Kritika Nakshatra, कृतिका नक्षत्रातील सर्व बारा ग्रहांची फले,

Kritika Nakshatra
श्रीपाद गुरुजी

रवि :- Kritika Nakshatra

1)Kritika Nakshatra, कृतिका नक्षत्रात रवि असेल व त्यावर मंगळाची दृष्टि असेल तर जातक भांडणात हुशार असतो. धाडसी व जोखमीच्या कामात चांगला पैसा मिळतो.

2) बुधाची दृष्टि असेल तर संगीत कला व ललित कलेत रूचि असते. त्यांचे व्यक्तिमत्त्व मोहक असते.

3) गुरुची दृष्टि असेल तर कुलश्रेष्ठ असतो. हा राजकारणात पडला तर आमदार व मंत्री बनतो. त्याच्या जवळ पुरेशी संपत्ती असते,

4)शुक्राची दृष्टि असेल तर डोळे आकर्षक असतात. सुंदर देहयष्टीमुळे सर्वत्र त्यांची चर्चा होत राहते.

5) शनिची दृष्टि असेल तर आरोग्य व आर्थिक स्थिती दुर्बल असते. भांडण तंटणामुळे कौटुंबिक जीवन विस्कळीत होते आणि पूर्णजीवन आस्तित्त्व शून्य बनते.

रवि कृतिका नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या प्रथम चरणी असेल आणि कोणत्याही शुभ ग्रहाच्या दृष्टित असेल तर साधारण प्रकारे जीवन निर्वाह चालेल. संतती अधिक असते. गरीब निर्धन असतो. असा जातक ज्योतिषशास्त्र, रेखाशास्त्र किंवा अशीच रहस्यमय विद्या शिकण्यासाठी उत्सूक असतो. परंतु त्याचे या विषयातील अल्पज्ञान त्याला सहायक बनू शकत नाही. त्याचे डीके कमकुवत असते. खादाड असतो. आग किंवा विजेमुळे दुर्घटनेचा संभव असतो. कांही जातक अथार्जिनासाठी सैन्य किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये नौकरी करतात.

रवि कृतिका नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या द्वितीय चरणात असेल तर त्याला खूप आयुष्य संतती कडून चांगले सुख मिळते. जीवनाच्या उत्तरार्धात ऐश्वर्यवान बनतो. याची बुद्धी तीक्ष्ण असते, साधु सताचा अनुयायी बनतो. कांही असे जातक संगीत, नाट्यकलेने असते. शौखिन असतात, परंतु काही जातकात सट्टा, जुगाराची प्रवृत्ती असते. लहानपणी नीट शिक्षण दिले गेले तर अशी व्यक्ती चर्मरोगाची विशेषज्ञ, नर्स, औषधविक्रेता बनते.

रवि कृतिका नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

रवि कृतिका नक्षत्राच्या तृतीय चरणात असेल तर याचक किया भिकान्यासारखे जीवन जगावे लागते. ठिकठिकाणी फिरावे लागते. अनैसर्गिक रोग होतात. अनेक बालके बालारिष्ट योगामुळे मृत्युमुखी पडतात. कांही जातक केशकर्तन कलेत, काहीजण चर्मकाराच्या रूपात उपजिविका चालवतात. स्रियांच्या कुंडलीत असा रवि असेल तर त्या वेश्यावृत्ति करून पैसा कमवितात. कालांतराने व्ही. डी. सारख्या रोगाने मृत्यू येतो. पुरुष जातक जलमार्गाने वाहतूकीद्वारे मेहनत मजुरी करून तर काही शिकार व पशुपालनाने तर कांही जण मांस-मच्छीचा खरेदी विक्रीत पैसा मिळवतात.

रवी कृतिका नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या चतुर्थ चरणात रवि असेल तर जातक निम्नश्रेणीचे जीवन जगतो. दुसऱ्यांची सेवा, चाकरी करून निर्वाह करतो. अशी व्यक्ती बेजबाबदार, हत्यारा, क्रूर, बुद्धीची, स्त्रीसंततीला त्रास देणारी असतो. मदिरापान, सट्टा, लॉटरी, जुगार यात पैसा घालविणारा व पाण्यापासून उत्पन्न होणाऱ्या रोगांचा त्राव सहन करणारा असतो.

चंद्र :- Kritika Nakshatra

विशेष करून या ग्रहावर जास्त असतो. कृतिका नक्षत्रात चंद्र असेल व त्यावर रविची दृष्टि असेल तर असा जातक मीन जुमला असलेला धनवान व कृषिकार्यात यश मिळवणारा असतो. मंगळाची दृष्टी असेल तर विपरित लिंगी आकर्षण याला असते. कामलिप्सा पूर्ण केल्याशिवाय धन मिळत नाही. आपल्या मित्रांचा व नातेवाईकांचा शुभचिंतकही असतो. बुधाची दृष्टी चंद्रावर असेल तर असा जातक बुद्धिवान, गरजूंची मदत करणारा असतो. शुक्राची दृष्टी असेल तर चांगले कपडे, सोन्या चांदीने युक्त, घर, वाहन, नोकर चाकरांनी युक्त दशस्वी व्यापारी असतो. आईच्या सुखाची वानवा असते. परंतु गुरुची दृष्टी शनिवर असेल तर बरीच वर्षे कई जिवंत राहते. तो रोगी किंवा अल्पायू असू शकेल. अशा जातकाला भौतिक जीवनाची सर्व सुखे प्राप्त होतात.

चंद्र कृतिका नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या प्रथम चरणात चंद्र असेल तर अशा जातकाला मंत्रशक्तीचे अथवा कोणत्यातरी वशीकरण किंवा तांत्रिक विद्येचे, जादू टोण्याचे जुजबी ज्ञान असताही असाधारण प्रसिद्धी मिळते. हा चंद्र स्त्रीला पुरूषापासून व पुरुषाला स्त्रीपासून त्रास उत्पन्न करतो.

चंद्र कृतिका नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या द्वितीय चरणात चंद्र असेल तर ती व्यक्ती शासन सत्तेचे सुख उपभोगते. तिचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असते. विद्वानाकडून तिचे स्वागत होते. पित्तरोग किंवा रक्तबिघाडामुळे त्रास होतो. रसायन, भौतिक, विज्ञान, भूगोल या विषयात रूचि असते, या चंद्रावर शनिची दृष्टी असता माता-पित्याचे सुख अल्पकाळ मिळते.

चंद्र कृतिका नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या तृतीय चरणात चंद्र असेल तर जातक चतुर, ऊंच शरीरयष्टीचा असतो. आर्थिक स्थिती कमकुवत असते. जर स्त्री जातकाच्या कुंडलीत असा चंद्र असेल तर त्यावर राहू किंवा मंगळाची दृष्टी असेल तर तिच्या पतीचा मृत्यू त्याच्या ३५ व्या वर्षी अल्पायु असताना होतो.

चंद्र कृतिका नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

चंद्र जर कृतिका नक्षत्राच्या चतुर्थ चरणात असेल तर अशी व्यक्ती यथेष्ट शिक्षण घेतलेली. मध्यम आकृतिची, वार्तालापात कुशल, तर्कसंगत बोलणारी, सर्व गोष्टींचा आनंद भोगणारी वैवाहिक जीवनात दुःखी परंतु विवाहोत्तर बाह्य संबंधात सुखी, अन्य स्त्रियांना प्रिय भोगविलासाच्या साधनांनी संपन्न, धनवान, मान्यवर व्यवसायी किंवा उच्चाधिकारी असतो. धार्मिक अनुष्ठान व ज्योतिषशास्त्र, तंत्रशास्त्र इत्यादित प्रगत असतो. गरजूंना मदत करणे हा यांचा स्थायी गुण असतो. प्रतिष्ठेचा हव्यास असतो. चांगला मित्र व हितचिंतक असतो. डोळे कमजोर असतात. वडिल किंवा सासऱ्यांशी संबंध स्नेहपूर्ण राहत नाहीत.

