Leo, सिंह राशीची संपूर्ण माहिती,

Leo
श्रीपाद गुरुजी

Leo, सिंह रास बारा राशींपैकी पांचवी रास होय. म्हणून ५ आकडा लिहिला तरी त्याचा अर्थ सिंह राशी असा प्रचलित आहे.

कुंडलीत राशींची नावे न लिहिता आकडेत लिहावयाचे असतात. म्हणून प्रत्येक राशीचा अंक पाठ करावा.

१) नक्षत्र :- Leo

मद्या नक्षत्राचे १ ते ४ चरण, पूर्वाफाल्गुनी नक्षत्राचे १ ते ४ चरण व उत्तराफाल्गुनी नक्षत्राचे पहिले चरण मिळून सिंह रास बनते.

खालील तक्त्यात चंद्राचे अंश, नक्षत्र, चरण, राशी स्वामी, नक्षत्रस्वामी, योनी, नाडी, गण व नामाक्षर यांची माहिती दिली आहे.

चंद्राचे अंशनक्षत्रचरणनामाक्षरराशी स्वामीनक्षत्र स्वामीयोनीनाडीगण
० ते १३.२०
१३.२० ते २६.४०
२६.४० ते ३०.००
मद्या
पूर्वा फाल्गुनी
उत्तरा फाल्गुनी
१ ते ४
२ ते ४
म,मी,मु,मी
मो,टा,टी,टू
टे
रवी
रवी
रवी
केतू
शुक्र
शुक्र/रवी
मूषक
मूषक
आद्य
अंत्य
अंत्य
आद्य
राक्षस
मनुष्य
मनुष्य

सिंह राशीची आकृति सिंह आहे. पृथ्वीवर पडणाऱ्या क्रांती अंशावर आधारीत विषुववृत्तरेखेपासून २० ते १२ अंशापर्यंत या राशीची व्याप्ती मानण्यात येते.

२) सिंह राशीची नांवे :-

कंठीरव, सिंह, मृगेन्द्र, लेय आणि इंग्रजीत Leo (लिओ) ही बृहत शरीरधारण करणारी, पूर्वसंज्ञक, पूर्व दिशेकडील घनदाट जंगले,

पर्वत व गुहा वर राज्य करणारी, क्रूरधर्मी, शांतलक्षणे, स्थिर स्वभावाची, वृद्ध किंवा जीर्ण आवरणाची,

पांडुगौरवर्णी, तमोगुणी, अग्नितत्त्वाची, दिनवली, वनचारी, पित्तप्रकृतीची, क्षत्रिय जातीची शोर्वेदय विषम राशी आहे.

या राशीचा स्वामी सूर्य, निवास स्थान पांडुदेश, वार रविवार व अंक १ आणि ४ आहेत.

शरीरातील पोट, पाठ, रक्त, हृदय यावर या राशींचे स्वामीत्व आहे.

विद्वत्ता व भाषाज्ञान हे या राशीचे गुण असून मनोरंजन व संरक्षणाशीही तीचा संबंध येतो.

पौष्टिक अन्न, धष्टपुष्ट त्वचा, व्याघ्राम्बर, मृगचर्म, गुळ, खांडसरी, हरभरे, पितळ, सोने ही सिंह राशींची द्रव्ये आहेत.

मेदिनीय ज्योतिषशास्त्रात इटली, फ्रान्स, बोहेमिया, रूमानिया, सिसिली, शिकागो, डेमस्कम, अफगानिस्थान,

हिमाचल प्रदेश व मुंबई इत्यादि देश प्रांताचे प्रतिनिधित्त्व या राशीकडे आहे.

३) मद्या नक्षत्राच्या जातकाची लक्षणे :- Leo

धष्टपुष्ट शरीर, रूंद भरदार छाती, बलदंड, प्रभावशाली, आकर्षक व प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व मद्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीचे असते.

