Gemini, मिथुन राशीची संपूर्ण माहिती,

Gemini
श्रीपाद गुरुजी

Gemini, मिथुन रास बारा राशीपैकी तिसरी रास होय. म्हणून ३ आकडा लिहिला तरी त्वाचा अर्ध मिथुन राशी असा प्रचलित आहे. कुंडलीत राशींची नावे न लिहिता आकडेच असतात, म्हणून राशीचा अंक पाठ करावा.

१) नक्षत्र :- Gemini

मृगशीर्ष नक्षत्राचे शेवटचे दोन चरण, आर्द्रा नक्षत्राचे चार चरण व पुनर्वसु नक्षत्राचे पहिले चरण मिळून मिथुन रास बनते.

खालील तक्त्यात चंद्राचे अंश, नक्षत्र, चरण, राशीस्वामी, नक्षत्रस्वामी, योनी, नाडी, गण व नामाक्षर यांची माहिती देत आहे.

चंद्राचे अंशनक्षत्रचरणनामाक्षरराशी स्वामीनक्षत्र स्वामीयोनीनाडीगण
० ते ६.४०
६.२० ते २०.००
२०.०० ते ३०.००
मृगशीर्ष
आद्रा
पुनर्वसू
३,४,
१ ते ४
१ ते ३
का, की
कु,घ,ड,छ,
के,को,हा
बुध
बुध
बुध
मंगळ
राहू
गुरु

सर्प
श्वान
मार्जार
मध्य
आद्य
आद्य
देव
मनुष्य
देव
तक्ता

मिथुन राशीची आकृती नवजात जुळ्या मुलासारखी किंवा श्रीपुरूष जोडप्याच्या आकारासारखी आहे.

पृथ्वीवर पडणाऱ्या क्रांतीअंशावर आधारित विषुववृत्त रेखेपासून २४ अंशार्पयत या राशीची व्याप्ती मानण्यात आली आहे.

२) मिथुन राशीची नांवे :-

द्वन्द, नृयग्म, यम, युग, तृतीय व इंग्रजीत Gemini (जेमिनी) ही रास सम शरीराची, भोगी, क्रूर, चंचल व शांत, द्विस्वभावी, बालअवस्था असलेली, हरितवर्णाची, सत्त्वगुणी, वायुतत्त्वाची,

रात्रीबली, ग्रामचारी, वातप्रधान, त्रिधातु प्रकृतीची, वैश्य जातीची, शीर्षोदय, विषमराशी, वक्तृत्व बुद्धी प्रदायिनी मानली जाते.

या राशीचा निवास पश्चिम दिशा, रति, रतिविहार भूमि, द्युतक्रिडास्थाने या ठिकाणी आहे. या राशीचा स्वामी बुध व अंक ५ आहे.

शरीरातील वक्षस्थळ, स्तन, खांदा व भूजा, हात, फेफडे आणि श्वास यावर या.

राशीचा अंमल आहे. नृत्यगायन, वाद्य, शिल्प, विमानप्रवास व नपुंसक व्यक्ती यांचे स्वामीत्व या राशीकडे आहे.

तसेच ज्वारी, बाजरी, मूंग, शेंगा, कापूस, सरकी, ज्यूट, बारदाना। केशर-कस्तूरी, हळद, कुंकू, कागद, संपादन-प्रकाशन, शिल्पकला यांचेही स्वामीत्व या राशीकडे आहे.

मेदिनीय ज्योतिषशास्त्रात यु. एस. ए. उत्तर आफ्रिका व वेल्स या देशांचे प्रतिनिधीत्व या राशीकडे आहे.

३)मृगशीर्ष नक्षत्राच्या जातकाची लक्षणे. :- Gemini

मृगशीर्ष नक्षत्रावर जन्मलेत्या व्यक्ती गंभीर, वाक्पटू, चंचल आणि स्वाभिमानी असतात.

यांना अपमान खपत नाही. दुसऱ्यांच्याविषयी मनात अढी ईर्ष्या असते.

आपल्या जीवनात नाव मिळवून उच्च स्थान मिळवतात.

मृगनक्षत्र नक्षत्राच्या व्यक्ती शस्त्रकलेत पारंगत असतात. नम्र स्वभाव व आदरणीय व्यक्तीच्या बाबतीत आदराची भावना यांच्यात असते.

