Horoscope of Marriage Time, विवाह मुहूर्ताची कुंडली,

Horoscope of Marriage Time
श्रीपाद गुरुजी

Horoscope of Marriage Time, विवाह संस्कारात एक प्रमुख क्रिया असते- ‘हस्तमेलाप’ ! राजस्थानी भाषेत या क्रियेला ‘हथलेवो’ म्हणतात. हस्तमेलापच्या वेळेची कुंडली तयार करण्यात येते. या कुंडलीत स्थानापत्र झालेल्या ग्रहांचा विचार दंपत्तिच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. ही कुंडली तयार केल्या शिवाय आणि त्यांतील शुभ-अशुभ ग्रहयोग पाहिल्याशिवाय हस्तमेलापाचा शुध्द मुहूर्त काढता येत नाही. हस्तमेलापक कुंडलीत कशावरून कोणत्या गोष्टीचा विचार केला जातो हे या प्रकरणात देत आहे.

लग्न स्थान :- Horoscope of Marriage Time

१) हस्तमेलापाच्या वेळी लग्नात रवि असेल तर वैधव्याचे कारण बनतो.

लनी चंद्र असेल तर कन्याचे आयुष्य भवरुप बनते.

लग्नी मंगळ असेल तर वधूवरांच्या – उभयताच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो.

या ठिकाणी गुरु शुक्र असतील तर वधुवरांना ते दीर्घायुष्य देतील. लग्नी शनि असेल तर दारिद्र्य देतो.

लग्नी ‘राहू केतु’ असतील तर संतनोत्त्पत्तित अवरोधक बनतात.

द्वितीय स्थानी :-

२) द्वितीय स्थानी पापग्रह असतील तर विपत्ति आणि दुःखाचा संकेत ते देतात.

द्वितीय स्थानी चंद्र असेल तर संतती होते. द्वितीय स्थानी बुध-गुरु असतील

तर भरपूर पैसा देतील द्वितीय स्थानी शुक्र असेल तर हा शुक्र वधूला सुख

मिळवून देईल व तिचे वैधव्यापासून संरक्षण करील.

तृतीय स्थानी :-

३) तृतीय स्थानी असलेले ग्रह वधुवराला आनंद, सुख व वैभव देतील.

चतुर्थ स्थानी :-

४) चतुर्थस्थानी असलेला रवि संकटांना निमंत्रण देतो.

चतुर्थस्थानी मंगळ गरीब बनवतो.

या स्थानी बुध सुखानंद देतो.

चतुर्थस्थानी गुरु वैधव्यापासून दूर ठेऊन जीवन सुखी बनवतो.

चतुर्थस्थानी शुक्र पत्नीला नम्र व सद्गुणी बनवतो.

यास्थानी शनि संकट- प्रसंग उभे करतो.

चतुर्थस्थानी राहू केतू पत्नीला वाईट मार्गाला लावतात.

पंचम स्थानी :-

३) पंचमस्थानी शुभ ग्रह असतील तर बरेच पुत्र होतात.

पंचमस्थानी रवि मंगळ असतील तर संततीच्या जीवाला धोका उत्पन्न होतो.

पंचमस्थानी राहू केतु असतील तर गंभीर व भयंकर रोगाचे कारण बनतात.

पष्ठम स्थानी :-

६) पष्ठस्थानी चंद्र असेल तर वैधव्याचे कारण तो बनतो.

षष्ठस्थानी असलेला बुध विवाहितांना बरोबर ठेवण्यात हातभार लावतो.

षष्ठस्थानातील राहू विवाहोत्सुकाला नेहमी दारिद्रयात ठेवतो. षष्ठस्थानातील इतर ग्रह संतती देतात.

सप्तम स्थान :-

७) विवाहाच्या हस्तमेलापाच्या वेळी त्या वेळच्या कुंडलीत सप्तमस्थानात कोणताही ग्रह असता कामा नये.

जर असेल तर त्याचा परिणाम खालीलप्रमाणे होतो –

अ) सप्तमस्थानी गुरु असेल तर पत्नी आपल्या पतिचा अनादर करते.

आ) सप्तमस्थानी बुध असेल तर धार्मिक कार्याची अवहेलना होते..

इ) सप्तमस्थानी शुक्र असेल तर वाईट वर्तणुक असते.

ई) सप्तमस्थानी मंगळ असेल तर तो स्त्रीला व्याभिचारी बनवतो.