सत्ता व स्वातंत्र्यप्रिय, ज्ञानपिपासू, विश्वासपात्र, दार्शनिक, उदार, दयाळू, स्पष्टवक्ता, खर्चिक, राग आल्यावर भयंकर रूप दाखविणारा, सामाजिक व राजकीय कार्यात पुढाकार घेणारा, लहान पोट असणारा,

अल्पोपहारी, बहुधा दोन विवाह करणारा किंवा एकच कन्या अपत्य असणारा, लेखक, कारकून, भाषाशास्त्री, नट, नाटककार, सैनिक, वकील,

डेकोरेशनचे काम करणारा, उत्तम डॉक्टर असा मानव मद्या नक्षत्रावर जन्मलेला असतो.

४) मद्या नक्षत्राच्या महिलांची लक्षणे :-

खाण्यापिण्याविषयी चोखंदळ, टापटीपीची आवड, वेश सुव्यवस्थित, माता- पिता व देवभक्त, पतिला श्रेष्ठ मानणाऱ्या, धनसंपत्तीचे सुख उपभोगणाऱ्या अशा मद्या नक्षत्रावर जन्मलेल्या महिला असतात.

५) मद्या नक्षत्राच्या व्याधी व व्याधीमुक्तीसाठी दैवी उपाय :- Leo

मद्या नक्षत्रावर जन्मलेल्या अधिकांश व्यक्तींना डोकेदुखी व अर्धांगपीडेचा त्रास असतो. पितृदोषामुळे जीवनात अनेक प्रकारचे त्रास भोगावे लागतात. आयुष्य क्रमात अनेक अडचणी येऊन भाग्योदयात खंड पडतो.

यासाठी ज्या दिवशी मद्या नक्षत्र असेल त्यादिवशी पितृस्वरूप कूलपूज्य ब्राह्मणांना आमंत्रित करून श्वेतचंदन, गंध, चापकपुष्प, तूप गुग्गुळ, शुद्ध तूपाचा दिवा आणि मिष्टान्नाच्या नैवेद्याने त्यांचे पूजन करावे.

वस्त्र, तीळ व तांदुळ दान करावेत. त्र्यंबकेश्वर येथे जाऊन विधिवत श्राद्ध करावे. खालील मंत्राचा विधिपूर्वक दहा हजार वेळा जप करावा किंवा ब्रह्मणांकडून करवून घ्यावा.

ॐ पितृभ्या स्वधामिभ्या स्वधानमः पितामेहभ्या स्वधाभिम्यः स्वधानमनम्।

प्रतितामहेभ्यः स्वधामिभ्यः स्वधानमः अक्षन्नपितरो मीषदन्तपितरो ती

तृपन्त पितः पितः शुद्धम ॐ पितृभ्यो नमः ॥

याच मंत्राने तूप-तीळ-तांदळाच्या आहुती दिल्याने स्नायुरोग, शिरोव्यथा, चर्मरोग, हृदयरोग, यकृतजन्य व्याधीतून सुटका होते व अनंत अडचणीवर मात करता येते.

६) पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या जातकाची लक्षणे :-

पूर्वाफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती विद्वान व प्रतिभावंत असतात. स्वभावाने गंभीर व आर्थिक दृष्ट्य सुसंपन्न असतात. स्त्रियांच्यावर अधिक प्रभाव असतो. खूप परिश्रमानंतर राज्यकृपा प्राप्त होते.

सैनिकाचे गुण यांच्यात असतात. धाडसीपणा असतो. चातुर्थ, स्वार्थ व कामातुरता अधिक असते. थोड्याशा प्रयत्नाने कोणतीही सिद्धी मिळवू शकतात. बहुधा नोकरी करतात.

व्यापारात भागीदारीमुळे नुकसान होते. स्वभाव काहीसां घमेंडी असतो.

७) पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या महिलांची लक्षणे :- Leo

गोड बोलणाऱ्या, आपल्या वाक्चातुर्याने इतरांना प्रभावित करणाऱ्या उत्तम पतिसुख मिळवणाऱ्या,

आकर्षक मुखाकृतीच्या, चंचल, विनोदी, धर्मावर श्रद्धा ठेवणऱ्या,

नेहमी पुढे जाण्याच्या उत्तम गुणांनी संपन्न अशा महिला पूर्वाफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या असतात.

८) पूर्वाफाल्गुनी नक्षत्रांच्या व्याधी व व्याधीमुक्तीसाठी दैवी उपाय :-

शारीरिक त्रास, ज्वरपीडा, शीरपीडा, उष्णता व मानसिक रोगाने ग्रस्त पूर्वाफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेले जातक असतात. या व्याधीमुक्तीसाठी खालील मंत्राचा दहा हजार वेळा जप करावा.

दशांश हवन करावे.

ॐ भगप्रणेतर्भगसत्यरागोमंगेमाधियमूदवादन्नः । भृग प्रणोजनय गोभिरश्वैप्रतिभतृर्वतस्याम ॐ भगाय नमः ॥

तसेच पूर्वा नक्षत्राच्या दिवशी पळसाची पूजा करून पळवासे पान सतत जवळ बाळगावे.

९) उत्तराफाल्गुनी नक्षत्राच्या जातकाची लक्षणे :- Leo

उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती स्वभावाने क्रूर असतात.

आत्मस्तुती प्रिय, धाडसी, अभिमानी, प्रसिद्धी, मिळवणारे, हसतमुखी, सुधारणावादी, कर्तव्यदक्ष,

भांडणात पुढाकार घेणारे दान पुण्य करणारे, धनवान असे महाभाग उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेले असतात.

खगोलतज्ज्ञ, ज्योतिषी, हस्तरेषातज्ज्ञ, लेखक, प्रकाशक, इंजिनिअर, फिजिशिअन, राजदूत, प्राध्यापक म्हणून उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्यांना ख्याति मिळते.

१०) उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या महिलांची लक्षणे :-

धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या, धनसंचयाकडे सर्व लक्ष केंद्रित करणाऱ्या, टीका करणे व लोकांची उणे-दुणे काढण्याची वृत्ती असणाऱ्या सतत बदनामी पत्करणाऱ्या, विघातक सर्व गुणसंपन्न, पुत्र सुखाने आनंदी अशा महिला उत्तराफाल्गुनी नक्षत्राच्या असतात.

११) उत्तराफाल्गुनी नक्षत्राच्या व्याधी व व्याधीमुक्तीसाठी दैवी उपाय :-

शारीरिक व सांसारिक अडचणी उत्तराफाल्गुनी नक्षत्राच्या जातकाना खूप भोगाव्या लागतात. वैवाहिक सुखात विघ्ने येतात यासाठी खालील मंत्राचा दहा हजार वेळा जप करावा.

ॐ दैव्यावध्वर्यू आगत गूं रथेन सूर्यलचा । मध्वायज्ञगूं समजावे तं प्रयत्नयावेनाशिचं देवानाम् ॐ अर्यमणे नमः ॥

१२) सिंह राशीच्या व्यक्तींचे भविष्य :- Leo

शरीराकृती दिसायला चांगली असली तरी आतून फोफसे, डोळे, पिवळट, हनुवटी मोठी, चेहरा मोठा, अशी ठेवण सिंह राशीच्या व्यक्तींची असते. जंगलात फिरण्याचा छंद असतो. रागीट व एका ठिकाणी स्थिर न राहण्याच्या वृत्तिमुळे जीवनात यांना खूप त्रास सहन करावा लागतो. खाण्यापिण्यात चोखंदळ व व्यसनी असतात. कुटुंबावर प्रेम करतात पण वैचारिक मतभिन्नतेमुळे वेगळे राहवे लागते. कंबरदुखीमुळे खूप त्रास सहन करावा लागतो.