राज्य पक्षाकडून अनुकूलता प्राप्त होते. मंत्र्याशी मैत्री असते. धार्मिक वृत्तीचे व सन्मार्गावर चालणारे असतात.

भोगविलासात विशेष रस यांना असतो.

नवनवीन अनुभवांचा संग्रह यांच्याकडे असतो.

स्वभावाने भावूक असल्याने चटकन प्रभावित होतात.

पैशाची बचत करण्याची कला यांना चांगली अवगत असूनही आवश्यक बाबीसाठी खूप खर्च अनेक विचारांचे अनुयायी असतात.

व आपले विचार प्रकट करताना हाव-भाव करण्याची सवय असते. आपल्या प्रगतीसाठी निरंतर झटण्याची वृत्ती असते.

आंतरिक प्रेरणेमुळे सामान्यपणे भाग्यशाली असतात. मनोवैज्ञानिकाच्या रूपात प्रसिद्धी यांना मिळते.

४)मृगशीर्ष नक्षत्राच्या महिलांची लक्षणे. :-

मृगशीर्ष नक्षत्राच्या महिलांची लक्षणे मृगशीर्ष नक्षत्राच्या महिला काहीशा भित्र्या स्वभावाच्या परंतु चतुर पतिभक्तीपरायण,

चंचल, हसतमुखी, रसिक व मनोहर, विद्वान, पुत्रवती, बडिलांचे आज्ञांकित, सुखसंपन्न, खर्चिक स्वभावाच्या,

माता-पिताज्ञांकित असतात.. श्रेष्ठजनाविषयी आदराची भावना यांच्यात असते. काटकसरी दुसन्यावर आसक्त असतात.

५) मृगशीर्ष नक्षत्राच्या व्याधी व व्याधीमुक्तीसाठी दैवी उपाय :- Gemini

मृगशीर्ष नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीच्या शरीरात बहुधा आलटून पालटून वायु- पित्त-कफ हे विदोष निर्माण होऊन त्रास होतो. अर्धागवायू, रक्तचाप व इतर तत्सम रोगांपासून त्रास होण्याची शक्यता असते.

या दोष परिहारार्थ मृग नक्षत्राच्या दिवशी श्वेतचंदन, गंध, नीरजपुष्प, दशागंधूप, साजूक तूपाचा दिवा व पायस आणि मालपुआ (आपूप) च्या नैवेद्याने चंद्राची पूजाअर्चा करावी. एकदा सवत्सधेनुचे दान करावे.

दर मृगनक्षत्राच्या दिवशी दही-भाताचे दान द्यावे. ‘जयन्तीमूळ’ ताईतात घालून धारण करावे. खालील मंत्राने दही व दुधाने हवन करून दही-भात व साखरेचा बली द्यावा.

ॐ इममदेवा असफल गं गुबच्वं महतेक्षेत्राय महते जैष्ठवाय महते जानराज्यायेन्द्रस्योन्द्रियाय । ममुष्य पुत्रमुष्ये पुत्रस्यै विषएववो भी राजासोमो स्मांक ब्राह्मणाना गुं राजा ॐ चंद्रमसे नमः ॥

या मंत्राचा पांच हजार जप करणेही अवाश्यक आहे.

६) आर्द्रा नक्षत्राच्या जातकांची लक्षणे :-

आर्द्रा नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्ति कृतघ्न असतात. दुसऱ्यांनी त्यांच्यावर केलेल्या उपकारांची जाणीव ते ठेवीत नाहीत. हट्टी आणि मूर्ख, सांपत्तिक स्थिती बेताचीच असली तरी मानसिक स्थिती उत्तम असते.

व्यावहारिक ज्ञानामुळे अडचणीतूनही ते आपला मार्ग काढू शकतात.

दिसायला चांगले असले तरी शारीरिक भोग कमी मिळतो. स्वजनांजे प्रेम याना मिळते. पण यांच्या चिडचिड्या स्वभावामुळे ममत्त्व त्यांना मिळत नाही. कर्तव्यपरायणता यांच्यात नसते. कोणतेही काम करण्यात पाई यांना नडते.

भाग्योन्नतीत अनेक अथडळे येतात पण परिश्रमपूर्वक त्यातून मार्ग काढण्याचा जन्मजात गुण यांच्यात असतो. नवनवीन उद्योग व पैसा मिळवण्याची साधने यांना आपोआप उपलब्ध होतात, आपले राहते घर व कुटुंबाविषयी यांना जास्तीत जास्त काळजी असते.

