Marriage Counseling, विलंबाने विवाह व त्यावरील उपाय,

Marriage Counseling
श्रीपाद गुरुजी

Marriage Counseling, आजकाल विवाह ही एक मोठी जटिल समस्या बनली आहे. केवळ मुलीचेच नव्हे तर मुलांचे विवाहही वेळेवर होत नाहीत. ही अडचण कुरूप किंवा यंग असलेल्या मुलामुलींच्या बाबतीत येते असे नाही तर अगदी उच्चशिक्षित, गोयापान, देखण्या व कमवत्या मुलामुलींच्या बाबतीतही येताना दिसते.

‘असे का होते? याला अर्थातच त्यांच्या पत्रिकेतील ग्रहयोग प्रामुख्याने कारण असतात. प्रामुख्याने म्हणण्याचे कारण, इतरही काही कारणे विवाह वेळेत न होण्यामागे असतात. उदा. वास्तुदोष, पितृदोष इ. आपली राहती वास्तू दूषित असेल तर त्या घरात कोणतेही मंगलकार्य घडत नाही. पितरांचेही तसेच आहे. पितरांच्या शापामुळे घरातील मंगलकार्य अडकून राहतात व त्यामुळे विवाहयोग लांबतो.

वास्तुदोष, पितृदोषाबरोबर विवाह विलंब होण्यामागे व विवाह ठरताना अडचणी, त्रास येण्यामागे अनुक्रमे शनि, मंगळ, राहु, केतु, हर्षल, नेपच्यून इ. पापग्रहांचाही हात असतो.

जातकाच्या कुंडलीचा अभ्यास करून आपण त्याला जर तुझा विवाह होणार नाही किंवा विवाह फार विलंबाने होणार आहे आणि विवाह झाला तर वैवाहिक सौख्याची हानी होणार आहे. यापैकी काहीतरी सांगितले असता लगेच पालक व विवाह इच्छुक मुलेमुली यावर काही उपाय नाही का? असे विचारतात. वस्तुतः ग्रहयोगामुळे जे विधिलिखित असते ते अटळ असते. असे असले तरी उपायाने त्यांच्या अशुभ फळांच्या तीव्रतेमध्ये नक्कीच सौम्यता येते. उपायांचे परिणाम मनावर होतात. त्यामुळे मन उपायाने शांत झाल्याने व्यक्ती चांगल्या प्रकारे विचार करून व चांगली वागून ग्रहयोगाच्या वाईट फेऱ्यातून सुखरूप बाहेर येऊ शकते.

उपासना :-

उपाय किंवा उपासना करण्यासाठी किंवा ती फलद्रुप होण्यासाठी श्रद्धेची नितांत आवश्यकता असते. श्रद्धा ही मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. कोणावर तरी श्रद्धा असल्याशिवाय जीवन जगणे कठीण असते. ‘आपण सर्व श्रद्धा आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवल्या तर त्यापासून एक प्रकारची शक्ती निर्माण होते व तीच शक्ती आपल्याला उपयोगी पडते. यासांठी जातकाने उपासना किंवा उपाय श्रद्धेने केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. आता आपण विवाह विलंब, विवाहामध्ये अडचण इ. विवाहविषयक समस्येवर काय उपासना करावयाच्या त्याचा विचार करू.

१) वास्तुदोष असेल तर राहत्या घरामध्ये लघुरुद्र स्वाहाकार किंवा नवचंडी याग हे विधी करावेत. किंवा जमल्यास मुलगा किंवा मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी घ्यावा.

२) पत्रिकेत पितृदोष असता विवाह अजिबात न होणे, विलंबाने होणे व विवाह झाल्यास संतती न होणे इ. परिणाम होतात. यासाठी विवाहापूर्वी सहकुटुंब त्र्यंबकेश्वर नाशिक येथे जाऊन नारायण नागबली व त्रिपिंडी हे विधी शास्त्रोक्त पद्धतीने मनःपूर्वक श्रद्धेने करावेत. नक्की लाभ होतो.

३) बऱ्याच पत्रिकेमध्ये हर्षल या ग्रहांची बाधा विवाहात पाहायला मिळते. चंद्र- हर्षल युती, प्रतियुती, शुक्र-हर्षल युती, प्रतियुती, सप्तमात हर्षल इत्यादी असता हर्षलचे अलेक्झांड्रा रत्न उजव्या हाताच्या मधल्या बोटात अंगठीमध्ये घालावे, विवाहात गती येते.

