Planet Pain Sadhana ग्रह पीडे मुळे खूप भाविक त्रस्त आहेत या लेखात आपण त्याच्या साठी आवश्यक ते उपाय दिलेले आहेत.
व्यस्त आणि धकाधकीच्या आजच्या काळात ज्यांना साधनेसाठी एवढा वेळ नसेल व खर्चही करता येणे शक्य नसेल.
उपासनेत नियम,संक्रमण प्रतिबंध आवश्यक वस्तू यांचा विचार गोण आहे,
मुख्यतः उपासना साधनेसाठी आस्था, श्रद्धा, धैर्य, विश्वास मानसिक संयम या गोष्टींची प्रामुख्याने आवश्यक्ता आहे.
जिज्ञासूंच्या सोईसाठी व हितासाठी येथे प्रत्येक अनिष्ट ग्रहाची निवारक साधना दिली आहे,
विधिवत श्रद्धेने साधना केली तर थोड्याच दिवसात चमत्कारिक अनुभव फायद्याचा अनुभव येईल.
नवग्रहशांति स्तुति :- Planet Pain Sadhana
अल्पमोली बहुगुणी अनिष्ट ग्रहपीडा निवारक साधना,(Inauspicious Planet Pain Prevention Sadhana)
ब्रह्मा मुरारिः त्रिपुरान्तकारी मानुः शशि: भूमिसुतो बुधश्च ।
गुरुश्च शुक्रः शनि राहु केतवे, सर्व ग्रहा शान्तिकरा भवन्तु ।।
या एकाच श्लोकाने नवग्रहांचे स्तवन होते. या श्लोकाचा नियमित जप नवग्रहांची अनुकूलता मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही.
इतर साधना :-
Planet Pain Prevention Sadhana ग्रह वेदना प्रतिबंध साधना अनिष्ट ग्रहपीडा निवारुन ग्रहाची संक्रमण अनुकूलता प्राप्त करण्यासाठी
जप, प, पूजा, पाठ, हवन, रत्न धारण आणि त्या ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान ही साधना सर्वश्रेष्ठ व निश्चित प्रभावी आहे,
परंतु ज्यांना ही साधना शक्य नाही, त्याच्यासाठी नवग्रहांच्या सोप्या, कमी खर्चाच्या साधना खाली देत आहे.
प्रत्येक प्रकरणात मंत्राचा उल्लेख आहे, त्यापैकी कोणताही मंत्र जपासाठी घ्यावा, रत्नधारण ज्यांना परवडणार नाही,
त्याच्यासाठी पर्याय म्हणून त्या त्या ग्रहाची वनस्पतीची माहितीही देत आहे.
रवि :- संक्रमण
१) जे रवि ‘माणिक्य’ किंवा पर्यायी रत्न ‘रूबी’ धारण करू शकत नाहीत
त्यांनी कोणत्याही रविवारी (अमावस्या सोडून) प्रातःकाळी प्रातः विधी उरकून स्नानादितून निवृत्त होऊन बेलाचे झाड असेल
तेथे जावे पूर्वेकडे तोंड करून बैलाची मूळ उकरून ती घेऊन घरी यावे,
शुद्ध पाण्याने ती मूळ स्वच्छ करून धूप-दीप व रवि मंत्र म्हणत पूजा करावी.
गुलाबी किंवा लाल रंगाच्या सुती धाग्यात गुंडाळून उजव्या बाहूवर धारण करावी,
रत्न धारण केल्याने जो परिणाम साधला जाईल तोच परिणाम या बेलमुळीने साधता येईल.अल्पमोली बहुगुणी अनिष्ट ग्रहपीडा निवारक साधना, (Inauspicious Planet Pain Prevention Sadhana) अवश्य करावी.
२) रविवारी रवि पूजेनंतर गूळ, गहू व तांब्याचा पैसा दान करावा ज्यांना शक्य असेल
त्यांनी हरीवंश पुराणाचे वाचन करावे, हे जमत नसेल तर कोणतीही सूर्यस्तुती व रविमंत्राचा जप करावा,
३) रात्री झोपण्यापूर्वी अग्नी दुधाने शांत करावी, आज सर्वत्र गॅस, बीज व केरोसीन स्वयंपाकासाठी वापरले जाते,
यामुळे चूल किंवा शेगडीतील निखारे मिळणे जवळ जवळ अशक्यच आहे, त्यासाठी उददानीत थोडे कोळसे प्रज्वलित करून ते दुधाने विझवेत.
४) वाहत्या नदीत किंवा पाण्यात तांब्याचा तुकडा किंवा पैसा प्रवाहित करावा.
५) प्रत्येक रविवारी हे प्रयोग करावेत. फक्त बेलाची मूळ एकदाच धारण करावी.
