Marriage And Nadi Dosha,आजकाल विवाह हा समाजाचा गंभीर विषय बनला आहे.
समाज कितीही पुढे गेला असला तरी विवाहासारख्या बंधनात अडकताना दोन्ही पक्षाकडील लोक जागृत होताना दिसतात.
दोन्ही पक्षाकडून पत्रिका पाहण्याचा हट्ट धरला जातो.
वधूवरांच्या पत्रिकेचे गुणमेलन करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक नाडी दोष संक्रमण हाच असतो.
कारण ३६ पैकी ८ गुण नाडीला दिले गेले आहेत व शास्त्रात एक नाडी दोष संक्रमण असताना विवाह करू नये (१८ पेक्षा गुण जास्त असले तरी) असे विधान केले आहे.
त्यामुळे विवाहमेलनामध्ये एक नाडी दोष संक्रमण ही मोठी समस्या बनली आहे. यावरच आता आपण विचार करू.
आयुर्वेद – Marriage And Nadi Dosha,
आयुर्वेदामध्ये मानवाच्या प्रकृतीच्या बाबतीत वातप्रकृती, पित्तप्रकृती, व कफप्रकृती सांगितल्या जातात.
त्याचप्रमाणे पूर्वाचार्यांनी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून प्रकृती वर्णन करताना नाडीचे वर्णन केलेले आहे.
नाडी या शब्दाचा अर्थ जोम, उत्साह, शक्ती संक्रमण असा आहे.
शरीररचना, आनुवंशिकता त्याचप्रमाणे सध्या होणारे जन्मतः विकार यावर हा उत्साह अवलंबून असतो.
ही संकल्पना ज्योतिषशास्त्राने आद्यनाडी, मध्यनाडी व अंत्यनाडी संक्रमण या शब्दात वर्णन केली आहे.
हि म्हणजे मानवाची नैसर्गिक प्रकृती असते.
ज्या नक्षत्रावर मूल जन्माला येते, त्या नक्षत्राची जी नाड असते ती त्या मुलाची प्रकृती असते.
त्या नक्षत्राच्या कितव्या चरणात ते मूल जन्माला आले आहे ते पाहणेही महत्त्वाचे असते.
नाडी चे प्रकार – Marriage And Nadi Dosha,
पत्रिकेत तीन प्रकारच्या नाड्या संक्रमण असतात- आद्य, मध्य, अंत्य, सत्तावीस नक्षत्रांपैकी प्रत्येकी नाडीची नऊ नक्षत्रे असतात.
आद्यनाडी वातप्रकृती दाखविते, मध्यनाडी पित्तप्रकृती दाखविते, तर अंत्यनाडी ही कफ प्रकृती दाखविते.
वधूवरांच्या पत्रिकेत जेव्हा त्यांची एक नाडी असते तेव्हा त्यांची समान संक्रमण दोषाने बनलेली प्रकृती तयार होते.
समान प्रकृती असणाऱ्या नवरा- बायकोपासून निरोगी, दीर्घायु संतती निर्माण होत नाही. विवाहाचा हेतू प्रजाजनन किंवा सृष्टीची उत्पत्ती असा आहे.
प्रकृतीची साम्यअवस्था म्हणजेच सृष्टीचा अभाव होय, त्यामुळे पती-पत्नी एकाच नाडीचे संक्रमण, एकाच तत्त्वाचे असताना सृष्टीची निर्मिती होणार नाही.
याच कारणामुळे एक नाडी दोष असताना विवाह करू नये, असा उल्लेख शास्त्रात केला असावा.
याशिवाय आयुर्वेदिक दृष्टिकोनातून विचार केल्यास एकच नाडी असणाऱ्यांना विशिष्ट ऋतू त्रासदायक होतो,
प्रकृती संक्रमण –
जर वधू वरांची एकच नाही असेल तर प्रकृती सारखी असल्याने बदलत्या हवामानानुसार होणारे विकार
वधू वरांना एकाच वेळी संक्रमण झाल्यामुळे एकमेकांना सेवा शुश्रूशा करता यावी यासाठी तसेच दीर्घामधील विकार संक्रमण सारख्या पद्धतीने असल्याने पुढच्या पिढीत से विकार चालू राहण्याची शक्यता असते.
यासाठीही एक नाडी दोष असता विवाह करू नये, असे सांगण्यात आले असावे.
संतती दोषाव्यतिरिक्त, एक नाडी दोष असता विवाह केल्यास पती-पत्नी एकमेकांना दुःखदायक बनतात.
त्यामुळे पुढे वैवाहिक सौख्यात दोष (घटस्फोट, वैधव्य योग इ.), वैवाहिक समस्या निर्माण होऊन विवाहाचा अंत संभवतो.