सिंह राशीच्या महिला शरीराने काहीशा स्थूल असतात. सर्व तऱ्हेच्या खाद्य पदार्थांची आवड असते. स्वपराक्रमाने पैसा कमवितात. संततीसुख कमी प्रमाणात मिळते. पतिच्या प्रत्येक कामावर टिका करण्याची सवय असते. पित्ताचा त्रास जाणवतो.

१३) जातकाभरण चंद्र निर्याणाध्याया प्रमाणे :-

सिंह राशीच्या अधिकांश व्यक्ती श्रीमंत असतात. शिकले-सवरलेले असतात. समाजात मान त्यांना मिळतो. भ्रमणशील असतात. युद्धात पुढाकार घेऊन शत्रूवर विजय मिळवतात. शीघ्रकोपी, डोळ्यात आकर्षण व कठोरहृदयी असतात.

जन्माच्या प्रथमवर्षी प्रेमवाधेंचा त्रास होतो. पांचव्यावर्षी अग्निभय व सातव्या वर्षी ज्वरपीडा होते.

विसाव्या वर्षी सर्पभय असते. एकविसाव्या वर्षी खूप त्रास सहन करावा लागतो. पोटातील उजवीकडील भागात वायुरोगामुळे त्रास होतो. स्वभावाने सुशील परंतु कंजूस व स्पष्ट वक्ते असतात. आयुष्ययोग एकाहत्तर ते शंभर वर्षे असतो.

१४) सिंह राशीची अनुभवसिद्ध फळे :- Leo

सिंहराशीच्या व्यक्ती प्रयत्नवादी असतात. बुद्धी विलक्षण असूनही शिक्षणाचा योग सर्वसाधारण असतो. उच्चशिक्षणाचा उपयोग व्यवहारात होत नाही. शीघ्रकोपी, बुलन्द, धाडसी, शृंगार व स्वच्छेतेचे भोक्ते, सत्ताधारी बनण्यात तरबेज, असे सिंह व्यक्ती अढळतात. शरीरावर एखादे ऑपरेशन होते.

प्रतिकूल :-

दरवर्षी फेब्रुवारी महिना.

दरमहा ३, १८, २३, २९ या तारखा, शनिवार

काळा रंग वस्त्र इत्यादि.

कर्क, वृश्चिक व मीन राशीच्या व्यक्ती, प्रतिकूल असतात.

१५) सिंह राशीच्या व्यक्तींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचा काळ :-

वयोवर्षे १८ ते २५ या काळात विवाह योग असतो. वैवाहिक जीवन सुखी राहील. संततीसुख उत्तम राहील. वयोवर्षे १९ ते ३६ हा कालखंड भाग्योदयाच्या दृष्टीने उत्तम राहील. या काळात जमीन घर, वाहन व भरपूर संपत्ति मिळेल मान सन्मान मिळेल.

३७ ते ४५ हा कालखंड अडचणींचा राहील. नोकरी व्यवसायात अनेक अडचणी सहन कराव्या लागतील. मौल्यवान वस्तूंची चोरी होणे शक्य आहे.

४६ ते ६२ शारीरिक त्रास जाणवेल. कोर्टकचेऱ्या होऊन आर्थिक नुकसान होईल.

६३, ६४, ६५ या वर्षी सुख व समाधान मिळेल.

६६ व्या वर्षी कोणत्यातरी वाहनामुळे अपघात संभवतो. मृत्यूसम पीडा होईल.

१६) सिंह व्यक्तींसाठी विशेष उपासना :- Leo

सूर्योपासना करावी. ‘हनुमानचालिसा’ नियमीत वाचावा. रविवारचा उपवास करावा. ‘श्री आदिक्यकवच’ धारण करावे. माणिक रत्न वापरावे. खालील मंत्राचा रोज एकशें आठ वेळा जप करावा –

“ॐ क्लीं ब्रह्मणे जगदाधाराय नमः ।।

मार्गदर्शन :-

ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा, WHATSAPP GROUP

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,(संतती समस्या निवारण विशेतज्ञ)

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!