Spouse Information: विवाहाचा जोडीदार कसा असेल, सासर कसे असेल, जोडीदार कसा असेल, सासरच्या लोकांशी पटेल का.? सविस्तर माहिती पाहूया…

Spouse Information
श्रीपाद गुरुजी

विवाहाचा जोडीदार कसा असेल, सासर कसे असेल, जोडीदार कसा असेल, सविस्तर माहिती पाहूया… Spouse Information

Spouse Information, सप्तमातील राशी,(Marriage) सप्तमातील ग्रह, सप्तमेश व शुक्र यावरून जोडीदाराचे रूप, स्वभाव, जात, नोकरी, व्यवसाय, दिशा, अंतर, शिक्षण इ. गोष्टींचे अनुमान काढता येतात व त्याप्रमाणे तर्कशक्तीचा वापर करून अचूक वर्णन करता येते. (Wedding Invitations) आता आपण या प्रकरणात वरील सर्व गोष्टींचा सविस्तर विचार करू.

अ) जोडीदाराचे रूप व स्वभाव :-

जोडीदाराचे रूप व स्वभाव वर्णन करताना,(Couples Therapy) सप्तमातील राशी, सप्तमातील ग्रह व सप्तमेश कोणत्या ग्रहाबरोबर व कोणत्या राशीत आहे. याचा विचार करावा. (Relationship Tips) सर्वप्रथम आपण सप्तमातील ग्रहाप्रमाणे जोडीदाराचे वर्णन पाहू.

सप्तमातील ग्रहाप्रमाणे वर्णन :-

१ ) सप्तमात रवि असता :-

रूप – उंच, सडसडीत बांध्याचा, पिंगट केस, देखणा, गौरवर्णी, गोल चेहरा.

स्वभाव – अतिमहत्त्वाकांक्षी, स्वाभिमानी, गर्विष्ठ, माझेच खरे करणारा मात्र प्रामाणिक, उदार, वक्तशीर, शिस्तप्रिय, करारी, हेकट, निश्चयी असा मिळतो.

२) सप्तमात चंद्र असता :-

रूप – मध्यम उंच, मध्यम बांधा, गोल चेहरा, सुंदर, गौरवर्णी.

स्वभाव – जोडीदार चंचल, गृहकर्तव्यदक्ष, कुटुंबवत्सल, प्रेमळ, संवेदनशील, भोगी, प्रणयी, आनंदी, बोलका असा मिळतो.

३) सप्तमात मंगळ असता :-

रूप – तांबूस गौरवर्णी, राजबिंडा, सुदृढ बांध्याचा, उंच,

स्वभाव – जोडीदार करारी नजरेचा, तापट, मानी, हट्टी, भांडखोर, खर्चिक, हुकूमत गाजविणारा, कामप्रधान, स्वातंत्र्यप्रिय असा मिळतो.

४) सप्तमात बुध असता :-

रूप – नाजूक शरीराचा, मध्यम उंचीचा, आहे त्या वयापेक्षा लहान दिसणारा, गोरा, देखणा.

स्वभाव – बोलक्या स्वभावाचा, व्यवहार कुशल, सुस्वभावी, विनोदी, विलासी, विद्वान, बुद्धिमान, गुणवान, बालिश, व्यापारी वृत्तीचा असा मिळतो.

५) सप्तमात गुरु असता :-

रूप गौरवर्णी, स्थूल, सुडौल, गुटगुटीत बांध्याचा, सात्त्विक तेज असलेला, मध्यम उंचीचा

स्वभाव – जोडीदार सुंदर, सद्गुणी, धार्मिक, सदाचारी, सात्त्विक, शांत, बुद्धिमान, हौशी असा मिळतो.

ग्रह व वर्णन :- Marriage Counseling

६) सप्तमात शुक्र असता :-

रूप देखणा, सुंदर, कुरळ्या केसांचा, निमगौरवर्णाचा, मध्यम उंचीचा, मध्यम बांध्याचा (आकर्षक बांध्याचा).

स्वभाव – जोडीदार कलाप्रिय, कांतिमान, विनोदी, हौशी, आनंदी, कर्तव्यदक्ष, विलासी, प्रेमी, कामासक्त, रसिक असा मिळतो.

