Ardra Nakshatra, आर्द्रा नक्षत्रातील सर्व बारा ग्रहांची फले,

Ardra Nakshatra
श्रीपाद गुरुजी

Ardra Nakshatra, रवि –

Ardra Nakshatra, १) रवि आर्द्रा नक्षत्रात असून चंद्राच्या दृष्टित असेल तर जातक स्वजनांकडून पीडित असतो.

त्याला उदरनिर्वाहासाठी जन्मस्थानापासून दूर रहावे लागते. तेथेही अपयश पदरी येते.

२) मंगळाची दृष्टी या रविवर असेल तर जातकाचे शत्रू त्याला कोठेही टिकू देत नाहीत.

३) बुधाची दृष्टी असेल तर अन्नान्न दशा होते. परंतु संतती बुद्विमान निपजते व ती चांगला पैसा मिळवते.

त्यामुळे त्याचे जवळचे आप्तेष्ट त्याचा मत्सर करतात.

४) गुरुची दृष्टी असेल तर जातक तंत्रमंत्रादि शास्त्राचा ज्ञाता असतो. कुटुंबाशी भांडणारा, बाहेरच्या लोकांत मान मिळवणारा व भटक्या असतो.

५) शनिची दृष्टी असेल तर विदेशात खूप पैसा मिळवतो. परंतु गुरु किंवा शनिच्या महादेशत सर्व धनसंपत्ती नष्ट होते.

असा जातक चलाख, पण स्त्रियांसमोर लाजणारा असतो. दुसऱ्यांच्या चेष्ठेचा विषय बनतो.

रवी आर्द्रा नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

रवि जर आर्द्रा नक्षत्राच्या प्रथम चरणात असेल तर जातकं मध्यम स्वरूपाचे शिक्षण घेणारा, श्रीमंत व चांगला ज्योतिषी बनतो.

गणित व वाणिज्य संबंधी रोजगार असतो.

बुध किंवा गुरुचा संयोग असेल तर जुळी मुळे होतात.

मंगळाचा योग असेल तर पोलीस किंवा सैन्यात नोकरी करावी लागते. म्हातारपणी डोळे कमकुवत होतात.

रवी आर्द्रा नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

रवि जर आर्द्रा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात असेल तर जातक गोडबोल्या, स्नेहशील आणि सर्वप्रिय असतो.

तो संशोधक विद्यार्थी, आपल्या कुटुंबाचा प्रिय, सरकार किंवा राजकारणात प्रवेश करणारा असतो.

शनिची दृष्टी रविवर असेल तर दुसऱ्यांच्या मध्ये मध्यस्थी करणारा, दलाल,

कमिशन एजंट किंवा विवाह जमविणारा असतो.. त्याची पत्नी व संतती कष्टाचे जीवन जगतात.

रवी आर्द्रा नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

रवि जर आर्द्रा नक्षत्राच्या तृतीय चरणात असेल तर अनेक विषयात रूचि असणारा,

वयाच्या चाळीसी नंतर ज्योतिषी, हिशेबनीस,

आर्थिक सल्लागार बँक किंवा खाजगी व्यापारी संस्थेत काम करणारा असतो.

याला डांग्या खोकला किंवा फुफ्फुसाचा रोग होतो.

रवी आर्द्रा नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या चतुर्थ चरणात रवि असेल तर जातक विशेष गुणांनी युक्त,

चांगल्या चारित्र्याचा, शास्त्र व पुराणांचा अभ्यास करणारा,

ज्योतिष व मनोविज्ञानाचा ज्ञाता असतो.

अडतिसाव्या वर्षानंतर त्याला प्रसिद्धी मिळते.

तो श्रीमंत आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा असतो. वय फार झाल्यावर लग्न करतो. अशा मुलांचा विवाह त्यांच्या वयाच्या बाविसाव्या वर्षी होतो.

चंद्र :- Ardra Nakshatra

1)आर्द्रा नक्षत्रात चंद्र असेल तर जातक भौतिक शास्त्रात उच्च शिक्षण घेतो परंतु पैसा मिळवण्यात असमर्थ असतो.

