Mrigashirsha Nakshatra, मृगशीर्ष नक्षत्र तील सर्व बारा ग्रहांची फले सर्व नक्षत्र तिल पाचवे नक्षत्र मृगशीर्ष चे, सर्व बारा ग्रह असल्यास काय फले देतात या बाबत माहिती पाहणार आहोत,
चार नक्षत्र मिळून एक राशी तयार होते, एक नक्षत्र सर्व ग्रह नुसार काय प्रभाव देतात ते पाहूया, ब्रह्मंडामध्ये अगणित तारेतारका, ग्रह, उपग्रह आहेत.
दुरून पाहिल्यावर तेथे तार्यांचे अनेक समूह दिसतात. या समूहांतून विविध आकृत्या तयार होतात. तार्यांच्या या समूहालाच नक्षत्र म्हणतात.
रवि :- Mrigashirsha Nakshatra
1)मृगशीर्ष नक्षत्रात रवि असेल आणि त्यावर चंद्राजी दृष्टी असेल तर पाण्याशी संबंधित व्यवसायातून जातक पैसा कमवितो.
त्याच्यावर कुटुंबातील स्त्रिया अवलंबून असतात.
2) मंगळाची दृष्टी या रविवर असेल तर ती व्यक्ति शक्तिमान असते. आपल्या शारीरिक शक्तीच्या जोरावर ती पैसा मिळवते.
3)बुधाची दृष्टी असेल तर व्यक्ती दिसायला सुंदर असते. बुद्धिवान, लेखक किंवा पत्रकार बनते.
4) गुरुची दृष्टी असेल तर शासन व सत्तेच्या निकट संपर्कात राहते. आणि विशेष लाभ मिळवते.
5) शुक्राची दृष्टी असेल तर पत्नीला नोकरी किंवा कामधंदा असतो. स्वतः जातक राजकारणात असतो.
6) शनिची दृष्टी असेल तर तो महाकंजूस व आपल्यापेक्षा वयाने वयस्कर स्त्रीशी विवाह करतो. संतती अल्प असते.
रवि मृगशीर्ष नक्षत्रातील प्रथम चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या प्रथम चरणात रवि असेल तर सुगंधी फुलांच्या शौकिन असतो.
तो भाग्यवान, बुद्धिवान आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा असतो.
त्याला मुले कमी असतात. त्याला चेहरा, गळा व डोळ्यांशी संबंधित असलेले रोग होतात.
रवि मृगशीर्ष नक्षत्रातील द्वितीय चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या द्वितीय चरणात रवि असेल तर जातक स्वच्छ कपडे धारण करणारा, तेजस्वी चेहऱ्याचा आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा असतो.
संगीतात रूचि असते. पाण्यापासून भय असते. व्याच्या पंचवीसाव्या वर्षाच्या सुमारास विवाह होतो.
रवि मृगशीर्ष नक्षत्रातील तृतीय चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या तृतीय चरणात रवि असेल तर जातकाचा आर्थिक क्षेत्रांशी संबंध येतो.
आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे तो सार्वजनिक क्षेत्रात उच्चपदी पोहोचतो.
त्याचा एक मुलगा वैज्ञानिक क्षेत्रात संशोधनाच्या कार्यात प्रशंसनीय कार्य करतो. नाक व दातांचे रोग अधून मधून त्रास देतात.
रवि मृगशीर्ष नक्षत्रातील चतुर्थ चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या चतुर्थ चरणात रवि असेल तर जातक लोकहिताची कामे करतो.
बुध या नक्षत्रात असून चंद्र ही या नक्षत्राच्या प्रथम चरणात असेल तर जातक महाविद्वान,
चांगले वक्तृत्त्व असणारा, धुरंधर ज्योतिषी असतो.
अशा जातकाला टॉन्सील्स व गळ्याचे विकार त्रसा देतात.
