Complete information about Sagittarius धनु रास बारा राशीपैकी नववी रास होय. म्हणून ९ आकडा लिहिला तरी त्याचा अर्थ धनु राशी असा प्रचलित आहे. कुंडलीत राशींची नावे न लिहिता आकडेत लिहावयाचे असतात. म्हणूण प्रत्येक राशीचा अंक पाठ करावा.
१) नक्षत्र :-
मूळ नक्षत्राचे चार चरण, पूर्वाषाढा नक्षत्राचे चार चरण व उत्तराषाढा नक्षत्राचे पहिले चरण मिळून धनु रास बनते.
या राशीची आकृती धर्नुधारीची आहे. अर्धा मनुष्य व अर्धा घोडा अशी अश्वाची आकृती आहे. पृथ्वीवर पडणाऱ्या क्रांतीअंशावर आधारित विषुववृत्त रेखेपासून २० ते २५ अंशापर्यंत या राशीची व्याप्ती मानण्यात आली आहे.
२) धनु राशीची नांवे :- Complete information about Sagittarius
ध्वनी, धनु, चाप, शरासन व इंग्रजी (Sagittarius) (सेजिटेरिअस)
सम देहाची, करूणामय, पुरूष स्वभावाची, सौम्य, क्रूर, चंचल व शांत लक्षणाची, द्विस्वभावी, सत्वगुणी, अतित्वाची व पिवळसर रंगाची, दिवसबली, अल्पसंततीयुक्त, क्षत्रिय जातीची, पृष्ठोदयी विषम राशी आहे.
या राशीचे निवास स्थान सैंधव देश असून स्वामी गुरू व अंक ३ आहे. शरीरातील दोन्ही जांघा, छाती व कुल्ले यावर या राशीचा अंमल आहे. शस्त्र, घोडे, वाहने व मीठ, कंदमुळे बटाटे, अन्न, वस्त्र, रबर, चरबी, कागद- विमा, व्यापार व समुद्रात उत्पन्न होणाऱ्या वस्तू व औषधी विज्ञान इत्यादि या राशीच्या वर्चस्वाखाली येतात.
मेदिनीय ज्योतिषशास्त्रात स्पेन, अरब, ऑस्ट्रेलिया, हंगेरी इत्यादि देशांचे प्रतिनिधित्त्व धनु राशीकडे आहे.
३) मूळ नक्षत्राच्या जातकाची लक्षणे :-
मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती शिकण्याची आवढ असणाऱ्या, कार्यतत्पर निष्कपटी, हास्यप्रिय, सरळमनाच्या, पण रागीट, स्पष्टवक्ते, वाक्युद्धात प्रवीण हजरजबाबी, विषारी जिभेच्या अंधविश्वासू, धार्मिक कार्यात खूप खर्च करणाऱ्या, घमेंडी, दृढनिश्चयी, ज्योतिषप्रेमी, सुखी व संपत्तिवान असतात. बलवान शरीर, व हिंसक प्रवृत्तीचे, आपल्या युक्तीबळावर शत्रूना नामोहरम करणारे असे मूळ नक्षत्री जातक असतात.
जननकाळी घरातील परिस्थिती कांहीशी प्रतिकूल असते. कुटुंबावर आलेल्या अनेक प्रकारच्या संकट परंपरा बघायला मिळतात.
खोलबुद्धी असल्यामुले चांगले सल्लागार होतात. कांहीचे शिक्षण अपूर्ण राहते प्रवासातून आर्थिक फायदा होतो.
शरीराचा बांधा मजबूत व धिप्पाड असतो. मांड्या भरदार असतात. छाती काढून चालणयाची सवय असते.
वडिलांची संपत्ती व स्थावर इस्टेटीचा दीर्घकाळ उपभोग यांना मिळतो.
वकील, न्यायाधीश, शिक्षक, लेखक, ज्योतिषी, धार्मिक व्यवसाय, या क्षेत्रात यांची कर्तबगारी दिसून येते.
४) मूळ नक्षत्राच्या महिलांची लक्षणे :- Complete information about Sagittarius
मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या महिलांचा बांधा मजबूत, धिप्पाड असतो. मांड्या, छाती व नितंब भरदार असतात. कुटुंबातील व्यक्तींशी यांचे पटत नाही.
