Marriage Life Astrology, सप्तम स्थान व वैवाहिक जीवन,

Marriage Life Astrology
श्रीपाद गुरुजी

Marriage Life Astrology, सप्तमस्थान हे कुंडलीतील एक केंद्रस्थान व एक मारकस्थान असे दोन्ही आहे. सप्तमस्थानावरून पती-पत्नी, विवाह, वैवाहिक सौख्य, पती-पत्नीमधील संबंध, व्यक्तीचे शारीरिक संबंध (प्रणय), व्यक्तीचा पिंड व चारित्र्य, नपुंसकत्व, स्त्रियांमुळे होणारे फायदे व तोटे इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो.

विवाहविषयक बऱ्याच गोष्टींचे ज्ञान सप्तमस्थानावरून होते. उदा., विवाहयोग, जोडीदाराचे स्वरूप व स्वभाव, त्याचे शिक्षण व नोकरी, व्यवसाय, जोडीदाराचे आयुष्य, आर्थिक स्थिती, विवाहाचा प्रकार इ.

शुक्र, चंद्र व नेपच्यून हे स्त्री-ग्रह प्रेमळ, सुंदर, आनंदी अशा गुणांचे असल्याने या तीन ग्रहांना सप्तमस्थानाचे वातावरण पोषक असते. शुक्र हा विवाह, पत्नी, प्रणय, प्रेम, शृंगार यांचा कारक असल्याने सप्तम स्थानातील शुक्र अति उत्तम ठरतो. त्याच्या सर्व कलागुणांचा आविष्कार या स्थानात उत्तम होतो.Marriage Life Astrology

आता आपण प्रत्येक ग्रह सप्तमस्थानात काय फळे देतो ते पाहू.

१) सप्तम स्थाना तील रविची फळे :-

सर्वसामान्य फळे :-

  • सप्तमस्थानात रवि असता जोडीदार उंच, सडसडीत बांध्याचा, पिंगट केस असलेला, देखणा, गोरा, रागीट मुद्रेचा, तरतरीत नाक असलेला, गोल चेहऱ्याचा असा मिळतो.
  • जोडीदाराचा स्वभाव रागीट, स्वाभिमानी, गर्विष्ठ करारी, हेकट, निश्चयी, उदार, शिस्तप्रिय, आपलेच खरे करणारा व वक्तशीर असा असतो. Marriage Life Astrology
  • सप्तमात रवि असलेल्या व्यक्तींना जोडीदार आधिभौतिक पिंड असलेला मिळतो. त्याला उच्च राहणीची जन्मजात आवड असते. हा रवि जोडीदार नोकरी करणारा, इंजिनिअरिंग क्षेत्रातील किंवा स्पर्धा परीक्षेमधून यश मिळवून झालेला सरकारी नोकरदार असतो. जोडीदार पूर्व दिशेचा मिळतो.
  • रवि हा सौम्य पापग्रह असल्याने व विवाहकारक शुक्राचा शत्रू असल्याने हा रवि वैवाहिक सौख्यामध्ये वादविवाद, संघर्ष करायला लावतो. विरहयोग संभवतो (आयुष्याच्या मध्यावस्थेच्या प्रारंभी). हा रवि विवाहानंतर आर्थिक उन्नती चांगली करतो.Marriage Life Astrology

विशेष फळे :-

  • १) रवि पीडित असेल तर (रवि-राहु, रवि-शनि, रवि-हर्पल) जमलेली लग्ने फिसकटतात. वैधव्य योग किंवा घटस्फोट संभवतो.
  • २) हा रवि २४ व्या वर्षी धनलाभ व स्त्रीसुख देतो.
  • ३) रवि चंद्र युती असता विरहयोग संभवतो.

२) सप्तम स्थाना तील चंद्राची फळे :-

सर्वसामान्य फळे :-

  • सप्तमस्थानात चंद्र असता मनुष्य दयाळू, स्त्रीवश, भोगी, प्रवासी, मिष्टान्न प्रिय असणारा, सुखी, सुप्रसिद्ध, ईर्षायुक्त, कामासक्त, प्रणयी असा असतो. सप्तमातील चंद्र जोडीदार गोरा, मध्यम उंचीचा, गोल चेहऱ्याचा, देखणा, मध्यम बांध्याचा किंवा कृश असा मिळतो. जोडीदार चंचल, गृहकर्तव्यदक्ष, कुटुंबवत्सल, प्रेमळ, संवेदनशील, घरातील लोकांसाठी त्याग करणारा, स्वयंपाकाची आवड असणारा, भोगी, प्रणयी अशा स्वभावाचा असतो.
  • सप्तमात चंद्र असता जोडीदार मानसोपचारतज्ज्ञ, बागबगीच्या संबंधित काम करणारा किंवा पाण्याशी संबंधित काम करणारा, नेव्हीत काम करणारा असा मिळतो. हा चंद्र प्रेमविवाहाला पोषक असतो. जोडीदार उत्तर किंवा वायव्य दिशेचा मिळण्याची शक्यता असते. Marriage Life Astrology

चंद्राची फळे :-

हा चंद्र बलवान व शुभसंबंधित असता उत्तम प्रकारे वैवाहिक सौख्य, स्त्रीसौख्य मिळते. मात्र हा चंद्र नीच राशीत किंवा पापग्रहांनी बिघडलेला असल्यास घटस्फोट किंवा वैवाहिक सौख्याची हानी करतो, तसेच विवाहवैचित्र्य दर्शवितो, जात, वय, रंग, धर्म इ. बाबतीत वेगळेपणा असू शकतो. हा चंद्र विवाह २४ व्या वर्षी किंवा २४ ते २८ दरम्यान करतो. शुभ संबंधित चंद्र लहान वयात किंवा लवकर विवाह करतो व विवाहानंतर हा चंद्र आर्थिक भरभराट करतो.Marriage Life Astrology

विशेष फळे :-

  • १) हा चंद्र शनिने युक्त किंवा दृष्ट असता विवाह विलंबाने होतो, जोडीदार जास्त वयाचा किंवा पुनर्विवाहित किंवा आंतरजातीय असा मिळतो.Marriage Life Astrology
  • २) २/४/७/९/११/१२ या राशीचा पूर्ण चंद्र असता जोडीदार व्यवहार- दक्ष मिळतो.
  • ३) शुभ बलवान चंद्र असता व्यक्तीला मुली जास्त होतात. विद्या, धन, इस्टेट यांची प्राप्ती चांगली होते. प्रवास घडून व्यापारात धनप्राप्ती होते. मनपसंत जोडीदार मिळून उत्तम वैवाहिक सौख्य लाभते.
  • ४) चंद्र नीच राशीत किंवा अशुभ संबंधित असेल तर वैवाहिक सौख्य फार थोडे मिळते. सार्वजनिक दुष्कृती होते. उघड शत्रू बरेच होतात व स्त्रीविषयक भांडणे फार होतात.
  • ५) चंद्र हा शुक्र मंगळाने युक्त असता व्यभिचार योग उत्पन्न करतो, विवाह लवकर होत नाही.
  • ६) चंद्र-मंगळ युतीत तीव्र प्रकारची मतभिन्नता, वादविवाद, घटस्फोट, जोडीदाराचे आरोग्य बिघडणे वगैरे दृष्टीने वैवाहिक जीवनात वैगुण्य निर्माण करतात.
  • ७) सप्तमातील चंद्रावर पापग्रहांची दृष्टी असता एकदा तरी वादविवाद विकोपाला जाऊन घटस्फोटाची वेळ येते.
  • ८) चंद्र-शनि, चंद्र-राहू, चंद्र-केतू हे योग असता विवाह विलंबाने होणे, परजातीय किंवा वयाने मोठ्या व्यक्तीशी लग्न होणे, पुनर्विवाह, ठरलेले लग्न मोडणे यापैकी काहीतरी संभवते.Marriage Life Astrology

३) सप्तम स्थाना तील मंगळाची फळे :-

सर्वसामान्य फळे :-

  • सप्तमस्थानात मंगळ असता व्यक्तीला उत्तम प्रकारची शासकीय कार्यप्रवीणता व अधिकार योग दाखवतो. हा मंगळ व्यक्तीला अतिमहत्त्वाकांक्षी, हुकुमशाहीवृत्ती व सत्तेची आवड देतो. या मंगळामुळे व्यक्ती रागीट, हट्टी व युद्धप्रिय ( वादविवादप्रिय) होते. या मनुष्याचे भागीदाराशी पटत नाही. हा मंगळ कुटुंबापासून वेगळे राहण्याचे प्रसंग आणतो. तसेच हा प्रवास घडवितो व जुगारीपणा देतो. सप्तमातील मंगळ व्यक्तीला कामप्रधान करतो. हा मंगळ जोडीदाराच्या प्रकृतीवर अनिष्ट परिणाम करतो. विवाहानंतर आर्थिक स्थिती ढासळते.
  • सप्तमात मंगळ असता हा एक मंगळदोष असतो. जोडीदार तांबूस गौर वर्णाचा, सुदृढ बांध्याचा, राजबिंडा, उंच असा मिळतो. त्याचा स्वभाव तापट, करारी, क्रूर कामे करणारा, मानी, हट्टी, भांडखोर, खर्चिक, तिखट, मांसाहार करणारा, हुकुमत गाजविणारा व कामप्रधान असा असतो. हा मंगळ विवाहयोग उशिराने, वयाच्या २८ व्या वर्षी किंवा त्यानंतर आणतो.
  • विवाह ठरताना त्रास, अडचणी, अडथळे आणतो. एखादा विवाह मोडणे, फिसकटणे असे करतो. सप्तमातील मंगळ जोडीदार तंत्रक्षेत्राशी (इंजिनिअर) संबंधित शिक्षण झालेला किंवा पोलीस, मिलिटरी, पी.एस.आय. अशा ठिकाणी नोकरी करणारा देतो. जोडीदार दक्षिण दिशेचा मिळतो. हा मंगळ विवाहास अपेक्षेपेक्षा जास्त खर्च करतो, सप्तमात मंगळ असता जोडीदाराशी मतभेद, सतत भांडणे इ. राहतात. त्यामुळे वैवाहिक सौख्याची हानी होऊ शकते. थोडक्यात, हा मंगळ वैवाहिक सौख्याला त्रासदायक असतो.Marriage Life Astrology

