Mangal Dosha, विवाहातील अडथळा – मंगळ दोष

Mangal Dosha
श्रीपाद गुरुजी

Mangal Dosha, विवाह ठरविताना पत्रिकांचे गुणमेलन करण्याचा प्रघात आता सर्वत्र प्रचलित झाला आहे. ख्रिश्चन व मुस्लीम समाजातही अलिकडे गुणमेलन करण्यास सुरुवात झाली आहे. गुण मेलनासाठी आलेल्यांचे फक्त दोन प्रश्न असतात.

१) मुलाला किंवा मुलीला मंगळ नाही ना ?

२) किती गुण जमतात ?

यावर सर्रास उत्तर मिळते -“पत्रिका चांगली जमते आहे.मंगळ दोष नाही. गुण योग्य आहेत.” एवढयावर समाधान मानून मुला- मुलींचे पालक लगाच्या पुढच्या कार्याला लागतात. विवाह झाल्यावर काही काळातच नवरा-बायकोत धुसफूस सुरु होते व त्याचे पर्यावसान मोठया भांडणाहून संबंध विच्छेदापर्यंत पाळी येते.

तेव्हा या जोडप्यांच्या पत्रिका पुन्हा तपासल्यावर लक्षात येते की पत्रिका मंगळाची आहे. मूळात पत्रिकाच जमत नाही. पंचागात केवळ नक्षत्र राशीवरून दिलेले एक कोष्टक वर्षानुवर्षे छापले जात आहे. त्यावरून कोणालाही पत्रिकेचे सनाच्या टूटने गुण काढता येतात. पण एवढयावर भागत नाही. विवाहाच्या दृष्टीने गुणमेलन खूप सविस्तर काळजीपूर्वक केले पाहिजे. गुणा पेक्षा ग्रह मैत्री स्थान मैत्रीला अधिक महत्व द्यावे. या बाबतीत अष्टक वर्ग पध्दती फारच उपयुक्त आहे.

या प्रकरणात आपण फक्त मंगळाचा चौकस विचार करणार आहोत. :-

१) कुंडलीतील लग, द्वादश, चतर्थ, सप्तम अष्टम या स्थानी असेल तर स्त्रीच्या कुंडलीत पुरुषाचा नाश व पुरुषाच्या कुंडलीत स्त्रीचा नाश अशी फले मिळतात. वधु वरांच्या कुंडल्यात वरील प्रमाणे दोष असेल तर विवाह करु नये. परंतु गुणमेलनात चांगले गुण मिळत असतील किंवा दोघांच्या कुंडल्यात समान ‘मंगळ दोष’ असेल तर विवाह करण्यास हरकत नाही.

२) दोघांच्या कुंडल्यात समान मंगळ नसेल व इतर पापग्रह असेल तर १, ४, ७, ८, १२व्या स्थानी असलेल्या मंगळाप्रमाणेच रवि, राहू व शनिची फले मिळतात. मंगळाच्या मुलीचा विवाह मंगळाच्या मुलाशी केल्यास मंगळ दोषाचा परिहार होतो व कोणत्याही प्रकारे मंगळाचे अनिष्ट फल न मिळता त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होते. मंगळाला तुल्य मंगळ असेल तसेच कोणताही तसलाच पापग्रह असेल तर विवाह शुभ होऊन तो विवाह दिर्घायु होतो. पुत्र-पौत्र होतात.

३) मेष राशीचा मंगळ लग्मी, धनु राशीचा मंगळ व्ययस्थानी, वृश्चिकेचा मंगळ चतुर्थस्थानी, मीनेचा मंगळ सप्तमस्थानी व कुंभेचा मंगळ अष्टमस्थानी असेल तर मंगळ दोष लागत नाही.

खोल विचार :-

४) जन्म कुंडलीत लग्नी, चतुर्थ स्थानी, सप्तमस्थानी, अष्टमस्थानी किंवा व्ययस्थानी वक्री मंगळ असेल तर मंगळ दोष गणला जात नाही. मंगळ वक्री किंवा शत्रू राशीचा, मिथुन राशीचा किंवा रविने अस्तंगत झालेला मंगळ दोषाई नसतो. दोहोंच्या जन्म कुंडलीत समान फल देणारा मंगळ असेल किंवा त्याच प्रकारचा अनिष्ट फल दायक पापग्रह असेल तर दोघांचा विवाह करण्यास हरकत नाही. हा विवाह शुभ होतो.

