Patrika Julat Nahi, पत्रिका जुळत नाही, त्यामुळे लग्न जुळत नाही, पण नक्की कुंडली का जुळत नाही, या गोष्टीचा नेमका अर्थ काय असतो.?

Patrika Julat Nahi
श्रीपाद गुरुजी

हिंदू विवाह पद्धत आणि जन्मपत्रिका :- Patrika Julat Nahi

Patrika Julat Nahi, हिंदू विवाहप्रक्रियेतील पहिला टप्पा (की अडथळा?) म्हणजे कुंडली किंवा जन्मपत्रिका जुळवणं होय. कोणताही विवाह जमवण्याआधी कुंडलींची देवाण-घेवाण ठरलेलीच.कुंडलीमध्ये एखाद्या ग्रहाचं स्थान जरी पुढे-मागे असल्यास चर्चेचे सगळेच मार्ग बंद केले जातात.

मग ‘स्थळ’ किती जरी ‘सोन्यासारखं’ असलं तरी पत्रिकेची रवानगी पुन्हा गुरूजींच्या ‘शबनम’ बॅगेत होते.हिंदू विवाहपद्धतीतील हुंडा देण्या-घेण्यासारख्या अनिष्ट प्रथेवर पितृसत्ताक मानसिकतेतून आलेली प्रथा म्हणून टीका केली जाते.

पण याच व्यवस्थेत पत्रिका पाहणं ही कदाचित अशी गोष्ट असावी, ज्याची चर्चा करताना दोन्ही बाजू एकाच पातळीवर आलेल्या असतात.रास, नाडी, गण, नक्षत्रं, मंगळादी ग्रहांचं स्थान यांचा ऊहापोह करून अखेर गुण तपासले जातात.या अग्निपरिक्षेतून सुटून अलगद बाहेर आलेल्या दोन जीवांनाच मिलनाची परवानगी मिळते.

हिंदू धर्मामध्ये विवाह करताना वर आणि वधूची पत्रिका (कुंडली) जुळवली जाते.यामध्ये दोन्ही पक्षातील म्हणजेच वर आणि वधूचे किती गुण जुळतात हे पाहिलं जातं.याच आधारावर त्यांचं लग्न शक्य आहे की नाही हे ठरवलं जातं.ज्योतिषशास्त्रानुसार लग्न जुळवण्यासंदर्भातील एकूण ३६ गुण आहेत.वर आणि वधूचे लग्न होण्यासाठी कमीत कमी १८ गुण जुळणं आवश्यक आहे.

पत्रिकेमधील किमान १८ गुण जळले तरच लग्न होऊ शकतं नाहीतर लग्न लागू शकत नाही असं सांगितलं जातं.दोघांचेही वैवाहिक आयुष्य सुखी, सामाधानी असावं यासाठी पत्रिका जुळवून पाहिल्या जातात.अनेकदा पत्रिका जुळत नसल्याने लग्न जुळत नाही वगैरे असं आपण ऐकतो.पण पत्रिकेमध्ये जुळवण्यात येणारे हे ३६ गुण नक्की असतात तरी काय आणि पत्रिका जुळवताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात जाणून घेऊयात…

ते ३६ गुण कोणते. :- Patrika Julat Nahi

विवाह जुळवण्यासाठी पत्रिकेमधील अष्टकूट गुण जुळतात की नाही ते पाहिलं जातं.यामध्ये नाडीसंदर्भातील आठ गुण, भटूकचे सात गुण, गण मैत्रीसंदर्भातील सहा गुण, ग्रह मैत्रीसंदर्भातील पाच गुण, योनि मैत्रीसंदर्भातील चार गुण, ताराबलाचे तीन गुण, दोन गुण वश्य आणि एक गुण वर्षाचा असतो. या प्रकारे एकूण ३६ गुणांची तुलना करुन ते जुळतात की नाही हे पाहिलं जातं.

हे ही वाचा :- विवाह गुण मेलन पद्धत,

गुण मिलन :- Patrika Julat Nahi

गुण मिलन करतानाचे सर्वच तांत्रीक गोष्टी इथे सांगणे शक्य होणार नाहीतरी सुद्धा गुण मिलन म्हणजे नेमक कायआणि ते कशावरून पाहतात हे या उत्तरावरून नक्कीच समजेल.