विशेष फळे :-

  • १) हा मंगळ ४/८ राशीत किंवा पापग्रहाने पीडित असता प्रेमविवाहात फसगत होते. द्विभार्यायोग घडतो. वैवाहिक चिंता उत्पन्न होते. व्यापारात अपयश येते.
  • २) स्त्रियांच्या कुंडलीत या स्थानातील मंगळ वैधव्य देतो. १/८/१० राशीतील मंगळ एकदा वैवाहिक सौख्य नष्ट केल्यावर पुन्हा विवाह होऊ देत नाही.
  • ३) शुक्र-मंगळ, चंद्र-मंगळ, नेपच्यून-मंगळ, राहु-मंगळ या युतीत व्यक्ती अतिशय कामप्रधान असल्याने व्यभिचार, अनैतिक संबंध करते. वैवाहिक सौख्य नष्ट करते.
  • ४) सप्तमातील मंगळ १७ व्या वर्षी अग्निभय व ३७ व्या वर्षी स्त्रीनाश करतो.
  • ५) मंगळाबरोबर हर्षल, शनि, राहु या ग्रहांपैकी एखादा ग्रह असता विवाहित जोडीदारास मोठे अपघात, मृत्यू, घटस्फोट, अथवा विधुर अवस्था किंवा वैधव्य योग दाखवतो.
  • ६) मंगळ – हर्षल जोडीदारास भाजण्याचा अपघात घडवितो.
  • ७) मंगळ – नेपच्यून, मंगळ-बुध युती विवाहात फसगत होते.
  • ८) मंगळ-राहु युतीत शारीरिक व्यंग, घृणास्पद वागणूक राहते.Marriage Life Astrology

४) सप्तम स्थाना तील बुधाची फळे :-

सर्वसामान्य फळे :-

  • बुध व्यापारास उत्तम असतो. भागीदार उत्तम मिळतात. हा बुध लेखनकला चांगली देतो. सप्तमात बुध असता जोडीदार व्यवहारकुशल, सुस्वभावी, सुशिक्षित, बोलका, विनोदी, विद्वान, धनवान, गुणवान, बालिश, कष्टाळू, व्यापारी वृत्तीचा असा मिळतो, तसेच तो नाजूक शरीराचा, मध्यम उंचीचा, आहे त्या वयापेक्षा लहान वाटणारा, गोरा, देखणा असा असतो.
  • जोडीदाराचे शिक्षण वाणिज्य शाखेमध्ये किंवा मार्केटिंगसंबंधी झालेले असते. जोडीदार व्यवसाय करणारा मिळतो किंवा कमिशन एजंट, सरकारी बँका किंवा इतर सरकारी क्षेत्रात उदा., रेल्वे, पोस्ट इ.मध्ये नोकरी करणारा मिळतो, जोडीदार उत्तर दिशेचा मिळतो.

विशेष फळे :-

  • १) सप्तमात बुध असून प्रथमात हर्षल असता व्यक्ती अत्यंत तिरसट, विक्षिप्त असते. अशा लोकांचे वैवाहिक जीवन त्यांच्या ह्या स्वभावामुळे बिघडते.
  • २) सप्तमात बुध बलवान असता जोडीदार व भागीदार उत्तम मिळतात. विवाह लवकर होतो. कला, कौशल्य, विनोदप्रियता, चातुर्य, पायाकडे नजर देऊन चालणे, पुष्कळ संततीने युक्त, तरुण स्त्रियांशी परिचय, सुंदर वेष धारण करणे याबाबतीत चांगलीच अनुकूलता देतो.
  • ३) २/३/६/७/११ या राशीतील बुधामुळे बोलका, हुशार व व्यवहारचतुर जोडीदार मिळतो.
  • ४) बुध हा मंगळ, शनि, हर्षल यांनी युक्त किंवा दृष्ट असता वैवाहिक सौख्य मिळत नाही. वैवाहिक जीवनात पुष्कळ भानगडी होतात..
  • ५) बुध अस्तगंत असेल तर लग्न थोडे उशिराने होते.
  • ६) या बुधामुळे १७ किंवा २२ व्या वर्षी विवाहयोग जुळतो.
  • ७) सप्तमातील एकटा बुध उत्तम असतो. मात्र तो शनि, मंगळ, हर्षल, राहु या पापग्रहांनी युक्त किंवा दृष्ट असता विवाह विलंब, घटस्फोट व एकापेक्षा जास्त विवाह होतात.
  • ८) सप्तमात बुध-शनि ३ / ६ / १० / ११ या राशीत असता जोडीदार किंवा स्वतः व्यक्ती नपुंसक संभवते.
  • ९) पुरुषाच्या कुंडलीत सप्तमात बुध असता त्याला कामवासना कमी असते.

५) सप्तम स्थाना तील गुरुची फळे :-

सर्वसामान्य फळे :-

  • बौद्धिक, आध्यात्मिक, सात्विक, ज्ञानी अशा गुरु ग्रहाला सप्तम स्थान पोषक नसते. गुरु स्थानहानी करतो. या नियमाप्रमाणे हा गुरु या स्थानाची अशुभ फळे देणारा ठरतो. सप्तमस्थानाचा कारक शुक्र हा गुरुता कट्टर शत्रू असल्याने तसेच प्रणय, वासना, स्त्रीसुख याबाबतीत दोघांचे परस्पर विरोधी स्वभाव असल्याने सप्तमातील गुरु हा वैवाहिक सौख्य व विवाह या दृष्टीने अशुभच ठरतो.
  • हा गुरु व्यक्तीला सुंदर व सद्गुणी, धार्मिक जोडीदाराचा लाभ करून देतो. व्यक्ती सदाचारी, कविश्रेष्ठ, थोर लोकांच्या संगतीत नित्य वास्तव करणारी, उत्तम स्थळी प्रवास करणारी अशी असते. विवाहापासून त्याचा भाग्योदय होतो. कोर्टकचेरीच्या कामी वारंवार यश मिळते. भागीदार चांगले मिळतात. तो पित्यापेक्षा मोठ्या योग्यतेस चढतो. त्याला राजवैभव भोगावयास मिळते. स्वतःच्या सामर्थ्याचा त्याला मोठा गर्व असतो, तीर्थयात्रा व सुंदर वस्तूंचा उपभोग हे त्याच्या आवडीचे विषय होऊन राहतात. विद्वान लोकांत त्याला मान मिळतो.

गुरुची फळे :-

सप्तमातील गुरू विवाह विलंबाने, वयाच्या २८व्या किंवा त्यानंतर करतो. विवाह ठरताना प्रचंड त्रास होतो. हा गुरु जोडीदार गोरा, स्थूल, सुडौल, मध्यम किंवा कमी उंचीचा व विजोड असा देतो. त्याच्या चेहऱ्यावर सात्त्विक तेज असते. जोडीदाराचा स्वभाव धार्मिक, सात्त्विक, शांत, बुद्धिमान, हौशी असा असतो. जोडीदार उच्चशिक्षित व दीर्घायू मिळतो. जोडीदार ईशान्य दिशेचा मिळण्याची शक्यता असते. हा गुरू वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने चांगला नसतो. घटस्फोट, विवाह न होणे, विजोड जोडीदार मिळणे, विरह होणे, वैधव्य किंवा विधुरावस्था येणे इ. करतो.

विशेष फळे :-

  • १) सप्तमातील गुरु शनिने दूषित असेल तर विवाह न होणे, विलंबाने होणे, पुनर्विवाहीत जोडीदार मिळणे. किंवा नवरा-बायकोच्या वयात मोठे अंतर असणे इ. दाखवतो. वैवाहिक सौख्य, शरीरसुख चांगले मिळत नाही.
  • २) हा गुरु पापग्रहाने युक्त किंवा अशुभ ग्रहांनी दृष्ट असता विवाह होत नाही. विवाह झाल्यास स्त्रिया आजारी असतात. द्विभार्या योग घडतो. स्त्रियांच्या कुंडलीत या योगात मोठ्या वयाचा पती किंवा बिजवर मिळतो. अकाली वैधव्य येते.
  • ३) २/७/४/९/१२ या राशीत गुरु अशुभ ग्रहांच्या अशुभ योगात किंवा दृष्टीत असता विवाह न होणे दाखवितो.
  • ४) चंद्र-गुरु, रवि गुरु हे योग श्रीमंत व उच्च पदवीधर जोडीदार दाखवतो.
  • ५) गुरु-मंगळ, गुरु- हर्षल हे योग वैधव्य, तीव्र प्रकारचे मतभेद किंवा घटस्फोट दाखवितो.Marriage Life Astrology
  • ६) प्रथमस्थानात अशुभ ग्रह असता, हा गुरू विवाहासंबंधी व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण करीत नाही. कित्येक वेळा विजोड जोडपे असते.

६) सप्तम स्थाना तील शुक्राची फळे :- Marriage Life Astrology

सर्वसामान्य फळे :-

  • सप्तमस्थानी म्हणजेच स्वस्थानी शुक्र असेल तर वैवाहिक सौख्य दतम मिळते. प्रेमळ भागीदार लाभतात. बलवान शुक्र असेल तर विवाहानंतर भाग्योदय होतो. अर्थप्राप्ती चांगली होते. ललितकलांचा व्यासंग व्यक्तीला असतो. हा शुक्र नटण्यामुरडण्याची हौस व पोहण्याची विद्या देती, ही व्यही दैववान, धनवान, पुत्रवान, आनंदी, क्रीडासक्त व परदेशनिवासी होते.
  • राजकीय कामात यशस्वी, शुघ्र व विलासी वस्तूंचा व्यापार करणारी व आपल्या कुटुंबात उदयास येणारी असते. सप्तमातील शुक्र असलेले पुरुष बायकांच्या अधीन जाणारे, बाईलवेडे असतात. या शुक्रामुळे तारुण्याचा काळ वय वर्षे ३६-३७ पर्यंत सुखाचा जाती.

शुक्राची फळे :-

  • हा शुक्र विवाह लवकर करतो. पुरुषाच्या पत्रिकेत वय २४ व स्त्रियांच्या पत्रिकेत वय १९ अशी विवाहाची वर्षे असतात. या शुक्रामुळे जोडीदार सावळा किंवा गोरा, मध्यम उंचीचा, मध्यम व आकर्षक बांध्याचा, डोळे व आवाज सुंदर असणारा, कुरळ्या केसांचा, अतिशय देखणा, सुंदर मिळतो.
  • जोडीदार कलाप्रिय, कलाकार, कांतिमान, विनोदी, हौशी, खर्चिक, कर्तव्यदक्ष, विलासी, प्रेमी, कामासक्त, हुशार, सद्गुणी, श्रीमंत घरातील अशा स्वभावाचा मिळतो. सप्तमातील शुक्र प्रेमसंबंध घडवितो. त्यामुळे या लोकांचा प्रेमविवाहाकडे कल असतो. जोडीदार आग्नेय दिशेचा मिळण्याची शक्यता असते.
  • हा शुक्र पती-पत्नीत एकोपा, समजूतदारपणाची वृत्ती, एकमेकांचे सुखदुःख जाणण्याची कला वगैरे दृष्टीने उत्तम असल्याने या लोकांना वैवाहिक सौख्य उत्तम मिळते.

विशेष फळे :-

  • १) सप्तमातील शुक्र अशुभ राशींचा किंवा पापग्रहाने दूषित असता, त्या माणसाची सर्व बाजूंनी खराबी होते. नेहमी स्त्री-चिंतनात त्याचा व्यर्थ काळ जातो. विवाह विलंबाने होतो.
  • २) शुक्र १/८/१० या राशीत असता व्यक्तीत व्यभिचारपणा येतो.
  • ३) शुक्राबरोबर रवि चंद्रापैकी ग्रह असता तर जोडीदार सुस्वरूप, कलाकार असा उत्तम मिळतो. वैवाहिक सौख्य उत्तम मिळते.
  • ४) शुक्र-शनि, शुक्र-राहु, शुक्र-केतु या युत्या सप्तमात असता विवाह विलंबाने होतो. आंतरजातीय विवाह संभवतो, वैवाहिक सौख्यामध्ये दोष, असमाधान राहते. मात्र जोडीदार शांत, विचारी, कष्टाळू, प्रामाणिक मिळतो.
  • ५) शुक्राच्या सप्तम स्थानावरूनही वैवाहिक सौख्याचा अभ्यास करतात. सप्तमात शुक्र कितीही चांगला असला तरी प्रथमस्थानातील मंगळ, रवि, हर्षल, राहु-केतु, शनि हे पापग्रह किंवा यांच्या युत्या सौख्यात वैगुण्य दाखवितात. वैवाहिक
  • ६) शुक्र- नेपच्यून युतीत काही काळ पतिपत्नीमध्ये उच्च आकर्षण, प्रीती दाखविते. जोडीदार कलाकार असतो.Marriage Life Astrology
  • ७) शुक्र-राहु, शुक्र-केतु हे योग दोन विवाह, परजातीय विवाहु, वयात बरेच अंतर, उंच जोडीदार अशा स्वरूपाचे फळ देतो.
  • ८) शुक्र-हर्षल युती बाह्यप्रेमाची द्योतक आहे. हे लोक अविचारी व वासनायुक्त प्रेम करतात. ही युती विवाहसौख्य बिघडवते.
  • ९) शुक्र-मंगळ, शुक्र-हर्षल इ. पापग्रहांनी बिघडलेला सप्तमातील शुक्र जोडीदार व स्वतः व्यक्ती अतिकामप्रधान दाखवतो. त्यामुळे प्रेमसंबंध, अनैतिक संबंध, व्यभिचार इ. राहते.

७) सप्तम स्थाना तील शनिची फळे :- Marriage Life Astrology

सर्वसामान्य फळे :-

  • प्रत्येक गोष्टीत मंदपणा आणणारा, विलंब करणारा शनि या स्थानात असता विवाह उशिरा घडवितो. हा शनि विवाहयोग वयाच्या ३०व्या वर्षी किंवा ३६व्या वर्षी दाखवितो. विवाह ठरताना त्रास, विलंब, अडथळे आणतो.
  • सप्तमात शनि असता व्यक्ती काबाडकष्टी, व्यसनी व कामप्रधान असते. तो मूर्खशिरोमणी, वाईट मित्रांनी वेढलेला, रोगी व स्त्रीपासून दुःख पावणारा असतो. त्याचे शरीर कृश असते व हा शनि व्यक्तीचा भाग्योदय उशिरा करतो. सप्तमातील शनिमुळे स्त्रीचा दीर्घकाळ विरह देखील होतो.
  • या स्थानी शनि शुभ संबंधित असता शत्रूचा पराभव होतो. जुगार व स्त्रीविषयक आप्त यांच्यापासून धनलाभ होतो. कायद्याच्या कामात यश मिळते. पती-पत्नी सुखाने नांदू शकतात. मात्र या स्थानी दूषित किंवा अशुभ शनि असता व्यसनी लोकांचा परिचय घडतो. विवाहसुख चांगले मिळत नाही. कोर्टकचेरीत अपयश येते. व्यक्ती दंभाचरणी, धन घालविणारा, निरुत्साही, लोभी असा असतो. सुखाच्या चिंतेत राहतो. खोटे बोलतो. त्याला पराधीनता राहते.
  • सप्तमातील शनि जोडीदार कमी उंचीचा, सावळा, कृश किंवा मध्यम बांध्याचा किंवा थोराड बांध्याचा, सर्वसामान्य व्यक्तिमत्त्वाचा, विजोड (रंग, रूप, वय, शिक्षण, उंची, स्वभाव यापैकी कशात तरी वेगळेपणा असतो) असा मिळतो. जोडीदाराचा स्वभाव अबोल, अरसिक, कष्टाळू प्रामाणिक, शांत, सोशिक, विचारी वृत्ती, काटकसरी, आळशी, मंद असा असतो. जोडीदाराचे शिक्षण कमी किंवा अर्धवट झालेले असते. शिक्षण झाले असल्यास इंजिनिअर, वकील, कॉमर्स इ. शाखेचे असते. जोडीदार नोकरी करणारा असा पश्चिम दिशेचा मिळण्याची शक्यता असते. हा शनि वैवाहिक सौख्यामध्ये असमाधान देतो.

विशेष फळे :-

  • १) सप्तमात शनि असून प्रथम, द्वितीय, व्यय व अष्टम स्थानात मंगळ असता वैवाहिक सौख्याची हानी व द्विभार्या योग संभवतो.
  • २) ३/६/९ राशीतील शनि पुष्कळ विवाह घडवितो.
  • ३) स्त्रियांच्या कुंडलीत सप्तमात शनि असता बिजवर किंवा म्हातारा (वयाने मोठा) नवरा मिळतो.
  • ४) हा शनि ३७ व्या वर्षी स्त्रीनाश करतो.
  • ५) १/४/५/८ या राशीतील शनि विवाह अतिविलंबाने करतो व वैवाहिक सौख्य बिघडवतो.
  • ६) सप्तमात शनि असून कुंडलीत शुक्र बिघडला असता व्यक्ती व्यभिचारी, कामप्रधान अशी असते.Marriage Life Astrology

८) सप्तम स्थाना तील राहुची फळे :- Marriage Life Astrology

सर्वसामान्य फळे :-

  • 1) सप्तमातील राहु विवाह विलंबाने करतो. विवाह ठरताना त्रास, अडचणी, अडथळे देतो.
  • 2) हा राहु कोणत्याही राशीत असला तरी वैवाहिक सौख्यामध्ये काहीना काहीतरी बाधा, त्रास देतोच.
  • 3) थोडक्यात, या स्थानी राहू असणे चांगले नसते.
  • 4) राहु शुभ राशीत व बलवान असता अपघात टळतात. सुंदर जोडीदार लाभतो. मात्र विवाह सुखप्रद होत नाही. प्रवासात लाभ होतात.
  • 5) लोकांनी जे पापमार्ग म्हणून ठरविलेले असतात, त्यातच त्याचा उदय होतो. सट्टे-जुगारादी व्यवहारातही त्याला यश लाभते.
  • 6) अनेक वेळा पुनःपुन्हा संसाराची नवीन मांडणी करावी लागते.
  • 7)हाच राहु अशुभ संबंधित असेल तर जोडीदार नेहमी आजारी, रोगी असतो.
  • 8) सप्तमातील राहु जोडीदार मध्यम किंवा कमी उंचीचा, सावळा, कृश, रोगी, कुरूप, दिसण्यास सर्वसाधारण असा देतो.
  • 9) जोडीदाराचा स्वभाव आळशी, पापकर्मरत, दुर्गुणी, भांडखोर, नीच, पापवासनेचा असा असतो.
  • 10) विवाह विलंबाने २८ वर्षादरम्यान संभवतो. जोडीदाराचे शिक्षण कमी असते.
  • 11) आंतरजातीय किंवा आपल्यापेक्षा खालच्या जातीच्या व्यक्तीशी विवाह संभवतो.
  • 12) हा राहु वैवाहिक सौख्याला बाधक असतो.
  • पती-पत्नी परस्पराला बाधक, त्रासदायक असतात. दोघांमध्ये मतभिन्नता, सतत भांडणे इ. राहतात.
  • 13) हा राहु घटस्फोट करतो व एकापेक्षा जास्त विवाह करायला लावतो.

विशेष फळे :-

  • १) ३/६/५/९ या राशीतील राहु अविवाहितही ठेवतो.
  • कौटुंबिक विभक्तपणा (घटस्फोट), कोर्टातील दावे यापासून त्रास होतो. तो मनुष्य गर्विष्ठ, कुटिल, बांधव विरोधी, असंतोषी, मधुमेहादी रोगाने पिडलेला असतो.
  • २) पापग्रहाबरोबर असलेला राहु अतिशय वाईट फळे देतो.
  • ३) शुक्र-राहु युती आंतरजातीय प्रेमविवाह किंवा जोडीदार दाखवितो.Marriage Life Astrology

९) सप्तम स्थाना तील केतुची फळे :- Marriage Life Astrology

सर्वसामान्य फळे :-

  • 1) सप्तमात केतु असता व्यक्ती आळशी, झोपाळू, मूर्ख असते. त्याला फारसा मान मिळत नाही. शत्रूचे भय नेहमी राहते.
  • 2) कोर्टकचेरीत अपयश येते. चोरीचा त्रास वारंवार होतो. स्त्रीसुख मिळत नाही.
  • 3) सप्तमातील केतु जोडीदार वादविवाद करणारा, भांडखोर, क्रूर, गुणहीन, थोराड बांध्याचा, सावळा, रोगी, पापी असा मिळतो.
  • 4) जोडीदार कमी शिकलेला, टेक्निकल साईडचा, असा नैर्ऋत्य दिशेचा मिळण्याची शक्यता असते.
  • 5) आंतरजातीय जोडीदार मिळण्याची शक्यता असते.
  • 6) वैवाहिक सौख्यामध्ये हा केतु मतभेद, असमाधान दाखवतो. वैवाहिक सौख्य चांगले मिळत नाही.
  • 7) कधी कधी हा केतु वैवाहिक सौख्याची हानी व द्विभार्यायोग आणतो.

विशेष फळे :-

  • १) केतु बुध युक्त असेल तर विवाह उशिरा होतो. क्वचित विवाहही होत नाही. व्यभिचार कर्म घडते.
  • हा मनुष्य कोठे स्थिर राहत नाही.
  • राहण्याचे स्थळ वारंवार बदलतो.
  • विधवा किंवा नीच जातीच्या स्त्रीशी संबंध ठेवायला लावतो.
  • २) केतु शुभ संबंधित असेल तर किंवा ४/८/९/१२ राशीत असेल तर सर्वकाळ द्रव्यप्राप्ती होते.
  • मात्र त्याची चिंता कधीही कमी होत नाही.
  • ३) गुरु युक्त केतु वैराग्यवृत्ती देतो. विवाह विलंबाने होतो. व्यक्ती विवाहाला नकार देते.
  • कदाचित अविवाहित योग आणते.Married Life And Seventh House

१०) सप्तम स्थाना तील हर्षलची फळे :-Marriage Life Astrology

सर्वसामान्य फळे :-

  • 1) या ठिकाणी हर्षल हा मंगलापेक्षा हि कडक फळे देतो. हा हर्षल प्रतिस्पर्धी, शत्रू ह्यामुळे त्रास दाखवतो.
  • 2) कोर्टातील खटल्यात अपयश देतो.
  • 3) स्त्रीसंबंधी काही ना काहा विवंचना सतत चालूच राहते.
  • 4) भागीदारांशी फारसे पटत नाही.
  • 5) स्वतंत्र असे नवीनच उद्योगधंदे सुरू होतात.
  • 6) नवीन नवीन ओळखीपासून फायदा होतो.
  • 7) स्त्रीविरहीत दिवस काढावे लागतात.
  • 8) सार्वजनिक कामात अधिकाराची जागा पत्करू नये. कारण हा हर्षल समाजामध्ये दुलौकिक पसरवतो.
  • 9) थोर मंडळीशी शत्रुत्व उत्पन्न करतो. परकीय लोक,
  • 10) नवीन ओळखी जोडू पाहणारे लोक यांच्यापासून सावधगिरी बाळगावी.
  • 11) येथे हर्षल असता विवाहाच्या बाबतीत अशुभ फळे देतो.
  • 12) हा हर्षल विवाह विलंब, विवाह मोडणे, विवाह आकस्मित होणे, स्थळपसंती न होणे,
  • 13) एकमत न होणे, विवाहामध्ये अडथळे, अडचणी आणणे इ. गोष्टी करतो.
  • 14) हा हर्षल विवाह ठरतेवेळी गोंधळ, त्रास, घरात वादविवाद इ. दाखवितो. Married Life And Seventh House
  • 15) असा हर्षल विवाह २८ व्या वर्षी किंवा ४२ व्या वर्षी करतो.
  • 16) सप्तमातील हर्षल जोडीदार गोरा, सदृढ बांध्याचा, उंच, विक्षिप्त, लहरी, हेकट स्वभावाचा, बुद्धीमान, रागीट असा देतो.
  • 17) जोडीदार तामसी, भांडखोर, मारझोड करणारा असा असतो.
  • 18) जोडीदार शिक्षित, टेक्निकल किंवा इंजिनिअर क्षेत्रातील संशोधक असा मिळू शकतो.
  • 19) हा हर्षल व्यक्तीला प्रेमी, विषयासक्त करतो.
  • 20) त्यामुळे प्रेमविवाहाची शक्यता असते.
  • वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने हा हर्षल बाधक, त्रासदायक असतो. पती-पत्नीमध्ये तीव्र मतभेद, भांडणे दाखवितो. तसेच घटस्फोट किंवा जोडीदाराचा अपघाती मृत्यू दाखवतो.

विशेष फळे :-

  • १) पापग्रहामुळे हर्षल वैवाहिक सौख्यात अनपेक्षित अडचणी, विचित्र प्रसंग निर्माण करतो.
  • २) शनि किंवा मंगळ प्रथमस्थानात असता घटस्फोट किंवा जोडीदाराचा आकस्मित मृत्यू दाखवतो.
  • ३) शुक्र-हर्षल, हर्षल नेपच्यून, चंद्र-हर्षल या युती / प्रतियुती व्यक्तीला कामप्रधान करतात. व्यभिचारी वृत्ती राहते.
  • ४) हर्षलबरोबर सप्तमात दोन किंवा दोनपेक्षा जास्त पापग्रह असता विवाह होत नाही किंवा वैवाहिक सौख्याची हानी होते.

११) सप्तम स्थाना तील नेपच्यूनची फळे :-Marriage Life Astrology

सर्वसामान्य फळे :-

  • 1) सप्तमस्थानातील नेपच्यून वैवाहिक जीवनात संकटे आणतो. जोडीदार मनासारखा मिळत नाही. जोडीदार व्यंग असलेला मिळू शकतो. केव्हा केव्हा गुप्तपणे लग्न होते.
  • 2) लग्नात हजारो भानगडी उत्पन्न होतात. द्विभार्यायोग घडतो.
  • 3) सप्तमात नेपच्यून असता जोडीदार गोरा, सुंदर, कलाप्रिय, सौंदर्यप्रिय, अंतस्फूर्ती असलेला मिळतो. जोडीदार व्यसनी किंवा मानसिक विकृतीचा मिळू शकतो.
  • 4) विवाहामध्ये अचानक गोंधळ निर्माण होतो. विवाहामध्ये किंवा जोडीदाराकडून फसवणूक, मनस्ताप संभवतो.
  • 5) हा नेपच्यून प्रेमविवाहाला पोषक आहे.

विशेष फळे :-

  • १) या स्थानी पीडित नेपच्यून असता भागीदारीच्या व्यवहारात पडू नये. विश्वासघातकी जोडीदार मिळतात.
  • २) शुक्र- नेपच्यून युतीमध्ये काम वासना अत्यंत प्रबळ असतात. व्याभिचारी वृत्ती असू शकते.
  • विवाह अचानक ठरतो. व्यक्तीच्या नीतीमत्तेबद्दल सर्वत्र संशय घेतला जातो.
  • अशी माणसे गुप्त शत्रुत्व किंवा नसत्या भानगडी व कट रचणे अशी कामे करतात. Married Life And Seventh House
  • ३) प्रथम व सप्तम स्थानात पापग्रह असता वैवाहिक सौख्य लाभत नाही. द्विभार्या योग संभवतो.

१२) सप्तम स्थाना तील प्लुटोची फळे :-Marriage Life Astrology

सर्वसामान्य फळे :-

  • सप्तमस्थानी प्लुटो असता वैवाहिक जीवनात विचित्रपणा असतो. विवाहाने जोडले गेलेले जोडपे परस्परांविषयी आदरभाव व प्रेम फारसे बाळगत नाही. Married Life And Seventh House
  • विवाह हा पुष्कळदा वादविवादाचा विषय होत असतो. प्लुटो या स्थानी अशुभ असल्यास सार्वजनिक अडचणी, जनसमाजापासून त्रास व विरोध संभवतो.

मार्गदर्शन :-

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा लेख आवडला असेल आणि तो उपयुक्त वाटला असेल. कृपया आपल्या कुटुंब आणि मित्रांसह सामायिक करा आणि अधिक लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या

अश्याच नवनवीन लेख ची सूचना आपल्याला वेळोवेळी मिळत राहावी या साठी खालील WhatsApp वर क्लिक करावे.

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण ShreeSevaPrathishthan@Gmail.Com या वर मला Email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित 
श्रीपाद विनायक जोशी (गुरुजी) +91 9420270997 +91 9404594997
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन, (संतती समस्या विशेतज्ञ)
सामुद्रिक ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ , व्यसन मुक्ती औषध तज्ञ

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!