Marriage Matching 2025: लग्न कुंडली कशी पाहावी, कसा पहावा विवाह योग; कोणत्या स्थानामध्ये जुळून येतो विवाह योग.. Best 50 Positive And Negative

Marriage Matching 2025

Marriage Matching 2025: लग्न कुंडली कशी पाहावी, कसा पहावा विवाह योग; कोणत्या स्थानामध्ये जुळून येतो विवाह योग.. Best 50 Positive And Negative

Marriage Matching 2025 : कोणत्या स्थानामध्ये जुळून येतो विवाह योग मराठी ज्यावेळी मुलींच्या कुंडलीमध्ये चलित गुरूचे भ्रमण हे तिच्या जन्मगुरूवरून होते तेव्हा ती समंजस होते आणि पुरूषाच्या कुंडलीमध्ये हेच भ्रमण जेव्हा जम्नराहूवरून होते तेव्हा विवाह योग संभवतो. लवकर अथवा उशीरा विवाह ही काळ, जाती, समाजानुसार वेगवेगळे असू शकते.

(मुलाचं अथवा मुलीचं लग्नाचं वय झालं की, लग्न कधी होणार, प्रेमविवाह की ठरवून, जोडीदार कसा असेल असे अनेक प्रश्न घरच्यांच्या आणि मुलामुलींच्याही मनात रुंजी घालायला लागतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी भविष्यात डोकावण्याचा मार्ग म्हणजे ज्योतिष दिशादिग्दर्शन करणा–या या शास्त्राच्या दृष्टीकोनातून ‘लग्न’ या विषयाचा निरनिराळ्या महत्वाच्या बाबींचा घेतलेला वेध या अंकात देत आहोत.)

लग्न कुंडली आणि राशी कुंडली म्हणजे काय.?

हा बहुसंख्य लोकांना नेहमीच पडणारा प्रश्न. याविषयी अगदी ढोबळमनाने सांगायचे तर- राशीकुंडली ही व्यक्तीच्या जन्माचे वेळी जी रास असते त्या राशीची कुंडली असते. जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती जन्मणा–या व्यक्तीची रास असते. कुंडलीतील प्रथम स्थानात ती रास अंकरुपाने मांडलेली असते व त्या राशीपासून पुढील अंक कुंडलीच्या द्वितीय, तृतीय याप्रमाणे पुढील स्थानात क्रमाने मांडलेले असतात, चंद्र सुमारे सव्वादोन दिवस एका राशीत असतो.

जन्म झाल्यावेळी तो ज्या राशीत असेल ती त्या व्यक्तीची जन्मरास वा चंद्ररास असते. मेष ते मीनपर्यंत बारा Marriage Matching 2025 राशी पूर्वकडून पश्चिमेकडे ‘जायंट व्हिल’ प्रमाणे गोल फिरत असतात. प्रत्येक रास पूर्व क्षितिजावर सुमारे दोन तास असते. या दोन तासात जन्म झाला असता ती रास त्यावेळी जन्मणा–याचे लग्न असते. लग्नकुंडली मांडताना प्रथमस्थानात त्या राशीचा अंक मांडून पुढील स्थानात क्रमाने राशीचे अंक मांडलेले असतात. भविष्य वर्तविताना लग्नकुंडलीलाच जास्त महत्व असते. ज्यांना जन्मवेळ निश्चित माहीत नसते त्यांना राशी कुंडलीशिवाय पर्याय नसतो.

लग्न कुंडली :- Marriage Matching 2025

लग्नकुंडली म्हणजे व्यक्तीच्या जन्माचे वेळी पूर्व क्षितीजावर जी रास असते ती रास म्हणजे त्या व्यक्तीचे जन्मलग्न असते. लग्नकुंडलीचा आपण ज्याला ‘लग्न’ अथवा विवाह म्हणतो त्याच्याशी तसा काही संबंध नाही. मेष ते मीनपर्यंत Marriage Matching 2025 बारा राशी पूर्वकडून पश्चिमेकडे ‘जायंट व्हिल’ प्रमाणे गोल फिरत असतात. प्रत्येक रास पूर्व क्षितिजावर सुमारे दोन तास असते. या दोन तासात जन्म झाला असता ती रास त्यावेळी जन्मणा–याचे लग्न असते. लग्नकुंडली मांडताना प्रथमस्थानात त्या राशीचा अंक मांडून पुढील स्थानात क्रमाने राशीचे अंक मांडलेले असतात.

