Marriage Or Love Marriage, अंक ज्योतिषाच्या आधारे विवाह की प्रेमविवाह! प्रेम विवाह योग किंवा परंपरेनुसार विवाह कसा पहावा? तुमचे आवडीच्या व्यक्तीशी लग्न होईल का?

Marriage Or Love Marriage
श्रीपाद गुरुजी

Marriage Or Love Marriage, अंकशास्त्र (Numerology) ही ज्योतिषशास्त्राचीच एक पूरक शाखा आहे. ज्यांना आपली कुंडली माहित नाही किंवा कुंडली बनविण्यासाठी लागणारी माहिती जन्मतारीख, जन्मवेळ व जन्मठिकाण या गोष्टी माहित नाहीत. फक्त त्यांना आपली जन्मतारीख माहित आहे.(Love Marriage Prediction by Numerology) अशांच्या सोईसाठी जन्मतारखेवरून मुलांक काढून त्या आधारे त्यांचा विवाह, प्रेमविवाह होईल का? व त्यांचे वैवाहिक जीवन कसे राहील या बाबतची माहिती या प्रकरणात देत आहे.

भाग्यांक काढण्याची सोपी पध्दत

भाग्यांक कसा काढावा. ? Numerology Number, Numerology Reading

काढण्याची अगदी सोपी पध्दत आहे. समजा तुमची जन्मतारीख १८- २-१९३३ आहे. ही जन्मतारीख पुढील प्रमाणे लिहा – १+८+२+१+९+३+३=२७. बेरीज सत्तावीस आली. (Numerology Calculator) पुन्हा २+७ = ९ बेरीज आली. (Life Path Number) ९ हा तुमचा भाग्यांक झाला.

जन्मतारखेच्या एक एक अंकात एक (My Numerology Number) एक अंक मिळवून जी बेरीज येईल त्याची पुन्हा बेरीज करावयाची व एकांक काढायचा. हा एकांक म्हणजेच भाग्यांक खालील उदाहरणे पहा. म्हणजे भाग्यांक कसा काढावयाचा ते चटकन लक्षात येईल. (Life Path Calculator)

  • १) जन्मतारीख ४-८-१९४२ आहे. या जन्मतारखेचा भाग्यांक काढावयाचा आहे. ४+८+१+९+४+२=२८. २+८=१०. १+०=१ भाग्यांक आला.
  • २) जन्मतारीख १-४-१९६८ आहे. या जन्मतारखेचा भाग्यांक काढावयाचा आहे. १+४+१+९+६+८=२९. २+९=११=१+१=२ भाग्यांक आला,
  • ३) जन्मतारीख ३१-१-१९५८ आहे. या जन्मतारखेचा भाग्यांक काढावयाचा आहे. ३+१+१+९+५+८=३०. ३+०=३ भाग्यांक आला.
  • ४) १-११-१९७२ या जन्मतारखेचा भाग्यांक काढावयाचा आहे. १+१+१+१+१९+७+२-२२. २+२०४ भाग्यांक आला.
  • ५) जन्मतारीख १०-१-१९६५ या जन्मतारखेचा भाग्यांक काढावयाचा आहे. १+०+१+१+१६+५०२३. २+३०५ भाग्यांक आता.
  • ६) जन्मतारीख १-११-१९७४ या जन्मतारखेचा भाग्यांक काढावयाचा आहे. १+१+१+१+९+७+४-२४. २+४०६ भाग्यांक आला.
  • ७) जन्मतारीख १-१-१९७६ या जन्मतारखेचा भाग्यांक काढावयाचा आहे. १+१+१+९+७+६=२५. २+५=७ भाग्यांक आला.
  • ८) जन्मतारीख १३-६-१९७८ या जन्मतारखेचा भाग्यांक काढावयाचा आहे. १+३+६+१+९+७+८=३५. ३+५=८ भाग्यांक आला.
  • ९) जन्मतारीख १९-१-१९३३ या जन्मतारखेचा भाग्यांक काढावयाचा आहे.

