Offspring, संतती सुख योग कसे तयार होतात, संतती प्राप्ती कश्या प्रकारे होते. ज्योतिष शास्त्रानुसार भविष्यातील जोडप्याची आर्थिक स्थिती कशी असेल, त्यांचे कुटुंब कसे चालेल हे कुंडलीच्या मिश्रणावरून कळते, त्यांना किती मुले असतील.? हिंदू धर्मात मूल झाल्यावरच विवाहाचे यश पूर्ण मानले जाते. पंचम स्थानात वेगवेगळ्या ग्रहांची वेगवेगळी फळे वेगवेगळ्या प्रकारे संतती सुख देतात. त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील मुलांचे सुख देखील घरांची बेरीज असते,
जी व्यक्तीच्या जीवनातील मुला-मुलींची संख्या ठरवते. चला जाणून घेऊया कोणते ग्रह अधिक पुत्र आणि कन्या योग निर्माण करतात. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत,जेव्हा पुरुष गृह बिंदू गुरूच्या अष्टक वर्गातील गुरुकडून पाचव्या भावात मुलगा आणि स्त्री गृहबिंदू देतो, तेव्हा कन्या जन्माला येते. एखाद्याच्या कुंडलीत स्त्री-पुरुष दोन्ही घरांचे योग कारक असतील तर त्या व्यक्तीला मुलगा आणि मुलगी दोघांचेही सुख प्राप्त होते.
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि चंद्र हे स्त्री गृह मानले जातात, तर सूर्य, मंगळ, गुरू हे पुरुष गृह मानले जातात आणि राहू आणि केतू हे दोन ग्रह अशुभ गृह मानले जातात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये, त्या व्यक्तीचा पुरुष कारक मुलगा असतो आणि जर पुरुष कारक स्त्री असेल तर मुलगी होण्याची शक्यता निर्माण होते.
शनी बुध :-
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि व बुध विषम राशीत योग कारक असेल तर मुलगा जन्माला येतो आणि सम राशीत असल्यास कन्या जन्माला येते. तसेच सातव्या घरात पुरुषाचे घर असेल तर मुलगा आणि स्त्री घरामध्ये असेल तर कन्या सुखाची प्राप्ती होते. संतती न होण्याचे समाजातील प्रमाण मोठे आहे. आणि गेल्या काही वर्षात विविध कारणांनी ते वाढले आहे. याचे एक कारण म्हणजे प्रेमविवाहाचे वाढते प्रमाण, प्रेमविवाहात जोडिदारांच्या पत्रिका जुळत आहेत की नाही हा मुद्दा पूर्णपणे दुर्लक्षित होतो. आणि त्यानंतर त्याचे दुष्परिणाम संतती न होणे, संतती होऊन जाणे, वारंवार गर्भपात होणे, त्यातून येणारे नैराश्य, जोडीदारांचे एकमेकांशी न पटणे, तुझ्यामुळे माझे आयुष्य बरबाद झाले, अशा स्वरूपाचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप, आणि त्याची परिणती म्हणजे घटस्फोट आणि विभक्तता.
त्याचप्रमाणे काहीजणांच्या कुंडलीत मुळातचं संततीसौख्य नसतं.त्यांना अनेक ट्रिटमेंट घेऊनही आणि विविध डॉक्टरांकडे जाऊनही संतानप्राप्ती होत नाही. मुळात जर कुंडलीमध्ये काय आहे, हे जाणून घेतले तर वरील गोष्टींपासून आपोआप वाचता येतं. जर का दोघांपैकी एकाच्या कुंडलीत “वंध्यायोग” असेल (बीज-क्षेत्र अत्यंत कमकुवत ज्यामुळे गर्भधारणा होऊच शकत नाही) “मृतवंध्या” योग असेल (मूल होऊन ते जाणे किंवा मृत बालक जन्मास येणे)
किंवा “काकवंध्या” योग असेल ( संतती मानसिकदृष्ट्या विकलांग असणे – पंचमात बुध पापग्रहाने बिघडल्यास) “नपुसंक” योग असेल ( पंचम आणि सप्तम भाव शनि, बुध, केतुने बिघडल्यास) आणि तो आधी समजला तर पुढे काय होणार आहे याची आगाऊ कल्पना असल्यामुळे संतानप्राप्ती न होताही अशी जोडपी आनंदाने एकमेकांबरोबर राहू शकतात. त्याचप्रमाणे ठराविक कालावधीपर्यंत वाट पाहून पुढे दत्तक घेण्याचा विचारही करू शकतात.
