आपले प्रेम किंवा विवाह कोणाशी सुखकर होईल.?
Love Or Marriage, अविवाहित किंवा विवाहोत्सूक तरुण-तरुणींच्या आकर्षणाचे सौंदर्य, तारुण्य, आरोग्य, धन, प्रसिध्दी व अधिकार असे सहा मुख्य केंद्र बिंदु असतात.
या गुणांनी संपन्न स्त्री-पुरुष विरुध्द लिंगी सेक्सला सहजगत्या आकर्षित करु शकतात. प्रेमसंबंध किंवा वैवाहिक जीवनात या गुणांचे आपले विशिष्ट असे स्थान निश्चितपणे आहे.परंतु प्रेमाचे स्थायित्व व वैवाहिक जीवनाच्या सुखाच्या दृष्टीने केवळ या गोष्टींना पुरेसे मानता येणार नाही.एखादी तरुणी एखाद्या युवकाच्या सौंदर्य, आरोग्य किंवा क्रीडाक्षेत्रातील त्याच्या कर्तबगारीवर खुश होऊन
त्याच्याकडे आकर्षित होऊन त्याच्याबरोबर विवाहबद्ध झाली आणि नंतर तो युवक अत्यंत दरिद्री किंवा चारित्र्यहीन किंवा रागीट स्वभावाचा आहे.असे तिला कळल्या नंतर ती आपल्या चुकीचा किती पश्चाताप करील?याचप्रमाणे रुप व यौवनावर भाळूनएखाद्या तरुणीशी तरुण विवाहबध्द झाला आणि विवाहानंतर तिचा स्वैराचार,यौनाचरण व अत्यंत खर्चिक आहे असे लक्षात आल्यावर तो युवक जीवनभर पश्चाताप करीत राहील.
मार्गदर्शन :- Love Or Marriage
अशा विवाहांचा अंत घटस्फोट किंवा आतल्या आत तळमळणे अथवा आत्महत्या या खेरिज होऊ शकत नाही.या वरील प्रमाणे गोष्टी घडू नयेत यासाठी लग्ना आधीच या गोष्टी माहित झाल्यावर वैवाहिक जीवनात येणाऱ्या अनेक संकटापासून बचाव होईल.कोणी कोणाशी विवाह केला तर तो विवाह सुखी होईल या बाबतीत मार्गदर्शन करणारी विपुल माहिती व मार्गदर्शक तत्त्वे ज्योतिषशास्त्रात आहेत.
कोणत्या राशीच्या स्त्री पुरुषाचा स्वभाव कसा असेल व चारित्र्य कसे असेल त्यांचे प्रेमसंबंध व वैवाहिक जीवन कसे राहिल?याबाबतीत उपयुक्त मुद्यांचा उहापोह या पुस्तकात ठिकठिकाणी केला आहे.या प्रकरणात कोणत्या राशीच्या स्त्री पुरुषांचे संबंध कोणत्या राशीशी टिकतील याबाबत तुलनात्मक विश्लेषण प्रस्तुत आहे.या माहितीचा उपयोग विवाहोत्सूक तरुण-तरुणींना होईल अशी माझी खात्री आहे.
मेष राशीच्या जातकाचे इतर राशीच्या जातकांशी संबंध कसे राहतील.? Love Or Marriage
मेष :- या दोन्हीं राशीत परस्पर शारीरिक व आर्थिक आकर्षण असते. या राशीच्या स्त्रीशी संपर्क आल्यावर पुरुषाने नित्य नवीन कार्य करावे.याच प्रमाणे स्त्रीने अधिकाधिक आकर्षक वेष-भूषा करावी. हे उभयता स्वाभिमानी असतात. त्यामुळे एकमेकांना झुकविण्याचा प्रयत्न करु नये.
वृषभ :- या दोन्हीं राशीत परस्पर शारीरिक व आर्थिक आकर्षण असते. वृषभ राशीचे लोक मेष राशीचे लोकांना प्रभावित करतात म्हणून मेष राशीवाल्यांनी हड़ करु नये.सामान्यपणे वृषभ व्यक्ति मेष राशीला अधिक लाभप्रद होऊ शकत नाहीत. परंतु परस्पराच्या भागीदारीत व्यवसाय केला तर मात्र फायदेशीर ठरतो.
मिथुन :- सामान्य व्यवहार व प्रवासात या दोघांचे चांगले पटते. परंतु इतर – मिळत नाही. मिथुन राशीचे स्त्री-पुरुष चिंताग्रस्त, व्यग्र व उदास वृत्तिचे मुख काही असतात.मेष राशीवाल्यांबरोबरच त्यांचे सामान्य संबंध असतील तर ते ठीक आहे परंतु अधिक जवळचे संबंध चांगले नसतात.
१)
कर्क :- या दोघात परस्पर आकर्षण असते. मेष राशि कर्क राशीला प्रेरणा देणारी असते व कर्क राशी मेष राशीचे समाधान करु शकतेपरंतु कर्क राशिच्या काही व्यक्तिंशी मेष राशीचे संबंध मधुर नसतात. एकूण मेष कर्क हा संबंध चांगला नसतो.
सिंह :- या दोन राशींचे मिलन प्रेरणादायक असते. दांपत्य जीवन व संतती आदींवर परिणाम होतो.मेष राशीचा जातक सिंह राशीच्या जातकाबरोबरचे संबंध सुरक्षित मानीत नाही तरी त्यात कोणताही धोखा नसतो. हा संबंध सामान्यपणे चांगला असतो.
कन्या :- मेष कन्या संबंध सामान्यपणे फायदेशीर असतो. कन्या राशी मेष राशीला आपल्या ध्येयाचे अंतर व क्षमता दोन्हींचे ज्ञान देते व कल्याणकारी टिका- टिप्पणी ही करते.त्यांच्या उत्पन्नाच्या आय व्यया बाबतही सतर्क असते. परंतु मे जोडीदाराच्या सृजनशक्तीचा योग्य फायदा घेऊ शकत नाही. म्हणून मेष-कन्या हा संबंध टिकणे अवघड असते.
2)
तुळ :- या दोन्हीं राशीत परस्पर विरोधी आकर्षण असते. तुळ राशी मेष राशीला फायदेशीर ठरते.मात्र तिचे शोषण करु नये. तुळ राशिच्या जातकाच्या संपर्कात राहिल्याने मेष राशीतील आक्रमक वैशिष्ट्यात सरळपणा येतोव मेषेला पुर्नविचारांची प्रेरणा देते, विवाह, संपर्क, समझोता व कायदेशीर कागदपत्रांच्या बाबतीत हा संबंध फारच चांगला असतो.
वृक्षिक :- मेषेचा वृश्चिकेशी संबंध भयानक असतो. यांचे कारण वृश्चिक रास मेष राशीची कुलंगडी-लफडी बाहेर काढतेव त्यामुळे मेष जातकाच्या मनात विद्रोह व क्रियाशीलता उदय पावते.हा संबंध आग पाण्यासारखा असतो. यास्तव हा संबंध चांगला मानला जात नाही.
३)
धनु :- मेष धनुचा पारस्पारिक संबंध शुभ असतो. दोघे मिळून विस्तार, महत्वाकांक्षा, क्रियाशीलतेला जन्म देतात.धनुच्या संपर्कामुळे मेषेची उद्योगशीलता, प्रयोगशीलता व इतर चांगल्या गुणात वाढ होते.मेषेच्या संपर्कामुळे धनुच्या शिक्षण, ज्ञान व प्रकाशनाचा विस्तार होतो. या दोहोंचा संपर्क कार्य पूर्ण करण्याच्या भावनेला जन्म देतो. त्यांचे सहप्रवास सुखी होतात.
ईतर :-
मकर :- मेष मकरच्या संबंधामुळे मेष जातकात जबाबदारीची भावना वृध्दिंगत होते. या भावनेचा संबंध सामाजिक स्थिती,आजिविका व चारित्र्याशी येतो. मेषेच्या बाबतीत मकरेची भावना मातृ-पितृवत असते.परंतु मेषेने मकरेवर फार अवलंबून रहाणे अयोग्य असते.मकरेचे संबंध कायम ठेवण्यासाठी मेषेला समजूतदारपणाची खूप आवश्यकता असते.
कुंभ :- या संबंध वारा व अग्नि सारखा आहे. म्हणून अशुभ आहे. मेष राशीच्या खोलवर भावनांशी कुंभ राशीचा संबंध येतो.त्यामुळे मेष निराश होते. या राशी एकमेकांना आकर्षित करीत असल्या तरी त्यांत धोका असतो.कुंभ जातकाशी मेष जातकाचा पूर्ण व्यवहारी दृष्टीकोण ठेवला गेला तर दोघांचे पटेल नाही तर गंभीर व त्रासदायक मैत्रीत त्यांचे रुपांतर होईल.
मीन :- मेष मीनेचा पारस्पारिक संबंध मनात भय व गुप्त इच्छा निर्माण करतो. ज्ञात अथवा अज्ञात अपराधातून मुक्ती मिळवण्याची आकांक्षा हृदयात उचंबळून येते.मीन राशीचे जातक मेष राशिच्या जातकाला अध्ययन व रहस्योद्घाटनाच्या बाबतीत प्रेरणा देतो.या राशींचा संबंध बहुधा यशस्वी ठरत नाही. परंतु बुध्दि व समयसूचकतेचा उपयोग केल्यास हा संपर्क फक्त घनसंग्रहाच्या बाबतीत लाभदायक असतो.
वृषभ राशीच्या जातकाचे इतर राशीच्या जातकांशी संबंध कसे राहतील.? Love Or Marriage
मेष :- वृषभ मेष हा संबंध चांगला सुखदायी होतो. हे दोघेजण दोन विरोधी ध्रुवांसारखे परस्पर आकर्षित होतात.एकमेकांच्या आवडी-निवडी वेगवेगळया असून सुध्दा आदर्श जोडीदार बनू शकतात.हा संबंध जाहीर न होता आन्तरिक रहातो. संघठनात्मक कार्यात दोघेही सहयोगी बनतात.मेष राशीवाल्या बरोबर क्रिडा करणे, सिनेमा पाहण्यात वृषभ जातकांना आनंद मिळतो.
वृषभ :- वृषभ वृषभ या संबंधात औपचारिकता अधिक व आत्मीयता कमी असते.दोघेजण एकमेकांना नाराज करु इच्छित नाहीत. यामुळे या दोघांचे चांगले पटते.
मिथुन :- वृषभ मिथुन हा संबंध अनेक दृष्टिने उत्तम असतो. दोघेही परस्पर ज्ञान व विचारांचे आदान-प्रदान करतात आणि योग्य निर्णयाप्रत पोहोचतात.मिथुनेच्या संबंधामुळे वृषभेच्या बँक बॅलंस मध्ये वाढ होते. आर्थिक गोष्टीत मिथुन वृषभेला मदत करते.आपसात संतुलन राहिले तर हा संबंध स्थायी रहातो.मिथुन सदैव आपली रुचि प्रकट करण्याची आकांक्षा ठेवतो आणि वृषभेने असे केले नाही तर संबंध ताणले जाऊन तुटतात.
४)
कर्क :- वृषभ कर्क हा संबंध परस्पर सुंदर वाटत असला तरी याचा पाया मजबूत नसतो.या संबंधामुळे प्रवास घडतात व नातेवाईकांशी विचारविमर्श, शोध, गाठीभेटी होतात.काही सवलत प्रतिदान दिली गेली तर कर्के बराबर वृषभेचा संबंध शुभ बनतो.कर्क वृषभेला मानसिक दृष्टया उत्तेजित करुन बंधन तोडण्याची प्रेरणा देते.
सिंह :- एकूण वृषभ सिंह हा संबंध समान्य असतो आणि हा अधिक यशस्वी होत नाही.यांच्यात प्रेमाचे आकर्षण उत्पन्न होते पण त्यांत रोमँटिकपणा अधिक असतो.सिंह राशीचा प्रभाव वृषभेच्या घराच्या सुरक्षेवर व आर्थिक आधारांना प्रभावित करतो.कमकुवतपणा दूर करुन धृष्टपणा आणण्यात सहायक बनतो.वृषभ राशीच्या जातकाने शंकेखोर स्वभावाचे प्रदर्शन केले तर या संबंधातील माधुर्य संपुष्टात येते.
कन्या :- वृषभ-कन्या हा संबंध उत्तम असतो. या सबंधामुळे सक्रियता, परिवर्तन, प्रवास व विविधतेची भावना उत्पन्न होते, कन्या राशी वृषभेच्या प्रेम, धाडस व निरीक्षण शक्तीवर प्रभाव टाकते.ती त्याला आत्मत्यागाची प्रेरणा देते व त्यातील बौध्दिक सुकता जागृत करते.वृषभेचा अत्याधिक आलोचनात्मक पवित्रा हा संबंध संपुष्टात तो जर बुध्दि व भावना यांचे संतुलन ठेवले गेले तर हा संबंध खूप चांगला असतो.
५)
तुळ :- वृषभ तुळ हा संबंध चांगला व शुभ असतो. तुळ रास वृषभ राशीला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करते.परंतु वृषभ राशी तुळेपासून तितकीच शो जात रहाते. जर वृषभेने आपला दृष्टिकोण बदलला तर या संबंधाचा चांगला या एकमेकांना होतो.तुळेच्या मदतीने वृषभेची आरोग्य, कला, कौशल, सन्मान व अजिविकेच्या क्षेत्रात वृध्दि होते.
वृश्चिक :- वृषभ वृश्चिक हा संबंध खूपच शुभ असतो किंवा मग अत्यंत अशुभ असतो.वृश्चिक रास विरोधी ध्रुवाप्रमाणे वृषभ राशीला आपल्याकडे आकर्षित करते परंतु वृषभ व वृश्चिक दोघेही स्वतःला मोठे समजतात.त्यामुळे कधी कधी यांच्यात धर्षाची स्थिती उत्पन्न होते.हा संबंध यशस्वी व्हावा असे वाटत असेल तर आपआपल्या स्वभावावर उभयतांनी नियंत्रण ठेवले पाहिजे.
धनु :- वृषभ धनु आर्थिक व कामजीवनाच्या दृष्टीने हा संबंध आकर्षक असतो. सरळ नसतानाही या संबंधाला योग्य म्हणता येईल. या संबंधात वृषभेला बहुधा अमित व चकित व्हावे लागते.धनुच्या व्यक्तिमत्वाच्या खोलीपर्यंत पोहचणे वृषभेला अवघड असते.हा संपर्क दूरवरचे प्रवास घडवतो. संकटात वाढ करतो व आव्हाने उभी करतो.स्पष्ट उद्देश व अथक प्रयत्नावर या संबंधाचे यश अवलंबून असते.
६)
मकर :- वृषभ मकर हा संबंध खूप शुभ असतो. वृषभ राशीच्या बाबतीत मकर राशी एक उत्तम जोडीदार ठरते.ही त्याला प्रगतीपथावर अग्रेसर करते आणि उच्च शिक्षण, आध्यात्म, दूरवरचे प्रवास व सत्प्रेरणांकडे प्रेरित करते.लेखन, वाचन-मनन व पारस्पारिक सामंजस्याने या संबंधात टिकावूपणा देतो.
कुंभ :- वृषभ कुंभ या दोन्ही राशी मजबूत व नेतृत्वाच्या इच्छूक असतात.यामुळे हा संबंध सुखद वातावरणाची निर्मिती करतो व शुभ ठरतो. या दोन्ही राशी एकमेकांवर अधिकार गाजवू इच्छितात.हा संबंध पारस्पारिक सहिष्णूतेवरच स्थिर राहू शकतो. कुंभ राशि वृषभेला अजिविका, व्यवसाय व सामाजिक स्थितित पुढे जाण्यास रित करते.
मीन :- वृषभ मीन या संबंधात फक्त स्वप्निल सुखाची उपलब्धी होऊ – शकते.परंतु मीनेची प्रेरणा व वृषभेची दृढ कर्तव्य भावना दोन्हीं मिळून हा संबंध आदर्श.ताऊ शकतो. सतर्क दृष्टि, इच्छा व क्रिया यातील स्पष्ट रेखांकन यावर संबंधाचे भवितव्य अवलंबून असते.मीनेचा वृषभेशी संबंध काल्पनिक विश्वासाठी वेळ व पैसा खर्च करणारा आहे.
मिथुन राशीच्या जातकाचे इतर राशीच्या जातकांशी संबंध कसे राहतील.? Love Or Marriage
मेष :- मिथुन मेष यांच्या पारस्पारिक संबंध प्रेमात परिवर्तित होऊ शकतो. परंतु त्यासाठी उभयतांनी थोडा तरी त्याग केला पाहिजे.प्रवास व रचनात्मक कार्यात एकमेकांना प्रोत्साहित करतात.मेषेच्या संपर्कामुळे मिथुनेची आशा-आकांक्षा, मैत्री, प्रवास व नवीन कार्याचे क्षेत्र प्रभावित होते.
वृषभ :- सामान्य तक्रारींचे निवारण करुन मिथुन-वृषभ हा संबंध यशस्वी – करता येतो.याराशी मिथुनेच्या जीवनात स्थायित्व आणू शकते आणि सामाजिक संस्थात अभिरुचि उत्पन्न करुन जीवनातील सत्त्याशी परिचित करवते.वषभ राशिचा मिथुनेच्या परोक्ष-अपरोक्ष व गुप्त जीवनाशी विशेष संबंध असतो. येणाऱ्या भयाची कल्पना यामुळे मिळते..
मिथुन :- थोडी सावधानी राखली तर हा संबंध निभू शकतो. यासाठी अधिक समजूतदारपणाची गरज आहे.प्रसन्न रहाण्यासाठी यांनी मानसिक उदासीनते पासून दूर राहिले पाहिजे व एकमेकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कर्क :- हा संबंध काही प्रमाणात यशस्वी होतो. परंतु भावुकतेच्या आधारावर असेल तर अयशस्वी होतो.कर्क राशि मिथुनेला संरक्षणाच्या बाबतीत सतर्क बनविते.कर्केशी संबंधाच्या कारणाने मिथुन जातकाने एखादी व्यवसायिक योजनेचा प्रारंभ केला तर त्यात यश मिळते.प्रयत्नाने हा संबंध यशस्वी होऊ शकतो.
सिंह :- मिथुन सिंहेचा पारस्पारिक संबंध विनोदी होऊ शकतो आणि – – कधी कधी विनोदाचे अश्रूत रुपांतर होते.वैचारिक आदानप्रदानाच्या दृष्टीने हा संबंध चांगला असतो.सिंहे मुळे मिथुनेला आवश्यक उत्तेजन मिळते. भ्रमण, अध्ययन व परिवर्तन यात यश मिळते.या दोघांचे घरगुती व वैवाहिक संबंध शांतिपूर्ण असतात.
कन्या :- मिथुन कन्या या दोघांचे संबंध बहुधा व्यक्तिगत स्वार्थामुळे होतात.एकमेकांच्या मार्गदर्शनाच्या बाबतीत मतभेद होऊ शकतात. यामुळे हा संबंध टिकविण्यासाठी खूप सावधगिरी बाळगती पाहिजे.कन्या राशीच्या प्रौढ व्यक्तिशी मिथुनेचा संबंध अधिक स्थायी बनू शकतो.कन्याच्या माध्यमातून घरातील परिस्थिती, संपत्ति व स्थायित्वावर प्रभाव पडतो.या संबंधामुळे जबाबदान्यांची भावना वृध्दिंगत होते.
७)
तुळ :- मिथुन-तुळ संबंध चांगला असतो. परंतु हा संबंध यशोदायी होण्यासाठी मिथुन व्यक्तींनी गंभीर होणे आवश्यक असते.सिध्दांता विषयीचा पारस्पारिक आग्रह फायदेशीर ठरतो.तुळ राशि मिथुनेला प्रेम, व्यवहार, आकर्षण व आत्म-प्रवाहात प्रभावित करतो.हा संबंध लहान मुलांच्या बाबतीत अधिक स्नेहपूर्ण असतो.
वृश्चिक :- मिथुन वृश्चिक हा संबंध एकमेकांच्या प्रश्नांची उकल करण्याच्या बाबतीत सहाय्यक होतो.वृश्चिक जातक मिथुन जातकाच्या नियोजन, आरोग्य, व्यवसाय, पाळीव प्राणी, आजिवीका व अन्य कार्यावर प्रभाव टाकतो आणि कार्य पूर्ण करण्यास हातभार लावतो.परंतु हा संबंध टिकणे अवघड असते. हा संबंध एक परीक्षण मागतो व मुश्किलीनेच यांचा निर्वाह होतो.
धनु :- मिथुन धनु हा संबंध दोन विरुध्द ध्रुवांचे आकर्षणा सारखा असतो.गंभीर विषय आहे आणि व्यवसायिक भागीदारी किंवा विवाहात यांचे संबंध एक परिवर्तन होऊ शकते.धनुराशी मिथुनेच्या जबाबदाऱ्या, धन, विवाह, जनसंपर्क, भागीदारी, कायदेशीर प्रश्न व विशिष्ट संबंधांना प्रभावित करते आणि त्याला प्रेरणा, प्रसन्नता व बोध ग्रहण करण्यायोग्य बनवते.
मकर :- मिथुन-मकर हा संबंध सुखसंतुलनाच्या दृष्टिने श्रेष्ठ असतो.मकर राशी मिथुन राशीची चंचलता पूर्णपणे समजू शकत नाही.परंतु हिचा रहस्यपूर्ण स्वभाव व थाटमाटावर प्रभाव टाकणारी असते.मकरेच्या संगतीने मिथुनेत आपल्या स्वतः विषयी अधिक जाणण्याची शक्ती उत्पन्न होते.भांडवल घालण्याची संधी लाभते.
कुंभ :- कुंभ हा संबंध उभयंतांना गतिशील बनवणारा असतो.या संबंधाचा परिणाम परस्पराची मानसिक सक्रियता, प्रवास, लेखन, प्रकाशन यावर होतो.कुभेबरोवरच्या संबंधामुळे मिथुनेला चंचलतेचा अनुभव मोठया प्रमाणात मिळतो.परंतु याची निरंतर प्रेरणा कधी कधी मिथुनेला डोकेदुःखी ठरते.
मीन :- मिथुन मीन हा संबंध रोमँटिक बनू शकतो परंतु यथार्थाच्या घरातलाला हा स्पर्श करू शकत नाही.मिथुन राशीने जर मीनेच्या इच्छेप्रमाणे कार्य केले तर त्यात प्रगती होईल.मिथुनेच्या मनात एक प्रकारचा भ्रम असतो.मकर हा भ्रम नाहीसा करण्यासाठी मिथुनेला साथ देतो. समजूतीने वागल्यास हा संबंध आकर्षक व स्थिर बनतो.
कर्क राशीच्या जातकाचे इतर राशीच्या जातकांशी संबंध कसे राहतील.? Love Or Marriage
मेष :- कर्क मेष हा संबंध प्रशंसा करण्यालायक नसतो.परंतु हा सक्रियतेत वाढ करतो. मेष राशी कर्क राशीचे भावी जीवन, प्रतिष्ठा, अभिलाषा व सामाजिक किंवा व्यावसायिक स्थितीवर प्रकाश टाकते आणि यांत सुधारणा करते.परंतु कढईतील तेल उतू जाण्यासारखा हा संबंध -मैत्री त्वरित संपुष्टात येते.घरासंबंधी विषयावर यांच्यात वैचारिक सब होतो.
वृषभ :- कर्क वृषभ हा संबंध पारस्पारिक सन्मानाच्या भावनेने निभू शकतो.जर योग्य संतु ठेवले नाही तर जेथून आरंभ झाला होता त्या ठिकाणीच वृषभ कर्क राशीला नेऊन बसवितो.वृषभ राशीशी घनिष्ट संपर्क ठेवला तर कर्क राशीच्या अनेक आशा-आकांक्षा ग्ल्लवीत होऊन पूर्ण होऊ शकतात.त्यांचे कार्य व मनोरंजनात योग्य सामंजस्य आवश्यक आहे. अन्यथा धन व वेळेचा अपव्यय होऊन नुकसान होते.
मिथुन :- हा संबंध पारस्पारिक उदासीनतेत भर घालतो.या राशी एकमेकांत सुधार करु इच्छितात यामुळे एकमेकांच्या टिकाकार ही असतात.कर्केच्या दृष्टित मिथुन आवश्यकता नसून विलासाचे साधन असते.हा संबंध फक्त वार्तालापावर टिकून असतो तो कोणत्याही क्षणी ढासळू शकतो.
८)
कर्क :- कर्क-कर्क हा संबंध फक्त एकदुसऱ्याच्या सन्मानाच्या भावनेवर टिकून राहतो.कर्क राशीचे पुरुष कर्क जातकाला फक्त प्रेमच देतात. कर्क राशीचा पुरुष ‘लहरी’ असतो.ते आपल्या पत्नीला संपूर्ण गृहिणीच्या रुपातच पाहू इच्छितो.यास्तव कर्क स्त्रीने त्याच्या आवश्यकता व उत्कंठांविषयी सहानूभूतिचा दृष्टिकोण ठेवावा.
सिंह :- कर्क सिंह हा संबंध चांगला असतो.सिंहेच्या संपर्कामुळे कर्केत गतिशीलता येते आणि त्यामुळे कर्क जातक अधिक वस्तुंचा संग्रह करतो व आपले उत्पन्न वाढविण्यात यशस्वी होतो.सिंह राशी हट्टी व कर्क राशी ही हट्टी व सुरक्षाप्रिय असते.त्यामुळे हा संबंध टिकाऊ नसतो.परंतु कर्क जातकांनी सिंह जातकांशी मिळते घेण्याचा प्रयत्न केला तरच ही मैत्री यशस्वी होते.
कन्या :- कर्क कन्या अधिक ऐकणे व कमी आदेश देणे यावर या संबंधाचे भवितव्य अवलंबून असते.आपल्या वयापेक्षा मोठया कन्या जातकाशी कर्कचा संबंध अधिक हितावह होतो.कन्या राशी कर्केला त्याच्या प्रतिस्पर्ध्याविषयी सावधान करते आणि नवे विचार, नव्या योजना व नव्या प्रयोगाकडे प्रेरित करते.कर्क जातकांचे प्रवासा संबंधीचे विचारांवर आणि अस्वस्थतेवर कन्याचा प्रभाव अधिक असतो.
९)
तुळ :- कर्क तुळ घर-कुटूंबाच्या दृष्टिने हा संबंध सुखकारी असतो.तुळ राशी कर्क राशीला भावी तयारीसाठी प्रेरित करते व घरखर्च, बचत इत्यादि विषयातश्री कार्यात कर्केचा सहयोग चांगला मिळतो यामुळे सुरक्षितता व भावी जीवनाच्या स्थितीवर सुपरिणाम होतो.तुळा राशीशी संबंध पक्के करण्यापूर्वी कर्क राशीने खोलवर विचार करावा.
वृक्षिक :- जर काळजीपूर्वक वागले तर हा संबंध सरस सिध्द होतो.बिस्फोटापासून बचाव करण्यासाठी त्यात योग्य भावनात्मक नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहाणे आवश्यक असते.परंतु दोन्हीं राशींचा हा संबंध सुखावह होतोच असे नाही.वृश्चिक राशी कर्क राशीला प्रेम, विवाह, धाडस, मुले-बाळे, निरीक्षण व परिवर्तन इत्यादि बाबतीत प्रभावित करते.
धनु :- कर्क धनु हा संबंध टिकावा म्हणून दोन्ही कडून सावधानी असावी लागते.नवीन स्थान, नवे अनुभव व कार्याविषयी रुचि उत्पन्न करणारा हा संबंध असतो.धनु राशी कर्केच्या आरोग्य, पाळीव प्राणी, सेवा कार्य व व्यस्त ठेवणाऱ्या कार्याबाबत प्रोत्साहित करते.धनुराशी वृश्चिक प्रमाणे प्रेरक नसते परंतु अधिक सुखकर असते. धनुराशी उत्तेजने शिवाय कर्केला मदत करते.
मकर :- कर्क मकरेचा संबंध नवीन रुचि निर्माण होऊन दीर्घजीवी होऊ शकतो.या दोन्हीं राशीत सुरुक्षेची आंतरिक भावना असते. हा संबंध विवाहात परिवर्तित होऊ शकतो.मकर राशी कर्क राशीतील आत्मविश्वास जागृत करुन स्वातंत्र्य, भौतिकपणा व नवीन अनुभवाशी एकमेकांना निगडीत ठेवते.’जैसे थे’ स्थिती असेल तर असंतोष निर्माण होतो आणि संकटे व बाघेला छिन्न-भिन्न करण्याची शक्ती प्राप्त होते.
कुंभ :- कर्क कुंभ हा संबंध आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी व वैवाहिक जीवनाला लाभदायक असतो.राशी कर्केला गुप्त गोष्टी व दुसऱ्याची आर्थिक स्थितीशी निगडीतपणा आणते.कुंभ राशी कर्केवर विश्वास ठेऊन अनायास त्याकडे आकर्षित होते. या दोघांतील भागीदारी लाभप्रद असते.एकूण हा संबंध चांगला असतो.
मीन :- या दोन्हीं जलराशी आहेत. यामुळे पारस्पारिक संबंध अत्युत्तम राहतो. हे टोपे मिळून प्रवास करतात.एका रात्रीत जग बदलण्याची विचार सरणी त्यांची असते. सहयोगाची भावना कामी येते.हुकूमत गाजविण्याची भावना कायम राह नाही.मीनेच्या र्कामुळे कर्केचा बौध्दिक व भावनात्मक विकास होऊन आध्यात्मिक क्षेत्र विस्तृत होते.
कन्या राशीच्या जातकाने इतर राशीच्या जातकाशी संबंध कसे राहतील.? Love Or Marriage
मेष :- कन्या राशीचे जातक मेष राशीला भितात. याचे कारण त्याची वस्तु किंवा रहस्य गमविण्याची शंका असते.कन्या- मेषच्या मिलनामुळे मानसिक क्रियेत उत्तेजना निर्माण होते.मेष राशी अधिक दृढ धरातल प्रदान करते त्यामुळे त्यांच्यात वादविवाद होणे संभवते.मेष राशी खूप उतावळया स्वभावाची असते याविरुद्ध कन्या जातक शांत व विचाराने वागतात.हा संबंध फारसा चांगला नसतो.
वृषभ :- कन्या वृषभ संबंध टिकवण्यासाठी उभयतांनी कूटनीती व समजूतदारपणे वागणूक ठेवावी लागते.कन्या जातक खूप लवचिक असतात व वृषभ जातक स्थिर असतात.त्यामुळे दोहोंत संघर्ष होऊ शकतो. या दोहोंत प्रवास व प्रवाहात निश्चित धारणा असते.
मध्यान्य :-
मिथुन :- कन्या मिथुन संबंध टिकवण्यासाठी खूप सावधानपूर्वक वागणूक ठेवणे आवश्यक असते.या दोन्हीं राशी खूप चंचल व नेतृत्वाचा गुण त्यांत असतो.मिथुन राशी व्यक्तिंचे चारित्र्य, स्वावलंबन, भौतिकता व विकासात सहाय्यक असते.यांचे विचार तीव्र गतिचे असतात. त्यात प्रगती होते.
कन्या :-
कर्क :- कन्या कर्क या संबधात कर्क बरोबर कन्येच्या आशा गतिमान असतात व सामाजिक क्षेत्रात प्रगती होते.परंतु संतुष्टि व सुख दुर्लभ असुन सुध्दा लाभकारक असतो.कर्केच्या संयोगाने मिथुनेला नवे दिप, नवा मार्ग व सत्त्याचे परिज्ञान प्त होते.सामाजिक प्रेरणा सुध्दा प्राप्त होते व मूर्खतापूर्ण मनस्थितीतून सुटका मिळते.
सिंह :- कन्या सिंह संबंध चांगला असतो. या दोघात विवाह होण्याची शक्यता असते.या जातकाचा संबंध कन्या जातकाशी एखादे षड्यंत्र, गुप्तकार्य किंवा आकर्षणाने संबंधपूर्ण असते.सिंह राशी रोमांस, रहस्य व नियंत्रण पक्षाला प्रभावित करते आणि सौंदर्य व कलाप्रिय भावनांचा विकास होऊन बौध्दिक उत्सुकता जागृत होते.सिंहच्या संपर्काने कन्या- वैभवात वृध्दि होते.
कन्या :- कन्या कन्या पारस्पारिक विचार, भावना, कार्य इत्यादि बाबतीत अनेक बाबतीत दोन्हींत संघर्ष असतो.आपलेच विचाराचा आग्रही असल्याने परस्पर संघर्ष उत्पन्न होतो सामंज्यस्य होत नाही.हा संबंध सुखकर नसतो.
राशी संबंध :-
तुळ :- कन्या तुळ हा संबंध खूप चांगला, सौभाग्यवर्धक असतो.परंतु कुछ राशीत प्रेम करण्यासाठी कन्याने पुढाकार घेतला पाहिजे.ह्या संबंधान रचनात्मक रोमांसाची प्रगती होते.कलात्मक व सौंदर्यपूर्ण वस्तु यांचा संग्रह करण्याचा स्वभाव असतो.परंतु तिसऱ्या व्यक्तिचा हस्तक्षेप होण्याची शक्यता असते.तुळ बरोबर कन्या द्वारा केलेले सर्व कार्यात यश मिळते.
वृशिक :- कन्या वृश्चिक हा संबंध प्रेरणादायक असतो. परंतु यांत विश्रांती मिळत नाही.वृश्चिक राशी कन्या राशीला महत्वाकांक्षी व क्रांतिकारी बनविते. यामुळे पूर्वधारणा छिन्नभिन्न होतात.यामुळे स्वजनांशी सुध्दा मतभेद होतात, वृशिकच्या संबंधामुळे कन्या लहान-लहान प्रवास व विचार परिवर्तनाचा योग बनतो.परंतु स्वतःची शक्ति विस्कळीत होते.
कन्या :-
धनु :- कन्या धनु हा संबंध सुखकारक असतो.धनु-कन्या संयोगामुळे उभयतात जबाबदारीची भावना वाढते व आत्मसंयम व आत्मानुशासन वृत्ती वाढते.धनुचा व्यवहार आदेशात्मक असतो. बहुधा आपल्यापेक्षा मोठया वयाचे धनुवाले कन्या राशीवाल्यांकडे आकर्षित होतात.हे संबंध यशस्वी होण्यासाठी जबाबदारीचा निर्वाह करणे आवश्यक असते.
कन्या :-
मकर :- कन्या मकर संबंध सेक्स, निरीक्षण, संपत्ति व सक्रिय प्रयत्नांना प्रभावित करतो.मकर राशी कन्या राशीवर प्रभाव टाकते व आपली शैली परिवर्तन करते.कन्या राशीला विद्रोह भावनेच्या दृष्टीने प्रेरित करते. मकरेशी कन्याची स्वतंत्रता मर्यादित होते.या संबंधामुळे परिवर्तन, प्रवास इत्यादि फायदेशीर संबंध यशस्वी होतो.
कुंभ :- कन्या कुंभ हा संबंध क्लेशपूर्ण असतो.हा संबंध टिकवण्यासाठी व्यवहारी व रचनात्मक दृष्टीने प्रयत्नशील असणे आवश्यक असते.कन्या राशी कुंभेत विद्रोहाची भावना उत्पन्न करते. हा संबंध फारसा सुखदायक नसतो.
मीन :- कन्यामीन या दोघात परस्पर आकर्षण दोन विरोधी ध्रुवांसारखे असते.मीन राशी कन्या राशीला एक आव्हान असते.एकमेकांच्या जीवनाच्या महत्त्वपूर्ण अगावर प्रभावित होतो.या दोहोंत सामंजस्य राहत नसल्याने हा संबंध सुखकर नसतो.
तुळ राशीच्या जातकाचे इतर राशीच्या जातकाशी संबंध कसे राहतील.? Love Or Marriage
मेष :- तुळ मेष या राशीत परस्पर खूप आकर्षण असते, त्यामुळे या दोन्ही राशीत विवाह, भागीदारी व जनसंपर्क यशस्वी राहतो.तुळ राशीचे जातक मेष राशीच्या जातका बरोबर निर्वाह करु इच्छितात. मेष राशीवाल्यांना तुळेचे नेतृत्व पसंत असते, सकारात्मक भावना दोघांच्या बाबतीत सुखवर्धक असते. दोहोंतील योग्य आकर्षण विषयी होते व दोघांचे जीवन सुखी बनते.