१+१+१+१+९+३+३=२७. २+७=९ भाग्यांक आला.(Numerology Calculator by Date of Birth) वरील उदारणांवरुन भाग्यांक १ ते ९ कसे काढायचे ते आता वाचकांच्या लक्षात आले असेलच. मुख्य गोष्ट म्हणजे एक अंकी संख्या येईपर्यंत बेरीज करावयाची हे लक्षात ठेवावे. आणखी एक महत्वाची गोष्ट भाग्यांक काढताना लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तारीख रात्री १२ नंतर बदलते. (Numerology Birthday) तुमचा जन्म जर रात्री १२ नंतर झाला असेल तर त्या दिवशी रात्री १२ नंतर बदलणारी जन्मतारीख घेऊन त्या तारखेचा भाग्यांक काढावा. रात्री १२ नंतर जन्म असेल आणि तुम्ही जर त्या दिवसाचीच (रात्री १२ पूर्वीची) तारीख घेतलीत तर तुमचा भाग्यांक बदलेल आणि तुमचे भविष्य चुकेल.

भाग्यांक १ :-

व्यक्ति बहुधा प्रेम प्रसंगापासून दूर रहातात. हे प्रेमप्रसंगासाठी उत्सूक नसतात परंतु विरुद्ध लिंगी यांचेकडे अधिक आकर्षित होतात. यांचे प्रेम पहिल्या दृष्टितच होत नाही तर प्रदीर्घ मुलाखती नंतरच होते. सौंदर्यापेक्षा जास्त महत्व हे विचारांना देतात. यामुळेच यांचे प्रेम हळूहळू वाढते. हे कायम प्रेमी असतात.(Numerology Chart) एकदा प्रेम केल्यावर हे मागे फिरत नाहीत. यांचे प्रेम अतूट असते व हे आपले प्रेम विवाहात परिवर्तित करू इच्छितात.

वाल्यांनी भाग्यांक १, २, ४, ७ या भाग्यांकवाल्या व्यक्तिशी प्रेम करावे. (Life Path Number Calculator) प्रेम वाढविण्यापूर्वी प्रियकर किंवा प्रेयसीला नीट पारखून घेणे आवश्यक आहे.(Numerology Predictions) भाग्यांक १ च्या व्यक्तीला प्रेमात धोका झाला तर ती व्यक्ति खूपच निराश होते. जीवनाशी असलेला त्यांचा मोह संपतो व ते संपूर्ण स्त्री जातिची किंवा पुरुष जातीची घृणा करायला लागतात. जर धोका खाल्ल्यानंतर ते त्यांतून सावरले गेले तर आपल्या जीवनात प्रगती करुन आपल्या घोखेबाज प्रेमीला दाखवून देतात की त्याने घेतलेला निर्णय चुकीचा होता.

स्त्री-पुरुषाने मुलांक १,२,४ व ७ या भाग्यांकाच्या व्यक्तीशी विवाह करावा. याचा विवाह बहुधा लवकर होतो. विवाहाला आई-वडिलांची संमत्ति असते. यांचा प्रेमविवाह असतानाही हे आपल्या मातापित्याची संमत्ति घेण्यावर विशेष भर देतात. भाग्यांक १ च्या व्यक्ति स्वतः चांगल्या विचारांच्या असतात आणि यांचा जोडीदार ही विचारवान, गुणवान व योग्यता प्राप्त असतो. सासरी यांना योग्य मान मिळतो.

भाग्यांक १ च्या लोकांचे वैवाहिक जीवन बहुधा सुखी असते. आपल्या जोडीदाराकडे हे विशेष लक्ष देतात परंतु अयोग्य मागण्या, सल्ला व विचार नाकारण्यातही हे मागे-पुढे पहात नाहीत. जोडीदाराच्या विचारांशी आपल्या विचारांचा समझोता करण्यात हे अयशस्वी ठरतात. यामुळे जीवनात पुष्कळ वेळा कटुता पेल्यातल्या वादळाप्रमाणे तात्पुरती असते.

भाग्यांक २ :-

च्या व्यक्ति चांगल्या प्रेमी असतात. ह्या प्रेम प्रकरणात उत्सुकतेमुळे पडतात. यांच्या मनांत विरुध्द लिंगी व्यक्तिबद्दल आकर्षण असते. पहिल्याच दृष्टीत प्रेम करुन बसतात. बऱ्याच वेळा यांचे प्रेम एक तर्फी असते. प्रेमातला दुसरा पक्ष या प्रेमाशी सहमत आहे किंवा नाही हे पहाण्याची यांना गरज भासत नाही. हे कल्पनालोकात प्रेम करुन बसतात आणि विचारातच प्रेमाच्या सुळीवर चढण्याची तयारी करतात. बऱ्याच वेळा प्रेमाचे किल्ले बांधण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे यांना प्रेमात निराशा हाती येते व हे बदनाम होतात.