1(1 गुण) :- या प्रकारात 12 राशींची 4 चार प्रकारच्या वर्णात विभागणी केली आहे, विप्र, क्षत्रीय वैश्य शुद्र.. अध्यात्मीक पातळीवर यांची विभागणी केली आहे.

उदा. विप्र वर्णाची वक्ती ही क्षत्रीय वर्णाच्या तुलनेत अध्यात्म्याकडे जास्त झुकलेली असते.

2) वश्य (2 गुण) :- या प्रकारात चंद्र नक्षत्रानुसार स्वभाव वैशीष्ट्ये एकमेंकासाठी अनुकूल आहेत का? ते पाहीले जाते. यात जलचर, वनचर, किटक, मानव, चतुष्पाद, यानुसार विभागणी केली जाते. उदा. किटक (वृश्चीक) आणि चतुष्पाद (मेष, वृषभ) ही जोडी जास्त संयुक्तीक ठरेल.

3) तारागुण (3 गुण):- याला नक्षत्रगुण असेही म्हणतात, वधू वरांची चंद्रकुंडली आधारीत जन्मनक्षत्र एकमेकांपासून किती अतंरावर आहेत ते पाहीले जाते, आलेल्या उत्तराला 9 ने भागतात, उत्तर 3 किंवा 5 किंवा 7 आले नसेल तर ती ते दोन्ही जन्मनक्षत्र एकमेंकासाठी पुरक आहेत अस मानतात.

4) योनी (4 गुण) :- टोटल 14 योनी आहेत. जातकाचा जन्म नेमक कोणत्या योनीवर झाला आहे ते पाहतात. त्याचा बेसीक स्वभाव त्यानुसार असतो, वधू वर हे एकमेकांसाठी शारीरीक दृष्ट्या पुरक आहेत का, त्यांच्यात परस्पर आकर्षण टिकेल का.. इत्यादी गोष्टी ह्यावरून पाहतात कारण लग्नसंस्थेचा बेसीक पायाच तो आहे. तु्म्ही ज्योतीष नसलात तरीही नुसत्या नावावरून बरीच कल्पना येईल. अश्व, गज, मेष, सर्प, श्वान, मार्जार, गौ, व्याघ्र, वानर, मंगुस, सिंह, मृग, उंदीर,

हे हि वाचा :- लग्न कुंडली कशी पाहावी, कसा पहावा विवाह योग.

निम्म्न गुण :- Low Marks Patrika Julat Nahi

5) ग्रह मैत्री (5 गुण) :- चंद्र राशी वरून ग्रहांची एकमेकांशी मैत्री आहे की शत्रुत्व आहे, ते पाहीले जाते., उदा. रवी-शनी एकमेकांचे कट्टर शत्रु आहेत, किंवा रवी-मंगळ हे एकमेकांचे परम मित्र आहेत..

6) गण(6 गुण) :- टोटल तीन गण आहेत, 1) देवगण 2) मनुष्य गण 3) राक्षस गण. कोणत्या नक्षत्रावर जन्म आहे, त्यावरून हे ठरते. योनी प्रमाणे ह्याचाही विचार स्वभाव कसा असेल यावर ठरतो.

नक्षत्रांचा विचार केला तर राक्षस गणाचे मनुष्य गणांशी अजिबात जमत नाही.. कोणत्या गणांत कोणती नक्षत्रे येतात आणि त्यांचे का एकमेंकाशी पटत नसेल, हा एक वेगळा प्रश्न होईल, खुप मोठ उत्तर आहे यांच,,

7) राशी कुट (7 गुण) :- वधू वरांची चंद्र राशी एकमेकापांसून कितव्या स्थानावर आहे त्यानुसार हे गुण दिले जातात, या राशी एकमेकापासून 6 किंवा 8 स्थानी असेल तर मृत्यूषडाष्टक योग होतो.. तसेच नवीन संशोधनानुसार राशी एकमेकांपासून 12 वी रास येत असेल तर वैवाहीक सौख्याला हे सगळ मारक ठरत.

उदा. मेष राशी म्हणजे एक घाव दोन तुकडे हा स्वभाव त्यापासून सहावी रास कन्या येते, कन्या म्हणजे वाटाघाटी,, यालाच मृत्यूषडाष्टक योग म्हणतात..