५) पुरुष किंवा स्त्रीच्या जन्मकुंडलीत १,४,७,८,१२ यापैकी एका स्थानी मंगळ असेल व तिच्या जेडीस असलेल्या पुरुष किंवा स्त्रीच्या कुंडलीत त्याच भावापैकी एका भावात शनि, मंगळ किंवा राहू हे पापग्रह असतील तर मंगळ दोष रहात नाही.

६) मुलगा किंवा मुलीच्या कुंडलीत १, ४, ७, ८, १२ या स्थानापैकी एकात शनि असेल व कुंडलीत त्याच स्थानात मंगळ असेल तर मंगळ दोष राहत नाही.

विचारधीन :- Mangal Dosha

७) कर्क किंवा सिंह राशीत जन्मलेल्या जातकाला मंगळ दोष नसतो. मंगळ आपल्या मेष व वृश्चिक या स्वराशीत, मकर या उच्च राशीत किंवा कर्क या नीच राशीत असेल तर मंगळ दोष लागत नाही. तसेच मित्र ग्रह रवि, गुरु व चंद्राबरोबर असेल तरी मंगळ दोष लागत नाही.

८) जन्मकुंडलीत मंगळ, गुरु, चंद्रासोबत असेल किंवा चंद्र केंद्रात असेल तर मंगळ दोष मानू नये.

९) १,४,७,१० केंद्रात किंवा ९-५ त्रिकोणात जर शुभ ग्रह असेल व ३,६,११ या स्थानात पापग्रह असेल आणि सप्तमस्थानी सप्तमेश असेल तर मंगळ दोष लागत नाही.

१०) अनिष्ठ स्थानी मंगळ असेल परंतु त्या स्थानाचा मालक जर केंद्र किंवा त्रिकोणात असेल तर मंगळ दोष लागत नाही.

११) जर शुक्र, चंद्र, बुध व गुरु लग्नी असतील तर मंगळ दोषाचे निवारण होते.

मंगळ दोष कुप्रभाव :-

१२) धन स्थानी चंद्र व शुक्रं असतील, मंगळ व गुरुची युती असेल किंवा गुरु आपला पूर्ण दृष्टीने मंगळाला पाहत असेल, केंद्रस्थानी राहू किंवा राहू मंगळ कोठेही एकत्र असतील तर मंगळ दोष मानू नये.

१३) गुरु-मंगळाचा संयोग होत असेल किंवा चंद्र मंगळाचा संयोग होत असेल तर मंगळ दोष मानू नये.

१४) राशींची मैत्री असेल. गुण एक असेल किंवा ३० पेक्षा जास्त गुण ि असतील तर मंगळ दोषाचा विचार करु नये.

१५) जर मुलीच्या जन्मकुंडलीत १,४,७,८,१२ या स्थानापैकी कोणत्याही एका स्थानात मंगळ असेल आणि

केंद्र त्रिकोणात (१,४,७,९,१०,५) गुरु असेल तर मंगळ दोष राहत नाही व कन्या सुख-सौभाग्य संपन्न असते.

१६) जन्म कुंडलीत मंगळ अनिष्ट स्थानापैकी कोणत्याही एका स्थानात बलवान असेल तर त्याचा दोष उत्पन्न होतो.अन्यथा दुर्बल असेल तर किंवा शुभ ग्रह दृष्ट असेल किंवा रवि बरोबर असल्याने अस्तंगत होण्याच्या मार्गावर असेल तर मंगळ दोषकारक नसतो.

अविचार :- Mangal Dosha

१७) शुभ ग्रहांशी संबंध करणारा मंगळ अशुभ करीत नाही. कर्क लग्नात लग्नी असलेला मंगळ दोष कारक नसतो. मंगळ जर आपल्या नीच राशीत असेल अथवा शत्रूक्षेत्री असेल किंवा अस्तंगत असेल तर तो तटस्थ राहतो. शुभ किंवा अशुभ कसलाच परिणाम तो करीत नाही.

१८) जन्मकुंडलीत जर पापग्रह आपआपल्या राशीत असतील किंवा आपआपल्या उच्च राशीत असतील तर तेही शुभ फल देतात.