च्या व्यक्तिचे कोणाबरोबर प्रेम झाले तर ते प्रेम शेवटपर्यंत निभवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रेमाच्या बाबतीत हे फारच हळवे असतात आणि आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीला अंत:करणापासून प्रेम करतात. प्रेमावर सर्व काही अर्पण करण्यास हे सदैव तयार असतात.

व्यक्ति प्रेमात अयशस्वी झाल्यावर काही काळानंतर पहिले प्रेम विसरुन दुसन्या प्रेमाकडे आगेकूच करतात पण जर यांना प्रेमात धोखा झाला तर हे इतके निराश होतात की आत्महत्त्या करण्यापर्यंत मजल जाते. जीवनाविषयी असलेला यांचा मोह संपतो आणि मादक द्रव्यांचे सेवन करु लागतात. काही वेळा तर हे वेडे होऊन जातात. प्रियकरांची प्रेमप्रकरणे एकापेक्षा अधिक असतात. विवाह झाल्यावरही हे दुसऱ्यांशी प्रेम करतात.

दोन च्या व्यक्तिंनी मूलांक १,२,४ व ७ या (Numerology Birth Date) भाग्यांकवाल्या व्यक्तिशी प्रेम करणे लाभप्रद ठरते. भाग्यांक २ च्या व्यक्तिंनी भाग्यांक १,२,४ आणि ७ हे भाग्यांक असलेल्या व्यक्तिशी विवाह करावा. बहुधा यांचा विवाह होतो. ह्यांच्या विवाहाला आई- वडिलांची असते. भाग्यांक २ च्या व्यक्तिंचा जोडीदार सुंदर व गुणवान असतो.

भाग्यांक २ च्या व्यक्तिंचे वैवाहिक जीवन बहुधा सामान्य असते. हे आपल्या जीवनसाथीच्या योग्य-अयोग्य सर्व मागण्या मान्य करतात व विचारांशी सहमत होतात. मनापासून या मागण्या व विचार त्यांना मान्य नसतानाही त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या या वृत्तिमुळे हे लोक आई-वडिल व भावा बहिणीशी वितुष्ट विकत घेतात. भाग्यांक २ चे लोक विवाहोत्तर प्रेम संबंध ठेवतात त्यामुळे यांच्या वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होते. परंतु ही कटुता काही काळाने संपुष्टात येते. घटस्फोटाची पाळी बहुधा येत नाही.

भाग्यांक ३ :-

हे व्यक्ति चांगल्या प्रेमी असतात. पहिल्याच दृष्टित हे प्रेम करीत नाहीत. अनेक वेळा भेटी-गाठी झाल्यावर यांच्या मनात प्रेमाची ज्योत पेटते. शारीरिक सौंदर्यापेक्षा विचारांच्या सुंदरपणाला हे फार महत्त्व देतात. हे प्रेमाच्या मामल्यात दुर्दैवी असतात. मोठया प्रयत्नांती यांना प्रेमात यश मिळते. (Numerology Compatibility) प्रेममार्गात यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. हे अडचणी प्रयत्नपूर्वक दूर करतात.

भाग्यांक ३ च व्यक्तीत प्रेमाची अभिव्यक्ति चांगली असते. ते विचार व हावभाव दोन्हीं तन्हेने हे आपले प्रेम व्यक्त करतात. प्रेमाची परिणती विवाहात व्हावी अशी यांची मनोमन इच्छा असते आणि त्यासाठी प्रयत्नशील असतात. हे कोणत्या ना कोणत्या तन्ऱ्हेने आपल्या प्रेमीशी विवाह करु इच्छितात. (Numerolog Love) मातापित्यांची सहमति ही या विवाहासाठी ते मिळवतात.