चंद्र :- Planet Pain Sadhana
१) चंद्र संक्रमण, चंद्राला मोती किंवा चंद्रकांत मणी धरण करणे ज्यांना शक्य नाही,
त्यांनी सोमवारी प्रात:काळी खिरणी वृक्षाची मूळ पूर्वोन्मुख होऊन घेऊन यावी,
चंद्रमंत्राने त्याची पूजा-धूप दीप करून पांढऱ्या सुती धाग्यात गुंडाळून उजव्या दंडावर धारण करावी, मोती रत्नाएवढाच प्रभाव या वनस्पतीत आहे.
२) दर सोमवारी थोडे तांदूळ दान करावेत,अवश्य करावी.
दर सोमवारी शिवलिलामृताचा अकरावा पाठ वाचावा, दर सोमवारी वाहत्या पाण्यात चांदीचा तुकडा किंवा रुपया प्रवाहित करावा.
३) दर सोमवारी रात्री झोपताना एका भांड्यात थोडेसे दूध घेऊन हे पलंगाखाली बरोबर उशी ठेवतो त्या खाली ठेवावे,
मंगळवारी सकाळी लवकर उठून कोणाशी न बोलता पिंपळाच्या झाडाला हे दूध घालावे, सोमवारी स्मशानातील विहिरीतून किंवा नळातून पाणी आणून घरात ठेवावे, हे पाणी एकाच सोमवारी आणावे, प्रत्येक सोमवारी आणू नये. काहीं महिन्यानी हे पाणी बदलावे.
मंगळ :-
१) मंगळ रत्न पोवळे धारण करणे ज्यांना शक्य नाही, त्यांनी मंगळवारी सध्याकाली अनंतमुळाची मूळ आणून मंगळमंत्राने त्याची पूजा धूप-दीप वगैरे करन लाल दोन्यात गुंडाळून दंडावर धारण करावी अनंत मूळाची मूळ बाजारातही विकत मिळते. ती आणली तरी चालेल.
२) प्रत्येक मंगळवारी गुळ किंवा रेवड्या वाहत्या पाण्यात प्रवाहित कराव्यात.
३) मृगचर्मावर बसून मंगळ मंत्राचा जप करावा मृगचर्म मोठे मिळत नसेल तर कोतूनही लहान तुकडा मिळवावा व जवळ बाळगावा.
४) मारुतीचे भजन पूजन करावे, रामायणातील सुंदर कांड, हनुमान चालिसा किंवा हनुमान कवच वाचावे, काहीच जमले नाहीतर ” ॐ हं हनुमते नमः 1 हा हनुमान मंत्र कमीतकमी १०८ वेळा म्हणावा, मंगळवारी ब्रह्मचर्य पाळावे.
बुध :- Planet Pain Sadhana
१) बुध रत्न पाचू किंवा फिरोजा धारण करणे ज्यांना शक्य नाही,अल्पमोली बहुगुणी अनिष्ट ग्रहपीडा निवारक साधना, (Inauspicious Planet Pain Prevention Sadhana) अवश्य करावी. त्यांनी बुधवारी सकाळी वरधारा – विधारा वनस्पतीची मूळ आणून बुध यंत्राने धारण करावी, ही वनस्पती वनौषधीच्या दुकानातही मिळते.
२) दर बुधवारी काही कवड्या जाळून ती राख वाहत्या पाण्यात सोडावी, त्या बरोबर एक तांब्याचा पैसाही सोडावा, रोज तुरटीच्या मंजनाने दात स्वच्छ करावेत, बुधवारी दुर्गापूजा करून दुर्गास्तोत्र म्हणावे, बुधवारचा उपवास करावा.
गुरु :-
१) गुरुरत्न पुष्कराज किंवा टोपाझ ज्यांना धारण करणे शक्य नाही, त्यांनी गुरुवारी सकाळी हळकुंड किंवा भारंगमूळाची मूळ, किंवा केळीच्या झाडाची मूळ स्वच्छ धुऊन गुरुमंत्राने पूजा-धूप-दीप करून नव्या पिवळ्या कापडात बांधून दंडावर धारण करावी.
२) गुरुवारी उपवास धरावा, विष्णु सहस्त्रनाम वाचावे.
३) दररोज पिंपळाच्या झाडाची पूजा करुन झाडाला पाणी घालावे.
४) हरबऱ्याची डाळ, बेसन, पिकलेली पिवळी केळी, पिवळे वस्त्र पिवळे कव्हर असलेली धार्मिक पुस्तक यापैकी जे शक्य असेल त्याचे दान करावे.
शुक्र :- Planet Pain Sadhana
१) शुक्ररत्न हिरा किंवा झिरकॉन किंवा पांढरा पुष्कराज ज्यांना धारण करणे अशक्य आहे त्यांनी, अल्पमोली बहुगुणी अनिष्ट ग्रहपीडा निवारक साधना, (Inauspicious Planet Pain Prevention Sadhana) अवश्य करावी, शुक्रवारी सकाळी वाघारीचे मूळ किंवा सरपंखा वनस्पतीचे मूळ आणून शुक्र मंत्राने त्याची पूजा धूप-दीप करून पांढऱ्या दोऱ्यात गुंडाळून ती दंडावर धारण करावी.
