Shani And Shani Sadesati, सूर्याभोवती ग्रह ज्या मार्गाने फिरतात त्या मार्गाला क्रांतीवृत्त असे म्हणतात.
प्रत्येक ग्रहाचे क्रांतीवृत्त वेगळे आहे व प्रत्येक ग्रहास सूर्याभोवती फिरण्यास व प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागणारा काळ वेगवेगळा आहे.
शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास २९ ।। वर्षे लागतात.
शनीच्या क्रांतीवृत्ताचे सारखे बारा भाग केले तर त्या बारा भागाला एकेक नाव दिलेले आहे.
ती नावे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन. शनि एका राशीत २ ॥ वर्षे असतो म्हणजे ज्या राशीत शनि असतो ती राशी त्याच्या मागील राशी मेष आहे.
तेव्हा ज्या वेळी शनि मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा त्या मेष राशीला साडेसातीची पहिली अडीच वर्षे सुरु होतील.
जेव्हा शनि मेष राशीत प्रवेश करील तेव्हा मेष राशीला साडेसातीची दुसरी अडीच वर्षे सुरु होतील. जेव्हा शनि वृषभ राशीत प्रवेश करील तेव्हा मेष राशीला साडेसातीची तिसरी अडीच वर्षे सुरु होतील.
अशा एकूण साडेसात ‘वर्षाच्या काळाला ‘साडेसाती’ म्हणतात व जेव्हा शनि वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करील तेव्हा मेष राशीची साडेसाती संपेल. एकूण ज्या राशीतून शनीचे भ्रमण असते ती राशी, त्याच्या मागील राशी व त्याच्या पुढील राशीस एका वेळी साडेसाती असते.
शनिची नक्षत्रे :-
१) शनीची नक्षत्रे- उत्तराषाढाचे दुसरे, तिसरे व चवथे चरण, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा नक्षत्राचे पहिले, दुसरे आणि तिसरे चरण असे एकूण साडेचार नक्षत्रांवर शनीचे स्वामित्त्व आहे.
२) शनीच्या राशी: मकर आणि कुंभ या दोन्हीं राशी शनीच्या मालकीच्या आहेत. म्हणजे या दोन राशींचा मालक शनि आहे.
३) शनीची उच्च रासः मेष ही शनीची उच्च रास आहे.
४) शनीची नीच राशी: तूळ ही शनीची नीच राशी आहे.
५) शनीची मूळत्रिकोण राशी: कुंभ ही शनीची मूळ त्रिकोण राशी आहे.
६) शनीच्या मित्र राशी: वृषभ, मिथुन, कन्या व तूळ या शनीच्या मित्र राशी आहेत.
७) शनीच्या शत्रूराशी: मेष, कर्क, सिंह, वृश्चिक या तीन शनीच्या शत्रू राशी आहेत. तसेच धनु व मीन या राशीस शनी शत्रू व मित्र मानीत नाही. सम समजतो.
८) शनि हा जातीने अत्यंज आहे.
९) शनि हा पश्चिम दिशेचा मालक आहे.
१०) शनि वयाने वृद्ध आहे.
११) शनि हा दूत आहे.
१२) शनि स्वभावाने दारुण आहे.
१३) शनि हा दुःखदायक आहे.
१४) शनि हा कृष्ण वर्णाचा आहे.
१५) शनिची ब्रह्मा देवता आहे.
विशेष :-
१६) शनि हा पापग्रह आहे.
१७) शनि हा नपुंसक ग्रह आहे.
१८) शनि हा तमोगुणी ग्रह आहे.
१९) शनि हा वायुतत्त्वाचा ग्रह आहे.
२०) शनिचा अंमल शरीरातील शिरांवर असतो.
२१) शनीचे वस्त्र जीर्ण आहे.
२२) शनि चे धातू शिसे आहे.
२३) शनिचा ऋतु शिशिर आहे.
२४) शनीचा रस तुरट आहे.
२५) शनीची विद्या यावनी आहे.
२६) शनीचे वास्तव्य घरात असते.
२७) शनीची क्षुधा स्थानस्थित असते.
२८) शनीला तिसरी व दहावी पूर्णदृष्टी असते.
२९) शनीला एक राशी भोगण्यास तीस महिने लागतात.
३०) शनीच्या देवता:- शनि, मारुती, शाखिणीदेवी या शनीच्या देवता आहेत.
अती विशेष :-
३१) शनी घुडघे, पोटन्या आणि पाय यांचा कारक आहे.
३२) शनीच्या नैसर्गिक दशेचा काल वय वर्षे ७० ते १२० वर्षाचा आहे.