‘चेहन्यावर एक व मनात एक’ अशी वृत्ती असल्याने यांना ओळखणे अवघड जाते. दुसऱ्यांची नक्कल करण्यात हुशार, वक्तृत्व चांगले हा यांचा स्थायीभाव आहे. वारंवार विचार व घंदे बदलण्याची वृत्ती असते.

७) आर्दा नक्षत्राच्या महिलांची लक्षणे :- Gemini

विरूद्ध आचरण, चेहऱ्यावर सोंदर्याचा अभाव, वाद-विवाद व कलह करण्यात अग्रेसर, बदला घेल्याची भावना आर्द्रा नक्षत्रावर जन्मलेल्या महिलांत असते. अत्यंत कठोर हृदयाच्या, दुसऱ्याचे न ऐकणाऱ्या (अहंकारी, कृतघ्न) अशा, आर्दा नक्षत्रावर जन्मलेल्या आढळतात.

८) आर्द्रा नक्षत्राच्या व्याधी व व्याधी मुक्तीसाठी देवी उपाय :-

आर्द्रा नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्री पुरुषांना वायु-पित्त-कफ या त्रिदोषजन्य निर्मित रोगामुळे शारीरिक त्रास होतो. ज्वर, अनिद्रा, सर्वांगपीटा, (अंगदुखी) क्लेशकारक ठरतात.

या दोषांच्या परिहारार्ध श्री शंकराची दैनिक आराधना, श्वेतचंदन, गंध, सुवासिक फुले, दशांगधूप व साजूक दिवा इत्यादि सामग्रीने पूजन करावे. पायसोदन नैवद्याद्वारे शिवपूजा करावी. ‘अश्वत्थमूळ धारण करावे. खालील मंत्राचा पाठ तूप व मधाच्या आहुतीने करावा.

ॐ नमस्ते रुद्रमष्यव उतो न दूषवे नमःबाहुभ्यामुनते नमः ॐ रुद्रायनमः शिवाय नमः ॥

शिव शंकर कृपाप्राप्ती व दैनिक कल्याणासाठी या मंत्राचा जप दहा हजार वेळा करावा.

आर्द्रा नक्षत्राच्या बालकाच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नये. साधारण रोग सुद्धा असाधारण बनतो व तो लवकर बरा होत नाही.

९) पुनर्वसु नक्षत्राच्या जातकाची लक्षणे :- Gemini

पुनर्वसु नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती मुखी, भोगविलासी, हसतमुखी, मृदुस्वभावी व विनोदी असतात. यांना स्वजनांकडून प्रेम व आत्मीयता मिळते. मनोरंजनात दंग असतात.

भावुकता व कल्पनाशक्तीचा विकास चांगला होतो. मित्रात यांचे स्थान मोठे असते. अत्र शस्त्राच्या प्रयोगाविषयी उत्सूक व त्याचा अभ्यास करणारे असतात. रत्न आभूषण सोनेचांदी याच्याकडे असते.

दान देण्यात पुढाकार घेतात. स्व-वास्तूचे उत्तम सुख लाभते जुन्या चालीरिती किंवा रूढी तोडण्यात हे पुढे असतात. आपल्या कुटुंबाविषयी चिन्ताग्रस्त राहणे हा यांचा स्थायीभाव असतो.

अलौकिक विषयांचा अभ्यास व अनुभव घेण्यात यांना विशेष रस असतो. परोपकारी असल्याने आपल्या वंश परिवार जाती, स्वराष्ट्र आणि इष्ट मित्राकरिता तनमनधन अर्पण करण्यात मागे पुढे पाहत नाहीत. देशासाठी बलिदान करण्यात आघाडीवर असतात.

१०) पुनर्वसु नक्षत्राच्या महिलांची लक्षणे :-

पुनर्वसु नक्षत्रावर जन्मलेल्या महिला सुशील, धैर्यवान, सहनशील, मनमिळाऊ, प्रियकर व भावावर अलोट प्रेम करणाऱ्या असतात. सुस्वभावी स्वरूपवान, सर्व भौतिक सुखांनी संपन्न, उच्चाकांक्षी व विज्ञासू असतात. शारीरिक रचना रोगग्रस्त असते.

