Bharani Nakshatra, भरणी नक्षत्रातील सर्व बारा ग्रहांची फले,

Bharani Nakshatra
श्रीपाद गुरुजी

Bharani Nakshatra,भरणी नक्षत्र तील सर्व बारा ग्रहांची फले सर्व नक्षत्र तिल दुसरे नक्षत्र भरणी चे, सर्व बारा ग्रह असल्यास काय फले देतात या बाबत माहिती पाहणार आहोत,

चार नक्षत्र मिळून एक राशी तयार होते, एक नक्षत्र सर्व ग्रह नुसार काय प्रभाव देतात ते पाहूया, ब्रह्मंडामध्ये अगणित तारेतारका, ग्रह, उपग्रह आहेत.

दुरून पाहिल्यावर तेथे तार्‍यांचे अनेक समूह दिसतात. या समूहांतून विविध आकृत्या तयार होतात. तार्‍यांच्या या समूहालाच नक्षत्र म्हणतात.

रवि :- Bharani Nakshatra

1) भरणी नक्षत्र तील सर्व बारा ग्रहांची फले सर्व दुसरे नक्षत्र रवि असेल आणि त्यावर चंद्राची दृष्टी असेल तर अशा जातकात दयाभाव असतो आणि इतरांना मदत करण्याची उदात्त भावना असते. त्याच्याकडे सेवक व नोकरचाकर मोठया संख्येत असतात.

2) जर मंगळाची दृष्टी असेल तर जातक कठोर व फूटपाडण्याच्या कलेत प्रवीण असतो. त्याचे डोळे लाल असतात. शरीर मजबूत व कमविलेले असते.

3) जर गुरुची दृष्टि असेल तर गरीबांना मदत करणारा, धनवान व राजनीतिक ख्यातीप्राप्त असतो. या शिवाय तो उच्चशिक्षित, चिकित्सक- डॉक्टर किंवा शासनाधिकारी असतो.

4)शुक्राची दृष्टि असेल तर खालच्या स्तरातील लोकांत उठ बैठ करणारा, चारित्र्यहीन व वेश्यांसाठी खर्च करणारा आणि संधीसाधू मित्रांनी युक्त असतो.

5) शनिची दृष्टि असेल तर आळशी, अकर्मण्य, चोरी करणारा व रोगग्रस्त शरीर असलेला असतो.

रवी भरणी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

भरणी नक्षत्र तील सर्व बारा ग्रहांची फले सर्व नक्षत्र तील दुसरे नक्षत्र भरणी,

प्रथम चरण बाबत माहिती पाहणार आहोत रवि भरणी नक्षत्रच्या प्रथम चरणात असेल तर जातक विशेष शिक्षण घेतलेला,

विचारांनी प्रगत व मनोविज्ञान आणि ज्योतिषशास्त्राचा ज्ञाता असतो.

सौभाग्यशाली तर असतोच पण त्याशिवाय धनसंपत्ति व ख्यातीनेयुक्त असतो.

त्याचे व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि वागणूक सौहार्दपूर्ण असते.

डोके किंवा डोळ्याजवळ जखमेची खूण असते.

चिकित्सा, कायदा, या सारख्या जीवनातील कोणत्याहि कार्यक्षेत्रात तो विशेषज्ञ बनू शकतो.

जर रवि १५ किंवा १६ अंशात असेल तर तो यशस्वी व्यापारी होतो.

खत, कृषि उपकरणे, उस, कापड, फळ फळावळ, इंटिल-भोजनालय यासारख्या कार्यक्षेत्राशी त्याचा संबंध येतो.

रवी भरणी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

रवि जर भरणी नक्षत्राच्या द्वितीय चरणात असेल तर कौटुंबिक स्थिती अनुकूल व सुखद असते.

पत्नी व संततीचे पूर्ण सुख त्याला मिळते.

अशा व्यक्तिला वारसाहक्काने किंवा अकस्मात धनलाभ होतो.

लॉटरी, सट्टा, शेअरमार्केट मधूनही त्याला धनलाभ होतो.

याला गळ्याचे विकार, टॉन्सिल्स किंवा गर्भाशय व जननेंद्रियासंबंधी विकार असतात.

दळणवळ, समुद्री किंवा हवाई सेवा, तेलशोधक कारखाने किंवा जलोत्पन्न वस्तूंपासून फायदा होतो.

जर रवि १८/१९ अंशात असेल तर त्याला रतिरोग किंवा संसर्गजन्य रोग होतो.

केमिकल इंजिनिअर, टेक्सटाइल इंजिनिअर आणि थाटामाटात राहणारा सुखभोगी असतो.

रवी भरणी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

रवि जर भरणी नक्षत्राच्या तृतीय चरणात असेल तर अशी व्यक्ती संघर्षरत असते.

