Matrimonial Merit Method: कुंडलीत ३६ गुण शोधणे शुभ की अशुभ? विवाह गुण मेलन पद्धत, विवाहाचे 36 गुण कोणते आहेत लग्नासाठी किती गुण आवश्यक आहेत? Best 10 Positive And Negative Effect

Matrimonial Merit Method

Matrimonial Merit Method: कुंडलीत ३६ गुण शोधणे शुभ की अशुभ? विवाह गुण मेलन पद्धत, विवाहाचे 36 गुण कोणते आहेत लग्नासाठी किती गुण आवश्यक आहेत? Best 10 Positive And Negative Effect

विवाह गुण मेलन पद्धत, (Matrimonial Merit Method) या Shree Seva Pratishthan च्या लेखात आपण विवाह जमविताना हमखास विषय निघतो तो गुणमेलनाचा किंवा पत्रिकामेलनाचा. आजकाल विवाह पत्रिका जुळवून करण्याची पध्दत आहे. अगदी प्रेमविवाह करणारे जोडपेसुद्धा प्रेमविवाह करण्यापूर्वी कुंडलीमेलन होते की नाही ते सर्वप्रथम पाहतात. बऱ्याच वेळा कुंडली जमत नसल्याने अशी जोडपी एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असले तरी विवाह करण्याचा निर्णय मागे घेतात. ही एक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.

मात्र मनात यावेळी प्रश्न पडतो की अशा एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडप्यांना फक्त गुणमेलन Matrimonial Merit Method व राशीमैत्रीवर विवाह करू नका, असे सांगणे सयुक्तिक आहे का? निसर्गाने एकमेकांना आकर्षित करून, जवळ आलेल्या प्रेमीयुगलांना वेगळे करण्याचा हक्क ज्योतिषाला किंवा ज्योतिषशास्त्राला आहे का?

या प्रश्नांवर विचार केला असता असे लक्षात येते की फक्त गुणमेलनावर Matrimonial Merit Method हे विवाह टाळणे चुकीचे होईल. पारंपरिक गुणमेलन हे फक्त व्यक्तीच्या राशी व नक्षत्रावर अवलंबून असल्याने अपूर्ण असल्यासारखे वाटते. काळ बदलला आहे त्यामुळे ज्योतिषांनीही यावर संशोधन करून एक आदर्श परिपूर्ण, गुणमेलन पद्धती विकसित करणे ही काळाची गरज आहे.

मीही एक ज्योतिष अभ्यासक म्हणून यावर माझ्या अल्पबुद्धीने एक विवाहमेलनाची पद्धत विकसित केली आहे. त्या पद्धतीने विवाहमेलन सर्वांना करता यावे यासाठी येथे माझी विवाह गुणमेलन Matrimonial Merit Method पद्धती सर्वांसमोर मांडत आहे.

माझ्या मते वधूवरांच्या पत्रिका विवाहमेलनासाठी आल्यावर खालील तीन प्रकारे पत्रिकेचे मेलन करावे व एकूण सरासरी गुण काढून मगच त्यांनी विवाह करावा की नाही याचे उत्तर ज्योतिर्विदाने द्यावे. तीन पद्धती खालीलप्रमाणे :

१) पारंपरिक गुणमेलन :- Matrimonial Merit Method

२) मंगळदोष मेलन :- Matrimonial Merit Method

३) पत्रिका मेलन :- या तिन्ही पद्धतींचा सविस्तर अभ्यास करू. – Matrimonial Merit Method

Matrimonial Merit Method

१) पारंपरिक गुणमेलन- १० गुण – Matrimonial Merit Method

ही गुणमेलन Matrimonial Merit Method पद्धती फक्त वधूवरांच्या राशी, नक्षत्रे, व प्राचीन ग्रंथांतून किंवा प्राचीन काळापासून गुणमेलन पद्धती विकसित चरणावर आधारित आहे. चंद्रराशी म्हणजे व्यक्तीच्या स्वभाव, आवडी- निवडी, तडजोडीची भूमिका मानसिक स्थिती इ. होय. चंद्र मनाचा कारक असल्याने दोन्ही व्यक्ती मनाने आकर्षित होणाऱ्या एकमेकांना समजून घेणाऱ्या अशा असाव्यात. दोघांचे स्वभाव पटल्यास वैवाहिक जीवन सुखी होऊ शकते इ. गोष्टीवरून फक्त चंद्रराशीवरून गुणमेलन करण्याची पद्धत रूढ झाली असावी.

वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी मनोमिलन जितके आवश्यक आहे, तितके त्याचे मिलन दोन शरीराचे मिलन हेही आवश्यक आहे. कारण विवाहद्वारे दोन मने एकत्र येत नसून दोन वेगवेगळे आत्मे, दोन शरीर व दोन कुटुंबे एकत्र येत असतात. त्यामुळे फक्त स्वभाव जुळतात म्हणून विवाह करण्यापेक्षा दोघांचे लग्न, रवि, लग्नेश, सप्तमेश, पंचमेश, दशमेश इ. यांचीही मैत्री असणे तेवढेच आवश्यक आहे. त्यामुळे आधुनिक काळात पारंपरिक गुणमेलना Matrimonial Merit Method बरोबरच दोघांच्या पत्रिका मेलनालाही तेवढेच महत्त्व दिले पाहिजे असे मला वाटते.

याचा अर्थ पारंपरिक गुणमेलन Matrimonial Merit Method पद्धत चुकीची आहे असा होत नाही. प्राचीन ग्रंथकर्त्यांच काहीतरी अभ्यास, संशोधन यामागे असणार आहे. त्यामुळे याही गुणमेलनाचा Matrimonial Merit Method विचार करावा लागेल. आता आपण पारंपरिक गुणमेलन Matrimonial Merit Method पद्धतीबाबत विचार करू – वधूवरांच्या गुणमेलनात एकूण आठ अंगांचा समावेश यामध्ये केला आहे. ह्या आठ बाबी म्हणजे वर्ण, वश्य, तारा, योनी, ग्रहमैत्री, गण, राशीकुट, व नाडी होय. या आठ बाबींचे मिळून ३६ गुण पूर्ण होतात.

१) वर्ण :- Matrimonial Merit Method

पहिले अंग म्हणजे वर्ण. यास ३६ पैकी सर्वात कमी म्हणजे एक गुण आहे. वर्णं म्हणजे त्या व्यक्तीची सर्वसाधारण प्रवृत्ती होय. यामध्ये चंद्राच्या राशी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या वर्णानुसार वधूवरांचे गुणमेलन Matrimonial Merit Method केले जाते.

२) वश्य :- Matrimonial Merit Method

यास ३६ पैकी २ गुण दिले आहेत. राशिचक्रातील राशी या पाच प्राणीवर्गात विभागल्या गेल्या आहेत. त्या एका प्राणीवर्गाचे वैशिष्ट्य सर्वसाधारणपणे त्या व्यक्तीत असते. हा वश्यमेळ वधूवरांना एकमेकांस परस्पर किती आकर्षण राहील आणि एकमेकांची किती अधीनता स्वीकारेल हे दर्शवितो. गुणमेलनात Matrimonial Merit Method जलचर, वनचर, कीटक, मानव व चतुष्पाद ह्या वश्यप्रकारातून गुणमेलन Matrimonial Merit Method केले जाते.

३) तारा :- Matrimonial Merit Method

यास ३६ पैकी ३ गुण दिले आहेत. यात जन्म संवत विपत या नक्षत्र गोचरीचे शुभाशुभ तत्त्व आहे. यात क्रमशः नऊ नक्षत्रांपैकी २, ४, ६, ८, व ९ क्रमांकाची नक्षत्रे वधूवरांच्या नक्षत्रांपासून शुभ मानली जातात. जसे वर आणि वधू दोघांच्या नक्षत्रापासून एकमेकांची नक्षत्रे शुभ आल्यास पूर्ण ३ गुण आणि एकाच्या नक्षत्रापासून दुसरे नक्षत्र अशुभ आल्यास निम्मे म्हणजे दीड गुण धरले जातात. दोघांच्या नक्षत्रापासून एकमेकांची नक्षत्रे प्रतिकूल आल्यास शून्य गुण घरतात.

हे तारामेलन वर व वधू एकमेकांस आयुष्यबल व लग्नजीवनाचा तालमेल आणि वियोग किंवा विरह होईल की नाही, ते दर्शविते.

४ ) योनी :- Matrimonial Merit Method

यास ३६ पैकी ४ गुण दिले आहेत. योनी यांचा संबंध जोडीदाराच्या शरीरसुखाशी अभिप्रेत असावा. योनीमैत्री नसल्यास जोडीदारांचे परस्परामध्ये औदासीन्य असू शकते. चंद्राच्या नक्षत्रावरून अश्व, गज, मेष, सर्प, श्वान, मांजर, मुषक, गौ, महिषी, व्याघ्र, मृग, वानर, मुंगूस, सिंह अशा १४ प्रकारच्या योनींचा विचार करून वधूवरांचे स्वभाव अनुकूल की प्रतिकूल, हे ठरवले जातात.