११) पुनर्वसु नक्षत्राच्या व्याधी व व्याधीमुक्तीसाठी देवी उपाय :- Gemini

बहुधा पुर्वजन्मलेल्या श्री-पुरुषांना कंबरदुखी, ज्वर,शिरोव्यथा व मलावरोधाचा त्रास असतो. नक्षत्रस्वामी सूर्याच्या प्रसन्नतेसाठी व कष्टशमनार्थ हळद- कुंकू-गपे, शेवंतीची फुले, अष्टगंध, धूप, साजूक तूपाचा दिवा, पिवळ्या रंगाचे नैवद्य इत्यादि सामग्रीने करावी.

पुनर्वसु नक्षत्राच्या दिवशी अफलाईन भरून ते धारण करावे. पाच कुमारी कन्यांना भोजन द्यावे. त्यांना बस, पुष्प व दक्षिणा द्यावी. तूप व पिवळ्य तांदुळाच्या बलीने आहुती देऊन खालील मंत्र पाठ करावा.

‘ॐ अदिति ‘धौरदितिरस्तरिक्षमदितिर्माता सपिता सुपुत्रः विश्वदेवाः अदिति: पंचजना अदितिर्जातमदिति जीतित्वम् ॐ आदित्यै नमः ।।

‘ या मंत्राचा दहा हजार वेळा जप करावा.

१२) मिथुन राशीच्या व्यक्तींचे भविष्य :-

मिथुन राशीच्या व्यक्तींच्या हातावर मत्स्याकृती आढळते. कामकलेत पारंगत, सिया यांच्यावर मुग्ध असतात. बोलण्यात अडखळतात.

सुंदर चेहऱ्याचे, तीक्ष्ण नाकाचे, बुद्धिवान, विचारवंत, नृत्य-संगीतात रस घेणारे, घरकोंबडे असे मिथुन व्यक्ती आढळतात. भोगविलासात खूप खर्च करणारे, धनसंग्रहाचा विशेष योग नसलेले, दुसऱ्यांच्या मनाचा ठाव घेणारे मिथुन महाभाग असतात.

मिथुन महिलांची शरीराची ठेवण मध्यम बांध्याची, बुद्धीची उंची कमी, गोड बोलून इतरांना मोहवणाऱ्या, चंचलनेत्री अशा आढळतात. गोडपदार्थाची आवड असते.

मिथुन पुरुषांना द्विभार्या योग संभवतो. संतती कमी असते.

१३) जातकाभरण चंद्रक निर्याणप्रमाणे :- Gemini

मिथुन राशीच्या व्यक्ती आपल्या गावात, समाजात आणि कुटुंबात अधिक शिकलेल्या असतात, सुशील स्वभाव, बंचलनेत्र, आवश्यकतेपेक्षा कमी बोलणाऱ्या असतात. गोड पदार्थांची आवड असते. भोगविलासात निमग्न राहतात.

व्यावर्षी झाडावरून पडण्यची शक्यता असते. सोळाव्या वर्षी शत्रूपीडा होते. अठराव्या वर्षी कर्णपीडा होते. वीसाव्या वर्षीविशेष त्रास होतो, रोगवाधा, शत्रुपीडा, यामुळे मृत्युसम पीडा अडतीसाव्या वर्षी होते.

विलासी आणि भोगी असून सुद्धा दानपुण्यात आस्था असते. शास्त्र पारंगत व कलानिपूण असतात.

आयुष्ययोग साधारणपणे ऐंशी वर्षाचा राहील. वैशाख महिना व प्रत्येक आठवड्याचा बुधवार यांना चांगला जात नाही.

१४) मिथुन राशीची अनुभवसिद्ध फले :-

मिथुन राशीचे स्त्री-पुरूष वाचाळ, मेहनती व साधे जीवन जगण असतात. आयुष्यात बरेच चढाव-उतार बघावे लागतात. रसिक स्वभाव, तीक्ष्णबुद्धि असते. बेहयावर किंवा मस्तकावर बखमेचा डाग किंवा तिढळतो.

कर्ज घेण्याण्यात वाकबगार असतात. कागद, कापड, लेखनसाहित्य, सौंदर्यप्रसाधने, खाद्यपदार्थाच्या व्यापारात फायदा होतो. पुढारी, कवी, लेखक, संपादक, डॉक्टर, ज्योतिषी, प्रोफेसर यापैकी व्यवसाय नोकरी करताना आढळतात.