१९) जर कोणा कन्येच्या कुंडलीत जन्मलग्नापासून किंवा जन्माच्या वेळेच्या नाम राशिपासून सप्तम स्थानी त्याची राशी असेल किंवा अन्य कोणी शुभ ग्रह बसला असेल तर त्या कन्येच्या कुंडलीतील अनापत्त्यदोष, वैधव्य दोष आणि विष कन्या दोष नष्ट होतात.

२०) गुरु, शुक्र आणि बुध यापैकी एक ग्रह केंद्र किंवा त्रिकोणात असेल, चंद्र वर्गोत्तम असेल व रवि एकादश स्थानी असेल तर कुंडलीतील सर्व दोष नष्ट होतात.

२१) १,४,७,८,१२ या पैकी कोणत्या स्थानी मंगळ असेल तर अशा जातकाने विवाहच करु नये. परंतु हा मंगळ बुध गुरु दृष्ट असेल किंवा युक्त असेल तर मंगळ दोष राहत नाही.

२२) ज्या कुमार व कुमारिका दोघांच्या कुंडलीत लग्नापासून, चंद्रापासून आणि शुक्रापासून १,४,७,८,१२ यापैकी कोणत्याहि स्थानी मंगळ समान स्थितीत (मुला-मुलींच्या कुंडलीत एकाच स्थानी) तर त्या दोघांचे वैवाहिक जीवन प्रदीर्घ काळ टिकते आणि धन-धान्य, पुत्रपौत्रादिने युक्त ते दोघे सुखी राहतात. परंतु कुमार आणि कुमारी यापैकी एकाच्याच कुंडलीत वरील स्थानापैकी एका स्थानी मंगळ असेल तर मंगळाची फले सर्वथा विपरीत मिळतील.

परिणाम :- Mangal Dosha

२३) कुंडलीतील द्वितीय स्थानी मिथुन किंवा कन्या राशी असेल, व्यय स्थानी वृषभ किंवा कर्क राशी असेल, चतुर्थ स्थानी मेष किंवा वृश्चिक राशी असेल, सप्तम स्थानात मकर किंवा कर्क राशी असेल व अष्टम स्थानी धनु किंवा मीन राशी असेल तर मंगळाला दोष लागत नाही आणि कुंभ किंवा सिंह राशी अष्टमस्थानी असेल या स्थानी असलेल्या मंगळाला दोष लागत नाही.

२४) जन्म कुंडलीतील लगापासून किंवा चंद्रापासून किंवा शुक्रापासून अनिष्ट स्थानी असेल तर मंगळ मंगळाचे फळ मिळते.

२५) स्त्री पुरुष दोघांच्या जन्मकुंडलीत जर समान शक्तिमान मंगळ बाधक असेल तर तो मंगळ दांपत्याला कल्याणमय बनवतो.

२६) कुंडलीच्या रवि, चंद्र, बुध हे तीन ग्रह असतील, पंचमात गुरु असेल, द्वितीय स्थानी मंगळ असेल. षष्ठस्थानी शुक्र, सप्तमस्थानी शनि असेल तर अनिष्ट फले मिळतात. परंतु हेच विरोधी लग्नी असतील तर सर्व दोषांचा परिहार होतो.

२७) ज्या जातकाच्या कुंडलीत एकटा गुरु केंद्रात असेल किंवा शुक्र बुधासह असेल तर जसे ‘हरि स्मरणाने’ पापाचा नाश होतो तसेच केंद्रस्थ गुरु, शुक्र आणि बुध अकालजन्म सर्व दोषांचा परिहार करतात.

२८) मंगळ अस्तंगत असेल, नीच राशिगत असेल किंवा शत्रूक्षेत्री किंवा अष्टमस्थानी असेल त्या मंगळाला अष्टमजन्य दोष लागत नाही.

सर्व बारा लग्नात मंगळाचा दोष :- Mangal Dosha

१) मेष लग्नात मंगळ दुसऱ्या स्थानी असेल तर ‘मंगळ दोष’ होतो.

२) वृषभ लग्नाच्या प्रथम स्थानी म्हणजे लग्नी मंगळ असे तर ‘मंगळ दोष’ होतो.

३) मिथुन लगनात लग्नी, चतुर्थ स्थानी मंगळ असेल तर ‘मंगळ दोष’ होतो.

४) कर्क लग्नात आठव्या स्थानी मंगळ असेल तर ‘मंगळ दोष’ होतो.

५) सिंह लग्नी मंगळाचा दोषच लागत नाही.

