Kuldevta Kuldevi, कुलदेवता माहीत नसल्यास काय करावे? कुलदेवता कशी ओळखावी? याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या !

Kuldevta Kuldevi
श्रीपाद गुरुजी

Kuldevta Kuldevi, कुलदेवता आणि कुलदेवीची पूजा जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते. त्यांच्या पूजेचा लाभ वंशजांनाही आशीर्वाद स्वरूप मिळतो. कुलदेवता आणि कुलदेवी पूजेचे रूप म्हणजे देव आणि देवीची ओळख.

कुलदेवी ही संकल्पना हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे. कुलदेवता आणि कुलदेवीची पूजा जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते. त्यांच्या पूजेचा लाभ वंशजांनाही आशीर्वाद स्वरूप मिळतो. कुलदेवता आणि कुलदेवी पूजेचे रूप म्हणजे देव आणि देवीची ओळख.

देवतेकडून आशीर्वाद मिळाल्यानंतर पूर्वज देव आणि देवीच्या विशिष्ट रूपाची पूजा करू लागतात. त्यानंतर वंशज विशिष्ट देवतेची पूजा करतात. ही संकल्पना महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणाचा काही भाग आणि आंध्र प्रदेशात अधिक प्रचलित आहे. कुलदेवता आणि कुलदेवी यांना हिंदू देवी-देवतांसह ओळखणे आज अधिक प्रचलित आहे. परंतु काही लोकांना आपली कुलदेवता कोणती ते माहित नसते तेव्हा त्यांनी कोणाची पूजा करावी हे जाणून घेऊया.

कुलदेवता आणि कुलदेवी पूजनाचे फायदे :- Kuldevta Kuldevi

पूजेचा मुख्य फायदा म्हणजे कुलदेवता आणि देवीने एक रक्षा चक्र तयार केले. हे कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक उर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते. कोणत्याही नकारात्मक उर्जेपासून किंवा कुटुंबावर हल्ला होण्याची शक्यता असेल तर त्यापासून संरक्षण मिळते. ऐक्य राहतं. आध्यात्मिक आणि धार्मिक प्रगती होते. आत्मे आणि स्वर्गीय प्राण्यांपासून संरक्षण मिळते. शांतता आणि समृद्धी राहते. निरोगी मुले आणि निरोगी कुटुंब असते.

​कुलदेवता आणि कुलदेवी माहित नसण्याचे कारण :-

आज अनेकांना त्यांच्या कुलदेवता किंवा कुलदेवीबद्दल काहीच माहिती नाही. हे खालील कारणांमुळे आहे. जेव्हा विभक्त कुटुंबांमध्ये मोठ्या विस्तारित कुटुंबाचे विभाजन होते तेव्हा ते बहुतेकदा कुलदेवता आणि कुलदेवी पूजा विसरतात. कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्याचा अकाली मृत्यू – त्याने/तिने ही माहिती तरुण सदस्यांना दिली नसावी. धर्म परिवर्तन केले असेल तर कुलदेवतेची माहिती नसते. मातृभूमीपासून दूरच्या ठिकाणी जाणे,जबरदस्तीने स्थलांतर. पूर्वजांनी पाळलेल्या मूल्यांचा आदर नाही अशा विविध कारणांमुळे कुलदेवता किंवा कुलदेवी माहित नसते.

कुलदेवतेची पूजा न केल्याने या अडचणींचा सामना करावा लागतो :- Kuldevta Kuldevi

कुटुंबात अपघात, अकाली मृत्यू, घोटाळा, संपत्तीची हानी, प्रगतीचा अभाव, कायदेशीर समस्या, मुलांचे वाईट मार्गाला जाणे, कुटुंबातील सदस्यांमधील वाद आणि अशा अनेक समस्या येतात. सुरुवातीच्या काळात कुटुंबात कोणतीही अडचण येणार नाही कारण पूर्वजांनी जास्त काळ पूजा केली असेल. परंतु कुलदेवतेने दिलेले संरक्षण संपल्यानंतर सहा वर्षांनंतर समस्या सुरू होतात. केवळ नियमित पूजा केल्याने कुलदेवतेची शक्ती मजबूत होऊ शकते.

उपाय :- Kuldevta Kuldevi

तुमची कुलदेवता आणि कुलदेवी तुम्हाला माहीत नसली तरी पूजा करताना आपल्या पूर्वजांची मनात प्रार्थना करा. श्राद्ध विधी न चुकता करा. वर्षातून एकदा अन्नदान करा. गाय आणि इतर प्राण्यांना चारा अन्न खाऊ घाला. पिंपळ किंवा कडुलिंबाचे झाड लावा.

बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत असेल आणि बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत नसेल, आपल्याला कुलदेवता माहीत नसेल आणि कुलदेवताची पूजा आपल्या घरात होत नसेल तर आपल्या घरात भरपूर अडथळे येतात, समस्या येतात, घरात काहीनाकाही वादविवाद सुरू असतात.

म्हणून नित्यानियमाने कुलदेवतेची मूर्ती घरात स्थापन करून त्यांची रोज पूजा करायला हावी. पण, काहीना आपले कुलदैवतच माहीत नसेल? अश्या वेळेस काय करावे हा मोठा प्रश्न असतो, प्रत्येक घराण्याची एक कुलदैवत असतेच. बहुतेक घरामधून लग्न, मुंज, वास्तू, मंगलकार्य अश्या मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवतेला जाणे हा महत्वाचा भाग मानला जातो.

कुळाचार कसा करावा, तळी का व कशी भरावी, टाक का व कसे पूजावे या साठी या फोटो वर क्लिक करा,

कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय?  :- Kuldevta Kuldevi

कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय? आपले कुलदैवत कुटे आहे? त्याचे महत्व काय? कुलदेवता संबदी आपले काय कर्तव्य आहे? असे अनेक प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरीत राहतात. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात.

आणि घरात एखादी समस्या उदभवली की आपली धावपळ सुरू होते. कुलदेवता हा शब्द ” कुळ आणि देवता ” या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता, ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनीशक्ती जागृत होते, म्हणजेच अध्यात्मिक उन्नतीचा आरंभ होतो, ती देवता म्हणजे आपली कुलदेवता.

कुलदेवता ज्यावेळी पुरुषदेवता असते त्यावेळी तिला कुलदेव, आणि जेव्हा ती स्त्रिदेवता असते त्यावेळी तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते. तुम्हाला तुमचे कुलदैवत माहीत नसेल, आणि ते तुम्हाला माहित करून घ्यायचे असेल तर, त्याचे दोन नियम आहेत.

नियम 1:- Kuldevta Kuldevi

रोज सकाळी आणि संध्यकाळी ” स्त्री कुलदेवताय नमः, श्री कुलदेवताय नमः” या मंत्राचा जप करावा. एक माळ जप रोज करावा. मंग काही दिवसातच काहीतरी घटना घडून आपल्याला आपली कुलदैवत माहीत होते, मंग ते कुलदेवी असेल किंवा कुलदेव असेल.

आत्ता तुम्हाला प्रश्न पडेल की कसे कळेल किंवा माहीत होईल?, तर रोज हा जप आपण मनोभावे, खऱ्या श्रधेने करू तेव्हा काहीनाकाही असे होते जसे कोणीतरी आपल्या घरात येईल, कोणीतरी ज्येष्ठ मंडळी येतील, आणि आपल्याला सांगून जातील की तुमची कुलदेवी किंवा कुलदेव हे आहेत.

किंवा, स्वप्नात आपल्याला कोणतेतरी देव किंवा देवी दिसेल अश्या रीतीने आपल्याला हा साक्षात्कार होतो. हा भरपूर लोकांचा अनुभव आहे, जर तुम्हाला कुलदैवत माहीत नसेल तर तुम्ही सुद्धा हा जप सुरू करा, काही दिवसातच तुम्हाला कळेल, हा बऱ्याच लोकांना आलेला अनुभव आहे.

नियम 2 :- Kuldevta Kuldevi

आपले कुलदैवत हे ब्रम्हा, विष्णू, महेश, आणि आदीमाया यामधूनच कोणाचे तरी रूप असते. म्हणून आपली श्रद्धा यामधून ज्या देवावर असेल त्यांची आपण उपासना करावी. अशी उपासना केली तरी आपल्या कुलदैवताची कृपा होते. मंग आपल्याला कुलदैवत माहीत करून घेण्याची गरज नसते.