त्यामुळेही एक नाडी दोष असता शक्यतो विवाह करू नये हाही एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा.
गुण मिलन – संक्रमण
वरील नियम बरोबर असले तरी एक नाडी दोष असताना त्यांची नक्षत्रे, चरणे कोणती आहेत हेही पाहणे गुणमेलन करताना महत्त्वाचे आहे.
पंचांगात ‘अभिनव विवाह मेलन कोष्टकात’ नाडीपादवेध हे कोष्टक दिले आहे. त्यात उभ्या व आडव्या रांगेमध्ये वधू-वरांची नक्षत्रे, चरण दिली आहेत,
ती बघावीत जर वधू-वरांची नक्षत्रे, चरणे एकाच आडव्या ओळीत आली तर एक नाडी दोष पूर्ण आहे असे समजावे व विवाह करू नये.
परंतु जर नक्षत्रे, चरणे वेगवेगळ्या संक्रमण आडव्या ओळीत आली तर एक नाडी दोष धरू नये व गुणमेलनात जे गुण असतील त्यात आठ गुण मिळवावेत व विवाह करण्यास मान्यता द्यावी.
वरील विवेचनातून एक नाडी संक्रमण दोषाचा परिहार कसा होतो हे समजले असले तरी वधूवरांच्या पत्रिका संततीयोगाच्या दृष्टीतून तपासाव्यात.
यासाठी पंचम व चतुर्थस्थान, त्यातील ग्रह, पंचमेश व संततीकारक गुरू या सर्वांचा विचार करावा.
हल्ली एक नाडी दोष संक्रमण असताना रक्तगट पाहणे हे एक नवीन खूळ निर्माण झाले आहे,
आणि बरेच ज्योतिषीसुद्धा नाडी संक्रमण दोषासाठी म्हणून एक रक्तगट नसावा असा पर्याय सांगू लागले आहेत.
वास्तविक नाडी संक्रमण आणि रक्तगट यांचा काहीही संबंध नाही.
एक नाडी दोष असता होणाऱ्या संततीत दिसणारे दोष, एक रक्तगट दोघांचा असता होणाऱ्या संततीत दिसत नाही.
थोडक्यात वरील सर्व विवेचनातून असे लक्षात येते की एक नाडी दोष संक्रमण असता एक तर संतती होत नाही,
किंवा संतती झाल्यास त्या संततीस आनुवंशिक रोग, लक्षणे मात्र हमखास दिसतात म्हणून नाडीस महत्त्व आहे.
नाडी दोष संक्रमण उपाय –
नाडी दोषाच्या अपवादांमध्ये आपण बघितल्याप्रमाणे एक नाडी असेल मात्र जन्म नक्षत्र भिन्न असल्यास होणा-या दुष्परिणामांची तिव्रता कमी होते. त्यामुळे इतर गोष्टी पत्रिकेतील जुळत असल्यास विवाह जुळविण्यास काहीही हरकत नसते. आपली पुढील पिढी आरोग्य संपन्न, बुद्घीनेही सुदृढ होण्यासाठी नाडी दोष असल्यास विवाह टाळण्याचा सल्ला देण्यात येतो.
१) वर-वधु एकाच राशीचे आहेत. मात्र त्यांची जन्म नक्षत्रे वेगवेगळी आहेत. अशा परिस्थितीत नाडी दोष नसतो.
२) वर-वधुचे जन्म नक्षत्र एकच आहेत. मात्र राशी वेगवेगळ्या आहेत, अशा परिस्थितीतही नाडी दोष नसतो.
३) जरी दोघांची नाडी एक येत असेल परंतु दोघांची चंद्र नक्षत्र वेगळी असतील तर एक नाडी संक्रमण दोष समजू नये.
४) जर 28 गुण जुळत असतील आणि एक नाडी दोष संक्रमण येत असेल तरीही एक नाडी दोष समजू नये.
खबरदारी : हल्ली बरेच लोक computer / mobile software वरून मुला – मुलींची कुंडली जुळवून पाहतात, आणि त्या मध्ये जर एक नाडी दोष दिसला कि पत्रिका जुळत नाही म्हणून विषय बंद करून टाकतात. ( परंतु त्यांना हे माहित असते का कि नाडी दोष cancellation points मुळे साधारणतः 90% पत्रिकांमध्ये एक नाडी दोष निष्क्रिय होतो आणि लग्न करता येते. )
पत्रिकेचे गुणमिलन करीत असतांना नाडी जर शून्य गुण मिळाले तर नाडी दोष मानण्यात येतो.
इतर महत्वाचे लेख :-
ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा, WHATSAPP GROUP
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!
मार्गदर्शन :-
ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!
आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.
(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
अधिक माहिती साठी संपर्क :-
श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,(संतती समस्या निवारण विशेतज्ञ)