8) नाडी (8 गुण) :- एकूण तीन नाडीचे प्रकार प़़डतात, 1) आद्य 2) मध्य 3) अंत्य,. शारीरीक संरचना (अंतर्गत) आणि आनुवांशीकाता याचा विचार यात केला जातो.

यालाच आयुर्वेदात कफ, पित्त, वात, या तिन प्रकारात विभागले आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार भिन्न नाडी या एकमेकांसाठी पुरक असतात..

हे हि वाचा :- विवाह व एक नाडी दोष.

गुण का जुळवले जातात. ? :- Patrika Julat Nahi

लग्नानंतरही वर आणि वधू एकमेकांसाठी अनुकूल जोडीदार ठरावेत, त्यांच्या संतती आणि संपत्तीमध्ये वाढ व्हावी, त्यांना दिर्घायुष्य मिळावं यासाठी दोघांचे ३६ गुण जुळवून पाहिले जातात.मुहूर्तचिंतामणि ग्रंथामध्ये अष्टकूटमधील वर्ण, वश्य, तारा, योनि, ग्रह मैत्री, गण, भटूक, नाडी या गुणांचा विचार केला जातो.

किती गुण जुळल्यास लग्न होतं. ? :-

लग्न ठरवण्यासाठी वर आणि वधूचे किमान १८ गुण जुळणे आवश्यक असतं. किमान १८ आणि त्यावर कितीही गुण जुळले तरी लग्न लावता येतं असं म्हणतात.एकूण ३६ गुणांपैकी १८ ते २१ गुण जुळल्यास त्याला मध्यम मिलन असं म्हटलं जातं.

याहून अधिक गुण जुळत असतील तर त्याला शुभ मिलन विवाह असं म्हणतात.कोणत्याही वधू आणि वराचे सर्वच्या सर्व म्हणजे ३६ गुण जुळणं हे अत्यंत दुर्लभ मानलं जातं. धार्मिक मान्यतांनुसार भगवान श्रीराम आणि सीतामातेचे ३६ गुण जुळले होते.

हे हि वाचा :- कालसर्प योग,सुखकारक कि दुखकारक.

पत्रिका जुळत नाही म्हणजे काय. ? :- Patrika Julat Nahi

जेव्हा वधू आणि वर या दोघांच्या पत्रिकेमधील १८ हून कमी गुण जुळतात तेव्हा त्याला पत्रिका जुळली नाही असं म्हणतात.१८ हून कमी गुण जुळणाऱ्यांनी लग्न करु नये असं म्हटलं जातं. अशा पत्रिका न जुळलेल्या व्यक्तींनी लग्न केल्यास त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी येतात अशं म्हटलं जातं.

पत्रिका जुळवताना काय लक्षात घेतलं पाहिजे. ? :- Patrika Julat Nahi

पत्रिका जुळवताना एखाद्याच्या पत्रिकेत मंगळ असेल तर अशा व्यक्तीची पत्रिका मंगळ असणाऱ्या व्यक्तीशीच जुळवली पाहिजे.सामान्य पत्रिका असणाऱ्या व्यक्तीने पत्रिकेत मंगळ असणाऱ्या व्यक्तीशी लग्न करु नये असं सांगितलं जातं.

लवकरात लवकर लग्न होण्यासाठी. ? :- Patrika Julat Nahi

सगळ्या प्रकारच्या शांत्या, पूजा-पाठ, व्रत-वैकल्ये करून झालंय तरी पण फरक पडत नाही, असं जेव्हा लोक म्हणतात तेव्हा अंशात्मक कुंडल्यात त्यांच्या प्रश्नांची उत्तरे सापडतात. लग्न कधी होणार यासाठीच्या कालनिर्णयात ‘ग्रहदशा’ आणि ‘ग्रहांचे भ्रमण’ या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. 

काही काही लोक ग्रहांची महादशा बघून थांबून राहतात. पण पत्रिकेतील अंतर्दशेचा प्रभाव सुद्धा जास्त असतो.लग्न जमताना ती सुद्धा  महत्त्वाची असते. तुम्ही जर महादशेचीच वाट पहात बसलात तर पत्रिकेतील लग्नाचे योग असलेली अंतर्दशा सुद्धा निघून जाते.