रागीट स्वभावाच्या व आपलेच खरे मानणाऱ्या असतात. धैर्यवान,
धाडसी परंतु भोगविलासात मग्न असतात. सदाचारीपणा यांच्यात नसतो.
५) मूळ नक्षत्राच्या व्याधी व व्याधीमुक्तीसाठी दैवी उपाय :-
मूळ नक्षत्राचे पहिले चरण जातकाच्या पित्याला, दुसरेचरण जातकाच्या मातेला व तिसरे चरण जातकाला स्वतःला सांपत्तिक दृष्टीने अनिष्ट असते. चवथे चरण अशुभ नाही.
म्हणून मूळ नक्षत्राचे १ ते ३ चरण असतील तर ‘मूळनक्षत्रशांती’ करणे आवश्यक आहे.
रक्तनासणे फुफ्फुसातील शिरावर सूज येणे, पाठीच्या कण्याचा स्नायू दुखणे, डोके, फिरणे, फिट्सयेणेल, हिस्टेरिया या सारख्या विकाराने मूळ नक्षत्राचे जातक त्रस्त होतात.
योगक्षेम नीट चालावा व वरील आधी व्याधीतून मुक्त होण्यासाठी खालील मंत्राचा कमीत कमी पाच हजार वेळा जप करावा व एक दशांश हवन करावे किंवा जाणकाराकडून करून घ्यावा.
ॐ मातेव पुत्रं पृथिवी पुरूषमग्निगूं स्वेयोनाव भारूषा । तां विश्वदेवेर्त्रनुभिः संवदानः प्रजापतिः । विश्वकर्मा विमंच ऊं निऋयते नमः ॥
‘मन्दारमूळ’ धारण करावे व वैडूर्य रत्न वापरावे.
६) पूर्वाषाढा नक्षत्राच्या जातकाची लक्षणे :- Complete information about Sagittarius
पूर्वाषाढा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती परोपकारी, दिसायला आकर्षक, प्रतिभासंपन्न असतात. श्रीमंत, विद्वत्ता व उदात्त विचारांजा संस्कार यांच्यावर असतो.
आप्त-मित्र यांना फसवतात. वारंवार पाणी किंवा तरल पदार्थ पिण्याची सवय असते.
आपल्याकडे गोड स्वभावाने सर्वांना आपलेसे करून घेण्याचा विलक्षण गुण यांच्यात असतो. पित्याशी पटत नाही.
जन्मस्थानापासून दूर ठिकाणी भाग्योदय होतो. पत्नी कमी बोलणारी, नेहमी उदास, दुःखी व निराश असते.
यामुळे एकापेक्षा अधिक विकार होण्याची शक्यता असते.
७) पूर्वाषाढा नक्षत्राच्या महिलांची स्वाती :- Complete information about Sagittarius
पूर्वाषाढा नक्षत्रावर जन्मलेल्या महिला शीलसंपन्न, सत्यप्रिय, मृदुभाषी, असतात.
व्यवहारकुशल, धार्मिक वृत्तीच्या असतात.
यांचा विवाह लवकर होतो.
पण त्यांच्यापेक्षा कमी वयाचा पति मिळतो. पतिसुख चांगले मिळते. सांपत्तिक स्थिती चांगली राहते. पुत्रसुख मिळते. कोर्टकचेरीत मात्र यांना अपयश मिळते.
८) पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्याधी व व्याधीमुक्तीसाठी दैवी उपाय :-
मुत्राशयासंबंधी रोग, विक्षिप्तपणा, संधीवात, कामासक्ती, कॅन्सर, वगैरे व्याधी पूर्वाषाढा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना पीडतात.
या व्याधीपासून मुक्त होण्यासाठी व योगक्षेम व्यवस्थित चालण्यासाठी खालील मंत्राचा पांच हजार वेळा जप करून एक दशांश हवन करावे.
ॐ अपाधमप किल्विषमपकृत्यायमोरपः । अपामार्गत्वम स्मरणः दुःष्वण्य गूं सुव ॐ अद्भ्यो नमः ॥
शुक्रवारी पूर्वाषाढा नक्षत्र असेल तेव्हा पाण्याने भरलेला माठ दान करावा.
