Article no 002: आज मा; अजित दादा पवार यांची पत्रिका पाहूया, त्यांना मिळालेले यश का व कसे मिळाले,

article-no-002-2
श्रीपाद गुरुजी

Article no 002: ही पत्रिका माननीय अजित दादा पवार यांची पत्रिका आहे.या पत्रिकेवरुन राजकारणात त्यांना एवढी मोठे यश का मिळाले याबद्दल विश्लेषण करणार आहे.

लग्न कुंडली मध्ये दशमस्थानात हर्षल, बुध,रवी हा एक मोठा राजयोग होत आहे व राशी कुंडली मध्ये चंद्राच्या दशम स्थानाचा मालक मंगळ दशम स्थानाच्या दशमस्थानात व या मंगळाची दृष्टी दशम स्थानावर आहे. दशम स्थान अत्यंत बलवान व सिंह या राज राशीत मंगळ त्यामुळे दशम स्थानाला विशेष बळ, महत्व प्राप्त झाले आहे.

यामुळे यांना मानसन्मान, प्रतिष्ठा, कीर्ती, अधिकार पद लाभते व चतुर्थ स्थान हे जनतेचे कारक स्थान आहे. चंद्र लोकप्रियतेचा कारक आहे, गुरु ,चंद्र नवपंचम योग होत आहे. Article no 002चतुर्थश व दशमेश यांच्यामध्ये लाभ योग होत आहे. या चंद्र व शनी सोबत शुक्र, मंगळ यांचे शुभयोग होत आहेत.शनि तृतीयात आहे त्यामुळे तृतीय स्थान पराक्रमाचे स्थान आहे.भाग्य स्थानाचा मालक दशमस्थानात केंद्रस्थान आला आहे. बुध हा हर्षल, रवी बरोबर त्यामुळे भाग्यस्थान बलवान झाले.

भाग्यस्थान बलवान

चंद्राच्या भाग्यस्थानी गुरु त्यामुळे राशी कुंडलीला ही महत्व प्राप्त होत आहे. तृतीय स्थानात शनी हा राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत चांगला योग आहे तिकीट मिळणे निवडून येणे यासाठी तृतीय स्थान फार महत्वाची असते. त्याचबरोबर शत्रू स्थानावर किंवा शत्रू स्थानाच्या मालकावर पाप ग्रहांची दृष्टी असावी लागते यांच्या पत्रिकेमध्ये सहाव्या स्थानात केतू आहे.Article no 002 सहाव्या स्थानावर राहुची दृष्टी आहे व मंगळाची ही दृष्टी आहे त्यामुळे शत्रूवर विजय मिळवण्यासाठी प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवण्यासाठी राहू, मंगळाची उत्तम साथ लाभते.

राशी कुंडलीचा सहाव्या स्थानाचा मालक चंद्र, या चंद्रावर शनीची पूर्ण दृष्टी आहे.
त्यामुळे राजकारणात यशस्वी होण्यासाठी जी ग्रहस्थिती लागते ती या पत्रिकेमध्ये दिसत आहे.राजकारणामध्ये प्रथम स्थान, तृतीय स्थान, चतुर्थ स्थान, सहावे स्थान, सातवे स्थान, व दशम स्थान, भाग्यस्थान, या स्थानांना विशेष महत्त्व असते व यांच्या पत्रिकेमध्ये लग्न कुंडली व राशी कुंडली मध्ये विशेष बळ,Article no 002 महत्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे हे राजकारणामध्ये यशस्वी होत आहेत. व पुढील जीवनामध्ये ही यशस्वी होत राहतील राजकीयदृष्ट्या ही पत्रिका अत्यंत चांगली आहे.

तसेच आपण या पत्रिकेचे आर्थिकदृष्ट्या मजबूत व प्रॉपर्टी संदर्भात प्रबळ का?

या संदर्भात पत्रिकेच्या माध्यमातून विश्लेषण करणार आहे.

कुंभ रास, तूळ लग्नाची पत्रिका आहे प्रथम स्थानाचा मालक शुक्र लाभस्थाना मध्ये आला आहे त्यामुळे यांना अनेकांचे सहकार्य लाभते या गोष्टीचा आर्थिक दृष्टीने व राजकारणी दृष्टीने विशेष फायदा होत आहे.

आता आपण आर्थिकदृष्ट्या प्रबळ का? Article no 002 यासंदर्भात योग पाहणार आहोत यांच्या आर्थिक स्थानाचा मालक धनस्थानात स्थानाचा मालक मंगळ हा सिंह या राज राशीत आला आहे व विशेष करून प्रथम स्थानाचा मालक शुक्र सोबत लाभस्थाना मध्ये आला आहे शुक्र हा नैसर्गिक कुंडलीमध्ये धनस्थानाचा मालक आहे, लक्ष्मीचा स्थानाचा मालक आहे.मंगळ हा भूमीचा मालक आहे, प्रॉपर्टी चा मालक आहे व शनी जमिनीचा स्थिर प्रॉपर्टी मालक आहे.हे मोठ्या प्रॉपर्टीचा मालक आहे.
नैसर्गिक या मोठ्या दोन Article no 002 ग्रहा बरोबर यांच्या पत्रिकेमध्ये शनी-मंगळ अंशात्मक नवपंचम हा एक शुभ योग आहे व शुक्र मंगळावर दशमेश चंद्राची शुभ दृष्टी हा पण एक चांगला योग आहे.