५) ग्रहमैत्री :- Matrimonial Merit Method

यास ३६ पैकी ५ गुण दिले आहेत. ग्रहमैत्री म्हणजे चंद्रराशी मैत्री होय. यात वधूवरांची चंद्रराशी स्वामीची मैत्री किती प्रमाणात आहे हेच पाहिले जाते. येथे स्वभावाचा, वागण्याचा भाग सर्वसाधारणपणे दिसतो. पण केवळ राशीवरून किंवा केवळ नक्षत्रावरून एखाद्याचा स्वभाव पूर्णपणे ठरवणे हे फसवे व चुकीचे असू शकते यांचाही विचार करावा.

६) गण :- Matrimonial Merit Method

यास ३६ पैकी ६ गुण दिले आहेत. देव-मनुष्य-राक्षस असे तीन प्रकार यात आहेत, अनुक्रमे सत्त्व-रज-तम अशी त्या प्रकारांची मूळ मानवी गुणात ओळख होते. हे गुणमेलन Matrimonial Merit Method वर व वधू एकमेकांस स्वाभाविक, आणि प्राकृतिक, एकरूपतेची माया, प्रेम नक्की करण्याकरिता बघितली जाते.

७) राशीकुट :- Matrimonial Merit Method

यास ३६ पैकी ७ गुण दिले आहेत. यामध्ये वधूवरांच्या चंद्रराशीतील अंशात्मक योगांचा विचार केला आहे. मृत्युषडाष्टक, द्विद्वादर्शक, केंद्रयोग, प्रतियोग, लाभयोग यात आहेत. त्यात सुकुट व दुष्कुट ओळखण्यास अंशात्मक कुंडली वाचन हवे.

८ ) नाडी :- Matrimonial Merit Method

यास ३६ पैकी ८ गुण दिले आहेत. आद्य, मध्य, अंत्य या तीन नाड्या नक्षत्रपरत्वे वणलेल्या आहेत. अनुक्रमे आयुर्वेदानुसार वात-पित्त-कफ या प्रकृतीचे आधिक्य त्यात असते. प्रकृतीदृष्टया, आरोग्यदृष्ट्या समान नाडी नसावी, यासाठी एक नाडी असणे हा दोष मानला जातो. वधूवरांच्या कुंडलीमेलनाच्या ३६ गुणांचे रहस्य वरीलप्रमाणे लक्षात येईल.

या आठ प्रकारांत प्रचलित गुणमेलन Matrimonial Merit Method करून विवाहास होकार किंवा नकार दिला जातो. मात्र ही पद्धत परिपूर्ण व तर्कशुद्ध वाटत नाही. उलट या पध्दतीने होणाऱ्या विवाहात अडथळे येण्याची शक्यता असते. यामध्ये मुख्य विचार जो केला गेला आहे. त्याचा उद्देश लक्षात घेणे गरजेचे आहे. वधूवरांचे गुणमेलन Matrimonial Merit Method म्हणजे स्वभाव मिलन किंवा मनोमिलन होणे हा उद्देश असणे महत्त्वाचे वाटते. मग फक्त चंद्रावरून व्यक्तीचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्त्व ठरवणे चुकीचे वाटते. व्यक्तीचा स्वभाव कुंडलीतील सर्व ग्रहांप्रमाणे व ‘लग्नाप्रमाणे ठरतो. त्यामुळे गुणमेलनाबरोबर वधूवरांच्या पत्रिकेचे मेलनही करणे गरजेचे आहे.

Matrimonial Merit Method

पारंपारिक गुणमेलनाविषयी काही महत्त्वाचे नियम :-

१) वधूवरांचे रास, नक्षत्र, चरण समजल्यावर गुणमेलन Matrimonial Merit Method काढण्यासाठी दाते पंचागांमधील पान नं. १०, ११, १२, १३ या पानांचा विचार करावा.