७) सप्तमात शनि असता :-

रूप – थोराड बांध्याचा, सावळ्या रंगाचा, कमी उंची, सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व, विजोड.

स्वभाव – जोडीदार कष्टाळू, अबोल, अरसिक, प्रामाणिक, शांत, सहनशील, संसारी, विचारी, काटकसरी असा मिळतो.

८) सप्तमात राहु असता :-

रूप – मध्यम किंवा कमी उंचीचा, कृश, रोगी, कुरूप, दिसण्यास सर्वसाधारण.

स्वभाव – जोडीदार आळशी, पापकर्मरत, दुर्गुणी, भांडखोर, नीच स्वभावी, पापवासनेचा असा मिळतो.

९) सप्तमात केतु असता :-

रूप – थोराड बांध्याचा, सावळा, कृश.

स्वभाव – जोडीदार वादविवाद करणारा, हट्टी, क्रूर, गुणहीन, रोगी, पापी असा मिळतो.

१०) सप्तमात हर्षल असता :-

रूप – गोरा, सदृढ बांध्याचा, उंच.

स्वभाव – जोडीदार विक्षिप्त, लहरी, बुद्धिमान, हेकट, रागीट, तामसी, भांडखोर, विलासी असा मिळतो.

११) सप्तमात नेपच्यून असता :-

रूप – गोरा, सुंदर, मध्यम बांध्याचा.

स्वभाव – जोडीदार कलाप्रिय, सौंदर्यप्रिय, अंतःस्फूर्ती असलेला, कधीकधी व्यसनी किंवा मानसिक विकृतीचा असा मिळतो. जोडीदाराकडून मनस्ताप किंवा फसवणूक संभवते.

सप्तमातील राशीप्रमाणे वर्णन :- Wedding Venues Near Me

१) सप्तमात मेष राशी असता :-

जोडीदार तापट, वादविवाद प्रिय, हट्टी, मानी, तिखट-मसालेदार खाणारा (मांसाहारी), खर्चिक, चंचल, हुकूमत गाजविणारा, उतावळा, स्वतंत्र विचाराचा, साहसी व आग्रही असा मिळतो.

२) सप्तमात वृषभ राशी असता :-

जोडीदार – देखणा, टापटीपमध्ये राहणारा, सौंदर्यप्रिय, हौशी, विलासी, आकर्षक, शांत, सहनशील, आनंदी, स्वच्छंदी, मध्यम उंच व बांधा असलेला गोरा असा मिळतो. सुंदर कपडे, अलंकार, सेंट, गायन, वादन, नाटक, सिनेमा याची आवड जोडीदाराला राहते.

३) सप्तमात मिथुन राशी असता :-

जोडीदार – बोलका, व्यापारी वृत्तीचा, व्यवहारचतुर, बालिश, देखणा, कष्टाळू, चतुर, बुद्धिमान, सुशिक्षित, सदैव तरतरीत व तरुण दिसणारा असा मिळतो. जोडीदार बौद्धिक कामाशी निगडित क्षेत्रातच नोकरी- व्यवसाय करणारा असतो. विवाह कदाचित एकाच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीशी होण्याची शक्यता असते. तसेच पत्रव्यवहार, जाहिरातीच्या माध्यमातून किंवा प्रवासात झालेल्या ओळखीतून संभवते.. जोडीदाराचा स्वतंत्र धंदा, व्यवसायही असू शकतो.

४) सप्तमात कर्क राशी असता :-

जोडीदार – चंचल, गृहकर्तव्यदक्ष, कुटुंबवत्सल परोपकारी, समाजप्रिय, गोरा, सुंदर, देखणा असा मिळतो. जोडीदाराचे घर, कुटुंब व मुलेबाळे यांच्याकडे सर्वप्रथम लक्ष राहते.

५) सप्तमात सिंह राशी असता :-

जोडीदार – स्वाभिमानी, हेकट, करारी, महत्त्वाकांक्षी, स्वतः चेच खरे करणारा, देखणा, उच्च घरातील, उत्तम नीतिमान, रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेला असा मिळतो. सामाजिक क्षेत्रात, कार्यात भाग घेण्याची हौस असते. व्यायाम, योगासने, पथ्य पाळणे इ. मार्गांनी प्रकृती सुडौल ठेवण्याकडे कल राहतो.

