Shravan Sankashti Chaturthi 2024: श्रावण संकष्टी चतुर्थी: कसे कराल व्रत? बाप्पाची कृपा, इच्छा होईल पूर्ण; पाहा, चंद्रोदय वेळ

Shravan Sankashti Chaturthi 2024
श्रीपाद गुरुजी

Shravan Sankashti Chaturthi 2024: गणेशोत्सवापूर्वी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. व्रताचे महात्म्य आणि विविध शहरांतील चंद्रोदय वेळा जाणून घ्या…

Shravan Sankashti Chaturthi 2024: अगदी काही दिवसांनी गणेशोत्सव सुरू होत आहे. गणेश चतुर्थीची काहीशी लगबग सुरू झाली आहे. डेकोरेशन कसे करावे, यंदा वेगळे काय करावे, याची चाचपणी सुरू झाली आहे. त्याआधी येणारी श्रावणातील संकष्ट चतुर्थी महत्त्वाची मानली गेली आहे. चातुर्मासातील श्रावण मासात व्रत-वैकल्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. श्रावणातील संकष्ट चतुर्थी व्रतपूजन, प्रमुख शहरातील चंद्रोदय वेळा जाणून घेऊया…

गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. श्रावणातील वद्य चतुर्थीला गणरायाचे विशेष मानले जाणारे संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्रीगणेश चतुर्थीपूर्वी येणारी श्रावणातील संकष्ट चतुर्थी विशेष मानली जाते. 

विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो

संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे.  मात्र, चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते.

कान्हासाठी यशोदामातेने केले होते संकष्टी व्रत

भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्वश्रुत आहे. श्रीकृष्णांनी खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चारचौघा मुलांसारखे वागावे म्हणून यशोदामातेने हे व्रत केल्याचा उल्लेख आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. काही व्रते केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात, तर काही ईच्छापूर्तीसाठी केली जातात. संकष्ट चतुर्थीचे व्रत ईच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता, गणरायाची कृपादृष्टी लाभून ईच्छापूर्ती होते, असा भाविकांचा अनुभव आहे. या दिवशी उपासाइतकेच उपासनेलाही महत्त्व असते. आपली ईच्छा देवासमोर प्रगट करावी आणि ईच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. ईच्छेमागील हेतू शुद्ध असेल आणि आपले कर्म चांगले असेल, तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही, असे सांगितले जाते.

बहुला चतुर्थी व्रत अन् श्रीकृष्ण पूजन Shravan Sankashti Chaturthi 2024

या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते. बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे. गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन करणे शुभ मानले गेले आहे. हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात, दीर्घायुष्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजनही केले जाते. या सर्व अद्भूत योगांमुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, असे सांगितले जात आहे. 

श्रावण संकष्ट चतुर्थीचे कसे कराल व्रत? Shravan Sankashti Chaturthi 2024

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे.

१) श्रावण संकष्ट चतुर्थी: गुरुवार, २२ ऑगस्ट २०२४

२) श्रावण वद्य चतुर्थी प्रारंभ: गुरुवार, २२ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ०१ वाजून ४६ मिनिटे.

3) श्रावण वद्य चतुर्थी समाप्ती: शुक्रवार, २३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजून ३८ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रदोष काळी चंद्रोदय झाल्यावर केले जात असल्याने २२ ऑगस्ट २०२४ रोजी व्रताचरण करावे, असे सांगितले जात आहे.

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ Shravan Sankashti Chaturthi 2024

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
ठाणेरात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
पुणेरात्रौ ०८ वाजून ५८ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०८ वाजून ५८ मिनिटे
सातारारात्रौ ०८ वाजून ५८ मिनिटे
नाशिकरात्रौ ०८ वाजून ५८ मिनिटे
अहमदनगररात्रौ ०८ वाजून ५४ मिनिटे
धुळेरात्रौ ०८ वाजून ५४ मिनिटे
जळगावरात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे
वर्धारात्रौ ०८ वाजून ३८ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे
बीडरात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे
सांगलीरात्रौ ०८ वाजून ५६ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०८ वाजून ५९ मिनिटे
सोलापूररात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे
नागपूररात्रौ ०८ वाजून ३६ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०८ वाजून ४१ मिनिटे
अकोलारात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)रात्रौ ०८ वाजून ५२ मिनिटे
भुसावळरात्रौ ०८ वाजता ५० मिनिटे
परभणीरात्रौ ०८ वाजून ४६ मिनिटे
नांदेडरात्रौ ०८ वाजून ४३ मिनिटे
धाराशीवरात्रौ ०८ वाजून ४९ मिनिटे
भंडारारात्रौ ०८ वाजून ३४ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०८ वाजून ३६ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०८ वाजून ४८ मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे
पणजीरात्रौ ०८ वाजून ५९ मिनिटे
बेळगावरात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटे
इंदौररात्रौ ०८ वाजून ४८ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०८ वाजून ३८ मिनिटे

चला जाणून घेऊया चतुर्थी व्रताचे फायदे- चतुर्थी व्रताचे फायदे

  1. श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांचा आवडता महिना आहे. आणि त्यांचा मुलगा श्री गजाननाचा या महिन्यात येणारा चतुर्थीचा उपवास केकवर बर्फ लावल्यासारखा आहे असे म्हणतात. त्यामुळे सावन चतुर्थी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रतांचे शुभ फल मिळतात, तसेच हे व्रत प्रत्येक कार्यात यश आणि शापापासून मुक्ती मिळवण्यासाठीही लाभदायक आहे.
  2. चतुर्थीच्या दिवशी पूजेच्या वेळी श्री गजाननाला दुर्वा अर्पण केल्याने नकारात्मकता दूर होते, कारण श्री गणेशाला दुर्वा खूप प्रिय आहे, त्यामुळे घरात आनंद येतो.
  3. हे व्रत केल्याने धार्मिक लाभासोबतच आर्थिक लाभही होतो आणि धनाच्या प्रवाहाचा मार्गही मोकळा होतो.
  4. चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील संकटे दूर होतात, धन, सुख आणि सौभाग्य वाढते, शांतीचा अनुभव येतो आणि पुण्य संचित होते.
  5. श्रावण चतुर्थीला विशेष मनोकामना करून उपवास केल्यास श्री गणेश आपल्या भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात आणि त्याला यशाचे वरदान देतात.

मार्गदर्शन :-

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevasprathishthan@gmail.com या वर मला Email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे.तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Whatsapp ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,

Horoscope 8 July 2024

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित 
श्रीपाद विनायक जोशी (गुरुजी)
+91 94202 70997 +91 94232 70997
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,
संतती समस्या विशेतज्ञ
ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ, व्यसन मुक्ती औषध तज्ञ
(दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!