चंद्र :- Mrigashirsha Nakshatra
1)मृगशीर्ष नक्षत्रात चंद्र असून त्यावर रविची दृष्टी असेल तर जातक ग्रामीण क्षेत्रात राहून जमीनदार, धनवान व व्याज खाणारा बनतो.
2) या चंद्रावर मंगळाची दृष्टी असेल तर जातक आपल्या रखेल स्त्रीसाठी पत्नीचा त्याग करतो. आईशी क्रूरव्यवहार करतो.
3)बुधाची दृष्टी असेल तर आपल्याच जाती वंशात विवाह ठरतो. धन व पुत्राने प्रख्यात होतो.
4) शुक्राची दृष्टी असेल तर मातृपक्षाकडून धनप्राप्ती होते. जीवन सुखी असते.
5) शनिची दृष्टी असेल तर धनहीन, मातेला घातक असतो पण संतती आज्ञांकित असते.
चंद्र मृगशीर्ष नक्षत्रातील प्रथम चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या प्रथम चरणात चंद्र असेल तर जातक प्रसिद्ध विद्वान व कन्या संतती असलेला असतो.
त्याची पत्नी सुंदर, चांगल्या चारित्र्याची, राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधीत असते.
तीच्याकडून आर्थिक सहयोग मिळतो. जातकाचे डोळे कमकुवत असतात व सांधेदुखीचा त्रास होतो.
चंद्र मृगशीर्ष नक्षत्रातील द्वितीय चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या द्वितीय चरणात चंद्र असेल तर व लग्ग्रही याच नक्षत्रात असेल तर जातक चांगला कुळात जन्मलेला सभ्य पुरूष असतो.
याचा विवाह लवकर होतो. वैवाहिक जीवन सुखी असते.
उत्तरार्धात अस्थमा, क्षय, फुफ्फुसाचे आजार व हृदयरोजाचा त्रास होतो.
चंद्र मृगशीर्ष नक्षत्रातील तृतीय चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या तृतीय चरणात चंद्र असेल तर असा जातक प्रसिद्ध ख्यातिप्राप्त असतो.
उत्पन्न संतोषकारक असते. लहानपणी कष्ट पडतात.
आईच्या स्नेहाची छाया मिळत नाही. तंबाखु सेवनामुळे कँसर होण्याची शक्यता असते.
चंद्र मृगशीर्ष नक्षत्रातील चतुर्थ चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या चतुर्थ चरणात चंद्र असेल तर शरीर धडधाकट असते.
पाठीवर एखादे चिन्ह असते.
प्रसाधन किंवा रसायनाचा व्यापार करतो.
वैद्यकीय चिकित्सेच्या क्षेत्रात खूप पैसा मिळवतो.
फुफ्फुसाचे पाणी होण्याची व मासिकपाळी अनियमित असण्याची महिलांच्या बाबतीत जाणवते.
मंगळ :- Mrigashirsha Nakshatra
1)मृगशीर्ष नक्षत्रात मंगळ असून त्यावर रविची दृष्टी असेल तर जातक धाडसी व जंगलात राहणारा असतो. स्त्रियांची घृणा करतो.
2)चंद्राची दृष्टि असेल तर आईचा अनादर करतो आणि वेश्यागामी असतो. त्यामुळे त्याला अनेक संकटांशी मुकाबला करावा लागतो.
3) बुधाची दृष्टी असेल तर त्याच्याकडे थोडासा पैसा आणि अल्प संतती असते.
4) गुरुची दृष्टी असेल तर गाण्याबजावण्याचा शौकिन असतो. मित्रप्रेमी असतो.
5) शुक्राची दृष्टी असेल तर उच्च दर्जाचे राजकीय पद प्राप्त होते. सेनाधिकारी किंवा पोलीस अधिकारी असतो.
6) शनिची दृष्टी असेल तर गुंड व बदमाष आणि तडीपार झालेला असतो.