भविष्य वर्तविताना लग्नकुंडलीलाच जास्त महत्व असते. ज्यांना जन्मवेळ निश्चित माहीत नसते त्यांना राशी कुंडलीशिवाय पर्याय नसतो. लग्नकुंडली व राशीकुंडली म्हणजे काय आहे हे आपण बघितले. आता सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विवाह या विषयाची आपण माहिती करुन घेऊयात. विवाह केव्हा होईल ? जोडीदार कसा असेल ? दूरचा की जवळचा, वैवाहिक सौख्य लाभेल का ? असे अनेक प्रश्न मुला-मुलींच्या तसेच त्यांच्या पालकांच्या मनात सतत येत असतात.

Marriage Matching 2025

काही महत्वाच्या गोष्टी –

  • १) ‘लग्न’ या विषयावर विचार करताना मुलाच्या कुंडलीत चंद्र-शुक्र तर मुलीच्या कुंडलीत रवि-शुक्र हे महत्वाचे ग्रह असतात.
  • २) शनि, मंगळ आणि राहू हे ग्रह विवाहाला विलंब करतात. विवाहसौख्यात बाधा आणतात.
  • ३) गुरु ग्रह नेहमीच शुभ असतो. कुंडलीतील त्याच्या स्थितीवर वैवाहिक सौख्य अवलंबून असते.
  • ४) सप्तमस्थानात जी रास असते त्या राशीचा ग्रह हा वैवाहिक बाबतीत महत्वाचा ग्रह असते. उदा. सप्तम स्थानात कन्या रास असेल तर त्या राशीचा ग्रह बुध हा महत्वाचा ठरेल.
  • ५) ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नसला तरी राशी आणि ग्रह यांची अगदी थोडीतरी माहिती असणे योग्य ठरते.
  • ६) मेष ही मंगळाची, वृषभ ही शुक्राची, मिथुन ही बुधाची, कर्क ही चंद्राची, सिंह ही रविची, कन्या ही बुधाची,
  • तूळ ही शुक्राची, वृश्चिक ही मंगळाची, धनु ही गुरुची, मकर आणि कुंभ शनिच्या आणि मीन ही गुरुची रास आहे.

का होतो विवाहाला विलंब :- Marriage Matching 2025

विवाहाला विलंब Marriage Matching 2025 होण्यात शनि, मंगळ आणि राहू यांचा हात असतो. शनि प्रथमस्थानी, पंचमस्थानी, सप्तमस्थानी किंवा दशमस्थानी असता, मंगळ प्रथमस्थानी, चतुर्थस्थानी, सप्तमस्थानी, अष्टमस्थानी किंवा बाराव्या स्थानी असता, तसेच राहू प्रथमस्थानी किंवा सप्तमस्थानी असता विवाहाला विलंब होतो. अनेक वेळा आपण पाहतो की, घरात सर्व सुख आहे. मुलगा वा मुलगी अत्यंत चांगले आहेत. नोकरी, पैसा, घर सर्व काही आहे मात्र विवाह योग जुळून येत नाही. मग असे का असाही प्रश्न पडतो.

विवाहाला विलंब होण्यासाठी मंगळ, शनि आणि राहू या तीन ग्रहांचा त्रास असतो. एखाद्या व्यक्तीच्या लग्न कुंडलीत प्रथमस्थानी, पंचमस्थानी वा सप्तमस्थानी अथवा दशमस्थानी शनि असेल अथवा प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम किंवा बाराव्या स्थानी मंगळ असेल, तसंच राहू प्रथम स्थान वा सप्तम स्थानात असेल तर विवाह जुळण्यास हमखास विलंब होतो. त्याचप्रमाणे एखाद्याच्या पत्रिकेमध्ये शनिदोष असेल तर अशा व्यक्तीचा विवाह हा वयाच्या तिशीनंतरच होतो.

Horoscope Matching for Marriage

मंगळदोष असल्यास, 28 व्या वर्षानंतर लग्नाचे योग Marriage Matching 2025 असतात. तर राहूचा दोष असेल तर 32-35 वयापर्यंत वाट पाहावी लागते. कधीकधी तर अशा व्यक्तींचे विवाहच होत नाहीत.  सप्तमस्थानामध्ये रवि, मंगळ, शनि वा राहू असेल तर विवाहाला विलंब होतोच. अनेक अभ्यासावरून हे सिद्ध झाले आहे. तसंच महिलांच्या कुंडलीमध्ये रवि – शनि, रवि – मंगळ अथवा रवि आणि राहू अशा जोड्या असतील तर हमखास उशीरा विवाह होतो.

तर पुरूषांच्या कुंडलीमध्ये चंद्र – मंगळ, चंद्र – राहू अथवा चंद्र – शनि अशी जोडी बनली असेल तर विवाह जुळण्यास विलंब होतो.

Marriage Matching 2025

असमाधानकारक विवाह :- Marriage Matching 2025

  • १) विवाहाला विलंब लावणा–या योगाबरोबरच सप्तमात असणा–या राशीचा ग्रह सहाव्या, आठव्या किंवा बराव्या स्थानी असता.
  • २) सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानातील राशींचे ग्रह सप्तम स्थानात असता वा सप्तम स्थानाच्या राशीच्या ग्रहाबरोबर इतर कुठल्या स्थानात असता विवाह असमाधानकारक ठरतो.
  • ३) पुरुषाच्या कुंडलीत चंद्र, शुक्र हे मंगळ, शनि किंवा राहुबरोबर असता मनाप्रमाणे विवाहसौख्य मिळत नाही.
  • ४) स्त्रीच्या कुंडलीत रवि, शुक्र हे मंगळ, शनि किंवा राहूबरोबर असता मनाप्रमाणे विवाहसौख्य मिळत नाही.

विवाहात जुळण्यात मंगळाची भूमिका :-

वैवाहिक Marriage Matching 2025 बाबतीत मंगळ हा ग्रह खलनायकाची भूमिका बजावत असतो. मंगळ हा ग्रह प्रथमस्थानी, चतुर्थस्थानी, सप्तमस्थानी, अष्टमस्थानी आणि बाराव्या स्थानी असता ‘मंगळाची कुंडली आहे’ असे समजले जाते. त्याचे हे वास्तव्य त्रासदायक असेच असते. त्यामुळेही विवाहाला उशीर होतो. मंगळ पाहण्याची आवश्यकता नाही, त्याचा फार बाऊ करु नये असे जरी मानले तरी वरील स्थानी मंगळ असता त्याचा अनुभव त्रासदायक असाच येतो. विवाह २८ वयानंतर होतो. लग्नाला उशीर होणे, लग्नात अडचणी येणे, ठरलेला विवाह मोडणे. प्रेमसंबंध फिसकटणे, लग्नानंतर मतभेद होणे, गृहसौख्यात कटकटी असे योग संभवतात. मंगळ पाहताना दुराग्रही भूमिका ठेवण्याची आवश्यकता नसली तरी त्याच्या फलिताची कल्पना अवश्य असावी.

विवाह योग कसा कळतो :- Marriage Matching 2025

विवाहयोग्य Marriage Matching 2025 अर्थात लग्नयोग नक्की कसा बघावा अथवा तो कसा कळतो हा प्रश्न प्रत्येकालाच असतो. पण ज्योतिषशास्त्रात त्याचे काही आराखडे असतात.  त्यानुसार लग्नयोग पाहिला जातो. तुम्हालाही याची माहिती आम्ही देत आहोत.  महिलांच्या कुंडलीत रवि – गुरू एकत्र असतील, रवि हा गुरूपासून पाचव्या अथवा सातव्या स्थानात असेल तर विवाह होतो. तसेच शनि, मंगळ, राहू यापैकी कोणत्याही ग्रहाचा दोष पत्रिकेत नसेल तर लग्नयोग लवकर म्हणजे योग्य वयात होतो.

पुरुषाच्या कुंडलीत चंद्र आणि गुरू एकत्र असतील आणि चंद्र गुरूपासून पाच अथवा सातव्या स्थानात असेल तर त्याचा लग्नयोग Marriage Matching 2025 जुळून येतो. लवकर अथवा उशीर विवाह होण्याचे योग हे देश, काळ, जाती आणि समजानुसार बदलू शकतात. पण हा योग असतो.  त्या कालावधीत तुम्ही लग्न करू शकता. गोचरीचा गुरू जेव्हा प्रथम, तृतीय, सप्तम अथवा एकादश स्थानामध्ये असतो त्यावेळी लग्नयोग जुळून येतो. त्याचवेळी चंद्र, रवी, शुक्र याचा गुरूशी शुभयोग होत असतो अशी परिस्थिती असेल तेव्हा लग्नयोग जुळून येण्याची दाट शक्यता असते.