नोकरीत खोटे आरोप येतात. कोणतीही गोष्ट गुप्त ठेवणे यांना जमत नाही. पत्नीसुख बागले लाभते परंतु संततीचे सुख मिळत नही. हिरवा रंग यांना प्रिय असतो. सीकडून फासवणूक होण्याची दाट शक्यता असते.

प्रतिकूल :-

मिथून व्यक्तींना दरवर्षी डिसेंबर महिना,

दर महिन्याच्या १९.१६,२६,२८ या तारखा,शनिवार

पिवळा रंग पिवळ्या रंगाचे कपडे वगैरे,

वृषभ, कन्या, व मकर राशींच्या व्यक्ती प्रतिकूल असतात.

१५) मिथुन व्यक्तींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचा काळ :-

वयोवर्षे १९ ते २६ या काळात विवाहयोग असतो.

जन्मापासून क्योवर्षे ६ पर्यंत आणि २१ ३२ व्या वयापर्यंत भाग्यात अडथळे येण्याचा व आसाचा कालखंड जाईल.

वयोवर्षे ७ ते २० हा काळ चांगला जाईल. २१ वे वर्ष अडचणीचे असेल तरी भाग्योदयास प्रारंभ होईल.

३३ ते ४६ हा कालखंड जीवनातील अत्यंत प्रगतीचा कालखंड जाईल. सट्टा, लॉटरी यातूनही पैसा मिळेल.

४७ ते ५६ हा कालखंड त्रासाचा राहील. या काळात, राजभय, पत्नी वसंततीकडून त्रास संभवतो. व्यवसाय व नोकरीतही खूप त्रास होईल. हगवणीच्या विकाराने त्रस्त रहाल.

५७, ५८, ६१ व ६८ ही क्योवर्षे त्रासदायक आहेत. आयुष्ययोग, साधारणतः शहात्तर वर्षांचा राहील.

१६) मिथुन व्यक्तींसाठी विशेष उपासना :-

मिथुन रास किंवा लग्राच्या व्यक्तींना देवी कोपाचा त्रास चांगलाच जाणवतो.

कंबरदुखी, मानसिकभ्रम, फिटस् येणे, दुर्घटना, दुःस्वप्न यामुळे ही त्रास होतो. अशा व्यक्तींनी दररोज गुग्गुळ घरात जाळवा.

मारुतीचा मंत्र म्हणावा ॐ क्लीं कृष्णाय नमः।’ हा मंत्र रोज एकशे आठ वेळा जपावा.

खालील ‘शिवपंचाक्षर’ स्तोत्राचा रोज बारा वेळा पाठ करावा. सोयीने सकाळ किंवा सायंकाळची वेळ ठरवून घ्यावी. ठरलेल्या वेळीच पाठ करावा.

शिववंचाक्षर स्तोत्र :-

नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्यास शुद्धाय दिगम्बराय तस्मै ‘ने’ काराय नमः शिवाय ॥

मन्दाकिनी सलिलचन्दनचर्चिताय नन्दीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मन्दारपुष्प बहुपुष्य सुपजिताय तस्मै ‘म’ कराय नमः शिवाय ॥

शिवाय गौरीवदनाब्जवृन्द सूर्याय दक्षाध्वर नाशकाय। श्रीनीलकण्ठाय वृषभध्वजाय तस्मै ‘शि’ काराय नमः शिवाय ॥

वसिष्ठ कुम्मोद्भवगौतमार्य मुनिन्द्रदेविचिंत शेखराय । चन्द्रार्क वैश्वान्तर लोभनाय तस्मै ‘वा’ कराय नमः शिवाय ॥

यज्ञस्वरूपाय जलाधराय पिनाहस्ताय सनातनाय । दिव्याय देवाय दिगम्बराय तस्मै ‘य’ कराय नमः शिवाय ॥

पञ्चाक्षरमिदं पुण्यं यः पठेच्छिक्तांसिधो शिवलोक व्याप्नेति शिवेत्ः सह मोदते ॥

मार्गदर्शन :-

‘फिरोजा’ रत्न चांदीच्या अंगठीत करंगळीत धारण करावे.

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,(संतती समस्या निवारण विशेतज्ञ)

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!