९) उत्तराषाढा नक्षत्राच्या जातकाची स्वाती :- Complete information about Sagittarius
उत्तरापानावर जन्मलेला आतक बोलताना अडखळणारा, अनेक भाषांचा आणकार, वक्तृत्वकलेत पारंगत,
सार्वजनिक कामात पुढाकार घेणारा, अल्प आयुष्य असणारा, तीव्र स्मरणशक्ती, बुद्धीश्रेष्ठ, अभिमानी, कपड्यालत्यासंबंधी चोखंदळ, सर्वजनप्रिय, दयाळू स्वभावाचा असा असतो.
व्यापार किंवा नोकरीत कोणत्याही काळात नुकसान सोसावे लागते.
वकील, तज्ज्ञ, अध्यापक, प्राध्यापक, कलेक्टर, कमिशनर, कीर्तनकार, ज्योतिषी, लेखक, प्रकाशक म्हणून नावलौकिक मिळतो.
१०) उत्तराषाढा नक्षत्रावर जन्मलेल्या महिलांची स्वाती :-
उत्तराषाढा नक्षत्रावर जन्मलेल्या महिला गोडबोल्या, आल्यागेल्याचे उत्तम स्वागत करणाऱ्या, पतीच्या आज्ञेत रहाणाऱ्या, बुद्धीचातुर्याने आयुष्यात विजयी होणाऱ्या असतात. पुत्रसुख उत्तम मिळते.
११) उत्तराषाढा नक्षत्राच्या व्याधी व व्याधीमुक्तीसाठी देवी उपाय :-
उत्तराषाढा नक्षत्रावर जन्मलेल्या अधिकांश स्त्रीपुरूषांना नेत्ररोग, कटिपीडा, जळजळ व मानसिक रोगांचा त्रास असतो. या व्याधीच्या परिहारार्थ नित्य विश्वदेवाची पूजा उपासना करावी व खालील मंत्राचा पाच हजार वेळा जप करून एक दशांश हवन करावे.
ॐ विश्वेदेवा श्रृणुतेन गूं हवं मे ये अन्तरिक्षेय य उपद्यविष्ठाय अग्निजिव्हा तवायजत्रा आद्यास्मिन्वाहर्षि मादयधम ॥ ॐ विश्वेभ्यो देवेभ्यो नमः ॥
१२) धनु राशीच्या व्यक्तींचे भविष्य :-
धनु राशीचे जातक अनेक कलात पारंगत असतात. शारीरिक-मानसिक व बौद्धिकशक्ती उत्तम असते.
स्वच्छ व स्पष्ट बोलणारे. एकांतप्रिय व संन्याशासारखे जीवन जगणारे , विषप्रयोग, मिथ्यापवाद,
कारावास इत्यादिचे भय असते. हॉस्पीटल, अनाथाश्रम, कारागृह, समाजसेवी संस्था यांचे ट्रस्टी म्हणून हे काम करतात.
दीर्घद्योगी, महत्त्वाकांक्षी, दूरदृष्टी व प्रामाणिकपणा या मुळे छत्तीस किंवा चाळीस व्या वर्षी श्रेष्ठ पदी पोहचतात.
यांचे नाक, कान, चेहरा व मान सर्व साधारण मोठी असते. नीतीला विशेष महत्त्व देतात, मात्र सोसावा लागतो,
जनसंपर्क अधिकार असणा या व्यापारातून यांना पैसा मिळतो. धनु राशीच्या महिला स्थूल असतात.
यांचे ओठही मोठे असतात, कथित प्रसंगी दात मोठे असतात, ज्ञानाने श्रेम, बाहू व कंबरेखालचा भाग मजबूत असती,
पतीच्या कार्यात, हस्तक्षेप करण्याचा स्वभाव असतो, अपकिर्ती भय असते.
१३) ‘जातकाभरण चंद्र’ निर्याणाघ्याया प्रमाणे :-
धनु राशीच्या व्यक्ती धर्मप्रिय, बुद्धिमान, प्रतापी, आणि विद्वान असतात. शिक्षणात विशेष प्रगती करतात.
राजकीय पुढा-यांकडून व मान्यवर व्यक्तीकडून योग्य तो सन्मान यांना मिळतो.
समाज व कुटुंबातही मोठे स्थान मिळते. पुत्रसुख मिळते. देवावर विश्वास असतो.