लग्न कुंडलीत विवाह मोडणे किंवा घटस्फोट होईल हे कसे बघावे

लग्न भविष्य मराठीत आपण वाचत असतो. सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे विवाह Marriage Matching 2025 मोडणे अथवा घटस्फोटाची. पूर्णपणे नातं विस्कळीत होणे म्हणजे शेवटची पायरी अर्थात घटस्फोट घेणे. पण हे नक्की का घडते. अर्थात याला माणसाचे स्वभाव, परिस्थिती कारणीभूत असते. पण सर्वात मोठा ग्रह कारणीभूत ठरतो, तो म्हणजे हर्षल. तुमच्या कुंडलीमध्ये हर्षल हा ग्रह सप्तमस्थानात अथवा प्रथमस्थानात असेल तर हमखास विवाह मोडतो. त्याचप्रमाणे कुंडलीमध्ये कोणत्याही स्थानावर चंद्र – हर्षल, रवि – हर्षल एकत्र असतील अथवा समोरासमोर असतील तर घटस्फोटाची शक्यता नाकारता येत नाही. या युतीमुळे विवाहामध्ये फसवणूक, मतभेद, चढउतार सगळ्याला दोन्ही व्यक्तींना सामोरे जावे लागते.

याशिवाय जर कुंडलीमध्ये खालील युती असेल तर विवाह मोडतो.

  • १) लग्नामध्ये शनी – हर्षल युती
  • २) शुक्र वक्री असल्यास, चंद्र – शनि – मंगळ युती 
  • ३)शुक्र केंद्रयोग शनि – हर्षल युती 
  • ४)सप्तम स्थानात केतू, हर्षल वक्री 
  • ५)पाप नक्षत्रामध्ये रवि आणि मंगळ ग्रहाची युती 
  • ६)सप्तम स्थानात मंगळ – नेपच्युन – केतू एकत्र 
  • ७)लग्न स्थानात शनि आणि नेपच्युन युती, धन स्थानामध्ये वक्री मंगळ, शुक्र – हर्षल युती

लग्न कुंडलीत प्रेमविवाहाची स्थिती आहे कसे समजते – Marriage Matching 2025

प्रत्येकालाच आपला प्रेमविवाह Marriage Matching 2025 व्हावा असे वाटत असते. पण त्यासाठी कुंडलीत तसे ग्रहही असावे लागतात. त्यासाठी पाचवे आणि सातवे स्थान महत्त्वाचे आहे. चंद्र – गुरू, रवि – गुरू यांचा शुभयोग असल्यास, प्रेमविवाह होण्याची दाट शक्यता असते. तसेच यांचा विवाह टिकून राहातो. यासाठी पाचवे आणि सातवे स्थान एकमेकाला पूरक असणे अत्यंत आवश्यक मानले जाते.  लग्न केल्यानंतर आपला संसार सुखाचा व्हावा असं सगळ्यांनाच वाटत असतं.

चंद्र – गुरू, रवि – गुरू, सप्तमस्थानाचा ग्रह आणि गुरू यांचा शुभयोग असेल तर त्या व्यक्तींचे विवाह सुखकारक होतात. वैवाहिक जीवनात कोणतेही वादळ येत नाही. ज्या स्थानात गुरू आहे त्यापासून पाचवे, सातवे आणि नववे स्थान इथे रवि, चंद्र अथवा सातव्या स्थानाचा ग्रह असल्यास, शुभयोग जुळून येतो.

नक्की कसे होते गुण मिलन – Marriage Matching 2025

लग्न कुंडली Marriage Matching 2025 कशी पहावी हे जाणून घेताना एकूण आठ गोष्टी असतात आणि याला वेगवेगळे गुण देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या पत्रिकेत ज्याप्रमाणे त्याचे गुण असतात त्यानुसार त्यांचे मिलन करण्यात येते. प्रत्येकाचे वर्ण, गण, नाडी, तारा या सर्व गोष्टी वेगळ्या असतात आणि गुणही वेगळे असतात. त्यानुसार ज्योतिषशास्त्र अभ्यास करून याचे गुणमिलन करतात.कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये आठ प्रकारचे गुण आणि अष्टकूटचे मिलन करण्यात येते. ते गुण कसे असतात ते बघूया.

