Tortoise Vastu Tips, घरात लक्ष्मी खेचून आणते कासव..फक्त या योग्य ठिकाणी ठेवावे..घरात धनाची बरसात होईल..वास्तूशास्त्र धनलाभ उपाय,

Tortoise Vastu Tips
श्रीपाद गुरुजी

घरात लक्ष्मी खेचून आणते कासव.. फक्त या योग्य ठिकाणी ठेवावे..घरात धनाची बरसात होईल..वास्तूशास्त्र धनलाभ उपाय

Tortoise Vastu Tips, नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू ध-र्मात घरामध्ये कासव असणे किंवा ठेवणे शुभ मानले जाते. हिंदु ध र्म मान्यतेनुसार प्रभू विष्णुंच एक रुप कासव होते. भगवान श्री विष्णूंनी कासवाचे रुप धारण करुन समुद्र मंथन मध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यादरम्यान मंदार पर्वत आपल्या कवचावर सांभाळले होते.

हिंदू ध-र्मातील ग्रंथानुसार जिथे कासव असतं तिथे माता लक्ष्मीचा वास असतो असे देखील म्हटलं जातं. हे कासव आपल्या घरात आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहावा म्हणून कासव ठेवला जातो. परंतू त्याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा कासव योग्य दिशेत ठेवला असेल.

नाहीतर अशुभ परिणाम होऊ शकतात. मग त्याने घराची अधोगती होऊ शकते.कासव घरी ठेवल्याने धन प्राप्ती होते. धनासंबंधी समस्या कासव ठेवल्याने दूर होतात. पण या साठी क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानले गेले आहे. तसेच घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीघार्यु प्राप्त होते आणि आ-जारापासून मुक्तीदेखील मिळते.

दिशा महत्व :- Tortoise Vastu Tips

असे फा-यदे या कासव घरामध्ये योग्य दिशेला ठेवल्याने होतात. आपण आपल्या घरामध्ये कासव आणून त्याला योग्य ती विधी करून योग्य जागी ठेवल्याने आपल्याला नोकरी आणि परीक्षेत पण यश मिळू लागतं. कासव हे आपल्या कुटुंबाला लोकांच्या वाईट नजरेपासून देखील वाचवतं.

याने घरात सुख-शांती नांदते. तसेच पैसा येण्याचे मार्ग अधिक निर्माण होतात. पण हिंदु ध-र्मात या कासवाला घरात किंवा आपल्या व्यापारामध्ये योग्य जागी ठेवल्यास खुप फा-यदा होतो व अयोग्य ठिकाणी ठेवल्यास तोटा. आपल्या व्यापारात वृद्धी होण्यासाठी हे कासव उत्तरेकडे तोंड करून ठेवा. या दिशेला कासव असल्यास व्यापारात धन आणि पैसा या दोन्ही मध्ये वाढ होत जाते.

या जगात सर्व जीवांमध्ये सर्वात जास्त कासव जगते आणि हे जसजसे मोठे होते तसे त्याचा आकार ही मोठा होत जातो. यामुळे याला व्यापारात उत्तर दिशेला ठेवले जाते. धातूपासून बनलेले कासव पाण्याच्या वाटीत ठेऊन आपल्या घराच्या उत्तर दिशेला देवावे. घरामध्ये कासव हे ठेवण्यासाठी उत्तर दिशा महत्त्वाचे मानली जाते.

जर तुमच्या घरात उत्तर दिशेला तुमची बेडरूम असेल तर चुकूनही पाण्याने भरलेल्या वाटीतील कासव त्या दिशेला ठेऊ नका. त्या दिशेला फक्त धातूचे चा कासव ठेवावे. फेंगशुई च्या नियमना नुसार तुमच्या बेडरूममध्ये पाणी ठेवणे खूप शुभ मानले जाते.

कासवाच्या निगडित जे नियम किंवा कोणत्याही दिशेविषय माहीती ही फेंगशुईच्या माध्यमातून मिळवली जाते. या कासवाचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. त्यामुळे त्याला आपल्या घरात किंवा ऑफिस मध्ये ठेवने शुभ मानले जाते.

घरात ही एक वस्तू ठेवल्याने लक्ष्मी राहते कायम प्रसन्न, कुटूंबातील सदस्यांना मिळते दिर्घायूष्य

घरामध्ये धन आणि धान्य प्राप्त होते. कोणत्याही प्रकारच्या वास्तुदोष किंवा आरोग्याशी संबंधित समस्या किंवा धनप्राप्तीसाठी क्रिस्टल कासव घरात ठेवण्याचा सल्ला दिला जातो.हिंदू धर्मात कासवाला (tortoise vastu Tips) अतिशय पवित्र मानले जाते. कासवाला भगवान विष्णूचा अवतार मानले जाते. घरामध्ये कासव ठेवल्याने लक्ष्मीच्या आशीर्वादासह सुख-समृद्धी येते. त्याचबरोबर समुद्रमंथनाच्या वेळी कासवाची उत्पत्ती झाल्याचेही सांगितले जाते. वास्तू आणि फेंगशुईमध्येही धातूचे कासव खूप शुभ मानले जाते.

घरामध्ये क्रिस्टल कासव ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. असे मानले जाते की, भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मी देखील घरात निवास करते आणि सकारात्मक उर्जेचा प्रवाह निर्माण करते. घरामध्ये धन आणि धान्य प्राप्त होते. कोणत्याही प्रकारच्या वास्तुदोष किंवा आरोग्याशी संबंधित समस्या किंवा धनप्राप्तीसाठी क्रिस्टल कासव घरात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घेऊया त्यासंबंधीचे नियम आणि फायदे.

१) क्रिस्टल कासवाचे फायदे Tortoise Vastu Tips

वास्तू तज्ज्ञ सांगतात की, जर एखाद्याला पैशाशी संबंधित समस्या असतील तर त्याने घरात क्रिस्टल कासव ठेवावे. असे म्हटले जाते की घरात क्रिस्टल कासव ठेवल्यास कुटुंबातील सदस्यांना दीर्घायुष्य मिळते. यासोबतच सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळते.दुसरीकडे, सफ्टिकाचे कासव घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळत नसेल तर त्याने घरात क्रिस्टल कासव ठेवावे. यामुळे व्यक्तीला नोकरीत यश मिळेल आणि नोकरीत चांगली कामगिरी करता येईल. सौभाग्य आणण्यासाठी ते ऑफिस किंवा बेडरूममध्ये देखील ठेवता येते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले गेले आहे.

2) क्रिस्टल कासवासंबंधी नियम Tortoise Vastu Tips

वास्तुशास्त्रानुसार क्रिस्टल कासव पाळणे तेव्हाच शुभ फळ देते जेव्हा ते योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी ठेवले जाते. कासव हा अतिशय शांत प्राणी असून त्याला घरात ठेवल्याने शांततेचे वातावरण निर्माण होते. या नियमांचे योग्य पालन केल्यास कासव तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल. हे एक प्रभावी यंत्र आहे, ज्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात.

३) इतर फायदेही जाणून घ्या Tortoise Vastu Tips

  • १) कासव ठेवल्याने नोकरी आणि परीक्षेत देखील यश हाती लागतं. कासव आपल्या कुटुंबाला वाईट नजरपासून देखील वाचवतं. याने घरात सुख-शांती नांदते.
  • 2) नवीन व्यापार सुरु करताना दुकान किंवा ऑफिसमध्ये चांदीचा कासव ठेवणे शुभ मानले गेले आहे. याने जीवनात ऊर्जेचा प्रवाह होता आणि स्थिरता राहते.
  • ३) फेंगशुईनुसार ऑफिस किंवा घराच्या मागील भागात म्हणजे बैकयार्डमध्ये कासव ठेवल्याने अपार ऊर्जा जाणवते आणि आपले सर्व कार्य योग्य रित्या पार पडतात.
  • ४) करिअरमध्ये उन्न्तीसाठी काळ्या रंगाचा कासव उत्तर दिशेत ठेवावा. ऊर्जा वाढल्याने व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची शक्यता वाढते.
  • ५) घराच्या मुख्य दारात पश्चित दिशेकडे कासव ठेवल्याने सुरक्षा मिळते.
  • ६)कासव गुड लकसाठी ठेवण्यात येतं म्हणून पाठीवर पिल्लं असलेल्या मादा कासव ठेवल्याने दंपत्तीला संतान सुख मिळतं.

घरात कासव असेल तर मुळीच ही चूक करू नका; अन्यथा मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल.!

अनेक जण धनप्राप्तीसाठी घरामध्ये कासव ठेवतात.काही जण जिवंत कासव ठेवतात तर काही संबंध धातूचे कासव घरामध्ये ठेवत असतात . कासव कोणतेही असू द्या हे कासव आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव पैसा कशाही पद्धतीने खेचून आणते परंतु का संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे असते.

जर कासव संबंधित हे नियम योग्य पद्धतीने पाळले गेले नाही तर आपल्या घरामध्ये पैसा खेचत आणले राहतो तोच कासव आपल्या घरातील पैसा बाहेर सुद्धा नेवू शकतो अशाने तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया घरांमध्ये नेमके कोणते कासव खरेदी करावे ते कासव कोणत्या दिशेला ठेवावे.

कासवाचे तोंड कसे असावे :- Tortoise Vastu Tips

कासवाचे तोंड कसे असावे व कासव पाण्यात संदर्भातील कोणते नियम महत्त्वाचे आहेत याबद्दल आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल. कासव हा मंद गतीने चालणारा दीर्घायुष्य असा जीव आहे आणि त्या घरामध्ये कासव राहते त्या घरामध्ये नेहमी शुभ वातावरण असते.

कासवा मुळे फक्त आर्थिक प्रगती निर्माण होत नाही तर ज्या ठिकाणी कासव असतो अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे मानसिक आरोग्य सुद्धा चांगले राहते व त्यांच्या घरातील नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जेमध्ये परावर्तित होत असते.कासव ठेवण्याची सर्वोत्तम जागा म्हणजे आपले देवघर असू शकते किंवा आपल्या घरातील हॉल असू शकते पण तू बाथरूमला चिकटून असलेल्या रूम मध्ये किंवा बेडरूममध्ये हे कासव कधीच चुकूनही ठेवू नका.

कासवाचे प्रकार :- Tortoise Vastu Tips

बाजारामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे कासव मिळत असतात, जर तुम्हाला सप्त धातूचे कासव मिळाले तर ते अतिशय उत्तम असते काही कासव हे आपल्याला स्पटिक रूपामध्ये म्हणजेच काचेच्या स्वरूपामुळे सुद्धा पाहायला मिळतात विशेष करून तांबे या धातूचे कासव शुभ मानले जाते. या धातूमुळे आपल्या घरांमध्ये धनसंपत्ती खेचून घेण्याची क्षमता असते.

असे मानले जाते जेव्हा तुम्ही हे खास बाजारातून आपल्या घरी आणतात तेव्हा स्वच्छ पाण्याने त्या कासवाला स्नान घालायचे आहे. वास्तुशास्त्रामध्ये कासवाला महत्त्व असे स्थान आहे कारण की कासं हे श्री महालक्ष्मी यांचे रूप आहे त्याचबरोबर हे भगवान विष्णू यांची सुद्धा एक रूप मानले जाते.