४) शनिची बाधा कुंडलीमध्ये असता शनिउपासना नित्य करावी. शनिची उपरन अमेथिस्ट किंवा ब्लू टोपाझ उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये अंगठीमध्ये विधीवत धारण करावे.

५) दर सोमवारी विवाह उत्सुक मुलामुलींनी शंकराच्या पिंडीजवळ एक नारळ व एक ओंजळभर गहू ठेवावेत व विवाहासाठी प्रार्थना करावी. हा उपाय विवाह ठरेपर्यंत दर सोमवारी करावा. निश्चित लाभ होतो.

६) त्वरित विवाह होण्यासाठी व इच्छित जोडीदार प्राप्तीसाठी नवनाथ पोथीतील २८ वा अध्याय रोज मनःपूर्वक वाचावा. हाही उपाय विवाह ठरेपर्यंत श्रद्धेने करावा. मुलींनी अडचणीच्या दिवशी फक्त ही पोथी वाचू नये.

७) मुलींनी वृंदावनात किंवा एखाद्या कुंडीत बाळकृष्णाची मूर्ती ठेवून त्यापुढे दिवा लावावा. त्याची व तुळशीची मनोभावे पूजा करून २१ प्रदक्षिणा घालाव्यात व पुढील श्लोकाचा रोज १०८ वेळा जप करावा म्हणजे अडलेले विवाह जुळून येतात.

मुलींसाठी श्लोक :-

पती मनोरमं देही मनो वृत्तासारिणीम् । तारिणी दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम् ॥

मुलांसाठी श्लोक :-

पत्नी मनोरमं देही मनो वृत्तासारिणीम् । तारिणी दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम् ॥

प्रभावी दुर्गा मंत्र :-

ॐ दुर्गायै नमः ।

मम विवाहं सत्वरं कुरू कुरू स्वाहा ।।

या मंत्राचा रोज किमान १०८ वेळा जप करावा.

८) यंत्रपूजा : नवग्रह यंत्र व गणेश यंत्र यांचे विधिवत नित्य पूजन केल्यास विवाहामध्ये गती येते व इच्छित वर प्राप्त होतो.

९) अल्पशिक्षित विवाहोत्सुक मुलींनी करावयाचे तोडगे :

i) बाजारातून तुरटी आणून ठेवावी. एक झाकण असलेला डबा स्वच्छ करून ठेवावा. शनिवारी सायंकाळी थोडीशी तुरटी निखाऱ्यावर फुलवावी. ही फुलवलेली तुरटी एका भांड्यात ठेवून ज्या मुलीचा विवाह होण्यात अडचणी निर्माण होतात. त्या मुलीवरून सात वेळा उतरवावी व डब्यात थोडे पाणी टाकून त्यात ही फुलवलेली तुरटी टाकावी. डब्याचे झाकण बंद करून डबा उंचावर ठेवावा. विवाह ठरेपर्यंत प्रत्येक शनिवारी हा उपक्रम चालू ठेवावा. साधारणतः तीन किंवा चार शनिवार नंतर विवाह जुळून येतो. विवाह जुळून आल्यावर या डब्याची पूजा करावी. डब्यात सव्वा रुपया टाकावा व नमस्कार करावा. हा डबा (तुरटी व पाण्यासह) नदीत प्रवाहित करावा.

ii) विवाहोत्सुक मुलींनी एक हळदीकुंकवाचा नवीन करंडा विकत घेऊन त्यात हळदीकुंकू भरावे. आपल्या गावातील देवीच्या मंदिरात दर मंगळवारी व शुक्रवारी हा हळदीकुंकवाचा करंडा घेऊन या करंड्यातील हळदीकुंकू मनोभावे देवीला अर्पण करावे व विवाह लवकर होण्यास प्रार्थना करावी. नमस्कार केल्यावर देवीपुढे जे हळदीकुंकू असेल ते उचलून आपल्या करंड्यात घ्यावे. हे हळदीकुंकू रोज आपल्या माथी लावावे.