2) मंगळाची दृष्टी असेल तर ऊंच पण, हडकुळा व विद्वान असतो.

3) बुधाची दृष्टी असेल तर सरकारकडून अनुदान किंवा ऋण घेऊन व्यवसाय करतो.

4)गुरुची दृष्टी असेल तर अनेक प्रकारची सुखे उपभोगणारा पण खोटे बोलणारा असतो.

5) शनिची दृष्टी असेल तर आर्थिक दृष्ट्या गरीब असतो.

चंद्र आर्द्रा नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या प्रथम चरणी चंद्र असेल तर जातक शीघ्रकोपी, कपटी व दुष्ट असतो.

मंगळाची दृष्टी असेल तर खाणी, विहिरी किंवा कालव्याशी संबंधित कामे करतो. तो चामड्याचा व मातीच्या भांड्याचाही व्यवसाय करतो.

लग्न आर्द्रा किंवा रेवती नक्षत्रात असेल आणि गुरु या स्थानी असेल तर जातक उच्च दर्जाचे जीवन जगतो. पुस्तक प्रकाशन व वितरण्याचा व्यवसायात पैसा मिळतो.

अशा जातकाला वातरोग, खांदे व पाठीचे दुखणे असते.

चंद्र आर्द्रा नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या द्वितीय चरणात चंद्र असेल तर जातक मॅकनिकल, कार्यातून पैसा मिळवतो.

शुक्राची दृष्टी असेल तर संगीत किंवा वाद्ययंत्राचा जाणकार असतो.

पैतृक आजार असतात.

चंद्र आर्द्रा नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

येथे आर्द्रा नक्षत्राच्या तृतीय चरणात असेल तर जातक बुद्धिमान, नेहमी प्रसन्न राहणारा, प्रभावशाली वक्तृत्त्वशक्ती असलेला असा असतो.

रोहिणी नक्षत्रात लग्न असेल तर जातक बचत करणारा व कंजूस असतो.

त्याच्या भावा-बहिणीपैकी एक जण वेडा, सांसर्गिक रोगाने पछाडलेला किंवा प्रेमबाधेमुळे हैराण असतो.

चंद्र आर्द्रा नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या चतुर्थ चरणात असेल तर जातक कमी शिकलेला व श्वरभक्त असतो.

इमानदारीने पैसा मिळवतो. पण घरगुती जीवन अशांत व विवादग्रस्त असते.

कांही जातकाना त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेली व पैसा मिळवणारी पत्नी मिळते. त्यामुळे जातकाचा मान वाढतो.

मंगळ :- Ardra Nakshatra

1)आर्द्रा नक्षत्रात मंगळ असेल व त्यावर रविची दृष्टी असेल तर जातक जन्मतः श्रीमत असतो. तो धाडसी, कॉन्ट्रॅक्टर, लाकूड किंवा प्लॅस्टीकच्या व्यवसायातून पैसा मिळवतो

2) मंगळावर चंद्राची दृष्टी असेल तर पोलीस किंवा सैन्यात ऑफिसर असतो. बेकायदेशी कृत्ये, भ्रष्टाचार व भ्रष्ट आचरणामुळे किंवा वेश्यावृत्ती करण्याच्या आरोपावरून त्याला दंडाची शिक्षा भोगावी लागते.

3) बुधाची दृष्टी असेल तर जातक वैद्य, ज्योतिषी, पु किंवा अध्यापक बनतो तो चांगल्या कुटुंबात पत्नी व मुलासह जीवन जगतो. 4)गुरुची दृ असेल तर लेखन प्रकाशन किंवा पत्रकारितेच्या क्षेत्रात भाग्य उदयाला येते. .

5) शुक्राची असेल तर पत्नी नोकरी करणारी असते.

6) शनिची दृष्टी असेल तर जातक कृतघ्न, तोड करणारा, शारीरिक परिश्रमाने पैसा मिळवतो. धर्म जातीने युक्त असतो.

