आपल्याकडे (Divorce) हिंदीत एक म्हण आहे, ‘जो शादी के लड्डू न खाये वो पछताए, जो खाये वो भी पछताए,’ ही म्हण १०० टक्के खरी आहे. आपण आज ज्या युगात वावरत आहोत, त्याचा आणि पुढील येणाऱ्या काळाचा विचार करता विवाह ही एक मोठी समस्या बनली आहे. विवाहाची लॉटरी लागणे हा दैवाचा भाग आहे. विवाह होऊन अनुरूप जोडीदार मिळणे आणि त्याच्याबरोबर वैवाहिक जीवन निभावले जाणे ही काळजीची बाब बनली आहे.
आज २१ व्या शतकात विवाहामधील दोन महत्त्वाच्या समस्या प्रामुख्याने पाहायला मिळतात. त्या म्हणजे
२) विवाह झाला, परंतु दोघांमध्ये टोकाचे मतभेद असल्याने वैवाहिक सौख्य मनाप्रमाणे मिळत नाही.
सविस्तर माहिती – Divorce
माझ्या मते विवाह होणे महत्त्वाचे नसून तो विवाह टिकविणे हेच विवाह सफल झाल्याचे द्योतक आहे. आजच्या युगात लहान लहान गोष्टींवरून, कारणांवरून विवाह विच्छेद किंवा घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले आहे आणि हेच प्रमाण समाजाच्या हानीसाठी कारणीभूत ठरले. पूर्वीच्या काळी स्त्री परावलंबी, कमी शिकलेली, चूल आणि मूल सांभाळणारी, एक उत्कृष्ट पत्नी व आई अशा भूमिकेत असल्याने सासरी कितीही त्रास झाला तरी माहेरी न येणारी, घटस्फोटाचे नावही न काढणारी अशी होती. तिच्या माहेरच्या लोकांचे संस्कारच तिला विवाह जीवन अबाधित ठेवण्यास भाग पडत असे. याउलट मात्र आजच्या कलियुगात हे चित्र पूर्णपणे विरुद्ध झाल्याने घटस्फोट ही एक फॅशन किंवा सहज होणारी प्रक्रिया होऊन बसली आहे. आजच्या काळात घटस्फोट होण्यामागे खालील कारणांचा विचार करावा लागेल.
१) बदलती जीवनशैली, इंटरनेट, सिनेमा, टी.व्ही., मोबाईल इ. चे दुष्परिणाम. Divorce
२) मुलींचे स्वतःच्या करियरला दिले जाणारे महत्त्व.
३) मुलीच्या आईवडिलांचा संसारामध्ये वाढता हस्तक्षेप.
४) स्वैर, व्यभिचारी वृत्ती.
५) उच्चशिक्षण, चांगली नोकरी व पगार, स्वावलंबित्व यामुळे मुलींमध्ये तडजोडीचा अभाव.
६) विवाहामध्ये फसवणूक व जोडीदाराशी वैचारीक मतभेद.
७) विवाहापूर्वीचे प्रेमसंबंध किंवा विवाहबाह्य प्रेमसंबंध. Divorce
८) जोडीदार नपुंसक असणे तसेच स्त्रीवंध्यत्व.
९) मनाविरुद्ध किंवा आईवडिलांच्या आग्रहाखातर विवाह करणे.
१०) लैंगिक कामजीवनामध्ये असमाधान, अभाव किंवा अतिरेक
११) कायदयाने स्त्रीयांना दिले जाणारे संरक्षण व लाभ (माहेरच्या प्रॉपर्टीमधील वाटा व पतीकडील प्रॉपर्टीचा लाभ किंवा पोटगी)
आता आपण कुंडलीतील घटस्फोटाच्या योगासंबंधी माहिती घेऊ.
घटस्फोटाचे योग – Divorce
१) सप्तमेश सप्तमाच्या ६/८/१२ मध्ये असता म्हणजे व्यय, धन व षष्ठ स्थानात असता.
२) सप्तमात शनि, मंगळ, हर्षल, गुरु, राहु, केतु असे ग्रह वक्री, अशुभ नक्षत्रात व पापग्रहांच्या अशुभ योगात असता.
३) सप्तमेश किंवा शुक्र हे राहु, केतु, हर्षल, नेपच्यून अशा ग्रहांच्या युतीत, प्रतियोगात किंवा केंद्रयोगात असता.
४) धन व अष्टमस्थान पापग्रहांनी युक्त असता किंवा या दोन स्थानांत पापग्रहांच्या प्रतियुती असता.