मध्यान :- Online Marriage Counseling

६) सप्तमात कन्या राशी असता :-

जोडीदार चिंतातुर, सतत काळजी करणारा, बुद्धिमान, व्यवहारी, चिकित्सक, गोड बोलून मतलब साधणारा, हजरजबाबी, विनोदी असा असतो. शिक्षण खाते किंवा सरकारी नोकरीत कार्यमग्न असतात, मातुल घराण्याशी संबंधित ठिकाणी विवाह होऊ शकतो. जोडीदार व्यवसायीसुद्धा असू शकतो.

७) सप्तमात तूळ राशी असता :-

जोडीदार सुंदर, एकनिष्ठ, अत्यंत प्रेमळ, रसिक, कुरळ्या केसांचा, देखणा, कलाप्रवीण, उंच, मध्यम किंवा कृश बांधा, सावळा असा मिळतो.

८) सप्तमात वृश्चिक राशी असता :-

जोडीदार जिद्दी, हट्टी, निग्रही, भावनाप्रधान, आकर्षक सुंदर, टोचून बोलण्याची सवय असणारा, तापट, वर्चस्व गाजविणारा व गूढ स्वभावाचा असा मिळतो. पती-पत्नीत लैंगिक भूक जास्त राहते.

९) सप्तमात धनु राशी असता :-

जोडीदार – सात्त्विक, धार्मिक परंतु हेकट, द्विस्वभावी, गोरा, सुडौल, स्थूल, सुशिक्षित, प्रामाणिक, सत्त्वगुणी, मनमोकळा, सुंदर, एकनिष्ठ असा मिळेल.

१०) सप्तमात मकर राशी असता :-

जोडीदार – कमी दर्जाचा व नोकरी करणारा, कष्टाळू, प्रामाणिक, एकनिष्ठ, सावळा, विजोड, हिशोबी, प्रेमाचे प्रदर्शन न करणारा, साधी राहणी असलेला, आळशी, थोराड बांध्याचा, वयाने मोठा असा मिळतो. जोडीदार लैंगिक बाबतीत कधीच पुढाकार घेत नाही. जोडीदार दिसावयास सर्वसाधारण असला तरी उत्तम संसारी असतो.

११ ) सप्तमात कुंभ राशी असता :-

जोडीदार – बुद्धिमान, कष्टाळु, देखणा, सावळा, विजोड, उंच, थोडा अरसिक, आळशी असा मिळतो.

१२ ) सप्तमात मीन राशी असता :-

जोडीदार धार्मिक, हौशी, शांत, गोरा, भोळा, रसिक, निरुपद्रवी, – सुस्वभावी, परोपकारी, आळशी व मनासारखा मिळतो. नात्यात विवाह किंवा पती-पत्नी एकाच गावातील असतात.

जोडीदाराचे वर्णन करताना खालील गोष्टींचा विचार करावा :- Wedding Venues

१) लग्नकुंडलीत सप्तमात ग्रह असल्यास जोडीदाराचे वर्णन त्या ग्रहाप्रमाणे तसेच तो ग्रह ज्या राशीत असेल त्याप्रमाणे करावे.

२) सप्तमात कोणताही ग्रह ज्यावेळी नसतो त्यावेळी सप्तमात जी राशी असते त्या राशीच्या मालकाप्रमाणे (सप्तमेश) जोडीदाराचे वर्णन करावे.

३) सप्तमेश ग्रह ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे तसेच त्याबरोबर ग्रह असतील त्याप्रमाणे जोडीदाराचे वर्णन करावे.

४) सप्तमातील ग्रहांवर व सप्तमेशावर ज्या ग्रहांची दृष्टी असेल त्याप्रमाणे तर्कशक्तीने जोडीदाराचे वर्णन करावे. कारण ग्रह दृष्टीने परिणाम करतात.

५) जोडीदाराने वर्णन करताना तर्कशक्तीला भरपूर वाव असल्याने अभ्यासपूर्वक (Wedding Planner) फलकथन करावे. आणि याच कारणाने प्रत्येकाचे जोडीदाराचे वर्णन वेगवेगळे येऊ शकते, याचाही विचार करावा.