वृषभ :- तुळ वृषभ हा संबंध सुखी असतो. यामुळे यांचा सुखदायक निभाव लागतो. वृषभ राशीमुळे तुळेला पैसा मिळतो. वृषभशी तुळेचा संबंध धन, गुप्तरहस्य व परामनोविज्ञान संबंधी घटनेमुळे होतो. तुळ राशि न्याय-अन्याय व अधिकारांच्या बाबतीत जागरूक असते. परंतु वृषभेतील धैर्य त्याला अधीन बनविते. वृषभवरोवर तुळेचा संबंध हास्यविनोदात व्यतीत होतो.
मिथुन :- तुळ मिथुन या राशींचा संबंध मैत्रीपूर्ण असतो. या संबंधामुळे तुळेचा व्यक्तिगत विचारांचा विकास होतो आणि त्याला सौंदर्य व कलात्मक वस्तूंच्या मूल्यांकनाची शक्ती प्राप्त होते. त्याच्या आदर्शांना प्रोत्साहन मिळते व प्रवास आणि आयात निर्यात संबंधी कार्यात रुचि उत्पन्न होते. मिथुन बरोबर संबंध जोडला गेला तर तुळेत सक्रियता निर्माण होते व लेखन प्रकाशन, विज्ञापन इत्यादि क्षेत्रात प्रेरणा प्राप्त होते.
कर्क :- तुळ कर्क या दोन राशीत आपसात कमी पटते. हा संबंध, ध्येयपूर्ति नंतर सुध्दा संपुष्टात येतो. हा संबंध प्रारंभी रोमॅटिक असतो. परंतु नंतर यात अडथळे उत्पन्न होतात. कर्क राशी संकटकालीन प्रसंगासाठी बचत करते परंतु तुळ राशी ध्येय प्राप्ती नंतर त्यांच्या उपयोगात मग्न राहते. यामुळे दोहोंत अडचणी उत्पन्न होतात.
इतर :-
सिंह :- तुळ सिंह हा संबंध वस्तुस्थिती यथार्थ रुपात पाहिली तर हा संबंध टिकू शकतो. सिंह राशी तुळेच्या आशा-आकांक्षा व मित्रांना प्रभावित करते. हा संबंध बहुधा संभ्रम व रोमांसावर आधारलेला असतो. सिंह राशी प्रदर्शनप्रिय असते तर तुळ राशीला विनम्रता व रोमांस प्रिय असतो. तुळेने बजेट लक्षात घेऊन सिंहेच्या उदारपणाचा अयोग्य फायदा घेता कामा नये.
कन्या :- या राशीचे मिलन गुप्तपणे होते. परंतु तिसरा पक्ष यात बाधकही होऊ शकतो. कन्या बरोबर तुळेचा संबंध अज्ञातपूर्ण ही बनू शकतो. तुला राशीच्या स्पष्ट व सत्य व्यवहारामुळे कन्या राशीत असंतोष उत्पन्न होता. कन्या राशी तुळ राशीला अरुचिपूर्ण रहस्य व सूचनेमुळे क्षुब्ध करु शकते.
तुळा :-
तुला :- तुळेचा तुळेशी संबंध प्रसन्नताकारक, परिहासपूर्ण व सुंदर असतो. या संबंधामुळे स्वप्नलोकांतून बोहर पडून जगातील कठोर सत्याशी सामना करतात. या दोहोंच्या संबंधाचा यशस्वीरित्या निर्वाह होतो आणि या दोहोंत स्थैर्य उत्पन्न होते.
वृक्षिक :- नवीन योजनांचे निर्माण व त्यांच्या क्रियान्वयनाच्या बाबतीत हा संबंध चांगला असतो. या संबंधात एका प्रकारचे भौतिक आकर्षण असते. वृश्चिक राशी स्वातंत्र्याचा अनुभव करते आणि धोखा पत्करण्यास तयार असते. व्यक्तिगत संपत्ति व उपलब्धीची इच्छा यांच्यात असते. परंतु बजेट बनविण्याच्या प्रश्नांवरुन आर्थिक प्रश्नाच्या बाबतीत उभयतात संघर्ष निर्माण होतो.
धनु :- तुळ व धनु संबंध निभू शकतो. मानसिक गुंता दूर करून स्वप्न साकारण्यात यशस्वी होतो. या संबंधामुळे मानसिक क्षेत्रात आव्हाने उभी राहतात. छोटे प्रवास, शेजारपाजारच्या लोकांशी व संबंधितांशी व्यवहार व संबंध प्रभावित होतात. नु राशी एकीकडे तुळेला आत्मप्रेरणा देते तर दूसरीकडे भ्रम व अति प्रयत्नाची शक्यता उत्पन्न करते. जर या दोहोंत पारस्पारीक त्यागाची भावना असली तर हा संबंध सुखी बनतो.
तुळा :-
मकर :- तुळ राशी सौंदर्यावर व मकर राशी प्रतिष्ठेवर प्रेम करते. संकटाच्या प्रसंगी मकर राशी तुळेला मदत करते. व्यक्तिगत सुरक्षा मिळवण्यासाठी मकर राशीकडून उत्तम सहयोग प्राप्त होतो. परंतु मकर राशीला कांही अपेक्षा व सवलती हव्या असतात. या बाबतीत तुळेचे सहकार्य मिळाले तर हा संबंध सुखी व टिकाऊ बनतो…
कुंभ :- हा संबंध पूर्ण स्वरुपात यशस्वी होतो. कुंभेच्या विषयी तुळेचे भौतिक आकर्षण असते. कुंभ राशीचे जातक तुळ जातकावर सक्रियता, रोमांस व संततिच्या बाबतीत प्रभाव उत्पन्न करतात. यांच्यातील रोमांस व प्रेम संबंध यशस्वी होतात. तुळेला कुंभ राशिकडून स्वावलंबी प्रेरणा मिळते व त्याच्या हृदयावर चांगली छाप पढते. या संबंधात उदारपणा व प्रौढ व्यवहार असल्यास दोहोंचे जीवन सुखी होते.
मीन :- या दोन राशीत एका विशिष्ट गुप्त शक्ति असते. यामुळे दोहोतील पडतो. तुळ राशि अधीर असते तर मीन राशी व्यवहारीक नसते. तरी ती तुळ राशीच्या संबंध उत्साह पूर्ण असतात. मीन राशिचा प्रभाव तुळेच्या आरोग्य सेवा कार्य इत्यादिंवर आवश्यकतेकडे लक्ष देते. तुळेला मीनेचे व्यक्तिमत्व आवडते. हा संबंध यशस्वी व सुखमय असतो.
वृश्चिकच्या राशीच्या जातकाशी इतर राशीच्या जातकाशी संबंध कसे राहतील.? Love Or Marriage
मेष :- मेष राशीच्या मदतीने वृशिक अडचणींवर विजय मिळवतो, परंतु मेघ वृश्चिकेला त्रास देते. तर्काच्या ऐवजी आवेश कार्यरत असतो, अशा स्थितीत अपराधी भावना उत्पन्न होते व दोघांचे मनोमीलन चांगले राहत नाही. हा संबंध जीवनात यशस्वी होत नाही.
वृषभ :- वृषभ राशीशी वृधिकेशी विरोधी आकर्षण असते त्यामुळे यांच्यात विवाह होण्याची शक्यता असते. हा संबंध फायदेशीर समझौता, भागीदारी व जनसंपर्काला प्रभावित करतो. वृषभ राशीची पहाण्याची व विचार करण्याची पध्दती वृश्चिक राशीवर परिणाम करणारी असते. पडलेल्या गोष्टी विसरण्याची सवय केल्यास हा संबंध सुखावह होतो.
मिथुन :- मिथुन वृशिके समोर आव्हान उभे करते व वृक्षिकेला संशयी बनविते. या संबंधामुळे एकमेकांच्या कार्य क्षेत्राचा विस्तार होती आणि मानसिक शक्तीचा विकास होतो. यामुळे हा संबंध सुखकारक व यशस्वी असतो. शूद्र मनोवृत्तीचा त्याग केला तर यांचे जीवन सुखी व यशस्वी बनते.
वृश्चिक :-
कर्क :- हा संबंध मधुर असतो. कारण या दोन्ही राशी जलतत्वाच्या आहेत. वृश्चिकेत अपार कार्यक्षमता असते, कर्क राशि तिचे प्रकट करण्याचे माध्यम बनते. या संबंधांमुळे बाधा दूर होते. कर्केबरोबर वृश्चिकेला आत्मीयतेची अनुभूति होते. हा संबंध विवाहात परिणीत होतो व सुख शांतिपूर्ण होतो.My Love Or Who Will Be The Best
सिंह :- सिंह व वृक्षिक राशीचे संबंध अधि व पाण्यासारखे असतात. दोन्हीं राशी शक्तिमान असतात. सिंहेच्या सहकार्याने वृधिकेच्या अभिलाषा पबित होतात. परंतु अधूनमधून दोघात मतभेद सुध्दा होतात. आपली इच्छा व मते दूसऱ्यावर लादण्याच्या स्वभामुळे हा संबंध सुखद होत नाही व शारीरिक आकर्षण व महत्वांकांक्षी स्वभावामुळे दोहोंत संघर्ष उत्पन्न होतो व जीवन समस्यापूर्ण बनते.