५) मंगळ किंवा इतर कोणताही पापग्रह लग्नी, चतुर्थात, सप्तमात, अष्टमात किंवा व्ययस्थानात असता.
६) सप्तमात रवि असून त्यावर पापग्रहांची दृष्टी असेल तर. ७) सप्तमस्थानात २/६/८/१२ या स्थानाचे अधिपती एकटे किंवा पापग्रहांच्या युतीत असता.
८) सप्तमस्थानावर पापग्रहांची दृष्टी असता.
९) सप्तमेश वक्री किंवा पापग्रहाबरोबर अगर ग्रहणयुक्त असणे.
१०) शुक्र पापकर्तरीत, पापग्रहयुक्त, अशुभ नक्षत्रात (कृत्तिका, आश्लेषा, ज्येष्ठा, मूळ) असता.
११) सप्तमेश बुध हा मंगळाच्या राशीत किंवा मंगळाबरोबर तसेच तो पापग्रहांनी बिघडलेला व ६/८/१२ स्थानी असता.
१२) लग्नी रवि एकटा किंवा पापग्रहांनी दूषित असता.
१३) मनाचा कारक चंद्र कुंडलीमध्ये दूषित असता (नीच राशीत, पापग्रहांच्या युतीत, दृष्टीत ६/८/१२ स्थानी)
१४) विष्टिकरण असल्यास.
१५) नवमांशात शुक्र किंवा सप्तमेश पापग्रहयुक्त किंवा दृष्ट असता.
घटस्फोटासंबंधी काही महत्त्वाचे नियम – Divorce
१) घटस्फोटाचा विचार पती-पत्नी या दोघांच्या कुंडलीचा एकत्रित अभ्यास करून करावा. एकाच्या पत्रिकेत घटस्फोटाचे योग असून दुसऱ्याची पत्रिका उत्तम वैवाहिक सौख्याची असता घटस्फोट होत नाही. जर दोघांच्याही पत्रिका घटस्फोटासाठी पोषक असता घटस्फोट होतो. या नियमाचा विचार वधू-वरांचे विवाहमिलन किंवा गुणमेलन करताना करावा.
२) घटस्फोट हा कुंडलीतील एखाद्या योगावर अवलंबून नसून अनेक योगांचा एकत्र परिपाक असतो. एकापेक्षा जास्त योग एकाच कुंडलीत आढळल्यास घटस्फोट संभवतो. अन्यथा फक्त वैवाहिक असमाधान राहते.
३) घटस्फोट हा गोचरीच्या पापग्रहांच्या भ्रमणकाळात होण्याची शक्यता जास्त असते. ज्यावेळी पत्रिकेत गोचरीने पापग्रहांचे (शनि, राहु, मंगळ इ.) भ्रमण चंद्रावरून, चंद्राच्या सप्तमातून व कुंडलीच्या लग्न व संप्तम स्थानातून होते, त्यावेळी घटस्फोटाच्या घटना अनुभवास येतात.
४) घटस्फोटामध्ये चंद्राचाही विचार करावा, कारण चंद्र मनाचा कारक आहे. मूळ कुंडलीत किंवा गोचरीने चंद्र बिघडला असता मनामध्ये अविचार येऊन व्यक्ती घटस्फोटाचा तडकाफडकी निर्णय घेते.
५) रविचाही विचार महत्त्वाचा ठरतो. ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत लग्नी रवि असतो, ती व्यक्ती स्वतःला खूप शहाणी समजते. दुराग्रही, हट्टी, माझेच खरे या स्वभावाने मतभेद वाढतात व त्याला माघार घेण्याची सवय नसल्याने घटस्फोट घेतो.
६) घटस्फोट हा गोचर भ्रमणामुळे होत असल्याने या अशुभ कालावधीत पती-पत्नी दोघांना वेगवेगळे राहण्यास सांगणे, त्यांना तडजोडीसाठी मार्गदर्शन, समुपदेश करणे, माघार घेण्यास लावणे व अशुभ ग्रहांची उपासना करण्यास सांगणे इ. उपाय ज्योतिषांनी सांगावे. घटस्फोट ही टाळता येणारी गोष्ट आहे. त्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात.
७) पतीपत्नी यांचे व्यक्तिमत्व प्रतिकुल किंवा एकमेकांस विरोधी असल्यास घटस्फोट संभवतो. दोघांच्या आवडीनिवडी, स्वभाव, वागणे इ. परस्परविरोधी असल्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय ते घेवू शकतात.
आता आपण घटस्फोटाचे योग असलेल्या कुंडल्यांचे विश्लेषण पाहू.
