनु, १० मकर, ११ कुंभ, १२ मीन या प्रमाणे प्रत्येक राशीचे अंक आहेत.
५) राशीस्वामी – प्रत्येक राशीचा राशीस्वामी सुध्दा ठरलेला आहे. राशी स्वामी खालील प्रमाणे आहेत.
१) १ मेष, ८ वृश्चिक या दोन राशींचा स्वामी मंगळ आहे.
२) २ वृषभ, ७ तुळ या दोन राशींचा स्वामी शुक्र आहे.
३) ३ मिथुन, ६ कन्या या दोन राशींचा स्वामी बुध आहे.
४) ४ कर्क या राशीचा स्वामी चंद्र आहे.
५) ५ सिंह या राशीचा स्वामी रवि आहे.
६) ९ धनु, १२ मीन या दोन राशींचा स्वामी गुरु आहे.
७) १० मकर, ११ कुंभ या दोन राशींचा स्वामी शनि आहे.
विश्लेषण :- Analysis
१) नऊ ग्रह – रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू, केतू असे नऊ ग्रह प्राचीन काळापासून ज्योतिषशास्त्रात आहेत.
२) नवीन तीन ग्रह- हर्षल, नेपच्यून व प्लुटो हे तीन ग्रह अलिकडच्या काळात सापडले आहेत. असे एकूण बारा ग्रह आता मानले जातात.
3) शुभग्रह – ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार चंद्र, बुध, गुरु व शुक्र हे शुभ ग्रह आहेत.
४) पापग्रह – रवि, मंगळ, शनि, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे पापग्रह आहेत. मित्रग्रह – बुध, शुक्र, शनि व राहू हे ग्रह एकमेकांचे मित्र आहेत.
५) शत्रूग्रह – रवि व चंद्र यांचे शत्रू शनि व राहू आहेत. बुधाचा शत्रू मंगळ आहे.
६) ग्रहांची दृष्टी – फलकथनात ग्रहांच्या दृष्टीलाही खूप महत्व आहे. सर्व ग्रह आपापल्या स्थानापासून सातव्या स्थानावर दृष्टी टाकतात. मंगळ ज्या स्थानात असेल त्या स्थानापासून चवथ्या, सातव्या व आठव्या स्थानावर दृष्टी टाकतो.
- रवि कुंडलीच्या ज्या स्थानात असेल त्या स्थानापासून सातव्या स्थानावर दृष्टी टाकतो.
- बुध कुंडलीच्या ज्या स्थानात असेल त्या स्थानापासून सातव्या स्थानी दृष्टी टाकतो.
- गुरु कुंडलीच्या ज्या स्थानात असेल त्या स्थानापासून पाचव्या, सातव्या, नवव्या स्थानावर दृष्टी टाकतो.
- शुक्र कुंडलीच्या ज्या स्थानात असेल त्या स्थानापासून सातव्या स्थानी दृष्टी टाकतो.
- शनि कुंडलीच्या ज्या स्थानात असेल त्या स्थानापासून तिसऱ्या, सातव्या व दहाव्या स्थानावर दृष्टी टाकतो.
- राहू कुंडलीच्या ज्या स्थानात असेल त्या स्थानापासून सातव्या स्थानावर दृष्टी टाकतो.
- केतू कुंडलीच्या ज्या स्थानात असेल त्या स्थानातून सातव्या स्थानावर दृष्टी टाकतो.
- चंद्र, बुध, गुरु, शुक्र या चार ग्रहांची दृष्टी शुभ असते.
- रवि, मंगळ, शनि या तीन ग्रहांची दृष्टी अशुभ असते.
कुंडलीतील बारा स्थानांच्या संज्ञा – Names of Twelve Places in Kundli
Delayed Marriage of Girls: Hindu Astrology Series
१) शुभस्थाने – कुंडलीतील ‘केंद्र’ व ‘त्रिकोण’ स्थानांना ‘शुभस्थाने’ म्हणतात. धनस्थान व लाभस्थान ही दोन स्थाने शुभ असतात. तृतीयस्थान कमी शुभ व षष्ठ, अष्टम व व्ययस्थाने ही अत्यंत अशुभ असतात.
केंद्र व त्रिकोण स्थानातील ग्रह बलवान असतात.
षष्ठ, अष्टम व व्ययस्थानातील ग्रह निर्बल असतात.
ज्या भावाचा स्वामी षष्ठ, अष्टम व द्वादस्थानी असेल तसेच अशुभ स्थानांचा स्वामी ज्या भावात असेल त्या भावाचा नाश होतो परंतु त्या ग्रहावर शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर त्या भावाचा नाश होत नाही.