कन्या :- वृक्षिक-कन्येचा संबंध मोठा लाभकारी व लोकप्रियतेस कारणीभूत ठरतो. परंतु दोघांनी सर्व समान निर्णय घेतला नाही तर जीवन दुःखमय बनते. प्रौढपणा व व्यवहारिकपणामुळे हा संबंध चांगला होतो. कन्येशी संबंध चांगले ठेवण्यासाठी वृश्चिकेला बाहेरील प्रभाव व सहाय्यकाची जरुर भासते. कन्या राशीच्या कल्पना वृश्चिक राशीची क्रियाशीलता यामुळे याची स्वप्ने साकार होतात.
वृश्चिक :-
तुळ :- तुळ राशी वृश्चिकेचा स्वभाव रोमैंटिक बनवते. या दोघांचे संबंध मिलन स्थायी आकर्षणाला जन्म देते. तुला राशीचे वृद्धिकेशी अनेक प्रकारचे मतभेद असले तरी या दोघांचे संबंध टिका असतात. नाटक, संस्कृति कार्य, अभिनय इत्यादि रात ही जोडी यशस्वी होते.My Love Or Who Will Be The Best
वृश्चिक :- आर्थिक व अधिकारा संबंधी पूर्ण जबाबदारी संबंधी असलेले – भेद विसरण्यासाठी एकमेकांना सहयोग दिला तर यांचा संबंध यशस्वी होतो, नाहीतर पांतील संघर्ष वाढतच जातो.
धनु :- हा संबंध अनेक बाबतीत भाग्यवान असतो. प्राप्ती कमी व खर्च अधिक होण्याची स्थिती उत्पन्न होते. काही प्रश्न दोघांत उभे राहतात. तरीसुध्दा पूर्ण सर्वकता ठेवली तर हा संबंध सुखी बनतो. धनु राशी खर्चिक व प्रवास प्रिय असल्याने. क्षिक गुप्त भावनांच्या आहारी जाते व अपेक्षेपेक्षा कमी गतिशील असते.
वृश्चिक :-
मकर :- मकर हा संबंध सक्रियता हास्य परिहास, सक्रियता व प्रवाहाच्या बाबतीत उत्तेजनापूर्ण असतो. यांच्या निकटवर्तियांकडून यांच्या स्वभावात अडचणी उभ्या केल्या जातात. वृश्चिक राशी शक्तिमान तर मकर राशी दृढ स्वभावाची असते. वृश्चिक राशीला मकर राशी लवचिक व उदार स्वभावाची बनवते. हा संबंध वृश्चिकेला सुखकारी असतो.
कुंभ :- हा संबंध संघर्षमय असतो. वृश्चिक राशीला वृश्चिक राशी – सुरक्षा, अभिभावक, दूर टप्प्याच्या योजना व पूर्णतेला प्रभावित करते. अनेक अडचणी असतानाही दोघात शारीरिक आकर्षण प्रभावी असते. सामाजिक किर्ति सुधारण्यात कुंभ जातक वृश्चिक जातकाला उपयोगी पडतात. हा संबंध घर, जमीन, स्थावर संपत्तिच्या बातीतही लाभदायक असतो हा संबंध फारसा सरळ नसतो.
मीन :- हा संबंध नेहमीच लाभदायक व सुखकारक असतो. या दोन्हीं राशी जलतत्वाच्या आहेत. किरकोळ बाधा आली तरी हा संबंध लाभदायक असता. एकदा संबंध आल्यावर यात न्यूनता येत नाही. तो संबंध स्थायी स्वरुपाचा असतो. एकमेकांच्या सहयोगामुळे यांचा जनसंपर्क वाढतो व यश, प्रतिभा, प्रवास, शिक्षण, ज्ञानोपार्जन इत्यादि क्षेत्रात चांगली प्रगति होते.
धनु राशीच्या जातकाचे इतर राशीच्या जातकाशी संबंध कसे राहतील.? Love Or Marriage
मेष :- या दोन्ही राशि अमितत्वाच्या आहेत. त्यामुळे हा संबंध यशस्वी होतो, मेष राशीचे जातक धनु जातकाला सामाजिक कार्यात व प्रवासात सहयोग देतात. शारीरिक मानसिक व भावनात्मक संतोष मिळतो. धनु राशीच्या लोकांनी मेष जातकांना पूर्ण विचार स्वातंत्र्य द्यावे. त्यामुळे जीवनातील माधुर्य चिरकाल राहील.
वृषभ :- या संबंधामुळे धनु-वृषभ राशीच्या जातकाचे आदर्श, परस्पर उच्च विचार व परोपकाराशी सलग असतात. हा संबंध सुखद राहतो. वृषभ राशीचे जातक धनु जातकाची देखरेख करतात व आपले संबंध उच्च स्तरावर ठेवतात. हा संबंध सर्वार्थाने सुखमय असतो.My Love Or Who Will Be The Best
मिथुन :- या दोन्ही राशींचे जातक परस्पर विरोधक असतात. तरी सुध्दा धनुचे मिथुन राशीत आकर्षण असते. मिथुनच्या सहयोगामुळे धनु आपल्या आदर्शाच्या बाबतीत प्रगती करतात. मिथुने कडून धनुला अतिरिक्त जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची क्षमता व प्रेरणा मिळते. या दोघांचा विवाह संबंध पूर्ण यशस्वी बनतो आणि दोघे मिळून आपल्या व्यवसायातही यशस्वी होतात.
धनु :-
कर्क :- या दोन्हीं राशीच्या स्वभावात फरक असतो. दोघांमध्ये शारीरिक आकर्षण असते. धनु खर्चिक तर कर्क संग्रह करणारी राशी आहे. यामुळे दोहोंच्या संयोगामुळे चांगले संतुलन रहाते. कर्क राशी धनुच्या भागीदारीमुळे धन व गुण विषयावर प्रभाव पडतो. धनु रहस्यमय पध्दतीने कर्केकडे आकर्षित होते. धनुचा संबंध कर्केला पैसा संग्रह करण्याची संधी देतो.
सिंह :- सिंह राशी धनु राशीला मानसिक प्रेरणा देते व विघ्नबाधा दूर – – करण्यात मदत करते. या दोघांच्या संबंधामुळे अप्रत्याशित साधने उपलब्ध करण्यात यश मिळते. धैर्याचा अभाव यांच्यात राहिला नाही तर एकदूसऱ्याच्या बाबतीत हा संबंध प्रेरणादायक व मार्गदर्शक सिध्द होतो. या दोहोंत शारीरिक आकर्षण कमी असले तरी हा संबंध टिकावू असतो.
कन्या :- हा संबंध फारसा सुखद होत नसला तरी व्यवसायिक दृष्टीने लाभप्रद – ठरतो. या संबधाने उभयतात जबाबदारीची जाणीव वाढते कन्या राशीचा रचनात्मक स्वभाव धनुशी संतुलन ठेवतो. परंतु कन्या राशीचा गतिशील स्वभाव कंटाळवाणा होतो. भावनात्मक बाबीपेक्षा रचनात्मक दृष्टीने हा संबंध यशस्वी होतो.Love Or Marriage
धनु :-
तुळ :- हा संबंध यशस्वी व उत्तम असतो. तुळ राशी धनुचे मित्र, आशा व आकांक्षात वाढ करते. तुळेच्या योगाने धनुचे विनम्र व दार्शनिक व्यक्तिमत्त्व अधिक खुलते. तुछ अधिक संवेदनशील राशी असल्याने धनुच्या बाबतीत खूप अनुकूल ठरते. या संबंधामुळे सौंदर्य, प्रकाश, प्रेम व सदिच्छेत वाढ होते. परंतु व्यवसायिक प्रगती विश्वसनीय नसते.
वृश्चिक :- हा एक साधारण संबंध असतो. यात गौप्यतेवर अधिक भर दिला जातो. यामुळे हा संबंध अडचणीचा असतो. आर्थिक दृष्टीने वृश्चिक राशीच्या बाबतीत हा संबंध चांगला असतो. परंतु व्यक्तिगत लाभाच्या दृष्टिने या संबंधात अनेक अडचणी उद्भवतात. वृश्चिक धनुचा पक्ष घेते व गुप्तभेदांशी तिचा संबंध असतो.Love Or Marriage
धनु :- धनु धनुचा संबंध घरगुती वातावरणाच्या दृष्टीने उत्तम व स्थायी असतो. परंतु हा संबंध अडचणीतून उभा राहतो. उभयताना आदर्शाची स्थापना करुन असंदिग्धतेची अपेक्षा असते.
धनु :-
मकर :- धनु राशीचा सहयोग मकरेच्या आर्थिक बाबतीत मिळतो. प्रतिभेला व्यवस्थित आधार प्रदान करतो. व्यवहारातील विचार परिपक्व ठेवले तर हा संबंध नक्की लाभदायक ठरतो व धनुला याचा खूप फायदा होतो. या दोन्हीं राशी टोकाच्या असतात. त्यामुळे ‘इकडे किंवा तिकडे’ अशी वागण्याची वृत्ति असते.Love Or Marriage
कुंभ :- कुंभ राशी धनुचे विचार, छोटे प्रवास, संबंधी बौध्दिक जिज्ञासा व शिघ्र निर्णय या बाबतीत प्रभाव टाकते. हा संबंध प्रसन्नता, धाडस, प्रवास अचानक बदलाचा योग उत्पन्न करतात. यामुळे कुंभ राशीला शोध करणे व लिहण्याची प्रेरणा मिळते. या बाबतीत लोकांकडून अडथळे आणले जातात. निर्वाहासाठी धनु राशीला आनंदी व परिवर्तनप्रिय बनले पाहिजे.