पुरुष जातक Divorce
1) जन्मतारीख : १२/६/१९८१ – जन्मकुंडली क्र. २४
2) जन्मवेळ : १.२०
3) जन्मठिकाण : पुणे
निरयन स्पष्ट ग्रह
ग्रह | राशी | अंश:कला:विकला | नक्षत्र | चरण |
---|---|---|---|---|
लग्न | मीन | ०८:०९:०९ | उ.भाद्र | २ |
रवि | वृषभ | २७:१०:५६ | मृग | २ |
चंद्र | कन्या | २३:२७:३२ | चित्रा | १ |
मंगळ | वृषभ | ११:०६:१६ | रोहिणी | १ |
बुध (वक्री) | मिथुन | ११:२४:52 | आर्द्रा | २ |
गुरु | कन्या | ०७:११:२० | उत्तरा-फा | ४ |
शुक्र | मिथुन | १४:२५:३६ | आर्द्रा | ३ |
शनि | कन्या | ०९:२६:१८ | उत्तरा-फा | ४ |
राहू (वक्री) | कर्क | १०:२१:१२ | पुष्य | ३ |
केतू (वक्री) | मकर | १०:२१:१२ | श्रवण | १ |
परिचय Divorce
सदर पुरुष जातकाचा विवाह २१ मे २००९ मध्ये झाला. १३ मार्च २०१३ मध्ये घटस्फोट झाला असून दुसऱ्या विवाहाची तयारी सुरू आहे.
सदर जातकाची पत्नी वादविवाद करून सतत माहेरी जात असे. मुलीच्या आईवडिलांचा हस्तक्षेप जास्त होता.
ग्रहस्थिती : Divorce
१) सप्तमात कन्या राशीमध्ये चंद्र-शनि-गुरु ही युती असल्याने घटस्फोट संभवतो.
२) सप्तमेश बुध व विवाहकारक शुक्र मिथुन राशीमध्ये चतुर्थात, आर्द्रा या अशुभ नक्षत्रात असून पापकर्तरीत हे दोन ग्रह आहेत. सप्तमेश बुध वक्री आहे.
३) चंद्र शनिने युक्त असल्याने पूर्णपणे बिघडलेल्या स्थितीत आहे. ज्यावेळी कन्या राशीतून म्हणजेच जातकाच्या चंद्रावरून व सप्तमस्थानामधून गोचरीने शनि जात होता त्या काळात घटस्फोट झाला (शनिची साडेसाती असताना).
४) शुक्राचे व सप्तमातील ग्रहांचे केंद्रयोग हेही घटस्फोटासाठी पोषक ठरले.
५) व्ययेश शनि सप्तमात गुरु-चंद्र युक्त आहे.
टीप : सदर जातकाचा विवाह वयाच्या ३०-३२ वर्षांपूर्वी झाल्यामुळे व शनिची साडेसाती चालू असताना झाल्यामुळे घटस्फोट झाला. यासाठी जातकाने विवाह कधी करावा, याचे योग्य मार्गदर्शन ज्योतिषाने करावे म्हणजे वरील घटना टाळता येतील.
स्त्री जातक Divorce
जन्मतारीख : १४/११/९१ जन्मकुंडली क्र. २५
जन्मवेळ : २१.५०
जन्मठिकाण: फलटण
निरयन स्पष्ट ग्रह Divorce
ग्रह | राशी | अंश:कला:विकला | नक्षत्र | चरण |
---|---|---|---|---|
लग्न | मिथुन | २४:२९:१७ | पुनर्वसू | २ |
रवि | तूळ | २८:०२:५२ | विशाखा | ३ |
चंद्र | मकर | २९:०६:१७ | धनिष्ठा | २ |
मंगळ | तूळ | २६:०५:५९ | विशाखा | २ |
बुध | वृश्चिक | १९:४८:२५ | ज्येष्ठा | १ |
गुरु | सिंह | १७:४०:४७ | पूर्वा-फा | २ |
शुक्र | कन्या | ११:५९:४६ | हस्त | १ |
शनि | मकर | ०७:४७:२६ | उ.षाढा | ४ |
राहू (वक्री) | धनु | १८:३३:३१ | पू.षाढा | २ |
केतू (वक्री) | मिथुन | १८:३३:३१ | आर्द्रा | ४ |
हर्षल | धनु | १७:२३:१० | पू.षाढा | २ |
नेप | धनु | २०:५४:०१ | पू.षाढा | 3 |
परिचय – Divorce
सदर स्त्री जातकाचा वयाच्या १९ व्या वर्षी म्हणजेच २०१० मध्ये विवाह झाला. पती अतिशय तापट, रागीट, विक्षिप्त, लहरी, वादविवाद करणारा, हुकुमत गाजविणारा, मारझोड करणारा व व्यसनी होता.
