Rohini Nakshatra, रोहिणी नक्षत्रातील सर्व बारा ग्रहांची फले,

Rohini Nakshatra
श्रीपाद गुरुजी

Rohini Nakshatra, रवी :- Rohini Nakshatra

Rohini Nakshatra,1)रोहिणी नक्षत्रात रवि असून त्यावर चंद्राची दृष्टी असेल तर जातक स्त्रियांची सेवा करण्यात तरबेज असतो.

या कार्यातून पैसा मिळवण्याव्यतिरिक्त तो पाण्यासंबंधी व वाहतूकीच्या कामातूनही पैसा मिळवतो.

2) मंगळाची दृष्टी या रवीवर असेल जातक युद्धकलानिपुण, धन व प्रतिक्षेने युक्त असतो.

3) बुधाची दृष्टी असेल तर ललित कलांच्या माध्यमातून पैसा मिळतो.

4) गुरुची दृष्टी असेल तर समाजाचा पुढारी बनतो व सत्ताधारी पक्षाकडून लाभान्वित होतो. जनसामान्यात खूप मोठी कीर्ति न नाव मिळवतो.

5) शुक्राची दृष्टी असेल तर जातक सुंदर, आकर्षक, सुंदर डोळ्यांनीयुक्त मधुरभाषी, योग्य पुरूष असतो. मित्र व शत्रूची संख्या सारखीच असते.

6) शनिची दृष्टी असेल तर कमकुवत शरीराचा, आर्थिक अडवणीतून उदरनिर्वाह करणारा, गरीब व पत्नीचा नेहमी प करणारा असतो.

रवी रोहिणी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या प्रथम चरणी रवि असेल तर जातक चलाख व बुद्धिमान असतो.

आपल्या कपड्यांकडे विशेष लक्ष देतो. पशुधन हत्ती, घोडे, मेंढ्या, शेळ्या इत्यादिकडून फायदा होतो.

तो समाजसेवी व गुप्तरोगाने पीडित असतो.

रवी रोहिणी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

रोहीणी नक्षत्राच्या द्वितीय चरणात रवि असेल तर जातक प्रभावी व आनंदी व्यक्तिमत्त्वाचा असतो तो तरलपदार्थ किंवा तेल-तूपाचा व्यापार करतो.

तो कधीही आपल्या घरापासून दूर गंगानदी वा इतर पवित्र नदीत स्नान करीत नाही.

फिट येणे, पित्त पेडणे, डोके दुखी हे रोग त्याला केव्हाही होऊ शकतात.

खोल पाण्यात किंवा तलाव, नदी, समुद्रात पोहण्याचा प्रयत्न करू नये.

मंगळ याच नक्षत्रात असेल तर जातक सेना किंवा पोलिस अधिकारी किंवा संपर्क अधिकारी बनतो.

रवी रोहिणी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या तृतीय चरणक्ष रवि असेल तर जातक जनहिताची कामे करून त्यातूनच पैसा मिळवतो.

उचक्या लागणे, अपचन होणे असे विकार त्याला अस्त करतात.

स्त्रियांच्या बाबतीत अनियमित मासिक धर्माची तक्रार राहते. पाण्यापासून धोका असतो.

रवी रोहिणी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

रोहिणी नक्षत्रात चतुर्थ चरणात रवि असेल तर जातक सरकारी नोकरी करतो, खूप प्रवास करावा लागतो.

पत्नीचा गुलाम असतो. स्त्री जातक पुरूषाच्या हातातील बाहुली बनते,

चंद्र :- Rohini Nakshatra

1)रोहिणी नक्षत्रात चंद्र असेल व त्यावर रविची दृष्टी असेल तर असा जातक कृषि “विषयक कार्यातून,

जादूटोणा व रहस्यपूर्ण ज्ञानाच्या माध्यमातून विशेष धन मिळवतो.

2) मंगळाची दृष्टी असेल तर विभिन्न लिंगी व्यक्तींना आकर्षित करतो.