मंगळ मृगशीर्ष नक्षत्रातील प्रथम चरण फल –
मृशशीर्ष नक्षत्राच्या प्रथम चरणात मंगळ असेल तर जातक भरभर बोलणारा असतो.
पैशाचा नेहमी अभाव राहतो.
आवडत्या व्यक्तींच्या बाबतीत कर्तव्ये पार पाडण्याची जबाबदारी त्याच्यावर असते.
त्याचे स्वतःचे आयुष्य अल्पायु असते व आपली पत्नी अल्पावस्थेत भमावून बसतो.
लग्न विशाखा नक्षत्रात असेल तर जातक संतानहीन असतो.
आणि त्याला तीव्र ज्वर, टॉन्सिल्स, स्राव व ग्रंथीचे विकार होतात.
मंगळ मृगशीर्ष नक्षत्रातील द्वितीय चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या द्वितीय चरणात मंगळ असेल तर जातक आपल्या कुटुंबाला घातक ठरतो.
त्यांच्या दुष्कर्मामुळे त्याच्या कुटुंबाची बदनामी होते.
शनिची दृष्टी असेल तर जेलमध्ये जावे लागते.
काही असाध्य रोगांशिवाय त्याला अल्सर, वातरोग व हाडे किंवा कमरेची दुखापत असते.
मंगळ मृगशीर्ष नक्षत्रातील तृतीय चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या तृतीय चरणी मंगळ असेल आणि लग्नही मृगशीर्ष नक्षत्राच्या तृतीय चरणात असेल तर जातक गरीब कुटुंबात जन्मलेला असतो.
लहानपणी देवीचा आजार होतो. चेहऱ्यावर व्रण असतात. व्यवसायात चतुर असतो. वारंवार आजाराचा त्रास असतो.
मंगळ मृगशीर्ष नक्षत्रातील चतुर्थ चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या चतुर्थ चरणात मंगळ असेल तर जातक पैतृक दुःखांनी पीडित असतो.
पत्नीच्या आजारामुळे वैवाहिक सुखात न्यूनता येते. गळा व इतर नानाप्रकारचे रोग होतात.
बुध :- Mrigashirsha Nakshatra
1)मृगशीर्ष नक्षत्रात असून त्यावर चंद्राची दृष्टि असेल तर जातकाचे आरोग्य उत्तम राहते.
तो दानशूर व सन्मापप्राप्त असतो. आणि आपल्या कुटुंबाचा निर्वाह सहजरूपाने करतो.
2) रविची दृष्टी असेल तर उच्चशिक्षित, अध्ययन-अध्यापन करणारा व शासकीय नोकरीत असतो.
3) मंगळाची दृष्टी असेल तर भंडखोर व रागीट असतो.
4) गुरुची दृष्टी असेल तर जातकाला सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात तो व्यवसाय कुशल, भाग्यवान व महाश्रीमंत असतो.
5) शनिची दृष्टी असेल तर आर्थिक स्थिती दुर्बल असते. पावलागणिक संकटे उभी राहतात. इष्टमित्रांमुळे अडचणीत येतो.
बुध मृगशीर्ष नक्षत्रातील प्रथम चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या प्रथम चरणात बुध असेल तर जातक पवित्र आचरणाचा, विद्वान व श्रीमंत असतो.
जीवनाच्या उत्तरार्धात त्याला मानसिक असंतुलन व विसरण्याचा आजार होतो.
बुध मृगशीर्ष नक्षत्रातील द्वितीय चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या द्वितीय चरणात बुध असेल तर जातक खालच्या दर्जाच्या कामातून पैसा मिळवतो.
दुसऱ्यांचा पैसा व वैभव पाहून मत्सर होतो. अनेक मुले व एक मुलगी असते.
गळ्यात अवरोध, दातांचे रोग, सर्दी-पडसे-खोकला अशा आजाराने ग्रस्त होतो.
बुध मृगशीर्ष नक्षत्रातील तृतीय चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या तृतीय चरणात बुध असेल तर जातक बुद्धिवंत, धाडसी व आशावादी असतो.