पती लहान- सहान कारणामुळे वादविवाद करून हिला मारहाण करत असे. शेवटी ती त्रासाला कंटाळून २०११ मध्ये माहेरी निघून आली व २०१३ मध्ये रितसर घटस्फोट घेऊन दुसऱ्या विवाहाचा विचार करत आहे.
ग्रहस्थिती – Divorce
१) सप्तमस्थानामध्ये दोनपेक्षा अधिक पापग्रहाधिक्य आहे.
२) सप्तमस्थानामध्ये नीच राशीतील पापग्रहयुक्त राहु विवाहसुख देत नाही. धनु राशीत राहु, हर्षल व नेपच्यून या ग्रहांमुळे व सप्तमेश गुरु सिंह राशीत असल्याने पती रागीट, तापसी, हेकट, विक्षिप्त, हुकुमत गाजविणारा, अहंकारी व व्यसनी मिळाला.
३) विवाहकारक शुक्र कन्या या नीच राशीत, सप्तमातील पापग्रहांच्या (राहु-केतुच्या) केंद्रयोगात असल्याने बिघडलेला आहे.
४) लग्नेश बुध षष्ठात शत्रूच्या राशीत व पापकर्तरीत असा दूषित आहे.
५) पतीकारक रवि, मंगळ हे ग्रह तूळ राशीत (नीच राशीत रवि) असून शनिच्या केंद्रयोगात व शनिदृष्ट असल्याने तेही दूषित आहेत.
६) नवमांश कुंडलीत लग्नकुंडलीचा सप्तमेश गुरु हा पापग्रहाने बिघडलेला आहे व नवमांशात शुक्र मेषेत नेपच्यूनच्या प्रतियुतीत असल्याने विवाहामध्ये फसवणूक व पती व्यसनी मिळाला.
७) चंद्रकुंडलीचा सप्तमेश चंद्र शनियुक्त व मंगळदृष्ट असल्याने तोही बिघडलेला आहे.
८) मनाचा कारक चंद्र अष्टमात मकर राशीत शनियुक्त व मंगळदृष्ट असा पूर्णपणे बिघडलेला असल्याने लगेच घटस्फोटाचा निर्णय घेतला.
थोडक्यात, सर्वच गोष्टी वैवाहिक सौख्यामध्ये बाधा उत्पन्न करणाऱ्या असल्याने घटस्फोट झाला. विवाहयोग वयाच्या २८ वर्षानंतर असतानाही गडबडीत, चौकशी न करता विवाह केल्यामुळे वैवाहिक सौख्याची हानी झाली.
स्त्री जातक Divorce
१) जन्मतारीख : २८/०१/१९८२ – जन्मकुंडली क्र. २६ जन्मवेळ : १६.३०
२) जन्मवेळ : १६.३०
3) जन्मठिकाण: सातारा
निरयन स्पष्ट ग्रह
ग्रह | राशी | अंश:कला:विकला | नक्षत्र | चरण |
---|---|---|---|---|
लग्न | मिथुन | १८:२२:४३ | आर्द्रा | ४ |
रवि | मकर | १४:३५:५५ | श्रवण | २ |
चंद्र | कुंभ | २२:३९:५५ | पू. भाद्र | १ |
मंगळ | कन्या | २२:३५:१७ | हस्त | ४ |
बुध (वक्री) | मकर | २२:३०:३३ | श्रवण | ४ |
गुरु | तूळ | १५:३७:२० | स्वाती | ३ |
शुक्र (वक्री) | मकर | ०३:२२:३७ | उ.षाढा | ३ |
शनि | कन्या | २८:३८:१४ | चित्रा | २ |
राषु (वक्री) | मिथुन | २८:०७:५३ | पुनर्वसू | ३ |
केतू (वक्री) | धनु | २८:०७:५३ | उ.षाढा | १ |
नेप | धनु | ०२:२८:३५ | मूळ | १ |
परिचय – Divorce
सदर स्त्रीजातक २०१२ मध्ये माझ्याकडे दुसऱ्या घटस्फोटासाठी व तिसऱ्या विवाहाच्या योगासाठी तसेच वैवाहिक सौख्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आली होती. ही स्त्री सुंदर, देखणी, गौरवर्णीय, आकर्षक, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाची असून सरकारी नोकरदार आहे. हिने प्रथम विवाह वयाच्या २४ व्या वर्षी म्हणजे २००६ मध्ये प्रेमसंबंधातून केला होता. तिने घटस्फोट २००७ मध्ये घेतला. दुसरा विवाह २००८ मध्ये केला, त्यामध्येही मतभेद, असमाधान आहे.
