Role Of Rahu Ketu And Fate, राहू-केतूंची भूमिका, आणि भाग्य. ?

Role Of Rahu Ketu And Fate
श्रीपाद गुरुजी

Role Of Rahu Ketu And Fate, ह्यापूर्वी हे सांगितलेच आहे की, राहू-केतू हे ग्रह नसून केवळ गणिताने आकलन होणारे छेदबिंदू आहेत. तरीही सर्व मानवांचे भविष्य घडवण्यात अन्य ग्रहांप्रमाणे त्यांचाही वाटा असतो, म्हणून फलज्योतिषात त्यांनाही ‘ग्रह’ अशी संज्ञा देऊन त्यांचाही अंतर्भाव केला गेला आहे. शिवाय शनि. व मंगळासारखे त्या दोघांनाही पापग्रहच गणलेले आहे.

रवि, चंद्र, गुरू व शुक्र हे चार शुभग्रह, शनि, मंगळ, राहू, केतू हे चार पापग्रह व बुध नपुंसक ग्रह असे सर्व मिळून प्रत्येक कुंडलीत एकूण नऊ ग्रह असतात. पापग्रह ज्या राशींचे स्वामी असतात त्या पापराशी होय.

राहू व शनि एकत्र लग्नी असलेल्या व्यक्तीस दारूचे व्यसन असण्याचा संभव असतो. अशा व्यक्तीचे जीवन खडतर व दुःखी असते. अशी व्यक्ती स्वतःच्या मातापित्यास भार होते. अशा व्यक्तीस कानाच्या व्यथा होण्याचा संभव असतो.

राहू-केतूंची भूमिका, आणि भाग्य. ?, Role Of Rahu Ketu And Fate

१) पहिले घर :-

लग्नी राहू असता व्यक्तिमत्व आकर्षक असते. ढोकेदुखीची व्यथा असण्याची शक्यता असते. त्याच्याशी नाते असलेल्यांची वा व्यवहार करणाऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. अशा व्यक्ती कधीकधी इतरांना उपद्रवही देतात. शुभराशीत राहू लग्नी असणाऱ्या स्त्रियां कार्यकुशल गृहिणी वा सार्वजनिक कार्यकर्त्या असतात.

त्या उलट केतू लग्नी असता शारीरसौष्ठव नसते. शरीरात काहीतरी कायमची व्यथा असते किंवा चेहऱ्यावर व्रण वा डाग असतो. अंगी भीत्रेपणा असतो. राम लवकर येतो. द्रव्यटंचाई भासणाऱ्या कुटुंबात जन्म होतो. तसेच वैवाहिक जीवन असंतुष्ट असण्याची शक्यता असते.

२) दुसरे घर :-

राहू द्वितीय स्थानात असता व्यक्तिमत्व आकर्षक असते. विशेषत द्वितीय स्थानी राहू असणाऱ्या महिला फार आकर्षक दिसतात. राहू, शुक्र एकत्र एका स्थानात असता सांपत्तिक स्थिती चांगली असते, पण वैवाहिक जीवन सदोष असण्याचा संभव असतो. त्या द्वितीय स्थानात (म्हणजे धनस्थानी ) केतू अन्य एखाद्या पापग्रहासह असता स्वभाव फार खर्चिक असतो.

द्वितीय स्थानी राहू वा केतू मेष वा वृश्विक ( या मंगळाच्या) राशीत असता बोलण्यात दोष असतो. द्वितीय स्थानी राहू पापराशीत असता त्या व्यक्तीस द्रव्यटंचाई भासले पुरुष राहू वा केतू द्वितीय स्थानी असता दृष्टिदोष संभवतो. तसेच त्या व्यक्तीस प्रवासाची आवड असते.

अशा व्यक्ती गुप्तता पाळू शकत नाहीत. असे पत्नीच्या सल्ल्यानुसार वागतात. धनु वा मीन राशीतील केतू द्वितीय स्थानी असता त्या व्यक्तीच्या जीवनात संतोष असतो.पापराशीत द्वितीयस्थानातील केतू तोडाच्या व्यथा निर्माण करतो. द्रव्यनाश व कौटुंबिक कलहही होण्याची शक्यता असते.

३) तिसरे घर :- Role Of Rahu Ketu And Fate

तृतीय स्थान म्हणजे पराक्रम स्थानात राहू असता ती व्यक्ती शूर असते. यश प्राप्त होते. पण आराम, चैन याकडे ओढा असतो. भावंडांचा अकाली मृत्यु होतो. सिंहेतील राहू अथवा २, ४, ६, ८ आदी द्विभाज्य राशीतील तृतीयस्थानाचा राहू असता भावंडांकडून सुख प्राप्त होते.

तसे नसता भावाबहिणींशी वितुष्ट येते. तृतीय स्थानी शुभराशीतील राहू हा चित्रकला, व्यंगकला आदी कलांत गती देतो. भावंडांवर द्रव्य खर्च होतो. तृतीयातील केतूही शौर्य देतो; पण समाजापासून दूर राहण्याची प्रवृत्ती निर्माण करतो. समाजात मान मिळतो.

पण स्वभाव निष्ठुर, सूड उगवणारा व क्लृप्त्या करणारा असतो. गुप्तता राखणारा मानसिक असमाधानाचा स्वभाव असतो. व्यभिचाराकडे कल असतो. बाहू व कानाची दुखणी होतात. पण तृतीयातील केतू जातकास कोणत्यातरी क्षेत्रात अग्रगण्यताही मिळवून देतो.

४) चौथे घर :-

चतुर्थ स्थानात राहू शुभराशीत असता जमीनजुमला, घरदार, शेती, इस्टेट इ. प्राप्त करवतो. लहान नगरात वास्तव्य असते. चतुर्थातील राहू मकर, कुंभ, धनु, मीन, मेष, वृश्विक, कर्क वा तुला राशीत असता भाड्याचे घर म्हणून व इतरांवर अवलंबून म्हणून असमाधान असते.

चतुर्थातील राहू मातृसुखात वैगुण्य निर्माण करतो. मन असमाधानी असते व भटकण्याची सवय लागते. नातेवाईकांशी केलेल्या आर्थिक व्यवहारात आर्थिकहानी सोसावी लागते. चतुर्धातील केतूही तसेच परिणाम घडवतो. पंचम स्थानी पापराशीतील राहू या कोणत्याही राशीतील केतू शरीर संबंधात असंतोष निर्माण करतो व अपत्यांचे बाबतीत असमाधान असते.

५) पाचवे घर :- Role Of Rahu Ketu And Fate

पंचमात केतू जर अन्य पापग्रहांसह वा पापग्रहांच्या दृष्टिपथात असला तर गर्भपात, अपत्यांचा अकाली मृत्यु वा अपघात इ. क्लेशदायी घटना घडतात. पंचमात पापराशीतील राहू सुहृदांशी वितुष्ट घडवून आणतो. तसेच पोटदुखी वा भ्रमिष्टपणा निर्माण करतो.

स्त्रियांच्या कुंडलीत पंचमातील केतू द्रव्यटंचाई व वैवाहिक जीवन असमाधानी करवतो. शुभराशीतील पंचमातील राहू संतती मर्यादित ठेवतो व विद्येस पोषक ठरतो, पण त्या स्थानी पाप- राशीतील राहू हुशार असूनही विद्यार्जनात बाधा आणतो. पंचमातील राहू कलानैपुण्य देतो.

६) सहावे घर :-

षष्ठ स्थान हे रोगस्थान व शत्रूस्थान म्हणवते. त्या स्थानी राहू वा केतू असता व्यक्ती धीट व शूर असते. विरोधकांवर विजय मिळतो. परस्थांशी मैत्री होते. शक्ती व समृद्धी प्राप्त होते. कंबरेच्या भागातील दुखणी होतात. षष्ठ स्थानी केतू असता मामा आदी मातुलाहाकडील व्यक्ती अल्पायुषी ठरतात वा त्यांच्याशी बेबनाव होतो. स्वतःच्या व्यवसायात वा नोकरीत महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. षष्ठात पापराशीतील राहू वा केतू डोळ्यांचे आजार वा दृष्टिदोष निर्माण करतात. दातांच्या व्यथाही उद्भवतात.

७) सातवे घर :-

सप्तमात राहू मेष, कर्क, वृश्चिक, धनु वा मकर राशीत असता दोन विवाह करावे लागण्याची शक्यता असते. पत्नी कजाग असते. मिथुन, सिंह, कन्या राशीत राहू सप्तमात असता विवाहास विलंब लागतो अथवा होतही नाही. राहूसह अन्य पापग्रह असला वा पापग्रहाची राहूवर दृष्टी असली तर लैंगिक संबंध असतात.

सप्तमात वृश्चिकेचा केतू असता उत्तरोत्तर सुबत्ता होत जाते; पण पतीपत्नी उभयतांना शारीरस्वास्थ्य नसते, अन्य कोणत्याही राशीचा केतू सप्तमात असता वारंवार प्रवास करावा लागतो. आर्थिकहानी व जोडीदाराशी मतभेद होतात. पाण्यापासून भय असते व भागीदारीत द्रव्यहानी होते.

८) आठवे घर :-

राहू या केतू अष्टमात असता जंगली जनावरांपासून, उंदीर वा सर्प आदींपासून भय असते. विशेषतः वृषभ, कर्क, वृधिक वा मीन राशीचा राहू अष्टमात असता पाळीव प्राण्यांपासूनही भय असते.

तरी व्यक्ती दीर्घायुषी असते. अष्टमात राहू या केतू असता लेगिक व्याधी होण्याची शक्यता असते अशा स्त्रियांच्या प्रसूती निर्विघ्न होत नाहीत किंवा नवजात अर्माच्या मृत्यूमुळे प्रसूती व्यर्थ वाटते. अध्यात्मी वृत्ती होते.

९) नववे घर :-

नवम स्थानातील राहू भाग्यकारी असतो. त्यातही तो वृषभ, मिथुन, कर्क, सिंह या कन्या राशीचा असता अधिक भाग्यकारी असतो. अशी व्यती गरिबीतून वा विरोधातूनही भाग्य काढते. त्यांचा जन्मस्थानापासून दूर भाग्योदय होतो.

अशा व्यक्तीस स्वतःच्या धार्मिक परंपरेचा अभिमान वाटतो. वयाच्या २२ वे वर्षांपासून भाग्यवृद्धी होते. भावंडांपासून दूर राहवे लागते वा दुरावा निर्माण होतो.

बराच प्रवास होतो. विशेषतः ऐतिहासिक वा सांस्कृतिक स्थळांचा प्रवास होतो. नवम स्थानी केतू असता परस्थांकडून सन्मान होतो.

लोकहिताच्या कार्यात स्वतःचा वेळ, पैसा व श्रम अर्पण केले जातात. नवगातील राहूमुळे वाहवा होते. विशेषतः मिथुन, कर्क, सिंह वा कन्येचा राहू अधिक मान्य देतो. व्यक्ती मोठया पदाला पोहचते.

१०) दहावे घर :- Role Of Rahu Ketu And Fate

दशमात राहू या केतू असता पचनदोष उद्भवतो व मातृपितृसुख कमी मिळते. दशमात राहू असणारी व्यक्ती भाग्यवान ठरते. सत्ता व वरिष्ठपद मिळते. दशमात राहू व केतू, नृषभ, मिथुन, सिंह वा वृश्चिकेत असता व्यक्ती राजकारणात भाग घेते.

राहू वा केतू दशमात पापराशीत असता वा त्यावर पापग्रहाची दृष्टी असता पदभ्रष्टता, बडतर्फी इत्यादी नशिबी येते. मात्र दशमातील राहू व्यक्ती कनिष्ठ स्तरावरून उच्चपद व संपत्ती देतो, पण दशमातील केतू तेवढा प्रभावी नसतो.

दशमातील राहू क्याच्या १९, ३८ व ५७ व्या वर्षी भाग्यवृद्धी करतो. एकादश स्थानातील केतू डोळ्यांचे रोग व लिंगस्थानासंबंधीचे रोग करवतो. तसेच ते लाभस्थान असल्याने जातक खर्चिक बनतो. एकादशातील राहू व केतू हे अपत्यासंबंधी चिंता करवतात,

कारण ते स्थान संतती स्थानासमोरचे असते. म्हणून अपत्ये, सशक्त व कर्तबगार असली तरी वडिलांशी उद्धटपणे वा बेपर्वाईने वागतात.

११) अकरावे घर :-

एकादशात राहू ( वा केतू) सह अन्य एखादा जरी पापग्रह असला तर निदान पहिले अपत्य तरी विघडून शत्रुवत व्यवहार करते. एकादशातील शुभराशीतील राहू असता चांगले वाहन दिमतीला असते व साऱ्या व्यवहारात यश व लाभ प्राप्त होतात. एकादश स्थानात राहएवढा केतू प्रभावी ठरत नाही.

एकादशात राहू असता जातक धनी होतो व त्यास द्रव्यचिता उरत नाही राहू वा केतू बाराव्या स्थानी असता शत्रूविरुद्ध संरक्षण मिळते व अध्यात्माकडे कल असतो. त्या स्थानी केतू असता वृत्ती गंभीर असते. उदासीनता जाणवते. उत्साहाचा अभाव असतो.

खर्चिक वृत्ती असते. लैंगिक भागाचे रोग होण्याची शक्यता असते. द्वादश स्थानी केतूपेक्षा राहू अधिक अनिष्ट असतो. तो डोळ्यांचे व पायांचे विकार करवतो. तो १. अविभाज्य राशीचा असला तर जीवनस्तर मध्यम दर्जाचा असतो. द्वादशातील ५७ आदी राहू संपत्तीचा व मालकीच्या भूखंडाचा लोप करवतो. नातेवाईकांसाठी बराच खर्च करावा लागतो.

स्त्री व महिला :- Role Of Rahu Ketu And Fate

स्त्रियांच्या जन्मलग्नकुंडलीत राहू वृषभ, कन्या वा मकर लग्नी असता भाग्यकारी ठरतो. लग्नी राहू कोणत्याही राशीत महिलांच्या कुंडलीत लैंगिक भावना वाढवितो.

वृत्ती शिस्तप्रिय, पद्धतशीर पण खुनशी, सूड उगवणारी असते. त्यांचेवर पतीची मर्जी असते. राहू लग्नी वृश्चिकेत असता वैवाहिक जीवनात असमाधान असते व अपत्यांचा मृत्यू घडवतो.

अशा महिला लठ्ठ, मत्सरी वृत्तीच्या व तऱ्हेवाईक वागणुकीच्या असतात. राहू लग्नी वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या वा तुला यामध्ये असता अशी व्यक्ती सुदेवी, कार्यक्षम, उद्योगी व ऐटबाज असते.

१) पहिले घर :-

लग्नी केतू असता व्यक्ती ठेंगणी व कामसू असते. विवाह लांबणीवर पडतो. जीवन रखडते.

२) पुढील घरे :-

स्त्रियांच्या लग्नी मेष, सिंह, धनु राशीचा राहू असता त्या पुरुषी स्वभावाच्या असतात. महिलांच्या कुंडलीत राहू पंचमात असता मासिकपाळी अनियमित असते व गर्भाशयाची दुखणी उद्भवतात. वस्त्रांची आवड असते.

ऐटबाज व आरामशीर जीवनशैली असते. वृषभ, मिथुन, कन्या, तुला वा मीन राशीत पंचम स्थानी राहू असणाऱ्या महिलांची ऐटबाज राहणी असते, पण पारंपरिक संयमांचा प्रभाव त्याच्यावर असल्याने त्या आडमार्गाला लागत नाहीत.

३) पाचवे व त्या पुढील घर :- Role Of Rahu Ketu And Fate

केतू पंचमात असता व्यक्ती भावनाप्रधान असते. स्वभाव व राहणी साधी असल्याने कोणाचे लक्ष वेधले जात नाही. राहू वा केतू महिलांच्या कुंडलीत अष्टमात असता त्यांना शरीराच्या कटिभागाच्या व्याधी होतात.

ते जर मेष, कर्क, वृधिक वा मीन राशीचे असले तर शल्यक्रिया करणे भाग पडते. अष्टम स्थानी केतू मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु वा मीन राशीत असता चर्मरोग होतात.

शिवाय त्या स्थानातील राहू वा केतूसह शनि वा मंगळ असा एखादा पापग्रही असला तर क्षय, महारोग, कोड आदी रोगाने शरीर विद्रुप दिसते. राहू, केतू आदी या ग्रहांच्या महादशेत तशा रोगांचा प्रादुर्भाव होतो. गुरू व बुधाच्या अंतर्दशेत रंगास उतार पडतो.

मार्गदर्शन :-

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

( सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित 
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन, (संतती समस्या विशेतज्ञ)
सामुद्रिक ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ 
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!