जर तुमची श्रद्धा ब्रम्हावर, विशुवर, महेशवर असेल किंवा आदिमायावर असेल तर त्यांची तुम्ही भक्ती करा, त्यांची सेवा करा, त्यांची श्रद्धा करा, त्यांच्या नामाचा जप करा, तरी आपली सेवा कुळदैवताला लागते. आणि त्यांची कृपा होते. या दोन गोष्टी आहेत,

आत्ता तुम्हाला काय करायचे हे तुम्ही ठरवा.म्हणजे तुम्हाला कुलदैवत माहीत असेल किंवा या मार्गातून माहीत होईल. तर, वर्षातून एक वेळेस आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवाचे दर्शन नक्की घ्यावे. याने घरात शांती, सुख-समृध्दी राहते. घरातून आजार, तिजार दूर राहतात.

कुलदेवता या शब्दाचा अर्थ ! :-

‘कुलदेवता’ हा शब्द ‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्या वेळी पुरुष देवता असते, त्या वेळी तिला ‘कुलदेव’ आणि जेव्हा ती स्त्री देवता असते, तेव्हा तिला ‘कुलदेवी’ म्हणून संबोधले जाते.

कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात आहेत.

कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व :-

ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आली की, साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा.

कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे ? :-

मूळ स्वरुपातील दैवते : ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया

विष्णूची अवतार रुपातील दैवते : नृसिंह, राम, कृष्ण, परशुराम

शंकराची अवतार रुपातील दैवते : कालभैरव, खंडोबा, मारुती

आदिमायेची अवतार रुपातील दैवते : सरस्वती, लक्ष्मी, पार्वती, दुर्गा, चंडी, काली

शंकराच्या गणांचा मुख्य अधिपती, तसेच आरंभ पूजनाची देवता – गणेश

देवांचा सेनापती : कार्तिकेय (दक्षिण भारतात याला महत्त्व आहे. अय्यप्पा म्हणतात)

वैदिक देवता : इंद्र, अग्नी, वरुण, सूर्य, उषा (यातील सूर्य व अग्नी वगळता इतर दैवतांची उपासना आज प्रचलित नाही )

नोट: कुलदेवी/देवता माहीती नसल्यास वरील पैकी ज्या देवावर भक्ति आहेत त्यांची उपासना करवी

या अजुन ग्रामदैवत, कुलदैवत, इष्टदैवत वगैरे दैवतांचे प्रकार आहेत. (आराध्यदैवत असाही एक प्रकार असावा पण त्यात आणि इष्टदैवतात नेमका फरक कोणता ते माहित नाही.)

ग्रामदैवत ही संपूर्ण गावाचे दैवत, कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदैवत हे कोणतेही आवडणारे, आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे दैवत असते.

एखाद्याचे कुलदैवत कोणते हे कसे ठरवावे?  :- Kuldevta Kuldevi

(हे काहिसे आधी कोंबडी की अंडे सारखे झाले ना?) कुळावरून कुलदैवत व कुलदैवतावरून कुळ ठरवणे

बहुदा कुळाचे एखादे दैवत असावे. कदाचित काही नातलग कुटुंबांचा एखाद्या गावाशी संबंध असावा. जिथे वस्ती केली, तिथे एक देऊळ बांधणे

कुळ म्हणजे कुटुंबकबिला वाढला की म्हणत असावेत असा आपला एक अंदाज करते. अशा कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत असणे शक्य असू शकेल. मग जरी लोक स्थलांतरित झाले, तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी.

कुळ म्हणजे कोणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधले गेलेले विस्तृत कुटुंब. (दत्तक विधान अर्थातच यात मान्य आहे. अशी तडजोड आमच्या कुळातील एका फांदीवर पाहिलेली आहे.) बहुधा गोत्र, जाती वगैरेंसारखा लहान गट किंवा टोळी म्हणजे कुळ. एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावतातच असे नाही परंतु कुलदैवत, गाव, जात वगैरे वरून ते स्वतःला एकाच कुळातले मानतात असे वाटते.

कुळाला इंग्रजीत क्लॅन म्हणतात असे वाटते. एकंदरीत काय कुळ म्हणजे एक टोळी यावरून महाभारतयुद्ध हे एक टोळीयुद्ध होते या वचनाची आठवण होते.

आप्त संबंधांमुळे जे एकत्र आले आहेत किंवा एकत्र वास करतात असे एका रक्ताचे व संबंधांचे जे काही लोक असतील त्या सर्वांच्या समूहास कुळ असे म्हणतात.कुळ शब्दाला मराठीत घराणे असा शब्द रूढ आहे. कुळ म्हणजे घराणे ठीक आहे परंतु कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे. एका जातीत अनेक कुळे असू शकतात.

मार्गदर्शन :-

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित 
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन, (संतती समस्या विशेतज्ञ)
सामुद्रिक ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ 
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!