३३) शनीची दिनदशा ३६ दिवसांची आहे.
३४) शनीची अष्टोत्तरी दशा १० वर्षांची असते. त्याची नक्षत्रे पूर्वाषाढा, उत्तराषाढा, अभिजित, श्रवण ही आहेत.
३५) शनी हा निरक्षर आहे.
३६) शनि हा चुंबक व धार्मिक ग्रह आहे.
३७) शनि हा स्वतःचे दैवाचा कारक आहे.
३८) शनि हा कर्क व सिंह राशीत निर्बली असतो.
३९) शनि हा कृष्णपक्षात बलवान असतो.
४०) शनि हा रात्री बलवान असतो.
४१) शनीला रवि चंद्र हे ग्रह मारक आहेत.
४२) शनीला बुध, गुरु, शुक्र, राहू आणि केतू हे तारक ग्रह आहेत.
४३) शनी हा धाकट्या भावंडांचा कारक आहे.
४४) शनि पश्चिमेस अस्त झाल्यापासून ३८ दिवसांनी पूर्वेस उदय पावतो. पूर्वेस उदय झाल्यानंतर १०५ दिवसांनी वक्री होतो. वक्री झाल्यापासून १३५ दिवसांनी मार्गी होतो. मार्गी झाल्यानंतर १०५ दिवसांनी पश्चिमेस अस्त पावतो.
४५) शनि साधारण १३५ दिवस वक्री असतो.
आधार :-
४६) शनीला अर्धदृष्टी आहे.
४७) शनि हा १०० वर्षाचा आहे.
४८) शनि हा पृष्ठभागाने उदय पावतो.
४९) शनि हा चतुष्पाद जनावरांचा कारक आहे.
५०) शनीचे पर्वत, अरण्य, ओसाड जागा व शेतीजमिनी या ठिकाणी कारकत्त्व असते.
५१) शनी तुळ राशीत २० अंशावर परम उच्च असतो.
५२) शनी मेष राशीत २० अंशावर परम नीच असतो.
५३) शनीची विशॉतरी दशा १९ वर्षांची आहे.
५४) शनीचा पराभव रवि करतो.
५५) शनि पावसाचा कारक आहे.
५६) शनीचा प्रदेश: गंगा नदीपासून ते हिमालयपर्यंतच्या प्रदेशावर शनीचे स्वामित्व आहे.
५७) शनि मंगळापेक्षा बलवान आहे.
५८) शनिची नावे त्याची छायात्मज, पंगु, यम, अर्कपुत्र, अर्कि, मंद अशी नावे प्रसिद्ध आहेत.
५९) शनीच्या होऱ्यावर मुसलमान, रजस्वला स्त्री, पिशाच, गृधपक्षी, विधवा स्त्री, अग्नि, नपुंसक तरुण व बलवान पुरुष यापैकी काहीतरी शकुन होतात.
६०) शनि हा आठ आकड्याचा कारक आहे.
वय वर्ष :-
६१) जातकाची वय वर्षे ३६ ते ४२ ही शनीची भाग्योदयी वर्षे आहेत.
६२) शनि रविच्या मागे १४ अंश असला म्हणजे तो अस्तंगत होतो वपुढे १४ अंश गेला म्हणजे उदय पावतो.
६३) आपल्या राशीत जितक्या अंशावर चंद्र असतो. त्याच्या मागे ४५ अंशावर शनि आला की साडेसातीस सुरवात होते व पुढे ४५ अंश गेल्यावर साडेसाती संपते.
६४) शनीचे दीतांश: कोणत्याही राशीत शनि ९ अंशावर आला असता चांगली अगर वाईट फले उत्पन्न करतो.
६५) शनिचा मंत्र: “निलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रज छायामार्तडसंभूतं तं नमामि शनैश्वरं ” ।।
६६) शनीचे १४ हे कलांश आहेत.
६७) शनि हा अष्टम, षष्ठ, दशम, व्यय या भावांचा कारक आहे.
६८) शनि कोणत्याही स्थानी असल्यास त्या स्थानापासून ३,४,५,१०,११ या स्थानी कोणताही ग्रह असल्यास त्या ग्रहाचा तो तात्कालिक मित्र होतो.
शनी ग्रह :-
६९) शनि हा कोणत्याही स्थानी असल्यास त्या स्थानापासून २,६,७,८,१२ या स्थानात असणाऱ्या ग्रहाचा तो तात्कालिक मित्र होत असेल तर तो त्याचा अधिमित्र होतो.
७०) शनीचे नैसर्गिक मित्र व तोच ग्रह जर त्याचा तात्कालिक मित्र होत असेल तर तो त्याचा अधिमित्र होतो.
७१) शनीचा नैसर्गिक शत्रू असल्यास तो ग्रह जर त्याचा तात्कालिक शत्रू होत असेल तर तो त्याचा अधिशत्रू होतो.
७२) शनीचे आजारः दीर्घकाळ टिकणारे रोग, संधीवात, खोकला,अर्धांगवायू, शरीरातील अवयवास बधीरत्व, हिवताप, क्षय, वातपीडा, शरीरातील भाग कुजणे, दाढ दुखणे, महारोग, कुजणे, सुजणे, अपचन,बद्धकोष्ट, रिकेट्स, दमा, हे शनीचे आजार आहेत.
७३) शरीरातील अवयवांवर शनीची सत्ताः शरीरातील हाडे, हाडांचे सांधे, यकृत, प्लीहा, पाणथरी, डावाकान, पोटऱ्या, गुडघे, मलोत्सर्ग करणारी इंद्रिये,
अत्यंत घाम येणे, कुष्ठ, भगंदर, हातापायाच्या सांध्यामध्ये दुखणे, बधीरत्व, वेड, मुकेपणा, तोतरेपणा, भित्रेपणा वगैरे गोष्टींवर शनीचे
७४) प्रथमस्थान हे शनीचे मृत्यूस्थान आहे,स्वामित्त्व आहे.
७५) अष्टमस्थानी असलेला शनि शुभफलदायी असतो. तो पैसा व दीर्घायुष्य देतो.
शनीचे रुप व गुण :-
शनि हा कावेबाज, दुष्टबुद्धी, धूर्त, मन मानेल तसे वागणारा, आळशी, बुद्धीमंद, मनाने दुर्बळ, उद्योग न करणारा, स्वतःविषयी फाजील विश्वास असणारा,
अहंकारी, आत्मप्रतिष्ठा मिरविणारा, कलहप्रिय, दुसऱ्याचे चांगले न पाहणारा, कठोर भाषण करणारा, दुसऱ्याच्या ममीं घाव घालवणारा, तिरसट, असमाधानी, निरनिराळ्या व्यसनाधीन, दुराचारी, स्वार्थी बुद्धीचा, वाईट भाषण बोलणारा,
अविचारी, दुसऱ्याच्या पैशांवर नजर ठेवणारा, पैशाचा फार लोभी, काळासावळा, मोठा घामटा, शिरा फार असलेला, फार केस असणारा, दुर्बल लांब दातांचा, लांब नखांचा, पिंगट नेत्रांचा, दुष्ट,
वातप्रकृती, रोगीट, लोभी, घातकी, रागीट, मोह, मद, मत्सर वगैरे षड्विकारांनी युक्त, सूड घेणारा, निर्दयी, लज्जाहीन, क्रूर, दुर्मती, ठकराज, खोटे बोलणारा, अविचारी, घारे डोळे वगैरे रुपे व गुण शनीचे आहेत.
शनिचे आजार :-
थंडी-ताप, पडसे, बहिरेपणा, दात कुजणे, मलेरिया, पायोरिया, घटसर्प, मॉलस्टोन, पाठीतील कण्याचा विकार, आतड्यांमध्ये मलाशयाची गाठ होणे, हाडांची अगर स्नायूंची लचक, हेमोराईड्स, दमा,
मळमळणे, फुफ्फुसाचा क्षय, पंडुरोग, रक्तन्यूनता, त्वचेचे रोग, गजकर्ण, खरुज, नायटे, इसब, कॅन्सर, पक्षघात, नळगुद, यकृत, प्लीहा, पाणथरी, भगंदर वगैरे शनीचे आजार आहेत.
शनीचे कारकत्त्व :-
मजूरवर्ग, शारीरिक काम करणारे, वृद्ध, शेतकरी, जमिनदार, खाणी आणि खनिजपदार्थ, हाल, कष्ट, गुप्तगोष्टी, नोकरवर्ग, पराधीन लोक, गुप्त व दुष्टपणाची कारस्थाने, विश्वासघात, सामान्य, छापखान्यांचे मालक,
कामगारवर्ग, नीच विद्या, नोकरांचे सुख, आयुष्य, कायमचे आजार, मृत्यू, दारिद्र्य, लोभ, घातपाताची कामे, मोह, दुष्टबुद्धी, रोग, दुसऱ्याचा उत्कर्ष, अस्वस्थता, कैद, दंड, राजदंड, लोकात कमीपणा, राजकार्यात व उद्योगधंद्यात हानी,
सरकारी आरोप, धाकटे भाऊबंद, कायद्याची आवड, सूडाची भावना, परपीडा, निर्दयत्व, जाणीव, क्रूरपणा, दुर्मती, चोरी, ठकबाजी, खोटे बोलणे, अविचार, भीती, म्हैस, वाहने,
आयुष्य, निर्वाहाचे साधन, उपाय, दीर्घकाळ, आपत्ति, अडथळे, खोळंबा, व्यंग, खोड, विकलांग, छिद्र, अपघात, दैन्य, गरिबी, कायमचे मित्र, आप्त, मैत्री, पापकर्मे नाश, गुन्हा, पीडा, शेतजमीनीशी संबंधीत असणारे व्यवसाय,
खाणी, कोळसा, शिसे, तुरूंग, खडतर कष्ट, साधे व हलके धंदे, खुनशीपणा, मौनवृत्ती, दुरात्मा, अविचारी, स्मशानभूमी, जमीनदोस्त झालेली शहरे, गुप्त जागा, दऱ्या, जंगले,
एकांतस्थाने, कोळशाच्या खाणी, मोया, उकीरडे, घाण व गलिच्छ जागा, बहुतेक सर्व अनिष्ट व अशुभ गोष्टी, घातपात, वैमनस्य, नाश, पराधीनता, बेअब्रू, विविध तऱ्हेची संकटे या सर्वांचा कारक शनि आहे.
शनीच्या अवस्था :-
१) बाल, २) कुमार, ३) तरुण, ४) वृद्ध, ५) मृत, ६) जागृत, ७) स्वप्नावस्था, ८) निद्रावस्था, ९) लज्जितावस्था, १०) गर्भितावस्था, ११) मुदितावस्था अस्वस्थ, १२) क्षुधितावस्था, १३) तृषार्तावस्था, (१४) संशोभितावस्था.
१) समराशीत म्हणजे वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर, मीन यां समराशीत शनि पहिल्या १ ते ६ अंशात बाल असतो. दुसऱ्या ७ ते ११ अंशात कुमार असतो. तिसऱ्या १३ ते १८ अंशात तरुण असतो. चवथ्या १९ ते २४ अंशात वृद्ध असतो. पाचव्या २५ ते ३० अंशात मृत असतो.
२) शनि विषम राशीत म्हणजे मेष, मिथुन, सिंह, तुळ, धनु, कुंभ यात पहिल्या १ ते ६ अंशात मृत असतो. दुसऱ्या ७ ते १२ अंशात वृद्ध असतो. तिसऱ्या १३ ते १८ अंशात तरुण असतो. चवथ्या १९ ते २४ अंशात कुमारअसतो. पाचव्या २५ ते ३० अंशात बाल असतो.
शनी स्थिती :-
३) विषम राशीत १ ते १० अंशात जागृत अवस्थेत शनि असतो. विषम राशीत १९ ते २० अंशात शनि स्वप्नावस्थेत असतो. विषम राशीत २१ ते ३० अंशात निद्रावस्थेत असतो.
त्याच्या उलट समराशीत पहिल्या १ ते १० अंशात जागृत अवस्थेत शनि निद्रावस्थेत असतो. सम राशीत ११ ते २० अंशात शनि स्वप्नावस्थेत असतो. सम राशीत २१ ते ३० अंशात शनि जागृतावस्थेत असतो..
विशिष्ट पध्दतीत शनि वर्षे ४८ चे पुढे फल देतो असे दिसून आलेले आहे. शनि एकदा उगम पावल्यावर तो सतत, अस्ताचे दिवस वजा करुन, ३४१ते ३४७ दिवसापर्यंत दिसतो.
शनीला उदय होण्यास ३३ ते ३७ दिवस लागतात. ३७८ दिवसात शनिचा एक उदय व एक अस्त होतो. शनीची राोजची गती १ कला ३६ विकलांची आहे.
शनि वक्री झाल्यापासून मार्गी होण्यास १३५ दिवस लागतात कधी कधी १४३ दिवस लागतात. शनि मार्गी झाल्यापासून वक्री होण्यास २३.२ ते २४९ दिवस लागतात.
शनीची साडेसाती कोणत्या राशीला किती काळ अनिष्ट असते.? :- Shani And Shani Sadesati
१) मेष-
ज्यांची मेष राशी असेल त्यांना मीन राशीत शनि आल्याबरोबर साडेसाती सुरु होते. तेव्हा पहिली अडीच वर्षे व शेवटची अडीच वर्षे चांगली जातात.
परंतु मेष राशीत शनि आला म्हणजे मधली अडीच वर्षे अनिष्ट जातात.
२) वृषभ-
ज्यांची वृषभ राशी आहे. त्यांना मेष राशीत शनि आला की साडेसाती पुन्हा सुरु होते व पहिलीच अडिच वर्षे अनिष्ट जातात. पुढील पाच वर्षे त्रासदायक जात नाहीत.
३) मिथुन-
ज्यांची मिथुन राशी आहे. त्यांना वृषभ राशीत शनि आला की साडेसाती सुरु होते. पहिली पाच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.
४) कर्क-
ज्यांची कर्क राशी आहे. त्यांना शनि मिथुन राशीत आला की साडेसाती सुरु होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.
५) सिंह-
ज्यांची सिंह राशी आहे. त्यांना शनि कर्क राशीत आला की साडेसाती सुरु होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.
६) कन्या-
ज्याची कन्या राशी आहे. त्यांना शनि सिंह राशीत आला की साडेसाती सुरु होते. पहिली अडीच वर्षे त्रासदायक चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे चांगली जातात..
मध्यंतर :-
७) तुळ-
ज्यांची तूळ राशी आहे, त्यांना शनि कन्या राशीत आला की साडेसाती सुरु होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.
८) वृश्चिक-
ज्यांची वृश्चिक राशी आहे. त्यांना शनि तुळ राशीत आला की साडेसाती सुरु होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. मधली अडीच वर्षे त्रासदायक जातात.
९) धनु-
ज्यांची धनु राशी आहे. त्यांना शनि वृश्चिक राशीत आला की साडेसाती सुरु होते. पहिली अडीच वर्षे त्रासदायक जातात. शेवटची पाच वर्षे चांगली जातात..
१०) मकर-
ज्यांची मकर राशी आहे. त्यांना शनि धनु राशीत आला की साडेसाती सुरुहोते. संपूर्ण साडेसात वर्षे चांगली जातात.
११) कुंभ-
ज्यांची कुंभ राशी आहे. त्यांना शनि मकर राशीत आला की साडेसाती सुरु होते. संपूर्ण साडेसात वर्षे चांगली जातात.
१२) मीन-
ज्यांची मीन राशी आहे. त्यांना शनि कुंभ राशीत आला की साडेसाती सुरु होते. पहिली पाच वर्षे चांगली जातात. शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.
शनिची चांगली फले केव्हा मिळतात.? :- Shani And Shani Sadesati
जन्म राशीपासून तिसरा, सहावा, दहावा, आकरावा शनि गोचरीने आला म्हणजे त्याची चांगली फळे अनुभवास येतात. विद्यार्थ्यास परीक्षेत यश मिळतें. उद्योगधंद्याची भरभराट होते. नोकरीत बढती मिळते.
अधिकार मिळतात. पराक्रम आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. लोकाच मानसन्मान मिळतो. सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात. घरात मंगलकार्ये घडतात. अशा शनीत काही गोष्टी अनिष्टही घडतात.
उदाहरणार्थ- तिसरा शनि आला म्हणजे द्रव्यलाभ होतो. वादविवादात यश मिळते. पराक्रमाला चांगला असला तरी संतती विषयी त्रासदायक गोष्टी घडतात. द्रव्याचा खर्च फार होतो.
आजारीपणात काळ जातो. मनाला त्रासदायक गोष्टी अशाच वेळी घडतात.
राशीपरत्वे शनीची इष्टानिष्ट फले :- Shani And Shani Sadesati
१) मेष राशीला चवथा व आठवा शनि अनिष्ट फले देतो.
२) वृषभ राशीला चवथा व बारावा शनि अनिष्ट फल देतो.
३) मिथुन राशीला चवथा व आठवा, बारावा शनि अनिष्ट फल देत नाही.
४) कर्क राशीला चवथा, आठवा, बारावा शनि अनिष्ट फल देत नाही.
५) सिंह राशीला चवथा, बारावा शनि अनिष्ट फल देतो.
६) कन्या राशीला आठवा व बारावा शनि अनिष्ट फले देतो.
७) तुळ राशीला चवथा, आठवा, बारावा शनि अनिष्ट फल देतो,
८) वृश्चिक राशीला चवथा व आठवा, बारावा शनि अनिष्ट फल देत नाही.
९) धनु राशीला आठवा व बारावा शनि अनिष्ट फल देतो.
१०) मकर राशीला चयथा, बारावा शनि अनिष्ट फल देतो.
११) कुंभ राशीला चवथा व आठवा, बारावा शनि अनिष्ट फल देत नाही.
१२) मीन राशीला चवथा, बारावा शनि अनिष्ट फल देतो.
शनीची जनावरे :- Shani And Shani Sadesati
मांजर, गाढव, ससा, लांडगे, अस्वल, मगर, साप, विषारी सरपटणारे प्राणी, म्हैस उंट.
शनिच्या दृष्टीची फले.:- Shani And Shani Sadesati
१) एक म्हणजे पहिल्या स्थानाची शनीची दृष्टी असेल तर तिसऱ्या वर्षी शरीरास पीडा होते. पैसा, धन आणि मित्र यांपासून नेहमी त्रास होतो. तापामुळे दुःख भोगावे लागते.
२) धनस्थानावर शनीची दृष्टी असेल तर धनाचा नाश होतो. कुटुंबातील माणुस सुद्धा शत्रूसारखा वागतो. तेराव्या वर्षी पाण्यापासून भीती असते. दगडापासून पीडा होते.
३) तिसन्या स्थानावर शनीची दृष्टी असेल तर फार पराक्रमी, फार बलवान, बहिण-भावडांपासून दुःख, लाभदायक गोष्टी घडताना प्रचंड नुकसान होते.
४) चवथ्यास्थानी शनीची दृष्टी असेल तर पहिल्या वर्षी शरीरास पीडा,चवथ्या वर्षी मातापित्यांना पीडा होते.
५) पंचमस्थानी शनीची दृष्टी असेल तर नेहमी पुत्रांबद्दल चिंता, धननाश होतो. परंतु प्रकृती निरोगी राहते.
६) षष्ठस्थानी शनीची दृष्टी असेल तर नेहमी शत्रूंचा नाश होतो.मातृपक्षाकडून सुख लाभत नाही. डोळ्यास व पायास पीडा होते. परमाविकार संभवतो.
७) सप्तमस्थानी शनीची दृष्टी असेल तर स्त्रीच्या शरीरास मृत्यूतुल्य पीडा, राजभय, धननाश या गोष्टी घडतात.
८) अष्टमस्थानी शनीची दृष्टी असेल तर चोरीचा आरोप, अपघात, ठेस लागून पीडा होणे, राजापासून भय, धननाश होतो.
९) नवमस्थानी शनीची दृष्टी असेल तर म्लेंच्छांपासून भाग्योदय होतो.भावांचे सुख लाभत नाही.
१०) दहावे स्थानी शनीची दृष्टी असेल तर मातृसुख पुष्कळ मिळते. परंतु वडीलांचे सुख मिळत नाही. स्वपराक्रमाने उपजीविका करणारा जातक बनतो.कायद्याचा अभ्यास, वकीली करतो किंवा कारावास घडतो.
११) एकादशस्थानी शनीची दृष्टी असेल तर सर्व प्रकारची सुखे आणि वृद्धावस्थेत पुत्रसुख मिळते. दृष्टी असेल तर कुकर्माकडे पैसा खर्च होतो.
१२) द्वादशस्थानी शनीची अतिकामी बनतो व स्त्री-पुरुषापासून नेहमी क्लेश होतात.
शनिचा भ्रमण काल :-Shani And Shani Sadesati
१) एका नक्षत्रांतून शनीला भ्रमण करण्यास एक वर्ष, एक महिना आणि दहा दिवस लागतात.
२) एका नक्षत्राचे चरण चार असतात. तेव्हा शनीला एका नक्षत्राचे चरणातून भ्रमण करण्यास तीन महिने दहा दिवस लागतात.
३) एका राशीत सव्वादोन नक्षत्रे असतात. तेव्हा एक राशीतून शनीला भ्रमण करण्यास दोन वर्षे सहा महिने लागतात.
४) शनि एका महिन्यात एक अंश भ्रमण करतो. ५) शनीला दोन कला जाण्यास एक दिवस लागतो.
६) शनीला स्वतःभोवती पृथ्वीप्रमाणे प्रदक्षिणा करण्यास १० तास २९ मिनिटे १० सेकंद लागतात. (७) शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास २९ ।। वर्षे लागतात.
याचा अर्थ आपल्या पृथ्वीवरची जेव्हा २९ ।। वर्षे होतात तेव्हा शनीचे एक वर्ष होते.
साडेसातीचा त्रास कोणाला होतो.? :- Shani And Shani Sadesati
१) ज्या कुंडलीत शनी चंद्राचे अशुभ योग असून शनी शत्रू राशीत असेल अशा व्यक्तींना साडेसातीमध्ये जास्त त्रास होण्याची शक्यता असते.
२) मूळचा शनि शत्रूराशीत असून शनीची महादशा / अंतर्दशा चालू असेल अशावेळी साडेसाती आल्यास जास्त त्रास होण्याची दाट शक्यता असते.
३) ३९ ते ४५ वयोगटातील व्यक्तींना साडेसाती त्रासदायक ठरते. या बरोबरच ज्या व्यक्तींचे पूर्ण जीवन खडतर जाते.
अशा व्यक्तींना साडेसाती एक निमित्त असते. कारण कायमच भोग भोगणे त्यांच्या नशीबी असते.
उदाहरणार्थ- केंद्रस्थानात शनी-मंगळ यांची प्रतियोग, युती, केंद्रयोग यापैकी कोणताही एक योग असेल तर अशी व्यक्ती नेहमीच त्रासाच्या चक्रात गुरफटलेली असते.
अशा व्यक्तींना साडेसातीचा वेगळेपणा जाणवत नाही.
साडेसातीचा त्रास कोणाला होत नाही.? :- Shani And Shani Sadesati
१) जन्म चंद्र स्वराशीत, उच्चराशीत बलवान शुभग्रहांनी युक्त, दृष्ट असता साडेसातीचा त्रास होण्याची शक्यता नसते.
२) जन्म चंद्राच्या मूळच्या शनीशी शनीचा शुभयोग असून शनि स्वराशीत, उच्चराशीत, मित्रराशीत असेल तर साडेसातीचा त्रास होत नाही.
३) साडेसातीच्या काळात चंद्राकडून गोचर शुभग्रहांचे (गुरु, बुध, शुक्र) भ्रमण सुरु असेल तर त्या काळात साडेसातीचा त्रास होत नाही.
४) वय वर्ष ३२ ते ४५ व्यतिरिक्त वय असताना साडेसातीचा विशेष त्रास होत नाही,
५) साडेसातीच्या काळशत शुभग्रहांची दशा, अंतर्दशा चालू असेल तर साडेसातीचा त्रास होत नाही. मानवी जीवनातील सुखदुःखांचा चढ-उतार हा कायमचा सुरु असतो.साडेसातीतच मनुष्य दुःखी होतो असे नाही.
त्यामुळे त्याला या काळात घाबरुन जाण्याचे कारण नाही.
जी व्यक्ती प्रामाणिक असेल, ज्यांचे कर्म चांगले असेल, जो मनाने व अध्यात्मिक दृष्टीने स्थिर झाला असेल
अशा व्यक्तींना सुख किंवा दुःख यांचा सहज स्वीकार करतात.
अशा व्यक्तींना साडेसातीचा वेगळेपणा जाणवत नाही. लहान मुलांना त्यांच्या वयाच्या १२ वर्षापर्यंत शनिचा कसलाच त्रास होत नाही.
साडेसातीमध्ये कोणती अशुभ फले मिळतात.? :- Shani And Shani Sadesati
मनुष्याला दुःख हे मानसिक, शारीरिक, अर्थिक दृष्टीने होण्याची शक्यता असते.
प्रत्येक दुःखात मानसिक हानी झालेली असते. अशावेळी मूळची पत्रिका महत्त्वाची ठरते.
त्या काळात शरीरिक दृष्टीने मूळची पत्रिका बिघडलेली असता बारावा (केंद्राच्या मागील राशीतील ) शनि आजारपण,
दवाखाना याविषयी अशुभ फले देण्याची शक्यता असते.
साडेसातीच्या काळात वैयक्तिक सौख्य, जोडीदार, भागीदारांचे व्यवसाय या दृष्टीने पत्रिका बिघडलेली असून चंद्र बलहीन (चंद्राच्या राशीतून शनि जाताना) एकटेपणा, कोर्टकचेरी,
निराशा, मानसिक विकार होण्याची शक्यता असते व साडेसातीच्या काळामध्ये आर्थिक, व्यवसायिक दृष्टीने बिघडलेली असता
चंद्राच्या दुसऱ्या स्थानातून ( राशीतून) शनि जात असता प्रचंड अर्थिक हानि होते. कर्जबाजारीपणा येण्याची शक्यता असते.
म्हणजे मूळची पत्रिका साडेसातीच्या काळात जर बिघडलेली असेल आणि ज्या विषयाशी संबंधित पत्रिकेत दोष असेल
त्याप्रमाणे त्रास होण्याची शक्यता असते. म्हणजे ज्यांचे धनस्थान,
धनेश, दशमेश व शुक्रबलवान असतील अशा व्यक्तींचे साडेसातीमध्ये अधिक नुकसान होणार नाही हे निश्चित.