१०) बरेच वर्षे ठरत नसलेले लग्न ठरून येण्यासाठी तोडगा : पाच गोटा खोबरे आणावेत. मंगळवारी सकाळी उठून शुर्चिभूत होऊन एक खोबऱ्याचा गोटा घेऊन मधोमध त्याला चीर पाडावी व या चिरेतून गोटयात गव्हाचे पीठ, पिठीसाखर व साजूक तूप इ. एक-एक चमचा घालावे. हा गोटा घेऊन न बोलता घराबाहेर जाऊन वारुळाशेजारी ठेवावा. व त्याला नमस्कार करून न बोलताच परत यावे. असे पाच मंगळवार केल्यास लग्न ठरते.

११) पत्रिकेत ज्या ग्रहांमुळे विवाहास विलंब किंवा अडचणी येतात त्या ग्रहाची उपासना नित्य करावयास सांगावी. प्रत्येक ग्रहाची उपासना पुढे देत आहे.

हे हि वाचा – सप्तम स्थान व वैवाहिक जीवन,

रवि उपासना :-

१) रवि

उपासनेमध्ये गायत्री मंत्र हा सर्वश्रेष्ठ मंत्र मानला आहे. ह्या मंत्राचे रोच सकाळी ११ वेळा पठण करावे. (मनातल्या मनात) ।

मंत्र :- ॐ भूः भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम् भगो देवस्य धीमहि, धीयो योनः प्रचोदयात्

२ ) पुराणोक्त मंत्र :

ग्रहाणामादिरादित्यो लोकरक्षणकारकः । विषमस्थानसंभूतां पीडां हरतु मे रविः ।। ३) नमस्कार मंत्र :

(रोज १०८ वेळा )

जपाकुसुमसंकाशं काश्यपेयं महाद्युतिम् । तमोऽरिं सर्वपापघ्नं प्रणतो ऽस्मि दिवाकरम् । (रोज १०८ वेळा)

४ ) मंत्र :

१) ॐ ह्रीं नहीं सूर्याय नमः ॥

२) ॐ घृणिः सूर्याय नमः ॥

(रोज १०८ वेळा)

५) रत्न :

रविसाठी माणिक हे रत्न सोने किंवा तांब्याच्या अंगठीत बसवून.. रविवारी सकाळी सूर्योदयापासून एक तासाच्या अवधीत ॐ घृणिः सूर्याय नमः ॥ या मंत्राने अभिमंत्रित व पूजा करून ही अंगठी उजव्या हाताच्या करंगळीशेजारील बोटामध्ये परिधान करावी.

६ ) इतर सोपे तोडगे :

१) कोणत्याही रविवारी सव्वा किलो गूळ सूर्योदयापासन सूर्यास्तापूर्वी केव्हाही वाहत्या पाण्यात नदीत सोडावा.

२) रवि- शनि युती, प्रतियुती असता अशा जातकाने आपल्या वडिलोपार्जित

घरात हॅन्डपंप किंवा हापसा बसवावा किंवा विहीर खोदून घ्यावी.

३) वेलाचे मूळ ताईतात घालून ते धारण करावे.

४) वाहत्या नदीत किंवा पाण्यात तांब्याचा पैसा किंवा तुकडा प्रवाहित करावा.

५) रवियंत्राची रोज पूजा करावी.

हे हि वाचा – विवाह केव्हा होईल.? कुठे होईल,कसा होईल,

चंद्र उपासना :-

१ ) मंत्र :

दधिशंखतुषाराभं श्रीरोदार्णवसंभवम् । नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकूट भूषणम् ॥

(रोज १०८ वेळा)

२) तंत्रोक्त मंत्र

१) ॐ सों सोमाय नमः । २) ॐ ऐं ही सोमाय नमः ॥

(रोज १०८ वेळा)

३ ) रत्न :

या मंत्राने अभिमंत्रित व पूजा करून सोमवारी सकाळी सूर्योदयापासून एक तासाच्या अवधीत उजव्या हाताच्या करंगळीमध्ये धारण करावे.

चंद्राचे मोती रत्नाची चांदीमध्ये अंगठी करून ॐ सोमाय नमः ।

४) चंद्र यंत्राची रोज पूजा करावी.

५) इतर प्रभावी तोडगे :

१) दर सोमवारी थोडे तरी तांदूळ दान करावेत.