मंगळ आर्द्रा नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

या जागी आर्द्रा नक्षत्राच्या प्रथम चरणी असेल तर जातक चांगले शिक्षण घेतलेला व कविहृदयाचा असतो. काव्यप्रसारार्थ देश-विदेशी हिंडतो, लग्न कृतिका नक्षत्राचे असेल तर भाऊ बहीण जीवंत राहत नाहीत. पत्नीपण रोगी व संतती अल्पायू असते. त्याला न्यूमोनिया रोग होण्यचा संभव असतो.

मंगळ आर्द्रा नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या द्वितीय चरणी मंगळ असेल तर जातक ज्ञानी, धाडसी, व श्रीमत असतो. जंगल किंवा एकांतात राहणे आवडते. तो काष्ठ कलेचा ज्ञाता किंवा वन अधिकारी, लाकडाचा कॉन्ट्रॅक्टर किंवा फर्निचर विक्रेता असतो. आघात किंवा जखम होणे संभवते.

मंगळ आर्द्रा नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

येथे आर्द्रा नक्षत्राच्या तृतीय चरणी असेल तर जातक गणित व काव्यात पारंगत असतो. आणि तो सरकारी खर्चाने विदेश भ्रमण करतो. म्हातारपणी शापग्रस्त व दु:खी राहतो. त्याला कॉलरा, देवी, किंवा फुफ्फुसाचा आजार होऊ शकतो.

मंगळ आर्द्रा नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या चतुर्थ चरणात मंगळ असेल तर जातक रसायनशास्त्राची उच्च पदवी मिळवतो. ज्योतिषशास्त्रात त्याची रूचि असते. अग्नि किंवा शस्त्रामुळे नुकसान होते. विस्फोट किंवा भांडण व मारामारीतही अडकू शकतो. शरीर कालांतराने वातुळ बनते.

बुध :- Ardra Nakshatra

1)आर्द्रा नक्षत्रात बुध असेल व त्यावर रविची दृष्टी असेल तर जातक सरकार किंवा आपल्या अभिभावकाकडून लवकर पदोन्नत्ती मिळवतो.

2) जर या बुधाला चंद्र पाहत असेल. तो प्रशासनात जिल्हाधिकारी, मेयर किंवा पुढारी असतो. जनसाधारणाकडून त्याला प्रेम मिळते.

3) गुरु दृष्ट बुध असेल तर जातक श्रीमंत व चतुर असतो. हिशेबनीस किंवा मुनीम बनून उदरनिर्वाह चालवतो. आर्थिक देवघेवीतही फायदा मिळतो.

4) शुक्राची या बुधावर असेल तर जातक चित्रकार, संगीतकार किंवा केमिकल इंजिनिअर बनतो. रंग-रोगण, चित्रकारी करणारा, गायक, संगीतकार किंवा केमिकल इंजिनिअर तो पत्नीकडून त्रास होतो.

5) शनिची दृष्टी असेल तर गंभीर स्वभावाचा परंतु सर्वाकडून मानसन्मान मिळवणारा असतो.

बुध आर्द्रा नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या प्रथम चरणी बुध असेल तर जातक आपल्या क्षेत्रात पारंगत असतो. तो ज्योतिषी, वेदपुराणांचा जाणकार परंतु थोडा बहिरा व एकापेक्षा अधिक शिवाह करणारा असतो. मनमौजी असतो.

बुध आर्द्रा नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

यास्थानी जर आर्द्रा नक्षत्राच द्वितीय चरणी असेल तर जातक भव्य जागेत राहणारा सुरभाषी व विद्वान असतो. तो सर्व कार्यात रूचि ठेवतो आणि ज्योतिषशास्त्र व कर्मकांडाचा जाणकार असतो. आपल्या कुटुंबाचे हित करणारा, स्वार्थी, पुष्कल संततीने युक्त असतो. रक्तात दोष उत्पन्न होणे, मूळव्याध, अस्थमा किंवा सोच्छवासाचा त्रास होतो.

बुध आर्द्रा नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या तृतीय चरणी बुध असेल तर जातक विद्वान, धन संपत्तिचा सचय करणारा, सर्व भावंडाकडून लाभ मिळवणारा व आदर्श कुटुंबातील असतो.