मंगळ :- Kritika Nakshatra

या ग्रहावर वक्र दृष्टी असते. कृतिका नक्षत्रात मंगळ असेल व त्याबरोबर चंद्रही असेल किंवा चंद्राची दृष्टि असेल तर आपल्या आई विषयी द्वेष मत्सर असतो. त्याच्या एका पेक्षा अधिक बायका असून शिवाय रखेल असते. त्याची पत्नी लालची व पतिविरूद्ध वागणूक असणारी असते. या मंगळावर चंद्र किंवा रविची दृष्टी असेल तर असा जातक एकांतात किंवा जंगलात राहणे पसंत करतो. याला शत्रू फारच कमी असतात.

अशी व्यक्ती ललित कलाप्रेमी, मितभाषी, ज्ञानी, गंभीर, आकर्षक चेहऱ्याची व श्रीमंत असते. गुरुची दृष्टी या मंगळावर असेल तर आपल्या कुटुंबाचा शुभचिंतक, कुटुंबप्रेमी, संगीत कलेचा ज्ञाता असतो. वयाच्या ३० वर्षानंतर श्रीमंत बनतो. शुक्राची दृष्टी मंगळावर असेल तर सेना किंवा पोलीस डिपार्टमेंटचा प्रमुख, हत्यार चालविण्यात तरबेज असतो. उत्पादक संस्थेचा प्रमुख किंवा संचालक असतो. मशिनरी किंवा विस्फोटक सामग्रीचा नियंत्रक ही असू शकतो.

मंगळवार शनिची दृष्टी असेल तर धनवान, संपत्तिवान, नोकरचाकरांनी युक्त निरोगी असतो.

आपल्या समाजात प्रमुख सामाजिक प्रतिष्ठा असलेला असतो. नेता किंवा सरपंच ही असतो.

मंगळ कृतिका नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या प्रथम चरणात असेल तर जातकाला नेतृत्त्व करण्याची क्षमता असते. तर्क देण्यात तो निपुण असतो.

तो प्रख्यात वकील, मिलिटरी किंवा पोलिस अधिकारी बनण्यास योग्य असतो.

मंगळ २८ ते ३० अंशात असेल तर अशी व्यक्ती सर्वोच्च शिखरावर पोहचते.

गोचर मंगळ किंवा रवि वृषभ राशीत असेल आणि मंगळ किंवा रविची दशामहादशा सुरू असेल तर अपेक्षाकृत अधिक यश मिळते.

जर शनिची दृष्टी असेल तर अशी व्यक्ती वेश्यागामी किंवा चारित्र्यहीन असते. त्याचे मित्र असलेच असतात.

विषारी पदार्थ किंवा मादक द्रव्याच्या सेवनामुळे आरोग्यात विघाड होऊन त्रास संभवतो

कृतिका नक्षत्रात मंगळ मादक पदार्थामुळे लहानपणी मेंदुज्वर, मलेरिया किंवा डोक्यावर आघात होण्याची शक्यता असते.

अशा व्यक्तीने स्टेनलेसस्टील, गंधक, सुरंगाची दारू, माचिस, बीडी, सीगारेट, तमाखू, किंवा अन्य मदक पदार्थांच्या खरेदी विक्रीत पैसा मिळवावा.

मंगळ कृतिका नक्षत्रातील दुसऱ्या चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात मंगळ असेल तर सरकारकडून जास्तीत चास्त फायदा मिळतो.

अशा व्यक्तीचे डोळे लाल असतात. लहानपणी डोक्याला बखम होते.

मानसिक भ्रमिष्टपणा किंवा सन्नीपात होतो. चारित्र्य शंकास्पद असते.

इतर रहाने युक्त मंगळ असेल तर संततीसुखात विघ्ने येतात.

इंजिनिअरिंग, अथवा तीक्ष्ण धारदार हत्यारांच्या उत्पादनातून पैसा मिळतो.

मंगळ कृतिका नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या तृतीय चरणात मंगळ असेल तर सरकारकडून अधिकाधिक फायदा मिळतो. आभूषण व मौल्यवान वस्तुंचा संग्रह करतो.

त्याचा व्यवसाय खूप आरामाचा असतो. सर्व धर्मात श्रद्धा असते.