चांगल्या आवरणाचा अशी व्यक्ती कुटुंबाला विशेष प्रिय असते.

3) बुधाची दृष्टी असेल तर सर्व विषयांचे जुजबी ज्ञान असते. विद्वान असतो. आयुष्याच्या मध्यात उपजीविका मिळवण्यात यशस्वी होतो.

4) गुरुची दृष्टी असेल तर धार्मिक विचारांचा, मातृपितृभक्त असतो.

5) शुक्राची दृष्टी असेल तर भौतिक सुख, अलंकार, वाहन व पाळीव प्राण्यापासून सुख मिळते.

6) शनिची दृष्टी असेल तर लहानपणीच आईचा विरह होतो आणि वडिलांकडून विशेष लाभ मिळत नाही.

चंद्र रोहिणी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या प्रथम चरणात असेल तर जातक प्रसन्नवदनी, मधुरभाषी, सदगुणी व परिश्रमी असतो.

तो पशुपालन, डेअरी उद्योग, गुळ-साखर, तूप तेल इत्यादिंच्या व्यापारातून पैसा कमवितो.

कान, नाक व दातांचे विकार होतात. भावंडाची अधिकता असते.

चंद्र रोहिणी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या द्वितीय चरणात चंद्र असेल तर जातकाची संगीत व ललित कला मध्ये विशेष रूचि असते.

हॉटेल, रेस्टॉरंट, डायनिंगहॉल, गेस्टहाऊस व पर्यटन सेवेतून पैसा मिळवतो.

शिक्षणात खंड पडतो. घर बारवार बदलावे लागते.

अशा खिया धोका पत्करण्यात व जुगार सट्टा आदित प्रवृत्त असतात. पुरुषाला अधिक पुत्र व स्त्रीला अधिक मुली होतात.

चंद्र रोहिणी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या तृतीय चरणात चंद्र असेल तर अशी व्यक्ती सुखी जीवन जगते.

त्याचा व्यवसाय महिला वर्गाशी संबंधित असतो.

पाणी व इतर तरल पदार्थांच्या व्यवासयातून पैसा मोठ्या प्रमाणात मिळतो.

आकर्षक व्यक्तिमत्त्व, अद्भूत स्मरणशक्ती व बुद्धिस्थिर असते. अधून मधून गळा व डोळ्यांचे विकार त्रास देतात.

चंद्र रोहिणी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात चंद्र असेल तर असा जातक रत्नाभूषण व सराफी व्यवसायातून धन मिळवतो.

काहीजण डेअरी उद्योग, पिठाची गिरणी, हॉस्पिटल, धर्मशाळा इत्यादि सेवाकार्य करूनही उपजीविका कमवितात.

अशा स्त्रियांच्या जवळ आभूषण व वस्त्रांचे भाडार मोठ्या प्रमाणात असते.

बऱ्याच उच्चप्रतीचे वाहन, नौकर- चाकरांनी युक्त असतात.

परंतु त्यांना मासिकपाळी हातपायात दुखापत आणि डोकेदुखीचा त्रास असतो.

मंगळ :- Rohini Nakshatra

1)मंगळ रोहिणी नक्षत्रात असून त्यावर रविची दृष्टी असेल तर जातक जंगल किंवा पर्वतीय क्षेत्रात राहतो.

कुटुंब व पत्नीला तो पूर्ण सुख देऊ शकत नाही.

2) चंद्राची दृष्टी असेल तर मातृ विरोधी असतो. त्याची मैत्री हलक्या दर्जाच्या स्त्रियांशी असते.

3) बुधाची दृष्टी असेल तर जातक विद्वान व धार्मिक असतो. आकर्षक व्यक्तिमत्वाचा पण रागीट स्वभावाचा.

4) गुरुची दृष्टी असेल तर जवळच्या नातेवाईकाकडे राहतो. व त्यांना आर्थिक मदत करतो.

5) शुक्राची दृष्टी असेल तर उच्च राजनैतिक पद मिळते. चोहोकडे प्रसिद्धी होते.