मीन :- मीन राशीत एक रहस्यात्मक आकर्षण असते. ती धनु राशीत आपल्या आकांक्षापूर्तिचा आधार शोधते. या दोन्हीं राशी व्यक्तिगत लाभाच्या दृष्टीने पुढे जातात. आपला दर्जा व स्थिति संबंधी संघर्ष होणे संभवते आणि समस्यांच्या विरोधांची उत्पत्ती वाढते. थोडी बुध्दि वापरली तर हा संबंध सुखकर बनतो.
मकर राशीच्या जातकाचे इतर राशीच्या जातकाशी संबंध कसे राहतील.? Love Or Marriage
मेष :- मेष राशी मकर राशीला आपली कर्तव्ये व शिस्तीचा पाठ देते, लांब पल्ल्याच्या योजना यशस्वी करुन धनलाभ करवते. स्थावर व जंगम संपत्तिच्या बाबतीत सहाय्यक बनते. या संबंधामुळे पर व भविष्य कालीन सुरक्षा प्रभावित होते आणि व्यवहारी विचारांसंबंधी परामर्श होतो.
वृषभ :- मकर वृषभेचा संबंध सरस व लाभदायक सिध्द होतो. मकर वृषभेला अडचणीतून मार्ग काढण्यात मदत करते आणि रोमांस, लोकप्रियता व क्रियाशिलतेकडे प्रेरित करते. प्रेम, रोमांस, संतती या बाबतीत सक्रिय करण्यासाठी उत्साह वाढवते. या संबंधामुळे मकर राशी प्रवास, विविधता, शारीरिक आकर्षणाविषयी प्रेममय बनते.Love Or Marriage
मिथुन :- मकर राशी बरोबर राहिल्याने मिथुनेच्या मूलभूत गरजा भागतात. मिथुन अनेक विषयात ओढा व रुचि उत्पन्न करते आणि ती एक चांगली सहाय्यक सिध्द होते. मिथुनेची बुध्दिमत्ता, चातुर्य, औदार्याशी संबंध स्थापित करुन मकर जातक एकाग्र व शिस्तबद्ध बनतात. या योगात मकर रास अधिकार गाजवते.Love Or Marriage
मकर :-
कर्क :- या दोन्हीं राशीत विरोधी आकर्षण असते. कर्केचा संबंध भागीदारी व कायदेशीर बाबतीवर जोर देतो. मकरेसाठी नवीन क्षेत्रांची उपलब्धी प्राप्त करुन देण्याचे काम कर्क करते. या संबंधामुळे नवीन प्रेरणा प्राप्त होऊन कार्य क्षेत्रांची दारे उघडी होतात.
सिंह :- सिंह राशीची वागणूक मकरेच्या गंभीर स्वभावाविरुध्द असते. सिंहेत आत्मप्रदर्शनवृत्ति अधिक असते. गुप्त विद्या व गुप्त शक्तीत मकरेची रुची सिंह उत्पन्न करते. एखाद्या व्यवसायात चांगली मदत मिळते. दोहोंत मतभेदाच्या संधी ही उपस्थित होतात. त्यामुळे हा संबंध आदर्श संबंध ठरत नाही.Love Or Marriage
कन्या :- मकर कन्या या दोन्हीं मित्र राशी आहेत. त्यामुळे परस्पर सहाय्यक असतात. हा संबंध परंपरा तोडून नवीन गतिमान सिध्द करण्यात यशस्वी होतो. कन्या राशि मकरेचे विचार प्रकटीकरण, राजकारण, सामाजिक क्षेत्र व लोकप्रियता वाढविण्यास सहकार्य देते, धैर्य व प्रयत्नपूर्वक वागणूक ठेवल्यास संबंध सुखदायी होतो.Love Or Marriage
मकर :-
तुळ :- तुळेचे भावी जीवन, प्रतिष्ठा व अभिलाषा यावर मकरेचा प्रभाव असतो. ती त्याच्यातील कलात्मक अभिरुचि व सुंदर वस्तुंची अभिरुची वाढवते. तुळेच्या माध्यमातून मकरेची वैशिष्ठे प्रकट होतात व सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यवसायिक यश मिळवून देते. हा संबंध परिवर्तन, सक्रियता, प्रवास व शारीरिक आकर्षणात वृध्दी करतो तरी सुध्दा फारसा अनुकूल रहात नाही.
वृक्षिक :- वृश्चिक राशी मकर राशीतील आत्मप्रकाशनाच्या संधीचा – विस्तार करते. या संबंधामुळे मनोविनोदाचे पर्याप्त अवसर प्राप्त होतात. आशा – आकांक्षा व वैशिष्ठये प्रकाशात येतात. वृश्चिक राशीच्या सहकार्याने प्रवास, लेखन, सामाजिक संबंध निर्माणाच्या संधी प्राप्त होतात. हा संबंध व्यक्तीला विचार व कार्यात अधिक स्वातंत्र्य देतो.Love Or Marriage
कुंभ :- कुंभ राशीचा प्रभाव मकरेच्या उत्पन्न, संपत्तिवर प्रभाव टाकून धनोपार्जनात उत्साहीत बनविते. कुंभेच्या संबंधाने गांभीर्याचे ढग विरळ होतात व भविष्याची चिंता वाढते. मकर कुंभ राशीला आर्थिक दृष्टया सहकार्य करते. या संबंधामुळे मकरेला आपले व्यक्तिमत्व रहस्यमय बनविता येते. हा संबंध मोडण्याचे प्रसंग अनेक वेळा येतात. हा संबंध टिकवून ठेवण्यासाठी समजूतदारपणा आवश्यक असतो.
मीन :- मीन रास मकरेच्या प्रदीर्घ योजना संबंधी परिस्थिती अनुकूल बनवते. घर खरेदी करण्यात सहकार्य मिळते व आपल्या भरीव प्रयत्नाने यश मिळते. या दोन्हीं राशीचा विवाह होऊ शकतो व या संबंधाने कौटुंबिक कुशलता व घरादारासंबंधी तीव्र सन्मानाची भावना उत्पन्न होते.Love Or Marriage
कुंभ राशीच्या जातकाचे इतर राशीच्या जातकांशी संबंध कसे राहतील.? Love Or Marriage
मेष :- या दोन राशींची गति वेगवान असते. दोन्ही राशी आपल्याला मुख्य – बनवू इच्छितात. या दोन्ही पैकी एक जण नम्र बनला तर हा संबंध सुखी राहून टिकू शकतो. परंतु स्थैर्याच्या दृष्टीने हा संबंध टिकावू नसतो. मेष राशी कुंभेच्या प्रवास, विचार व नजीकचे नातेवाईकांवर प्रभाव टाकते.Love Or Marriage
वृषभ :- वृषभ रास कुंभेची स्वतंत्र कार्य करण्याची इच्छा जागृत करते आणि वाढत्या वयात मदत करते. या संबंधामुळे आर्थिक विकास होतो. परंतु वास्तविक हा संबंध लाभदायक होत नाही. अनेक विघ्न, बाधा उत्पन्न होतात. जीवनात चढ-उतार येतात. अत्यंत बुध्दीमानीने वागून हा संबंध टिकू शकेल.Love Or Marriage
मिथुन :- या दोन्हीं राशी एकमेकांना सहाय्यक व अनुकूल असतात. हा – – संबंध टिकविण्यासाठी भावनेपेक्षा तर्काला अधिक महत्व दिले पाहिजे. यांच्या क्रिया व प्रतिक्रिया एकदम उत्पन्न होतात. सच्चेपणा व प्रामाणिकपणाची परस्पर भावना ठेवली कर हा संबंध सर्वश्रेष्ठ ठरतो. सामान्यपणे हा संबंध वाहय आकर्षणावर आधारित असतो. त्यामुळे आंतरिक दृढ भावनेचा अभाव असतो.
कुंभ :-
कर्क :- या संबंधात कार्यातील यश व प्रसिध्दीचे आश्वासन असते. महत्त्वपूर्ण कार्यात हा संबंध यशदायक असतो. घराच्या निवडीबाबत दोघात मतभेद होतात. कर्क राशी कुंभेला महत्वपूर्ण कार्य करण्याची योग्यता, आरोग्य व प्रगती विषयी सावधान करते. कळेचा प्रभाव कुंभ राशीवर आरोग्य, कार्य व त्यांचे आश्रित यावर पडतो.
सिंह :- दोन्ही राशीत विवाह होणे संभवते. सिंह राशी कुंभेचा विवाह, – भागीदारी व जनसंपर्कावर परिणाम करते. या दोन्ही राशी परस्पर विरोधी आहेत. तरी यांच्यात संबंध होऊ शकतो. दोन्ही राशी सामाजिक कार्याच्या दृष्टीने चांगल्या असतात. आपसात मतभेद मात्र राहतो.