त्याची दृष्टी लोकांवर जरब बसविणारी काही जातक फारच तर्क-वितर्क करणारे, वादविवाद करणारे, जन्मजात भांडखोर असतात.

जमीन, स्थावर, सट्टा, लॉटरीतून पैसा मिळवतात.

मंगळ कृतिका नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या चौथ्या चरणात मंगळ असेल तर अशा व्यक्तीचे शरीर फारच नाजुक असते.

आपल्या जीवनाचा भरपूर आनंद तो लुटतो.

आपल्या कुटुंबाला जबाबदार व मित्रांचा हितकर्ता असतो. ताप-टाफॉईड, देवी, किंवा इतर संक्रामक रोग होतात.

मंगळाबरोबर चंद्र असेल तर व्यापारातून खूप आर्थिक फायदा होतो.

किंवा विस्फोटक द्रव्ये, गंधक सुरंगाची दारू, औषधे यातून फायदा होतो. लग्नानंतर व्यवसायात मोठा आर्थिक लाभ होतो.

काहींचे दोन विवाह होण्याची शक्यता असते.

बुध :- Kritika Nakshatra

या ग्रहावर खूपच खास असतो.

बुध कृतिका नक्षत्रात असेल आणि त्यावर रवीची दृष्टि असेल

तर ती व्यक्ती धनहीन व नेहमी कोणत्या ना कोणत्या रोगाने आजारी असते.

जर चंद्राची दृष्टी या बुधावर असेल तर कठोर परिश्रमाने धनवान बनू शकतो.

मंगळाची दृष्टी असेल तर नोकरीच्या काळात सरकारडून किंवा मालकाकडून दंड सोसावा लागतो.

वाईट कृत्यामुळे सर्वांच्या दृष्टीतून उतरतो. आणि रोगी शरीर व खर्चिक मंडळीमुळे तो बेजार होतो.

गुरुची दृष्टी असेल तर नगरपालिकेचा अध्यक्ष, सार्वजनिक किंवा सामाजिक संस्थेचा अध्यक्ष, नेता, किंवा सेक्रेटरी बनतो.

राजकारणात त्याला मोठे पद मिळते.

या व्यक्तीतील गुणामुळे तो बुद्धीवंताचा बुद्धिवंत म्हणवला जातो.

शुक्राची दृष्टी असेल तर मौल्यवान कपड्यांचा शौकिन असतो. भोगविलासाची तीव्र इच्छा असते.

सर्वांचे आकर्षण केंद्र बनतो.

आपल्या व्यवसायात तो यशस्वी होतो.

दलित व शोषित समाजाच्या कैवारी बनतो.

शनिची दृष्टी असेल तर जीवन दुरावस्थेत कंठावे लागते.

त्याची पत्नी व मुले त्याची साथ सोडतात.

बुध कृतिका नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या प्रथम चरणात असेल तर ती व्यक्ती सरकारी नोकरी करते.

किंवा व्यापार करून सरकारकडून मोठा फायदा मिळवते.

आयुष्य मध्यम असते. जनमनसाकडून प्रशंसा प्राप्त होते.

अशा व्यक्तींना व्यापाराखेरीज अभिनय, संगीत, किंवा साहित्य लेखनातून ही पैसा मिळतो.

बुध शनि किंवा मंगळाने युक्त असेल तर ती व्यक्ती सडपातळ, सुरा सुंदरीची इच्छुक, संचित धनाचा नाश करणारी असते.

जर हा बुध रवियुक्त असेल तर उच्च श्रेणीचा डॉक्टर किंवा सर्जन बनतो.

बुध कृतिका नक्षत्रातील दुसऱ्या चरण फल :-

जर कृतिका नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात असेल तर असा जातक नेहमी हसतमुख व प्रसन्नवदनी असतो.

अशा व्यक्तीचे एका पेक्षा अधिक विवाह होतात. शरीर उंचे पुरे व दीर्घायु असते. चांगल्या व्यवसायामुळे धनवानात गणना होते.

संततीकडूनही भरपूर सुख मिळते व याच्या ४० व्या नंतर सर्वांकडून ख्याती प्राप्त होते

जर बुधाबरोबर गुरुही असेल तर अशी व्यक्ती उच्च श्रेणीची ज्योतिषी किंवा तांत्रिक बनते.