बुध आर्द्रा नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या चतुर्थ चरणात बुध असेल तर जातक व्यापार-व्यवसायात निपूण, सार्वजनिक कार्यात भाग घेणारा, सावकारी करून पैसा मिळवणारा असतो. डोळे फटकळ किंवा चहाडीखोर असतो. याचा चेहरा वाकडा असतो.

गुरु :- Ardra Nakshatra

1)आर्द्रा नक्षत्रात गुरु असून त्यावर रविची दृष्टी असेल तर जातक धन, पुत्र व आदर्श पत्नीने युक्त, सर्वाकडून सन्मान मिळवणारा असतो.

2) चंद्र पाहत असेल तर गाव किंवा शहराचा मुख्य बनतो किंवा शासनात मोठे पद प्राप्त करतो.

3) मंगळाची दृष्ट असेल तर हवाई सेवा, ऑटोमोबाईल्स किंवा वाहतूकीच्या व्यवसायातून पैसा मिळवतो.

4) बुध दृष्ट गुरु असेल तर जातक गणितज्ञ किंवा ज्योतिषी बनतो.

5) शुक्राची ट्टी असेल तर व्यक्ती कलात्मक कार्यातून पैसा मिळवते. परंतु मिळालेल्या पैशाचे भोगण्यास असमर्थ राहते.

6) शनिची दृष्टी असेल तर जातक ‘लाखात एक ‘ असतो. तो आदर्श पत्नी व ख्यातिप्राप्त पुत्रांनी युक्त असतो. पण त्याच्याकडे विशेष जैसा पैसा राहत नाही.

गुरु आर्द्रा नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या प्रथम चरणात गुरु असेल तर जातक अनेक विषयांचा ज्ञाता, साहित्य कलेत निपूण, अध्ययन-अध्यापन करणारा, चिकित्सक किंवा वकील बनतो. दुसयांची कामे करण्याची क्षमता त्यात असते. त्याला पोटाचे आजा व हृदयरोगाचा स होऊ शकतो.

गुरु आर्द्रा नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या द्वितीय चरणात गुरु असेल तर जातक उच्च किंवा कोणत्या तरी विभागाचा प्रमुख असतो. संतती आज्ञांकित असते.

गुरु आर्द्रा नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या तृतीय चरणात गुरु असेल तर जातकाला लहानपणी वयो वर्षे पांच पर्यंत त्रास असतो. विवाह झाल्यावरच मानसिक व व्यवसायिक स्थिरता होते. त्याला वातरोग, कंबर किंवा जांघाच्या रोगाचा त्रास असतो.

गुरु आर्द्रा नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या चतुर्थ चरणी गुरु असेल तर जातकाचा विवाहानंतर भाग्योदय होतो. मध्यामावस्थेत आपल्या बुद्धिचातुर्याने प्रगती करतो. ‘हाजारात एक’ असतो.’ याला प्लुरसी गळ्याचे रोग व हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो.

शुक्र :- Ardra Nakshatra

1)आर्द्रा नक्षत्रात शुक्र असेल व त्यावर रविची दृष्टी असेल तर जातक वैद्य किंवा शल्यचिकित्सक बनतो. दोन विवाह होतात.

2)चंद्राची दृष्टी असेल तर व्यक्ती लाजाळ, आपले विचार गुप्त ठेवणारी, गैरसमजाचा शिकार होणारी असते. विरूद्ध लिंगी जातकांत उपहास व चेष्टेचा विषय बनतो.

3) मंगळाची दृष्टी असेल तरं सर्वत्र भाग्यवान म्हणवतो.

4) गुरुची दृष्टी असेल तर बुद्धिमान व श्रेष्ठ शिक्षण घेतलेला असतो. त्याच्याकडे अनेक नोकरचाकर व वाहने असतात.

5)शनिची दृष्टी असेल तर गुप्तरोगाने पछाडलेला, आचरणहीन, लंपट स्वभावाचा, कुटुंबसुखाला पारखी असतो.

शुक्र आर्द्रा नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या प्रथम चरणी शुक्र असेल तर योग महिलांच्या बाबतीत विशेष चांगला नसतो. महिला अयोग्य कार्यातून पैसा मिळवतात. पुरूष जातक योग्य शिक्षित असतो. सामान्यविज्ञान, चित्रकलेत रूचि असते.

शुक्र आर्द्रा नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

मंगळाची दृष्टी असेल तरं सर्वत्र भाग्यवान म्हणवतो. गुरुची दृष्टी असेल तर बुद्धिमान व श्रेष्ठ शिक्षण घेतलेला असतो.

त्याच्याकडे अनेक नोकरचाकर व वाहने असतात.

शनिची दृष्टी असेल तर गुप्तरोगाने पछाडलेला, आचरणहीन, लंपट स्वभावाचा, कुटुंबसुखाला पारखी असतो.

शुक्र आर्द्रा नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या तृतीय चरणात शुक्र असेल तर जातक विद्वान व धनवान असतो.

शासनाकडून धनलाभ होतो. परंतु वाईट व्यसनामुळे धनक्षय होतो.

देवाला भिणारा, पूजापाठ करणारा व धार्मिक संस्कार मानणारा असतो.

रक्तविकार व हृदयरोग होऊ शकतो.

शुक्र आर्द्रा नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या चतुर्थ चरणी शुक्र असेल तर जातकाचे शिक्षण अर्धवट राहते. तो अभिनेता किंवा सोंगाड्या असतो.

संगीत, नाट्य, गाणे बजावणे करून, मिळवतो. चाळीसाव्या वर्षी जीवनात स्थिरता येते. त्याचा उजव्या शरीरात वेदना होतात व मान मुरगळते.

शनि :- Ardra Nakshatra

1)आर्द्रा नक्षत्रात शनि असेल तर त्यावर रविची दृष्टी असेल तर असा जातक कोणाशीही सरळ बोलत नाही. आपल्या पित्याचा तो शत्रू .असतो. यामुळे पैतृक संपत्तिचा फायदा त्याला मिळत नाही.

2)चंद्राची दृष्टी असेल तर धाकटी बहिण विधवा होते व तिची जबाबदारी जातकावर येऊन पडते.

3)जर मंगळाची दृष्टी असेल तर भावंडे जगत नाहीत.पैतृक संपत्तिला धोका उत्पन्न होतो.

4) बुधाची दृष्टी असेल तर विद्वान व उच्चशिक्षित असतो.परंतु त्याचे वैवाहिक जीवन असंतुलित असते.

5)गुरु दृष्ट शनि असेल तर शासनाकडून फायदा होतो व सर्वांकडून मान मरातब मिळतो.

6)शुक्र दृष्ट शनि असेल तर चांदीची खरेदी विक्री करणारा व दोन पत्नीने युक्त असतो.

शनि आर्द्रा नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या प्रथम चरणी शनि असेल तर जातक दोनहीन व कर्जात बुडलेला असतो.

असा जातक मेहनती, चोरी, तस्कर, आदि कामे करतो.

लाजलजा त्याच्याकडे नसतेच. गुप्त स्थानांत लपलेला राहतो.

शनि आर्द्रा नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या द्वितीय चरणी शनि असेल तर जातक दुसऱ्याचा पैसा हडप करतो. आपल्या वडिलांकडून त्याला कांही फायदा होत नाही.

पूजापाडाचे डोंग करतो. चंद्राची दृष्टी या शनिवर असेल तर जातक आपल्या जातीचा पुढारी व ट्रेड युनियनचा मुख्य बनतो.

अशा कामातूनच चांगला पैसा व नाव मिळवतो.

शनि आर्द्रा नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या तृतीय चरणी शनि असेल तर जातक आपल्या पत्नीवर अवलंबून असतो. अडचणीत आयोग्यजीवन जीवन कंठतो.

पत्नी व कुटुंबाशी संबंध स्नेहपूर्ण नसतात. सामाजिक संघटनाचा प्रमुख, चोर किंवा बदमाष असतो. शारीरिक वेदना व जखम होण्याची शक्यता असते.

शनि आर्द्रा नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या चतुर्थ चरणी शनि असेल तर जातक आपल्या पत्नीवर अवलंबून असतो. पत्नी अयोग्य कामे करून पैसा मिळवते.