हे व्यक्तींनी ३.६.९ या भाग्यांकाच्या व्यक्तिशी प्रेम करावे. भाग्यांक ३ वाल्यांनी ३,६,९ या भाग्यांकाच्या व्यक्तिशी विवाह करावा. यांचा विवाह योग्य वयात होतो. यांचा विवाह मातापित्याचे सहमतीनेच होतो. जरी प्रेमविवाह असेल तर हे आपल्या मातापित्याची संपत्ति मिळवण्याचा प्रयत्न करतात. यांचा जीवनसाथी गुणवान व सुंदर असतो आणि यांच्या बाबतीत पूर्ण समर्पणाची भावना असते.

या व्यक्तिंचे वैवाहिक जीवन बहुधा सुखी असते. यांचा जोडीदार यांच्या विचारांच्या अनुकूलच वागतो. स्वतः आपल्या जीवनसाथीला समर्पित असतात परंतु आपले विचार त्यांच्या विचारांशी मिळवून घेत नाहीत. त्यामुळे जीवनात कटुता येते. पण ही कटुता तात्पुरती राहते. यांचे व्यक्तिंचे प्रेम स्थायी असते. एकदा प्रेम झाल्यावर ते हे शेवटपर्यंत निभावतात. प्रेमात धोखा झाल्यावर काही काळ हे विचलित अवश्य होतात पण नंतर स्वतःला सावरतात व घडलेला प्रसंग विसरुन जातात.

भाग्यांक ४ :- Marriage Or Love Marriage

चार च्या व्यक्ती विचित्र प्रकारच्या प्रेमी असतात. मागचा पुढचा विचार न करता है प्रेम करून बसतात. यांच्या प्रेमाला वस्तुतः काहीच आधार नसतो. हे प्रेमात अधिक सुंदरपणा पाहतात किंवा विचार व गुणांकडेही पाहतात. काही वेळा आपल्या पेक्षा कमी दर्जाच्या किंवा उच्च दर्जाच्या व्यक्तीशी प्रेम करतात. प्रेमाच्या बाबतीत विवाहित / अविवाहित याकडेही यांचे लक्ष नसते. यांचे प्रेम पहिल्या दृष्टीत होत नाही. बऱ्याच वेळा गाठी भेटी, बोलाचाली झाल्यानंतरच यांचा प्रेमसंबंध जुळतो.

प्रेमाच्या बाबतीत हे फार उतावळे असतात. यांच्या प्रेमाची अभिव्यक्ती विचित्र प्रकारे होते. शेरोशायरी, कविता, तत्वज्ञान आणि इतर कलात्मक पध्दतीने हे प्रेम व्यक्त करतात. ४ च्या लोकांना प्रेममार्गात खूप अडचणींना तोंड द्यावे लागते. यांनाण प्रेमात यश मिळणे फारच अवघड असते.यांच्या प्रेमाच्या कायम स्वरुपातही विचित्रतेचे अनुभव येतात. बऱ्याच वेळा यांचे प्रेम कायमस्वरुपी असते आणि बऱ्याच लोकांच्या बाबतीत अल्पकालिन प्रेम असते.

भाग्य ४ चे लोक प्रेमात अयशस्वी झाल्यावर नव्या प्रेम प्रसंगात अडकतात आणि धोखा खाल्ल्यावर तो प्रसंग विसरुन जातात. अविश्वासू प्रेमाचा यांच्यावर विशेष कुप्रभाव होत नाही.. भाग्यांक ४ च्या व्यक्तींनी १,२,४ व ७ वा भाग्यांकवाल्याशी प्रेम संबंध ठेवणे फायद्याचे ठरते.यांच्या प्रेमाच्या कायम स्वरुपातही विचित्रतेचे अनुभव येतात. बऱ्याच वेळा यांचे प्रेम कायमस्वरुपी असते आणि बऱ्याच लोकांच्या बाबतीत अल्पकालिन प्रेम असते.

भाग्या ४ च्या व्यक्तींनी आपला विवाह १,२,४, व ७ या भाग्यांकवाल्याशी करावा. यांचा विवाह एक तर लवकर किंवा मग खूप विलंबाने होतो. विवाहासाठी माता-पित्याची सम्मति विशेष महत्वाची नसते. जर यांना प्रेमविवाह करावयाचा असेल माता-पित्याची संगति शिवाय प्रेमविवाह करुन मोकळे होतात. भाग्यांक ४ वाल्यांचा जीवनसाथी सुंदर व गुणवान असतो.