६) कन्या लग्नी १,२,४,७ यापैकी एका स्थानी मंगळ असेल तर ‘मंगळ दोष ‘ होतो.

७) तुळ लग्नी १,१२ या पैकी एका स्थानी मंगळ असेल तर ‘मंगळ दोष ‘ होतो.

८) वृश्चिक लग्नी २,८ यापैकी एका स्थानी मंगळ असेल तर ‘मंगळ दोष’ होतो. ९) धनु लग्नी १,४,७ पैकी एका स्थानी मंगळ असेल तर ‘मंगळ दोष’ होतो.

१०) मकर लग्नी २,८ यापैकी एका स्थानी मंगळ असेल तर ‘मंगळ दोष’ होतो.

११) कुंभ लग्नी पहिल्या व दुसऱ्या स्थानात मंगळ असेल तर ‘मंगळ दोष ‘ होतो.

१२) मीन लग्नी १,४,७,१२ यापैकी एकास्थानी मंगळ असेल तर ‘मंगळ दोष ‘ होतो.

वरील प्रमाणे मंगळ दोषाचे नियम ज्योतिष शास्त्रात यत्रतत्र विखुरलेले आहेत. यावरुन हे स्पष्ट होते की ८०% कुंडल्यात मंगळ दोष असतो. म्हणून ‘मंगळाचा वाऊ’ करन घाबरण्याचे किंवा घाबरवण्याचे काम करु नये.

मंगळ दोष परिहार व अपवाद :- Mangal Dosha

१) कुंडलीत ‘मंगळ दोष’ पहाण्यासाठी लम व चंद्रापासून मंगळ शुक्राच्या स्थितिचा विचार करावा.

२) मुलगा व मुलगी यांच्या कुंडलीतील १,२,४,७,१२ यापैकी एका स्थानी मंगळ असेल तर ‘मंगळ दोष’ नसतो.

३) ज्या स्थानातील मंगळामुळे ‘मंगळ दोष’ लागतो. त्याच स्थानात कोठेही शनि असेल तर मंगळ दोष लागत नाही.

४) जर सप्तमस्थानाचा कारक ग्रह शुक्र पापग्रहाने ‘मंगळ दोष’ रहात नाही. युक्त किंवा दृष्ट नसेल तर

५) कुंडलीत शुक्र शुभ स्थितित असेल आणि त्यावर शुभ ग्रहांचा प्रभाव असेल तर ‘मंगळ दोष’ रहात नाही.

६) मंगळ धनस्थानी असेल व धनस्थान ची रास मिथुन किंवा कन्या असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

७) मंगळ सप्तमस्थानी कर्क राशीत असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

८) मंगळ चतुर्थस्थानी असेल व चतुर्थस्थानी मेष किंवा वृश्चिक राशी असेल तर ‘मंगळ दोष’ रहात नाही.

९) धनु किंवा मीन राशीचा मंगळ अष्टमस्थानी असेल तर ‘मंगळ दोष’ लागत नाही.

१०) वृषभ किंवा तुळ राशीचा मंगळ व्ययस्थानी असेल तर ‘मंगळ दोष’ नसतो.

११) राहू शुभ राशीत व शुभ ग्रहांबरोबर केंद्र त्रिकोणात असेल व मंगळाची दृष्टी त्यावर असेल तर ‘मंगळ दोष’ रहात नाही.

१) प्रभाव १:- Mangal Dosha

१२) सप्तमेश बलवान असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

१३) सप्तमस्थानी गुरु असेल तर ‘मंगळ दोष’ नसतो.

१४) सप्तमस्थानी शुक्र शनि असतील तर ‘मंगळ दोष’ रहात नाही.

१५) शुभ ग्रहाने युक्त तुळ राशीचा शुक्र मंगळास पहात असेल तर ‘मंगळ दोष ” रहात नाही.

१६) कुंडलीत चंद्र, गुरु, शनि व शुक्र बलवान असतील तर ‘मंगळ दोष’ रहात नाही.

१७) लग्नी मेष, सिंह, वृश्चिक किंवा मकर राशी असेल तर ‘मंगळ दोष’ नसतो.

१८) जर कुंडलीतील द्वितीय, चतुर्थ, सप्तम, अष्टम किंवा द्वादश स्थान यापैकी कोणत्याही स्थानी मेष, कर्क, सिंह किंवा वृश्चिक राशी असेल तर ‘मंगळ ‘दोष’ होत नाही.