२) दर सोमवारी शिवलीलामृताचा ११ वा पाठ वाचावा.

३) दर सोमवारी वाहत्या पाण्यात चांदीचा तुकडा किंवा रुपया प्रवाहित करावा.

हे हि वाचा – आपले प्रेम किंवा विवाह कोणाशी सुखकर होईल.?

मंगळ उपासना :-

१) मंत्र :

धरणीगर्भ संभुतं विद्युत्कांति समप्रभम् ।

कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणमाम्यहम् ।।

(रोज १०८ वेळा)

२) पुराणोक्त मंत्र :

भूमिपुत्रो महातेना जगतां भयकृत सदा ।

वृष्टिकृदवृष्टिहर्ताच पीडां हरतु मे कुजः ।। (रोज १ वेळा)

३) तंत्रोक्त मंत्र :

१) ॐ अं अंगारकाय नमः ॥

२) ॐ क्रां क्रीं क्रौ सः भोमाय नमः ॥

३) ॐ गं गणपतये नमः ॥

(रोज १०८ वेळा)

४) कुंडलीत मंगळदोष असल्यास विशेषतः सप्तमात मंगळ असता गणेशाची उपासना श्रेष्ठ आहे. संकष्टी चतुर्थी व्रत करावे.

५) रोज अंगारक स्तोत्र, मंगळकवच म्हणावे.

६) मंगळ यंत्राची रोज पूजा करावी.

७) रत्न :

मंगळाचे पोवळे रत्न तांब्याच्या किंवा सोन्याच्या अंगठीत बसवून ॐ अं अंगारकाय नमः ॥ या मंत्राने अभिमंत्रित व पूजा करून मंगळवारी सकाळी सूर्योदयापासून एक तासाच्या अवधीत अनामिकेत घालावी.

८) इतर तोडगे :

१) मंगळवारी अनंतमूळ वनस्पतीचे मूळ आणून लाल दोऱ्यामध्ये बाहूवर बांधावे.

२) प्रत्येक मंगळवारी गूळ किंवा रेवड्या वाहत्या पाण्यात प्रवाहित कराव्या. ३) मारुतीचे चालीसा, हनुमान कवच म्हणावे, कारण करावे. हनुमान

पूजन :

मंगळाचा स्वामी रामभक्त हनुमान मानला गेला आहे.

४) दर मंगळवारी मंगळमंत्र व ॐ हं हनुमते नमः । हा मंत्र कमीतकमी १०८ वेळा म्हणावा व त्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे.

हे हि वाचा – विवाह जुळविताना कुंडली अडसर की मार्गदर्शक.?

बुध उपासना :-

१) मंत्र :

प्रियंगुकलिकाश्यामं रूपेणाप्रतिमं बुधम् । सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम ||

२) पुराणोक्त मंत्र :

(रोज १०८ वेळा )

उत्पातरूपो जगतां चंद्रपुत्रो महाद्युतिः । सूर्यप्रियकरो विद्वान पीडां हरतू मे बुधः

।। (रोज १०८ वेळा)

३) तंत्रोक्त मंत्र :

१) ॐ बुं बुधाय नमः ।

२) ॐ ऐं श्रीं श्रीं बुधाय नमः ।

३) ॐ ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः ।

(रोज १०८ वेळा )

४) दुर्गासप्तशतीचा पाठ विशेष प्रभावकारी आहे.

५) बुधयंत्राची रोज पूजा करावी.

६) बुधरत्न :

बुधाचे पाचू किंवा फिरोजा रत्न सोन्यामध्ये अंगठी करून बुधवारी प्रात:काळी सूर्योदयापासून १ तासाच्या अवधित ॐ बुं बुधाय नमः । या मंत्राने अभिमंत्रित व पूजा करून उजव्या हाताच्या करंगळीमध्ये धारण करावे.

७) इतर तोडगे :

१) दर बुधवारी काही कवड्या जाळून ती राख वाहत्या पाण्यात सोडावी व त्याबरोबर एक तांब्याचा पैसा सोडावा.

२) बुधवारी उपवास करून दुर्गापूजा व दुर्गास्तोत्र म्हणावे.

३) वरधारा व वनस्पती ताईतमध्ये घालून धारण करावी.

