Cancer, कर्क रास बारा राशीपैकी चौथी रास होय. म्हणून ४ आकडा लिहिला तरी त्याचा अर्थ कर्क राशी असा प्रचलित आहे. कुंडलीत राशींची नावे न लिहिता आकडेत लिहावयाचे असतात.
म्हणूण प्रत्येक राशीचा अंक पाठ करावा.
१) नक्षत्र :- Cancer
पुर्नवसु नक्षत्राचे शेवटते (चौथे) चरण, पुष्प नक्षत्राची चार चरणे, व आश्लेषा नक्षत्रची चार चरणे मिळून कर्क रास बनते.
खालील तक्त्यात चंद्राचे अंश, नक्षत्र, चरण, राशी स्वामी, नक्षत्रस्वामी, योनी, नडी, गण व नामाक्षर यांची माहिती दिली आहे.
चंद्राचे अंश | नक्षत्र | चरण | नामाक्षर | राशी स्वामी | नक्षत्र स्वामी | योनी | नाडी | गण |
०.० ते ३.२० ३.२० ते १६.४० १६.४० ते ३०.०० | पुनर्वसू पुष्य आश्लेषा | ४ १ ते ४ १ ते ४ | हि, हु,हे,हे,हा डी,डू,डे,डा | चंद्र चंद्र चंद्र | गुरु शनी बुध | मार्जार मेष मार्जार | आद्य मध्य अंत्य | देव देव राक्षस |
कर्क राशीची आकृती खेकड्या सारखी आहे. पृथ्वीवर पडणाऱ्या क्रांती अशंवर अधारित विषुववृत्त रेखेपासून २४ ते २० अंशापर्यंत या राशीची व्याप्ती मानण्यात आली आहे.
२) कर्क राशीची नांवे :-
कलीट, कर्कटक, कर्कट व इंग्रजीत (Cancer) कॅन्सर. ही रास समशरीराची, प्रवासी, स्त्रीराशी, खेकड्याच्या आकाराची धातूसंज्ञक आहे.
या राशीचे निवासस्थान उत्तर दिशेला उपवन, जलाशय, नदी व सागरतीरी, सुरम्य स्थळी, असते.
चंचल स्वभावी, कोमल, सौम्य, चरस्वभवाची बाल्यावस्थेतील, रक्तश्वेतवर्णा, रजोगुणी, जलतत्त्वाने युक्त, रात्रीबली, कफ, प्रकृतीची, शुद्र जातीची,
पृष्ठोदय सम रास आहे या राशीचे निवासस्थान चोलदेश असून तीचा स्वामीचंद्र, वार सोमवार व अंक २ आहे.
शरीरातील हृदय, पोट व फेफडे यावर या राशीचा जंगल आहे. उत्तम प्रकारची धान्ये, फळे, किराणामाल, चहा, चांदी व पारा या वस्तूं अधिपत्य कर्क राशीकडे आहे.
मेदनीय ज्योतिषशास्त्रात चीन, स्कॉटलैंड, न्यूजीलैंड, कॅनडा, रशिया अल्जेरिया, न्यूयॉर्क, सिंप, काठेवाड, कच्छ, गुजरात या देशप्रांताचे प्रतिनिधीत्व या राशीकडे आहे.
३) पुनर्वसु नक्षत्राच्या जातकाची लक्षणे :- Cancer
पुनर्वसु नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती सुखी, भोगविलासी, हसतमुखी, मृदुस्वभावी व विनोदी असतात.
यांना स्वजनांकडून प्रेम व आत्मीयता मिळते. मनोरंजनात दंग असतात. भावुकता व कल्पनाशक्तीचा विकास चांगला होतो.
मित्रात यांचे स्थान मोठे असते. अस्त्र-शस्त्राच्या प्रयोगाविषयी उत्सूक व त्याचा अभ्यास करणारे असतात.
रत्न-आभूषण-सोनेचांदी यांच्याकडे असते.
दान देण्यात पुढाकार घेतात. स्व-वास्तूचे उत्तम सुख लाभते जुन्या चालीरिती किंवा रूढी तोडण्यात हे पुढे असतात.
आपल्या कुटुंबाविषयी चिन्ताग्रस्त राहणे हा यांचा स्थायीभाव असतो.
अलौकिक विषयांचा अभ्यास व अनुभव घेण्यात यांना विशेष रस असतो.
परोपकारी असल्याने आपल्या वंश-परिवार-जाती, स्वराष्ट्र आणि इष्ट मित्राकरिता तनमनधन अर्पण करण्यात मागे पुढे पाहत नाहीत.
देशासाठी बलिदान करण्यात आघाडीवर असतात.
४) पुनर्वसु नक्षत्राच्या महिलांची लक्षणे :-
पुनर्वसु नक्षत्रावर जन्मलेल्या महिला सुशील, धैर्यवान, सहनशील, मनमिळाऊ, प्रियकर व भावावर अलोट प्रेम करणाऱ्या असतात. सुस्वभावी, स्वरूपवान, सर्व भौतिक सुखांनी संपन्न, उच्चाकांक्षी व जिज्ञासू असतात.
शारीरिक रचना रोगग्रस्त असते.
५) पुनर्वसु नक्षत्राच्या व्याधी व याधीमुक्तीसाठी दैवी उपाय :- Cancer
पुनर्वसु नक्षत्राच्या व्याधी व व्याधीमुक्तीसाठी दैवी उपाय – बहुधा पुनर्वस नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्री-पुरूषांना कंबरदुखी, ज्वर, शिरोव्यथा व मलावरोधाचा त्रास असतो.
नक्षत्रस्वामी सूर्याच्या प्रसन्नतेसाठी व कष्टशमनार्थ हळद- कुंकू-गंध, शेवंतीची फुले, अष्टगंध, धूप, साजूक तूपाचा दिवा, पिवळ्या रंगाचे नैवद्य इत्यादि सामग्रीने करावी.
पुनर्वसु नक्षत्राच्या दिवशी अर्कफल ताईतात भरून ते धारण करावे. पाच कुमारी कन्यांना भोजन द्यावे. त्यांना वस्त्र, पुष्प व दक्षिणा द्यावी.
तूप व पिवळ्य तांदुळाच्या बलीने आहुती देऊन खालील मंत्र-पाठ करावा.
“ॐ अदिति सपिता सुपुत्रः विश्वदेवाः अदिति: पंचजना अदितिर्जातमदिति जीतित्वम् ॐ आदित्यै नमः ॥’
या मंत्राचा दहा हजार वेळा जप करावा.
६) पुष्य नक्षत्राच्या जातकाची लक्षणे :-
पुष्य नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती धन संपक्षिने संपन्न असतात. धार्मिक प्रवृत्ती दिसायला मोहक असतात.
स्वभावाने शांत व गंभीर असतात. चंचलता असते. माता-पित्याची विशेष माया यांच्यावर असते.
वाहनसुख उत्तम लाभते. प्रवास व परिभ्रमणाची आवड नसते. परंतु नाईलाजाने खूप प्रवास करावा लागतो, शारीरिक व मानसिक सामर्थ्य चांगले असते.
लोकांच्या दया कृपेवर न जगता पुरूषार्थाने पुढे येतात. राजकारणात चमकतात. कंपनी कामकाज, शेअर खरेदी-विक्रीत चांगला नफा होतो. कामात घाई असते.
७) पुष्य नक्षत्राच्या महिलांची लक्षणे :- Cancer
पुष्य नक्षत्रावर जन्मलेल्या महिला विद्वान, सर्वगुणसंपन्न, उदार स्वभावाच्या, विशाल अंत:करणाच्या, धनसंपन्न, आपल्या पुत्रापासून सुख मिळवणाऱ्या व गृहकृत्यदक्ष असतात.
८) पुष्य नक्षत्राच्या व्याधी व व्याधीमुक्तीसाठी देवी उपाय :-
क्षय, अस्थिशूल, सांधेदुखी, ज्वर, व इतर अडचणीमुळे भाग्येदयात अडथळे निर्माण होतात. पुष्य नक्षत्री जन्मलेल्या व्यक्तींना हा त्रास कायमचा असतो.
या त्रासातून मुक्त होण्यासाठी कुंकू, गंध, कमळपुष्प, तूप व गुग्गुळ, साजूक तूपाचा दिवा, घृतपायस व साखराचा नैवेद्य इत्यादि सामग्रीनें विष्णूस्वरूप देवगुरूचे विधिवत पूजन करावे.
गुरूवारी पिवळ्या वस्त्राचे दान द्यावे. जवसाच्या पीठाचे मोदक करून त्यांचा होमात बली द्यावा.
ॐ बृहस्पते अतियदर्यो अहदि द्युमद्विभति कृतमज्जतेषु । यदुरीयदन सऋतुप्रजाज दस्मास द्रविणधेही चित्रम ॐ बृहस्पतये नमः ॥
या मंत्राचा दहा हजार वेळा जप करावा. जपानंतर तूप व पावसाचे हवन करावे.
९) आश्लेषा नक्षत्राच्या जातकाची लक्षणे :- Cancer
आश्लेषा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती बुद्धीहीन, दुसऱ्याचे न ऐकणाऱ्या व हट्टी असतात.
वाईट कामात रस घेतात. सामान्य व्यसन असते. व्यर्थ भटकंती, विनाकारण लोकांना त्रास देण्याची प्रवृत्ती यांच्यात आढळते.
कामशक्ती प्रबळ असते. स्वतंत्र व्यवसायात पैसा मिळतो. भागीदारीच्या व्यवसायात नुकसान होते. आईचे असते, संसार चालविण्यासाठी अनेक लफडी करावी लागतात.
वकील, इंजिनिअर, फिटर, सोनार, लोहार, डॉक्टर म्हणून यशस्वी होतात.
कोणत्याही कामाची सुरुवात सुख कमी चांगली करतात पण ते कार्य अर्धवट सोडतात.
एकापेक्षा अधिक विवाह करणे, कायदेकानूनचे उल्लंघन करणे, कमनशीब मुलांचा पिता बनणे, राजकारणात निवडून येणे, ही खास वैशिष्ठे नक्षत्रोच्या जातकांची असतात.
१०) आश्लेषा नक्षत्राच्या महिलांची लक्षणे :-
आश्लेषा नक्षत्रावर जन्मलेल्या महिला उग्र स्वभावाच्या, भांडखोर, व कुरूप असतात.
कलह करण्याची संवय असते. परंतु प्रेम निभावतात. स्वतःच्याच विचाराला प्राधान्य देतात.
यांना भाग्यशाली म्हणता येणार नाही. खाण्यापिण्यात यांना कसलेच पथ्य नसते. स्वभावाने चंचल व कृपण असतात.
११) आश्लेषा नक्षत्राच्या व्याधी व व्याधीमुक्तीसाठी दैवी उपाय :-
आश्लेषा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना बहुधा सर्वागपीडा, पायाला त्रास, अंगीकृत कार्यात अनेक अडथळे येऊन अपयश येणे, संतती न होणे, संसारसुख न लाभणे, विवाहास विलंब होणे, इत्यादि व्याधी आश्लेषा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना भोगाच्या लागतात.
या नक्षत्राचा स्वामी सर्प असून सर्पपीडेमुळे हे सर्व भोगावे लागते.
या सर्व आधीव्याधीतून मुक्त होण्यासाठी ज्या दिवशी आश्लेषा नक्षत्र असेल त्या दिवशी सोन्याच्या नागाची प्रतिमा बनवून विधिवत प्राणप्रतिष्ठा करून कुंकू,
अगरगंध, अगस्त, पुष्प, तूप, गुग्गुळ, धूर्म, साजूक तूपाचा दिवा, दुधाची खीरीचा नैवेद्य इत्यादि सामग्रीने दर महिन्याच्या आश्लेषा नक्षत्राच्या दिवशी पूजन करावे.
यथाशक्ती दान करावे. सर्पाकरीता हविदध्योदनाचा बली द्यावा. पूर्ण अनुष्ठानाने हा विधी करावा. सर्पशांती हा विधी त्र्यंबकेश्वर येथे करून घेणे उत्तम.
खालील मंत्राचा १० हजार जप करावा.
ॐ नमोस्तु सर्पेभ्यो ये के च पृथिनी मनुः ये अन्तदिक्षेदिवितेभ्यः सर्पेभ्यो नमः ॥ ॐ नमो केशवराय नमः ॥
१२) कर्क राशीच्या व्यक्तीचे भविष्य :- Cancer
कर्क राशीच्या व्यक्ती शास्त्र व कलेत प्रवीण असतात. चांगले व्यापारी असतात. उंची सामान्य, फुले व सुगंधी द्रव्यांची आवड त्यांना असते. धन संपत्तीचे सुख यांना मिळते.
भरभर चालण्याची सवय, स्त्रियात विशेष रस घेणारे, कंबर मोठी, स्वभाव कारस्थानी, पुत्रसुख कमी, स्वतःची वास्तू असते. वैवाहिक जीवन सुखी परंतु विलासी प्रवृत्तिमुळे आर्थिक दृष्ट्या अडचणीत येतात. जलक्रिडेचा आनंद घेतात.
१३) ‘जातकाभरण चंद्र’ निर्याणाध्याया प्रमाणे :-
परोपकारी, स्त्री प्रेमी, बाल्यावस्थेत आर्थिक दृष्टिने कमकुवत तर प्रौढावस्थेत आर्थिक स्थिती चांगली असते. आयुष्यमान सामान्यत: कमी प्रतीचा असतो. शिरोव्यथा व मस्तक रोगाने त्रस्त होतात.
शरीरातील उजव्या भागाला आगीचे भय असते. मित्रपरिवार मोठा असतो. ज्योतिषविषयक कार्यात यश मिळते. आईवडिलांविषयी आदराची भावना असते.
जन्माच्या व तिसऱ्या वर्षी गुप्तेंद्रिय व जननेंद्रियाचा त्रास सहन करावा लागतो. कितीसाव्या वर्षी विषारी जंतूचा उपद्रव होतो. ३२ व्या वर्षी अनेक प्रकारची शरीरपीडा भोगावी लागते.
आयुष्ययोग पंच्याऐंशी ते शहाण्णव असतो.
शास्त्रानुसार माघ महिना, शुक्ल पक्षातील नवमी व वार शुक्रवार घातक असतो. कर्क राशीच्या महिला कफ व वायु प्रकृतीच्या असतात. किडकिडीत किंवा स्थूल शरीराच्या असतात.
सामाजिक व कौटुंबिक जीवन यशस्वी असते. दुसऱ्यांनी काढलेली उणीदुणी यांना सहन होत नाही. पतीची वर्तणूक चांगली नसते. यांना मुली जास्त होतात.
१४) कर्क राशीची अनुभव सिद्ध फले :-
कर्क राशीचा चेहरा व शरीराची ठेवण आकर्षक व इतरांना मोहून घेणारी असते. आळस, सर्दी-पडसे, जलभय, व सांसारिक जीवनात खूप संघर्ष करावा लागतो.
प्रत्येक कामात घिसाडघाई, पांढऱ्या व नीळ्या (आकाशी) रंगा विषयी आकर्षण असते. लेखन व वकृत्त्वकलेत पारंगत, गोडबोले, रागीट, मदिरा-मांस भक्षक करणारे असे महाभागही कर्क राशीचे आढळतात.
स्त्रियांकडून यांना खूप फायदा होतो. वैवाहिक सबंधाखेरिज अनेक स्त्रियांशी गुप्त संबंध असतो. स्वभाव व विचार स्त्रियांसारखेच असतात. कर्क राशीच्या महिला व्यभिचारी व गुप्तपणे वेश्या व्यवसाय करताना आढळतात.
डॉक्टर, इतिहासतज्ञ, राजकीय पुढारी, मंत्री, प्राध्यापक, नौसेनेचे कॅप्टन, राज्यकर्मचारी, भाषा विशारद व अद्भूत वस्तुसंग्रह करणारे, वकील, असे महाभाग कर्क राशीचे असतात.
बहुधा दोन व्यवसायातून अर्थप्राप्ती होते. तोंड येणे, मधुमेह, छातीचे रोग मुरूम, वगैरेंचा त्रास भोगावा लागतो.
प्रतिकूल :-
दर महिन्याच्या ६, ९, १८, २७ या तारखा,
दरवर्षी जानेवारी महिना,
बुधवार
काळा रंग काळ्या रंगाची वस्त्रे इत्यादी. मिथुन, तुळ व कुंभ राशीच्या व्यक्ती, कर्क राशीच्या लोकांना प्रतिकूल असतात.
१५) कर्क राशीच्या व्यक्तींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचा काळ :-
कर्क राशीच्या व्यक्तींच्या बगलेत किंवा पायावर जखमेचा व्रण किंवा काळा तिळ असतो. कोणत्याही वर्षी फेब्रुवारी महिना व दर महिन्याच्या ७, १९, २८, ३० या तारखा व प्रत्येक सोमवार या दिवशी शुभ व महत्त्वाची कामे केल्यास ती यशस्वी होतील.
१८ ते २३ व २७ ते ३५ या वयोवर्षात विवाह योग येईल. जन्मापासून एकोणीसल्या वयापर्यंत खूप मेहनत करावी लागेल. शिक्षण पूर्ण होईल. २० व्या वर्षी नोकरी किंवा व्यवसायाचा प्रारंभ होईल.
वयोवर्षे २१ ते ३६ व्यापार, नोकरी, कृषी, कला व्यवसायात प्रगती होऊन भाग्योन्नती होईल. ३७ ते ५२ पैशाची चणचण राहील. कोर्टकचेरी, विशेषतः फौजदारी केस,
कोणाकडून फसवणूक, धंद्यात नुकसान, अशा अडचणी येतील. ५३, ५४,५५ शारीरिक त्रास होईल. ५६ ते ६९ सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतील. अंतिम काळ सुखाचा जाईल.
१६) कर्क व्यक्तींसाठी विशेष उपासना :-
कर्क रास किंवा कर्क लग्राच्या व्यक्तींना बहुधा शाकिनीजन्य उपद्रवांचा त्रास
होतो. मंदाग्नि, हृदयरोग, मधुमेह, डोकेदुखीचा त्रासही होतो. या व्याधीतून मुक्त होण्यासाठी व सर्व प्रकारची सुखप्राप्ती व्हावी या साठी वस्तूदान व तंत्रोक्त पद्धतीने शाकिनीचे पूजन करावे. खालील मंत्र रोज १०८ वेळा म्हणावा.
ॐ हिरण्यगर्भाय अव्यक्तरूपिणे नमः ।।’
गणपतीची उपासना ही अवश्य करावी.
मार्गदर्शन :-
ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!
आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.
(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
अधिक माहिती साठी संपर्क :-
श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,(संतती समस्या निवारण विशेतज्ञ)