विशेष – Specially
Fertility Rates, Delayed Marriage, and Infertility
प्रथम स्थानाचा स्वामी म्हणजे लग्नेश, पंचमस्थानाचा स्वामी म्हणजे पंचमेश व नवमस्थानाचा स्वामी म्हणजे नवमेश हे नेहमीच एकमेकांचे मित्र असतात व ते शुभ फले देतात. लग्नेश व पंचमेश ज्या स्थानात असतील व ज्या ग्रहावर त्यांची दृष्टी असेल त्या ग्रहांच्या शुभफलात वाढ होते. म्हणून कोणताही ग्रह नैसर्गिक पापग्रह आहे म्हणून त्याला अशुभ समजू नये. प्रथम भावाचा स्वामी लग्नेशाचा मित्र असेलेला ग्रह शुभफले देईल व शत्रू ग्रह अशुभ फले देईल. कर्क व सिंह लग्नाला शनि वाईट फले देतो. मिथुन व कन्या लग्राला मंगळ अत्यंत हानिकारक असतो.
भाव – Delay in Marriage, the Reasons and Solutions
कुंडलीतील प्रत्येक स्थानावरुन ज्या सुखदुःखांचा विचार केला जातो त्यांना ‘भाव’ म्हणतात. कोणत्या स्थानावरुन कोणत्या गोष्टींचा विचार करावयाचा त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
१) लग्नस्थानावरुन – शरीरसौख्य, दीर्घायुष्य, आरोग्य यांचा विचार केला जातो.
२) धनस्थानावरुन – संपत्ती, बुध्दी, वाचा-वाणी, वकृत्व, डोळे व कुटुंबातील मंडळी यांचा विचार केला जातो.
३) तृतीयस्थान-सहजस्थानावरुन भावंडे, धाडस, पराक्रम, धैर्य, प्रवास, मैत्री, महत्वाकांक्षा, लेखन व कर्तृत्व या गोष्टींचा विचार केला जातो.
४) चर्तुथस्थान-सुखस्थानावरुन मातृसौख्य, घरदार, जमिनजुमला, स्थावर इस्टेट, वाहन, शिक्षण, बुध्दिमत्ता, संसारसुख व सर्व ऐहिक सुखांचा विचार केला जातो.
५) पंचमस्थान-सूतस्थानावरुन – भाग्य म्हणजे पूर्वपुण्याई, संतती, विद्याबुध्दी, विचारशक्ती, इच्छा, प्रेमभावना, तपश्चर्या, धोरण, चातुर्य, अकस्मात द्रव्य लाभ या गोष्टींचा विचार केला जातो.
६) षष्ठस्थान-शत्रूस्थान, रोगस्थानावरुन – रोग, शत्रुपीडा, दुःख, कर्ज, क्लेश, दारिद्रय, मामा, मावशी या गोष्टींचा विचार केला जातो.
७) सप्तस्थान-व्यापारस्थान -पति पत्नीचे स्थानावरुन – विवाह, पतिपत्नी सौख्य, स्त्री सौख्य, व्यापार-धंदा, भागीदारी, स्वतंत्र व्यवसाय, कोर्ट कचेरी व परदेश यात्रा या गोष्टींचा विचार केला जातो.
८) अष्टमस्थान-मृत्यूस्थानावरुन दीर्घायुष्य, अपमृत्यू, अपघात, आत्महत्या, भयंकर संकटे, मानहानी, अपकिर्ती, पराजय, पत्नी किंवा भागीदाराकडून द्रव्यलाभ, वारसा हक्काने मिळणारी संपत्ति या गोष्टींचा विचार केला जातो.
९) नवमस्थान-भाग्यस्थानावरून – पूर्व पुण्याई, भाग्य, पितृ सौख्य, भाग्योदय, ऐश्वर्य, धार्मिक मते, औदार्य, शांति, कीर्ति, नातवंडे, परर्देश गमन व वडिल यांचा विचार केला जातो.
१०) दशमस्थान-कर्मस्थानांवरुन व्यापार, उद्योग, नोकरी, अधिकार, ऐश्वर्य, कीर्ति, कर्तृत्व व वडील यांचा विचार केला जातो.
११) एकादशस्थान-लाभस्थानावरुन पैसा मिळवण्याचे मार्ग, द्रव्यलाभ, मित्रसौख्य, धाडस, पराक्रम व त्यापासून फायदा, केलेल्या कामाचा मिळणारा मोबदला या गोष्टींचा विचार केला जातो.
१२) द्वादशस्थान-व्ययस्थानावरुन मिळालेल्या पैशाचा खर्च विनियोग, सर्व त-हेचे उपभोग, दुष्ट कृत्ये, कर्ज, द्रव्यनाश, डोळयांचे विकार, शत्रूपीडा, हालअपेष्टा या गोष्टींचा विचार केला जातो.
ग्रहांचे गुणधर्म – Properties Of Planets
- ■ रवि, मंगळ व गुरु हे पुरुष ग्रह आहेत.