हे हि वाचा – विवाह मुहूर्ताची कुंडली कशी असते.? केव्हा जुळतो विवाह.?

गुरु उपासना :-

१) मंत्र :

देवानां च ऋषीणां चं गुरू कांचनसन्निभम । बुद्धीभूतं त्रिलोकेशं तम् नमामि बृहस्पतिम् ।। (रोज १०८ वेळा)

२) पुराणोक्त मंत्र :

देवमंत्री विशलाक्षः सदा लोकहिते रतः । अनेक शिष्यसंपुर्णः पीडां हरतु मे गुरू ।। (रोज १०८ वेळा)

३) तंत्रोक्त मंत्र :

१) ॐ बृं बृहस्पतये नमः ।

२) ॐ ऐं क्लीं बृहस्पतये नमः ।

(रोज १०८ वेळा )

४) गुरुयंत्र :

गुरूयंत्राचे रोज पूजन व दर्शन घ्यावे.

५) रत्न :

गुरूचे पुष्कराज किंवा उपरत्न टोपाझ रत्न सोने किंवा कास्य धातूत अंगठी करून अंगठ्याशेजारील बोटामध्ये गुरुवारी सकाळी सूर्योदयापासून १ तासाच्या अवधीमध्ये ॐ बृं बृहस्पतये नमः । या मंत्राने अभिमंत्रित व पूजा करून धारण करावे.

६) इतर उपाय :-

१) दर गुरुवारी उपवास करावा. सोने, हळद, केशर, पिवळे वस्त्र, साखर, हरभऱ्याची डाळ, पुष्कराज किंवा टोपाझ रत्न यापैकी शक्य असेल ते दान करावे.

२) भारंगमूळ नावाची वनस्पती ताईतात घालून ताईत धारण करावा.

७) मंत्र :

श्री स्वामी समर्थ रोज १०८ वेळा म्हणावा.

हे हि वाचा – विवाहात अडथळे आणण्यासाठी कोणते ग्रह जबाबदार असतात.?

शुक्र उपासना :-

१) मंत्र :

(रोज १०८ वेळा)

हिमकुंदमृणालाभम् दैत्यांना परमं गुरुम् । सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ॥ (रोज १ वेळा )

२) पुराणोक्त मंत्र :

दैत्यमंत्री गुरूस्तेषां प्राणदश्च महामतिः । प्रभुस्ताराग्रहाणां च पीडां हरतु मे भृगुः ।। (रोज १०८ वेळा )

३) तंत्रोक्त मंत्र :

१ ) ॐ शुं शुक्राय नमः ।

२) ॐ ह्रीं श्रीं शुक्राय नमः ।

४) शुक्रयंत्र :

शुक्रयंत्राचे रोज पूजन व दर्शन घ्यावे.

५) रत्न : Marriage Counseling

शुक्राचे हिरा रत्न किंवा झिरकॉन हे सोने किंवा चांदीच्या अंगठीमध्ये तयार करून ॐ शु शुक्राय नमः । या मंत्राने अभिमंत्रित व पूजा करून उजव्या हाताच्या अनामिकेत किंवा करंगळीत शुक्रवारी सूर्योदयापासून… एक तासाच्या अवधीत परिधान करावे.

६) इतर प्रभावी तोडगे :

१) जेवणापूर्वी जेवणाच्या ताटातून सर्व पदार्थ थोडे बाजूला काढून पांढऱ्या गाईला किंवा पांढऱ्या बैलाला खाऊ घालावेत.

२) चांदी, तांदूळ, चित्रविचित्र रंगाची वस्त्रे, हिरा यापैकी शक्य असेल त्या वस्तूचे दान करावे.

३) वाघारीचे मूळ ताईतात घालून तो ताईत धारण करावा.

४) लक्ष्मीची उपासना करावी. ॐ श्रीं नमः । हा मंत्र कमीत कमी १०८ वेळा म्हणावा.

हे हि वाचा – पत्रिका जुळत नसल्याने लग्न जुळत नाही, पण नक्की या गोष्टीचा नेमका अर्थ काय असतो.?