२) एक नाडी दोष येत असल्यास तो दोष नाडीपादवेध कोष्टकात नाहीसा होतो का नाही ते पाहण्यासाठी दाते पंचांगामधील पान नं १४ वरील नाडीपादवेध कोष्टक पाहावे. जर वधूवरांची नक्षत्र, चरण एकाच आडव्या ओळीत येत असतील तर एक नाडी दोष राहतो. मात्र जर वधूवरांची नक्षत्र, चरण एकाच आडव्या ओळीत येत नसतील तर एक नाडी दोष नाहीसा होतो. त्यामुळे गुणमेलनात Matrimonial Merit Method ८ गुण वाढवावेत व विवाहास परवानगी द्यावी.

३) एक रास, एक नक्षत्र व एक चरण हे वधूवरांचे समान असल्यास विवाह करू नये.

४) मनुष्य, राक्षस हा गणदोष विवाह निषिद्ध करण्याइतका मोठा दोष नाही.

पारंपरिक गुणमेलनात ३६ पैकी गुण किती गुण पडलेत हे पाहून १० पैकी किती पडतील ते काढावे. कारण आपण आपल्या पद्धतीमध्ये पारंपरिक गुणमेलनाला १० गुण दिले आहेत.

आतापर्यंत आपण पारंपरिक ३६ गुण असणारे गुणमेलन Matrimonial Merit Method याचा अभ्यास केला. ३६ पैकी १८ गुण म्हणजे ५०% गुण असता किंवा त्यापेक्षा जास्त गुण असता विवाहास हरकत नाही असे मानतात. परंतु येथे एक प्रश्न पडतो की ३६ पैकी ३६ किंवा ३० पेक्षा जास्त गुण पडले असतानाही वधुवरांना वैवाहिक जीवनात दुःख भोगायला लागते.

घटस्फोट होणे किंवा तीव्र मतभेद, असमाधान राहणे हे त्यांच्या नशिबी का येते? किंवा याउलट मृत्युषडाष्टक योग असता व १८ पेक्षा कमी गुण पडले असता केलेले विवाह किंवा प्रेमविवाह टिकतात कसे? यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की फक्त पारंपरिक गुणमेलनावर Matrimonial Merit Method सर्व काही अवलंबून नसून दोघांच्या पत्रिकेतील योग, ग्रहमैत्री, वैवाहिक सौख्य, मंगळदोष इ. वर वैवाहिक जीवन अवलंबून असते. यासाठी आता आपण मंगळदोष मेलन या दुसऱ्या पद्धतीचा विचार करू.

१) मंगळदोष मेलन :-

१० गुण मागील प्रकरणामध्ये आपण मंगळदोषावर सविस्तर चर्चा केली आहेच. गुणमेलनाबरोबर वधूवरांच्या कुंडल्या मंगळदोष मेलनासाठी जरूर पाहाव्यात. पारंपरिक गुणमेलनात Matrimonial Merit Method दोघांना चांगले गुण पडले आहेत, मात्र एकाच्या कुंडलीत कडक मंगळ व दुसऱ्याच्या कुंडलीत मंगळदोष नाही किंवा ती कुंडली सदोष मंगळाला प्रतिकारकही नाही, अशा वेळी विवाह टाळणे योग्य होते, कारण असा विवाह टिकणे शक्य नसते. काही ना काही अशुभ परिणाम भोगावयास मिळतातच. थोडक्यात, गुणमेलनाबरोबर मंगळदोष मेलन आवश्यक आहे.

मंगळदोष मेलनासाठी १० गुण द्यावेत. जर दोघांच्या पत्रिका मंगळदोष मेलनास अनुकूल असतील तर १० पैकी १० गुण द्यावेत, नसतील तर ० गुण द्यावेत.

मंगळदोष मेलनाविषयी काही नियम :-Marriage Merit Method,

१) सौम्य मंगळाचा दोष राहत नसल्याने सौम्य मंगळ आहे की कडक मंगळ हे सर्वप्रथम पाहावे.

२) कडक मंगळदोष असता वधूवरांचे वय, गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा. मंगळाची महादशा इ.

३) एकाच्या पत्रिकेत सदोष मंगळ असेल व दुसऱ्या पत्रिकेत सदोष मंगळ नसेल अशा वेळी दुसऱ्या कुंडलीत मंगळाला प्रतिकारक योग किंवा जाब आहेत का ते पाहावे व निर्णय घ्यावा.

४) मंगळदोषाबाबत योग्य निर्णय व १० पैकी किती गुण द्यायचे हे प्रत्येकाच्या अभ्यासावर, संशोधनावर अवलंबून आहे. ज्योतिषांनी मंगळदोषाचा सखोल अभ्यास करूनं यावर निर्णय घ्यावा, ही विनंती.