ब) जोडीदाराची जात :- Premarital Counseling

जोडीदार कोणत्या जातीचा मिळेल यासाठी आपणास सर्वप्रथम ग्रह व त्यांच्या जातीचा अभ्यास करावा लागेल.

ग्रहजात
१) गुरु,शुक्र,ब्राह्मण, उच्चवर्णीय, (स्वजातीय)
२) रवी, मंगळ,क्षत्रिय, मराठा, (स्वजातीय)
३) शनी, राहू, केतू,शुद्र किंवा परजातीय, मातंग
४) बुध, चंद्रवैश्य, समजातीय
कोष्टक

आता आपण काही नियम पाहू :- Wedding Decorations

१) सप्तमात शनि, राहु, केतु असे ग्रह असता परजातीचा जोडीदार मिळण्याची शक्यता राहते.

२) सप्तमेश हा शनि, राहु, केतु याच्या अंशात्मक युतीत असता परजातीय जोडीदार मिळण्याची शक्यता असते.

३) शुक्र हा शनि, राहु, केतु याच्याबरोबर असता वरीलप्रमाणे फळ मिळते.

४) सप्तमेश, शुक्र व सप्तमातील ग्रह हे शनि, राहु, केतु यांच्या नक्षत्रात असता वरीलप्रमाणे फळ मिळते.

५) सप्तमात रवि, गुरु, चंद्र, शुक्र, बुध हे ग्रह असता समजातीय, उच्चवर्णीय जोडीदार मिळतो.

क) :- Relationship

ज्ञानाचा, शिक्षणाचा कारक ग्रह गुरु आहे. बुध बुद्धिमत्तेचा कारक आहे. चंद्र शुक्र कलेचे, सायन्सचे कारक आहे. हर्षल नेपच्यून हे प्र आधुनिक शिक्षणाचे संशोधनाचे कारक आहेत.. जोडीदाराचे शिक्षण हे सप्तमातील ग्रहाच्याप्रमाणे व सप्तमेशाप्रमाणे सांगावे. आजच्या काळात शिक्षणाच्या अनेक शाखा, उपशाखा असल्याने अचूक शिक्षण सांगणे अवघड जाते, मात्र मुख्य सायन्स, कला, कॉमर्स शाखेचा विचार सर्वप्रथम करावा व नंतर ग्रहाप्रमाणे उपशाखा, उच्चशिक्षण सांगण्याचा प्रयत्न करावा. ग्रहाचे कारकत्व, राशीचे शिक्षण माहीत असल्यास जवळपास शिक्षण सांगता येते.

१) सप्तमात गुरु किंवा सप्तमेश गुरु असता जोडीदार ज्ञानी,(Wedding Themes) उच्चशिक्षित मिळतो. विशेषत: शिक्षण क्षेत्राशी संबंधित, शिक्षण झालेला असतो.

२) सप्तमात बुध असता किंवा सप्तमेश बुध असता वाणिज्य शाखा, एम.बी.ए. मार्केटिंगसंबंधी शिक्षण झालेला जोडीदार मिळतो.

३) सप्तमात शनि असता जोडीदाराचे शिक्षण कमी किंवा अर्धवट झालेले असते तसेच सप्तमेश शनि असता जोडीदार इंजिनिअर, वकील किंवा कॉमर्स क्षेत्रामधील मिळतो

४) सप्तमात रवि, मंगळ असता तंत्रक्षेत्राशी संबंधित शिक्षण (इंजिनिअर) झालेला जोडीदार मिळतो.

५) सप्तमातील चंद्र, शुक्र असता जोडीदार समशिक्षित, कलेचे शिक्षण झालेला किंवा डॉक्टर मिळतो.

ड) जोडीदार नोकरदार किंवा व्यवसाय करणारा :- Free Marriage Counseling

१) चतुर्थात किंवा सप्तमात रवि किंवा शनि असता किंवा सप्तमेश रवि किंवा शनि असता जोडीदार नोकरदार मिळतो.