शनि उपासना :-

१ ) शनिमंत्र :

नीलांज्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम् । छायामार्तंडसंभूतं तं नमामि शनैश्चरम् ॥

२) शनिमंत्र : Marriage Counseling

ॐ शम् शनैश्चराय नमः ।

३ ) शनिस्तोत्रम् :

कोणस्थ: पिंगलो बभ्रु कृष्णो रौद्रेतको यमः । सौरिः शनैश्चरो मंदः पिप्पलादेन संस्तुतः ॥

एतानि दशनामानि प्रातरुत्थाय यः पठेत । शनैश्चरकृता पीडा न कदाचित भविष्यति ॥ पिप्पलाद उवाच ॥

नमस्ते कोणसंख्याय पिंगलाय नमोस्तुते । (राज १०८ वेळा)

नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णायच नमोस्तुते || नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चांतकाय च । नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभोः । नमस्ते मंदसंज्ञाय शनैश्चर नमोस्तुते । प्रसादं करू देवेश दीनस्य प्रणतस्य च ।

(रोज सकाळी १ वेळा).

४) शनिप्रार्थना :

नीलांज्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम् । छायामार्तण्डसंभूत तं नमामि शनैश्चरम् ॥ सूर्यपुत्रौ दीर्घदेही विशालाक्षो शिवप्रियः । मन्दचारो प्रसन्नात्मा पीडा हरतु मे शनि ।। द्विभुजं दीर्घदेहिनाम् दण्डपाश धराय च । पिंगाक्षौ यमरूपाय शनिदेवाय नमो नमः ॥ शनिदेवो श्यामलांगी सूर्यपुत्रो जटाधरो । महाकालं भयानकश्च शनेश्चराय नमो नमः ॥

(रोज सकाळी १ वेळा)

५) मंत्र : Marriage Counseling

ॐ रहीम सूर्याय नमः ।

(रोज १०८ वेळा)

६) शनिपूजा :

दर शनिवारी उपवास धरावा व संध्याकाळी शनिचे किंवा मारुतीचे दर्शन घ्यावे व त्यास उडीद, काळे तीळ, नारळ, मीठ अर्पण करावे व तेलाभिषेक घालावा. लहान मुलांना शनिची बाधा असल्यास त्यांच्याकडून ११ चढत्या रुईची माळ, क्रमाने कणकेचे दिवे दर शनिवारी शनि किंवा मारुतीसमोर लावावेत व नंतर उतरत्या क्रमाने ११ शनिवारी लावावेत.

७) रत्नधारण :

१) शनिची बाधा निवारणार्थ आयोलाईट किंवा ॲमेथिस्ट नावाचे उपरत्न सोने किंवा पंचधातूच्या अंगठीत बसवून उजव्या हाताच्या मधल्या बोटात विधीपूर्वक धारण करावे.

२) मोती किंवा पाचू हे रत्न वापरल्यास शनिपीडा कमी होते.

८) दरवर्षी शनि शिंगणापूरला जाऊन शनिचे दर्शन घ्यावे.

९) शनियंत्र व साडेसाती निवारक यंत्र, विधीपूर्वक घेऊन त्याची नित्य पूजा करावी किंवा शनियंत्र आपल्या जवळ बाळगावे.

१०) शनि पीडा काळात शनि ग्रहाची शांती करून घ्यावी.

११) ११ शनिवारी उपवास करावा, शनि किंवा मारुतीला प्रदक्षिणा घालाव्यात व शेवटी मारुतीला अभिषेक घालावा.

१२ ) सोपा उपाय :

शुक्रवारी संध्याकाळी मूठभर काळे चणे पाण्यात भिजवावेत, शनिवारी संध्याकाळी एका ६ x ६ आकाराचे काळे कापड घेऊन त्या कापडात ते काळे भिजलेले चणे ठेवावेत. चण्यावर एख लोखंडी खिळा व एक कोळशाचा तुकडा ठेवावा. नंतर त्या पुरचुंडीला तीन गाठी माराव्यात. . ही पुरचुंडी ज्या पाण्यात मासे आहेत अशा ठिकाणी सोडावी. याप्रमाणे १३ शनिवार करावेत.

हे हि वाचा – विवाह गुण मेलन पद्धत,असा जुळतो विवाह.