१९) सप्तमेश ग्रह शुक्रा बरोबर असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

२०) १,४,५.७,९,१० यापैकी कोणत्याही स्थानी गुरु, शुक्र बलवान असतील तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

२१) सप्तमेश बलवान असून तो शुभ ग्रह दृष्ट असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

२) प्रभाव २:-Mangal Dosha

२२) मंगळावर शनिची दृष्टी असेल किंवा मंगळ शनिच्या युतीत असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

२३) कुंडलीच्या द्वितीय व सप्तमस्थानी बलवान शुभ ग्रह असतील तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

२४) लग्नी उच्चीचा शुभ ग्रह स्वगृहीचा असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

२५) बलवान शुक्र १,२, ४, ७, १२ या स्थानापैकी कोणत्याही स्थानी असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

२६) वृषभ, तुळ किंवा मीन राशिचा शुक्र कुंडलीच्या सहाव्या किंवा बाराव्या स्थानी असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

२७) जन्मराशीशी मैत्री असेल व गुणमेलनात ३० पेक्षा जास्त गुण मिळत असतील तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

२८) मंगळ शत्रूक्षेत्री किंवा अस्तंगत असेल तर ‘मंगळ दोषा’ चा विचार करु नये.

२९) धनस्थानी चंद्र-शुक्राची युती असेल तर ‘मंगळ दोष’ संपतो.

३०) केंद्रस्थानी चंद्र मंगळाची युती असेल तर मंगळ शांत होतो.

३१) बलवान गुरु लग्न किंवा सप्तमस्थानी असेल तर ‘मंगळ दोष’ रहात नाही.

३२) कन्येच्या कुंडलीत ज्या स्थानात मंगळ असेल मुलाच्या कुंडलीत त्याच स्थानात पापग्रह असेल तर ‘मंगळ दोष’ रहात नाही.

३) प्रभाव ३:- Mangal Dosha

३३) मेष राशीचा मंगळ लग्नी किंवा वृश्चिक राशीचा मंगळ चतुर्थस्थानात असेल किंवा मकरेचा मंगळ सप्तमस्थानी किंवा कर्केचा मंगळ अष्टमात किंवा धनु राशीचा मंगळ द्वादश स्थानी असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

३४) द्वितीय स्थानी चंद्र, शुक्र असतील, मंगळ गुरुची युती असेल किंवा मंगळ द्वादश स्थानी असेल तर ‘मंगळ दोष’ नसतो. ३५) केंद्र त्रिकोणात शुभ ग्रह व ३,६,८,११ या स्थानात पापग्रह अस ‘मंगळ दोष’ शांत होतो.

३६) कुंडलीत वक्री, नीच, अस्त किंवा शत्रूक्षेत्रीचा मंगळ १,४,७,८,१२ यापैकी ३७) मंगळ शुभ किंवा चंद्र मंगळ कुंडलीत एकाच स्थानात असतील तर ‘मंगळ एका स्थानी असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही. दोष’ होत नाही.

३८) चंद्र १.४,७,१० स्थानी असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही. (३९) राहू दशमस्थानी असेल व शनि एकादश स्थानी असेल, शनि लग्नापासून १, ४, ७, ८, १२ यापैकी एका स्थानात असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

४०) लग्नापासून गुरु १,४,५,७,९,१० यापैकी एका स्थानात असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

४१) शनि, मंगळ एकत्र असतील किंवा मंगळावर शनिची पूर्ण दृष्टी असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

४२) राहू अष्टमस्थानी असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

४३) मेप किंवा सिंह लग्नाला ‘मंगळ दोष’ लागत नाही.

४४) मंगळ रवि बरोबर अस्तंगत असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

४५) वधूच्या कुंडलीत ज्या राशिचा चंद्र असेल त्याच राशीचा मंगळ वराच्या कुंडलीत असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

४) प्रभाव ४ :_-Mangal Dosha

४६) शनि व मंगळ एकत्रित कुंडलीच्या १, २, ४, ७, ८,१२ यापैकी एका स्थानात असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

४७) कुंडलीत मंगळ-शुक्राची युति किंवा दृष्टी असल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

४८) कर्क लग्नाला मंगळाचा दोष लागत नाही.