6) शनिची दृष्टी असेल तर हृदय पवित्र व विद्वत्ता चांगली असते. नगरपालिका सारख्या सार्वजनिक संस्थाचा अध्यक्ष बनतो.

मंगळ रोहिणी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या प्रथम चरणात मंगळ असेल तर वाद्ययंत्राचा शौकीन असतो.

मधुरभाषी असतो सामुद्रिक किंवा हवाई वाहतुकीसंबंधीच्या कार्याशी संबंध येतो.

त्याला टॉन्सिल्स, गालफुगी व ग्रंथी विकार होतात.

मंगळ रोहिणी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या द्वितीय चरणात मंगळ असेल आणि रवीचा संयोग होत असेल तर जातक सेनाविभागात किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो.

असा जातक विक्षिम व मूर्ख असतो. त्याला नाक व कानावा अजार असतो.

मंगळ रोहिणी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या तृतीय चरणात मंगळ असेल तर जातक धाडसी व विद्वानाकडून सन्मान मिळवणारा असतो.

परंतु अशांना सतती मृत्यूचे दुःख व पत्नीमुळे त्रास सहन करावा लागतो.

शरीराच्या मांसपेशी सुन्न पडणे व गळ्याचे विकार होतात.

मंगळ रोहिणी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात मंगळ असेल तर जातक अस्थिर वृत्तीचा, श्रीमंत व सुरासुंदरीवर पैसा खर्चणारा असतो.

बेकायदेशीर व्यक्तीशी संलग्न असतो.

शासकिय सेवेत असेल तर लाचलुचपती द्वारा अवैध संपत्ति गोळा करतो.

मादक पदार्थाचा विक्रेता व तस्कर असतो..

बुध :- Rohini Nakshatra

1)रोहिणी नक्षत्रात बुध असून त्यावर रविची दृष्टी असेल तर जातकाचे शरीर कमकुवत असते.

याची कंवर बारीक असते. स्वतः धनहीन असतो पण इतरांना मदत करण्यात पुढाकार घेतो.

2) चंद्राची दृष्टी असेल तर परिश्रमी, श्रीमंत व राज्यसत्ते कडून लाच मिळवणारा असतो.

3) मंगळाची दृष्टी असेल तर श्रीमताकडून पैसा मिळवतो. पण हानिच्या महादशेत किंवा अंतदर्शत अशुभ फळे भोगावी लागतात.

4)गुरुची दृष्टी असेल महाविद्वाद, ऐश्वर्यवान व शहराचा प्रमुख असतो.

5) शुक्राची दृष्टी असेल तर सुशोभित कपडे वापरणारा व देखावा करणारा असतो. विरूद्ध लिंगी व्यक्तीच्या विषयी आकर्षक असते.

6) शनिची दृष्टि असेल तर मानसिक असमाधान राहते. घरच्या व बाहेरच्या लोकांकडून अपमान होतो. पत्नीही मान देत नाही.

बुध रोहिणी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या प्रथम चरणात बुध असेल तर जातक बुद्धिवान व मधुरभाषी असतो.

लेखन व पारमार्थिक कार्यातून अमाप पैसा मिळवतो.

त्याची पत्नी खूपच सुंदर मधुर व्यवहार करणारी असते. आवेशात आल्यावर बोलण्यात अडखळतो.

बुध रोहिणी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या द्वितीय चरणी बुध असेल तर जातक वेदशास्त्राचा व्याख्याता, प्रसिद्ध, खातीप्राप्त व राजकीय कार्यात महत्त्वाचा सहभाग असलेला असा असतो.

वडिलांना राजदंड भोगावा लागतो. भावंडांकडून ही निराश व्हावे लागते. पातूरोग व गुद्वाराचे रोग होतात.

बुध रोहिणी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या तृतीय चरणात बुध असेल तर अशा जातकाकडे दृढ इच्छाशक्ती असते.