भाग्यांक ४ च्या व्यक्तिंचे वैवाहिक जीवन सामान्य असते. आपल्या स्वभावामुळे हे आपले दांपत्यजीवन गढूळ बनवतात. परंतु ही कटुता अस्थायी स्वरुपाची असते. भाग्यांक ४ च्या जोडीदाराचे आरोग्य बहुधा कमकुवत असते.

भाग्यांक ५ :- Marriage Or Love Marriage

पाच वाल्या व्यक्ती चांगल्या प्रेमी असतात. हे प्रेम करायला स्वतः उत्सुक असल्या तरी एकदा प्रेम केल्यावर ते पूर्णपणे निभावतात. सुंदरते ऐवजी प्रेमळ विचारांना यांच्या लेखी फार महत्व असते. यांचे प्रेम सात्विक असते. हे आपल्या प्रेमीवर अंतःकरणाने प्रेम करतात. प्रेमात खूप भावनावश होतात. प्रेमीकडून थोडे जरी दुखावले गेले तरी हे विचलित होतात.यांचे प्रेम बहुधा स्थायी स्वरुपाचे असते. लहान सहान कारणावरून यांच्या प्रेमात चढ-उतार जरूर होतात.

भाग्यांक ५ च्या व्यक्ती प्रेमाला विवाहात परिवर्तित करु इच्छितात. यासाठी प्रयत्नही करतात परंतु यात अडचणी आल्यावर हा विचार सोडून देतात. भाग्यांक ५ वाल्यांनी ५ भाग्यांकांच्या व्यक्तिशी प्रेम संबंध जोडावा.५ भाग्यांकाचे व्यक्ती शेरोशायरी, कविता, बौध्दिक विचार इत्यादिद्वारे प्रेम व्यक्त करतात.

५ भाग्यांक वाल्यांनी ५ भाग्यांक वाल्याशीच विवाह करणे फायद्याचे ठरते. विवाह वयानंतर काहीशा विलंबाने यांचा विवाह होतो. बहुधा यांचा विवाह आईवडिलांच्या अनुमतीने होतो, प्रेम विवाह असला तरी आईवडिलांच्या संमत्तीवर हे जोर देतात. यांचे वैवाहिक जीवन सामान्य असते. आपल्या जोडीदाराकडे हे विशेष लक्ष पुरवतात.

तरी सुध्दा लहान सहान गोष्टीवरून बऱ्याचवेळी कटुता व तणाव पूर्ण स्थिती उत्पन्न होते. हे आपल्या जीवन साथीला आपल्याच विचाराने वागावययास लावतात. दांपत्य जीवनातील कटुतेचे हेच कारण असते. परंतु कटुता व गढुळपणा तात्कालीक असतो. यांचे वैवाहिक जीवन दिर्घायू असते.

भाग्यांक ६ :- Marriage Or Love Marriage

भाग्यांक ६ च्या व्यक्ती चांगल्या प्रेमी असतात. प्रेमासाठी हे स्वतः उत्सूक असतात. यांचे प्रेम मुख्यतः शारीरिक सुंदरतेवर अवलंबून असते. हे स्वतः सुध्दा सुंदर असतात. पहिल्या दृष्टित यांचे प्रेम जमते. विरुध्द लिंगाकडे हे स्वतः ही आकर्षित होतात व दुसऱ्यांनाही आकर्षित करतात. यांचे नटणे-मुरडणे विरुध्द लिंगीना आकर्षित करते. ६ च्या व्यक्ती कलात्मक रीतिने आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करतात. यांचे प्रेम भावूक व संवेदनशील असते.

यांचे प्रेम स्थायी असते तरी सुध्दा एका पेक्षा अधिक प्रेम प्रसंग यांच्या आयुष्यात येतात. विवाहोत्तर प्रेमाचीही शक्यता असते. भाग्यांक ६ वाले लोक आपल्या प्रेमीच्या बाबतीत संपूर्ण समर्पणाची भावना ठेवतात. आपले प्रेम विवाहात परिवर्तन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. परंतु या मार्गात असलेल्या अडचणींना भिऊन हा विचार सोडून देतात. एका प्रेमात यांना अपयश आले तर हे लगेच दुसन्याकडे वळतात.