  • १) वर्ण – जातीचे मिलन – 1 गुण
  • २) वैश्य – आकर्षण – 2 गुण
  • ३) तारा – अवधी – 3 गुण
  • ४)योनी – स्वभाव आणि चरित्र – 4 गुण
  • ५) मैत्री – एकमेकांमधील समज – 5 गुण
  • ६) गण – मानसिक क्षमता – 6 गुण
  • ७)भकोत – दुसऱ्याला प्रभावित करण्याची क्षमता – 7 गुण
  • ८)नाडी – संतानजन्म – 8 गुण

विवाह केव्हा होईल – Marriage Matching 2025

पुरुषाच्या बाबतीत चंद्र-गुरु एकत्र असता तसेच चंद्र गुरुपासून पाच किंवा सातव्या स्थानात असता. स्त्रियांच्या बाबतीत रवि-गुरु एकत्र, रवि गुरुपासून पाचव्या किंवा सातव्या स्थानात असता होऊ शकतो. शनि, मंगळ, राहू यांच्यापैकी कशाचा दोष नसेल तर विवाहयोग Marriage Matching 2025लवकर म्हणजे योग्य वयात येतो. स्त्रीच्या कुंडलीत ज्यावेळी चलित गुरुचे भ्रमण तिच्या जन्मगुरुवरुन होते त्यावेळी ती समंजस होते.

तसेच पुरुषाच्या कुंडलीत ज्यावेळी चलित गुरुचे भ्रमण त्याच्या जन्मराहूवरुन होते त्यावेळी हा योग येतो. लवकर किंवा उशीरा विवाह याची वयोमर्यादा देश, काल, जाती, समाजानुसार वेगवेगळी असू शकते. ती एकदा निश्चित झाल्यावर गोचर गुरुच्या भ्रमणावरुन त्याचा कालनिर्णय करता येतो. गोचरीचा गुरु ज्यावर्षी प्रथम, तृतीय, सप्तम किंवा एकादशस्थानी येतो, त्यावर्षी विवाहयोग संभवतो. त्याचवेळी जर चंद्र, रवि, शुक्र वा सप्तमस्थानाच्या राशीचा ग्रह यांच्याशी गुरुचा शुभयोग होत असेल तर विवाह होण्याची दाट शक्यता असते.

जोडीदाराचे रंग रुप – Marriage Matching 2025

जोडीदार दिसायला Marriage Matching 2025 कसा असेल हा तर प्रत्येकाच्याच मनातील सर्वात औत्सुक्याचा प्रश्न असतो. या करिता सप्तमस्थानातील राशी, सप्तमस्थानातील ग्रह यांचा विचार करावा लागतो. ग्रहांच्या स्वभावगुणधर्माप्रमाणे सहचराचे स्वभावगुण असतात आणि राशीप्रमाणे शरीरबांधा असतो. सप्तमस्थानी ज्या ग्रहाची रास असते त्या ग्रहाच्या वर्णनाप्रमाणे जोडीदाराचे वर्णन असते. किंवा एखादा ग्रह जर त्या स्थानात असेल तर त्या ग्रहाप्रमाणे त्याचे वर्णन असते. याकरिता प्रत्येक ग्रहाचा बारकाईने अभ्यास असणे आवश्यक आहे.

थोडक्यात सांगायचे तर, सप्तमस्थानी मंगळाची रास वा मंगळ असता किंवा मंगळ असता भांडखोर, तापट, अरेरावी करणारा, वाद घालणारा, हट्टी, तामसी, विषयासक्त, वर्चस्व गाजवणारा, उच्छृंखल स्वभावाचा, तांबूल किंवा कृष्णवर्णी असा जोडीदार असतो. शुक्राची रास किंवा शुक्र ग्रह असता देखणी, प्रेमळ, शौकिन, कलावान, आनंदी, समंजस, कदर करणारा, शांत स्वभावाचा, उत्तम व्यक्तिमत्वाचा, आधुनिकतेची आवड असणारा असा जोडीदार असतो. विवाहयोग लवकर येतो. राहू, मंगळ, किंवा हर्षल याच्या कुयोगात असता प्रेमभंग, विभक्तपणा असे प्रसंग येतात. बुधाची रास किंवा बुध ग्रह असता चतुर, विश्र्वासू, हसतमुख, व्यवहारदक्ष, बोलका, बुद्धिमान,

स्वभाव :- Marriage Matching 2025

विनोदी स्वभावाचा, सतत हसत बोलणारा, सर्वांशी मिळून मिसळून वागणारा, Marriage Matching 2025 प्रेम करणारा, हलका कानाचा, उंचीने मध्यम, गुणी असा जोडीदार असतो. चंद्राची रास किंवा चंद्र असता चंचल स्वभावाचा, भावनावश, प्रेमळ, लहरी, कलावान, अनेक गोष्टींची आवड असलेला, सर्वांशी मिसळून राहणारा, समाजकार्याची आवड असणारा, संसारदक्ष, प्रसिद्ध प्रवासाची आवड, गौरवर्णी, छानछौकीने राहणारा, दिसण्यास आकर्षक असा असतो. विवाहयोग लवकर येतो.

