Tulsa Tree, तुळस ही वनस्पती जवळपास प्रत्येक घरात आपल्याला दिसून येते. हिंदूंच्या श्रद्धेनुसार तुळस ही अत्यंत शुभ मानली जाते.
कारण, त्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास आहे, असं म्हटलं जातं.
याशिवाय तुळस घरासाठी फायदेशीर मानली जाते.
तुळस भरपूर ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्याने ती आपल्यासाठी फारच उपयोगी आहे.
तसेच आयुर्वेदात देखील तुळशीचे बहुगुणी उपयोग असल्याचं म्हटलं आहे.
त्यामुळे तुळस ही आपल्या घरी असणं केव्हाही चांगलंच आहे.
वास्तुशास्त्रानुसार :- Tulsa Tree
वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये तुळस कुठे ठेवावी, यालाही काही शास्त्र (Shastra) आहे.
घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो, याला महत्त्व आहे.
तुळशीचे रोप योग्य दिशेने ठेवल्यास घरात नेहमी सुख-समृद्धी राहते, असे म्हटले जाते.
तुळशीचे रोप लावण्याची दिशा महत्त्वाची असते,
त्याचप्रमाणे ती योग्य दिवशी लावण्याचा सल्लाही दिला जातो.
तुळस ठेवण्याची दिशा आणि जागेला शास्त्रात महत्त्व असून,
चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.
त्यामुळे तुळस ठेवण्याची योग्य जागा आणि दिशा (Direction) कोणती आहे,
हे आज आपण जाणून घेऊयात.
सकारात्मक ऊर्जा :- Tulsa Tree
तुळशीचं रोप घरात असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, असं म्हणतात.
वास्तुशास्त्रानुसार,, घराच्या छतावर तुळस ठेवू नये, असं म्हटलं जातं.
घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान व्हायला लागतं.
त्यामुळे तुळस योग्य ठिकाणी ठेवावी, असे सांगितले आहे.
दारात तुळशीचे रोप लावणे वास्तूशास्त्रानुसार, शुभ मानले जात नाही.
कारण, हे पूजनीय असून ते घराबाहेर ठेवल्याने आणि ये-जा करताना
सर्वांची नजर त्यावर पडल्याने त्याचे शुभकार्य कमी होते, असे सांगितले आहे.
तुळशीचे रोप कुठे ठेवावे? :-
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते.
उत्तर दिशेला ठेवणे शक्य नसेल तर उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला लावू शकता.
तसेच तुळशीचे रोप बाल्कनीत किंवा खिडकीजवळ उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला ठेवता येईल.
यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. तसेच गुरुवारी तुळशीचे रोप लावण्याला विशेष महत्त्व आहे.
या दिवशी तुळस लावल्याने भगवान श्री विष्णूची कृपाही प्राप्त होते.
तसेच शनिवारी तुळशीचे रोप लावल्यास आर्थिक समस्या दूर होतात, असे मानले जाते.
रविवारी तुळस का तोडू नये :-
हिंदू धर्मात तुळस ही वनस्पती खूप शुभ मानली जाते.
तुळशीला रोज पाणी घालणे आणि पूजेसाठी किंवा खाण्यासाठी तुळस तोडणे चांगले असते.
मात्र रविवारी तुळस तोडणे आणि तिला पाणी घालणे व्यर्ज मानण्यात आले आहे.
असे मानले जाते की, रविवारी तुळस ही भगवान विष्णूंसाठी उपवास करते.
या दिवशी तुळशीला जल अर्पण केल्यास किंवा तिचे पाने तोडल्यास तिचा उपवास मोडतो .
असे केल्याने नकारात्मकता पसरते. जीवनाशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
एकादशीला तुळशीला पाणी का घालू नये :-
असे मानले जाते की एकादशीला तुळशीचा विवाह विष्णूचे रूप असलेल्या शालिग्रामशी झाला होता. धार्मिक मान्यतेनुसार
देवउठी एकादशीला दोघांनी रितीरिवाजानुसार लग्न केल्याची पुराणात माहिती आहे.
एकादशीला तुळस उपवास ठेवते, असाही समज आहे.
या त्यादिवशी तुळशीला जल अर्पण करून त्यांचे व्रत मोडले जाते.
त्यामुळे तुळस सुकायला लागतात.
मार्गदर्शन :-
ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!
आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.
(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
अधिक माहिती साठी संपर्क :-
श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,(संतती समस्या निवारण विशेतज्ञ)