बुध कृतिका नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या तृतीय चरणी बुध असेल तर असा जातक व्यवहारकुशल, सत्ता सुख भोगणारा व आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा असतो.

या बुधाबरोबर शनि असेल तर ती व्यक्ती वैज्ञानिक किंवा बौद्धिक कार्यात नावाजली जाते.

बुध कृतिका नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या चतुर्थ चरणात बुध असेल तर असा जातक व्यवसायात सर्वोच्च स्थिती प्राप्त करतो.

तो आपल्या कर्तव्यांशी प्रामाणिक, ईमानदार व कर्मठ असतो.

त्याला मुले अधिक व मुली कमी असतात. आरोग्याच्या दृष्टीने जीवनाच्या उत्तराधांत औषधपाण्यासाठी खूप खर्च करावा लागतो.

६०-६२ वयापर्यंत जगतात पण चांगला नावलौकिक कमवितात.

जर या बुधा बरोबर गुरु असेल तर आपल्या जाति-समाजाचा पुढारी बनतो. संस्थेचा सल्लागार म्हणूनही काम करावे लागते.

आर्थिक क्षेत्राशी संबंधित विद्वान व्यक्ती म्हणून नाव कमवितो.

गुरु :- Kritika Nakshatra

कृतिका नक्षत्रात गुरु असेल व त्यावर रवीची दृष्टी असेल तर अशी व्यक्ती युद्धकलेत निपुण असते. लढाईत शरीर जख्मी होते.

नोकरचाकर, वाहन, धनधान्याची समृद्धि याच्याकडे असते. चंद्राची दृष्टी असेल तर सत्याचारी, आदरणीय व दयाळू असतो.

त्याचे भाग्य सर्वोत्तम असते. माता-पित्याकडून सहकार्य चांगले लाभते.

मंगळाची दृष्टि असेल तर संतती चांगली असते.

नोकरदारांच्या संपर्कात राहण्याची संधी मिळते.

कलेच्या क्षेत्रात भाग्य चमकते. बुधाची दृष्टी असेल तर मंत्रसिद्धी प्राप्त होते.

यांच्या विद्वतेची प्रशंसा शासन व सत्तेच्या श्रेष्ठ नेत्यापर्यंत होते.

आकर्षक व्यक्तिमत्त्व निरनिराळ्या कलेत प्रवीण असतो. शुक्राची दृष्टी असेल तर धन, यश व अलंकाराने युक्त असतो.

जीवनाचा आनंद यथेच्छ लुटण्याची संधी मिळते.

शनिची दृष्टी असेल तर गाव, शहर किंवा प्रांताचा नेता बनतो. पत्नी व संततीसुख उत्तम लाभते.

गुरु कृतिका नक्षत्राच्या प्रथम चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या प्रथम चरणी गुरु असेल तर असा जातक ज्ञानपिपासू असतो.

तो उच्च श्रेणीचा धर्मात्मा, भक्त, उपदेशक किंवा पुजारी बनतो. काहींना वडिलापार्जित संपत्ती मिळते.

जुगार, सट्टा व योग्य संततीकडूनही अर्थलाभ होतो. जीवन धन- ऐश्वर्याने परिपूर्ण असते.

सतत प्रयत्नशील, सुरा-सुंदरीचे षौकिन, ऐतिहासिक साहित्यात रूचि ठेवणारे असतात.

गुरु कृतिका नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या द्वितीय चरणात गुरु असेल

तर असा जातक मातृभक्त, धिप्पाड, शरीराचा व वेश्यागामी असतो.

धार्मिक संस्थेच्या माध्यमातून लौकिक प्राप्त होतो.

गुरु कृतिका नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या तृतीय चरणी गुरु असेल तर जातक उच्च अधिकारी बनतो.

आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा, समाजाचा स्नेह व सोहार्द मिळवणारा परंतु निर्धन असतो.

इतरांसाठी कायद्याची पर्वा न करता काम करतो. पण स्वतःच्या बाबतीत कायद्याच्या सीमेत राहतो.