चंद्र-मंगळ परस्पर दृष्टी मध्ये आहेत तसेच केंद्र स्थानाचे दुसरे स्थान हे धनस्थान असते. प्रथम स्थानाचे धनस्थानाचा मालक मंगळ आहे. चतुर्थ स्थानाचा धनस्थाना चा मालक स्वतः शनिच आहेत. सातव्या स्थानाच्या धनस्थानात चा मालक शुक्र आहे व दशमस्थानाच्या धनस्थानाचा मालक रवी आहे. मंगळ शुक्र युती लाभस्थानात सिंह राशीत त्यामुळे तृतीय स्थान, प्रथम स्थान, सप्तेम स्थान, अष्टम स्थान या स्थानाला विशेष बळ आले.

लाभ स्थान

शनी तृतीय स्थानात म्हणजेच पंचमेश त्याच्या लाभ स्थानात त्यामुळे चतुर्थ स्थान, पंचम स्थान, तृतीय स्थानाला बळ आले व दशमस्थानात रवी, बुध युति रवी लाभेश व बुध भाग्येश दशमस्थानात केंद्र स्थानांमध्ये आले त्यामुळे भाग्यस्थान, दशमस्थान स्थानाला विशेष बळ आले.Article no 002 पत्रिकेमध्ये व्यर्थ स्थान राहू व षष्ठ स्थानात राहुची दृष्टी त्यामुळे विरोधकांवर मात करण्याची दृष्टीने या दोन स्थानांना ही महत्व प्राप्त झाले आहे. तर प्रत्येक स्थानाला आर्थिकदृष्ट्या विशेष बळ प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती व स्थिर प्रॉपर्टी संदर्भात पत्रिका उत्तम आहे.

मात्र यांच्या संततीला म्हणावं असं यश प्राप्त झालेले नाही याचे कारण पाचव्या स्थानावर शनी व मंगळाची पूर्ण दृष्टी आहे, तसेच अष्टमेश शुक्राची ही दृष्टी आहे, तसेच राशी कुंडली मध्ये पाचव्या स्थानावर शनीची दृष्टी आहे. योग्य ते मार्गदर्शन व उपाय केले तर संतती ही बऱ्यापैकी यशस्वी होऊ शकते.

वरील वरील लेख जुलै 2020 मध्ये लिहिलेला आहे

खालील मजकूर एक जुलै2023 रोजी ऍड केलेला आहे

अजित दादांनी कालचा निर्णय घेतलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा निर्णय घेतलेला आहे त्याचे परिणाम त्यांना शनी मार्गी झाल्यानंतर दिसायला चालू होतील 4नोव्हेंबर2023ला शनि मार्गी होईल खऱ्या अर्थाने रिझल्ट दिसतील ते जानेवारी2024 ते मे2024 मध्ये हा कालखंड Article no 002 अत्यंत अडचणीचा जाईल ,प्रचंड त्रासदायक मनस्तापचा राहणार आहे तसेच दादांचा एक निर्णय चुकला की दुसरा निर्णय चुकतो दुसरा चुकला की तिसरा चुकतो पूर्णपणे एकंदरीत मे 2024पर्यंत अडचणी कटकटी जाईल.टर्निंग पॉईंट राहिल आयुष्याचा मात्र त्यांच्या जीवनाला चांगला किंवा वाईट परिणाम या ठिकाणी मिळणार आहे मात्रशरद पवार साहेबांना वेळ चांगली असल्यामुळे

इथे फायद्यातच होईल हे मात्र नक्की अजित दादांना फायदा होईल अजितदादा पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येतील. कारण शरद पवार साहेबांना वेळ चांगली आहे.Article no 002 आताची वेळ अजित दादा ना थोडीशी वेळ खराब आल्यामुळे त्यांचा आत्ताचा निर्णय घेतलेला चुकलेला आहे जुलै2023 ते ऑगस्ट2023 हा कालखंड त्यांना कठीण कालखंड होता त्या काळात त्यांच्याकडून ती चूक झालेली आहे व पुढेही घटना त्या पद्धतीने घटना चुकत जातात व त्याचे प्रॉब्लेम विधानसभेला त्यांना नक्कीच अडचणी वाढतील. मात्र विधानसभा जून, जुलै मध्ये असतील 2024 ला तर नक्कीच त्यांना फायदा होईल अजित दादांना.

पुढील भकित

विधानसभा जर जानेवारी2024, फेब्रुवारी2024 मध्ये असतील तर त्यांना पराभव पत्करावा लागेल. कोणत्याही पक्षातून किंवा अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली तरी ही पराभव पत्करावा लागेल.

जून 2024 नंतर मात्र त्यांना वेळ चांगली आहे मुख्यमंत्री पदावर ते विराजमान पण होतील. ही वेळ त्यांना अत्यंत चांगली आहे इलेक्शनचा पिरेड कोणता आहे त्यावर त्यांना मोठेपण मिळणार की नाही हे Article no 002 अवलंबून राहील त्यांना वेळ चांगली असताना जर इलेक्शन झालं तर त्यांना मुख्यमंत्री पद यावेळी त्यांना नक्की मिळेल. (इलेक्शनचा निकाल हा मतदान ची तारीख व निकालाची तारीख ह्याला अत्यंत महत्त्व प्राप्त होते त्यामुळे जोपर्यंत ह्या तारखा निश्चित होत नाहीत तोपर्यंत पराभव किंवा विजय हे आपण सांगू शकत नाही.)

वरील संदर्भ 1 जुलै 2023 मधील झालेल्या परिस्थितीनुसार पुढील विचार मांडलेला आहे याची नोंद घ्यावी. वरील मजकूर एक जुलै रोजी लिहिलेला आहे

मार्गदर्शन :-

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!

अश्याच नवनवीन लेख ची सूचना आपल्याला वेळोवेळी मिळत राहावी या साठी खालील WhatsApp वर क्लिक करावे.

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित 
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997 9423270997 
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन, (संतती समस्या विशेतज्ञ)
सामुद्रिक ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ , व्यसन मुक्ती औषध तज्ञ
( दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!