तिच्याकडे अफाट पैसा असतो परंतु मन मानेल तसा खर्च केल्याने,

व्यसनात पडल्याने संपत्ति दुसऱ्याच्या हाती जाते.

महादशा सिद्धांताप्रमाणे त्याला फक्त रविची महादशा किंवा अंतर्दशा लाभदायक जाते.

बाकी सर्व महादशा त्रासदायक ठरतात.

मंगळाच्या महादशेत डोके फुटण्याचा संभव असतो.

व्यावसायिक क्षेत्रातही अपयश येते.

तो वकील असो किंवा तज्ज्ञ, डॉक्टर, इंजिनिअर यापैकी कोणीही असो कमी प्रमाणातच पैसा मिळतो.

मंगळ चांगला असेल तर स्थावर जमीनीतून कांहीं आर्थिक फायदा होतो.

तो आक्रमक घायकुत्या व भांडखोर वृत्तीचा असतो.

रवी भरणी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

रवि भरणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात असेल तर जातकाला लहानपणी खूप त्रास सहन करावा लागतो.

अवेळी पित्याचा मृत्यू होतो.

जर इतर ग्रहांचा सहयोग नसेल तर भिकाऱ्या सारखे जीवन कंठावे लागते.

एकादा शुभग्रह जरी शुभ असेल तर ती व्यक्ती भीक मागत नाही पण दुसऱ्याच्या दयेवर तिला अवलंबून राहावे लागते.

चंद्र :- Bharani Nakshatra

1 )भरणी नक्षत्र तील सर्व बारा ग्रहांची फले सर्व नक्षत्र तील दुसरे नक्षत्र भरणीत चंद्र असेल तर अशी व्यक्ती कठोर व क्रूर आचरणाची असते. मात्र याचना करणारांची मदत अवश्य करते. कधीतरी कायद्याच्या कचाट्यात सापडून दंड किंवा भोगावी लागते. विषभय असते. अग्नि, शस्त्र, पक्षाघातामुळे एखादा अवयव निकामी होतो. डोळे व दात भयंकर रोगाने पीडित असतात. पोट भरण्यासाठी दारोदार भटकावे लागते. दूसऱ्यांच्या दयेवर उदरनिर्वाह करते.

2) बुधाची दृष्टी या चंद्रावर असेल तर प्रसिद्धी मिळते. आयुष्यात प्रत्येक कार्यात प्राविण्य मिळते. असा जातक सन्मानित व श्रीमंत असतो.

3) गुरुची दृष्टी असेल तर आपल्या मालकाचा आवडता आणि अन्नदात्याचा विश्वासपात्र असतो. तो कोणत्यातरी संस्थेचा किंवा शासनाचा प्रतिनिधी असतो.

4) शुक्राची दृष्टी असेल तर आपले आयुष्य जीवनाच्या जोडीदाराबरोबर चांगले म्हणून काम करतो. त्याचे आरोग्य उत्तम असते. व तो धनवैभवाने सुखी व्यतीत होते परंतु त्याला त्याच्या संततीकडून विशेष लाभ होत नाही.

5) शनिची दृष्टी असेल तर खोटे व अपशब्द बोलण्याची सवय असते.

चंद्र भरणी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

भरणी नक्षत्रातील सर्व बारा ग्रहांची फले सर्व नक्षत्रातील दुसरे नक्षत्र भरणी प्रथम चरण बाबत माहिती पाहणार आहोत

चंद्र भरणी नक्षत्राच्या प्रथम चरणी असेल तर जातक खूपच श्रीमंत व भावंडाशी सहयोगाच्या भूमिकेने वागणारा असतो.

त्याच्याकडे अनेक प्रकारची वाहने, नोकर आजचा विचार करतो.

उद्याची बात विसरून जातो. याच सवयीमुळे धनाचा अभाव सहन करावा लागतो.

चंद्र भरणी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

तर त्याचे अधिकांश आयुष्य सुखात जाते. तो आपल्या आजोळकडून आर्थिक लाभ मिळवतो.

आजोळी दत्तक जाण्याची शक्यता असते.

आईच्या वडिलांकडून चांगला फायदा होतो.

त्याचे शिक्षण उच्च दर्जाचे असते. विद्वानात उठ-बैस असते, नोकरीत सर्वोच्च अधिकान्याबरोबर काम करण्याची संधी मिळते.

चंद्र भरणी नक्षत्रातील तृतीय चरण फल :- 

विवाह दोनदा होतो. त्याला जनसामान्यकडून प्रेम व सन्मान मिळतो.

गरजू लोकांना तो मदत करतो. चहा, कॉफी व पान तंबाखूचा विशेष पीक असतो.

त्याला उच्च लोकांकडून आणि सोने-चांदी रत्न, भूषण, कापूस, रेशीम,

रासायनिक खते व हॉटेल व्यवसायातून आर्थिक लाभ होतो.

चंद्र भरणी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

असा जातक संशयास्तद चारित्र्याचा असतो. त्याचे आचरण लंपट, धोखेबाज व नीच असते.

अनेक वेळा शरीरावर जखमा होतात. ऑपरेशनही होते.

पोर्ट, हवाई अड्डा किंवा रेल्वेच्या गोडाउनमध्ये काम करतो.

दळणवळण, मालसामानाची वाहतूक व दवाखान्यापासून आर्थिक लाभ होतो.

मंगळ :- Bharani Nakshatra

1)भरणी नक्षत्रातील सर्व बारा ग्रहांची फले सर्व नक्षत्रातील दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्रात असलेल्या मंगळावर रविची दृष्टी असेल तर जातक मेधावी, बुद्धिमान, आणि सज्जन असतो. मातापित्याचा सेवक व श्रीमतांत मान असणारा असतो.

2) चंद्राची दृष्टी या मंगळावर असेल तर जातक दुराचारी, व्यसनी व वेश्यागामी असतो. दया नावाची कोणती वस्तु त्याच्या वर्तणूकीत नसते. तो लाचखाऊ, किंवा कोषागरात, रेल्वे किंवा पोलीस विभागात सामान्य नोकरी करतो.

3) बुधाची दृष्टी जकात असेल तर इतरांच्या संपत्तीत आसक्त, दुश्चचरित्र, आपला मोठेपणा मिरवणारा व खोटे बोलणारा असतो. या योगावर मोठ मोठे चोर असतात. कुटुंबात सर्वात अधिक कमावणारी व मोठ्या हुद्यावर काम करणारी व्यक्ती असते. आयुष्याच्या मध्यंतरी भरपूर प्रमाणात श्रीमंती मिळते. औषध उपचारात याला प्रसिद्धी व संपत्ती मिळते.

मंगळ भरणी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

भरणी नक्षत्र तील सर्व बारा ग्रहांची फले सर्व नक्षत्र तील दुसरे नक्षत्र भरणी प्रथम चरण बाबत माहिती पाहणार आहोत भरणी नक्षत्राच्या प्रथम चरणात मंगळ असेल तर असा जातक चाळीस किंवा पन्नासाव्या वर्षीच मरण पावतो. त्याचा मृत्यू दूसऱ्या देशात किंवा रस्त्यात दुर्घटना होऊन होती. किरकोळ रोगाने सुद्धा त्याचे आरोग्य गंभीर बनते. अशा जातकाने स्वतः वाहन चालवू नये व विद्युतसंबंधी काम विशेष सावध राहून करावे. केमिकल ड्रॉप्स किंवा औषधेही वाला चातक ठरू शकतात. मादक पदार्थाच्या सेवनाचे पथ्य पाळणे अति आवश्यक आहे.

मंगळ भरणी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

भरणी नक्षत्राच्या द्वितीय चरणी मंगळ असेल तर जातक नाजुक असतो. कमजोर अवयवामुळे जड काम करण्यास घाबरतो. लिकोडरमा, धातुक्षय, चामडीत गाठी होणे या सारखे विकार होतात. असे असूनही तो मोठा बुद्धिमान व मेहनती असतो. शिक्षणात तो प्रथम असतो. विपरित योनी विषयी विशेष आकर्षण असते. सुर्वेद्रिय संबंधी रोग, सूज किंवा बी.डी. सारखे रोग होतात. खेळाच्या साधनातून व्यापारातून पैसा मिळतो.

मंगळ भरणी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

भरणी नक्षत्राच्या तृतीय चरणी मंगळ असेल तर अशा जातकाला त्याच्या जीवनात नकरात्मक कले प्राप्त होतात. आयुष्याच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत सतत संघर्ष करावा लागतो. पन्नास नंतर त्याचे जीवन बदलते. सुख-समृद्धि त्याला प्राप्त होते. चौयाशी वर्षांचे आयुष्य लाभते. तो मनोरंजनाची ठिकाणे सिनेमा, थियेटर, व्हिडिओ, सार्लर, स्टुडिओ, हॉटेल यापैकी एका व्यवसायाचा मालक बनतो.

मंगळ भरणी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

भरणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात मंगळ असेल तर त्याला त्याच्या प्रांतात किंवा देशात सर्वोच्च मान मिळतो. विदेश प्रवासात सावधान राहणे आवश्यक आहे. पर्यटन प्रवासात दुर्घटना होणे शक्य असते. त्यांत जिवाला भीती राहते. अशी व्यक्ती चिकित्सेच्या क्षेत्रात खूप रूचि घेते. किंवा पोलीस प्रशासन, राजकारण, सार्वजनिक हिताची क्षेत्रे यांच्याशी याचा संबंध येतो. चिकित्सा किंवा सेक्स, एडस्, कैंसर आदि झील चिकित्सेत तच्च बनतो.

बुध :- Bharani Nakshatra

1)भरणी नक्षत्र तील सर्व बारा ग्रहांची फले सर्व नक्षत्र तील दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्राच्या बुधावर चंद्राची दृष्टी असेल तर अशा जातकाला संगीत, अभिनय आणि इतर लोककलांमध्ये रुचि असते. अशा प्रकारच्या कलात्मक व्यवसायातून त्याचा चालतो. असा जातक संपन्न परिवारातील, स्त्रियांत आदरणीय मानला जातो. त्याला घर, वाहन, नोकर-चाकरांचे सौख्य लाभते.

2)मंगळाची दृष्टी असेल तर उच्चअधिकाऱ्यांचा आवडता असतो. अशा अधिकान्यांशी करून पैसा मिळवतो. परंतु अशी व्यक्ती भांडखोर व उपद्रवी देखील असते.

3) गुरुची दृष्टी असेल तर जीवन सुखी असते. तो आदर्श पत्नी व संततीने युक्त असतो.

4) शुक्राची दृष्टी असेल तर थोरमोठ्या लोकांत उठ- बैठ असते. त्याचे आचरण वाखाणण्यासारखे असते. मित्र आणि नातेवाईकांत तो चर्चेचा विषय बनतो.

5) शनिची दृष्टी असेल तर जातक चारित्र्यहिन भांडखोर व कठोर स्वभावाचा असतो.

बुध भरणी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

भरणी नक्षत्रातील सर्व बारा ग्रहांची फले सर्व नक्षत्रातील दुसरे नक्षत्र भरणी प्रथम चरण बाबत माहिती पाहणार आहोत भरणी नक्षत्राच्या प्रथम चरणी बुध असेल तर अशा जातकाचे आयुष्य दीर्घ नसते. लहानपणीच त्याला देवी व शारीरिक संकटाशी झगडावे लागते जर लहानपण घड गेले तरी त्याला पुन्हा पाप ग्रहाच्या दशेत त्रास सहन करावा लागतो. अशी व्यक्ती बहुधा लेखन, स्वाध्याय, अध्यापन, पौराहित्य, दलाली व ठेकेदारी, मिस्त्री, सजावट किंवा कारागिरीचा व्यवसाय करून पोट भरताना आढळतात.

बुध भरणी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

भरणी नक्षत्राच्या द्वितीय चरणात बुध असेल तर अशा व्यक्तीचे आयुष्य मध्यम असते. अशी व्यक्ति एकाचवेळी अनेक कामे सुरू करते पण एकाही कामात यश मिळत नाही. वडील व नातेवाईकांशी संबंध स्नेहपूर्ण नसतात. तरीही तो आपल्या कुटुंब व मित्रांना मदत करतो.

बुध भरणी नक्षत्रातील तृतीय चरण फले :-

भरणी नक्षत्राच्या तृतीय चरणात बुध असेल तर जातक दीर्घायु बनतो. तो उच्च शिक्षित व सौभाग्यशाली पत्नी ने युक्त असतो. त्याचे जीवन सुधारण्यात पत्नीचा सिंहाचा वाटा असतो. किरकोळ व्यापार, ठेकेदारी किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करून उदरनिर्वाह चालवतो.

बुध भरणी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

भरणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणी बुध असेल तर असा जातक सरकारी नोकरी करतो. त्याला आयुष्य पंचेचाळीस वर्षेच असते. लकवा किंवा पांडुरोगाने त्याला मृत्यू येतो. परंतु रागीटपणा व कठोर स्वभाव बनतो. शुक्राची दृष्टि असेल तर तो मिठाई व विशिष्ठ प्रकारच्या भोजनाचा शौकिन असतो. त्याचे आचरण लंपट व व्यवहार स्वार्थी असतो. तरीसुद्धा तो समाज व कुटुंबातून वेगळा केला जातो. त्याला आईची मायाही मिळत नाही. त्याचे शरीर सडपातळ व स्वभाव सूड घेण्याचा असतो. आपल्या कुटुंबाची नेहमी निंदा करतो. कुटुंबाविरूद्ध काम करणे त्याला आवडते.

गुरु :- Bharani Nakshatra

1)भरणी नक्षत्र तील सर्व बारा ग्रहांची फले सर्व नक्षत्र तील दुसरे नक्षत्र, गुरु भरणी नक्षत्रात असून त्याच्यावर रविची दृष्टी असेल तर जातक भाग्यवान, सत्यवादी, सामाजिक कार्यकर्ता व प्रसिद्ध असतो.

2) भरणी नक्षत्रातील गुरुवर चंद्राची दृष्टी असेल तर तो आपल्या पेक्षा मोठ्यांचा आदर करतो. व आपल्या सत्कार्यामुळे . लहान वयातच चांगले यश मिळवतो. नेहमी आपल्या कामात दंग असतो. संतोषी व शात असतो.

3) मंगळाची दृष्टी असेल तर कठोर, निर्दयी, अनावश्यक कार्यात पैसा खर्च करणारा असतो. स्वतः अधिकारी असतो व दुसऱ्याचा अहंकार मोडण्यात यश मिळवतो. मध्यम अवस्थेत तो सरकारी अधिकारी किंवा निरीक्षक बनतो. त्याच्या अधीन बरेच कर्मचारी काम करतात.

4) बुधाची दृष्टी असेल तर अशा व्यक्तीत सत्यता कमी असते. बोलण्यात चतुर व इतरांत भांडणे लावून देण्यात पटाईत असतो. एकाच वेळी अनेक स्त्रियांच्या संपर्कात येतो व आपल्या दिखाऊ व्यवहाराने लोकांना मुर्ख बनवतो.

5) शुक्राची दृष्टी असेल तर सर्व प्रकारची सुखे त्याला प्राप्त होतात. त्याची पत्नी सुंदर व प्रभावी असते. तिला वस्त्रालंकाराची आवड असते. स्वतः चांगल्या राहणीचा शौकीन, घर, वाहन व नौकर-चाकरांनी युक्त असतो.

6) शनिची दृष्टी असेल तर नेहमी अशांत व कलहपूर्ण जीवन घालवावे लागते. तो क्रूर, कपटी व इतरांना चुकीचे मार्गदर्शन देण्यांत निपुण असतो.

गुरु भरणी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

भरणी नक्षत्र तील सर्व बारा ग्रहांची फले सर्व नक्षत्र तील दुसरे नक्षत्र भरणी प्रथम चरण बाबत माहिती पाहणार आहोत भरणी नक्षत्राच्या प्रथम चरणात गुरु असेल तर जातक संभाषण चतुर आपल्या पित्याचा प्रिय व कुटुंबाचा एकमेव आधार असतो. लोक याला देव मानतात. सर्वत्र मान सन्मान मिळतो. एकापेक्षा अधिक पत्नी असतात. गणित, अर्कोटस, वाणिज्य, इत्यादित उच्चपदवी प्राप्त होते. तो फॅक्टरी, बँक किंवा व्यापारी संस्थेत उच्च पदावर काम करतो. मूर्च्छा, अपघात, बौद्धिक, तणावामुळे अचानक रोगग्रस्त होणे संभवते.

गुरु भरणी  नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

तर तो जातक पुत्र पौत्रादिकांने युक्त असतो. पंचावन्न किंवा साठाव्या वयापत आयुष्य असते. गुन्हेगारी कामात निपूण असतो. धार्मिक असल्याचा बहाणा करतो. जमीनीचे व्यवहार, सट्टा, लॉटरीच्या माध्यमातून पैसा मिळतो.

गुरु भरणी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

जातक खूप लांबवर प्रवास करतो. बत्तीस वयानंतर त्याचे जीवन संपन्न व सुखी बनते. भोगविलासात विशेष रूचि असते. बऱ्याच वेळा चमत्कारिक दुर्घटनेतून त्यांचा बचाव होतो. प्रतियोगीतापरीक्षा, स्पर्धा वगैरेत विजय मिळतो. राजस्वविभाग, कायदा, आयात निर्यात, सोनेचांदी किंवा वस्त्रांचा व्यापार व खेळांचे साहित्य यांच्या व्यापारात धन मिळवतो.

गुरु भरणी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

भरणी नक्षत्राच्या चौथ्या चरणात गुरु असेल तर ती व्यक्ती दीर्घायू असते. कृषी उत्पादन आणि खाद्यान्नांचा व्यापारात पैसा मिळतो. तंत्र-मंत्र व ज्योतिषशास्त्रात पारंगत असतो. चलाख व दुसऱ्याचे पोषण करणारा असतो.

शुक्र :- Bharani Nakshatra

1)भरणी नक्षत्र तील सर्व बारा ग्रहांची फले सर्व नक्षत्र तील दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र शुक्र असून त्यावर रविची दृष्टी असेल तर असा जातक शासनाकडून खूप पैसा मिळवतो. विशेष अशी कार्यक्षमता त्याच्या अंगी असते. दांपत्यजीवनात मात्र तो दु:खी असतो. पत्नीमुळे त्याला बराच त्रास सहन करावा लागतो. चंद्राची दृष्टी असेल तर समाजात उच्च प्रतिष्ठा प्राप्त होते. परंतु महिलांचे अधिक आकर्षण असल्याने सर्वत्र बदनामी होते.

2)मंगळाची दृष्टी असेल तर धनहीन व पावलागणित अडचणी सहन कराव्या लागतात. जीवनात सुख, शांतीचा अभाव असतो.

3)बुधाची दृष्टी असेल तर जीवनात आलेल्या अडचणीमुळे अनेक वेळा मार्ग बदलावा लागतो. त्याच्या इच्छेप्रमाणे तो जगू शकत नाही.

4)गुरुची दृष्टी असेल तर तो विख्यात व आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा, भाग्यशाली पत्नी व योग्य संततीने युक्त जीवनातील सर्व प्रकारची सुख सुविधा मिळवतो.

5)शनिची दृष्टी असेल तर त्याचकडे चोरी केलेला, गहाण टेवलेला बराच धनसंग्रह असतो.तो गुपचूप राहणारा, शांतचित्त, लोकांना आदरणीय असतो. गरजूंच्या विषयी यांच्या मनात दयाभाव असतो.

शुक्र भरणी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

भरणी नक्षत्र तील सर्व बारा ग्रहांची फले सर्व नक्षत्र तील दुसरे नक्षत्र भरणी

प्रथम चरण बाबत माहिती पाहणार आहोत भरणी नक्षत्राच्या प्रथम चरणात शुक्र असेल तर संगीत व काव्यात प्रवीण असतो.

व्याख्यान देण्यात व शास्त्रीय गायनात याला तोड मिळत नाही.

अल्प आहारी व लोकप्रिय असतो. अति धूम्रपान करणारा, कपाळावर किंवा डोळ्याजवळ जखमेचा व्रण असणारा असतो.

क्रीडा विशेषज्ञ व कलाकार म्हणून प्रसिद्धीला येतो. सुखोपभोगाची लालसा तीव्र असते.

संगीताची वाद्ये, रेडिओ, टी.व्ही. इत्यादिंचा व्यापारात पैसा मिळतो.

शुक्र भरणी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

भरणी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात शुक्र असेल तर स्त्रियांचे फार आकर्षण असते. याला गुप्तरोग असतो.

डोळे कमजोर असतात. महिलापयोगी वस्तुंच्या व्यापारात किंवा स्त्रीरोगचिकित्सक म्हणून यशस्वी होतो.

शुक्र भरणी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

भरणी नक्षत्राच्या तृतीय चरणात शुक्र असता अशी व्यक्ती ठेंगणी, परंतु जाडजूड असते.

सुंदर व व्यवहारकुशल पत्नी मिळते. स्वतः आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडणारा व कामात कार्यकुशल असतो.

प्रचार, जाहिरात मनोरंजन इत्यादि कार्यात धन मिळते.

शुक्र भरणी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

भरणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात शुक्र असेल तर जातक विदेशात वास्तव्य करणारा असतो.

यज्ञ हवनादि कृत्ये करणारा पुरोहित, मंदिराचा पुजारी किंवा धार्मिक संस्थेचा प्रमुख असतो.

दुसऱ्यांनी दिलेले जेवण घेतो व देवाच्या नावावर लोकांकडून पैसा गोळा करतो.

समाजात त्याला चांगली प्रतिष्ठा असते.

प्रत्येक चांगल्या कार्यात त्याचा सल्ला घेतला जातो.

शनि :- Bharani Nakshatra

1)भरणी नक्षत्रातील सर्व बारा ग्रहांची फले सर्व नक्षत्रातील दुसरे नक्षत्र,भरणी नक्षत्रात शनि असेल व त्यावर रविची पूर्ण दृष्टी असेल तर जातक पशुधन, कुकार्य, किंवा भवन निर्माण आदि कार्यातून पैसा मिळतो परंतु अपघातामुळे एकदा अवयव बाद होणे संभवते.

2) चंद्राजी दृष्टी असेल तर लहानपणापासून वाईट कामे करणारा, व्यसनी, अकर्मण्य, कठोर, गरीब, पैशासाठी गुंड-बदमापाची सेवा करणारा असतो, तो चारित्र्यहीन, कृतघ्न व जीवनात रक्षीणी अडचण उचलणारा असती.

3) बुधाजी दृष्टी असेल तर लबाड, बेईमान, सर्वांच्या तिरस्कारास यात्र दांपत्य सुखाला परखा, वारंवार चोरी करणारा, पॉकेटमार, तडीपार व्यक्ती असतो.

4) गुरुची दृष्टी असेल राज्यशासनात उच्चाधिकारी, धन ऐश्वर्याने युक्त वाहन, घर, नौकरचाकरांनी सुत व सुंदर पत्नी असलेला प्रभावशाली असतो.

5) शुक्राची दृष्टी असेल तर सरकारी कारणामुळे किंवा स्वतःच्या कार्यामुळे दूर देशात भ्रमण करणारा, नीच आचरणाचा, काळ्या रंगाचा, कुरूप, वाईट कृत्ये करणारा असतो.

शनि भरणी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

भरणी नक्षत्रातील सर्व बारा ग्रहांची फले सर्व नक्षत्रातील दुसरे नक्षत्र भरणी प्रथम चरण बाबत माहिती पाहणार आहोत.

भरणी नक्षत्राच्या प्रथम चरणी शनि असेल तर धार्मिक कार्यात सहभागी असतो.

धार्मिक शोधपूर्ण कार्यात त्याची रुचि असते.

व याच कार्यक्षेत्रातून भरपूर पैसा मिळवतो.

बुद्धिमान, कर्मठ व विख्यात महापुरुषांचा सहवासात राहून आदर व मान मिळवतो.

याची वाणी मधुर असते. याच्या डोक्यावर किंवा कपाळावर जखमेचा व्रण असतो.

लहानशी शस्त्रक्रिया डोके मेंदुवर होण्याची शक्यता असते तरी ही डोकेदुखीचा स राहतोच.

शनि भरणी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

भरणी नक्षत्राच्या द्वितीय चरणात शनि असेल तर जातकाची बुद्धी तीक्ष्ण असते.

शासनाचा उच्चाधिकारी असतो. उच्चवर्गीय लोकांचा सल्लागार बनतो. बहुधा त्याचे जीवन सुखी असते.

अधुन मधून ज्वर, फोड-फुटकुळ्यांचा त्रास होतो. महिलांना गर्भपात होणे शक्य असते.

शनि भरणी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

भरणी नक्षत्राच्या तृतीय चरणात शनि असेल तर असा जातक दुसन्यावर अवलंबून राहतो.

याचे दोन वडील किंवा दोन आया असतात.

आई किंवा वडील यापैकी कोणी त्याच्या लहान वयातच मृत्यु पावलेले असतात. त्यामुळे त्याचे जीवन अभावग्रस्त व विनाधार असते.

शनि भरणी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

भरणी नक्षत्राच्या चतुर्थचरणी शनि असेल तर त्याला भाकरीसाठी सुद्धा दुसऱ्याच्या तोंडाकडे पहावे लागते.

स्वभावाने आळशी व अकर्मण्य असतो. लहानपणीच आई-वडील मृत होतात. तारुण्यात पोलीस डिपार्टमेंटमध्ये सामान्य हुद्द्यावर काम करतो,

जर शनिवर मंगळाची दृष्टि असेल तर खुनी, लूटारू, आतंकवादी किंवा चोर बदमाश बनतो.

राहू :- Bharani Nakshatra

राहू भरणी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

भरणी नक्षत्रातील सर्व बारा ग्रहांची फले सर्व नक्षत्रातील दुसरे नक्षत्र भरणी प्रथम चरण बाबत माहिती पाहणार आहोत

भरणी नक्षत्राच्या प्रथमचरणात राहू असेल तर जातक ख्यातिप्राप्त असतो.

मल्लयुद्धात पटाईत असतो. मोठ-मोठाल्या रकमा घेऊन दुसऱ्यांचे रक्षण करतो.

जीवनाच्या अंतिम टप्प्यात तो भांडणतंट्यात अडकतो व त्याचा मृत्यू उपासमारीने होतो. कदाचित कुत्रा चावल्याने किंवा खाज-खरजेमुळेही त्रस्त असतो.

राहू भरणी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :

भरणी नक्षत्राच्या द्वितीय चरणात राहू असेल तर जातकाला श्रेष्ठ सन्मान प्राप्त होतो.

त्याच्याकडे पुरेसे कमावलेले धन असते. वाहतूक किंवा वाहनाच्या व्यवसायात त्याला यश मिळते.

कत्तलखाना किंवा जनावरांच्या मांस कातड्या पासूनही त्याला लाभ होतो. कोड किंवा ‘लाकोडरमा’ सारख्या रोगाने ग्रस्त होणे संभवते.

राहू भरणी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

भरणी नक्षत्रातील सर्व बारा ग्रहांची फले सर्व नक्षत्रातील दुसरे नक्षत्र,

भरणी नक्षत्राच्या तृतीय चरणात राहू असेल तर जातक प्रख्यात कवि किंवा गायक बनतो.

फारसा शिकलेला नसताना ही विद्वान लोकांच्या संगतीमुळे व आपल्या काव्यज्ञानामुळे लोकप्रिय व आदरणीय बनतो.

सैन्याधिकारी किंवा पोलीस खात्यात वरिष्ठ अधिकारी म्हणून ही असे लोक काम करताना आढळतात.

राहू भरणी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

भरणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात राहू असेल तर जातक दुग्धपदार्थ, तेल-तूप इत्यादि द्रव पदार्थाच्या विक्रीतून अर्थ उत्पन्न करतो.

दुसऱ्यांची मदत करणारा, श्रीमंत असतो. आपल्या कार्यात मग्न राहतो. याचे वैवाहिक जीवन सुखी नसते.

केतु :- Bharani Nakshatra

केतु भरणी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

भरणी नक्षत्रातील सर्व बारा ग्रहांची फले सर्व नक्षत्रातील दुसरे नक्षत्र भरणी प्रथम चरण बाबत माहिती पाहणार आहोत

केतु भरणी नक्षत्राच्या प्रथम चरणात असेल तर असा जातक कमळाच्या पानावर भोजन करतो पण याला आयुष्य फार नसते.

केतुवर शुभग्रहांची दृष्टि असेल तर तारुण्यावस्थेपर्यंत जिवंत राहतो.Bharani Nakshatra

शिक्षण व पुण्य कार्यात यांचे जीवन व्यतीत होते.

केतु भरणी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

केतु भरणी नक्षत्राच्या द्वितीय चरणात असेल तर अशी व्यक्ती साठ पासष्ट वर्षापर्यंत जगते.

पाण्याशी संबंधित रोग होतो किंवा पाण्यामुळे मृत्यु होतो.

डोके किंवा शरीरातील अन्य भागावर जखम होते. पडण्याची किंवा अपघाताची भीती असते.

बौद्धिक तणाव, मूर्च्छा, बेशुद्धपणा, अर्धवेडेपणा असणे संभवते. सेना किंवा पोलीसात रोजगार मिळू शकतो.

काहींच्या बाबतीत डोळे कमजोर असतात तर जादू टोणा करण्याची वृत्ति असते.Bharani Nakshatra

केतु भरणी नक्षत्रातील तृतीय चरण फल :- Bharani Nakshatra

भरणी नक्षत्रातील सर्व बारा ग्रहांची फले सर्व नक्षत्रातील दुसरे नक्षत्र केतु भरणी तृतीय चरणात असेल तर

जातक योगशास्त्राचा ज्ञाता, वैद्य किंवा हकिम असतो. दुसऱ्यावर उपचार करण्याची रूचि असते.

जडीबुटींच्या खेरीज तंत्र-मंत्राचेही ज्ञान याला असते. स्वतःला ईश्वराचा सेवक समजून सर्वांची सेवा करतो.

केतु भरणी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

केतु भरणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात असेल तर जातक दीर्घायु असतो. वास्तुशिल्प, घर-मंदिर बनविणारा इंजिनिअर,

अभियंता किंवा कंत्राटदार असतो. फावल्या वेळात संगीत व कलेची साधना करतो.

सोयारीस किंवा कोड यासारखे रोग असतात. अपघात मुळे दात तुटतात किंवा डोके फुटण्याची शक्यता असते.

हर्षल नेपच्यून :-

सर्व नक्षत्रातील दुसरे नक्षत्र भरणी प्रथम चरण बाबत माहिती पाहणार आहोत. भरणी नक्षत्रात हर्षल किंवा नेपच्यून असेल तर जातक चंचलवृत्तीचा,

निष्कारण वेळ वाया घालविणारा, शीघ्रकोपी, रागाच्या भरात वाटेल ते करणारा, विनाकारण देशांतर करणारा असतो.

प्लुटो :-

भरणी नक्षत्रात प्लुटो असेल तर लोकांच्या ‘हो’ ला ‘हो’ म्हणणारा स्वार्थी पिढीजात कामे करणारा,

नवीन काही करण्याची शक्ती नसलेले, धैर्यहीन, विद्या- बुद्धीने कमी, दुसऱ्यांच्या बुद्धिने चालणारा असतो.

दुसऱ्याला पुढे करून आपले काम साधतो. लोकांच्या गोड बोलण्याला फसतो.

माझे मनोगत :-

माझे मनोगत मी सदर करत आहे. भरणी नक्षत्रात जन्मलेल्या स्त्री पुरूषांनी रोहिणी, हस्त, श्रवण, आर्द्रा, स्वाति, शततारका, पुष्य अनुराधा, उत्तरा भाद्रपदा, नक्षत्रात जन्मलेल्या स्त्रीपुरूषांशी मैत्री व्यापार, घेवदेव व विवाह करू नये.

मार्गदर्शन :-

ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा, WHATSAPP GROUP

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,(संतती समस्या निवारण विशेतज्ञ)

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!