गुरु कृतिका नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

कृतिकेच्या चतुर्थ चरणात गुरु असेल तर असा जातक प्रामाणिक, व्यवहारदक्ष, उच्च शिक्षण घेतलेला, कमाऊ पत्नी असलेला असा असतो.

आजोळकडून धनसंपत्ती मिळते. २७ व्या वर्षी विवाह होतो. गोचरीने आर्द्रा नक्षत्राजवळ गुरु आला की विवाह होतो.

शुक्र :- Kritika Nakshatra

कृतिका नक्षत्रात शुक्र असून त्यावर रविची दृष्टि असेल तर ती व्यक्ति भाग्यशाली देव महिलावर्गात प्रिय असते.

त्याच्याकडे अत्याधुनिक वाहन व भरपूर पैसा असतो.

चंद्राची दृष्टि असेल तर खूपच भोगविलासी असतो. व त्यामुळे आपल्या व्यवसायात नुकसान सोसावे लागते.

गोड बोलणारा, कुटुंबात प्रसिद्ध असतो.

मंगळाची दर्श असेल तर सुख शांतीचा अभाव आयुष्यभर राहतो.

अवांछित कार्यातून ही पैसा मिळतो. बुधाची दृष्टी असेल तर ती व्यक्ती व्यवहारकुशल धाडसी व उत्तम व्यक्तिमत्त्वाची असते.

गुरुची दृष्टी असेल तर चांगली पत्नी, उत्तम संतती व नातेवाईकांचे सुख मिळते.

भरपूर संपत्ती त्याच्याजवळ असते.

शनिची दृष्टी असेल तर शरीर कमकुवत, कुटुंब व कुळाची शान घालविणारा दरिद्री व सामान्य मनुष्य असतो.

शुक्र कृतिका नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या प्रथम चरणात शुक्र असेल तर पुरूष असूनही स्त्री सारखी वागणूक असते.

आणि स्त्री असेल तर पुरुषासारखे मर्दानी वागणे असते.

शरीरयष्टी सुद्धा पुरूषासारखी धिप्पाड असते. रातांधळेपणाचा रोग व वैवाहिक जीवन दुःखी असते.

अशी व्यक्ती नौकायन किंवा जलसेनेत उच्च पदी असते.

रविची दृष्टी असेल तर विवाह लवकर होतो. वारसा हक्काने संपत्ति मिळते.

स्त्रीच्या कुंडलीत शुक्रावर चंद्राची दृष्टी असेल तर भावा-बहिणीशी द्वेषभाव असतो, स्नेहभाव नसतो.

शुक्र कृतिका नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या द्वितीय चरणात शुक्र असेल तर जातक जलसेवा, समुद्र: किंवा जलविभागात नोकर करतो.

स्त्रीच्या कुंडलीत चंद्राची दृष्टी या शुक्रावर तर त्या महिलेचे शरीर प्रमाणबद्ध नसते.

संतति होते पण तिला संतति राहवे लागते. असेल सुखाला पारखेच राहावे लागते.

शुक्र कृतिका नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

कृतिका नक्षत्रांच्या तृतीय चरणी शुक असेल तर अशी व्यक्ती उदार प्रकृतिची असते.

अशा व्यक्तीला एकापेक्षा अधिक पत्नी असतात.

शिक्षित असेल तर अध्यापक, बैंक अधिकारी, कमी शिकलेली असेल तर कापड, साडी, सौदर्य प्रसाधनाचा व्यापार करते.

शुक्र कृतिका नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या चतुर्थ चरणी शुक्र असेल तर अशा जातकाला अभिनय किंवा संगीताच्या माध्यमातून पैसा मिळवण्याची क्षमता असते.

वारसाहक्क किंवा इतर मार्गाने अचानक धनलाभ होतो. पत्नी नोकरी करते.

शनि :- Kritika Nakshatra

शनि कृतिका नक्षत्रात असून त्यावर रविची दृष्टी असेल

तर जातक चतुर क् असतो. दुसऱ्याच्या हाताचे भोजन करतो संतुष्ट राहतो.