जातक व्यसनी, दारूडया असतो. घन आणि सुखाला सदैव पारखा असतो.

राहू :-

राहू आर्द्रा नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या प्रथम चरणी राहू असेल तर जातकाचा चेहरा लाल किंवा काळ्या रंगाचा असतो.

धर्माला अधिक महत्त्व न देणारा, प्रेमळ व स्वाभिमानी असतो.

” शिवीगाळ करणारा, प्रेमात व व्यसनात पैसा खर्च करणारा असतो.

राहू आर्द्रा नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या द्वितीय चरणात राहू असेल तर जातक व्यर्थ बडबड करणारा वाहन दुर्घटनेत सापडणारा असतो.

अहंकारी, चोख व सर्वांचा शत्रू असतो.

राहू आर्द्रा नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या तृतीय चरणी राहू असेल तर जातक गाव किंवा शहराचा पुढारी, पत्नीमुळे असंतुष्ट व वेश्यागामी असतो. खोकलापडशाचा आजार असतो.

राहू आर्द्रा नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या चतुर्थ चरणी राहू असेल तर जातक चांगली कामे करणारा व सरकारकडून प्रशंसा मिळवणारा असतो.

त्याचे दोन विवाह होतात. शिक्षण व शास्त्रीय शोधाबद्दल त्याला धन, यश व संपत्ती मिळते.

प्रारंभिक शिक्षणात अडथळे येतात. कालांतराने शिक्षण पूर्ण होते.

केतु :- Ardra Nakshatra

केतु आर्द्रा नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या प्रथम चरणात केतु असेल तर जातक क्रूर, धोकेबाज असतो.

त्याला मदत करणाऱ्यांशी तो कृतघ्न होतो.

सरकारची वक्र दृष्टी याच्यावर असते. त्याची पत्नी रोग ग्रस्त असते.

तिचा मुत्यू पस्तीसाव्या वया पूर्वीच होतो. उपाशी रहावे लागल्याने स्वतःचे आयुष्यही कमी असते.

केतु आर्द्रा नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या द्वितीय चरणात केतु असेल तर जातक वाईट वर्तनाचा, अहंकारी व सर्वांचा शत्रू असतो.

व्यर्थ बडबडणारा व अपघातात सापडणारा असतो. आई व पत्नीशी संबंध स्नेहपूर्ण नसतात.

केतु आर्द्रा नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या तृतीय चरणी केतु असेल तर जातक गावाचा प्रमुख, पत्नीमुळे नाखूश व वेश्यागामी असतो.

खोकला व पडशाचा त्रास असतो. रोजी-व्यवसायातून पैसा मिळतो.

केतु आर्द्रा नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

आर्द्रा नक्षत्राच्या चतुर्थ चरणी केतु असेल तर जातकाला पैतृक संपत्ति मिळत नाही.

वडिलाकडून तिरस्कार व घृणा मिळते.

औषध, पान किंवा विषामुळे मृत्यू होतो. जातक सडपातळ, ईर्षा करणारा व दृष्ट बुद्धीचा असतो.

हर्षल – नेपच्यून –

हर्षल किंवा नेपच्यून आर्द्रा नक्षत्रात असेल तर जातक कडक, टीकाकार, सुबुद्ध पण विसरभोळा असतो.

उग्रगुणाकडे प्रवृत्त रहातो. मंगळ व शनि या नक्षत्रात चांगली फले देत नाहीत.

प्लुटो –

प्लुटो आर्द्रा नक्षत्रात असेल तर जातक लेखक, समीक्षक, सुबुद्ध असतो.

माझे मनोगत :-

आर्द्रा नक्षत्रात जन्मलेल्या स्त्री पुरूषांनी पुष्य, अनुराधा, उत्तराभाद्रपदा, मद्या, मूळ, अश्विनी, उत्तरा, उत्तराषाढा, आणि कृतिका नक्षत्रात जन्मलेल्या स्त्रीपुरूषांशी व्यवहार, व्यापार किंवा लग्न करू नये.

मार्गदर्शन :-

ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा, WHATSAPP GROUP

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,(संतती समस्या निवारण विशेतज्ञ)

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!