कन्या :- कन्या राशी कुंभेच्या योजना पूर्ण करण्यात व भविष्यनिर्माण – कार्यात सहाय्यक वरते. नवीन शोध करण्यात उत्साहित करते व आर्थिक बाबतीत चांगला सट्टा देते. लेखन, वैज्ञापनाच्या क्षेत्रातही यश मिळते. कन्या राशीचा संबंध कुंभेच्या संपत्ति, दीर्घ कालान सुरक्षा व रहस्यांच्या बाबींशी असतो.Love Or Marriage
कुंभ :-
तुळ :- राशी अनुकूल असतात. त्यामुळे यांचा संबंध स्वप्न साकारण्यात येतो. काही शिकण्याची बुध्दी असते. सामाजिक व कौटुंबिक बाबतीत दोघांचे चांगले पटते.
वृक्षिक :- या दोन्ही परस्पर सहयोग राशी आहेत. व्यवसायिक क्षेत्रात या संबंधामुळे फायदा मिळतो. वृश्चिक राशी कुंभेच्या भावी जीवनावर सामाजिक स्थिती व मूळ इच्छा आकांक्षावर प्रभाव टाकते. एकमेकांना पूर्णपणे ओळखले तर हा संबंध यश व सुखदायी होतो.Love Or Marriage
धनु :- या दोन्ही राशी एकमेकांना अनुकूल आहेत. त्यामुळे या संबंधामुळे – दोहोंचे जीवन सुखी बनते. धनुराशी कुंभ राशीच्या इच्छा-आकांक्षा व मित्र संबंधावर प्रभाव टाकते. या संबंधामुळे कुंभ स्वतःला लोकप्रिय बनवते. आपल्या शिक्षणात प्रगती होऊन विचारात औदार्य येते. हा संबंध फायदेशीर व सुखकारक ठरतो.
मकर :- सामान्यपणे हा संबंध उदासीन असतो. परंतु आर्थिक दृष्टीने हा संबंध चांगला असतो. या संबंधामुळे नवी दिशा मिळते परंतु मनात मतभेद असतात. प्रामाणिकपणा व सत्त्याचा वापर केल्यास जीवन सुखी होते.
कुंभ :- वर्तमानकाळापेक्षा भविष्याच्या दृष्टीने हा संबंध चांगला असतो. या दोन्हींच्या मध्ये एक तिसरी व्यक्ती असावी लागते. या संबंधामुळे जातक सुखी व अशस्त्री असतात.
मीन :- मीन राशी कुंभेच्या आर्थिक व व्यक्तिगत संपत्तिवर परिणाम करते. मीनेच्या सहयोगाने कुंभ लाभप्रद व्यवसाय करुन आपल्या संपत्तित वाढ करते. मीन राशीची आवडत्या वस्तुंच्या संग्रहात मदत होते. दोघे मिळून एक चांगले विक्रेता बनू शकतात. एकूण हा संबंध सुखी व लाभदायक असतो.
मीन राशीच्या जातकाचे इतर राशीच्या जातकांशी संबंध कसे राहतील.? Love Or Marriage
मेष :- मीन मेष संबंध फारसा लाभदायक होत नाही. या दोन्हीं क्रमशः जल व अभि राशी आहेत. या दोघांच्या संबंधामुळे विशाल कल्पना व आदशाँची सृष्टी होते. परंतु यांचे मनोमिलन अवघड असते. मेष राशीच्या बाबतीत मीन रास रहस्यमय व आकर्षक असते.
वृषभ :- मीन वृषभ हा संबंध खूप फायदेशीर ठरतो. परस्परात पूरक व अनुकूल भावना असतात. घराच्या निर्माण व सजावटीत या संबंधाचे विशेष स्थान असते. या संबंधाचा परिणाम लहान प्रवास, विचार व नातेवाईकांवर होतो. या दोहोंचा विवाह होतो. मीन राशी वृषभेला लेखन कार्य व जनसंपर्काची प्रेरणा देते.Love Or Marriage
मिथुन :- या दोन्हीं राशी परस्पर विरोधक असतात. मिथुन राशी मीनेला – मार्गदर्शन करते. मिथुन राशीकडे खूप विचार संग्रह असतो. त्यातून मीनेने निवड करावयाची असते. मिथुन मीन राशीला सुरक्षा, दीर्घकालीन योजना, घर-संपत्ति विषयी जागरुक ठेवते. त्या बरोबरच प्रवास, दृष्टिकोन व औदार्यता व रुचि जागृत करते.
कर्क :- मीन कर्क यांचा विवाह होऊ शकतो. त्यांना संततीसुध्दा होते व नंतर संबंधविच्छेद होते. या बाबतीत भावनांवर नियंत्रण ठेवणे अवघड जाते. मीन राशी शारीरिक बाबतीत कर्केकडे आकर्षित होते. या संबंधामुळे प्रवास, परिवर्तन, विभिन्नता संकेत मिळतो.
सिंह :- सिंह राशी मीनेची स्वप्ने साकार करते. सेक्सच्या दृष्टिने ही रास खूप आकर्षक असते. सिंहेच्या संबंधामुळे मीन राशीचे आरोग्य प्रभावित होते व अतिकामामुळे ती थकते. यास्तव मीनेने संतुलन ठेवणे आवश्यक बनते. सिंह मीनेला सक्रिय ठेऊन तिच्या विशिष्ठ गुणांना प्रकाशित करते.Love Or Marriage
मीन :-
कन्या :- हा संबंध महान, सुखद व दीर्घजीवी असतो. यात विरोधी स्वभावाचे आकर्षण असते. त्यामुळे यांच्यात विवाह होतो. कन्येचे चापल्य मीनेला व मीनेची • रहस्यात्मक वृत्ती कन्येला आकर्षित करते. या संबंधामुळे काळ चांगला जातो व सार्वजनिक “स्थिती उंचावते. कन्या राशी मीनेला अधिक रचनात्मक बनवून विवाह, भागीदारी व जनप्रतिष्ठेशी संबंध ठेवते.
मीन :-
तुळ :- तुळ राशी मीन राशीच्या सेक्स, धन व रहस्याला प्रभावित करते. यामुळे मीन राशी उत्साहाने रचनात्मक कार्य पूर्ण करते. आर्थिक व भावात्मक विषयी आशा पल्लवित करते. या संबंधामुळे जीवन आशापूर्ण बनते हा संबंध निश्चित सुखकारक व लाभप्रद होतो.Love Or marriage
वृक्षिक :- या संबंधाची यशस्विता पारस्पारिक स्पष्टपणा व मोकळया – मनावर अवलंबून आहे. मीन राशी वृश्चिक राशीला आपला मार्गदर्शक मानते व वृश्चिक राशी मीनेला प्रत्यक्ष भौतिक अर्थाने पाहते. या दोघांच्या संबंधामुळे भौतिक क्षेत्रात आश्चर्यजनिक प्रगती होते. प्रवास, शिक्षण, तत्त्वज्ञान व कार्यक्षमतेवर प्रभाव असतो.
धनु :- मीन धनु हा संबंध बहुधा सुखी नसतो. परंतु यामुळे परस्परात – सुरक्षेची भावना उत्पन्न होते. दोघेजण नेता किंवा अनुयायां च्या स्थितीत राहिले तर असंतोष निर्माण होतो. हा संबंध व्यवसायिक स्तरावर चांगला राहतो. परंतु अनेक प्रकारचे मतभेद व संघर्ष वैवाहिक जीवनात निर्माण होतात. धनु राशी मीन राशीचे भावी जीवन, प्रयत्न, आकांक्षा, प्रतिष्ठा, सामाजिक स्थिती व यश या गोष्टी प्रभावित करते.
मध्यान :-
मकर :- मीन मकर ही एक चांगली जोडी आहे. मकर राशी मीनेच्या आशा आकांक्षा, प्रेरणा व मित्रांना प्रभावित करते. वर वर पाहिले तर हा संबंध अत्यंत वेगळा दिसतो परंतु आंतरिक स्वरुपात अनेक प्रकारचे साम्य या दोहोंत असते. या दोघांचा संबंध अपार प्रेमाला जन्म देतो. यात पारिवारीक सुख संपन्नता असते व हा संबंध पूर्णरुपात लाभदायक असतो. मकर राशीकडून मीनेला लाभदायक सल्ला मिळतो.
कुंभ :- मीन कुंभ या दोन्हीं राशी रहस्यमय आहेत. या संबंधामुळे आर्थिक – फायदा मिळतो. जगातील सामन्याशी झुंझण्याची शक्ति प्राप्त होते. फिल्म, टि.व्ही., अभिनय, व दान देणाऱ्यांवर चालणाऱ्या संस्थाच्या संघठनात्मक कार्यात हा संबंध दोन्ही जातकाना यशस्वी करतो. वैवाहिक जीवन यशस्वी होते.
मीन :- हा संबंध बहुधा यशस्वी होतो. या संबंधामुळे चांगल्या गोष्टींचे परिणाम प्रकट होतात. यासाठी मात्र दोघांनीही आपले विचार, इच्छा, आकांक्षा व स्वप्ने दृढ व बलवान बनविणे आवश्यक असते.
मार्गदर्शन :-
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!
अश्याच नवनवीन लेख ची सूचना आपल्याला वेळोवेळी मिळत राहावी या साठी खालील WhatsApp वर क्लिक करावे.
आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.
( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
अधिक माहिती साठी संपर्क :-
श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997 9423270997
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन, (संतती समस्या विशेतज्ञ)
सामुद्रिक ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ , व्यसन मुक्ती औषध तज्ञ
( दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant