Taurus, वृषभ राशीची संपूर्ण माहिती,

Taurus
श्रीपाद गुरुजी

Taurus, राशी – परिचय,

वृषभ राशीची संपूर्ण माहिती वृषभ राशी परिचय नक्षत्र,महिला पुरुष अनुभवसिद्ध फळ महत्वाच्या घटनांचा काळ विशेष उपासना संपूर्ण माहिती सविस्तर पहा.

१) नक्षत्र :- Taurus

कृतिका नक्षत्राचे तीन चरणे, राहिणी नक्षत्राचे चार चरण व मृगशीर्ष नक्षत्राचे दोन चरण मिळून वृषभ रास बनते.

खालील तक्त्यात चंद्राचे अंश, नक्षत्र, चरण, राशीस्वामी, नक्षत्रस्वामी, योनी, नाडी, गण व नामाक्षर यांची माहिती दिली आहे.


चंद्राचे अंश
नक्षत्रचरणनामाक्षरराशी स्वामीनक्षत्र स्वामीयोनीनाडीगण
० ते १०
१० ते २३.२०
२३.२० ते ३०.००
कृतिका
रोहिणी
मृगशीर्ष
२,३,४,
१ ते ४
१,२
ई,ऊ,ए
ओ,वा,वी,वू
वे,वो
शुक्र
शुक्र
शुक्र
रवी
चंद्र
मंगळ
मेष
सर्प
सर्प
अंत्य
अंत्य
मध्य
राक्षस
मनुष्य
देव

वृषभ राशीची आकृती बैलासारखी आहे. पृथ्वीवर पडणाऱ्या क्रांती अंशावर आधारित विषववृत्त रेखेपासून २० अंशापर्यंत या राशीची व्याप्ती मानण्यात आली आहे.

२) वृषभ राशीची नांवे :- Taurus

उक्ष, गो, ताखुर, गोकुल व इंग्रजीत Taurus (टॉरस) ही रास लघुकाय, स्त्री राशी, दक्षिण दिशेला पर्वतावर शेतीची जमीन, गोशाला, अथवा मनात राहते.

ही कोमल व शांत, स्थिर स्वभावाची, युवा, गौरवर्णी, पृथ्वी तत्त्वाची रात्रीबली, लांबट शरीराची, ब्राह्मण जातीची, पृष्टोदय समरास आहे.

पशुपालक अथवा कृषिकारक, चतुष्पाद, ग्रामचारी व रजोगुणी, वात प्रकृतीच्या या राशीचे निवासस्थान कर्नाट,

देश असून तिचा स्वामी शुक्र, वार शुक्रवार व अंक ६ आहे. शरीरातील तोंड, जीभ, कपाळ, गळा, यावर याराशीचा अंमल आहे.

काव्य, शेती, खरेदी-विक्री व संपत्तीचे अधिपत्य वृषभ राशीकडे आहे. वन- जंगलात उत्पन्न होणारी फळे, फुले, श्वेत, गोधन, तांदूळ,

साखर, दूध, तूप, बैल, पांढरी वस्त्रे, सूत ज्यूट, कापूस मुद्रा या राशीची आहेत.

व मेंदिनीय ज्योतिषात आररलँड पार्शिया, हॉलंड, राशिया, जिओर्जिया, आदि देशांचे प्रतिनिधित्त्व वृषभ रास करते.

३) कृतिका नक्षत्राच्या जातकाची लक्षणे :-

कंजूस वृत्तीने राहून आवश्यक वस्तुंचा संग्रह करण्याची वृत्ति, खाण्या पिण्याचे शौकीन व विरूद्ध कार्यात अधिक रस घेणरे अशा कृतिका नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ति असतात.

यांच्या जीवनात रोज काही न काही त्रास असतो. असंगत कृत्यांत तल्लीन राहतात.

आक्रमक असून वाट्टेल ते करण्याची यांची तयारी असते.

खोटे बोलण्याची सवय असते. खादाड असतात. बोलणे कटू व बोचक असते.

व्यर्थ भ्रमंतीत वेळ घालवतात. यांच्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करण्यात यशस्वी ठरतील.

कोणतेही कार्य एकट्याने करणे यांना जमत नाही.

काही कृतिका नक्षत्रावर काही व्यक्ति भावनावश व धर्मश्रद्धाळू आढळतात.

अति विद्याव्यासंग व संशोधन यामुळे चिडचिडे व कलहप्रिय असतात.

एकांडेपणाची जाणीव आयुष्यभर असते. यांची न्यायशक्ती निष्पक्ष असते.

उच्च दर्जाच्या कलेत हे पारंगत असतात. सर्वांचे भले न करता फक्त आपल्या संपर्कातील लोकांचेच भले करतात.

४) कृतिका नक्षत्राच्या महिलांची लक्षणे :-

कृतिका नक्षत्रावर जन्मलेल्या महिला आपल्या रागीट स्वभावामुळे प्रत्येक ठिकाणी भांडण-तंटण करतात.

मत्सरी स्वभाव असतो. कफ प्रकृतिच्या आधिक्यामुळे ही शारीरिक कटकटींना सामोरे जावे लागते.

खाण्यापिण्याच्या शौकीने नेहमी उदर पोषणासाठी प्रयत्न करणाऱ्या कंजूसी स्वभावाच्या असतात.

पुरुषाविषयी जबरदस्त आकर्षण असते.

५) कृतिका नक्षत्राच्या व्याधी व व्याधी मुक्तीसाठी देवी उपाय :-

कृतिका नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींना बहुधा शूल-दाह, नेत्रपीडा, कटिपीडा, अनिद्रा, बेचैनी इत्यादि तक्रारीचा त्रास जागावतो.

या व्याधींच्या शमनार्थ श्वेतचंदन, मांघ, बुईची फुले, हुपाचा दिवा, तूप व गुगुळधूप तोळमिश्रीत अन्न आणि नैवेद्यद्वारा अधिदेवतेचे पूजन करावे.

स्वादान व गोदान करावे. पायसघृत व मोदकाचा बळी द्यावा. तीच यव व तुपाने हवन करावे. हवन समयी खालील मंत्र म्हणावा –

ॐ अनिर्वादिव ककुत्पत्तिः पृथिव्या अयम् । आता सिजिन्वति ॐ अशेष नमः ॥

या मंत्र का हार वेळा जप करावा.

६) रोहिणी नक्षत्राच्या जातकाची लक्षणे :-

रोहिणी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती बुद्धिचातुर्याने आपली कामे पूर्ण करणारे, गुणवान, धनसंपत्र, मृदुभाषी आणि सुंदर मुखड्याचे असतात.

राज्यशासनाकडून यांना सन्मान मिळतो. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस घेतात व त्यासाठी खर्चही खूप करतात.

स्वभाव गोड, शरीर आकर्षक, कोणतीही गोष्ट सहजपणे समजणारे व आपले म्हणणे दुसऱ्यांना सहज पटवणारे, शेती करणारे,

मंत्रोपासना व तांत्रिक कार्यातील आपली रुची गुप्त ठेवणारे, सामाजिक कार्यात पुढाकार घेत असूनही वेळप्रसंगी खोटे बोलणारे असे जातक रोहिणी नक्षत्रात जन्माला आलेले दिसतात.

बोलण्या-वागण्यात स्पष्टपणा, स्वच्छन्दता, दृढपणा व सौंदर्याकर्षण स्पष्ट दिसून येत.

समाजप्रेमी, प्रत्येकाकडून सहकार्य मिळवणारे, यशस्वी मध्यस्थ, ग्रामपंचायतीचे सरपंच, मंत्री, म्हणून लौकिक मिळवणारे, संगीत व कलापूर्ण तंत्रात यांना यश मिळते.

७) रोहिणी नक्षत्राच्या महिलांची लक्षणे :-

रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्या महिला सुंदर व आकर्षक शरीरयष्टीच्या पवित्र आचरणाच्या काळजीपूर्वक आपले जीवन निर्वाह करणाऱ्या आपल्या पतीच्या आहेत राहणाऱ्या, आई-वडिलांची सेवा शुश्रुषा करणाऱ्या, मुला बाळांच्या बाबतीत सुखी व ऐश्वर्यसंपन असतात.

या महिलांचे चारित्र्य उत्तम असते. खरे बोलण्याच्या सवयीमुळे सर्वत्र मान- मरातब मिळवणाऱ्या व सौंदर्यपूर्ण मुखाकृती आणि आकर्षक शरीराच्या असतात.

बुद्धि व विचार स्थिर असतात. धन-संपत्तिने परिपूर्ण असे गृहस्थजीवन जगणाऱ्या असतात.

८) रोहिणी नक्षत्राच्या व्याधी व व्याधीमुक्तीसाठी दैवी उपाय :- Taurus

रोहिणी नक्षत्रावर जन्मलेल्या श्री पुरूषांना बहुधा तारुण्यपीटिका, जेवणानंतर ज्वराभास, आळस, डोकेदुखी, कुक्षीशूल, भिन्नलिंगी व्यक्तीविषयी असणारी सहज आकर्षणाची व्याधी नेहमी त्रस्त करते.

या दोषांच्या परिहार्य श्वेतचंदन, कमलपुष्प, दशांगधूप, साजूक तूपाचा दिवा, दूध व नैवेद्याद्वारे ब्राह्मणांचे पूजन करावे. प्रत्येक रोहिणी नक्षत्राचे दिवशी काळ्या गाईचे दूध व सप्तमान्यांचे दान करावे व पांच कुमारी कन्यांना भोजन द्यावे.

आपामार्ग वनस्पतीची मुळ ताईतात घालून धारण करावी. आपामार्गाच्या समिधावर साजूक तूप, तीळ व यवादे हवन करावे. हवन करताना खालील मंत्र म्हणावा-

ॐ ब्रह्मज्ञानं प्रथमं पुचरस्ताद्विसीमतः सुरूच्चोव्वेन आवः सबुघ्न्या उपमा यस्प विष्ठाः सतश्चयोदिम सतश्चव्विवः ॐ ब्रह्मणे नमः

मध तूप आणि तांदळाची खीर यांचा बळी द्यावा.

या मंत्राचा पाच हजार वेळा जप करावा.

९) मृगशीर्ष नक्षत्राच्या जातकाची लक्षणे :-

मृगशीर्ष नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती गंभीर, वाक्पटू, चंचल आणि स्वाभिमानी असतात. यांना अपमान खपत नाही. दुसऱ्यांच्याविषयी मनात अढी व ईर्ष्या असते. आपल्या जीवनात नाव मिळवून उच्च स्थान मिळवतात.

मृगनक्षत्र नक्षत्राच्या व्यक्ती शस्त्रकलेत पारंगत असतात. नम्रस्वभाव व आदरणीय व्यक्तींच्या बाबतीत आदराची भावना यांच्यात असते. राज्य पक्षाकडून अनुकूलता प्राप्त होते. मंत्र्याशी मैत्री असते.

धार्मिक वृत्तीचे व सन्मार्गावर चालणारे असतात. भोगविलासात विशेष रस यांना असतो. नवनवीन अनुभवांचा संग्रह यांच्याकडे असतो. स्वभावाने भावूक असल्याने चटकन प्रभावित होतात.

पैशाची बचत कला यांना चांगली अवगत असूनही आवश्यक बाबीसाठी खूप खर्च करतात. अनेक विचारांचे अनुयायी असतात. व आपले विचार प्रकट करताना हाव-भाव करण्यांची सवय असते.

आपल्या प्रगतीसाठी निरंतर झटण्याची वृत्ती असते. आंतरिक प्रेरणेमुळे सामान्यपणे भाग्यशाली असतात. मनोवैज्ञानिकाच्या रूपात प्रसिद्धी यांना मिळते.

१०) मृगशीर्ष नक्षत्राच्या महिलांची लक्षणे :- Taurus

मृगशीर्ष नक्षत्राच्या महिला काहीशा भिन्न्या स्वभावाच्या परंतु चतुर, पतिभक्तीपरायण, चंचल, हसतमुखी, रसिक व मनोहर, विद्वान, पुत्रवती, वडिलांचे आज्ञांकित, सुखसंपत्र, खर्चिक स्वभावाच्या, माता-पिताज्ञांकित असतात. श्रेष्ठजनाविषयी आदराची भावना यांच्यात असते. काटकसरी व दुसऱ्यावर आसक्त असतात.

११) मृगशीर्ष नक्षत्राच्या व्याधी व व्याधीमुक्ती देवी उपाय :-

मृगशीर्ष नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींच्या शरीरात बहुधा आलटून पालटून वायु- पित्त-कफ हे त्रिदोष निर्माण होऊन त्रास होतो. अर्धागवावु, रक्तचाप व इतर तत्सम रोगांपासून त्रास होण्याची शक्यता असते.

या दोष परिहारार्थ मृग नक्षत्राच्या दिवशी श्वेतचंदन, गंध, नीरजपुष्प, दशागंधूप, साजूक तूपाचा दिवा व पायस आणि मालपुआ (आपूप) च्या नैवेद्याने चंद्राची पूजाअर्चा करावी. एकदा सवत्सधेनुचे दान करावे.

दर मृगनक्षत्राच्या दिवशी दही भाताचे दान द्यावे. ‘जयन्तीमूळ’ ताईतात घालून धारण करावे. खालील मंत्राने दही व दुधाने हवन करून दही-भात व साखरेचा बली द्यावा.

ॐ इममदेवा असफल गूं गुबध्वं महतेक्षप्राय महते जैष्ठवाय महते जान राज्यायेन्द्रस्योन्द्रियाय ।

इमममुष्य पुत्रमुष्ये पुत्रमस्यै विषएववो भी राजासोमो स्मांक ब्राह्मणाना गुं राजा ॐ चंद्रमसे नमः ॥

या मंत्राचा पांच हजार जप करणेही अवाश्यक आहे.

१२) वृषभ राशीच्या व्यक्तींचे भविष्य :- Taurus

वृषभ राशीच्या व्यक्ती स्थिर गतीने चालणाऱ्या असतात. बुद्धीश्रेष्ठ, आकर्षक व्यक्तिमत्व, सांसारिक भोग-उपभोगसंपन्न, नेहमी चांगल्या कामात रस घेणाऱ्या व वैयक्तिक चातुर्याने सौख्यमय जीवन जगणान्या असतात.

शेतीविषयक कामे चांगली करू शकतात. चेहरा आणि जांपा काहींशा मोठ्या असातात. जीवनाचा पूर्वार्ध दुःखी तर उत्तरार्ध सुखाचा जातो. गोधन सुख मिळते. यांच्या पाठीवर किंवा चेहऱ्यावर ‘मस्सा’ किंवा लसूणाचा व्रण असतो.

जाणून-बुजून कोणालाही फसवण्याची भावना नसते. बेपरवाई व आळशी असतात. अनेक स्त्रियांचा सुख-स्नेह-संबंध यांना सहज सुलभ असतो. चालण्या बोलण्यात अल्लडपणा दिसून येतो. कामशक्ती प्रबळ असते.

दुःख सहन करूनही आनंदी राहणे हा यांचा स्थायी भाव असतो. खाण्यापिण्याचे शौकीन असतात.

वृषभ राशींच्या महिलांचे नाक व ओठ काहीसे मोठे असतात. स्वधर्मापेक्षा इतर धर्मावर आस्था असते. स्वल्पमत संततीचे सुख मिळते. सर्व प्रकारची कामे करण्यात समर्थं परंतु स्वजनांच्या विपत्तीकाळात निराश होतात.

परिश्रमी स्वभावामुळे भूक चांगली असते. जलभय आणि शूलरोगाची मरणापर्यंत भीती असते.

१३) जातका भरणव चंद्र निर्णयाप्रमाणे :-

वृषभ राशीत चंद्र असता जातक कमी तेजस्वी असतो. विश्वसनीयता कमी असते. सत्यभाषी, धनवान, कामासक्त, पत्नीच्या हुकुमात राहणारा असतो.

दीर्घजीवी शरीरावर कमी केस, मातापिता व गुरुजनांचा भक्त, राज्याधिकारी, श्रीमंत व विद्वानांचा परमप्रिय असतो. सभा-सोसायटीत चातुर्य दाखवणारा, स्वल्प साधनात सुखी तरी अधिक साधनसंपन्नता प्राप्त होते.

लहानपणी जन्माचे पहिले वर्ष त्रासदायक असते. तिसऱ्यावर्षी अग्निभय असते. ७ व्या वर्षी कॉलरा, देवी, प्लीहा रोगाचे भय असते. नवव्यावर्षी नाना प्रकारचा त्रास भोगावा लागतो.

दहाव्या वर्षी अतिसार किंवा अपघातामुळे रूधिरवमनाची भिती असते. बाराव्या वर्षी झाडावरून किंवा उंचावरून पडण्याचे भय असते.

१६ व्या वर्षी सर्पभय, विषारीजंतू पासून ईजा होण्याचा संभव असतो. १९ व्यावर्षी अनेक प्रकारच्या पीडा सोसाव्या लागतात. पंचवीसाव्या वर्षी जलभय असते. तीसाव्या आणि बत्तीसाव्या वर्षी शरीर अरिष्ट भय असते.

जन्मकुंडलीत वृषभ राशीच्या चंद्रावर बुध, गुरू किंवा चंद्राची दृष्टी असेल तर शहाण्णव वर्षाचे आयुष्य लाभते.

चंद्रावर पापग्रहांची दृष्टी असेल तर अकाली मृत्यू येण्याचा संभव असतो.

१४) वृषभ राशीची अनुभवसिद्ध फले :- Taurus

कोणत्याही परिस्थितीत जय-यश-भोग व श्रीप्राप्तीची अपेक्षा वृषभ राशीच्या व्यक्ती करतात. वृषभ व्यक्ती गौरवर्णी किंवा गव्हाळी रंगाच्या असतात.

चमकदार चेहरा, मजबूत मध्यम ऊंचीचे शरीर, कान्तीयुक्त मनमोहक व्यक्तिमत्त्व, शत्रूंचा बीमोड करणारे आई-वडिलांची स्थिती साधारण अल्प सुखी जीवन, खर्चिक स्वभाव, संभोगाची मोठी आवड, वारसाहक्काने मिळकतीचा उपयोग

स्त्रीप्रेम व विलासी वस्तुंची आवड, कन्या संततीकडून साधारण सुख तर पुत्रसुखात बाधायोग, शेतीवाडी पशुपक्षी पालनाचा छंद, जन्मकाळ सुखाचा तर मध्य व अंतकाळ दुःखाचा, प्रारब्ध व प्रयत्नाचा समन्वय साधणारे असे महाभाग वृषभ राशीचे असातत.

सुखात सर्व विसरणारे व दुःखात विवेकहीन होऊन सर्वांना आपले दुःख सांगत बसणारे, मधुमेह, शीतज्वर, गुर्भेद्रियाचे रोग, तोंडाला येणारा बेचवपणा इत्यादि शारीरिक त्रास भोगणारे असतात.

कुटुंब व जन्मठिकाणापासून दूर रहावे लागते. पतिपत्नीत बहुधा भांडण चालूच असते.

कधी कधी या भांडणाचे पर्यवसान एकमेकांशी न बोलण्यात ही होते.

प्रतिकूल :-

वृषभ व्यक्तीना दरवर्षी नोव्हेंबर महिना

दर महिन्याच्या ५.१५,२० तारखा.

शनिवार,

लाल रंगाच्या वस्त्रादि वस्तू व सिंह, धनु, व मेष राशीच्या व्यक्ती प्रतिकूल असतात.

१५) वृषभ व्यक्तींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचा काळ :-

वयोवर्षे चौदा ते एकवीस किंवा पंचवीस ते एकोणतीस या काळात विवाहयोग.

बहुधा दोन होण्याचा योग संभवतो. वयोवर्षे सात व अठ्ठावीस ते पस्तीस या काळात संपूर्ण कुटुंबात रोग, ऋण व दुःखाचा कळस होईल.

सांपत्तिक नुकसान, परातील भांडणे, माता-पित्यांला त्रास, घर व शहरातून बदलीवर जाणे, कर्ज काढणे, शरीरिक त्रास असा प्रतिकूल काळ राहील.

आठ ते सोळा व छत्तीस ते सत्तेचाळीस हा कालखंडही अनेक दृष्टीने प्रतिकूल राहील.

बदनामी, चोरी सारख्या घटना पडतील. या बरोबरच कांही भाग्योदयकारक गोष्टी घडतील.

वयोवर्षे ४६ ते ५१ हा काळ अत्यंत खबरदारीचा राहील. या काळात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा. कुटुंबातील कोणाचा तरी मृत्यू संभवतो.

त्रेपन्नावे वर्ष मृत्युसम पीडेचे जाईल यातून सावरलात तर वयोवर्षे अठ्याहत्तर पर्यंत आयुष्य राहील.

पायावर किंवा कमरेच्या खाली काळा तिळ किंवा तीव्र जखमेचा व्रण असेल तर तो शुभ समजावा.

आयुष्यात तीन स्त्रियांशी खूप मैत्री राहील. एखाद्या स्त्रीकडून ताहमत येण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी जे काम कराल त्यात यश येईल. तसेच शक्यतो वृषभ, मिथुन मकर, आणि कुंभ राशींच्या लोकांशी व्यवहार करावा.

१६) वृषभ व्यक्तींसाठी विशेष उपासना :- Taurus

वृषभ राशी किंवा वृषभ लग्नाच्या व्यक्तीना स्त्रीप्रेमापासून त्रास होतो, डोले व कानात विकृती येते.

ज्वरादि पीडाही त्रस्त करते. या त्रासाच्या परिहारासाठी दुर्गासप्तशतीपाठ, जप आणि हवन करावे. तसेच

ॐ गोपालाय उत्तरध्वजाय नमः’ या मंत्राचा रोज कमीत कम १०८ जप करावा. वेळा

‘नारायण कवच’ सिद्ध करून ते धारण करावे. ‘शुक्रवारचे व्रत’ करावे. त्याबरोबरच खालील मंत्राचा रोज कमीत कमी १०८ वेळा जप करावा.

ॐ सर्वस्वरूपे सर्वेशेस सर्व शक्ति समन्विते । भयेभ्या स्वाहिनो देवि दुर्गे नमोस्तुते ।। ‘हिरा रत्न’ किंवा त्यास पर्यायी रत्न वापरावे.

ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी WHATSAPP ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. तसे असल्यास, आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे. धन्यवाद!

मार्गदर्शन :-

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevaprathishthan@gmail.com या वर मला email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित
श्रीपाद विनायक जोशी ( गुरुजी ) 9420270997
Astrologyist & Palmistry, Vastu Shastra Consultant
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,(संतती समस्या निवारण विशेतज्ञ)

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Weekly Love Horoscope 18 To 24 November 2024

Weekly Love Horoscope 18 To 24 November 2024: साप्ताहिक प्रेम राशीभविष्य १८ ते २४ नोव्हेंबर २०२४: मेषसह ३ राशींच्या नात्यात गैरसमज; या ३ लकी राशींना नोकरीत पदोन्नतीच्या संधी; गुरुपुष्य योगात होईल भरभराट! अनावश्यक वाद टाळा, 

Read More »

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!