जर प्रेमी प्रियकर किंवा प्रेयसीने यांचा विश्वासघात केला तर खूप त्रस्त होऊन लवकरच हा प्रेमसंबंध विसरुन दुसऱ्यांशी आपला प्रेमसंबंध जोडतात. भाग्यांक ६ च्या व्यक्तींनी ३, ६, ९ या भाग्यांकवाल्यांशी प्रेम करणे श्रेयस्कर राहते. भाग्यांक ६ वाल्या व्यक्तीने ३,६,९ या भाग्यांकांच्या व्यक्तीशी विवाह करावा. विवाहास योग्य वयात यांचा विवाह होतो. यांच्या विवाहाला माता-पित्याची अनुमति असते.

यांच्या बाबतीत प्रेमविवाह होण्याची शक्यता सुध्दा असते. यांचा जोडीदार सुंदर व गुणवान असतो. यांचे वैवाहिक जीवन सामान्यपणे सुखी असते. वैवाहिक जीवनात लहान मोठे मतभेद होतात. पण ते क्षणिक असतात. विवाहोत्तर प्रेम संबंध हे त्यांच्या दांपत्यजीवनातील कटुतेचे कारण असते.

भाग्यांक ७ :- Marriage Or Love Marriage

भाग्यांक ७ चे लोक चांगले प्रेमी असतात. प्रेम प्रकरणाची सुरुवात हे आपण हे होऊन करतात. यांचा प्रेमसंबंध एकापेक्षा अधिक वेळा भेटीगाठी झाल्यावर पक्का होतो. विरुध्द लिंगी व्यक्तिस आपणाकडे खेचण्यात हे समर्थ असतात.

७ च्या लोकांचे प्रेम शारीरिक व वैचारिक अशा दोन्हीं सुंदरतेवर आधारित असते. सुरवातीला आपल्या प्रेमपात्राला खूप महत्व देतात नंतर कालांतराने कमी महत्त्व देण्यास सुरुवात होते. आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती अत्यंत काळजीने हे करतात. बाहेर फिरावयास गेल्यावर घराबाहेर हे आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करतात.

प्रेमालापासाठी सरोवर किंवा सागर किनारा यांना जास्त पसंत पडतो. यांचे प्रेम बहुधा स्थिर असते. समर्पणाची भावना यांच्यात असते. आपल्या प्रेमाचे रुपांतर प्रेमविवाहात करण्याची उत्कंठा यांच्यात असली तरी या मार्गावर येणाऱ्या अडचणींचा विचार करुन हा विचार सोडून देतात. भाग्यांक ७ च्या व्यक्तींनी मूलांक १,२,४, व ७ यांच्याशी प्रेम करावे..

भाग्यांक ७ च्या लोकांनी भाग्यांक १, २, ४ व ७ या भाग्यांकाच्या स्त्री-पुरुषांबरोबर विवाह करावा. हा विवाह सुखकर होतो. यांचा विवाह विवाहयोग्य वयात होतो. आई वडिलांच्या मान्यतेनेच विवाह होतो. हे आपल्या जीवनसाथीच्या भाग्योदयाला करक उतात. विवाहानंतरच यांचा भाग्योदय होतो. यांचे वैवाहिक जीवन सरासरी असते. काही किरकोळ मतभेद वगळता एकूण वैवाहिक जीवन सुखी असते. हे आदर्श जोडपे म्हणून नावालौकिकाला येते.

भाग्यांक ८ :-Marriage Or Love Marriage

जे भाग्यांक ८ च्या व्यक्ती सरासरी प्रमाणातील प्रेमी असतात. हे बहुधा प्रेमाची स्वतः करीत नाहीत. परंतु विरुध्द बाजूकडून प्रेमाचा इशारा मिळताच प्रेमासाठी भूतासारखे मागे लागतात. प्रेम मिळविण्यासाठी वाट्टेल ते करण्यास हे तम्रार असतात. यांचे एकापेक्षा अधिक प्रेमसंबंध असतात. प्रेमप्रकरणात यांना फारसा लाभ मिळत नाही.