तो स्त्रीप्रेमी व एकापेक्षा अधिक विवाह करणारा असतो.
वाणीत दोष असतो. फुफ्फुसे खराब झाल्याने क्षयरोगाची भिती असते.
बुध मृगशीर्ष नक्षत्रातील चतुर्थ चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या चतुर्थ चरणात बुध असेल तर जातक भाग्यवान, धर्मश्रद्धाळू.
मध्यम शिक्षित परंतु प्रयत्न परिश्रमाने यशाचे शिखर सर करणारा असतो.
आर्थिक क्षेत्रात हिशेबनीस, नौकरचाकरांनी युक्त उच्चाधिकारी असतो.
मानसिक असंतुलन, बोलण्यातील घाई किंवा शरीराला पंगुपणा असे रोग होतात.
गुरु :- Mrigashirsha Nakshatra
1)मृगशीर्ष नक्षत्रात गुरु असून त्यावर रविची दृष्टी असेल तर जातक धन संपदा, स्थावर घर, पद-प्रतिष्ठा व नौकर चाकरांनी युक्त असतो.
तो उच्चाधिकारी व राज्यसत्तेच्या निकट संपर्कात राहतो.
2) चंद्राची दृष्टी असेल तर जातक कोट्यावधीश, संपत्तिवान, भोगविलासी व पैसा उडचणारा, आचरणहीन असतो.
3) बुधाची दृष्टी असेल तर जातक भाग्यवान, धाडसी, विद्वान परंतु कौटुंबिक दृष्ट्या त्रस्त असतो.
बुधाची दृष्टी असेल तर उच्चशिक्षित, आचरणाने पवित्र, व धनसंपदायुक्त असतो.
4) शुक्राची दृष्टी असेल तर सन्मान, व्यक्तिमत्त्वाने युक्त, संभ्रात कुटुंबातील असतो. महिलोपयोगी वस्तुंच्या व्यापारात पैसा मिळवतो.
5) शनिची दृष्टी असेल तर अनेक भाषा जाणणारा असतो.
स्वबुद्धिमुळे तो प्रशंसा व संपत्ति प्राप्त करतो. परंतु पत्नी कठोर स्वभावी असते.
गुरु मृगशीर्ष नक्षत्रातील प्रथम चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या प्रथम चरणी गुरु असेल तर जातक अस्थिर बुद्धीचा असतो.
मात्र त्याला शिकण्याची आवड असते. गोल गरगरीत शरीराने युक्त, धन, यश व ख्याति मिळवणारा असतो.
तरी सुद्धा तो संतुष्ट नसतो.
लग्न सुद्धा मृगशीर्ष नक्षत्रच्या प्रथम चरणी असेल तर जातक गौरवर्णीय, सुंदर डोळे असलेला प्रसिद्ध असतो.
हातापायात गांठी होणे, कुबड येणे किंवा अपघातामुळे अपंग बनणे संभवते.
गुरु मृगशीर्ष नक्षत्रातील द्वितीय चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या द्वितीय चरणात गुरु असेल तर सत्ता व राजकारणामुळे उच्चपदस्थ लोकांशी संपर्क ठेवतो.
लग्न सुद्धा याच नक्षत्र चरणात असेल आणि गुरुचा संयोग असेल तर जातक उच्च शिक्षा विभूषित,
विद्वान व आकर्षक व्यक्तिमत्वाचा असतो.
गुरु मृगशीर्ष नक्षत्रातील तृतीय चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या तृतीय चरणात गुरु असेल तर जातक संतती व पत्नीमुखात न्यूनता असते
चमडी जाय पर दमडी न जाय या म्हणी प्रमाणे वागणारा असतो.
खूपच स्वार्थी, कुटुंबातील लोकांवर सुद्धा संशय ठेवणारा असतो.
रक्तदोष किंवा हृदयविकाराचा त्रास असतो.