२) चतुर्थात किंवा सप्तमात बुध किंवा सप्तमेश बुध असल्यास जोडीदार व्यावसायिक मिळतो.

३) चतुर्थात हर्षल असता जोडीदार सतत नोकरी-व्यवसाय बदलणारा व चंचल असा मिळतो.

४) सप्तमात किंवा चतुर्थात गुरु असता जोडीदार शिक्षण क्षेत्राशी संबंधित काम करणारा मिळतो.

५) सप्तमात किंवा चतुर्थात शनि असता जोडीदार कंपनीत नोकरी करणारा मिळतो.

६) सप्तमात किंवा चतुर्थात बुध असता जोडीदार बँक, एल.आय.सी. एजंट, वकिली करणारा, शिकवणी घेणारा, किंवा कमिशन एजंट असा मिळतो.

७) सप्तमात चंद्र असता जोडीदार मानसोपचार तज्ज्ञ, बागबगीच्या संबंधित काम करणारा किंवा पाण्याशी संबंधित काम करणारा, नित्य प्रवास करणारा मिळतो. व्यवसायी मिळतो.

८) सप्तमात किंवा चतुर्थात शुक्र असता जोडीदार कलेशी संबंधित व्यवसाय करणारा किंवा स्त्रियांशी संबंधित व्यवसाय मिळतो.

इ) जोडीदाराचे अंतर :- Couple Counselling

१) सप्तमेश, रवि, शुक्र व चंद्र हे चार ग्रह कुंडलीत १ ते ४ स्थानात असता जोडीदाराचे जन्मठिकाण व राहण्याचे ठिकाण दोन्हीही आपल्या घरापासून २० कि.मी. च्या आत म्हणजे जवळच असते.

२) वरील चार ग्रह कुंडलीत पाच ते सात स्थानात असता जोडीदार पूर्वपरिचित किंवा मातुल घराण्यातल्या असा ५० ते २०० कि.मी. अंतरातील असतो.

३) वरील चार ग्रह कुंडलीत ८, १०, ११ या स्थानात असता जोडीदार नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने झालेल्या ओळखीचा असतो.

४) वरील चार ग्रह कुंडलीत ९ व १२ या स्थानात असता जोडीदार लांबचा, क्वचित परदेशातील मिळतो.

५) वरील ग्रहापैकी १ किंवा २ ग्रह १ ते ७ स्थानात असून उरलेले ग्रह ८ ते १२ स्थानात असता जोडीदाराचे जन्मस्थळ व राहण्याचे ठिकाण वेगवेगळे असू शकते.

६) जोडीदाराचे अंतर सांगताना पुरुषाच्या कुंडलीत सप्तमेश, शुक्र, चंद्र यांचा व स्त्रीच्या कुंडलीत सप्तमेश, शुक्र, रवि यांचा विचार करावा.

ई) जोडीदाराची दिशा :- Spouse Information

जोडीदार कोणत्या दिशेचा मिळेल हे कुंडलीतील सप्तमातील ग्रह, सप्तमेश यावरून सांगता येते. आपणांस कुंडलीतील स्थानांच्या दिशा माहित आहेत. त्याच बरोबर ग्रहांच्या दिशा व राशींच्या दिशाही माहीत आहेत या दिशांचा वापर करून जोडीदाराची दिशा सांगावी.

सप्तमेश व चंद्रराशी स्वामींच्या दिशेनुसार दिशा सांगावी.

अ) ग्रहाप्रमाणे दिशा :- Spouse Information

१) रविपूर्व
२) चंद्र –वायव्य
३) मंगळदक्षिण
४) बुधउत्तर
५) गुरुईशान्य
६) शुक्रआग्नेय
७) शनिपश्चिम
८) राहु केतु नैर्ऋत्यनैर्ऋत्य
ग्रहाप्रमाणे दिशा

ब ) राशीप्रमाणे दिशा :- Marriage Counseling Tips

१) मेष –पूर्व
२) वृषभ –दक्षिण
३) मिथुन –पश्चिम
४) कर्क –उत्तर
५) सिंहपूर्व
६) कन्यादक्षिण
७) तूळ –पश्चिम
८) वृश्चिक –उत्तर
९) धनु –पूर्व
१० ) मकर –दक्षिण
११) कुंभ –पश्चिम
१२) मीन-उत्तर
राशीप्रमाणे दिशा