भोगविलासात मग्र मध्यम श्रेणीचा श्रीमत व विवाहपूर्व अनैतिक आचरण ठेवणारा असतो.

बुध रोहिणी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात बुध असेल तर लांबच्या नातेवाईकांकडून फायदा होतो.

शत्रूकडून शरीरिक त्रास भोगावा लागतो. एका बहिणीचे खूप दुःख झेलावे लागते.

शनिची दृष्टी या बुधावर असेल तर जातक कुरूप, रोगी व दंतहीन असतो.

मानसिक अशांति व वेडेपणाचा त्रास होतो.

गुरु :- Rohini Nakshatra

1)गुरु रोहिणी नक्षत्रात असेल आणि त्यावर रविची दृष्टी असेल तर जातक नौसेना किंवा रक्षा सेना या मध्ये सेनापति सारखे पद मिळवतो.

असा जातक सरकारकडून सन्मान मिळवतो. परंतु शत्रुच्या आक्रमणाच्या वेळी शारीरिक नुकसान होते.

2) चंद्राची दृष्टी असेल तर जातक सत्यवादी, प्रामाणिक, आवश्यकता पडल्यावर इतरांची मदत करणारा व भाग्यवान असतो.

3)मंगळाची दृष्टी असेल तर उत्तम संतती व सुंदर पत्नीने युक्त असतो.

4) बुधाची दृष्टि असेल तर राजकारणात सक्रिय भाग घेतो.

आणि तेथे खूप पैसा कमावतो.

कला व संस्कृतिच्या विकासाला योगदान देतो. आकर्षक रूप-रंगाचा असतो.

5) शुक्राची दृष्टी असेल तर व्यापार करून श्रीमंत बनतो. गरीब जनतेची सेवा करतो व भाग्यवान असतो.

6) शनिची दृष्टी असेल तर जातक जन्मतः श्रीमंत असतो.

ख्याति व सर्वसुखाने युक्त असतो.

मंत्री किंवा राजकीय नेत्याचे पद विभूषवतो. सामाजिक संगठनाचा अध्यक्ष असतो.

गुरु रोहिणी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या प्रथम चरणी गुरु असेल तर जातक दर्शन शास्त्र व पौराणिक विषयात रूचि घेतो.

असा जातक सत्यवादी व चांगल्या संगतीत राहणारा असतो, नेतृत्त्वाचा गुण असतो. महिलावर्गात नावाजला जातो.

त्याला रक्त संबंधी रोग अस्थमा, असे आजार होतात पनसंपदा व संततिसुख उत्तम असते.

अनेकांचा मालक व सन्मानित असतो.

गुरु रोहिणी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या द्वितीय चरणात गुरु असेल तर जातक धार्मिकवृत्तीचा व पितृभक्त असतो.

सत्याचरणी असल्याने इतराकडून मान मिळतो.

अचारण पवित्र व एकापेक्षा अधिक पत्नी असतात. गळ्याचे विकार, खोकला, सर्दी-पडसे याचा नेहमी त्रास असतो.

गुरु रोहिणी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या तृतीय चरणी गुरु असेल तर जातक धूर्त, लंपट, अनैतिक कार्य करणारा बहिष्कार योग्य असतो.

पैशाचा जोरावर काहीही करण्याची तयारी असते. पैशाची गुर्मी असते.

त्याला संसर्गजन्य रोग किंवा कॅन्सर किंवा एडसना आजार होतो.

वेश्यांच्या संसर्गामुळे हे रोग होतात, त्याला ५० ते ५५ वर्षांचे आयुष्य असते.

गुरु रोहिणी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणी गुरु असेल तर जातक दूर देशांचे प्रवास करणारा असता.

विदेशात पैसा मिळवतो.

बत्तीसाव्या वर्षा पर्यंत आर्थिक त्रास सहन करावा लागतो.

त्यानंतर कोणा उदार व्यक्तीच्या मदतीने तो श्रीमंत बनतो व जीवनाच्या सर्व आकांक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होतो.

चाळीसाव्या वयाच्या जवळपास दुर्घटना घडते,

शुक्र :- Rohini Nakshatra

1)रोहिणी नक्षत्रात शुक्र असेल व त्यावर रविची दृष्टी असेल तर असा जातक महिलापयोगी वस्तूच्या बापारातून धन कमवतो.

स्थावर, जमीन, वाहन, नोकरानेयुक्त असतो.

परंतु योचे वैवाहिक जीवन दुःखी असते.

2) चंद्राची दृष्टी असेल तर रत्न- आभूषणाचा व्यापार करून पैसा मिळवणारा, भोग-विलासात मन असणारा, परंतु कुटुंबाच्या उद्धारकर्ता असतो.

3) मंगळाची दृष्टी असेल तर क्रूर असतो व गैरमार्गाने पैसा मिळवतो.

4) बुधाची दृष्टी असेल तर व्यक्तिमत्त्व आकर्षक असते. शांत स्वभाव व व्यापारात कुशल असतो.

5) गुरुची दृष्टी असेल तर तर वाहनसुख असते.

स्थावर संपत्ती असते.

एकापेक्षा दोन विवाह होतात.

कर्तव्यतत्पर संततीने युक्त असतो. कुशल प्रशासक असतो.

6) शनिची दृष्टी असेल तर गरीब लोकांकडून त्रस्त, आपली इज्जत आबरू पालविणारा असतो.

शुक्र रोहिणी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या प्रथम चरणी शुक्र असेल तर धन-संपत्ति, वाहन स्थावर कमाविणारा असतो.

पस्तीसव्या वर्षापर्यंत कौटुंबिक जीवनात दुःखी राहतो.

त्यानंतर पत्नीशी घटस्फोट होऊन मानसिक तणावाखाली राहतो.

त्यानंतर जीवनात स्थैर्य येते. आकर्षक पण गंभीर रोगी असतो.

शुक्र रोहिणी ननक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या द्वितीय चरणात शुक्र असेल तर जातक खेळाडू, ललित कलांत रूचि असणारा, संगीतज्ञ,

नाटककार, टिव्ही व सिनेमात अभिनय करणारा बनतो.

मानव हातापायावर सूज असते. वैवाहिक जीवन संतुलित व सुखी असते.

एक मुलगा व एक मुलगी होते. महिला जातकात भर्गपाताची शक्यता असते.

शुक्र रोहिणी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या तृतीय चरणात शुक्र असेल तर जातक भोगविलास व अनैतिक कार्यात मग्र असतो.

वाईट चालीच्या खिया याला ब्लॅकमेल करतात.

यामुळे आर्थिक नुकसानी व बदनामी होते.

३५-४० वयो दरम्यान आचरणावर नियंत्रण न ठेवल्यास भयंकर असाध्य रोग होऊ शकतो.

नोकर चाकर व अस्पृश्यांशी अनैतिक संबंध असतात.

शुक्र रोहिणी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात शुक्र असेल तर जातक उंचीने कमी पण भारदास शरीरयष्टीचा असतो.

विवाह खूप सुंदर स्त्रीशी होतो. यामुळे आयुष्य भर धन मिळत राहते. गलगंड, टॉन्सील्सचा आजार होतो.

शरीर अवाढव्य असते. अशा महिलांना मात्र श्रीमंत व प्रभावशाली पती मिळतो.

शनि :- Rohini Nakshatra

1)रोहिणी नक्षत्रात शनि असेल व त्यावर रविधी दृष्टी असेल तर असा जातक दुन्याने दिलेल्या पैशावर निर्वाह करतो.

2) चंद्राची दृष्टी असेल तर जातक सुदृढ, सरकारी खात्यात मध्यम अधिकारी पदावर काम करतो.

3) मंगळाची दृष्टी असेल तर व्यर्थ बडवडया, परंतु नेहमी हसत राहणारा कमी घनी असतो.

4) बुधाची दृष्टि असेल तर तापट, वाईट लोकात उठबस करणारा असतो.

5)गुरुची दृष्टी असेल तर समाजसेवक, दयेचा सेवा करणारा असतो. खूपच मेहनती व उच्च पदाधिकारी असतो.

6) शुक्राची दृष्टी असेल तर मद्यपान करणारा, सोनेचांदीच्या व्यापारातून पैसा मिळतो.

शनि रोहिणी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या प्रथम चरणात असेल तर धार्मिक कार्यात मग्न रहातो. जुगार व सट्ट्याचा पौकिन असतो.

तरुणपणी यात बराच पैसा पालवतो. क्योवर्षे ४५ नंतर जीवन सुखी बनते.

४५ वर्षानंतर हे नुकसान भरून काढतो. व त्याचे जीसन सुखी होते. आहार-विहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते.

नाहीतर टी. बी. कॅन्सर सारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. अवेळी दात पडतात.

शनि रोहिणी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

द्वितीय चरणातील शनि पशुधनाने लाभ मिळवून देतो. आकर्षक बोलणे, सुंदर व्यक्तिमत्व असते.

विद्वानही असतो. रक्तसाव किंवा गळ्याचे विकार होतात. पोटाचे ऑपरेशन होते, टकलू असतो.

शनि रोहिणी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या तृतीय चरणात शनि असेल तर जातक लहान वयात चांगले शिक्षण मिळवतो.

भाषा शास्त्र, किंवा शास्त्रांच्या चर्चेमुळे घन व यश मिळते. शोधकार्यात नाव होते. मधुरभाषी, बुद्धीमान परंतु दंतरोग व सर्दी-पडशाच्या त्रास राहतो.

शनि रोहिणी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणी शनि असेल तर जातक मशिनरी व पशुधना व्यवसायातून पैसा मिळवतो. वेशभूषा आकर्षक असते.

आपल्या कामात वैपरवाद बसतो. राजकारणांत सत्तेपर्यंत पोहोचतो. आपल्या जवळच्या पैशाच्या जोरावर राजकारणाच्या क्षेत्रात उतरतो.

५० व्या वयानंतर आमदार किंवा मंत्री बनतो. आरोग्याच्या बाबतीत उत्तरार्धात त्रास होतो.

डोळ्यांचे विकार, गळ्यात बिघाड नाकाचे विकार, लकवा, वायुविकार अपचन, बहिरेपणा असे विकार होतात.

राहू :- Rohini Nakshatra

राहू रोहिणी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

तर जातक दुबळ्या शरीराचा धाडसी, दबंग, चांगली खुराक असलेला असतो.

वायुविकार व अपचनाचा त्रास असतो. डोळे कमकुवत असतात.

लमही त्या चरणात असेल तर पावलागणिक अशा वातकाने संरक्षण राहू करते. आयुष्य मोठे असते.

राहू रोहिणी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या द्वितीय चरणात असेल तर जातकांना दृढ इच्छाशकी असते.

तो व्यापारात चांगली कमाई करतो. प्रतिष्ठा व यश दोन्हीं त्याला मिळतात याचा लोक कायदेशीर सल्ला घेतात व त्याप्रमाणे वागतात.

वयाच्या पन्नाशीपर्यंत कु पैसा मिळवतो. परंतु उत्तरार्धांत निष्कांचन बनतो. सर्वसाधारण रोग त्रास देतात.

राहू रोहिणी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या तृतीय चरणात राहू असेल तर इतरांवर अवलंबून राहूर उपजीविका चालवावी लागते.

दीन, हीन, अल्पबुद्धीचा असतो. पासष्य वर्षाचे आयुष्य असते, त्याला दुर्घटना, रक्त विकार, मूत्ररोग, मधुमेहाने मृत्यू येतो.

राहू रोहिणी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

रोहिणी रक्षत्राच्या चतुर्थ चरणी राहू असणाऱ्यानी प्रवासात खूप सावध असावे.

कविता, शायरी, लोकगीते लिहिण्याचा षौक असतो यामुळे उपजीविका होते.

अल्पबुद्धी व कमी शिक्षण असतानाही जातक उच्च विद्वान गणला जातो. मेहनत खूप करतो पण फळ उशीरा मिळते.

केतु :- Rohini Nakshatra

केतू रोहिणी नक्षत्रातील प्रथम चरण फल :-

रोहिणी नक्षत्रात प्रथम चरणात केतु असेल तर असा जातक जन्मस्थानामासून जाऊन आपली उपजीविका चालवतो.

कधी कधी तो जेवणासाठी दुसऱ्यावर अवलबून राहतो. किंवा दान दिलेले अत्र ग्रहण करतो.

काही जातक ३०-३५ वर्षांतच दिवंगत होतात. तो बहिरा किंवा अंधळा असू शकतो.

केतू रोहिणी नक्षत्रातील द्वितीय चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या द्वितीय चरणात केतु असेल तर जातक संमिश्र व अल्पायु जीवन जगतो.

गुरुची दृष्टी लय किंवा चंद्रावर असेल तर २०-२५ वर्षे जगतो. त्याचे शरीर व डोळे लहानपणापासून कमकूवत असतात.

कोढी, लंगडा, किंवा अपंग होऊ शकतो.

केतू रोहिणी नक्षत्रातील तृतीय चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या तृतीय चरणी केतु असेल तर जातक प्राध्यापक, पुजारी किंवा पंडित बनतो. त्याचे कुटुंब मोठे असते.

३० क्यापत तो जीवन सुखपूर्वक जगतो. त्यानंतर संघर्षाचे दिवस सुरू होतात. पत्नीकडून त्रास होतो.

तिला सूज, महामारी व ईतर असाध्य रोग होऊन ती मृत्यू पावते.

केतू रोहिणी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल :-

रोहिणी नक्षत्राच्या चतुर्थ चरणात केतु असेल तर जातक वेदशास्त्राचा जाणकार व तर्कशास्त्र पारंगत होतो.

तंत्रमंत्रातही त्याची रूचि असते. आयुर्वेद व पारंपारिक चिकित्सेतही तो नाव मिळवतो. वाचादोष, बहिरेपणा किंवा दृष्टीहीनता सारखे दोष जानकात येऊ शकतात.

हर्षल नेपच्यून :-

जातक विलक्षण बुद्धिचा, नाना प्रकारचे शोध लावणारा, गूढशास्त्र उघडकीस आणणारा, मनमिळाऊ नेहमी व्यवसायात मन रहाणारा, आपली प्रगती साधणारा असा असतो:

प्लुटो –

जातक सुंदर, सौदर्यवान, शांत, प्रेमळ, बुद्धिमान, विलासी, शरीराचा प्रत्येक भाग गोंडस असलेला, शुद्ध मनाचा, मायाळू व स्त्री प्रिय असतो.

या नक्षत्रात प्लुटो बरोबर चंद्र किंवा शुक्र असेल तर अशा खिया सौंदर्यवान असतात.

जातक नाव लौकीकाला साजेशी कामे करणारा, कुटुंबातील लोकांवर प्रेम करणारा असतो.

रोहिणी नक्षत्रातील चंद्र, गुरु, लग्न, त्रिकोण, दशम, किंवा चतुर्थात, प्लुटो असल्यास चांगला फलद्रुप होतो.

माझे मनोगत :-

रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्या जातकांनी आर्द्रा, पुष्य, मघा, स्वाति, मूळ, पूर्वाफाल्गुनी नक्षत्रांत जन्मलेल्या जातकांशी भागीदारी,

विवाह, घेण्यादेण्याचे व्यवहार करू नयेत. गोचर चंद्र या नक्षत्रात असेल तर कांही कार्य करू नये.

मार्गदर्शन :-

ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा, WHATSAPP GROUP

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,(संतती समस्या निवारण विशेतज्ञ)

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!