गुरु मृगशीर्ष नक्षत्रातील चतुर्थ चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या चतुर्थ चरणात गुरु असेल तर जातक श्रीमंत असतो.
सरकारकडून पद-प्रतिष्ठा लाभते. इतरांना सहजगत्या समजणारा चिकित्सक किंवा महाविद्वान असतो.
डोळे व उदर विकार होतो.
शुक्र :- Mrigashirsha Nakshatra
1)मृगशीर्ष नक्षत्रात असून त्यावर रविची दृष्टी असेल तर जातकाला सुंदर व भाग्यवान पत्नी मिळते. पत्नीमुळे धन-संपत्ती मिळते.
2)चंद्राची दृष्टी असेल तर जातकाची आई समाजात उच्चपद सुशोभित करते. यामुळे जातकाला सुद्धा प्रसिद्धी मिळते.
3) मंगळाची दृष्टी असेल तर विवाहात फसगत होते. त्याचा पैसा स्वस्त आचारणाच्या स्त्रियांवर खर्च होतो.
4) बुधाची दृष्टी असेल तर जातक सदैव प्रसन्न, सुखी व भाग्यवान असतो.
5) गुरुची दृष्टी असेल तर संतती, स्त्रीसुख व पैशाने युक्त असतो.
6)शनिची दृष्टी असेल तर सासुरवाडी पक्षाकडून दुःखी, पत्नी व कुटुंबियांकडून त्रस्त असतो.
शुक्र मृगशीर्ष नक्षत्रातील प्रथम चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या प्रथम चरणात असेल तर जातक संगीत व ललित कलानिपूण असतो.
व कलाकार किंवा अभिनेता म्हणून पैसा मिळवतो. भोगविलास व इंद्रियसुखाचा भोका असतो. कला व संगीताचा शासकीय पुरस्कार मिळतो.
शुक्र मृगशीर्ष नक्षत्रातील द्वितीय चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या द्वितीय चरणात शुक्र असेल तर जातक नेहमी स्रियांच्या घोळक्यात राहतो.
आपल्या जवळ जे कांही असेल ते गरजवंताना देऊन टाकतो.
त्याचे आरोग्य चांगले असते परंतु मूत्ररोग, सूज, फुफ्फुसांचा क्षय, व वातरोगाचा त्रास संभवता असतो.
शुक्र मृगशीर्ष नक्षत्रातील तृतीय चरण फल –
मृगनक्षत्राच्या तृतीय चरणात शुक्र असेल तर जातक शास्त्रात प्रवीण व नृत्यसंगीतादि कलेतून पैसा मिळवतो.
पापग्रहांची दृष्टी या शुक्रावर असेल तर दोन विवाह होतात.
शुक्र दशेची चांगली फले अनुभवास मिळतात. तेराव्या वर्षी भाग्याचा तारा चमकतो.
इतर आयुष्य संमिश्र जाते.
यदाकदा डोकेदुखी व किडनीचा रोग संभवतो.
शुक्र मृगशीर्ष नक्षत्रातील चतुर्थ चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या चतुर्थ चरणात शुक्र असेल तर जातक चारित्र्यवान असतो.
ठेंगणा व मध्यम शरीरयष्टीचा असा जातक कवी किंवा लेखक बनतो.
चेहऱ्यावर तिळ किंवा व्रण आढळतो. लग्न पुष्प नक्षत्रात असेल तर दोन विवाह होतात किंवा पत्नी खेरीज अन्यत्र स्त्री संबंध असतो.
याला गुल्मरोग व टॉन्सिल्सचा त्रास संभवतो.
शनि :- Mrigashirsha Nakshatra
1)मृगशीर्ष नक्षत्रात असून त्यावर रविची दृष्टी असेल तर जातक वेदशास्त्रांचा अभ्यास करणारा असतो. दुसऱ्यांचा आश्रित म्हणून जीवन जगतो.