थोडक्यात,

अग्नि राशी :- १, ५, ९पूर्व दिशा
पृथ्वी राशी :- २, ६, १०दक्षिण दिशा
वायु राशी :- ३, ७, ११पश्चिम दिशा
जल राशी :- ४, ८, १२उत्तर दिशा

ग) विवाह खर्च :-

१) सप्तमेश मंगळ असता किंवा सप्तमात मंगळ असता विवाहास अपेक्षेपेक्षा खर्च जास्त येतो.

२) सप्तमेश ६, ८, १२ व्या स्थानात असता विवाहास अपेक्षेपेक्षा खर्च जास्त येतो.

३) सप्तमेश मंगळ धनात असता स्वतःला खर्च जास्त करावा लागतो.

४) सप्तमेश अष्टमात किंवा अष्टमेश सप्तमात असता सासरचे लोक जास्त खर्च करतात.

फ) सासरी माणसे किती :- Spouse Information

१) अष्टमात चंद्र-शुक्र असता सासरी चार माणसे असतात.

२) अष्टमात रवि किंवा बुध असता सासरी पाच माणसे असतात.

३) अष्टमात मंगळ असता सासरी सहा माणसे असतात.

४) अष्टमात गुरु असता सासरी सातपेक्षा जास्त माणसे असतात.

५) अष्टमात शनि असता सासरी तीन किंवा त्यापेक्षा कमी माणसे असतात.

य) सासरची आर्थिक स्थिती कशी असेल :- Spouse Information

१) अष्टमात शुक्र, गुरु व बलवान चंद्र इ. शुभ ग्रह असता सासर मोठे, प्रतिष्ठित, गर्भश्रीमंत मिळते. नसल्यास विवाहानंतर आर्थिक स्थिती सुधारते.

२) अष्टमात मंगळ, शनि, राहु, केतु किंवा पापग्रह अशुभ स्थितीत असता सासर गरीब, कर्जबाजारी मिळते किंवा विवाहानंतर त्यांची आर्थिक स्थिती बिघडते.

ट) सासरच्या लोकांशी पटेल का.? :- Spouse Information

१) सप्तमात पापग्रह असता जोडीदाराशी मतभेद होतात, पटत नाही.

२) भाग्यस्थानात पापग्रह असता जोडीदाराच्या भावंडाशी पटत नाही.

३) दशमस्थानात पापग्रह असता सासूबरोबर पटत नाही.

४) चतुर्थात पापग्रह असता सासऱ्याबरोबर पटत नाही.

५) हर्षल ज्या स्थानात असतो त्या स्थानाने दर्शविलेल्या नातेवाइकांचा स्वभाव विक्षिप्त, लहरी, हेकट असतो.

६) वरील स्थानापैकी कोठेही शुभ ग्रह, बलवान स्थितीत असता व ते स्थान शुभ ग्रहाने दृष्ट असता उत्तम पटते.

१) जोडीदाराचे वर्णन :- Spouse Information

सप्तमात वृषभेचा चंद्र शनिदृष्ट व सप्तमेश शुक्र मेषेत गुरुदृष्ट असल्याने जोडीदार सुंदर, देखणा, गोल चेहऱ्याचा, मध्यम बांध्याचा, गौरवर्णीय असा व स्वभावाने चंचल, रसिक, विलासी, प्रेमी, आनंदी, धार्मिक, सात्त्विक, कलाप्रिय, सौंदर्यप्रिय, हौशी, टापटीपमध्ये राहणारा, नटण्यामुरडण्याची हौस असणारा असा मिळेल.

२) जोडीदाराची जात :- Spouse Information

सप्तमात चंद्र व सप्तमेश शुक्र असल्याने स्वजातीय, उच्चवर्णीय असा.

३) जोडीदाराचे शिक्षण :- Spouse Information

सप्तमात चंद्र व सप्तमेश शुक्र मंगळाच्या राशीत असल्याने जोडीदार समशिक्षित, वैद्यकीय शिक्षण झालेला असा.