प्रेमप्रकरणात अपयशी ठरल्यावर किंवा प्रियकर किंवा प्रेयसीकडून धोखा खाल्ल्यावर यांचा राग अनावर होतो आणि आपल्या पात्राला त्रास देण्याची योजना आखतात. यासाठी एखादा अपराध ही हे करतात. यांच्या प्रेमप्रकरणात स्थायित्वाचा अभाव असतो. हे स्वतः सुध्दा कायम प्रेमाचे इच्छुक नसतात. उदास प्रवृत्ति असते. शांतिपूर्ण मार्गाने प्रेमाची अभिव्यक्ती करतात. प्रेमपात्राच्या मतानुसार वागतात.

भाग्यांक ८ च्या लोकांनी ८ भाग्यांकाच्या लोकांबरोबरच प्रेम केल्यास ते यशस्वी नोईल. भाग्यांक ८ च्या व्यक्तिंनी भाग्यांक ८ बरोबर लम करावे. या लांकानी विवाह भाग्यांक ८ च्या व्यक्तिशी करावा. यांचा विवाह विवाहयोग्य वयापेक्षा काही विलंबाने होतो.

बहुधा लग्नाला आई-वडिलांची मान्यता असते. अशांचे प्रेम विवाह फारच कमी प्रमाणात होतात. यांचा जोडीदार गुणवान व समर्पण करण्याच्या भावनेने ओतप्रोत असतो. यांचे वैवाहिक जीवन सरासरी असते. लहानसहान गोष्टीवरुन मतभेद होतात.

भाग्यांक ८ चा शीघ्रकोपी स्वभाव व विवाहोपरांत प्रेमप्रकरणे ह्यामुळे उभयता मतभेद उत्पन्न होऊन वैवाहिक जीवनात कटुता येते. समजुतीने वागल्यास ही कटुता संपते. याचा जीवनसाथी सुंदर असतो. पण आरोग्याच्या बाबतीत कमजोर असतो.

भाग्यांक ९ :- Marriage Or Love Marriage

या भाग्यांक ९ चे प्रियकर चांगले असतात. पहिल्या दृष्टीत यांचे प्रेम जमते. प्रेमाच्या बाबतीत हे उतावीळ असतात. प्रेम प्रकरणामुळे कित्येकदा यांची बदनामी होते. आपल्या प्रेमीच्या प्रति समर्पणाची भावना यांच्यात असते. भाग्यांक ९ च्या लोकांची एकापेक्षा जास्त प्रेमप्रकरणे असतात. विवाहानंतरही ती चालू असतात.

प्रेमात ठोकर बसल्यावर किंवा विश्वासघात झाल्यावर हे रागावतात आणि सूड घेण्याचा प्रयत्न करतात. अयशस्वी पात्राशी शत्रूत्व करतात व काही वेळा अपराध ही करुन बसतात. यांचे प्रेम अस्थायी असते. प्रेमाला विवाहात तबदील करण्याच्या बाबतीत गंभीर असतात. अशा व्यक्तींनी भाग्यांक ३, ६, ९ या भाग्यांकाच्या व्यक्तीवरच प्रेम करावे.

भाग्यांक ९ च्या विवाहोत्सूकांनी भाग्यांक ३, ६ व ९ यांच्याशी विवाह केल्यास तो लाभप्रद ठरतो. विवाहास योग्य वयापेक्षा वयाने मोठा जोडीदार मिळतो. यांचा जोडीदार सुंदर, गुणी व आपल्या जोडीदारावर स्वतःला समर्पण करणारा असतो. यांचे वैवाहिक जीवन सरासरी असते. क्षणाक्षणाला चिढणारा स्वभाव असतो.

यामुळे वैवाहिक जीवन कटुता व तनाव पूर्ण राहते. जोडीदाराच्या स्वभावातही चिडचिडेपणा येतो. या लोकांनी व्यसनमुक्त रहाण्याचा आटोकाट प्रयत्न करुन आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेणे यांच्या हिताचे असते.

मार्गदर्शन :-

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevasprathishthan@gmail.com या वर मला Email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,

Horoscope 8 July 2024

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित 
श्रीपाद विनायक जोशी (गुरुजी)
+91 94202 70997 +91 94232 70997
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,
संतती समस्या विशेतज्ञ
ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ, व्यसन मुक्ती औषध तज्ञ
(दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!