Shree Seva Pratishthan

१) पत्रिका मेलन- १० गुण

पारंपरिक गुणमेलन, मंगळदोष मेलनाबरोबरच वधूवरांच्या कुंडल्यांचे ग्रहमेलन करणे हेही विवाह करण्यापूर्वी महत्त्वाचे आहे. व यासाठी सर्वप्रथम दोघांच्या कुंडल्यांचा स्वतंत्र अभ्यास करावा व त्या कुंडल्यामध्ये विवाहयोग, वैवाहिक सौख्य इ. सर्व विवाहविषयक बाबींचा सखोल अभ्यास करावा. त्यानंतर दोघांनाही विवाहानंतर पहिले दोन-तीन वर्षे ग्रहगोचरीने ग्रहमान कसे आहे तेही पाहावे कारण वैवाहिक सौख्यामधील समस्या, अडचणी या ग्रह गोचरीने अशुभ आल्यास किंवा लग्न व सप्तमातून जात असताना, उभ्या राहतात. या वरील दोन्ही गोष्टी कुंडल्यांमध्ये पाहिल्यावर मग दोघांच्या कुंडल्या शेजारीशेजारी मांडून दोघांच्या कुंडल्यातील ग्रहमेलन करावे.

ग्रहमेलन खालीलप्रमाणे करावे. एकूण पाच बाबींचा विचार करावा. प्रत्येक बाबीला २० गुण दिले असून एकूण १०० गुण होतात. १०० पैकी किती गुण पडतात ते पाहून १० पैकी किती पडतात ते काढावे.

१) वराचे लग्न आणि वधूचे लग्न = २० गुण

२) वराचा चंद्र आणि वधूचा रवि = २० गुण

३) वराचा शुक्र आणि वधूचा मंगळ = २० गुण

४) वराचा सप्तमेश आणि वधूचा लग्नेश = २० गुण

५) वराचा लग्नेश आणि वधूचा सप्तमेश = २० गुण

एकूण = १०० गुण

पत्रिका मेलनाविषयी काही नियम :-

१) वराचा चंद्र व वधूचा चंद्र म्हणजे दोघांची राशीमैत्री आपण पारंपरिक गुणमेलना Matrimonial Merit Method मध्ये पाहत असतोच, त्यामुळे येथे राशीमैत्री विचारात घेतली नाही.

२) पुरुषांच्या कुंडलीत स्त्री-ग्रह म्हणजे चंद्र व शुक्र तर स्त्रियांच्या पत्रिकेत पुरुष ग्रह म्हणजे रवि व मंगळ यांची स्थिती पाहणे, वैवाहिक सौख्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे यांची ग्रहमैत्री आवश्यक आहे. एक स्त्री व एक पुरुष एकत्र आल्याशिवाय प्रणय व संतती उत्पत्ती नाही, त्यामुळे दोघांच्या विवाहजीवनामधील सेक्स किंवा शरीरसंबंध, वरील ग्रहांवर अवलंबून असल्याने यामध्ये ग्रहमेलन आवश्यक असते. विवाहमेलनामध्ये याचा विचार फार महत्त्वाचा ठरतो.

३) लग्नेश म्हणजे मी स्वतः, माझा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, माझी तडजोडीची भूमिका होय व सप्तमेश म्हणजे जोडीदार, जोडीदाराने व्यक्तिमत्त्व, स्वभाव इ. होय, विवाहामध्ये हे दोघे एकत्र येऊन भावी जीवनाची वाटचाल करणार असतात, त्यामुळे या दोघांची परस्पर ग्रहमैत्री कुंडलीमध्ये पाहणे आवश्यक ठरते.

प्रत्येक राशीची, मित्र, सम व शत्रू राशी :- Matrimonial Merit Method

क्रमांकराशीमित्र राशी २० गुणसम राशी १० गुणशत्रू राशी ० गुण
मेष राशी १,४,५,८,९,१२२,७३.६,१०,११
वृषभ राशी२,३,६,७,१०,१११,४,८५,९,१२
मिथुन राशी२,३,५,६,७,१०,११९,१२१,४,८
कर्क राशी१,४,५,८,९,१२२,७३,६,१०,११
सिंह राशी१,४,५,८,९,१२३,६२,७,१०,११
कन्या राशी२,३.६.७,१०,११५,९,१२१,४,८
तूळराशी २,३.६.७,१०,१११,८४,५,९,१२
वृश्चिक राशी१,४,५,८,९,१२२,७३,६,१०,११
धनू राशी१,४,५,८,९,१२३,६,१०,११२,७
१०मकर राशी२,३.६.७,१०,११९,१२१,४,५,८,
११कुंभ राशी२,३.६.७,१०,११९,१२१,४,५,८,
१२मीन राशी१,४,५,८,९,१२३,६,१०,११२,७

