Ashwini Nakshatra,सर्व नक्षत्रातील पहिले नक्षत्र अश्विनी या बाबत माहिती पाहणार आहोत.
आपण येथे अश्विनी नक्षत्रातील बारा ग्रहांची फले व त्याचे काय परिणाम घडतात ते पाहूया, चार नक्षत्र मिळून एक राशी तयार होते, एक नक्षत्र सर्व ग्रह नुसार काय प्रभाव देतात ते पाहूया,
ब्रह्मंडामध्ये अगणित तारेतारका, ग्रह, उपग्रह आहेत.
दुरून पाहिल्यावर तेथे तार्यांचे अनेक समूह दिसतात. या समूहांतून विविध आकृत्या तयार होतात. तार्यांच्या या समूहालाच नक्षत्र म्हणतात.
रवि :-Ashwini Nakshatra
१) अश्विनी नक्षत्राचा रवि असेल आणि त्यावर मंगळाची पूर्ण दृष्टि असेल तर अशी व्यक्ती क्रूर स्वभावाची असते.
त्याचे मोठाले डोळे नेहमी लाल दिसतात.
2) अश्विनी नक्षत्रातील रविवर बुधाची दृष्टी असेल तर असा जातक आपले जीवन आरामात जगतो.
त्याचे व्यक्तिमत्त्वही प्रशंसनीय असते.
३) गुरुची दृष्टी असेल तर अशी व्यक्ती अधिकार व सत्ता सुख भोगते. व सरकारकडून लाभ मिळवते.
४) जर शुक्राची दृष्टि असेल तर अशी व्यक्ती अतिभोग विलासात निमग्न राहते.
५) जर शनिची दृष्टि असेल तर अशी व्यक्ती दरिद्री असते. त्याच्यात कोणतीही कार्यक्षमता नसते.
रवी अश्विनी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-
रवि अश्विनी नक्षत्राच्या प्रथम चरणात असेल तर जातकाचे आयुष्य मोठे असते.
असा जातक मधुरभाषी, संततीकडून विशेष सुख व आनंद प्राप्त करणारा असतो. पित्तवातादि रोग होऊ शकतात.
रवी अश्विनी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-
रवि जर अश्विनी नक्षत्राच्या दूसऱ्या चरणात असेल तर त्या जातकाची परिस्थिती चांगली नसते.
बऱ्याच बाबतीत वयाच्या आठव्या वर्षापर्यंत त्याला भयंकर संकटाचा सामना करावा लागतो.
तसे पाहिले तर अश्विनी नक्षत्रातील रवि चांगला असतो.
रवी अश्विनी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-
रवि अश्विनी नक्षत्राच्या तृतीय चरणात असेल तर ती व्यक्ती धनवान व संपन्न बनते.
परंतु त्याला आयुष्य खूपच कमी असते. आरोग्य धड नसते.
कित्येकदा हिंसक व नीच आचरण त्याच्यकडून घडते.
रवी अश्विनी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-
अश्विनी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात रवि असेल तर अशी व्यक्ती प्रख्यात, चलाख, धनवान व आपल्या समाजाची पुढारी बनते.
सेनेचा कमांडर अथवा जनतेचा पुढारी बनतो. तो राष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवते.
धार्मिक वृत्ती त्यात असते. अंतःकरण निर्मळ व स्वच्छ असते.
आपल्या जबाबदाऱ्या तो वेळेवर पार पाळतो.
प्रवास मोठ्या प्रमाणात करावा लागतो आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्याचा भाग्योदय होतो.
रवि अश्विनी नक्षत्राच्या दहा किंवा अकरा अंशात असेल तर हे फल अधिक प्रमाणात मिळते.
चंद्र :- Ashwini Nakshatra
१) चंद्र अश्विनी नक्षत्रात असून त्यावर रविची दष्टि असेल तर असा जातक दयाळू असतो.
परंतु एकूण अशी व्यक्ती कठोर असते.
असा जातक सरकार आणि राज्याच्या विभिन्न पदांवर कार्य करतो.
2) मंगळाची दृष्टि अश्विनी नक्षत्रस्थ चंद्रावर असेल तर समाजाच्या विशिष्ट अंगावर अवलंबून राहतो.
३) जर बुधाची दृष्टि या चंद्रावर असेल तर असा जातक धन व यश मिळवणारा
व सर्व प्रकारची भौतिक सुख प्राप्त करणारा असतो.
४) गुरुची दृष्टि असेल तर ती व्यक्ती खूप विद्वान आणि इतरांना ज्ञान देणारी असते.
५) शुक्राची दृष्टी असेल तर स्वतः श्रीमंत असून उच्च श्रेणीच्या महिलांत वावरणारी असते.
६) शनिची दृष्टि असेल तर आरोग्य कमकुवत असते. गरीब व आपल्या नातेवाईकाबरोबर याची वागणूक वाईट असते. संततीच्या बाबतीतही भाग्यशाली नसतो.
चंद्र अश्विनी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-
अश्विनी नक्षत्राच्या प्रथम चरणी चंद्र असता जातकाचे व्यक्तीमत्त्व इतरांना दिपवणारे असते. उच्चाधिकार प्राप्त होतो आणि उच्चभू लोकांबरोबरच सल्लामसलत करतो.
सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असतो.
जर लग्न सुद्धां या नक्षत्राचे असेल आणि त्यावर गुरुची दृष्टि असेल तर त्याचे आयुष्य ब्याऐंशी वर्षापेक्षा अधिक असते.
रक्तविकार व फोड फुटकुळ्यांनी ग्रस्त असतो.
एक चांगला कार्यतत्पर अधिकारी असून सुद्धां आपले सहकारी व अधीनस्थ कर्मचाऱ्यांकडून चांगला म्हणवला जात नाही.
गुरुची दृष्टि असता समाजात उच्चपद मिळते व शेकडो लोक यांच्या हाताखाली काम करतात.
चंद्र अश्विनी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-
जर चंद्र अश्विनी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात असेल तर अशी व्यक्ती उंच, चलाख व चतुर असते.
ती मंदिरापान व मसालेदार पदार्थांची शौकीन असते. सियाकडून त्रास होतो.
गरीबीतही काही काळ घालवावा लागतो. कांही उपाय केल्यावर परिस्थितीत सुधारणा होते. अशा व्यक्ती स्वार्थी परंतु महत्त्वाकांक्षी असतात.
मंगळ किंवा राहूचा चंद्राशी प्रतियोग होत असेल तर पत्नीचा अकाली वियोग संभवतो.
ही घटना जीवनाच्या तीसाव्या वयोवर्षांच्या जवळपास घडते.
चंद्रावर शुक्राची दृष्टि असेल तर व्यक्ती भाग्यवान असते आणि चांगल्या पुत्राबरोबर जीवन कंठते.
जर शनिची दृष्टि असेल तर मत्सरी व अप्रसन्न व संघर्षमय स्थितीत राहवे लागते.
चंद्र अश्विनी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-
असा जातक वैज्ञानिक शिक्षण घेतो किंवा धार्मिक उपदेशक किंवा पंडित बनतो.
असा जातक स्वतः सतत कार्यम असतो व त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचे भले करतो.
चांगला मित्र असतो. मंगळाची दृष्टि असेल तर फोडफुटकुळ्या, दंत व कर्ण रोगाने पीडित असतो.
चंद्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-
चंद्र अश्विनी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात असणे खूपच चांगले असते.
परंतु अशा चंद्राबरोबर रवि असू नये. असा जातक उच्चशिक्षण व ज्ञानांनी युक्त असतो.
विज्ञान व तांत्रिक विषयाच्या अनेक शाखात तो पारंगत असतो.
तो आपल्या पुरूषार्थ व परिश्रमाने आपल्या शिक्षणाचा दर्जा वाढवतो.
कार्यक्षेत्रात तो अधिक तत्पर व सक्रिय असतो.
हा चंद्र जर अश्विनी नक्षत्राच्या चतुर्थ चरणाच्या शेवटच्या अंशात असेल
तर जातक डॉक्टर, इंजिनियर बनतो किंवा भारतीय प्रशासनिक सेवेत उच्चपदी काम करतो.
आपण येथे अश्विनी नक्षत्रातील बारा ग्रहांची फले व त्याचे काय परिणाम घडतात ते पाहूया प्राचीन ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार अश्विनी कुमार दुःखी व रोग्यांची सेवा सुश्रुषा करण्यास सहायक बनतात.
आधुनिक काळात या नक्षत्रात जन्मलेले लोक चांगले डॉक्टर, वैद्य किंवा हकिम असतात.
कुंडलीतील लग्न सुद्धा अश्विनी नक्षत्राच्या चौथ्या चरणात असेल तरच हे संभवते.
छंद किंवा आवड म्हणून ही असे लोक इतरांना औषधे देताना आढळतात.
अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या जातकाच्या डोक्यावर जखमेचा व्रण हमखास असतो.
मंगळ :- Ashwini Nakshatra
१) मंगळ अश्विनी नक्षत्रात असेल व त्यावर रविची दृष्टि तर असा जातक आई-वडिलांचा आदर राखणारा,
उच्च शिक्षण घेतलेला, नम्र व विद्वान बनतो.
2) चंद्रावर मंगळाची दृष्टि असेल तर अन्य स्त्रियांत आसक्ती ठेवणारा असतो.
दूसऱ्याशी क्रूर व्यवहार करणारा, समाजात अयोग्य कामे करणारा, चोर व खिसेकापू असतो.
३) बुधाची दृष्टि असेल तर आपलीच थोरवी गाणारा दिखाऊशान दाखविणारा आणि चरित्रहीन स्त्रियात उठबस करणारा असतो.
४) गुरुची दृष्टी असेल तर कुटुंब प्रमुख असून धन संपत्ति व अधिकारयुक्त असतो.
५) शुक्राची दृष्टि या मंगळावर असेल तर नित्य आरोग्याची चिंता असते.
त्याला चांगले जेवण व इतर भौतिक सुख भोगता येत नाहीत.
दुसऱ्या खियांच्या पाठीमागे लागल्याने कुटुंब व समाजातून तो बहिष्कृत होतो.
अशा लफड्यातून बचावला तर तो उच्चश्रेणीचे सामाजिक कार्य करू शकतो.
६) शनिची दृष्टि या मंगळावर असेल तर मातापित्याचे प्रेम त्याला मिळत नाही आणि कुटुंबातून त्याची उचलबांगडी होते.
मंगळ अश्विनी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-
प्रथम चरणी जन्म असेल तर जातक ठेंगणा असतो. आपल्या व्यवसायात तो खूप यशस्वी होतो आणि श्रेष्ठपदी विराजतो.
समाजात आदर व प्रतिष्ठा मिळवतो.
आरोग्याच्या बाबतीत असा जातक भाग्यवान असतो.
इतर जण त्याला पितातुल्य प्रेम व आदर देतात.
विज्ञान व गणितात उच्च पदव्या संपादन करतो.
सैन्य किंवा सामूहिक कार्यास तो अनुकूल असतो.
मंगळ अश्विनी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-
अश्विनी नक्षत्राच्या द्वितीय चरणी मंगळ असेल तर असा जातक खूपच दोन-हीन अवस्थेत जगतो.
त्याला संतती असत नाही व त्याचे कुटुंबही लहान असते. संतती किंवा कमीतकमी एक पुत्रासाठी तो हपापलेला असतो.
बऱ्याच वेळा अशा व्यक्तीला एक किंवा दोन मुलींचे सुख मिळते.
सूड घेण्याची प्रवृत्ति अशा जातकात आढळते पण अग्नि व पाण्याला भिणारा असतो.
अपघात किंवा तापज्वर होण्याची शक्यता असते.
यांच्या चेहऱ्यावर किंवा माथ्यावर विशिष्ठ प्रकारचे चिन्ह असते.
मंगळ अश्विनी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-
अश्विनी नक्षत्राच्या तृतीय चरणी मंगळ असेल तर असा जातकाने घर सोडून इतरत्र व्यापार करणे श्रेयस्कर ठरते.
अशा मंगळावर रविची दृष्टि असेल तर चांगले आरोग्य व पर्याप्त धनसंपत्तिने युक्त सुखी वैवाहिक जीवन जगतो.
रवि आपल्या नीच राशीतून मंगळाकडे पाहतो परंतु नीचत्त्वामुळे ग्रहांचा प्रभाव उच्च राहतो.
या मंगळावर गुरु किंवा इतर शुभग्रहांची दृष्टी असेल तर जातकाच्या आईचा त्याच्या लहान पणीच मृत्यू होतो.
असा जातक अत्याधिक भोगविलास व खाण्यापिण्यात पैशाची उधळपट्टी करणारा असतो.
मंगळ अश्विनी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-
अश्विनी नक्षत्राचा मंगळ चतुर्थ चरणी असेल तर जातकाला श्रेष्ठ सुख प्राप्त होते.
तो स्वतः अतिकर्तव्यनिष्ठ व नम्र असतो. त्याला रक्तदोष किंवा जलोदरासारखा आजार होतो.
१२ किंवा १३ अंशात जन्म असेल तर असा जातक चांगला अभियंता बनतो.
कन्या संतती अधिक होते. गुरुची दृष्टि असता वारसाहक्काने खूप मोठी पैतृक संपत्ति त्याला मिळते.
बुध :- Ashwini Nakshatra
१) अश्विनी नक्षत्रातील बुधावर जर रविची दृष्टी असेल तर असा जातक आपले मित्र व नातेवाईकांत प्रसिद्ध होतो.
तो नेहमी सत्यवादी असतो. आणि सरकारकडून फायदा उचलतो.
येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की रविच्या एक किंवा दोन चरणांची दृष्टी या बुधावर राहिल.
2) अश्विनी नक्षत्रस्थ बुधावर चंद्राची दृष्टी असेल तर अशा व्यक्तीला संगीत किंवा काव्यकलेत रुचि असते आणि ललित कलांच्या माध्यमातून त्याला पैसा मिळतो.
अशा व्यक्तीकडे विविध प्रकारची वाहने, आभूषणे व घरेदारे असतात. क्षेत्र व श्रीमंत महिला त्याला खूप आवडतात.
३) अश्विनी नक्षत्रातील बुधवार मंगळाची दृष्टि असेल तर शासन व सतेत त्याचा फार मोठा सहभाग असतो.
४) गुरुची दृष्टी असता चांगल्या कुटुंबाचा सदस्य असून तो श्रीमंत संततीने युक्त असतो.
५) शुक्राची दृष्टी असता लोकप्रिय व व्यवहारचतुर बनतो, त्याच्याकडे भरपूर धन, यश व नावलौकिक असतो.
६) शनिची दृष्टी या बुधावर असेल तर तो सामाजिक कार्य उत्तम रीतीने करतो.
बलवान असल्याने कठोर वागणूक असते व हाणामारीलाही मागे पुढे पहात नाही.
बुध अश्विनी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-
असा जातक नास्तिक असतो. आपल्या जीवनात तो समाजात निम्न श्रेणीचे जीवन जगतो.
दारू पिणे व सिया हा त्याचा अवगुण असतो.
धोकेबाज म्हणून सर्वांकडून तिरस्कार पावतो.
सर्वांशी तो असहकार वृत्तीने वागतो.
चंद्राची दृष्टी या बुधावर असेल तर असा जातक उद्धट व चरित्रहीन असतो.
गुरुची दृष्टी असेल तर मात्र काही सकारात्मक प्रभाव असतो.
अशी व्यक्ती उच्चशिक्षाविभूषित असते आणि त्याचे नियमित उत्पन्नही चांगले असते.
त्याचा मेंदु दार्शनिक असतो.
काही प्रमाणात पराविज्ञानाचा अनुभव व ज्ञान त्याला असते. यामुळे त्याला समाजात मान मिळतो.
बुध अश्विनी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-
त्याला आपल्या संततीकडून विशेष आनंद प्राप्त होतो.
ज्ञानाच्या अनेक शाखांचा अभ्यास करण्याची त्याला संधी मिळते.
उत्तरार्धात म्हणजे वय ३५ ते ४० नंतर तो वही बनू शकतो.
जर बुधाबरोबर रवि असेल तर अशा जातकाला चिकित्सा क्षेत्रातील उच्च पदव्या मिळतात तो प्रख्यात फिजिशियन, सर्जन किंवा वैध बनतो.
औदार्य आणि पावित्र्य है दोन गुण यात प्रकर्षाने आढळतात.
बुध अश्विनी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-
अशा व्यक्तीवर भगवंताची मोठी कृपा असते.
आश्चर्यचकित करून टाकणारी कामे तो करतो.
आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करतो.
याला पुत्र अधिक असतात. ईश्वरी कृपा असून ही आरोग्य मात्र चांगले राहत नाही.
याचे आयुष्य अंदाजे साठ वर्षाचे असून शकते.
बुध अश्विनी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-
असेल तर चांगली फले मिळत नाहीत. अशी व्यक्ती नीच आचरणाची असते.
प्रत्येक कार्य व क्षेत्रात ती अयशस्वी होतो. कामचोर असतो.
व्यापारात नुकसान होते.
जर गुरुची दृष्टी असेल तर मात्र साधारण दर्जाचा लेखक, क्लार्क, किंवा पैशाची देवघेव करून व्याज मिळवणारा बनतो.
गुरु :- Ashwini Nakshatra
१) अश्विनी नक्षत्रातील गुरुवर रविची दृष्टी असेल तर असा जातक बेकायदेशीर कृत्य करायला घाबरतो.
अशी व्यक्ती देवाला भिणारी आणि जनतेची सेवा करणारी असते.
2) गुरुवर चंद्राची दृष्टी असेल तर आशाजनक यश व ख्यातीमुळे व्यक्ती जाणती बनते.
३) मंगळाची दृष्टी असेल तर कठोर वागणूक असते आणि राजकारणातील व्यक्तींच्याकडून पैसा मिळवतो. इतरांची घमेंड जिरवतो.
४) बुधाची दृष्टि असेल तर चांगल्या वर्तणूकीची कमतरता असते असा जातक ‘ये बैला मार मला,’ वृत्तीचा व अनावश्यक वाद-विवाद करणारा.
दुराग्रही व भांडखोर असतो.
५) शुक्राची दृष्टी असेल तर सुगंधी प्रसाधने व महिलापयोगी वस्तुंचा व्यापार करणारा आणि तरूणांशी हास्यविनोद करणारा असतो.
६) शनिची दृष्टी असेल तर सुखाला पारखा, कुटुंबापासून अलिप्त, कठोरकर्मी व दरिद्री असतो.
गुरु अश्विनी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-
जातक उच्चशिक्षित व धार्मिक वृत्तीचा असतो.
शास्त्रांच्या अभ्यासाबरोबरच आध्यात्मिक आणि दार्शनिक क्षेत्रांचे ज्ञानही त्याला मिळते.
त्यांच्या जीभेत एक चुंबकिय आकर्षण असते.
मोठमोठया सभेला तो आपल्या वाक्चातुर्याने खिळवून ठेवतो.
वयो वर्षे ३५ नंतर त्याला पैसा आणि नाव मिळते.
मित्र व आवडत्या व्यक्तींच्या सहकार्याने तो भरपूर संपत्ती व स्थावर कमवितो.
गुरु अश्विनी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-
अशा जातकाचे व्यक्तिमत्त्व भव्य आणि आकर्षक असते.
अशी व्यक्ती उदार, विद्वान व प्रामाणिक असते.
सामान्य पदावर असताना अशी व्यक्ती लेखक आणि पत्रकार बनते.
असा जातक इतराकडून प्रेम व मान मिळवण्यात चतुर असतो.
पण आर्थिक दृष्ट्या कमकुवत असतो. सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असतो.
गुरु अश्विनी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-
असा जातक बौद्धिक व भौतिक संपत्ति मिळवण्यात पटाईत असतो.
खूप शिकलेला व प्रसिद्धी मिळवणा असतो.
त्याला राजांचाही राजा म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही.
पण कहींच्या मते युवावस्थेपर्यंतच त्याला जीवन असते.
गुरु पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-
चतुर्थ चरणी गुरु असता जातक भाग्यवंत असतो.
त्याला जीवनात खरा आनंद लुटता येतो.
आपल्या प्रयत्न व पुरुषार्थाने तो धनसंपदा मिळवतो.
त्याच्या हाताखाली अनेक लोक काम करतात.
एक चांगला अधिकारी, आपल्या मुलाबाळांचा संरक्षक व सर्वांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणारा, चांगला पैसा मिळतो.
शुक्र :- Ashwini Nakshatra
१) अश्विनी नक्षत्री शुक्र असेल आणि त्यावर रविची दृष्टी असेल तर शासनाकडून मोठे लाभ मिळतात.
पत्नी मात्र त्याच्या आयुष्यात एक प्रश्नचिन्ह असते.
2) चंद्रानी दृष्टी असेल तर मोठे राजनैतिक पद मिळते.
पण स्वस्त व खालच्या दर्जाच्या परस्त्रीशी मैत्री असल्याने तो बदनाम ही होतो.
३) मंगळाची दृष्टी असेल तर धनहीन, दरिद्री व आपल्या कुटुंबाकडून काहीही न मिळवणारा असा असतो.
त्याचे वैवाहिक जीवन कलहपूर्ण असते.
४) बुधाची दृष्टी असता असा जातक परसंपत्तिचा अपहार करणारा असतो.
५) गुरुची दृष्टी असेल तर संपत्ति, कुटुंब व संततीने युक्त, सुखी असतो.
६) शनिची दृष्टी असता खूप गुप्तधन असते. तो दुराचारी, व्याज खाणारा व तस्करी करणारा असतो.
नेहमी हसतमुख असतो. जलविज्ञान किंवा मशिनरीच्या इंजिनिअर बनतो.
शुक्र अश्विनी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-
प्रथम चरणी असेल तर शरीर धष्टपुष्ट असते. मनमिळावू असतो. मनमिळावू असतो.
शुक्र अश्विनी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-
दुसऱ्या चरणात असेल तर आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा, मित्रांचा हितैषी, आणि अनेक साधनांनी संपन्न असतो.
परंतु हे सर्व त्याला उत्तरार्धात मिळते.
उत्तरार्धात तो साहित्यिक, चित्रकार व कलाप्रेमी बनतो. शिक्षणाकडे नीट लक्ष दिले तर उच्च दर्जाचा अभियंता किंवा वकील बनू शकतो.
शुक्र अश्विनी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-
तिसन्या चरणात असता जातक अत्यंत मेघावी व विद्वान असतो.
मोठ्या उत्साहाने लोकांचे स्वागत करतो.
विशिष्ठ प्रकारचा चिकित्सक, राजनीतीज्ञ, राजदूत बनू शकतो.
शरीरात व्यंग असते. लंगडा किंवा इतर अवयवहीन असू शकतो.
इतर चांगल्या ग्रहांचा योग असेल तर असा जातक सर्वप्रिय, दानशूर असा महापुरूष बनतो.
शुक्र पूर्वा अश्विनी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-
आकर्षक मुद्रा, बोलण्यात चतुर, प्रभावी वक्ता असतो. उच्च दर्जाचा अभिनेता, संगतीकार व वाद्ययंत्राचा शौकीन असतो.
याची लेखनशक्ती सुद्धां प्रभावी असते.
या शुक्राबरोबर रवि असेल तर मात्र वैवाहिक जीवन कष्टी व कलहपूर्ण असते.
अशा जातकाचा विवाह लवकर होतो. किंवा मग नाट्यमय परिस्थितीत विवाह होतो.
शनि :- Ashwini Nakshatra
१) शनि अश्विनी नक्षत्रात असेल व त्यावर रविची दृष्टी असेल तर असा जातक पशुधनाच्या माध्यमातून आपले जीवन जगतो.
दुध डेअरी, चामड्याचा व्यवसाय किंवा शेतीशी संबंधित त्यांचे कार्यक्षेत्र असते.
सर्वसाधारणपणे आपल्या जीवनात चांगले कार्य करतो.
पण रविच्या दुष्प्रभावामुळे पित्याचे सुख कमी प्रमाणात मिळते.. पित्याकडून त्रासच होतो.
2) चंद्राची दृष्टी असता जातक आपल्या जीवनात बदनाम व्यक्तींचे अनुकरण करतो.
स्वभावाने क्रूर व आचरणाने हीन व दारिद्रयात जीवन कंठणारा असतो.
३) मंगळाची दृष्टी असेल तर आगावू बोलणारा असतो.
दुसऱ्यांना फसवणारा व कोणलाही मतद न करणारा असतो.
४) शनिवर बुधाची दृष्टी असेल तर बेकायदेशीर मार्गांनी पैसा मिळवतो.
५) गुरुची दृष्टी असता सरकार दरबारात उच्चपद प्राप्त होते व
आपल्या जीवनात भूरपूर संपत्ति, खानदानी कुटुंब, सुशील पत्नी व उत्तम संततीयुक्त असतो.
६) शुक्राची दृष्टी असता प्रवासी दूर देशी पर्यटन करणारा असतो.
व्यक्तिमत्त्वात आकर्षण नसले तरी सुद्धा लोकांच्यावर त्याची छाप पडते.
स्त्रियांना प्रिय व भोगविलासात पैशाचा अपव्यय करणारा असतो.
शनि अश्विनी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-
अश्विनी नक्षत्राच्या प्रथम चरणी शनि असेल तर बालपण अत्यंत गरीबीत जाते.
कलांतराने प्रसन्न असणारा, मंदगतीने काम करणारा व मंदबुद्धीचा असतो
त्याला बोलताना अडखळण्याची व खोटे बोलण्याची सवय असते.
आयुष्य मोठे असते. ऐतिहासिक विषयात रूचि असते. जीवनाच्या उत्तरार्धात लेखन कार्यामुळे ख्याती मिळते.
शनि अश्विनी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-
अश्विनी नक्षत्राच्या द्वितीय चरणात शनि असेल तर जातक काळा किंवा श्यामवर्णी असतो. याचे केस जाड व उभे असतात.
डोके मोठे व शरीर सडपातळ असते.
अशा व्यक्तींना जंगल विभागात चांगला पैसा मिळतो.
पैसा मिळवण्यात पटाईत, व्यावहारिक ज्ञानात कमजोर व सामान्य गोष्टीत बुद्धीहीन असतो.
निष्कारण आर्थिक चिंतेत डुबलेला असतो. यामुळे तो हिंसक व क्रुद्ध आचरणाचा बनतो.
जीवनाच्या मध्यापर्यंत असामाजिक कार्याशी संबंध राहतो.
असा जातक व्यापारात कुशल असतो.
चहुकडे फिरणारा, सर्वांशी चांगले संबंध ठेवणारा असतो.
व्यापारात आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांचे हित पाहणारा असतो.
त्याच्याकडून झालेल्या कल्याणकारी कामगिरीमुळे लोक त्याला विसरत नाहीत.
शनि अश्विनी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-
तृतीय चरणी शनि असेल तर असा जातक सुखी जीवन जगतो.
धार्मिक विचारांने परिपूर्ण असूनही सट्टा जुगाराचा नाद असतो.
जर रविची दृष्टी या शनिवर असेल तर जमीनदार बनतो व शेतीतून फायदा मिळवतो.
शनि अश्विनी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-
आपण येथे अश्विनी नक्षत्रातील बारा ग्रहांची फले व त्याचे काय परिणाम घडतात ते पाहूया,
स्त्रीच्या कुंडलीत अश्विनी नक्षत्रांचा शनि असून त्यावर रविची दृष्टी असेल तर तिचा विवाह होत नाही.
विवाह झालाच तर तो मोडतो. चंद्राची दृष्टी शनिवर असेल तर
अशी स्त्री चरित्रहीन, कुरूप चेहऱ्याची व दुर्गंधयुक्त शरीराची असते.
राहू :- Ashwini Nakshatra
राहू अश्विनी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-
अश्विनी नक्षत्राच्या प्रथम चरणात राहू असेल तर असा जातक खूपच बुद्धिमान असतो.
शरीर घष्टपुष्ट असते. पितृभक्त असतो.
आपल्या संरक्षकाकडून त्याला वेळोवेळी योग्य सहयोग मिळतो.
त्याच्या चेहऱ्यावर विशिष्ठ प्रकारचा काळा तिळ असतो.
राहूवर पापग्रहांची दृष्टी असेल तर अशा जातकाच्या जीवनात वारंवार दुर्घटना घडतात. तरीही तो जिवंत राहतो.
राहू अश्विनी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-
जातक धार्मिक रीतिरिवाजांचा पुरस्कर्ता असतो. देशविदेशात भ्रमण करतो.
दुसऱ्याकडून दान घेऊन किंवा वाचना करून आपले जीवन कंठतो.
याचे विचार व कार्य वारंवार बदलतात. शेवटच्या अवस्थेत त्याला मानसिक आजार होतो.
राहू अश्विनी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-
अश्विनी नक्षत्राच्या तृतीय चरणी राहू असेल तर जातकाची स्थिती चांगली नसते.
खूपच गरिबीत जीवन जगावे लागते. Ashwini Nakshatra
चांगल्या किंवा वाईट दोन्हीं कामात रूचि नसते.
तो भावना विवश व दार्शनिक विचारांचा असतो. साधू किंवा संन्यासी बनतो. वैवाहिक जीवन कटुतापूर्ण असते.
राहू अश्विनी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-
राहू जर अश्विनी नक्षत्राच्या चतुर्थचरणी असेल तर असा जातक शूरवीर, धाडसी, शक्तिमान व स्पष्टवक्ता असतो.
त्याला वायु, गुल्मरोग व गॅस अपचनाचा विकार असतो.
रविची दृष्टी राहूवर असेल तर जातक कार्यदक्ष व आपल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकणारा असतो.
त्याच्या अडीअडचणीच्या प्रसंगी त्याला मदत करणारा महापुरूष त्याला भेटतो.
केतु :- Ashwini Nakshatra
केतु अश्विनी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-
अश्विनी नक्षत्राच्या प्रथम चरणी केतु असेल तर असा जातक उच्चशिक्षित बनतो.
जीवनाच्या चतुष्टिक क्षेत्रातील त्याचे यश इतरांच्यासाठी उदाहरण बनते.
असा जातक लोकप्रिय व कर्मठर असतोच, त्याचबरोबर आपल्या ज्ञानक्षेत्राचा विशेषज्ञ,
निर्माण कार्याशी संलग्न उपजीविका मिळवणारा, मॅकेनिकल इंजिनिअर किंवा अर्थ- तांत्रिक व्यवसाय करणारा असतो.
केतु अश्विनी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-
अश्विनीच्या द्वितीय चरणातील केतू जातकाला गरीबीत जीवन कंठायला लावतो.
जनसंपर्कात निपुण व सार्वजनिक कार्यातून फायदा मिळवणारा बसतो.
स्त्री आसक्ती मोठ्या प्रमाणावर असते. Ashwini Nakshatra
केतु अश्विनी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-
तृतीय चरणातील केतु जातकाला सदैव खालच्या दर्जाच्या लोकांत ठेवतो.
संततीहीन असतो. असंख्य त्रुटी असून सुद्धां समाजात आदरणीय असतो.
वेळोवेळी इतरांना मदत करतो.
केतु अश्विनी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-
अश्विनीच्या चतुर्थ चरणी केतु असता आपल्या जन्मस्थानापासून दूर रहावे लागते.
विदेशात राहणारा किंवा प्रवासी असतो.
दुसऱ्याच्या वाट्याचे जेवण जेवतो.
आयुष्य तीस-पस्तीस वर्षेच असते.
हर्षल – नेपच्यून :-
अश्विनी नक्षत्रात हर्षल व नेपच्यून असता जातकात अस्थिरता व चंचलता उत्पन्न होते.
वारंवार बेत बदलले जातात.
शांतपणापासून ढळविणारे गुण मोठ्या प्रमाणात असतात.
जातक स्वच्छंदी, तत्त्वज्ञानी, शास्त्री, वेदश, व मेंदुचा विकार असणारा असतो.
प्लुटो :-
अश्विनी नक्षत्री प्लुटो असेल तर जातक चंचल, सदा भटकणारा,
लांब लांबचे प्रवास करणारा, बुद्धिमान, विद्याव्यासंगी, तत्त्वज्ञानी, लेखक, ग्रंथकार, व पुढारी असतो.
जलद लिखाणाची सवय असते. कामे भराभर करण्याचा उत्साह असतो.
सार्वजनिक कार्यकर्ता, उपदेशक बनतो. बांधा सडपातळ असतो.
प्रकृति उष्ण असते. या नक्षत्रात रवि, बुध, चंद्र, गुरु, असून लग्नत्रिकोण, दशमत्रिकोण
अथवा सप्तम त्रिकोण असल्यास जातक नामांकित व भाग्यवंत असतो.
माझे मनोगत :-
अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या स्त्री-पुरूषांनी कृतिका, उत्तरा, उत्तराषाढा, मृग, चित्रा, धनिष्ठा, पुनर्वसु,
विशाखा व पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात जन्मलेल्या स्त्रीपुरूषांशी मैत्री, व्यापार, भागीदारील,
घेण्या देण्याचे व्यवहार व विवाह करू नये.
आपण येथे अश्विनी नक्षत्रातील बारा ग्रहांची फले व त्याचे काय परिणाम घडतात ते पाहूया
मार्गदर्शन :-
ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!
आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.
(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
अधिक माहिती साठी संपर्क :-
श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,(संतती समस्या निवारण विशेतज्ञ)