ग्रहस्थिती – Divorce
१) सप्तमात धनु राशीमध्ये, केतु उत्तराषाढा नक्षत्रात व नेपच्यून मूळ नक्षत्रात असून शनि मंगळाच्या केंद्रयोगात आहे.
२) सप्तमस्थानावर राहु व मंगळ या दोन पापग्रहांची दृष्टी आहे. तसेच सप्तमस्थान पापकर्तरीत आहे.
३) सप्तमेश गुरू पंचमात तूळ या शत्रूराशीत राहु दृष्ट व पापकर्तरीत आहे. सप्तमेश पंचमात या योगाने प्रथम विवाह प्रेमसंबंधातून झाला.
४) विवाहकारक शुक्र अष्टमात वक्री, शनिच्या मकर राशीत उत्तराषाढा नक्षत्रात व अस्तंगत असा बिघडलेला आहे.
५) पतीकारक रवि हा अष्टमात शत्रू राशीत व शुक्रयुक्त असल्याने वैवाहिक सौख्य व विवाहयोग सर्व वयाच्या ३० वर्षानंतर उत्तम दाखवितो.
६) नवमांश कुंडलीमध्ये सप्तमात कन्या राशीत शनि आहे. लग्नकुंडलीचा सप्तमेश गुरु व विवाहकारक शुक्र हे दोन ग्रह नवमांशात व्ययस्थानी कुंभ राशीत, मंगळदृष्ट अशा बिघडलेल्या स्थितीत आहेत.
७) चतुर्थ या मानसिक सौख्याच्या स्थानात शनि-मंगळ युती कन्या राशीत असल्याने व मिथुन लग्नाचा अशुभ ग्रह मंगळ चतुर्थस्थानात असल्याने मानसिक सौख्यास व कौटुंबिक सौख्यास बाधक ठरला.
सखोल माहिती Divorce
सदर स्त्री जातकाचे कुंडलीतील लग्नस्थान, चतुर्थस्थान व सप्तमस्थान पापग्रहाने पीडित असून एकमेकांच्या केंद्रयोगात, प्रतियुतीत (अशुभ योगात) असल्याने हिच्या जीवनामध्ये दुःख, अपयश, संघर्ष, कष्ट राहिले. मकरेचा शुक्र वैवाहिक जीवन दुर्दैवी व निरस दाखवितो. शुक्राची भूमिका येथे महत्त्वाची ठरली. पहिला पती व्यसनी व मारझोड करणारा मिळाल्याने हिने घटस्फोट घेतला.
दुसऱ्या विवाहामध्येही Divorce असमाधान, मतभेद आहेत. सध्या ही मुलगी नोकरीमुळे स्वतंत्र राहते. दुसरा घटस्फोट घेऊन तिसरा विवाह करू का, असे विचारण्यास माझ्याकडे आली असता, मी तिला इथून पुढे विवाहाच्या किंवा संसाराच्या भानगडीत पडू नकोस म्हणजेच तिसरा विवाह करू नको असे सांगितले. कारण हिच्या पत्रिकेत वैवाहिक सौख्य नाही. आपण तिसरे लग्न लाभस्थानावरून बघतो. लाभेश मंगळ शत्रूच्या Divorce राशीत शनिबरोबर व राहु, केतु, नेपच्यून या पापग्रहांच्या केंद्रयोगात आहे व लाभस्थानावर मंगळाची दृष्टी आहे. ही ग्रहस्थिती तिसरा विवाहही यशस्वी करेल असे वाटत नसल्याने हिला तिसरा विवाह करू नको असे सांगितले व विवाह करावयाचा झाल्यास वयाच्या ३२ वर्षानंतर करावा व तडजोडपूर्वक वैवाहिक जीवन व्यतीत करावे असेही सांगितले.
या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क सुविधा खाली दिलेली आहे,आपण आपली कुंडली व समस्या, प्रश्न या बद्दल सखोल उत्तर व मार्गदर्शन हमखास मिळेल.
मार्गदर्शन :-
आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevasprathishthan@gmail.com या वर मला Email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.
(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,
अधिक माहिती साठी संपर्क :-
श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी (गुरुजी)
+91 94202 70997 +91 94232 70997
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,
संतती समस्या विशेतज्ञ
ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ, व्यसन मुक्ती औषध तज्ञ
(दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)