2)चंद्राची दृष्टी असेल तर उच्चपद प्राप्त होते. राजकीय किंवा सरकारी संस्थेचा अध्यक्ष बनतो.
3)मंगळ या शनिला पहात असेल तर सेना किंवा पोलीस अधिकारी बनतो. त्याचे कुटुंबही एक… आदर्श कुटुंब असते.
4)बुधाची दृष्टी असेल तर जातक महिला वर्गात कार्य करतो. आपल्या वाईट कृत्यामुळे चर्चेचा विषय बनतो.
5)गुरुची दृष्टी असेल तर समान रीतीने दुःख सुखाचा भागीदार बनतो. आणि दुसऱ्यांना मदत करण्यात मागेपुढे पहात नाही.
6)शुक्राची दृष्टी असेल तर जमीनदार व राज्याधिकाऱ्यांचा मित्र बनतो. मांस-मदिरेचा शौकिन असतो.
शनि मृगशीर्ष नक्षत्रातील प्रथम चरण फल –
जर मृगशीर्ष नक्षत्राच्या प्रथम चरणात असेल तर जातक उंचापूरा परंतु आखूड खांद्याचा असतो.
वर्णकाळा असतो. केंस कुरळे असतात.
गरीब असतो परंतु शुक्राची किंवा गुरुची दृष्टी असेल तर विवाह करतो.
पण पत्नी कुलटा मिळते. लहानपणी आरोग्य चांगले नसते. दात किंवा केस अवेळी झडतात.
शनि मृगशीर्ष नक्षत्रातील द्वितीय चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात शनि असेल तर जातक खर्चिक व वाईट संगतीत राहून पैशाचा अपव्यय करणारा असतो.
खूप कामे करतो पण यशस्वी होत नाही ज्या वेगाने पुढे जातो त्याच वेगाने खाली आपटतो. भोगविलासात पैसा उधळून कंगाल बनतो.
शनि मृगशीर्ष नक्षत्रातील तृतीय चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या तृतीय चरणात शनि असेल तर व त्याचे लग्न उत्तराभाद्रपदा नक्षत्रात असेल
तर अशी स्त्री जातक आपल्या कुळाला कलंक लावते.
पुरूष जातक पोलीस डिपार्टमेंट किंवा तुरूंग अधिकारी किंवा सुरक्षाधिकारी म्हणून काम करून उदरनिर्वाह चालवतो.
शनि मृगशीर्ष नक्षत्रातील चतुर्थ चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या चतुर्थ चरणात शनि असेल तर जातक विकलांग बनतो.
जन्माच्या वेळी किंवा कालांतराने विकलांग होतो.
जातक धार्मिक असतो, परंतु जन्मस्थानापासून दूर ठिकाणी गुप्तपणे पापकृत्ये करतो. त्याला अस्थमा किंवा फुफ्फुसाचा रोग होणे शक्य असते.
राहू :- Mrigashirsha Nakshatra
राहू मृगशीर्ष नक्षत्रातील प्रथम चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या प्रथम चरणात राहू असेल तर जातकाची आर्थिक स्थिती उत्तम राहते, प्रशंसनीय कामे त्याच्या हातून होतात.
त्याला संसर्गजन्य रोग किंवा सफेद डाग अथवा पोटाचे विकार होतात.
राहू मृगशीर्ष नक्षत्रातील द्वितीय चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या द्वितीय चरणात राहू असेल तर जातक बुद्धिहीन, रागीट, व भांडखोर असतो, परंतु त्याच्या भाग्याने अकस्मात् धनलाभ होतो.
राहू मृगशीर्ष नक्षत्रातील तृतीय चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या तृतीय चरणात राहू असेल तर जातक लोभी बनतो.
तो खालच्या पातळीची कामे करतो.
आपल्या अशोभनीय कृत्याने सर्वांना नाराव करतो.
