Wife Horoscope: 100 Positive And Negative Effects जन्मकुंडलीच्या आधारे आपल्या पत्नीची निवड करा; स्त्री जातकाच्या कुंडलीतील सप्तम भाव सौभाग्य दर्शवितो;

Wife Horoscope

Wife Horoscope: 100 Positive And Negative Effects जन्मकुंडलीच्या आधारे आपल्या पत्नीची निवड करा; स्त्री जातकाच्या कुंडलीतील सप्तम भाव सौभाग्य दर्शवितो;

Wife Horoscope: स्त्रीच्या जन्मकुंडलीत वेगवेगळ्या स्थानी असलेल्या ग्रहांचा परिणाम काय होतो याबद्दलची माहिती ‘स्त्री जातक’ या बृहद् ग्रंथात दिलेली आहे. ‘स्त्री जातक’ या ग्रंथातील प्रमुख योगांची माहिती येथे मुद्दाम देत आहे. या ग्रहयोगांच्या सहाय्याने स्त्रीच्या जन्मकुंडलीवरुन तिचा स्वभाव, चारित्र्य, भावी जीवन इत्यादिंची माहिती मिळवून आपल्या भावी पत्नीची निवड करते वेळी खूप उपयोग होईल अशी आशा आहे.

स्त्री जातकाच्या कुंडलीतील सप्तम भाव Wife Horoscope

कुंडलीतील सप्तमभाव हे वैवाहिक जीवनाचे व भागीदाराचे स्थान आहे. या भावात बसलेले ग्रह आपले विशिष्ट फल खालील प्रमाणे देतात.

१) ज्या स्त्रीच्या कुंडलीत सप्तमस्थानी रवि असेल तर ती स्त्री कुरुप, पापिणी, निर्लज्ज, चंचल व काळी सावळी असते. ती पतिकडून त्यक्त म्हणजे परित्यक्त्या व पतिसुखाला पारखी होते.

२) ज्या स्त्रीच्या सप्तमस्थानी चंद्र असेल ती स्त्री चतुर, सुंदर, पतिस प्रिय, मधुर भाषिणी, धार्मिक, लज्जायुक्त, विवेकी व गुणवान पतिची पत्नी असते. चंद्र जर क्षीण असेल तर ती पतिसुखाला पारखी असते. चंद्र उच्च असेल तर ती सुंदरी धनवान व वस्त्राभूषणांनी संपन्न असते.

३) जिच्या कुंडलीच्या सप्तमस्थानी मंगळ असेल व तो कोणत्याही शुभ ग्रहाने दृष्ट नसेल तर अशी स्त्री गुणहीन, ऐश्वर्यहीन, कुरुप, दुष्ट स्वभावाची, परपुरुष गामिनी व विधवा होते. जर हा मंगळ शुभ असेल किंवा शुभ ग्रहाने दृष्ट असेल तर ती दुःखी, दुष्ट स्थभावाची, चंचल व परपुरुषात आसक्त राहणारी असते. काहींच्या मते अशी स्त्री सौभाग्यहीन असते.

४) ज्या स्त्री जातकाच्या सप्तमस्थानी बुध असेल ती स्त्री नम्र, चतुर, मधुर-भाषिणी, सुखी, संततीयुक्त, रुपवती, गृहकार्यदक्ष व सुंदर पतिची पत्नी असते. बुध उच्चीचा असेल तर तिचा पति सुंदर व धनवान असतो.

५) ज्या स्त्री जातकाच्या सप्तमस्थानी गुरु असेल ती स्त्री गुणवती, शीलवती, शास्त्रज्ञ, पतिप्रिया, पतिव्रता, सर्व सुखांनी संपन्न व श्रेष्ठ पतिची पत्नी असते. जर गुरु उच्चीचा असेल तर ती सुंदरी धनी असते व अनेक गुणांनी युक्त असते.

इतर ;- Wife Horoscope

६) ज्या स्त्रीच्या सप्तमस्थानी शुक्र असेल ती स्त्री सर्वमान्यं, कलानिपुण, रुपवान, वस्त्राभूषणांने संपन्न, रतिप्रिया, प्रभावशालिनी, पतिप्रिया व उत्तम पतिची पत्नी असते. तिचा पति कामकलेत प्रवीण, गुणवान, धनवान व श्रेष्ठ पुरुष असतो.

७) ज्या स्त्रीच्या सप्तमस्थानी शनि असेल ती स्त्री कपटी, शोकसंतप्त, मत्सर करणारी, पतिद्वारा परित्यक्ता, नींदनीय कार्य करणारी अशी असते. काहींच्या मते अशा स्त्रीचा पति दरिद्री, रोगी व व्यसनी असतो. शनि उच्चीचा असेल तर पति-पत्नी दोघेही धनवान, गुणवान व चारित्र्यसंपन्न असतात.

८) ज्या स्त्रीच्या सप्तमस्थानी राहू असेल ती स्त्री कुरुप, दुश्चरित्र, क्रोधी, मध्यम भाग्यवान, विधवा किंवा अधम पतिची पत्नी असते. जर राहू उच्चीचा असेल तर तिला सुंदर व नीरोगी पति मिळतो.

९) ज्या स्त्रीच्या सप्तम स्थानात केतू असेल अशी स्त्री सदैव व्यग्र असते. रस्त्यात शत्रूभय असते. ती धननाश करते व पतिला त्रास देते.

१०) स्त्री जातकाच्या कुंडलीत लग्नी किंवा चंद्रापासून सप्तमस्थानी चंद्र असेल तर ती स्त्री परित्यक्ता असते. काहींच्या मते ती कर्कशा, दुष्ट स्वभावाची व पतिप्रेमाला पारखी असते.

११) स्त्रीच्या सप्तमस्थानी कर्क राशीचा मंगळ असेल तर अशी स्त्री घर सोडून निघून जाते व स्वेच्छेने व्यभिचार करते.

कोणती स्त्री दुराचारिणी असते ? Wife Horoscope

स्त्रीच्या जन्मकुंडलीत खालील ग्रहयोग असतील तर ती स्त्री दुराचारिणी असते किंवा बनते.

१) जर कुंडलीतील लग्न मेष, मिथुन, सिंह, तुळ, धनु, कुंभ, यापैकी एका विषम राशीत असेल, शनि मध्यम स्थानी असेल, चंद्र, शुक्र आणि बुध बलहीन असतील व रवि, मंगळ आणि गुरु बलवान असतील तर अशी स्त्री बहुपुरुष गामिनी असते.

२) जर कुंडलीत लग्नस्थानी मेष, वृश्चिक, मकर किंवा कुंभ राशी असेल आणि पापग्रहाने दृष्ट चंद्र शुक्राबरोबर तेथे असेल तर अशी स्त्री व्याभिचारिणी असते.

३) जर सप्तमस्थानी कर्क किंवा सिंह राशि असेल आणि तिथेच शनिबरोबर मंगळ असेल तर अशी स्त्री चांगल्या कुळात जन्म घेते परंतु विधवा होते किंवा धोख्याने आपल्या पतिचा त्याग करुन व्याभिचारिणी किंवा वेश्या बनते. अशी स्त्री श्रीमंत असते पण खूपच वाईट स्वभावाची असते.

४) जर सप्तमस्थानी पापग्रहांनी दृष्ट शुक्र असेल तर अशी स्त्री घर सोडून जाते व स्वेच्छेने व्यभिचार करते.

५) जर सप्तमस्थानी दोन पापग्रहांची दृष्टी असेल अथवा दोन पापग्रहांनी युक्त सप्तमस्थान असेल तर अशी स्त्री दुराचारिणी व नीच स्वभावाची असते.

६) जर सप्तमस्थानी बलवान पापग्रह असतील व त्यांच्यावर पांपग्रहांची दृष्टी सुध्दा असेल तर अशा स्त्रीला पतिचे सुख कधी मिळत नाही व ती आधीपासूनच दुराचारिणी असते.

७) सप्तमस्थानी मेष, मकर, कुंभ किंवा वृश्चिक राशी असेल तर आणि तिथे चंद्र व शुक्र दोघेही असतील व त्यांच्यावर पापग्रहांची दृष्टी सुध्दा असेल तर अशा. ग्रहयोगाची स्त्री आपल्या आईसह पर पुरुषगमन करणारी असते.

इतर :- Wife Horoscope

८) जर सप्तमस्थानी बलहीन शुभ ग्रहाबरोबर पापग्रह सुध्दा असतील तर अशी स्त्री आपल्या पतिला सोडून दूसऱ्या पुरुषाची पत्नी बनते.

९) जर सप्तमस्थानी तीन पापग्रह असतील किंवा सप्तमस्थानावर तीन पापग्रहांची दृष्टी असेल तर अशी स्त्री आपल्या पतिला सोडून दूसऱ्या पुरुषाला पति म्हणून स्वीकारते.