- ■ चंद्र व शुक्र हे स्त्री ग्रह आहेत.
- ■ शनि व बुध हे नपुंसक ग्रह आहेत.
- ■ रवि, चंद्र व गुरु हे ग्रह सत्वगुणप्रधान आहेत.
- ■ बुध व शुक्र हे ग्रह रजोगुणांची वृध्दी करणारे आहेत. ‘
- ■ मंगळ व शनि हे ग्रह तमोगुणात्मक गोष्टी घडवणारे आहेत.
ग्रहांचे वर्ण – Delayed marriage
रवि व मंगळ तांबडा, चंद्र व शुक्र गौर, बुध हिरवा, गुरु – पिवळा, शनि – काळा याप्रमाणे ग्रहांचे वर्ण आहेत. कुंडलीतील बलवान ग्रहांप्रमाणे त्या त्या गुणांची छाया जातकावर पडते.
ग्रहांचे स्वभाव – Delayed marriage
रवि-स्थिर, चंद्र-चंचल, मंगळ-उग्र, बुध-मिश्र, गुरु-क्षिप्र,
शुक्र-मृदु, शनि-दारुण असा प्रत्येक ग्रहाचा स्वभाव आहे.
ग्रहांच्या जाती – Delayed marriage
गुरु-शुक्र-ब्राम्हण, रवि-मंगळ क्षत्रिय, चंद्र-बुध-वैश्य, शनि- अंत्यज.
ग्रहांची तत्वे – Establish a delayed record of marriage
रवि-मंगळ-अग्नितत्व, चंद्र-शुक्र-जलतत्व, बुध-भूमितत्व, गुरु- आकाशतत्व, शनि-वायुतत्व
ग्रहांचे अवयव – Delayed marriage
रवि-आत्मा, चंद्र-मन, मंगळ-सत्व, बुध-वाचा, गुरु-जीव, शुक्र-काम, शनि-दुःख.
ग्रह | उच्चराशी | मुल त्रिकोण राशी | नीच राशी |
---|---|---|---|
१) रवि | मेष | सिंह | तूळ |
२) चंद्र | वृषभ | वृषभ | वृश्चिक |
3) मंगळ | मकर | मेष | कर्क |
४) बुध | कन्या | कन्या | मकर |
५) गुरु | कर्क | धनु | मकर |
६) शुक्र | मीन | तूळ | कन्या |
७) शनि | तूळ | कुंभ | मेष |
8) राहू | मिथुन | कर्क | धनु |
9) केतू | धनु | मकर | मिथुन |
सम | विषम | सम | विषम |
बलवान ग्रह – Delayed marriage
जो ग्रह स्वगृही, उच्चराशीत, केंद्र त्रिकोणात असेल त्या ग्रहाला ‘बलवान ग्रह’ मानावे.
जो ग्रह षष्ठस्थान, अष्टमस्थान व द्वादशस्थानी असेल तो ग्रह ‘निर्बली’ मानावा. ग्रह जर त्याच्यापेक्षा बलवान असलेल्या त्याच्या शत्रुग्रहाने युक्त व दृष्ट असेल तर तो ग्रह ‘निर्बली’ होतो व स्वतःच्या भावाची पूर्ण फले देण्यात असमर्थ ठरतो.
युती –
दोन ग्रह एकाच राशीत असतील तर त्यांस ग्रहांची ‘युती’ म्हणतात.
वक्रीग्रह – Delayed marriage
कुंडलीत वक्री ग्रह असतील तर ते स्थान भावानुसार शुभ किंवा अशुभ फले तीव्रतेने देतात.
रवि, चंद्र हे दोन ग्रह कधीच वक्री होत नाहीत.
राहू – केतू हे नेहमीच वक्री असतात.
येथपर्यंत आपण ज्योतिष शास्त्राची प्राथमिक पण महत्वाची माहिती पाहिली. या माहितीच्या आधारावर विलंबाने विवाह होणे किंवा विवाह जमण्यात ज्योतिषशास्त्र दृष्ट्या कोणत्या ग्रहमानामुळे अडचणी किंवा अवरोध उपस्थित होतात हे सहजपणे स्पष् होईल.
मार्गदर्शन :-
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा लेख आवडला असेल आणि तो उपयुक्त वाटला असेल. कृपया आपल्या कुटुंब आणि मित्रांसह सामायिक करा आणि अधिक लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या
अश्याच नवनवीन लेख ची सूचना आपल्याला वेळोवेळी मिळत राहावी या साठी खालील WhatsApp वर क्लिक करावे.
आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण ShreeSevaPrathishthan@Gmail.Com या वर मला Email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.
( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
अधिक माहिती साठी संपर्क :-
श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997 – 9404594997
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन, (संतती समस्या विशेतज्ञ)
सामुद्रिक ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ , व्यसन मुक्ती औषध तज्ञ
( दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)