ज्योतिष शास्त्र काय म्हणते. :- Offspring
ज्योतिषामध्ये संततीसंबंधी ज्या विविध गोष्टी सांगितल्या आहेत त्यातील महत्वाची म्हणजे बीज क्षेत्र विचार ही आहे. त्यामध्ये स्त्री आणि पुरूषाची Fertility ( IVF) कितपत प्रभावी आहे, त्यांना मूल होऊ शकते की नाही याचा सखोल विचार केलेला आहे.
बीज- क्षेत्र विचार :- Offspring
बीज म्हणजे पुरूषाचे वीर्य आणि क्षेत्र म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयाची धारणाशक्ती. बीजाची बलवत्ता म्हणजे केवळ वीर्य संख्या नव्हे तर त्या वीर्य ची ताकद. त्यात गर्भधारणेची शक्ती आहे की नाही याचा विचार हा बीजावरून केला जातो. बीज कमकुवत असेल तर वीर्य संख्या चांगला असूनही गर्भधारणा होत नाही कारण कमकुवत बीजात स्त्रीच्या गर्भाशयापर्यंत पोहोचून तेथे स्त्रीबीजाचा संपर्क होईपर्यंत जिवंत राहण्याची क्षमता नसते.
क्षेत्र म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयाची धारणाशक्ती. जर क्षेत्र दुर्बल असेल, त्यात योग्य वेळी योग्य ताकदीचे स्त्रीबीज येऊन टिकत नसेल तर पुरूषबीज कितीही बलवान असले तरी गर्भधारणा होत नाही. फलज्योतिषात याचा फार सखोल विचार केला आहे. त्यासाठी पुरूष आणि स्त्री दोघांच्या कुंडलीतील बीज आणि क्षेत्र तपासले जाते.
पुरूषबीजाची बलवत्ता तपासण्यासाठी पुरूष कुंडलीतील रवी (शक्तीचा कारक), शुक्र (वीर्याचा कारक) आणि गुरू (संततीचा कारक) यांच्या राशी, अंश आणि कलांच्या गणितातून पुरूषबीजासंबंधी निर्णय केला जातो. तसेच स्त्रीक्षेत्रासाठी स्त्री कुंडलीतील मंगळ (रक्ताचा आणि विटाळाचा कारक), चंद्र (गर्भधारणा शक्तीचा कारक) आणि गुरू (संततीकारक) यांच्या गणितातून स्त्रीबीजाचा अभ्यास केला जातो.
त्यानुसार दोघांची बलवत्ता ठरवून संतती होऊ शकेल की नाही, हा निर्णय होतो. आज आम्ही असे पाहतो की, अनेक ज्योतिषांना या गोष्टी माहीत देखिल नसतात. संततीची समस्या घेऊन कोणी त्यांच्याकडे गेले की ते ज्योतिषी केवळ पंचमस्थान, त्यातील राशी, त्यातील ग्रह, त्यावर दृष्टी असणारे ग्रह आणि कारक गुरूची कुंडलीतील स्थिती यावरून अनुमान काढत असतात.
त्यामुळे अनेकदा जातकांच्या शंकेचे निरसन होण्यापेक्षा त्यांच्या संभ्रमात भर पडते. तसे होऊ नये, ज्यांना या स्वरूपाची समस्या आहे त्यांना त्याबद्दल माहिती व्हावी हा या लेखाचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे ज्योतिषांकडे ही समस्या घेऊन गेल्यावर त्यांना बीज-क्षेत्रासंबंधी जरूर विचारावे.Offspring
(या लेखाचा उद्देेश कोणाला मानसिक दृष्ट्या दुखावण्याचा किंवा त्याच्यात कमी असलेली गुणवत्ता याचा खेळ करण्याचा अजिबात नाहीय, फक्त आणी फक्त ज्यांना भरपूर प्रयत्न करूनही संतती नाहीय फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे याचं प्रथम हेतू.)
मार्गदर्शन :-
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!
अश्याच नवनवीन लेख ची सूचना आपल्याला वेळोवेळी मिळत राहावी या साठी खालील WhatsApp वर क्लिक करावे.
आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.
( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
अधिक माहिती साठी संपर्क :-
श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997 9423270997
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन, (संतती समस्या विशेतज्ञ)
सामुद्रिक ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ , व्यसन मुक्ती औषध तज्ञ
( दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant