Virgo, कन्या रास बारा राशीपैकी सहावी रास होय. म्हणून ६ आकडा लिहिला तरी त्याचा अर्थ कन्या राशी असा प्रचलित आहे. कुंडलीत राशींची नावे न लिहिता आकडेत लिहावयाचे असतात. म्हणूण प्रत्येक राशींचा अंक पाठ करावा.
१) नक्षत्र :- Virgo
उत्तराफाल्गुनी नक्षत्राचे शेवटचे ३ चरण, हस्त नक्षत्रांचे चार चरण व चित्रा नक्षत्राचे दोन चरण मिळून कन्या रास बनते.
कन्या राशीची आकृती कुमारी कन्येची आहे. पृथ्वीवर पडणान्या वृत्तीय – ये मून १२ ते ० अंशापर्यंत या राशीची व्याप्ती मानण्यात येते.
२) कन्या राशीचा नावे :-
पाथेन, कन्या, रमणी, तरूणी व इंग्रजीत Virgo (वीर्गो), ही स्नेह व विवेकाची प्रतीक आहे.
दीर्घकाय, स्त्रीपुरूषांची क्रीडावस्थळे, शिल्प व हस्तकलेलची केंद्रे इत्यादि ठिकाणी विचरण आहे.
द्विस्वभावी बाल्यावस्थेतील, स्वत्त्वगुणी, पृथ्वीतत्त्वाची, दिवसा बलवान, वातप्रकृतीची, शुद्र जातीची शीर्षोदय समरास आहे.
ह्या राशीचा स्वामी बुधवार व अंक ५ असून केरल प्रांत हे निवासस्थान आहे.
शरीरातील कटिप्रदेश-कंबर, पोट, व आंतडी यावर या राशीचा अंमल आहे.
जनसेवा व स्वास्थ्यविषयक कामाशी या राशीचा संबंध असून हिला मातुल राशी मानतात व आजोबा महिलांचे कारकत्व या राशीकडे आहे.
मूग, मटकी, अळसी, पिवळी मोहरी, मटार, ज्वारी, जवस, कापूस, व वस्त्र ही राशीची प्रमुख द्रव्ये आहेत.
मेदनीय ज्योतिषशास्त्रात तुर्क, युनान, ब्राजील, भारत, पॅरीस, इत्यादि देशांचे प्रतिनिधित्व या राशीकडे देण्यात आले आहे.
३) उत्तराफाल्गुनी नक्षत्राच्या जातकाची लक्षणे :- Virgo
उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती स्वभावाने क्रूर असतात. आत्मस्तुती प्रिय, धाडसी,
अभिमानी, प्रसिद्धी, मिळवणारे, हसतमुखी, सुधारणावादी, कर्तव्यदक्ष, भांडणात पुढाकार घेणारे दान पुण्य करणारे, धनवान असे महाभाग उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेले असतात.
खगोलतज्ज्ञ, ज्योतिषी, हस्तरेषातज्ज्ञ, लेखक, प्रकाशक, इंजिनिअर, फिजिशियन, राजदूत, प्राध्यापक, म्हणून उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्याना ख्याती मिळते.
४) उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या महिलांची लक्षणे :-
धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या, धनसंचयाकडे सर्व लक्ष केंद्रित करणाऱ्या,
टीका करणे व लोकांची उणे-दुणे काढण्याची वृत्ती असणाऱ्या सतत बदनामी पत्करणाऱ्या,
विघातक सर्व गुणसंपन्न, पुत्र सुखाने आनंदी अशा महिला उत्तराफाल्गुनी नक्षत्राच्या असतात.
५) उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर व्याधी व व्याधीमुक्तीसाठी दैवी उपाय :- Virgo
उत्तराफाल्गुनी नक्षत्राच्या व्याधी व व्याधीमुक्तीसाठी दैवी उपाय – शारीरिक व सांसारिक अडचणी उत्तराफाल्गुनी नक्षत्राच्या जातकाना खूप भोगाव्या लागतात.
वैवाहिक सुखात विघ्ने येतात यासाठी खालील मंत्राचा दहा हजार वेळा जप करावा.
ॐ दैव्यावध्वर्यू आगत गूं रथेन सूर्यलचा । तं प्रयत्नयावेनाशिचं देवानाम् ॐ अर्यमणे नमः ॥
६) हस्त नक्षत्राच्या जातकाची लक्षणे :-
कठोर, कपटी, कोणाचेही न ऐकणारे, स्वतःलाच शहाणे व मोठे समजणारे, व्यसनामुळे लाचार होऊन खोटे बोलणारे,
भावंडाचे सुख कमी असणारे, परस्त्रीकडे अधिक आकर्षित होणारे वादातीत प्रामाणिक,
भागीदाराशी न पटणारे, पावला- पावलागणिक अडचणीशी झुंझणारे असे महाभाग हस्त नक्षत्रावर जन्मलेले असतात.
वेदांचे जाणकार, व्यापारी, कुशल कार्यकर्ता, तरल पदार्थांचे शौकीन, कापडाचे व्यापारी,
इंजिनीअर, पेंटर, राजदूत, राजकारणी, कलाकार, सर्जन, नर्स, पंडित, कवी,प्रेसमधील कामगार, वकील बहुधा या नक्षत्राचे असतात.
७) हस्त नक्षत्राच्या महिलांची लक्षणे :- Virgo
हस्त नक्षत्रावर जन्मलेल्या महिला मिजासखोर, महत्त्वाकांक्षी आणि दुसऱ्याकडून पैसा मिळवण्यात तरबेज
आपली कामे व्यवस्थित व चोख करणाऱ्या, सांसारिक जीवनात व्यवस्थित रहाणाऱ्या,
धाडसी, उत्साही, परंतु दया व उदारता कमी, दिसायला सुंदर पण निर्लज्ज,
दूसऱ्यांच्या वस्तू आपल्याच समजणाऱ्या,
अभक्ष्य पेय पदार्थ भक्षण करण्यात मागे पुढे न पाहणाऱ्या अशा हस्त नक्षत्री महिला असतात.
८) हस्त नक्षत्राच्या व्याधी व व्याधीमुक्तीसाठी देवी उपाय :-
रविच्या अनिष्टतेमुळे हस्त नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागतो.
या अनिष्टतेच्या निवारणासाठी खालील मंत्राचा पाच हजार वेळा जप स्वतः करावा किंवा योग्य ब्राह्मणाकडून करवून घ्यावा.
दशांश हवन दूध-तूपाच्या आहुतीने करावे.
मंत्र-ॐ बिभ्राडवृहलिबनु सौम्यंमध्वासुर्दधज्ञ पत्तावविहुतृ । वातजूतो यो अभिक्षतित्मता प्रजाः पुवोषापुरुषा विराजति ॐ सवित्रे नमः ।
सोमवारी हस्त नक्षत्र येईल त्यादिवशी (‘जातीमुळ’) एका तावीत मध्ये घालून रेशमी दोरा बांधून गळ्यात किंवा दंडास बांधावे.
९) चित्रा नक्षत्राच्या जातकाची लक्षणे :- Virgo
चित्रा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती विचारवंत, देवधर्मावर श्रद्धा असणाऱ्या सुपुत्रवान, पुत्रसुख असणाऱ्या, शत्रूजीत, व्यवहारकुशल, स्वच्छताप्रिय,
पोशाखाच्या बाबतीत टापटीपपणाची आवड असणाऱ्या व हसऱ्या स्वभावाच्या असतात. कॉम्प्युटर, प्रकाशन व व्यापारात चांगले नाव कमवितात.
१०) चित्रा नक्षत्राच्या महिलांची लक्षणे :-
चित्रा नक्षत्रावर जन्मलेल्या महिला नाक, कान, व डोळे, सुंदर असणाऱ्या हसतमुखी, विनोदी, कर्मप्रिय, पतीची आज्ञा शिरसावंद्य मानणाऱ्या महत्त्वाकांक्षी, पांढऱ्या वस्त्रांची आवड असणाऱ्या, आकर्षक व्यक्तीमत्त्वाच्या व चटकन रागावणाऱ्या असतात. कुटुंब व समाजाच्या कीर्तिस्तंभ असतात.
११) चित्रा नक्षत्राच्या व्याधी व व्याधीमुक्तीसाठी दैवी उपाय :- Virgo
चित्रा नक्षत्रवावर जन्मलेल्या व्यक्तींना बहुमूत्र रोग, अर्धांगवायु, उन्माद, कामुकतेमुळे जननेंद्रियांचे विकार त्रस्त करतात. धंद्यात अपयश येते. सांसारिक जीवनात खूप कष्ट उपसावे लागतात. या सर्व व्याधींच्या निवारणार्थ मंगळवारी चित्रा नक्षत्र असेल त्यादिवशी तीळ-गुळाचे दान करावे. विश्वकर्मादेवाचे पूजन करावे. खालील मंत्राचा दहा हजार वेळा जप करावा.
ॐ त्वष्टा तुरीयो अद्भुत इन्द्राग्निपुष्टि वर्धनपू । द्विपदादन्द इन्द्रियमुक्षा गौत्रवयोदथः ॐ विश्वकर्मेण नमः ।
एकदशांश हवन योग्य व जाणकार ब्राह्मणाकडून करवून घ्यावे. यामळे स्वतःचे वाहन, घर व इतर अडचणींचा परिहार होऊन समृद्धी लाभते.
१२) कन्या राशीच्या व्यक्तींचे भविष्य :-
कन्या राशीचे महाभाग स्त्रियोचित गुणस्वभाव संपन्न असतात. आचरण शुद्धअसून हास्य-विदोदात भाग घेतात. कन्या संतती अधिक असते. पुत्रसंतती कमी असते. शत्रूंचा बीमोड आपल्या बुद्धिचातुर्यांने सहजपणे करतात.
यांच्या डोक्यात लाज असते. आकस्मिक धनप्राप्ती होते. परंपरा व मर्यादेला अधिक महत्त्व देतात. शिक्षणात खूपच प्रगती करतात. स्वभावाने रागीट असेल तरी यांच्या रागाचा पारा लवकर उतरतो.
आयुष्यभर दुसऱ्यांसाठी झटतात. कन्या राशीच्या महिला, सुंदर, गृहकृत्यदक्ष आईवडील व पतीची माया संपादणाऱ्या साधनसंपन्न, अन्नवस व धनसंपत्तीचे सुख भोगणाऱ्या, नृत्यकलेत प्रवीण व चारित्र्याने कांहीशी शिथील असतात.
१४) जातकाभरण चंद्र निर्माणाध्याया प्रमाणे :- Virgo
कन्या राशींच्या व्यक्ती कुटुंबातील व्यक्तीकडून प्रशंसा मिळवतात. धनी मानी. देश, विदेशाची खूप माहिती असणारे असतात, गुर्वेद्रिय, जननेंद्रिय किंवा गळ्यावर काहीतरी खून असते. जन्मापासून तिसन्या वर्षी अग्निभय असते.
पाचव्यावर्षी नेत्रपीडेचा त्रास होतो. नवव्या व तेराव्या वर्षी गुप्तेंद्रियपीडा होते. पंधराव्या वर्षी विषारी जंतूपासून त्रास होतो. एकविसाव्या वर्षी झाडावरून किंवा भिंतीवरून खाली पडून जखमी होण्याचा योग असतो.
तीसाव्या वर्षी जंगलात शस्त्रघातामुळे जखमी होण्याचा योग असतो. आयुष्ययोग जवळ-जवळ ऐंशी वर्षाचा असतो.
१५) कन्या राशीची अनुभवसिद्ध फले :-
सरळ व साधा स्वभाव, स्वाभिमानी व उदार स्वभाव यामुळे धनसंग्रह होत नाही. भागीदार फसवतात. लोक उपकाराची फेड अपकराने करतात. भाऊ-बहीण- आईवडिलांबरोबर मतभेद असतात.
दोस्तमंडळी यांना यांचेच खाऊन-पिऊन बुडवतात.
लेखनकलेत प्रवीण, प्रभावी वक्तृत्व, गायनवादनादि कलेत रूची असणारे जातक कन्या राशीचे असतात. चालण्यात गबाळेपणा, भांबावलेल्या हत्तीप्रमाणे चाल असते. कामकलेत चतुर व मधुर भाषणाने सर्वांना मोहित करण्याची कला अवगत असते.
कन्या राशीच्या व्यक्ती बँकेत अकौंटट लिगल अॅडव्हायझर, राजकारणी, पुस्तक विक्रेते, आयुर्वेद व अॅलोपथीचे डॉक्टर, लॉजिंग बोटिंगचा व्यवसाय करणारे, वकील इन्कमटॅक्स सेल्सटॅक्स सल्लागार, इत्यादि व्यवसायात आढळतात.
प्रतिकूल :-
कोणत्याही वर्षी मार्च महिना
प्रत्येक महिन्याच्या ८,११,२३,३० तारखा.
शनिवार.
लाल रंग लाल रंगाची वस्त्रे इत्यादि. मेष, सिंह, धनु, राशीच्या व्यक्ती, कन्या राशीच्या व्यक्तींना प्रतिकूल असतात.
१६) कन्या राशीच्या व्यक्तींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचा काळ :-
जन्मापासून वयवर्षे १४ पर्यंत विविध शारीरिक त्रास सहन करावा लागतो.
१८ ते २६ या कालखंडात विवाह योग असतो. वैवाहिक जीवन सुखावह राहील.
भोगविलासात खूप वेळ जाईल. आई-वडिल व मित्र याकडून सुख कमी मिळेल. स्वप्ने मोठ्या प्रमाणात पडतील.
उद्योग व्यवसाय नोकरीत यश मिळेल. स्वतःचे घर होईल.
२५ व्या व३१ व्यावर्षी कोर्टकचेरी किंवा सरकारी लफडे मागे लागेल.
३६ ते ४८ हा कालखंड अत्यंत वाईट व दुःखद जाईल. प्रत्येक कार्यात अपयश येईल. दोन वेळची भाकरी मिळणे ही कठिण होईल. व्यवसायाचे दिवाळे वाजेल. मित्र शत्रु होतील.
४९ ते ६२ या कालखंडात पुन्हां चांगल्या काळाची सुरूवात होईल.
गेलेले वैभव परत मिळेल. दुःखाचा अंत होईल. भाग्यविस्तार होईल. अनेकांचे सहकार्य मिळेल.
६३ ते ७० हा काळ सुखाचा जाईल. ७० व्या वर्षी क्षयरोग होऊन त्यातच जीवन संपण्याची शक्यता आहे.
१७) कन्या राशीच्या व्यक्तींसाठी विशेष उपासना :-
आयुष्य सुखी रहाण्यासाठी खालील ‘श्रीरामवंदना’ रोज ११ वेळा म्हणावी.
आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् । लोकाभिरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥ रामाय रामभद्राय रामचन्द्राय मानसे । रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥ नीलाम्बुजश्यामल कोमलांगं सीता समारोपितवाम भागम् । पार्णो महासायकचारु चापं नमामि रामं रघुवंशनाथम् ॥
या शिवाय संकष्टी चतुर्थी करावी. बुधग्रहाचे रत्न ‘पाचू’ किंवा फिरोजा उजव्या हाताच्या करंगळीत धारण करावे. ‘बटुकभैरव स्तोत्र’ नित्य वाचावे.
मार्गदर्शन :-
ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा, WHATSAPP GROUP
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!
आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.
(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
अधिक माहिती साठी संपर्क :-
श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,(संतती समस्या निवारण विशेतज्ञ)