२) शुक्रवारी उपवास धरावा. तांदूळ, साखर, दूध, दही पांढरे वस्त्र, पांढरे चंदन यापैकी जे शक्य असेल त्या वस्तूचे दान करावे.
३) लक्ष्मीची उपासना करावी, ॐ श्रीम् नमः हा मंत्र कमीत कमी १०८ वेळा म्हणावा.
४) दररोज जेवणापूर्वी गाईसाठी एक घास काढावा. यालाच गोग्रास म्हणतात. स्त्रियांचा आदर करावा.
शनि :-
१) शनि रत्न धारण करणे ज्यांना परवडत नाही त्यांनी शनिवारी सूर्योदयानंतर मलय चंदनाचे मूळ आणून त्यांची शनि-मंत्राने पूजा-धूप-दीप करून काळ्या दोन्यात गुंडाळून दंडावर धारण करावी.
२) शनिवारचा उपवास करावा, लोखंड, काळे उडीद, काळे कापड, करजीचे तेल, कस्तूरी काळी पादत्राणे यापैकी जे शक्य होईल त्याचे दान करावे.
३) आपल्या ताटातील उष्टे जेवण कावळ्यांना खायला घालावे. कणकेच्या लहान लहान गोळ्या करुन त्या माशांना खायला घालाव्यात.
४) एक भांडे तेलाने भरावे व त्यात आपले प्रतिबिंब पाहून त्या भांड्यासह ते तेल दान करावे.
राहू :- Planet Pain Sadhana
१) राहू रत्न गोमेद धारण करणे ज्यांना शक्य नाही, त्यांनी सफेद चंदनाचा एक तुकडा पांढन्या कापडात बांधून बुधवारी रात्री तो दंडावर धारण करावा, प्रत्येक बुधवारी किंवा शनिवारी भैरोबाची पूजा करावी.
२) शक्य असेल तर रोज, नाही तर निदान प्रत्येक बुधवारी गोमूत्राने आचमन करावे, गोमुत्राने दात घासावेत.
३) नदीच्या प्रवाहात थोडेसे कोळसे व खोटी नाणी प्रवाहित करावीत.
४) तीळ, मोहरी, निळे कापड, मूळे ( भाजीचे ), सूप, काळी घोंगडी यापैकी जमेल तर दान करावे.
केतु :-
१) केतु रत्न लसण्या किंवा वैडुर्य धारण करणे ज्यांना परवाडणार नाही, त्यांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी अष्टसांधाची मूळ आणून केतु मंत्राने त्याची पूजा धूप-दीप करून काळ्या दोऱ्यात गुंडाळून दंडावर धारण करावी.
२) गणेश उपासना करावी.
३) संकष्टी चतुर्थीचा उपवास करावा.
४) रोज कमीत कमी १०८ वेळा ‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करावा.
५) कुत्र्यांना अन्नाहार-भाकरी, चपाती, ब्रेड जमेल ते खाऊ घालावे.
मंगळ दोष साठी :- Planet Pain Prevention Sadhana
प्रत्येक व्यक्ती WHATSAPP चा वापर करतो, व प्रत्येक व्यक्तीचे निदान दोन तरी WHATSAPP चे ग्रुप असतात, पण काही व्यक्ती स्वभावाने निर्मल असतात ते हा ( 9420270997) नंबर आपल्या ग्रुप ला जोडून माहिती चा अजून प्रसार करतात, पण काही व्यक्ती फक्त स्वत:ह पुरता विचार करतात. लेख वाचतात व आपले गणित जुळवून पाहतात. आपण काय कराल. ?
अनेकांसाठी मंगळ जरी अनलकी वाटत असला तरी पुढील महिन्यात मंगळ गोचरमुळे अनेकांना मोठा धनलाभ होणार आहे. (Mangal Gochar ) मंगळाचा शाब्दिक अर्थ ‘शुभ’ असा आहे. त्याला ‘भूमी’ म्हणजेच पृथ्वीपुत्र असेही म्हणतात. त्याला महाराष्ट्रात भगवान गणेश, उत्तर भारतात बजरंगबली आणि दक्षिण भारतात कार्तिकेय समानार्थी मानले जाते. पुढील महिन्यात मंगळ गोचर होत असल्याने याचा खूप मोठा लाभ हा 4 राशींच्या लोकांना होणार असून त्यांच्या हाती पैसाच पैसा येणार आहे.
मार्गदर्शन :-
आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.
( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
अधिक माहिती साठी संपर्क :-
श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन, (संतती समस्या निवारण विशेतज्ञ)