रविची रास किंवा रवि ग्रह असता मानी, गर्विष्ठ, तडफदार, रुबाबदार, हुकमत गाजवणारा, स्वाभिमानी, दुस–याला मदत करणारा, अन्यायाची चीड असणारा, एकमेकांविषयी आकर्षण कमी असलेला, उच्च घराण्यातील असतो. विवाहयोग उशीरा येतो. शुभग्रहांची साथ असता विवाह सुखावह होतो. गुरुची रास किंवा गुरु ग्रह असता विद्वान, प्रेमळ, हुशार, धार्मिक-सात्विक वृत्तीचा, ज्ञानी, ज्ञानदान करणारा,

समाजकार्याची आवड असणारा, समंजस, शांत स्वभावाचा, Marriage Matching 2025 व्यवहारी, आदरणीय व्यक्तिमत्वाचा असा असतो. स्वभावभिन्नतेमुळे आकर्षण कमी राहते. गुरुच्या दृष्टीत असता विवाह लवकर होतो. शनिच्या दृष्टीत असता विवाह उशीरा होतो. सप्तमस्थानी शनिची रास किंवा शनि असता अत्यंत धूर्त, कावेबाज, विश्र्वासास अपात्र, कर्तव्यनिष्ठ, कष्टाळू, सोशिक स्वभावाचा,

हवतेत मनोरे बांधणारा, हलक्या कानाचा, राजकारणाची आवड असणारा असा जोडीदार असतो. विवाह उशीरा होतो. विवाहसौख्य साधारण मिळते. वर वर्णन केलेल्या स्वभावर्णनाचा अनुभव विशेषत: सप्तमस्थानी राशीपेक्षा ग्रह असता विशेष येतो. शनि बिघडला असता विषयवासना कमी असलेला वा नपुसंक सहचर असतो.

घटस्फोट – Marriage Matching 2025

पूर्णपणे विस्कळीत झालेले विवाहजीवन म्हणजे घटस्फोट ! या बाबतीत महत्वाची भूमिका बजावणारा ग्रह म्हणजे हर्षल. सुरुवातीला उल्लेख केलेले काही कुयोग असून जर हर्षल हा ग्रह सप्तमस्थानी किंवा प्रथमस्थानी असेल, तसेच कुंडलीत कोणत्याही स्थानी चंद्र-हर्षल, रवि-हर्षल, एकत्र किंवा समोरासमोर असतील तर घटस्फोटाची दाट शक्यता असते. या योगामुळे विवाहाच्या बाबतीत नाटयपूर्ण घटना, मतभिन्नता, फसवणूक इत्यादी घटना संभवतात.

Marriage Matching 2025

मार्गदर्शन :-

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण  shreesevaprathishthan@gmail.com या वर मला Email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित 
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी )
+91 94202 70997 – +91 94232 70997 
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,
संतती समस्या विशेतज्ञ
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ,
व्यसन मुक्ती औषध तज्ञ
( दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)

Share someone who needs a little cosmic boost in their life!"

Facebook
X
LinkedIn
Telegram
WhatsApp

मार्गदर्शन : -

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा लेख आवडला असेल आणि तो उपयुक्त वाटला असेल. कृपया आपल्या कुटुंब आणि मित्रांसह सामायिक करा.

अश्याच नवनवीन लेख ची सूचना आपल्याला वेळोवेळी मिळत राहावी या साठी खालील WhatsApp / Telegram वर क्लिक करावे.

Recent Post

Daily Horoscope 29 March 2025

Daily Horoscope 29 March 2025: आजचे राशी भविष्य २९ २०२५: मिथुन राशी आर्थिक लाभ; मेष राशी लोकांना मिळणार नोकरी… कर्क राशी लोकांची वाढणार व्यावसायिक प्रतिष्ठा; सिंह राशी लोक करणार नवीन गाडी खरेदी; Best Positive And Negative

Read More »

Web Developer

error: Content is protected !!