हे हि वाचा :- विवाहातील अडथळा – मंगळ दोष

माझा अनुभव :- My Experience

मागे एकदा लग्नाच्या केस मध्ये २००७-०८ च्या आसपास एका मुलीच्या पत्रिकेत सगळे योग जुळून आले होते,लग्नासाठी अनुकूल अशी खूप लाभकारक आणि अचूक ग्रहदशा मिळाली होती,पण त्यांचे वडील आजारी होते म्हणून नंतर लग्न करू असं त्या म्हणाल्या आणि ते प्रकरण मागे पडलं. पुढे मी पण विसरून गेलो.

वर्षभरानंतर त्यांनी मला विचारलं तेव्हा मी पुन्हा पत्रिका पाहिली तर दशा संपून गेली होती.मी सांगितलं कि आता चालू असलेल्या दशेत लग्न करू नका.तरी त्यांनी लग्न केलं आणि १.५ वर्षांत घटस्फोट झाला.आणि त्यांना चालू असलेल्या ग्रहाची दशा संपण्याची वाट पहात बसावे लागले.एवढ्यासाठी वेळच्या वेळी गोष्टी करून घ्याव्यात.

या विवाह मार्गदर्शनाचे फायदे काय. ? :- Patrika Julat Nahi

तुमच्या पत्रिकेतील लग्नाला कारणीभूत असलेल्या ग्रहांची भ्रमणे पाहता लग्नाचे योग कधी आहेत हे कळेल.लग्नासाठी योग्य स्थळाचा शोध कुठे व कशाप्रकारे घ्यावा हे कळेल.

सगळ्यात मोठा हा फायदा हा आहे कि कशामुळे लग्न जमत नाही ह्यामागचं मूळ कारण कळेल,  नेमक्या काय अडचणी आहेत? ठरलेलं लग्न का मोडतंय? नकार का येतो? आणि मग काय केलं म्हणजे लग्न जमेल हे कळेल.

हे हि वाचा :- विवाह जुळविताना कुंडली अडसर की मार्गदर्शक.?

या विवाह मार्गदर्शनात विशेष काय आहे. ? :- Patrika Julat Nahi

या मार्गदर्शनात मी जन्मकुंडलीच्या जोडीने अंशात्मक कुंडल्यांचा देखील अभ्यास करतो.या अंशात्मक कुंडल्या  तुमच्या मार्गातील अडथळे दूर करून तुम्हाला योग्य दिशा दाखवतात.  आपली जन्मकुंडली आपल्याला आपल्या जन्माच्या वेळी अंतराळात ग्रहांची स्थिती कशी होती, कुठले ग्रह कुठल्या राशीत व नक्षत्रात होते हे दर्शवते.आणि त्या कुंडलीचे सुक्ष्म भाग पाडून अंशात्मक कुंडल्या तयार केल्या जातात.

त्याच्यामुळे आपल्याला आपल्या जन्म कुंडलीत दिलेल्या गोष्टींचा आपल्याला नेमका कधी व कसा फरक पडणार आहे हे कळतं.म्हणजे ग्रहांचे योग, दृष्टी आणि युती यांचा नेमकं काय फळ मिळणार यासाठी अंशात्मक कुंडल्यांचा अभ्यास महत्त्वाचा असतो. पराशर ऋषींनी त्यांच्या ‘बृहत पराशर होरा शास्त्र’ या प्राचीन ज्योतिषविषयक ग्रंथात याविषयीचे सगळे नियम सविस्तरपणे मांडून ठेवलेले आहेत. त्यांच्या आशीर्वादाने व श्री स्वामी समर्थ कृपेने मी हे मार्गदर्शन करतो म्हणून हे विशेष आहे.

हे हि वाचा :- विवाह मुहूर्ताची कुंडली कशी असावी,?

मार्गदर्शन :-

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!

अश्याच नवनवीन लेख ची सूचना आपल्याला वेळोवेळी मिळत राहावी या साठी खालील WhatsApp वर क्लिक करावे.

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित 
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997 9423270997 
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन, (संतती समस्या विशेतज्ञ)
सामुद्रिक ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ , व्यसन मुक्ती औषध तज्ञ
( दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!