दुसयांची धनसंपदा पाहून त्यांचा मत्सर करतो. सदैव त्याला शत्रूंची भीती असते. स्वकर्माने अवनीतीकडे जाणारा, पोलियोग्रस्त व हातपाय तोडून घेणारा असतो.
राहू मृगशीर्ष नक्षत्रातील चतुर्थ चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या चतुर्थ चरणात राहू असेल तर जो जातक शोधकार्य करणारा विद्यार्थी असतो, याची संतती आज्ञांकित असते.
त्याचे चारित्र्य संशयास्पद असते व तो खीचा गुलाम असतो.
केतु :-
केतु मृगशीर्ष नक्षत्रातील प्रथम चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या प्रथम चरणी केतु असेल तर जातक जीवनात अनेक चह उतार पाहणारा,
अधिक संतती असलेला, स्वप्रयत्नाने कमी प्रमाणात पैसा मिळतो.
परंतु आपल्या संततीच्या माध्यमातून वृद्धावस्था आर्थिक दृष्ट्या चांगली जाते. त्याला दृष्टीदोष किंवा डोळ्याचे विकार होतात.
केतु मृगशीर्ष नक्षत्रातील द्वितीय चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या द्वितीय चरणी केतु असेल तर जातक शरीराने विकलांग परंतु बुदिने महाविद्वान बनतो.
तो विकलांगासाठी कार्य करतो. गळा किंवा जीभेचे विकार संभवतात.
केतु मृगशीर्ष नक्षत्रातील तृतीय चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या तृतीय चरणी केतु असेल तर असा जातक सदैव दुसयांची निंदा-या करण्यात दंग असतो,
त्याला वातरोग किंवा खाखरू सारखे रोग होतात.
केतु मृगशीर्ष नक्षत्रातील चतुर्थ चरण फल –
मृगशीर्ष नक्षत्राच्या चतुर्थ चरणी केतु असेल तर जातक भांडखोर व पापकृत्ये करणारा, नीच आचरणांचा बऱ्याच रोगांनी पोडलेला व धनहीन राहतो.
आपल्या अयोग्य कार्यामुळेच तो दरिद्री बनतो. मृगशीर्ष नक्षत्राच्या २८,२९ अंशावर बर मंगळ किंवा गुरु असेल तर जातकाच्या जीवनाला धोका असतो.
गोचर भ्रमणात जेव्हा चंद्र व मंगळ मृगशीर्ष नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात अंतिम अंशात आले तर दुर्घटना इत्यादिमुळे त्रास होतो.
हर्षल – नेपच्यून –
मृगशीर्ष नक्षत्रात हर्षल किंवा नेपच्यून असेल तर जातक कुटिल कारस्थानी, कामातूर, मध्यम विद्याबुद्धि युक्त, गावंढळ, काबाडकष्ट करणारा मध्यमवर्गी असतो. Mrigashirsha Nakshatra
बुध-शुक्र गुरु यांची हर्षल नेपच्यून संयोगाची उत्तम फळे मिळतात तर शनि, मंगळ हर्षलची फळे चांगली मिळत नाहीत.
प्लुटो –
मृगशीर्ष नक्षत्रात प्लुटो असेल तर जातक कामातूर, कुटिल, रोगी, विद्याबुद्धी कमी, गांवढळा, शेती करणारा व मध्यम वर्गीय असतो.
माझे मनोगत –
मृगशीर्ष नक्षत्रात जन्मलेल्या स्त्री-पुरूषांनी पुनर्वसु, विशाखा, पूर्वाभाद्रपदा, आश्लेषा, ज्येष्ठा, रेवती, पूर्वा, पूर्वाषाढा, भरणी नक्षत्रात जन्मलेल्या स्त्रीपुरूषांशी देणे घेणे भागीदारी किंवा विवाह करू नये.
मार्गदर्शन :-
ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!
आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.
(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
अधिक माहिती साठी संपर्क :-
श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,(संतती समस्या निवारण विशेतज्ञ)