तक्ता

वरील तक्त्यांचा वापर करून किंवा आपल्या बुद्धीचा वापर करून पत्रिका मेलन करावे व १० पैकी गुण काढावेत.

आतापर्यंत आपण विवाहगुणमेलनाच्या Matrimonial Merit Method तिन्ही पद्धतींचा विचार केला. प्रत्येकाला १० गुण दिले असून एकूण ३० गुण होतात. सर्व पद्धतीनुसार गुणांची बेरीज करून ३० पैकी गुण काढावेत. जर २० पेक्षा जास्त गुण असतील तर विवाह करावयास हरकत नाही असा निर्णय द्यावा. तसेच विवाह निर्णय देताना पत्रिका मेलनामध्ये कमीत कमी १० पैकी ५ गुण असणे आवश्यक आहे.

५ किंवा ५ पेक्षा गुण जास्त असतील तर विवाह करावयास हरकेत नाही. तिन्ही प्रकारांमध्ये पत्रिका मेलनाचा विचार सर्वप्रथम करावा. सुज्ञ ज्योतिषाने स्वबुद्धीने योग्य निर्णय घ्यावा. उदाहरणादाखल या प्रकरणातील ३ क्रमांकाच्या पत्रिकेचे विश्लेषण पाहा. पारंपरिक पद्धतीने गुणमेलन Matrimonial Merit Method उत्तम होते म्हणून त्यांनी विवाह केला. आत्ता दोन वर्षातच घटस्फोट घेतला आहे. याचे कारण त्यांचे पत्रिका मेलनामध्ये पडलेले ५ पेक्षा कमी गुण असावेत.

टिप :-

विवाहगुणमेलन Matrimonial Merit Method व वैवाहीक सौख्य या पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गुणमेलन Matrimonial Merit Method उत्तम झाले मात्र दोघांच्या कुंडल्यामध्ये किंवा एकाच्या कुंडलीमध्ये वैवाहिक सौख्यामध्ये दोष उदा. घटस्फोट, वैवाहीक मतभेद, वैधव्ययोग इ. असल्यास त्या दोघांना उत्तम वैवाहिक सौख्य मिळेलच असे नाही. अशावेळी जातक किंवा समाज ज्योतिषांना दोष देतो.

गुणमेलन Matrimonial Merit Method उत्तम झाले असतानाही घटस्फोट कसा झाला? असे अनेक प्रश्न लोक विचारतात. यासाठी दोन्ही पत्रिका वैवाहिक सौख्यात कशा आहेत, भविष्यात त्यांना काय काय अडचणी येणार आहेत, तडजोड कशामध्ये करावी लागेल ते ज्योतिष मार्गदर्शकांनी सर्वप्रथम येणाऱ्या जातकाला सांगितले पाहिजे असे मला वाटते. जर जातकाच्या पत्रिकेस वैवाहिक सौख्यच नसेल तर ३६ गुण जुळून सुद्धा उपयोग होणार नाही हे येथे लक्षात घ्यावे.

Shree Seva Pratishthan

मार्गदर्शन :-

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण श्री सेवा प्रतिष्ठान shreesevaprathishthan@gmail.com या वर मला Email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित Shree Seva Pratishthan
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी )
+91 94202 70997 – +91 94232 70997 
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,
संतती समस्या विशेतज्ञ
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ,
व्यसन मुक्ती औषध तज्ञ
( दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)

Share someone who needs a little cosmic boost in their life!"

Facebook
X
LinkedIn
Telegram
WhatsApp

मार्गदर्शन : -

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा लेख आवडला असेल आणि तो उपयुक्त वाटला असेल. कृपया आपल्या कुटुंब आणि मित्रांसह सामायिक करा.

अश्याच नवनवीन लेख ची सूचना आपल्याला वेळोवेळी मिळत राहावी या साठी खालील WhatsApp / Telegram वर क्लिक करावे.

Recent Post

Web Developer

error: Content is protected !!