June Month Horoscope 2024 : जून महिन्यात शनी-राहुची वक्री चाल; ‘या’ राशींच्या अडचणीत प्रचंड होणार वाढ; एकामागोमाग येतील संकटं

June Month Horoscope 2024
श्रीपाद गुरुजी

June Month Horoscope 2024 : राहु कुंडलीत नेहमी प्रतिगामी म्हणजेच वक्री अवस्थेत राहतो पण यावेळी जूनमध्ये शनीची वक्री चाल होणार आहे. अशा परिस्थितीत राहु-शनीची उलटी चाल काही राशींसाठी त्रासदायक ठरू शकतात.

June Month Horoscope 2024 : मे महिन्याचा आजचा शेवटचा दिवस असून उद्याापासून जून महिना सुरु होणार आहे. या जून महिन्यात (June Month) राहु (Rahu) आणि शनीचा (Shani Dev) तांडव पाहायला मिळेल. राहुने सध्या मीन राशीत संक्रमण केलं आहे. तर, शनी कुंभ राशीत विराजमान आहे. राहुला पापी आणि मायावी ग्रह मानला जातो. 

राहु कुंडलीत नेहमी प्रतिगामी म्हणजेच वक्री अवस्थेत राहतो पण यावेळी जूनमध्ये शनीची वक्री चाल होणार आहे. अशा परिस्थितीत राहु-शनीची उलटी चाल काही राशींसाठी त्रासदायक ठरू शकतात. जून महिन्यात राहु-शनी कोणत्या राशींच्या अडचणींत वाढ होऊ शकते ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope) – June Month Horoscope 2024

सध्या राहु मीन राशीत विराजमान आहे. राहुच्या अशुभ प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम पडू शकतो. या दरम्यान तुमच्या व्यवसायात अनेक चढ-उतार पाहायला मिळू शकतात. तसेच, या काळात तुमचा आत्मविश्वास खचू शकतो. व्यवहारात तुमचं नुकसान होऊ शकतं. तसेच, पैशांची कमतरता तुम्हाला जाणवू शकते. 

कन्या रास (Virgo Horoscope)

राहुच्या अशुभ प्रभावाचा तुमच्या मानसिक स्थितीवर फार वाईट परिणाम पाहायला मिळू शकतो. तसेच, चांगल्या-वाईटाची समझ तुम्हाला न  आल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे डोळे बंद करून कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तुमचं मन अशांत असल्या कारणाने तुमच्या नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. 

धनु रास (Sagittarius Horoscope) – June Month Horoscope 2024

राहुच्या दुष्प्रभावामुळे तुमचं मन अशांत होऊ शकतं. नात्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. तसेच, तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग असल्या कारणाने नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो.  भौतिक सुखसोयी कमी होतील. पती-पत्नीमध्ये वैचारिक मतभेद पाहायला मिळतील. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडू शकते. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजी राहू नका.

मकर रास (Capricorn Horoscope) – June Month Horoscope 2024

राहु आणि शनी हे दोघांचीही जून महिन्यात वक्री चाल असणार आहे. अशा स्थितीत त्यांच्या दुष्परिणामांमुळे मकर राशीच्या लोकांचे काम बिघडू शकते. सध्या मकर राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसातीही चालू आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो. दिर्घकालीन आजार तुम्हाला उद्भवू शकतात. व्यवसायातही नुकसान होऊ शकते.

मार्गदर्शन :-

अश्याच नवनवीन लेख ची सूचना आपल्याला वेळोवेळी मिळत राहावी या साठी खालील WhatsApp वर क्लिक करावे.

Love Horoscope

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevasprathishthan@Gmail.Com या वर मला Email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित 
श्रीपाद विनायक जोशी (गुरुजी)
+91 94202 70997 +91 94232 70997
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,
संतती समस्या विशेतज्ञ
ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ, व्यसन मुक्ती औषध तज्ञ
(दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!