४) जोडीदार नोकरदार की व्यवसायी :- Spouse Information

सप्तमात चंद्र व सप्तमेश शुक्र असल्याने कलेशी संबंधित काम करणारा व चतुर्थात बुध असल्याने व्यवसायी मिळेल.

५) जोडीदाराचे अंतर :- Spouse Information

सप्तमेश व शुक्र षष्ठात, रवि पंचमात, चंद्र सप्तमात असे चार ग्रह ५ ते ७ या स्थानात असल्याने जोडीदार पूर्वपरिचित, ओळखीचा तसेच १५० २०० कि.मी. अंतरामधील मिळेल. जन्मगाव व राहण्याचे ठिकाण एकच असेल. पतीकारक रवि पंचमात असल्याने शिक्षणाच्या ठिकाणी झालेल्या ओळखीचा मिळेल.

६) विवाहखर्च :- Spouse Information

सप्तमेश शुक्र षष्ठात असल्याने विवाहास खर्च खूप होतो.

७) सासरी माणसे किती :- Spouse Information

सप्तमेश शुक्र गुरुदृष्ट त्यामुळे सासरी माणसे चार असतील.

८) सासरची आर्थिक स्थिती :- Spouse Information

सप्तमात चंद्र असल्याने व गुरुची धनस्थानावर दृष्टी असल्याने सासर श्रीमंत व विवाहानंतर भाग्योदय होईल, आर्थिक स्थिती सुधारेल.

९) सासरच्या माणसांशी संबंध :- Spouse Information

सप्तमात चंद्र असल्याने पतीशी उत्तम पटेल. चतुर्थात बुध-केतु असून पापग्रहांच्या संपूर्ण दृष्टीत तसेच वृश्चिक लग्नाचा अशुभ ग्रह बुध असल्याने सासरा नसलेला जोडीदार मिळेल किंवा सासरा असल्यास त्याच्याशी पटणार नाही.

दशमात सर्व पापग्रहांची गर्दी असल्याने व दशमातील सिंहेच्या मंगळ, राहु, शनि, गुरु युतीने सासू कडक, वर्चस्व गाजविणारी, गर्विष्ठ, अहंकारी, माझेच खरे करणारी असल्याने सासूशी अजिबात पटणार नाही..

सासर संख्या :-

वरील स्त्री जातकाच्या कुंडलीवरून जोडीदारासंबंधी माहिती आपण अशाप्रकारे सांगू शकतो. प्रत्यक्षात ही स्त्री एक बी. ए. एम. एस. डॉक्टर असून हिने शिक्षण चालू असताना तेथील पूर्वपरिचित, ओळखीच्या स्वजातीय अशा मुलाशी विवाह केला असून तिचा जोडीदार डॉक्टर (एम.डी) उच्चशिक्षित, समशिक्षित आहे. जोडीदार २०० कि.मी. अंतरामधील असून जन्मगावीच राहतो. तो वैद्यकीय व्यवसायी आहे. हिच्या पतीच्या वडिलांचा मृत्यू झालेला असून घरी चार माणसे आहेत. सासूशी अजिबात पटत नाही.

हिचा पती दिसावयास सुंदर, देखणा, गोरा, ५ फूट ५ इंच उंचीचा, रसिक, हौशी, विलासी, कलाप्रिय असा आहे. हिला विवाहास खर्च करावा लागला.

मार्गदर्शन :-

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevasprathishthan@gmail.com या वर मला Email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,

Horoscope 8 July 2024

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित 
श्रीपाद विनायक जोशी (गुरुजी)
+91 94202 70997 +91 94232 70997
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,
संतती समस्या विशेतज्ञ
ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ, व्यसन मुक्ती औषध तज्ञ
(दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Weekly Love Horoscope 18 To 24 November 2024

Weekly Love Horoscope 18 To 24 November 2024: साप्ताहिक प्रेम राशीभविष्य १८ ते २४ नोव्हेंबर २०२४: मेषसह ३ राशींच्या नात्यात गैरसमज; या ३ लकी राशींना नोकरीत पदोन्नतीच्या संधी; गुरुपुष्य योगात होईल भरभराट! अनावश्यक वाद टाळा, 

Read More »

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!