चंद्राची दृष्टी या शनिवर असेल तर शासन व सत्तेपासून लाभाचित होतो.

महिलांशी संपर्क राहून त्यांच्याशी घेणे-देणेचा व्यवहार असतो.

मंगळाची दृष्टी असेल तर असा जातक प्रसन्नवदनी पण वाचाळ असतो.

बुधाची दृष्टी या शनिवर असेल तर स्त्रीवर्गात अधिक खुलतो. आपल्या फायद्यासाठी वाईट व्यक्तीशी संगनमत करतो.

देशद्रोही व समाजकंटक आणि नपुसकाकडून व्याज खातो.

जर गुरुची दृष्टी असेल तर अशा व्यक्तीचा जीवनाचा बराच भाग इतरांची मदत करण्यात जातो.

राजकारणात आणि निवडणुकीत जनमताचा पाठिंबा त्याला मिळतो. शुक्राची दृष्टी असेल तर जीवनातील त्याच्या गरजा मोठ्या असतात.

मोठ्या प्रमाणात मदिरासेवन करणारा असा जातक शासनतंत्राशी संबंध ठेऊन असतो.

शनी कृतिका नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या प्रथम चरणात शनि असेल तर जातक आळशी व आपल्या वडिलांशी द्वेषभाव ठेवणारा असतो.

लहानपण अडचणीत जाते. नंतर स्थिती सुधारते.

मध्यन शरीराकृती, रंगाने काळासावळा आणि मध्यम असतो. काहींचा स्वभाव पूर्वग्रहदुषित व रागीट असतो.

जातक महत्त्वाकांक्षी, मोठेमोठी कार्ये उरकणारा, परंतु कठोर हृदयाचा असतो.

त्याला अपचनाची तक्रार असते व त्याचे दात खराव असतात.

शनी कृतिका नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या द्वितीय चरणात शनि असेल तर अशा जातकाला त्याच्यापेक्षा वयस्कर पत्नी मिळते. विवाहोत्तर संबंधही असतात.

अशांत जीवन जगतो. कौटुंबिक जीवन दुःखपूर्ण असते.

शनी कृतिका नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या तृतीय चरणात शनि असेल तर कृषि कार्यातून उपजीविका चालते,

स्त्रीजातक असेल आणि रविची दृष्टी या शनिवर असेल तर विवाह होत नाही.

किंवा दुर्भाग्यामुळे वैधव्य भोगावे लागते. बुधाची दृष्टी शनिवर असेल तर व्यक्ती नपुसक किंवा कमी कामेच्छेने युक्त असतो.

शनी कृतिका नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या चतुर्थ चरणात शनि असेल आणि चंद्राची दृष्टी त्यावर असेल तर अशी स्त्री कुरूप व चारित्र्यहीन असते.

अनियमित आहार विहारामुळे तिचे आरोग्य वारंवार बिघडते.

आणि पुरूष कुंडलीत अशा शनिवर रविची दृष्टी असेल तर जातक दुर्बन व कुरूप असतो.

परंतु चंद्राची दृष्टी असेल तर स्त्री वर्गाकडून स्त्रीउपयोगी अस्त्रांच्या व्यापारातून भरपूर पैसा मिळवतो असतो.

राहू :- Kritika Nakshatra

राहू कृत्तिका नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

कृत्तिका नक्षत्राच्या प्रथम चरणात राहू असेल

तर अशा व्यक्तीचे विवाहोत्तर संबंध असतात.

अशा व्यक्तीच्या चेहऱ्यावर काळा तिळ असतो. त्याची कामवासना चन्द्र असते.

आरोग्य उत्तम असते. सुदृढ शरीरयष्टीचा व विद्वान असतो. पितृभक्त असून आपल्या मालकाकडून लाभ मिळवतो.

राहू कृतिका नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या द्वितीय चरणात राहू असेल तर जातक अध्यात्मिक संततीकडून धनहीन, एकापेक्षा अधिक विवाह करणारा व प्रवासी असतो.

परदेशात भीक मागून निर्वाह करतो.

राहू कृतिका नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या तृतीय चरणात राहू असेल तर जातकाच्या बोलण्यात दोष असतो.

तो रिकामटे संग किंवा वाईट कोणतेही काम करण्या अयोग्य असतो. फारच गरीब व मांस या भंगार विकून आपला उदरनिर्वाह चालवतो.

राहू कृतिका नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या चतुर्थ चरणात राहू असेल तर असा जातक कुटुंबापासून विरक्त असतो.

विवाह होऊनही तो आपली कर्तव्ये पार पाडीत नाही.

देवाच्या भरवशावर सर्वकाही सोडून तीर्थयात्रेला निघून जातो. आपल्या बापजाद्यांची दौलत उडवणारा,

तारुण्यात भरपूर पैसा मिळवणारा व नंतर पैसा खर्च करून मोकळा होणारा असतो.

केतु :- Kritika Nakshatra

केतू कृतिका नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या प्रथम चरणात केतु असेल

तर उदरनिर्वाहात अडचणी येतात.

प्रत्येक कामात निराशाच पदरी पडेत. पोटाचे विकार व अनेक गुप्तरोग असतात.

असे जातक हवामानखाते, रसायन, टेकनिकल किंवा इंजिनिअरींग विभागात कार्य करतात. ४०-५० वर्षाचे आयुष्य असते.

केतू कृतिका नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या द्वितीय चरणात केतु असेल तर स्वकीयापासून दूर राहवे लागते. दरिद्री, पण सुरासुंदरीच्या जाळ्यात अडकलेला असतो.

लोकांकडून प्रताडित किंवा मार खाणारा व सर्वांग दुःखाची तक्रार असणारा असतो.

केतू कृतिका नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या तृतीय चरणात केतु असेल तर असा जातक सट्टेबाजीत मोठे नुकसान सहन करणारा, शासनाशी सबंधित लोकांकडून अनुदान मिळवणार,

खालच्या दर्जाच्या लोकात उठ-बैस करणारा असतो. अशा जातकाला अनौरस संतती होते.

आणि कुटुंबात त्याचा तिरस्कार होतो.

बाहेरचे लोक वेळो- अवेळी त्याला मदत करतात.

केतू कृतिका नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

कृतिका नक्षत्राच्या चतुर्थ चरणात केतु असेल

तर जातकाच्या व्यापारात वारंवार अडचणी उभ्या राहतात. मोठ्या लोकांशी भांडणे होतात. वैवाहिक जीवन ही संघर्षम असते.

विवाह उशीरा केला तर मात्र वैवाहिक सुख मिळते व जीवन विलासपूर्ण राहते.

हर्षल व नेपच्यून :-

कृतिका नक्षत्रात हर्षल व नेपच्यून असतील तर जातक अपघातात सापडणारा,

नेहमी संकटग्रस्त रहाणारा, दुःखी, शरीराची खराबी करून घेणारा व तामसी वृत्तीचा असतो.

प्लुटो –

 कृतिका नक्षत्रात प्लुटो असेल

तर जातकाची प्रकृति उष्ण असते. दांत व नाकातून रक्त पडण्याचा विकार असतो. शिरोगामी व्रण असतो.

तामसी स्वभाव, विद्वत्ता कमी कठोर बोलणारा, गर्विष्ठ, उपद्रवी, हलक्या मनोवृत्तीचा, धाडसी, थेड पदार्थाचा शौकिन असतो.

याच नक्षत्रातील मंगळ व हर्षल लग्नी असल्यास शिरोभागावर व्रण खात्रीने असतो.

मूळव्याध होतो शल्यक्रिया व अग्निचे भय असते. या नक्षत्रात मंगळ, शनि, राहू, हर्षल असल्यास हे ग्रह शरीराची नासाडी करतात..

माझे मनोगत :-

कृतिका नक्षत्रात जन्मलेल्या जातकांची मृगशीर्ष, आर्द्रा, मूळ आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीशी व्यवहार करू नयेत.Kritika Nakshatra

तसेच विशाखा, उत्तरा, भाद्रपदा, व अनुराधा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीशी विवाहाचा विचारच करू नये.

मार्गदर्शन :-

ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,(संतती समस्या निवारण विशेतज्ञ)

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!