3) सप्तमस्थानी केतु असेल तर स्त्रीला उन्माद, हिष्टिरिया, वेडेपणा देतो..

ऊ) सप्तमस्थानी रवि असेल तर वैधव्याचा काळ जवळ आणतो.

ए) सप्तमस्थानी राहू असेल तर दारिद्रय येते.

ऐ) सप्तमस्थानी चंद्र असेल तर सर्व प्रकारची दुःखे उभी राहतात.

वरील परिणाम होऊ नये म्हणून ‘हस्तमेलाप कुंडली’त सप्तमस्थान रिकामे असावे.

तेथे कोणताही ग्रह असू नये.

अष्टम स्थानी :-

८) अष्टमस्थानी रवि, शनि, मंगळ हे तीन ग्रह शुभ फले देतात

याशिवाय बाकीचे ग्रह अष्टमस्थानात वाईट फले देतात.

नवम स्थान :- Horoscope of Marriage Time

९) नवमस्थानी राहू, मंगळ व शनि खेरिज बाकीचे सर्व ग्रह आशा-आकांक्षा यशस्वी करतात.

दशम स्थान :- Horoscope of Marriage Time

१०) दशमस्थानी मंगळ असेल तर ते मृत्यूला निमंत्रण समजावे.

दशमस्थानी रवि क्षयरोग उत्पन्न करतो. दशमात शनि व्याभिचारी बनवतो.

दशमात राहू वैधव्य देतो. इतर ग्रह दशमात असतील तर चांगली फले मिळतात.

एकादश स्थान :- Horoscope of Marriage Time

११) एकादशस्थानातील ग्रह पति पत्नी उभयंतांना सुखी बनवतात.

१२) व्ययस्थानी बुध, गुरु व शुक्र असतील तर हे ग्रह मंगल कारक फले देतात.

हस्तमेलाप कुंडलीत लग्नी गुरु, षष्ठस्थानी रवि, अष्टमस्थानी शुक्र आणि दशमस्थानी चंद्र असेल तर

वधुवर उभयंताना वाहनसुख, फर्नीचर, धनधान्य, वस्त्राभूषणे व विपुल संपत्ति प्राप्त होते.

हस्तमेलाप कुडलीत गुरु ८वा, चंद्र चवथा अथवा सातवा,

रवि सहावा व शनि – मंगळ तीसरे असतील तर दंपत्ति दीर्घायुषी बनते व

त्यांना पुत्रपौत्रादिचे सुख त्यांचे जीवन संपन्न व चांगल्या आचरणात जाते.

त्यांच्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण होतात.

३. ६.८, ११ मा स्थानी पापग्रह असतील आणि केंद्र- त्रिकोणात शुभ ग्रह असतील

आणि एकादश स्थानाचा स्वामी उच्चीचा असेल तर पतिपत्नी पुत्रवान, धनवान व आयुष्यात बनवतात.

रवि दशमात, शनि षष्ठात, गुरु नवमात आणि बुध व्ययात असेल तर

दंपत्ति दीर्घायु बनते आणि सुख भोगते. पुत्रपौत्रादिंसह सर्वांना आरोग्य चांगले लाभते.

गुरु :- Horoscope of Marriage Time

गुरु, षष्ठस्थानी पापग्रह आणि केंदस्थानी वुध किंवा शुक्र असेल तर हा योग

दंपत्तिला धनधान्य, संपत्ति आणि वाहनसुख देतो.

बुधयुक्त, एकादशात रवि, दशमस्थानी मंगळ आणि पंचमात गुरु असेल तर दंपत्तिचे पुत्र श्रीमंत होतात आणि सुखी जीवन जगतात.

लग्नी शुक्र बुध व ३,६,१०,११ या स्थानी पापग्रह असतील आणि

द्वितीय स्थांनी चंद्र असेल दंपत्तिचे पुत्र श्रीमंत, सुखी व दीर्घायुषी होतात.

विवाहाचा मुहूर्त, हस्तमेलापचा मुहूर्त वरील कसोटया लावून काढले व त्याप्रमाणे

काटेकोरपणे वेळ साधली तर पतिपत्नीच्या भविष्यातील संभाव्य धोके दूर होतील,

घटस्फोटाचे कारणच रहाणार नाही व नवदंपत्तिचा संसार सुखाचा होईल. Horoscope of Marriage Time

मार्गदर्शन :-

ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा, WHATSAPP GROUP

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,(संतती समस्या निवारण विशेतज्ञ)

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!