यांना राग लवकर येतो पण गंगाचा पारा झटकन उतरती यांना सुवाद-दुसरा भाऊ असतो.
जन्मापासून पहिले वर्षे शारीरिक त्रासाचे जाते. रोग-बाधा, आयुष्यवारे योग असतो. तेराव्या वर्षी अरिष्ट येते. आयुष्य मर्यादा ६८ ते ७५ असते.
१४) धनु राशीची अनुभवसिद्ध फले :-
धनु व्यक्ती धार्मिक आस्था, विश्वात, पाडस, उत्साह आणि दृढनिश्चयाने स्वतःच्या भाग्यवृद्धीकरिता प्रयत्नशील असतात.
अध्ययनप्रिय, कलाप्रेमी, एकान्तप्रिय, स्वच्छताप्रिय, स्पष्टवक्ता, विनम्र, शांत, दयालु, परोपकारी, सौंदर्य प्रेमी, व्यवहारकुशल, गंभीर, परिश्रमी, श्रेष्ठजनात प्रिय, लेखन-भाषण कलेत पारंगत, अभिमानी, वाईट काम बेधडक करणारे, स्ववास्तू व वाहन सुख मिळते.
विदेश यात्रा होते. स्वभाव हारा व खोडकर असतो. शिकारीचा छंद असतो. याचा नेम सहसा चुकत नाही.
राजकीय क्षेत्रात मंत्र्यापासून मुख्यमंत्र्यापर्यंत मजल मारतात.
प्रायव्हेट क्लासेसचे चालक, पुस्तकांचे लेखक, डायकोर्ट जज, शिक्षक, गणितज्ज्ञ, अर्कोटंट, टेक्नॉलाजियन, ज्योतिषी, कीर्तनकार, इन्कमटॅक्स सल्लागार, इत्यादि। व्यवसायात धनुव्यक्ती यशस्वी होतात.
प्रतिकूल :-
कोणत्याही वर्षाच्या जून महिना प्रत्येक महिन्याच्या ३,९,१८,२४ तारखा, शुक्रवार रंग व इत्यादि. कर्क, वृश्चिक, मीन राशीच्या व्यक्ती धनु राशीच्या व्यक्तींना प्रतिकूल असतात.
१५) धनु राशीच्या व्यक्तींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचा काळ :-
१७ ते २६ किंवा ३० ते ३५ या वयात लग्न होईल. १८ ते ३७ या वयोवर्षात पैसा मिळेल. ख्याति, मानप्रतिष्ठा, वाढेल. स्वत:चे घर होईल.
सर्व क्षेत्रात दैदित्यमान यश मिळेल. ३८ ते ४७ या काळात अनेक वाईट प्रसंगाशी झुंझावे लागेल. ४८ ते ६० आर्थिक अडचण भासेल. कशात मन लागणार नाही.
६१ ते ६९ आर्थिक टंचाई दूर होईल. विविध लाभ मिळतील. सट्टा, लॉटरीद्वारे पैसा मिळेल. आयुष्ययोग पंचाहत्तर वर्षाचा राहील.
१६)धनु राशीच्या व्यक्तींसाठी विशेष उपासना :- Complete information about Sagittarius
धनु राशीच्या व्यक्ती ग्रामदेवता, कुलदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता, यांच्या कोपामुळे दुःखी असतात. श्वास, उदरशूल, नाभिशूल, हृदयशूल, कटिशूल, इत्यादि व्याधीतून सुटका होण्यासाठी महामृत्युंजय जप रोज करावा. “ॐ श्री देवकृष्णाय उर्ध्वान्तकाय नमः।’ या मंत्राचा रोज १०८ वेळा जप करावा.
धनुराशीच्या जातकांना शनिग्रह मारक ठरतो म्हणून प्रत्येक शनिवारी उजव्या हातात एक खिळा ठेऊन खालील मंत्र १२ वेळा म्हणावा व मंत्र म्हणून झाल्यावर हातातील खिळा दक्षिण दिशेला फेकावा..
ॐ लोह दंड समं दानं यम प्रीतिकरं शुभम् । हे लोहलांगल दिनीत्वत: शान्ति प्रगच्छ मे ।
ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा, WHATSAPP GROUP
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!
मार्गदर्शन :-
आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.
(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
अधिक माहिती साठी संपर्क :-
श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,(संतती सम