४९) सिंह लग्नाला मंगळाचा दोष लागत नाही.

५०) वृषभ लग्नाच्या कुंडलीत ४ किंवा १२ किंवा १ स्थानात मंगळ असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

५१) तुळ लग्नाच्या कुंडलीत १,४ किंवा १२ व्या स्थानी मंगळ असेल तर ‘मंगळ दोष’ लागत नाही.

५२) कुंडलीत राहू १,४,७,१० या स्थानी असेल तर ‘मंगळ दोष’ लागत नाही.

५३) मंगळ राहूची युती कुंडलीच्या कोणत्याही स्थानी असेल तर ‘मंगळ दोष’ लागत नाही.

५४) मंगळ मेष, कर्क, तुळ व मकर या चार राशीपैकी एका चर राशीत असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

५५) मंगळ सिंह किंवा कुंभ राशीत असेल तर ‘मंगळ दोष ‘ होत नाही.

५६) कुंडलीत मंगळाच्या माध्यमातून ‘रुचकयोग’ होत असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

५७) मंगळ अश्विनी, मद्या किंवा मूळ नक्षत्रात असेल तर ‘मंगळ दोष’ होत नाही.

कुंडलीत ‘मंगळ दोष’ नसतानाही, मंगळाचा अमंगल प्रभाव कां होतो. ?

१) ज्यावेळी घराची जमीन ३,८ किंवा १८ कोणी असेल तर मंगळाचा अमंगळ प्रभाव त्या घरावर व त्यांत रहाणाऱ्यावर होतो.

२) घरात तळघर बंद केलेले असेल किंवा तळ घर व विहिर जवळ जवळ असतील तर मंगळाचा अमंगळ दोष उत्पन्न होतो.

३) घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेस असेल तर मंगळाचा अमंगळ प्रभाव होतो.

४) घराबाहेर पडताना अग्नि डाव्या व पाणी उजव्या बाजूस असेल तर मंगळाचा अमंगल दोष उत्पन्न होतो.

५) घरावर झाडाची सावली असेल, अंगणात किंवा घराच्या पिछाडीला बोराचे किंवा कीकरचे झाड असेल तर मंगळाचा अमंगल प्रभाव निर्माण होतो.

६) घराच्या भिंतीत किंवा घराला लागून पींपळाचे झाड असेल किंवा कापले गेलेले पींपळाचे झाड समोर किंवा बरोबर असेल तर अमंगळ मंगळाचा प्रभाव होतो.

७) घराच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला अग्निशी संबंधित काम सुरु असेल भडभुंजाची भट्टी, बेकरी, हलवाईचे दुकान, भट्टीवाला कारखाना किंवा स्मशान घाट घराला लागून असेल तर मंगळाचा अमंगळ प्रभाव त्या घरावर किंवा त्या घरातील लोकांवर पडतो.

प्रभाव :-

८) संतती नसलेल्याकडून जमीन किंवा घर खरेदी केली असेल किंवा फुकटात मिळाली असेल व त्यांत रहात असतील तर त्यांच्यावर मंगळाचा अमंगळ प्रभाव असतो.

९) घराच्या दक्षिण दिशेला खिडक्या, दरवाजे किंवा प्रकाशासाठी झरोखा असेल तर किंवा घरावर सरळ हवा येत असेल तर मंगळाचा अंमंगल प्रभाव त्या घरावर पडतो.

१०) सडक किंवा गल्लीच्या रस्त्यावर छत बनवून घर बांधले असेल तरी सुध्दा त्या घरावर व त्यांत रहाणाऱ्यांवर मंगळाचा अमंगल प्रभाव पडतो.

११) विहिरीवर आच्छादन किंवा विहिर बुजवून त्यावर बांधलेल्या घरावर मंगळाचा अमंगल प्रभाव पडतो.

१२) जातक चैनबाज असेल तर त्याला कमी अक्कल असेल व कमी अफलेवा जातक आयुष्यभर गुलामीत राहिल.

ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,

मार्गदर्शन :-

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!

अश्याच नवनवीन लेख ची सूचना आपल्याला वेळोवेळी मिळत राहावी या साठी खालील WhatsApp वर क्लिक करावे.

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित 
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997 9423270997 
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन, (संतती समस्या विशेतज्ञ)
सामुद्रिक ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ , व्यसन मुक्ती औषध तज्ञ
( दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!