१०) जर सप्तमस्थानी चंद्राबरोबर मंगळ सुध्दा असेल तर अशी स्त्री आपल्या आईच्या संमत्तीने किंवा आज्ञेने परपुरुषगमन करते. काहींच्या मते सप्तमस्थानी चंद्र, मंगळ, शुक्र हे तीनही ग्रह असतील तरी वरील प्रमाणेच फळ मिळते.

११) जर अष्टमस्थानी मंगळ किंवा राहू असेल तर अशी स्त्री परपुरुषगामिनी असते

१२) जर धनेश शुक्र राहूने युक्त असेल किंवा धनेश मंगळ शनिने युक्त असेल तर अशी स्त्री व्याभिचारिणी असते.

१३) जर लग्न किंवा चंद्रापासून द्वितीय व द्वादश स्थानी पापग्रह असतील आणि त्यावर शुभग्रहाची दृष्टी नसेल तर अशी स्त्री आपल्या वडिलांच्या व सासऱ्यांच्या कुळाला बट्टा लावीत व्याभिचारिणी बनते.

विष कन्या योगापासून आपला बचाव करा Wife Horoscope

ज्योतिष शास्त्रात उल्लेखलेला ‘विष कन्या योग’ एक मोठा घातक योग आहे. ‘विष कन्या योग’ ज्या स्त्रीच्या कुंडलीत असेल ती स्त्री शोकसंतप्त, निर्धन व आपल्या पतिचे अमंगल करणारी असते. ज्या मुलीच्या कुंडलीत असा योग असेल तिच्याशी विवाह करु नये असे शास्त्र सांगते. ‘विष कन्या योग’ कुंडलीत होण्यासाठी खालील गोष्टी जन्मकुंडलीत असाव्या लागतात. Wife Horoscope

१) शनिवारी द्वितीया तिथी व आश्लेषा नक्षत्र, मंगळवारी सप्तमी तिथी व शततारका नक्षत्र, रविवारी व्दादशी तिथी व विशाखा नक्षत्र या पैकी एका योगावर मुलीचा जन्म झाला असता ‘विष कन्या योग’ होतो.

२) रविवारी द्वादशी तिथी व शततारका नक्षत्र, मंगळवारी द्वितीया तिथी व आश्लेषा नक्षत्र, शनिवारी सप्तमी तिथी व कृतिका नक्षत्र यापैकी एका योगावर मुलीचा जन्म झाला तर ती ‘विष कन्या’ असते. Wife Horoscope

विवाह व वैध्यव्य संबंधी योग Wife Horoscope

विवाह, वैधव्य आणि पतिपरित्याग या संबंधीचे काही प्रमुख योग खालील प्रमाणे आहेत. Wife Horoscope

१) जर जन्मकुंडलीत लग्न किंवा चंद्रापासून सप्तमस्थानी शनि असेल व त्यावर पापग्रहांची दृष्टी सुध्दा असेल तर अशा ग्रहयोगाची कन्या आजीवन अविवाहित राहते. जर सप्तमस्थानावर शुभ ग्रहाची दृष्टी असेल तर खूप वय झाल्यावर तिचा विवाह होतो.

२) जर शनि सप्तमेशा बरोबर असेल तर अशा स्त्रीचा विवाह खूप विलंबाने व वाढलेल्या वयानंतर होतो.

३) जर सप्तमस्थानी शनि व लग्नी किंवा चतुर्थ स्थानी ४ अंशापर्यंतचा मंगळ असेल तर अशी स्त्री अविवाहित राहते.

४) जर सप्तमेश ग्रह कोणत्याही पापग्रहाच्या दृष्टित किंवा युतीत असेल व सप्तमस्थानी पापग्रह असेल तर अशी स्त्री बिन लग्नाचीच राहते.

५) जर रवि-हर्षल यांचा ‘इत्थशाल’ योग कुंडलीत होत असेल तर अशी स्त्री स्वच्छन्दपणा व उद्दाम वासनेच्या आहारी जाऊन ‘प्रेमविवाह’ करते.

९) ज्या स्त्रीच्या सप्तमस्थानी शुभ व अशुभ, दोन्हीं प्रकारचे ग्रह असतील तर त्या स्त्रीचे दोन विवाह होतात. Wife Horoscope

कोणते ग्रह स्त्रीला पति-परित्यक्त्या बनवितात ? Wife Horoscope

स्त्रीच्या कुंडलीत खालील ग्रहयोग असतील तर अशी स्त्री स्वतः होऊन पतिचा त्याग करते किंवा पति तिला सोडून देतो.