समुद्रमंथन :- Tortoise Vastu Tips

समुद्रमंथनातून जेव्हा चौदा रत्ने बाहेर पडले तेव्हा कासव एक रत्न सुद्धा समुद्रमंथनातून बाहेर पडले म्हणून कासवाला अनन्य असे महत्व आहे म्हणून हे कासव घरी आल्यानंतर एकदा कसं झाल्यास हळद-कुंकू अभिर गुलाब जे काही पूजेची सामग्री तुमच्याकडे असेल त्या सामग्री द्वारे कासवाची पूजा करा.

आता तो कासव ठेवायचे कुठे अनेकांना हा प्रश्न नेहमी सतावत असतो की कासव नेमका आपल्या घरामध्ये कुठे कोणत्या दिशेला ठेवावे जर तुमच्याकडे धातूचे कासव असेल तर घरामध्ये एखाद्या धातूची प्लेट घेऊन त्यावर ठेवायचे आहे आणि त्यामध्ये पाणी सुद्धा आपल्याला ठेवायचे आहे. कासव पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल अशा पद्धतीने पाणी आपल्याला प्लेटमध्ये भरून ठेवायचे आहे तरी पूर्ण प्लेट पाण्याने भरली नाही तरी निदान कासवाचे पाय पाण्यामध्ये बुडतील असे भरायचे आहे.

कासव स्थान :- 

एकदा कासव आपल्या घरामध्ये आणल्यानंतर त्याचे स्थान वारंवार बदलू नका. तुम्ही वारंवार स्थान बदलल्यास लक्ष्मी आपले स्थान बदलते अशावेळी घरात येणारा पैसा थांबतो व उलट घरातील पैसा बाहेर जाऊ लागतो. कासवाची सर्वात उत्तम जागाही देऊ घराजवळची असते.

जर तरीसुद्धा तुम्हाला धनलाभ होत नसेल तर एकदा वास्तू शास्त्राप्रमाणे देवघर तपासून पहावे , त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये कासव असेल तर कासवाची मुख सुद्धा महत्त्वाचे असते. कासवाचे मुख हे नेहमी आपल्या घरामध्ये पडलेले असावे जर घराच्या बाहेर असेल तर घरामध्ये येणारा पैसा हा बाहेर जातो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे.तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मार्गदर्शन :-

आपल्याला या संदर्भात काही समस्या, काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान नक्कीच करण्यात येईल, किंवा याबत अधिक मार्गदर्शन हवे असल्यास आपण shreesevasprathishthan@gmail.com या वर मला Email करू शकतात किंवा खाली संपर्क सुविधा दिलेली आहे.

(सूचना :- आपली कुंडली पाहायची असेल, प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच सहकार्य करेल, पण कामाच्या व्याप जास्त असल्या कारणाने विलंब होऊ शकतो, ज्यांची संयम व वाट पाहण्याची तयारी असेल तरच कुंडली पाहण्याचा आग्रह करावा.)

ज्योतिष आणि अध्यात्म विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Whatsapp ग्रुपला अवश्य भेट द्या. ग्रुपला सामील होण्यासाठी येथे क्लिक करा,

Horoscope 8 July 2024

अधिक माहिती साठी संपर्क :-

श्री सेवा प्रतिष्ठान, संचलित 
श्रीपाद विनायक जोशी (गुरुजी)
+91 94202 70997 +91 94232 70997
कुंडली विश्लेषण व सुयोग्य मार्गदर्शन,
संतती समस्या विशेतज्ञ
ज्योतिष भास्कर पुरस्कार प्राप्त,
दुर्मिळ वनस्पती विशेतज्ञ, व्यसन मुक्ती औषध तज्ञ
(दारू, सिगारेट, तंबाकू, अफू, गांजा, चिंगम,)

Join Our Group

Social Share

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

Recent Post

Tags

About Me

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Categories

Website Developer

श्रीपाद जोशी (गुरुजी)

Trending Topics

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. 

ज्योतिष शास्त्र

वास्तुशास्त्र

विवाह

नक्षत्र

राशिभविष्य

error: Content is protected !!