राहु उपासना :-

१ ) मंत्र :

अर्धकार्य महावीर्यं चंद्रादित्यविमर्दनम् । सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम् ॥

(रोज १०८ वेळा)

२) पुराणोक्त मंत्र : Marriage Counseling

महाशिरा महावक्त्रो दिर्घदंष्ट्रो महाबलः ।

अतनुश्चोर्ध्व केशश्च पीडां हरतु मे शिरवी ॥ (रोज १ वेळा )

३) तंत्रोक्त मंत्र :

१ ) ॐ रां राहवे नमः ।

२) ॐ ह्रीं राहवे नमः ।

(रोज १०८ वेळा)

४) राहु यंत्र :

राहु यंत्राचे रोज पूजन करावे किंवा कालसर्प यंत्राची रोज पूजा करावी.

५) राहु रत्न :

राहुचे गोमेद रत्न सोने किंवा पंचधातूच्या अंगठीमध्ये तयार करून त्याची ॐ रां राहवे नमः । या मंत्राने पूजा अभिमंत्रित व पूजा करून उजव्या हाताच्या करंगळीमध्ये शनिवारी सूर्योदयापासून एक तासाच्या अवधीत परिधान करावे.

६) इतर प्रभावी तोडगे :

१) थोडेसे कोळसे वाहत्या नदीत सोडावेत.

२) जवसाचे काही दाणे दुधाने धुवून वाहत्या पाण्यात सोडावे,

३) एक नारळ समुद्रात सोडावा.

४) ब्राह्मणाला नमस्कार करावा.

५) शरपुंखा वनस्पतीची मुळे अंघोळीच्या पाण्यात घालून अंघोळ करावी.

६) सफेद चंदनाचा एक तुकडा पांढऱ्या कापडात बांधून बुधवारी रात्री तो दंडावर धारण करावा.

७) प्रत्येक बुधवारी किंवा शनिवारी भैरोबाची पूजा करावी.

८) तीळ, मोहरी, निळे कापड, सुप, काळे घोंगडे यापैकी जमेल ते दान करावे.

हे हि वाचा – लग्न कुंडली कशी पाहावी, कसा पहावा विवाह योग.?

केतु उपासना :-

१) मंत्र :

पलाश पुष्प संकाशं तारकाग्रह मस्तकम् । . रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतू प्रणमाम्यहम् ।।

(रोज १०८ वेळा)

२ ) पुराणोक्त मंत्र :

अनेकरूपवलौश्च शतशोऽपु सहस्त्रशुः । उत्पातरूपो जगतां पीडां हरतु मे तमः ।।

(रोज १०८ वेळा)

३) तंत्रोक्त मंत्र :

१) ॐ कें केतवे नमः ।

२) ॐ हीं केतवे नमः ॥

(रोज १०८ वेळा)

४) केतुयंत्र : Marriage Counseling

केतुयंत्र व कालसर्प यंत्राची रोज पूजा करावी.

५) केतु रत्न :

केतुचे लसण्या किंवा टायगर आयं हे रत्न पंचधातूच्या अंगठीमध्ये तयार करून ॐ कें केतवे नमः । या मंत्राने अभिमंत्रित व पूजा करून

शनिवारी सूर्योदयापासून एक तासाच्या अवधीत अनामिका या बोटात घालावे..

६) इतर प्रभावी तोडगे : Marriage Counseling

१) गणेशपूजन करावे व २१ संकष्टी चतुर्थी व्रत करावे.

२) कुत्र्याला चपाती, भाकरी द्यावी.

३) कोणत्याही मंदिरात काळी कांबळ दान द्यावी.

४) ‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

मार्गदर्शन :-

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevasprathishthan@gmail.com या वर मला Email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Whatsapp ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,

Horoscope 8 July 2024

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित 
श्रीपाद विनायक जोशी (गुरुजी)
+91 94202 70997 +91 94232 70997
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,
संतती समस्या विशेतज्ञ
ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ, व्यसन मुक्ती औषध तज्ञ
(दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Weekly Love Horoscope 18 To 24 November 2024

Weekly Love Horoscope 18 To 24 November 2024: साप्ताहिक प्रेम राशीभविष्य १८ ते २४ नोव्हेंबर २०२४: मेषसह ३ राशींच्या नात्यात गैरसमज; या ३ लकी राशींना नोकरीत पदोन्नतीच्या संधी; गुरुपुष्य योगात होईल भरभराट! अनावश्यक वाद टाळा, 

Read More »

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!