१) जन्मकुंडलीत रवि सप्तमस्थानी असेल अशा स्त्रीला तिचा पति सोडून देतो. Wife Horoscope

२) जर लग्नेश व सप्तमेश षष्ठ, अष्टम स्थानी किंवा द्वितीय, व्यय स्थानी असेल अथवा अष्टमेश पापग्रहाने पीडित असेल तर अशा स्त्रीचे वैवाहिक जीवन दुःखमय असते व तिला तिचा पति सोडून देतो.

३) जर सप्तमस्थान बलहीन पापग्रहाने युक्त असेल किंवा दृष्ट असेल तरी सुध्दा वैवाहिक जीवन दुःखमय असते आणि ती स्त्री पतिद्वारा त्यागली जाते.

४) सप्तमस्थानी एक पापग्रह असेल आणि त्यावर कोणा शुभ ग्रहाची दृष्टी नसेल तर अशा स्त्रीचा पति तिचा त्याग करतो.

५) जर सप्तमस्थानी रवि, मंगळ व हीनबली शनि असेल आणि यांच्यावर शुभग्रहांची दृष्ही नसेलं तर अशा स्त्रीचा त्याग तिचा पति करतो.

वैधव्य योग Wife Horoscope

स्त्रीच्या कुंडलीत खालील ग्रहयोग असतील तर त्या स्त्रीला वैधव्ययोग येऊन ती विधवा बनते.

१) जर लग्नी रवि, मंगळ व राहू हे तीन ग्रह असतील तर अशी स्त्री वैधव्य योगामुळे विधवा होते आणि अशा ग्रहस्थितित द्वितीय स्थानी शुक्र सुध्दा असेल तर पहिल्या पतिचा मृत्यू झाल्यावर ती दूसरा विवाह करते.

२) जर लग्नी पापग्रहाने युक्त राहू असेल व अष्टमस्थानी मंगळ असेल तर अशी स्त्री बालविधवा होते. Wife Horoscope

३) जर लग्नापासून सातव्या स्थानी किंवा आठव्या स्थानी रवि, मंगळ, शनि व राहू हे चार ग्रह असतील तर अशी स्त्री विधवा होते.

४) जर लग्नी किंवा सप्तमस्थानी पापग्रह असतील व षष्ठ किंवा अष्टम स्थानी चंद्र असेल तर अशी मुलगी विवाहापासून आठव्या वर्षी विधवा होते.

५) जर आठव्या किंवा बाराव्या स्थानी मेष किंवा वृश्चिक राशीचा राहू असेल तर अशी स्त्री विधवा होते. Wife Horoscope

६) सप्तमस्थानी राहू असून लग्नस्थानी मंगळ असेल व त्याची दृष्टी शुभ नसेल तर अशी स्त्री विधवा होते.

७) जर सप्तमस्थानी सप्तमेश कोणत्याही शुभ ग्रहाने युक्त असेल किंवा दृष्ट नसेल, तो दोन पापग्रहांच्या मध्ये असेल तर अशी स्त्री विधवा होते.

८) लग्नेश व अष्टमेश व्ययस्थानी असतील आणि अष्टमस्थानावर कोणत्याही ग्रहाची दृष्टी सुध्दा असेल तर अशी स्त्री विधवा होते.

९) जर कुंडलीत अष्टमस्थानी राहू चंद्र असतील व त्यांच्यावर कोणत्याही पापग्रहाची दृष्टि सुध्दा असेल आणि सप्तमस्थानाच्या स्वामीवर सुध्दा क्रूर ग्रहाची दृष्टि असेल तर अशी स्त्री विधवा होते.

इतर :- Wife Horoscope

१०) जर सप्तमेश व अष्टमेश अष्टमस्थानी असतील व ते पापग्रहाने दृष्ट किंवा युक्त असतील तर अशी स्त्री विधवा होते.

११) जर द्वितीय किंवा सप्तमस्थानी कोणताही पापग्रह असेल तरी सुध्दा अशी स्त्री विधवा होते.

१२) सप्तमस्थानी पापग्रहाने दृष्ट मंगळ असेल तर अशी स्त्री विधवा होते. Wife Horoscope

१३) जर सप्तमस्थानी शनि असेल आणि पापग्रहांची त्यावर दृष्टी सुध्दा असेल तर अशा स्त्रीचा एक तर विवाहच होत नाही व झालाच तर ती लवकरच विधवा होते. अशी स्त्री आपल्या पतिची शत्रू असते.

१४) लग्न व चंद्र यापैकी जो बलवानं असेल त्याच्यापासून सातव्या स्थानात जर मंगळ असेल व त्याच्यावर पापग्रहाची दृष्टी असेल. तर अशी स्त्री वालविधवा होते.

१५) जर अष्टमस्थानी क्रूर किंवा पापग्ग्रह असेल तर अशी स्त्री विधवा होते. जर लग्न किंवा कुंडलीतील चंद्रापासून सप्तम आणि अष्टम स्थानी तीन किंवा चार ग्रह असतील तर अशी स्त्री विधवा होते.

१६) लग्न व सप्तम दोन्हीं स्थानी पापग्रह असतील अशी स्त्री विवाहानंतर सात-आठ वर्षांनी विधवा होते.

१७) सप्तमेश अष्टम स्थानी असेल व अष्टमेश सप्तम स्थानी असेल तर अशी स्त्री विधवा होते.

१८) सप्तमस्थानी सर्व किंवा वरेचसे पापग्रह असतील तर अशी स्त्री विधवा होते.

स्त्रियांचे निःसंतान योग Wife Horoscope

खालील ग्रहयोग स्त्री जातकाच्या कुंडलीत असतील तर ती स्त्री निःसंतान -बांझोटी असते व तिला संतति होत नाही.

१) पंचमस्थानी पापग्रहाची राशी असेल आणि पंचम स्थान पापग्रहाने युक्त किंवा दृष्ट असेल तर अशी स्त्री वंध्या असते.

२) लगी मेष, वृश्चिक किंवा मकर रास असेल व त्यावर पापग्रहांची दृष्टी असेल तर अशी स्त्री वंध्या असते.

३) जर अष्टमस्थानी चंद्र व बुध असतील तर अशी स्त्री ‘काकवंध्या’ असते. तिला एकच मूल होते.

४) जर पंचमस्थानी तीन पापग्रह असतील किंवा तीन पापग्रहांची दृष्टि असेल व पंचमेश शत्रू राशीत असेल तर ही स्त्री वंध्या असते.

५) जर पति-पत्नी दोघांच्या कुंडल्यात शनि किंवा हर्षल तुळ राशीत असेल तर अशा जातकांना संततीचे सुख मिळत नाही.

मार्गदर्शन :-

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा लेख आवडला असेल आणि तो उपयुक्त वाटला असेल. कृपया आपल्या कुटुंब आणि मित्रांसह सामायिक करा आणि अधिक लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या

अश्याच नवनवीन लेख ची सूचना आपल्याला वेळोवेळी मिळत राहावी या साठी खालील WhatsApp वर क्लिक करावे.

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevasprathishthan@Gmail.Com या वर मला Email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित 
श्रीपाद विनायक जोशी (गुरुजी)
9420270997 – ९४२०२७०९९७
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,
संतती समस्या विशेतज्ञ
सामुद्रिक ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ , व्यसन मुक्ती औषध तज्ञ
( दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)

Share someone who needs a little cosmic boost in their life!"

Facebook
X
LinkedIn
Telegram
WhatsApp

मार्गदर्शन : -

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा लेख आवडला असेल आणि तो उपयुक्त वाटला असेल. कृपया आपल्या कुटुंब आणि मित्रांसह सामायिक करा.

अश्याच नवनवीन लेख ची सूचना आपल्याला वेळोवेळी मिळत राहावी या साठी खालील WhatsApp / Telegram वर क्लिक करावे.

Recent Post

Numerology Weekly Horoscope 13 to 19 April 2025

Numerology Weekly Horoscope 13 to 19 April 2025: अंकशास्त्र साप्ताहिक राशीभविष्य १३ ते १९ एप्रिल २०२५: २, ४, ७ मुलांक शुक्र करणार मालामाल; नक्षत्र परिवर्तनाचा जबरदस्त प्रभाव धनसंपत्ती अन् प्रमोशनही देणार; Best 10 Positive And Negative Effect

Read More »
Mercury Transits in Pisces

Mercury Transits in Pisces: मीन राशीत बुध मार्गी: या राशींना विशेषतः विशेष प्रभाव,, अचानक आर्थिक लाभ; करिअर आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता; कोणत्या राशीं त्रास वाढेल; कोणाला यश मिळेल? जाणून घ्या; Best 10 Positive And Negative

Read More »

Web Developer

error: Content is protected !!