म्हणजे या ठिकाणी मूळची प्रत्रिका महत्त्वाची ठरते.
मूळची पत्रिका बिघडते म्हणजे नेमके काय होते.? :- Shani And Shani Sadesati
जातकाचा जन्म होतो त्यावेळी ग्रहस्थितीनुसार सुखदुःखाचा सहभाग पूर्वक्रमानुसार निश्चित होतो.
यातील सुखाचा भाग शुभ व बलवान ग्रहांनी दिग्दर्शित होतो व दुःखाचा भाग पापग्रह, अशुभ ग्रहांनी दिग्दर्शिर्त होतो,
शनि हा पापग्रह असून दुःखाचा (भोग) कारक समजल्यामुळे शनीचे स्थान,
शनीची दृष्टी यांचा विचार करुन मिळणाऱ्या अशुभ फळांची नोंद घेता येते.
प्रत्येक वेळी शनि अशुभ फळे देईलच असे नसून शनि पत्रिकेत शुभस्थानी, स्व/उच्च राशीत असून रवि चंद्राच्या शुभ योगात असता जीवनात दुःखाचा सहभाग निश्चितपणे कमी असण्याची शक्यता असते.
पत्रिकेचा विचार केल्यास एकुण १२ स्थाने, १२ राशी, १२ ग्रह व २७ नक्षत्रे
यांचा स्थानगत / नक्षत्रगत व वर्गबळाच्या दृष्टीने विचार करुन पत्रिकेतील गुणदोषांचा विचार होतो.
यातील शुभयोगाचे फळ शुभग्रहांच्या दशा, अंतर्दशेच्या काळात तसेच शुभग्रहांच्या गोचर भ्रमणाच्या काळात मिळत असतात
व अशुभ योगाची फळे अशुभ ग्रहांच्या दशा-अंतर्दशेच्या काळात तसेच पापग्रहांच्या गोचर भ्रमणाच्या काळात मिळत असतात.
ही अशुभ फले फक्त साडेसातीमध्येच मिळतात असे नाही. साडेसातीबरोबर चवथा, आठवा शनीसुद्धा अशुभ फळे देण्याची शक्यता असते.
याशिवाय मंगळ, राहू, केतू यांसारख्या पापग्रहांचे भ्रमणसुद्धा अशुभ फळ देण्याची शक्यता असते. याउलट साडेसातीच्या काळात शुभग्रहांच्या दशा/ अंतर्दशा किंवा शुभग्रहांचे भ्रमण सुध्दा शुभ फळे देऊन जातात.
जीवनातील चांगला वाईट काळ हा नेहमीच अनुभवास येतो.
पूर्व कर्मानुसार योग्य वेळी शुभअशुभ घटना होत असतात.
साडेसातीसारख्या काळात मनाने न खचता आपले वर्तमान कर्म शुद्ध, सात्विक असता कोणतेही संकट येणार नाही.
याबद्दल विश्वास ठेवणे आवश्यक ठरते. याशिवाय काही उपाय / उपासना पूर्वाचार्यांनी सांगितल्या आहेत.
अशा काळात त्यांचा निश्चित उपयोग होतो.
साडेसातीच्या काळात करावयाचे उपाय / उपासना :- Shani And Shani Sadesati
१) शनिबरोबर मारुतीची उपासना नियमित करावी.
२) शनीला रुईच्या पानांची माळ, काळे उडीद, तेल दर शनिवारी वाहणे.
३) शनि महात्म्य / हनुमान चालिसा रोज वाचावे. ४) श्रीशंकराची उपासना नियमित करावी. (अभिषक / जप करावा)
५) मजूर, गरीब दुर्बलांना काळी वस्तू, घोंगडी, तेल, लोखंडी नाणी दान करावीत.
६) शनीस्तोत्राचे वाचन व पंचागातील पौराणमंत्राचा २३ हजार जप करुन घ्यावा.
यापैकी जमेल ते उपाय केल्यास निश्चितपणे होणारे त्रास कमी होऊन मानसिक बळ वाढते.
जे कायमच श्रीहनुमान व श्रीशंकराचे उपासक आहेत त्यांना साडेसातीच्या काळात निश्चितपणे संकटाची भीती राहत नाही.
मार्गदर्शन :-
ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!
आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.
(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)
अधिक माहिती साठी संपर्क :-
श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,(संतती समस्या निवारण विशेतज्ञ)